छायाचित्रण भाग ८. रचनाविचार (कॉम्पोझिशन)
Book traversal links for छायाचित्रण भाग ८. रचनाविचार (कॉम्पोझिशन)
छायाचित्रण - एक कला...
सूची १. कलाकृतीतील रचनेचे घटक २. काही साध्या गोष्टी ३. रचनाविचार
आतापर्यंत छायाचित्रणाच्या तंत्राचा आणि साधनांचा आपण विचार केला. मूलभूत डीएस्एल्आर छायाचित्रणासाठी एवढ्या गोष्टी माहीत असणं साधारणतः पुरेसे ठरते. (फ्लॅश किंवा कृत्रिम प्रकाश वापरून केले जाणारे छायाचित्रण हा भाग राहिला आहे. पण त्यासाठी आधी छायाप्रकाशाचे छायाचित्रणातील स्थान लक्षात घेऊन नैसर्गिक प्रकाशाचा वापर कसा करायचा हे पुढील एखाद्या लेखात पाहू आणि नंतर त्यायोगाने कृत्रिम प्रकाशाच्या विविध साधनांची माहिती तेव्हा घेऊ. कृत्रिम प्रकाशाचा वापर कसा करायचा ह्यातील जो तांत्रिक भाग आहे, तो खूपसा तुमच्या साधनांवर म्हणजे कॅमेरा, लेन्सेस, कृत्रिम प्रकाशाची साधने, इतर प्रकाश-परिवर्तक साधने (लाइट मॉडिफायर्स) वगैरे बाबींवर अवलंबून असतो आणि कितीही पुस्तकी ज्ञान वाचून काढले तरी स्वतः जोपर्यंत ते वापरून पहात नाही तोपर्यंत अशा संसाधनांवर हात बसणं जरा अवघड असतं. त्यामुळे तो विषय नंतर कधीतरी.)
इथून पुढे आपण छायाचित्रणाची कला जाणून घेऊ यात. कला म्हटलं की त्यातील तत्त्वज्ञानही आलंच. आणि ह्या दोहोंचाही आवाका अथांग आहे. छायाचित्रणाचे तंत्र जेव्हा माहीत झाले तेव्हाचा त्याचा 'माहितीची नोंद करणे' हा मूळ उद्देश जरी अजूनही तसाच असला, तरी लवकरच त्यातील कला लवकरच बहरू लागली आणि आज छायाचित्रणाला एक कला म्हणून भारतात एवढी नाही तरी जगात इतरत्र मोठी मान्यता मिळाली आहे. अर्थात, भारतात सामान्यांच्या जीवनात चित्रकलेचे जे दयनीय स्थान आहे तेच छायाचित्रणाचे एक कला म्हणून आहे, ही एक दुर्दैवाची बाब आहे. केवळ भारीतला जास्त मेगापिक्सेलचा कॅमेरा घेतला किंवा डीएस्एल्आर घेतला की आपल्याला चांगले फोटो काढता येतील ह्या भ्रमाचा दोष जितका कॅमेरा-उत्पादकांच्या धूळफेक करणार्या मार्केटिंग तंत्राचा आहे तितकाच तो चांगल्या, उच्च दर्जेच्या कलेबाबत जनसामान्यांत असलेल्या औदासीन्याचाही आहे. आणि काही प्रमाणात हा दोष कलाकारांचाही (त्यात छायाचित्रकारही आले) आहे. आपल्याला परदेशात किंवा उच्चभ्रू वर्तुळात ओळख मिळाली की भागले अशी एक वृत्ती इथे निर्माण झाली आहे. आणि ती प्रतिष्ठा मिळाल्यावर आपल्याकडील कलाकारपण मग जमिनीवर यायला तयार नसतो. तोही सामान्यांना तुच्छ लेखतो आणि सामान्यांनाही अशा लोकांचे नाव त्यांची एखादी कलाकृती भल्यामोठ्या रकमेला विकली गेल्याची बातमी आल्यावरच कळते. अर्थात ह्यालाही काही अतिशय सन्माननीय अपवाद आहेत. पण अपवादच. दुर्दैवाने छायाचित्रणामागच्या कलेची कदर करायचे वळण समाजाला लावले जात नाहीये आणि पर्यायाने चित्रकलेबरोबरच छायाचित्रणही सर्वसामान्य भारतीय जीवनाच्या उंबरठ्यावरच थिजून राहिले आहे. लोक आपल्या घराच्या दालनात एखादे चित्र पटकन लावत नाहीत ते छायाचित्राची मुद्रित प्रत विकत घेऊन काय लावणार...! असो.
असं म्हणतात की छायाचित्रणाची सुरुवात ही कलात्मक मांडणीपासून होते. केवळ छायाचित्रणच नव्हे, तर इतर सर्वच कलाप्रकारांना हे तत्त्व लागू होते. मानवी बुद्धीचा कल हा आधी बाह्यरेषा म्हणजेच आउटलाइन लक्षात ठेवण्याचा असतो. त्यातील बारकाव्यांकडे आपले लक्ष नंतर जाते. म्हणजेच, एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घ्यायची सुरुवात आपण मनोमन त्या कलाकृतीचा ढोबळमानाने पडलेल्या फर्स्ट इंप्रेशनपासून करतो. आणि हे फर्स्ट इंप्रेशन निर्माण करण्याचे सर्वात पहिले काम करते कलाकृतीतील घटकांचे एकमेकांशी निगडीत असलेले स्थान म्हणजेच कलाकृतीतील रचनाविचार. मला वाटते, कॉम्पोजिशन ह्या शब्दाला 'रचनाविचार' हा मराठी प्रतिशब्द चपखल आहे.
कलाकृती ही कितीही स्वांतसुखाय केलेली असो. जेव्हा कलाकाराव्यतिरिक्त दुसरा कोणीही ती कलाकृती बघतो किंवा अनुभवतो तेव्हा कलाकृती आणि पाहणार्याचे मन यात काही देवाणघेवाण होत असते. प्रत्येकजण आपापला अर्थ त्यात शोधत असतो. अशा वेळी, एक कलाकार म्हणून किंवा त्या कलाकृतीचा निर्माता म्हणून तुम्हांला तुमच्या प्रेक्षकांशी जो संवाद साधायचा असतो किंवा आपलं म्हणणं, आपला विचार हा इतरांपर्यंत पोहोचवायचा असतो तो संवाद, तो प्रभाव जास्तीत जास्त परिणामकारकपणे आणि सर्वात जलद रीतीने साधण्यासाठी रचनाविचाराशिवाय पर्याय नाही. इथे केवळ सौंदर्यविचारच नव्हे, तर इतरही प्रकार विशेषतः रिपोर्ताज किंवा वार्तांकनासारखे माहितीधिष्ठित माध्यमेही याच रचनाविचाराचा आधार घेताना दिसतात. छायाचित्रणासारख्या दृक् माध्यमात मांडणीला अनन्यसाधारण महत्त्व याचमुळे आहे. आणि छायाचित्रांचा दर्जा ठरवणार्या रंगाविष्कार, सुस्पष्टपणा इत्यादींसारख्या इतर घटकांपेक्षाही प्रेक्षकांपर्यंत जलद आणि परिणामकारकपणे पोहोचते ती त्या छायाचित्रामधील विषयवस्तूंची रचना.
कलाकृतीतील रचनेचे घटक -
रेषा आणि प्रतल(Lines and Planes)
बिंदू, रेषा आणि प्रतल यांचे स्वतंत्र अस्तित्व प्रत्यक्षात नसते. प्रतल हे सपाट पृष्ठभागाच्या इतर अवकाशाशी होणार्या संवादाचा आभास आहे. अशी दोन प्रतले एकमेकांना छेदतात तिथे रेषेचा आभास होतो. आणि दोन रेषा एकमेकींना छेदतात तिथे बिंदू दिसतो. निसर्गात ह्या तिन्ही गोष्टी इतर त्रिमितीय वस्तूंच्या परस्परसंबंधाच्या आधारे व्यक्त होतात. ह्या तिन्ही गोष्टींचा वापर प्रेक्षकांच्या दृष्टीला प्रतिमेच्या चौकटीत तसेच चौकटीबाहेरही प्रवास घडवून आणण्यासाठी कलाकारांकडून केला जातो.
आकार (Shape)
आकार हे द्विमितीय प्रतिमेच्या बाबतीत तिच्यातील कडांमुळे आणि रेषांच्या भासामुळे निर्माण होतात. ते नेहमीच वास्तवदर्शी असतीलच असे नाही. मानवी मेंदू प्रतिमेतील सुसंगती आणि विसंवादाचा शोध हा त्यातील आकारांच्या आणि रेषांच्या मदतीने घेत राहतो. वरवर अगदी वेगवेगळ्या वाटणार्या आकारांमधील रेषीय सलगपणा शोधणे हा मानवी मेंदूचा आवडता खेळ आहे.
अवकाश (Space)
अवकाश हे प्रतिमेतील विषयवस्तूंच्यामधील किंवा विषयवस्तूंच्या आभासी आकाराच्या आतील जागेमुळे निर्माण होते. अवकाशाचा वापर हा चित्राला गती मिळवून देण्यासाठी केला जातो. प्रतिमेतील एखाद्या पक्ष्याच्या बघण्याच्या दिशेला सोडलेली रिकामी जागा ही तो कशाचा वेध घेत आहे, भक्ष्य आहे की भक्षक, हे छायाचित्र काढल्यावर तो पक्षी उडाला का, कुठल्या दिशेला उडाला असावा असे अनेक प्रश्न प्रतिमा पाहणार्यांच्या मनात उत्पन्न करू शकते. त्याचबरोबर छायाचित्रातील धावणार्या मुलाच्या पुढे जागा न सोडता जर मागे सोडली तर प्रेक्षकांना अशी रचना चौकटीच्या बाहेर जाण्यास भाग पाडते.
