Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

R2T (भाग १)

भटकंती

R2T (भाग १)

व

वाह्यात कार्ट

सदस्य
3 लेखन
37 प्रतिक्रिया
2011 पासून
📅
सदस्य झाले
05 August 2011
🕐
अखेरची भेट
12 Mar 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

वाह्यात कार्ट
Mon, 01/21/2013 - 08:03
  • R2T (समाप्त)

Book traversal links for R2T (भाग १)

  • R2T (समाप्त) ›

(नमस्कार मिपाकरांनो ! __/\__
अभियांत्रिकीच्या उत्तरपत्रिकेतल्या 'ललितलेखनानंतर' सार्वजनिक लिखाणाचा पहिलाच प्रयत्न. सांभाळून घ्याओ)

अनेक वेळा ठरून सुद्धा राजगड ते तोरणा ट्रेक काही मूर्त स्वरूप घेत नव्हता. राजगड आणि तोरण्याच्या अनेक वाऱ्या झाल्या होत्या पण R2T खुणावत होता. शेवटी हो-नाही करत ४ टाळकी जमली. मी, मयूर आणि २ भूषणस. पुण्यातून निघावयास शुक्रवारी रात्री १० वाजलेच. गडावर जात असल्यामुळे, शिवापुर् जवळ इतरांचा सामिष खावयायचा डाव हाणून पाडून चना मसाला चापून मार्गस्थ झालो. एव्हाना १२ वाजलेच होते. गुंजवणे गावात पोचायला अमंळ उशीरच झाला. पायथ्याला "बायकांना" झोपवून आम्ही रात्री १.३० वाजता राजगड चढायला सुरुवात केली.
पहिला चढावरच डोळ्यासमोर अंधेरी येऊन तारे दिसायला लागले (रात्र असल्यामुळे हो..!! चाणाक्षांनी शब्दशः अर्थ घ्यावा). तरी मजल-दरमजल करत वाटचाल चालू होती. मस्त चांदणं पडलं होतं. या असल्या प्रीतीसुलभ वातावरणात मला मात्र 'चांदण्यात फिरताना' ऐवजी 'अंधेरी रात थी, कुत्ते चमक रहे थे, तारे भौंक रहे थे, चोर आया भैंस तोडी और दरवाजा ले गया' हा कंट्री विनोद आठवत होता. (वैचारिक अधःपतन, दुसरं काय. तुम्हाला सांगतो, हल्लीच्या तरुण पिढीचं काही खरं नाही बघा.)
असो, रेंग बर्यापैकी असल्यामुळे एका भूषणचं कॉल सेंटर सुरु झालं ते थेट चोर दरवाज्यापर्यंत. वारा नसूनही तो काय बोलत होता ते ऐकू येत नव्हतं. पठ्ठया अगदीच तरबेज निघाला. आम्ही आपली मजल - दरमजल करत चोर-दरवाजा गाठला. चोर दरवाजा चढून पद्मावती माची गाठली. शुक्रवार असून पण देउळ फुल्ल. मग काय, बाहेरच कॅंरी-matउलगडल्या आणि आमचे झंप्या दामले निद्रिस्त झाले !

पहाटे ६ ला उठून तोरण्याकडे मार्गस्थ झालो. संजीवनी माची उतरल्यावर ट्रेक मधल्या पेटंट पराठ्यांवर ताव मारण्यात आला. संजीवनी माची खालील डोंगर उतरायला जरा घसरडा (घसरडं आणि निसरडं यामधील फरकावर सिंहगडाच्या पायाथ्याशी २ पुणेकरांमधील एक साग्रसंगीत जुगलबंदी अनुभवलेला ३रा पुणेकर- पण त्या बद्दल पुन्हा केव्हातरी) असल्यामुळे परत तारे दिसायला लागले !!! हळू हळू सूर्य वर जाऊ लागला आणि "ऊन जरा जास्त होतं" करत "सौमित्र" सामोरे आले !! त्यामुळे मग "तुरंत शक्तीदायक" ग्लुकॉन-डी पिऊन पुढील मार्ग आरंभिला. ११ च्या सुमारास R2Tच्या मध्य टेकडीवर पोचलो. तिकडून मागे वळून पाहताना राजगड ताठ मानेनं उभा भासला. एखाद्या गडाला बेलाग का म्हणतात याची प्रचीती आली. इतका वेळच्या तंगडतोडीचं सार्थक झाल्यासारखा वाटलं.
पण अजून तोरणा गाठायचा होता कि राव. मग आमचे हिंद के जवान आगे बढले. वाटेत एका कारवीच्या जंगलात जरा थांबून क्षणभर विश्रांती आणि मणभर भडंग यांचा सुंदर मिलाफ साधला. मग डोळ्यातली झोप पाण्यासोबत गिळून निघालो ते direct बुधला माची पायथा.

(क्रमशः)
.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

  • Log in or register to post comments
  • 7958 views
💬 प्रतिसाद

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा