कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण
- छायाचित्रण भाग १. छायाचित्रण समजून घेताना
- छायाचित्रण भाग २. कॅमेर्यांचे प्रकार
- छायाचित्रण भाग ३. डीएस्एल्आर कॅमेर्यांची रचना
- छायाचित्रण भाग ४. लेन्सेसबद्दल थोडेसे
- छायाचित्रण भाग ५. अॅक्सेसरीज्
- छायाचित्रण भाग ६. मॅक्रो आणि क्लोजअप्
- छायाचित्रण भाग ७. लेन्स फिल्टर्स
- छायाचित्रण भाग ८. रचनाविचार (कॉम्पोझिशन)
- छायाचित्रण भाग ९. छायाप्रकाशाचा खेळ
- छायाचित्रण भाग १०. एक्स्पोजर ट्रायॅंगल आणि हिस्टोग्राम
- छायाचित्रण भाग ११. उद्भासन मापन आणि मीटरींग
- छायाचित्रण भाग १२. प्रतिमासंस्करणाची मूलभूत तत्त्वे
Book traversal links for कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण
कॅनन, निकॉन आणि डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण
(हा लेख म्हणजे आधी गुरूघंटाल यांच्या एका लेखावर दिलेल्या प्रतिसादांचे संकलन आहे. त्यात काही अजून मुद्दे समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. सौजन्य - पैसाताई, विसुनाना, संपत इ.
द्विरुक्ती वाटल्यास काढून टाकला तरी चालेल.)
डी. एस्. एल्. आर्. छायाचित्रण -
‘A good camera helps a good photographer; it doesn't make one.’जेव्हा एखादी नवखी छायाचित्रकार डी. एस्. एल्. आर्. घेण्याचं ठरवते तेव्हा बाजारात अक्षरशः ढिगाने उपलब्ध असलेल्या पर्यायांमुळे गोंधळून जाते. इथे सर्वात आधी हे लक्षात ठेवले पाहिजे की छायाचित्रण महत्त्वाचे आहे. तुमच्या हातातील साधने नंतर. फोटो तुम्ही काढता, तुमचा कॅमेरा नाही. मग या दर्जाचे छायाचित्रण करण्याचे ठरवल्यानंतर आधी हे ठरवा की तुम्हाला सुरुवातीला कोणत्या प्रकारचे छायाचित्रण करायचे आहे. पोर्ट्रेट्स, वाइल्डलाईफ, मॅक्रो, प्रॉडक्ट्स, आर्किटेक्चरल, इंडस्ट्रियल, वेडिंग्ज व इव्हेंट्स, बर्डिंग, लॅण्डस्केप्स, इ.... मग त्यातही पुढे तुम्ही किती प्रोफेशनल होणार, तुमचा प्रकाशचित्रे विकण्याचा मनोदय आहे का, की फक्त हौशी. तुम्हाला स्टुडिओ फोटोग्राफी करायची आहे की आउटडोअर. ह्यातला एक प्रकार निश्चित केला की त्याला कुठल्या प्रकारचे साहित्य लागते ते शोधावे. उदा. पोर्ट्रेट्स ला स्टुडिओ, स्पीडलाइट्स, सॉफ्टबॉक्सेस, रिफ्लेक्टर्स, बॅकड्रॉप्स इ. घ्यावे लागेल तर वाइल्डलाईफ साठी यातले काहीच लागणार नाही. पण वाइल्डलाईफला जास्तीत जास्त फोकल लेंग्थवाल्या लेन्सेस आणि फास्टेस्ट एफ्. पी. एस्. (फ्रेम्स पर सेकंड्स) देणारा अत्युच्च दर्जाचा कॅमेरा लागेल, तर पोर्ट्रेट्स साठी अगदी एपीएस् साइजचा (१.६ किंवा १.५ क्रॉप फॅक्टरवाला) कॅमेरा व ५०, ८५ वा ७०-२०० एमएम लेन्सेस पण चालतील. मॅक्रोसाठी विशेष मॅक्रो (निकॉनच्या भाषेत माइक्रो) लेन्सेस व खास मॅक्रो स्पीडलाइट्स लागतील. तर बर्डिंग साठी सर्वात जास्त फोकल लेंग्थवाल्या प्राइमच वापराव्या लागतील. आता एकदा आपल्याला काय काय साहित्य आत्ता किंवा पुढे लागू शकेल याची ढोबळ यादी बनविल्यानंतर त्यात सर्वात उत्तम दर्जा, सर्वात जास्त व्हरायटी, सर्वात जास्त कंपॅटिबिलिटी, सर्वात जास्त उपलब्धता व वापर, ब्रॅण्डची विश्वसनीयता व लॉन्जेविटी आणि शेवटी तुमची आवड व ब्रॅण्ड एकनिष्ठता या गोष्टींचा विचार करावा. शक्यतो सर्वच छायाचित्रकार वापरलेल्या लेन्सेस वगैरे घेत राहतात व आपले आर्सेनल समृद्ध करतात. त्यामुळे लगेचच सर्व काही व सर्व काही नवीन घेण्याचा अट्टाहास करू नये. मिळाल्यास आधी लेन्स, कॅमेरा वगैरे भाड्याने वापरून पहावे किंवा मित्रांकडून उधार घेऊन टेस्ट करून पहावे व मगच विकत घ्यावे. आता एकदा का तुम्ही एका ब्रॅण्डचा कॅमेरा घेतला की मग त्याच ब्रॅण्डच्या लेन्सेस किंवा त्याला कंपॅटिबल लेन्सेस, स्ट्रोब्ज इ. घेत राहाल. त्यामुळे काही काळाने ब्रॅण्ड स्विच करणे फार अवघड होऊन बसते. कॅनन आणि निकॉन- कॅनन आणि निकॉन दोन्ही मल्टि-बिलियन डॉलर ऑप्टिकल कंपन्या आहेत (ऑप्टिकल कंपनी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे) आणि या दोन्ही कंपन्या गेल्या कित्येक दशकांपासून असंख्य ग्राहक, सुरक्षादले व औद्योगिक उपयोगांसाठी जगातले सर्वात उच्च दर्जाचे ऑप्टिकल साहित्य बनवत आल्या आहेत. नेहमीच्या फोटोग्राफीसाठी लागणा-या अचूकतेपेक्षाही कितीतरी वरच्या दर्जाचे ऑप्टिक्स आणि स्टेपर्स सारखी उत्पादने या कंपन्या बनवतात आणि त्यांची किंमत लाखो डॉलर्समध्ये असते. याच अत्युच्च दर्जाच्या उत्पादनांबरोबरच त्या कॅमेरे व लेन्सेस वगैरे बनवतात. व्यावसायिक प्रयोगशाळांमध्ये वापरल्या जाणा-या सूक्ष्मदर्शकांमध्ये जे लेन्सेस, यांत्रिक स्टेपर्स इ. वापरले जाते त्यात निकॉनचा वाटा सर्वात जास्त म्हणजे ३७% आहे. (झाइस व लाइट्झ पेक्षाही जास्त). कॅननचा वाटा आहे २०%. केवळ नमुन्यादाखल या उपकरणांची क्षमता पाहिली तर थक्क व्हायला होते. (४५ नॅनोमीटर्सपर्यंत). कॅनन आणि निकॉन दोन्ही मुळात ऑप्टिकल कंपन्या आहेत - इलेक्ट्रॉनिक किंवा सॉफ्टवेअर कंपन्या नव्हेत. त्यामुळे आधी यांचा चांगला कॅमेरा घ्यायचा आणि मग पैसे वाचविण्यासाठी कुठलीतरी थर्ड पार्टी लेन्स त्यावर लावायची याला माझ्या मते काहीच अर्थ नाही. या दोन्ही कंपन्यांची ऑप्टिकल उत्पादने अक्षरशः लाखो डॉलर्सला विकली जातात. त्या तुलनेत आपण छायाचित्रकार जे लेन्सेस, कॅमेरे, स्पीडलाइट्स इ. विकत घेतो ते फार फार तर दोनशे ते दहा हजार डॉलर्सपर्यंत जाते. कॅनन आणि निकॉन दोन्हींच्या दृष्टीने चिल्लर... सरळ आहे. छायाचित्रण म्हणजे प्रकाश, ऑप्टिक्स. मग त्यासाठी ऑप्टिक्समधील बाप कंपन्यांकडेच जावे. उदा. निकॉन, कॅनन, लाइका, झाइस, पेन्टॅक्स, इ. हे झाले लेन्स बद्दल. आणि आधी लेन्सेस चा विचार करावा व मग त्यांना सूट होईल असा कॅमेरा विकत घ्यावा. मी निकॉन का घेतला - मी छायाचित्रण शिकलो ते मित्राच्या कॅननवर. पण स्वतःचा पहिला डी. एस्. एल्. आर्. घ्यायचं ठरवलं तेव्हा काही शोधाशोध केली, थोडी पुस्तके, फोरम्स, संस्थळे उलथीपालथी केली, प्रत्यक्ष काही कॅमेरे वापरून बघितले आणि निकॉन निवडला. त्यातील काही मुद्दे इथे देत आहे. १. फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स म्हणजे लेन्स माउंट च्या माउंटिंग फ्लॅन्ज आणि सेन्सर प्रतल यामधील अंतर. हे अंतर एका ब्रॅण्डच्या कॅमे-याला दुस-या ब्रॅण्ड्सच्या लेन्सेस अडॅप्टर वापरून लावता येतील की नाही हे ठरवते. हे शक्य होण्यासाठी ह्या लेन्सेसचे सर्वात योग्य फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स हे कॅमे-याच्या फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स पेक्षा जास्त हवे. निकॉन च्या एफ्-माउंटचे फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स ४६.५० मिमी तर कॅननचे (इएफ-एस माउंट) फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स ४४ मिमी आहे. फारसा फरक नाही. (सोनी व लायकाचे अंतर जास्त आहे.) फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स जास्त असण्याचा फायदा हा की अशा माउंटवर त्याच ब्रॅण्डच्या जास्त लेन्सेस लावता येतात, तर कमी असण्याचा फायदा हा, की अशा माउंटवर जास्त अडॅप्टर्स लावून वेगवेगळ्या लेन्सेस लावता येतात. म्हणूनच निकॉनचा एफ्-माउंट १९५९ पासून बदललेला नाही तर कॅननने १९८७ मध्ये इओएस माउंट आणून आधीच्या लेन्सेसची कंपॅटिबिलिटी संपवून टाकली. २. कॅननच्या कॅमे-यां ना निक्कॉर लेन्सेस लावता येतात, पण निकॉनच्या कॅमे-यांना कॅननच्या (किंवा इतर काही ब्रॅण्ड्स च्या) लेन्सेस लावता येत नाही याचे हेच कारण आहे. अर्थात, ही कमतरता निकॉनच्या टाइमलेस एफ्-माउंटमुळे चांगलीच भरून निघते, कारण तुम्हाला तुमच्या खूप जुन्या मॅन्युअल निक्कॉर लेन्सेस टाकून द्याव्या लागत नाहीत. अर्थात हा सगळा शेवटी वैयक्तिक आवडीनिवडीचा भाग आहे. ३. सुरुवातीच्या कॅनन कॅमे-यांना निकॉनच्या लेन्सेस असत. निकॉन आधी फक्त व्यावसायिक छायाचित्रकारांसाठी महागडे व्यावसायिक कॅमेरे बनवी, तर कॅनन आधी फक्त हौशी लोकांसाठी स्वस्त कॅमेरे बनवी. सुरुवातीला कॅननची स्पर्धा लायकाबरोबर होती. निकॉनने स्वस्त आणि कॅननने महाग कॅमेरे बनवण्यास सुरुवात केल्यापासून म्हणजे दुस-या महायुद्धानंतर दोन्ही कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली. ४. निकॉनच्या लेन्सेसच्या फिल्टर साइजेस बहुतांशी ठरलेल्या आहेत व तुम्हांला दरवेळी नवीन फिल्टर घ्यावे लागत नाहीत. ५. लायकाने ऑटोफोकसचा वापर करता येईल असे तंत्रज्ञान शोधले. १९८५ मध्ये आधी मिनोल्टाने व नंतर कॅनन व निकॉन ने असे कॅमेरे बाजारात आणले. पण आधी सांगितल्याप्रमाणे कॅननने आपली माउंटिंग सिस्टिम अद्ययावत केल्यामुळे निकॉनपेक्षा त्यांचे कॅमेरे ऑटोफोकस जास्त लवकर करू लागले. स्पोर्टस् फोटोग्राफर्सना ही बाब सोयीची वाटल्यामुळे कॅननचे कॅमेरे व लेन्सेस त्यांच्यात लोकप्रिय झाले. व एकदा आख्खी सिस्टिम एका ब्रॅण्डमध्ये उभी केल्यावर ब्रॅण्ड बदलणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने कॅननचा दबदबा कायम झाला तो २००० पर्यंत. अजूनही एखाद्या खेळाच्या सामन्यात वगैरे सर्वत्र पांढ-या लेन्सेस दिसतात ते याच कारणामुळे. ६. २००० नंतर ही परिस्थिती हळूहळू बदलू लागली ते निकॉनने तंत्रज्ञानाचा शोध लावण्यात आघाडी घेतल्यामुळे. आता निकॉनच्या लेन्सेससुद्धा कॅननच्या लेन्सेसइतक्याच वेगाने फोकस शोधू शकतात. निकॉनने इतर सर्व कॅमेरे-उत्पादकांवर तंत्रज्ञानाच्या संशोधनात व उत्पादनांच्या दर्जात गेल्या काही वर्षांपासून जबरदस्त आघाडी घेतली आहे. ही आघाडी कॅमे-यांच्या तंत्रज्ञानातही डी८०० च्या रूपाने दिसून येते. निकॉनचा हा कॅमेरा थेट मीडियम फॉरमॅट कॅमे-यांना आव्हान देणारा ठरत आहे. ७. निकॉन घेण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांची CLS ही फ्लॅश यंत्रणा. कॅननच्या TTL कडे अजूनतरी त्याला तोड नाही. कॅननचे प्री-फ्लॅशेस इतके तीव्र असतात की सब्जेक्ट्सना ते थोड्या वेळाने नकोसे वाटते. याउलट निकॉनचे प्री-फ्लॅशेस कधी पडले ते कळतही नाही. तरीही निकॉनचे फ्लॅश एक्स्पोजर पहिल्यावेळी आणि दरवेळी अचूक येते. कॅननच्या प्रोग्रॅम मोडमध्ये फ्लॅश सेटिंग्ज खूपच जास्त ऑटोमॅटिक होतात व निकॉनच्या तुलनेत आपल्याला पाहिजे तसे सेट करता येत नाहीत. ८. कॅननचे एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे कॅननचा व्यावसायिक व हौशी छायाचित्रकारांमधला भेदभाव. कॅननची एन्ट्रीलेवल मॉडेल्स व लेन्सेस इ. स्वस्त आहेत. पण त्याचबरोबर त्यांचा दर्जादेखील तितकाच तुलनेने कमी करण्यात आला आहे. उदा. कॅननच्या लाल रिंग असणा-या एल् सिरीज यूएसएम लेन्सेस सर्वात दर्जेदार आहेत पण नॉन-एल् सिरीज लेन्सेसच्या तुलनेत त्यांच्या दर्जा व किंमतीतील तितकाच फरक मला खटकतो. म्हणजे कॅनन तुम्हाला आधी निश्चित करायला लावते की तुम्ही प्रो आहात की अमॅच्युअर आहात. निकॉन असा उघड उघड भेदभाव करत नाही. त्यांच्या कुठल्याही लेन्समागे प्रो वगैरे लेबल लावलेले नसते तसेच फक्त प्रोफेशनल्ससाठी म्हणून त्यांची कुठलीही वेगळी खास सिरीज नाही. माझ्या 'Everyone can take good photographs' या तत्त्वाशी हे सुसंगत आहे. ९. निकॉनचे व्हाइट बॅलन्स खरोखर न्यूट्रल येतात, तर कॅनन किंचित फ्लॅश सेटिंग्जकडे झुकतो. निकॉनचे कलर रेन्डिशन बाय डिफॉल्ट न्यूट्रल आहे तर कॅननमध्ये कन्झ्युमर कॅमे-यांप्रमाणे बाय डिफॉल्ट कलर रेन्डिशनमध्ये कॉन्ट्रास्ट जास्त येतो. असे फोटोज जर त्यांमध्ये हिरवाई टिपली असेल तर जास्त चांगले वाटतात, पण आपल्या डोळ्यांना दिसणारे दृश्य आणि फोटो यात फरक लगेच कळतो. कॅननमध्ये अचूक कलर रेन्डिशन मिळवणे नवख्या छायाचित्रकारास अवघड आहे. पेन्टॅक्स सुद्धा याबाबतीत कॅननपेक्षा जास्त अचूक आहे. १०. निकॉनच्या लेन्सेसचे डायफ्रॅम विषम संख्येने असतात (७ किंवा ९) तर कॅननचे डायफ्रॅम सम संख्येत असतात (६ किंवा ८). याचा उपयोग चांगले सनस्टार्स मिळवण्यासाठी होतो. ११. निकॉनची बटने संख्येने जास्त तर मेन्यूंमधील सबमेन्यू लेवल्स कमी असतात. कॅननचे नेमके उलटे आहे. १२. जास्त आय्एस्ओ ला निकॉनचा परफॉर्मन्स किंचित जास्त चांगला आहे. नॉइज निकॉनमध्ये कमी येतो. १३. निकॉनचे ऑटोफोकसिंग कॅननच्या तुलनेत जास्त सायलेंट आहे. विशेषतः एन्ट्रीलेवल लेन्सेसमध्ये तुलना केली असता. १४. अंधारात ऑटोफोकस करण्यासाठी कॅनन पॉपअप फ्लॅश वापरते. निकॉनच्या नवीन मॉडेल्समध्ये त्यासाठी ऑटोफोकस असिस्ट बीम वापरली जाते, जी बंद करूनही निकॉनचा ऑटोफोकस जास्त अचूक व लवकर फोकस शोधतो. १५. कॅनन सेन्सर्सच्या तीन साइजेस वापरते (१, १.३, १.६), त्यामुळे दरवेळी कुठली लेन्स कुठल्या मॉडेलवर प्रत्यक्षात किती फोकल लेन्ग्थची ठरेल हे काढत बसणे जास्त अवघड ठरते. निकॉन फक्त १ आणि १.५ वापरते. त्यामुळे आख्खी आणि अर्धी असे पटकन सांगता येते. १६. निकॉनची बिल्ड क्वालिटी कॅननच्या तुलनेत सरस आहे. १७. फोटो प्लेबॅकमध्ये पाहताना झूम-इन करून फक्त तेवढ्याच भागापुरता हिस्टोग्रॅम पाहता येणे फक्त निकॉन व लायकामध्येच शक्य आहे. १८. निकॉनच्या प्रो लेन्सेस अगदी कॉर्नर्सपाशी सुद्धा शार्प असतात. १९. कॅननच्या प्रोग्रॅम्ड ऑटो, अपर्चर व शटर प्रायोरिटी मोडमध्ये मीटरिंग वापरायला काही मर्यादा येतात. याचा तोटा विशेषतः पोर्ट्रेट फोटोग्राफी करताना पार्श्वभूमीच्या प्रकाशाला अनुसरून सब्जेक्टला अचूक प्रकाशित (इल्युमिनेट) करताना जाणवतो. २०. डिजिटल कॅमे-यांचे संवेदक (सेन्सर्स) त्या त्या कॅमे-यांचे सर्वात महत्त्वाचे आणि सर्वात महागडे भाग असतात. कॅमे-याच्या RAW फाइल्सचा दर्जा हा त्याच्या सेन्सरवर ठरतो. RAW फाइलमध्ये टिपला जाणारा विदा (डेटा), डायनॅमिक रेंज (रंगांच्या सूक्ष्मातिसूक्ष्म छटा ओळखण्याची क्षमता), बर्नआउट झालेल्या भागातील व शॅडोजमधील डिटेल्स परत मिळवण्याची क्षमता, हाय ISO ला नॉइज नियंत्रण, इ. गोष्टी संवेदकावर अवलंबून असतात. आणि छायाचित्रकार नंतर पोस्ट-प्रोसेसिंगमध्ये किती वेळ घालवते हे या गोष्टींवर अवलंबून असते. गेल्या पाच-सहा वर्षांतील निकॉनचे सेन्सर्स हे कॅननच्या सर्वात उच्च प्रतीच्या कॅमे-यांपेक्षा कितीतरी पटींनी सरस आहेत. २२. त्याचबरोबर सेन्सरच्या बायनरी विदाचे विश्लेषण करून त्याचे प्रत्यक्ष प्रतिमेत रूपांतर करणारा प्रक्रियक (प्रोसेसर) व त्याचा अल्गोरिदम् सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. निकॉनचे Exspeed 3 प्रोसेसर इंजिन अजोड आहे. २३. निकॉनच्या लेन्सेसचा परफॉर्मन्स त्यांच्या फोकल लेंग्थ झूम रेंजवर आणि एपर्चर रेंजवर खूपसा एकसमान आढळतो. सर्वात वाइड एपर्चरला सुद्धा कॉर्नर-टू-कॉर्नर शार्पनेस निकॉनमध्ये चांगला मिळतो. २४. निकॉनच्या दोन मॉडेल्समध्ये Optical Low Pass Filter ला डच्चू देण्यात आला आहे. (D800E आणि D7100). Optical Low Pass Filter मुळे इमेज शार्पनेस कमी होतो, पण त्याचबरोबर color moiré येण्याची शक्यता वाढते. २५. निकॉनचा D800 व D800E हे ३६ मेगापिक्सेलचा सेन्सर वापरतात. हे कॅमेरे बाजारात आल्यापासून मीडियम फॉरमॅट कॅमे-यांना प्रथमच फुलफ्रेम कॅमे-यांकडून स्पर्धा निर्माण झाली आहे. कॅननचे काही सरस मुद्दे - १. कॅननकडे छायाचित्रणसाधनांच्या बाजारपेठेचा सर्वात मोठा हिस्सा आहे. २. कॅननकडे लेन्सेसचे इतर कोणत्याही उत्पादकापेक्षा जास्त वैविध्य आहे. ३. वरील मुद्दा क्र. ८ दुस-या बाजूने पाहता तसा कॅननलाही झुकते माप देणारा आहे. कॅननच्या लेन्स वर्गीकरणाच्या पद्धतीमुळे तुम्हांला ती लेन्स तुलनेने उत्कृष्ट आहे की नाही (L सीरीज व Non-L सीरीज) हे लगेच समजते. इतर लेन्सउत्पादकांनीही आपापल्या लेन्सेसचे असे वर्गीकरण उपलब्ध करून दिले आहे. उदा. टोकिना - AT-X Pro, सिग्मा - EX, पेंटॅक्स - limited, इ. निकॉनची कुठली लेन्स भारी हे त्या लेन्सवरील लांबलचक ओळ पाहून ठरवावे लागते. उदा. AF-S NIKKOR 200mm f/2G ED VR II यावरील ED (एक्स्ट्रॉ लो डिस्पर्जन) आणि VR II तसेच nano crystal coating असे डब्ब्यावर लिहिलेले असेल तर ती लेन्स उत्कृष्ट असावी असा अंदाज बांधता येतो. त्यासाठी छायाचित्रणाची आणि निकॉन लेन्सेसची पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. ४. कॅननची विक्रीपश्चात सेवा निकॉनच्या तुलनेत फारच चांगली आहे. अगदी भारताचाच विचार करायचा झाला तर भारतात एक्स्क्लूजिव कॅनन स्टोअर्स भरपूर आहेत. त्यामानाने निकॉनची एक्स्क्लूजिव स्टोअर्स नाहीत. जी आहेत ती फक्त निकॉन उत्पादने विकत नाहीत व म्हणूनच निकॉनच्या सर्व उत्पादनांची माहिती व उपलब्धता एका छताखाली कुठे मिळेल याची निदान मलातरी खात्रीशीर माहिती नाही. ५. विडिओ शूटिंग - निकॉनच्या कॅमे-यांनी चित्रफीत बनवणं हे ऑटोफोकस हंटिंग च्या कटकटीमुळे त्रासदायक वाटते. निकॉन वापरून केवळ प्रतिमा घ्याव्यात (फोटो काढावेत). विडिओ शूटिंगसाठी सोनीचा हॅन्डीकॅम घ्यावा. पण कॅननने विडिओ शूटिंग करणं तुलनेनं सोपं जातं असा अनुभव आहे. अर्थात् हे कॅमेरा-टू-कॅमेरा व लेन्स-टू-लेन्स बदलतं व निकॉनचे आधुनिक कॅमेरे कॅननइतकेच चांगले आहेत अशीही माहिती मिळाली आहे. कॅननच्या बाजूने बोलण्यासारखे इतरही मुद्दे जरूर असतील. कॅननच्या चाहत्यांनी ते प्रतिसादांमध्ये मांडल्यास त्यांचे आभार. तसेच निकॉनच्या बाजूचे वरील सर्व मुद्दे सर्वांनाच पटतील असेही नाही. आणि डी. एस्. एल्. आर्. म्हणजे केवळ याच दोन कंपन्या असेतर मुळीच नाही. कार्ल झाइस व लायकाच्या काही लेन्सेस ऑप्टिक्सचा विचार केला तर निव्वळ कहर आहेत. ऑलिंपस, पेंटॅक्स, कोनिका-मिनोल्टा, नव्यानेच दाखल झालेले सोनी व सॅमसंग इ. कंपन्यांचीही आपापली सामर्थ्यस्थळे आहेत. लायकाचा नुसता एक रेंजफाइंडर घेणे हे येर्या गबाळ्याचे काम नोहे. मीडियम फॉरमॅट व लॉन्ग फॉरमॅटचा इथे विचार केलेला नाही. डिस्क्लेमर्स व नोट्स - (लेखात सर्वसामान्यपणे अनामिक कर्त्यासाठी सर्वनाम पुल्लिंगी वापरण्याची पद्धत आहे. उदा. ‘जेव्हा एखादा नवखा छायाचित्रकार डी. एस्. एल्. आर्. घेण्याचं ठरवतो’. मी माझ्या लेखांमध्ये मुद्दाम सामान्य कर्ता रूप स्त्रीलिंगी ठेवलं आहे. उदा. ‘जेव्हा एखादी नवखी छायाचित्रकार डी. एस्. एल्. आर्. घेण्याचं ठरवते’. प्रेरणा - ‘Operating System Concepts’, Abraham Silberschatz, Peter B. Galvin, Greg Gagne. आणि Homai Vyrawalla, भारतातील पहिल्या स्त्री छायावृत्तकार) वरील लेख केवळ माहितीपर असून सर्वच मते अचूक असतील असे नाही. कुठला कॅमेरा किंवा ब्रॅण्ड कुणाला जास्त भावेल हे व्यक्तीसापेक्ष आहे. मला फक्त निकॉन व कॅननच्या कॅमेरे/लेन्सेसची विस्तृत माहिती देता येईल. इतर ब्रॅण्ड्सची किंवा पॉइंट व शूट कॅमे-यांबद्दल मला फारशी स्वानुभवजन्य माहिती नाही. मी माझ्या मते फार वाईट फोटोग्राफर आहे. संदर्भ - आंतरजालावरील विविध संस्थळे, पुस्तके, स्वानुभव, परानुभव, परीक्षणे, चर्चाकट्टे (फोरम्स), लिंक्डइन वरील कट्टे, इ. मधून वेळोवेळी काढलेली टिपणे. संज्ञा - डी. एस्. एल्. आर्. - ३५ मिमी सेन्सर साइज. http://en.wikipedia.org/wiki/Digital_single-lens_reflex_camera मीडियम फॉरमॅट - साधारणपणे ६X६ सेंमी फिल्म किंवा डिजिटल बॅक साइज. http://en.wikipedia.org/wiki/Medium_format लॉन्ग फॉरमॅट - साधारणपणे १२० सेंमी किंवा ८X१० इंच फिल्म साइज. रेंजफाइंडर http://en.wikipedia.org/wiki/Rangefinder_camera स्टुडिओ फोटोग्राफी - Studio photography is any photography shot under the controlled conditions of a studio. स्पीडलाइट्स - http://en.wikipedia.org/wiki/Speedlight सॉफ्टबॉक्सेस - http://en.wikipedia.org/wiki/Soft_box रिफ्लेक्टर्स - http://en.wikipedia.org/wiki/Reflector_(photography) फोकल लेंग्थ - http://en.wikipedia.org/wiki/Focal_length लेन्सेस - http://en.wikipedia.org/wiki/Camera_lens कॅमेरा - http://en.wikipedia.org/wiki/Camera एफ्. पी. एस्. (फ्रेम्स पर सेकंड्स) - http://en.wikipedia.org/wiki/Frame_rate एपीएस् - http://en.wikipedia.org/wiki/APS-C क्रॉप फॅक्टर - http://en.wikipedia.org/wiki/Crop_factor मॅक्रो - http://en.wikipedia.org/wiki/Macro_photography माइक्रो - Nikon nomenclature for Macro स्ट्रोब्ज - http://en.wikipedia.org/wiki/Strobe_light ऑप्टिकल - http://en.wikipedia.org/wiki/Optical फ्लॅन्ज फोकल डिस्टन्स - http://en.wikipedia.org/wiki/Flange_focal_distance लेन्स माउंट - http://en.wikipedia.org/wiki/Lens_mount सेन्सर - http://en.wikipedia.org/wiki/Image_sensor अडॅप्टर - A lens adapter allows the use of a lens on a camera for which it was not designed. एफ्-माउंट - http://en.wikipedia.org/wiki/Nikon_F-mount इओएस माउंट - http://en.wikipedia.org/wiki/Canon_EF_lens_mount मॅन्युअल लेन्सेस - Without CPU, Manual handling and focusing निक्कॉर - http://en.wikipedia.org/wiki/Nikkor फिल्टर - http://en.wikipedia.org/wiki/Photographic_filter ऑटोफोकस - http://en.wikipedia.org/wiki/Autofocus सीएलएस - http://www.nikoncls.com/ टीटीएल - http://en.wikipedia.org/wiki/Canon_EOS_flash_system प्री-फ्लॅशेस - http://en.wikipedia.org/wiki/Pre-flash_metering एक्स्पोजर - http://en.wikipedia.org/wiki/Exposure_(photography) एल सिरीज यूएसएम - http://en.wikipedia.org/wiki/Canon_L_lens व्हाइट बॅलन्स - White balance is a camera setting that adjusts for lighting in order to make white objects appear white in photos. कलर रेन्डिशन - For a light source, the extent of the agreement between the perceived color of a surface illuminated by the source and that of the same surface illuminated by a reference source under specified viewing conditions, measured and expressed in terms of the chromaticity coordinates of the source and the luminance of the source in agreed spectral bands. कॉन्ट्रास्ट - Difference between highest luminance and lowest. डायफ्रॅम - http://en.wikipedia.org/wiki/Diaphragm_(optics) आय्एस्ओ - http://en.wikipedia.org/wiki/Film_speed नॉइज - http://en.wikipedia.org/wiki/Image_noise पॉपअप फ्लॅश - The on-camera flash ऑटोफोकस असिस्ट बीम - http://en.wikipedia.org/wiki/Autofocus#Assist Lamp हिस्टोग्रॅम - http://en.wikipedia.org/wiki/Image_histogram RAW फाइल्स - http://en.wikipedia.org/wiki/RAW_file डायनॅमिक रेंज - http://en.wikipedia.org/wiki/Dynamic_range#Photography पोस्ट-प्रोसेसिंग - http://en.wikipedia.org/wiki/Digital_image_processing फोकल लेंग्थ झूम रेंज - http://en.wikipedia.org/wiki/Zoom_lens उदा. १८-५५ मिमी झूम लेन्सेचे १८ ते ५५ पर्यंतचे सर्व अपर्चर स्टॉप्स. एपर्चर रेंज - http://en.wikipedia.org/wiki/Aperture उदा. ५० मिमी लेन्सची Aperture range f/1.4-f/16 पर्यंत असू शकते. Optical Low Pass Filter - http://en.wikipedia.org/wiki/Anti-aliasing_filter Color Moiré - http://en.wikipedia.org/wiki/Moir%C3%A9 Nano Crystal Coating - Indicates the Nano Crystal Coat, a relatively new type of lens coating that originated in Nikon's semiconductor division. Lenses with this coating feature the logo of an "N" inside an elongated hexagon on the name plate. एक्स्ट्रॉ लो डिस्पर्जन - http://en.wikipedia.org/wiki/Chromatic_aberration तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. वरील लेखात आलेल्या तांत्रिक संज्ञांबद्दलही पुढे केव्हातरी विस्ताराने लिहीन.
🗣 चर्चा
(70)
३
३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 03/27/2013 - 16:43
नवीन
तुमचा काळ म्हणजे नक्की कोणता ते माहित नाही. पण अफगाणिस्तानी मुलगी, नापाम बाँबपासून पळणारी नग्न मुलं असे फोटो त्या-त्या काळात एवढे प्रसिद्ध आणि महत्त्वाचे होते की ते आजही फेसबुकावर दिसतात. फोटोग्राफी आयुष्य बदलणारी कला असू शकते हे असे फोटो पाहिले की वेगळं सांगावं लागत नाही.
माझं आडनाव जोशी असलं तरी भविष्य वर्तवण्यात माझं शिक्षण नाही. तरीही, सध्या जसे कॅमेरे येतात, ज्या प्रकारचे फोटो प्रस्थापित, आदरप्राप्त वृत्तपत्रांच्या संस्थळांवर दिसतात आणि ज्या प्रकारची गॅजेट्स वापरून लोकं फोटो पहातात ते पहाता तंत्र, स्किल वापरणार्यांच्या पातळीवर फार महत्त्वाचं ठरणार नाही असं वाटतं.
अलिकडच्या काळात कॅमेर्यातच एच.डी.आर. प्रोसेसिंग करता येतं असे कॅमेरे आलेले आहेत. कॅननचा, साधा, खिशात घालता येईल असा पॉईंट अँड शूट कॅमेरा हे करतो. आयफोनमधला प्रोसेसर पॅनोरमा बनवतो. कॅमेर्यांच्या कंपन्यांच्या नोकरीच्या जाहिराती पाहिल्या तर त्यांच्याकडे इमेज प्रोसेसिंगचे अल्गोरिदम समणार्या माणसांना मागणी आहे. थोडक्यात, कॅमेरा वापरणार्याला आपण तो कशासाठी वापरतो हे समजलं पाहिजे.
एकंदरच जास्तीतजास्त बिनडोक काम यंत्रांकडून करवून घ्यायचं आणि फक्त विचार करण्याचं काम माणसाने करायचं अशा प्रकारचा प्रवाह भूतकाळातून पुढे जाताना दिसतो. एकेकाळी सुंदर हस्ताक्षर फार चलतीत होतं. आज तुमचं आणि माझं हस्ताक्षर सारखंच दिसतं. कोण काय विचार करतं, ते कसं मांडतं, याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे. कॅमेरे आले तेव्हापासून हुबेहूब चित्र हाताने काढण्याचं महत्त्व संपलं. जी गोष्ट यंत्र करतं, ती गोष्ट हाताने तश्शीच केली तर त्यात काय वेगळी गंमत? त्यापेक्षा तसं यंत्र बनवणं ही मोठी 'कला'. वरचा लेख त्या 'कले'ची समीक्षा करणारा आहे.
पण स्वॅप्स याबद्दल पुढच्या भागात लिहीणार आहे तोपर्यंत हात आवरते.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
Wed, 03/27/2013 - 09:25
नवीन
छानच!
सवडीने तपशीलवार लिहितो.. तुर्तास फक्त वाचनखूण साठवत आहे
- Log in or register to post comments
प
पैसा
Wed, 03/27/2013 - 15:06
नवीन
तपशीलवार लिहिल्याबद्दल धन्यवाद! दोन कॅमेर्यात (कॅनन्/निकॉन) नेमका कसा फरक येतो हे फारच छान लिहिलं आहेत. लेख मुद्दाम सावकाशीने वाचूया म्हणून बाजूला ठेवला होता. अनेक प्रतिसाद वाचून ते बरेच केले असे वाटत आहे! खूपच छान. या मालिकेत असेच तपशीलवार लेख अजून येऊ द्यात! लोकांनी म्हटल्याप्रमाणे उदाहरण म्हणून अधून मधून फोटो टाकलेत तर अजून छान होईल.
- Log in or register to post comments
क
काव्यान्जलि
Fri, 02/28/2014 - 11:48
नवीन
या दोन्हि मधला कोनता घेऊ camra??? खुपच confusion आहे.... :(
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 03/02/2014 - 14:08
नवीन
दोन्ही कॅमेर्यांची तुलना करून बघा. त्यासाठी गुगलवर भरपूर पर्याय दिसतील. www.dpreview.com ही साइट त्यासाठी चांगली आहे. आणि कॅमेरा त्या ब्रॅण्डचा घ्या ज्या ब्रॅण्डचे कॅमेरे तुमच्या मित्रमंडळींकडेही असतील. त्यामुळे लेन्सेस शेअर करणे सोपे जाते. अजून काही माहिती हवी असल्यास जरूर विचारा.
- Log in or register to post comments
श
शैलेन्द्र
Sun, 03/02/2014 - 14:20
नवीन
५२०० घ्या ना..
- Log in or register to post comments
स
संपत
Fri, 02/28/2014 - 13:51
नवीन
विनंतीला मान दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार.
- Log in or register to post comments
क
कोकणी पुणेकर
Tue, 03/04/2014 - 10:16
नवीन
The camera's only job is to get out of the way of making photographs.
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 03/05/2014 - 09:49
नवीन
अॅग्रीड. अ कॅमेराज ओन्ली जॉब इज टू गेट आउट ऑफ द वे ऑफ मेकिंग फोटोग्राफ्स अॅट द राइट टाइम अॅण्ड फॉर द राइट टाइम.
- Log in or register to post comments
क
कोकणी पुणेकर
Wed, 03/05/2014 - 12:26
नवीन
राईट टाईम ला क्लिक करण जमल की उरलेल काम सध्याचे ऑटो मोड वाले कॅमेरे बहुतेकवेळा करतात.
- Log in or register to post comments
ए
एस
Wed, 03/05/2014 - 14:43
नवीन
जगातला कुठलाच कॅमेरा स्वत:च रचनाविचार ठरवू शकत नाही. अजूनही खूप गोष्टी असतात प्रतिमा घेण्यापूर्वी आणि प्रतिमा घेतल्यानंतही. त्याबद्दल नंतर केव्हातरी.
छायाचित्रणातील तांत्रिकता साधनांवर सोडावी आणि कलात्मकता छायाचित्रकारावर. :-)
- Log in or register to post comments
क
कोकणी पुणेकर
गुरुवार, 03/06/2014 - 07:40
नवीन
मान्य.
राईट टाईम ला क्लिक म्हणजे रचना (object / composition)वैगरे ठरवून क्लिक.
बाकी मी छायाचित्रणातील अडाणी माणूस.
"छायाचित्रणातील तांत्रिकता साधनांवर सोडावी आणि कलात्मकता छायाचित्रकारावर."
एकदम सहमत. Photography is the power of observation, not the application of technology. अर्थात हे वाक्य माझे नाही,(http://www.kenrockwell.com ) वर वाचले आहे.
- Log in or register to post comments
क
काव्यान्जलि
Mon, 04/28/2014 - 08:34
नवीन
मी canon 600D घेतला finally.... धन्यवाद... :)
- Log in or register to post comments
ए
एस
Mon, 04/28/2014 - 14:51
नवीन
आता लवकर तुम्ही घेतलेल्या प्रतिमा टाका मिपावर.
- Log in or register to post comments
क
काव्यान्जलि
Mon, 04/28/2014 - 15:08
नवीन
तुमच्या लेखाचा खुप फायदा होतो आहे.... photography शिकताना....
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 04/29/2014 - 09:56
नवीन
:)
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Tue, 06/03/2014 - 11:33
नवीन
डिजीटल च्या युगात सेन्सर आणि प्रोसेसर मुळे कॅमेरा बॉडीचे महत्व वाढले असावे काय ? मला फोटोग्राफी चि आवड आहे पण खोलवर ज्ञान नाही. काही अनुभव थोडक्यात सांगावेसे वाटतात.
मी Vivitar (हे स्वस्तातले कॅमेरे म्हणूनच प्रसिध्द होते) चा फिल्म रोल वाला SLR घेतला. तो जूना म्हणजे सेकंड हँड तेही एका लोखंडाच्या व्यापा-याकडून !! या कॅमे-याला ५० mm ची फिक्स्ड लेन्स (झूम नसलेली) होती. त्याला ऑटोफोकस ही नव्हते. त्या व्यापा-याने कॅमेरा विकण्यापुर्वि माझ्यासमोर एक फोटो काढून नंतर धूवून आणून मला दाखवला (माझी खात्री पटावी म्हणून). जमिनीवर पडलेल्या लोखंडी सळ्या, बाजूला बसलेली एक बकरी यांचा तो फोटो. पण त्यातले रंग खूप सुंदर भासले. (पूढे तो फोटो त्याने मलाच दिला सापडला कधी तर स्कॅन करुन ठेवेन).
पण मला मात्र नंतर फिक्स्ड लेन्स चा कंटाळा आला मग मी सिग्मा ची 70-210 अशी सेकंड हँड लेन्स पुण्यातील पूना फिल्म्स सेंटर मधून घेतली. ही माझी लाडकी लेन्स , अगदी घाईने जरी फोकस केले आणि फोटो काढला तरी तो छान स्पष्ट असायचा. पण 70 mm ने घरगुती फोटो काढता येईना. मग पुन्हा पूना फिल्म्स सेंटर मधून पेंटॅक्स ची 28-80 अशी लेन्स घेतली (अर्थात सेकंड हँड ). हीचे पण फोटो चांगले यायचे मात्र सिग्मा ची मजा अनोखीच.
पुढे सिग्मा खाली पडून खराव झाली मग टॅमरॉन ची 70-300 (की 80-300) नवी लेन्स घेतली. पण ह्या लेन्स ने मात्र निराशा केली. फोटो म्हणावे असे चांगले येईना. ऑटोफोकस प्रकारची लेन्स मी म्युन्युअली फोकस करुन वापरत असल्याने असेल कदाचित.
पुढे डिजिटल च्या युगात मी फिल्म रोलच्या त्या कॅमे-याला राम-राम केला.
डिजीटल मध्ये मी अजून तरी point & shoot वापरत आहे. आणि एक-दोन वर्ष थांबून DSLR पेक्षा Mirrorless घेईन असा विचार करतोय.
- Log in or register to post comments
ए
एस
Tue, 06/10/2014 - 17:22
नवीन
पूना फिल्म सेंटर चा बग्गा (की बागा?) ही एक वल्ली आहे. त्याच्याकडे गेलं की तास-दीड तास फक्त ऐकत रहायचं. :-) अर्थात 'उत्खनन' करायची हौस असेल आणि वेळ असेल तर त्या जुन्यापुराण्या अडगळीतल्या दुकानात बराच भारीभारी माल सापडतो. ;-)
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Fri, 06/13/2014 - 12:17
नवीन
विजय बागा. त्यांच्याकडे बहुतेक सगळ्या वस्तू स्वस्त मिळतात शिवाय खात्रीशीरपण. माझ्या जुन्या लेन्सेस देखील चांगल्या होत्या.
बाकी त्यांचे प्रवचन ही एक मजेची बाब आहेच !!
- Log in or register to post comments
ह
हुकुमीएक्का
Tue, 06/10/2014 - 19:41
नवीन
काही म्हणा. कॅनन बेस्ट आहे. बाकीचे कॅमेरे चांगले नाहीत असे मी म्हणत नाही. परंतू ज्याने एकदा कॅनन वापरला त्याला बाकीचे कॅमेरे वापरताना 'फरक' लगेच जाणवून येतो. माझा पहिला कॅमेरा कॅनन आहे परंतू त्यापुर्वी मी Panasonic, Nikon, Fujifilm या सारखे डिजिटल कॅमेरे हाताळले आहेत. कॅमेरा घेताना त्याची features जरूर पहावीत.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2