सखोलता (Depth)
द्विमितीय प्रतिमेत त्रिमितीय विश्व उभे करताना खोलीचा आभास हा त्यातील पृष्ठभूमी आणि पार्श्वभूमीतील घटकांद्वारे प्रस्थापित केला जातो. यात कधीकधी फोरग्राउंड आणि बॅकग्राउंडच्या मध्ये मिडलग्राउंड म्हणजे मध्यभूमीही असू शकते.
आकृतीबंध (Pattern)
प्रतिमेतील आकृतीबंध हे त्यातील आकारांच्या परस्परसमानतेमुळे निर्माण होतात. मानवी मेंदूला गोंधळाच्या स्थितीपेक्षा जास्तीत जास्त समरूप असणारे घटक एकत्र पहायला जास्त सोसवणारे वा रोचक वाटतात.
रंग (Color)
रंगीत छायाचित्रणाचा शोध लागल्यापासूनच अचूक रंगउठावाचे आणि पर्यायाने विविध रंगावकाशांचे महत्त्व छायाचित्रणात वाढले. मांडणीच्या बाबतीत उष्ण अथवा शीत, विरुद्ध अथवा समदर्शी अशा विविध प्रकारे रचनाविचार दर्शवता येतो. विविध संस्कृतींमध्ये विविध रंगांचा अर्थ आणि महत्त्व वेगवेगळे असल्याने छायाचित्रणात परिणामकारकता आणण्यासाठी रंगाधिष्ठित रचना करता येऊ शकते.
पोत (Texture)
पोत म्हणजे प्रतिमेतील वस्तूंच्या पृष्ठभागांचा मऊ किंवा खडबडीतपणा. प्रतिमेतील विविध वस्तूंच्या पोतातील विरोधाभास ठळक करून रचना साधता येते.
दृष्टिकोन किंवा परिदृश्य(Perspective)
छायाचित्रणामध्ये दृष्टिकोन किंवा परिदृश्य म्हणजे छायाचित्रातील वस्तूंचा दर्शवलेला (अभिधानित) परस्परसंबंध. वर दर्शवलेल्या सर्व घटकांचा प्रभाव हा चित्रामधील पर्स्पेक्टिव निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो. हा परस्परसंबंध प्रत्यक्षात वेगळाच असू शकतो. मात्र छायाचित्रणामध्ये पाहण्याचा दृष्यकोन बदलून मूळ त्रिमितीय जगताचे द्विमितीय प्रतिरूप निर्माण केले जाते.
रेषीय परिदृश्य (Linear Perspective)
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त वापरला जाणारा दृष्टिकोन हा छायाचित्रकाराच्या डोळ्यांच्या रेषेत आणि चित्रातील घटकांना लंबरूप असा असल्याचे पहायला मिळते. प्रतिमेतील घटक सामान्यपणे कॅमेरा जमिनीपासून डोळ्यांच्या अंतरावर आणि जमिनीला समांतर असा ठेऊन घेतले जातात.
अतिव्याप्ती परिदृश्य (Overlapping Perspective)
प्रतिमेतील घटकांची रचना एकमेकांना अंशतः झाकतील अशा प्रकारे केली जाते.
आकाशीय परिदृश्य (Aerial Perspective)
विषयवस्तूपेक्षा जास्त किंवा अतिशय उंचावरून केले जाणारे छायाचित्रण. यालाच बर्डस् आय व्ह्यू असेही म्हणतात.
बिंदूवत परिदृश्य (Worm's Eye View Perspective)
विषयवस्तूकडे नेहमीच्या उंचीपेक्षा अतिशय लहान उंचीवरून, जवळजवळ जमिनीवर कॅमेरा ठेऊन केले जाणारे छायाचित्रण.
काही साध्या गोष्टी -

रचनाविचार
आपल्या सूचना व प्रतिक्रियांचे मनापासून स्वागत आहे. रचनाविचार हा विषय इथे थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता अतिशय विस्तृत व्याप्ती असलेला छायाचित्रणातील हा भाग आहे. केवळ या विषयावर स्वतंत्रपणे लिहिली गेलेली पुस्तकेही बाजारात उपलब्ध आहेत. दुर्दैवाने ती इंग्रजीत आहेत आणि अतिशय महागडी आहेत.
जाताजाता"You know you are a photographer when performing daily duties, you adjust the angle of your head or change your line of vision for a more interesting composition... ;-)
क्रमशः- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments