Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

3d visualisation: making of rainy night (बदलुन)

स
स्पा
गुरुवार, 12/13/2012 - 11:27
💬 72 प्रतिसाद

Book traversal links for 3d visualisation: making of rainy night (बदलुन)

  • ‹ 3D
  • Up
  • 3d visualisation : गणपती ›
लाईफ ऑफ पाय पहिल्यापासून डोके भिरभिरलेले होते .. चायला जमाना कुठे चाललाय आणि मी कुठे . काहीतरी आपण पण हटके ३डी करायचे असे ,मनाशी वाटत होते . अर्थात मी जे नेहमी काम करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे , हटके , जे मला आनंद देईल असे. विचार करत बसलो मग मागे कधीतरी डोक्यात आलेल्या कथेचा प्लॉट आठवला. एक जुनाट हॉटेल ची रूम , भयानक पावसाळी रात्र , एक भयकथा लिहिणारा लेखक.. त्याच लिखाणाच टेबल , काही विन्ग्लीश पुस्तकं पडलेली , त्याच सिगरेट च पाकीट , एका बाहेरगावच्या मित्राने दिलेली आफ्रिकेतली एक भयानक मूर्ती (बहुतेक त्याच्या नवीन कथा संग्रहातल महत्वाच पात्र) , लाईट गेल्याने एक जळणारी मेणबत्ती.. पण अचानक अस काहीतरी घडत आणि त्या मूर्तीचे हावभाव , रंग बदलायला लागतात .. आणि त्याच वेळी भर पावसात एक विकृत , भयाण आकृती खिडकीतून डोकावून जाते .. हो .. त्याच्या हाताचे पंजे त्या धुकट काचेवर स्पष्ट दिसतायेत .. कोण असेल ? हम्म... एवढ सगळं लिहायला सोप्प आहे , पण ते तेवढ्या प्रभावी पणे कसे मांडणार? ते वातावरण बघ्ण्यार्याला बघता क्षणी जाणवायला हवं अस वातावरण कि जे गूढ , अंधार, धुकट. (इतके दिवस चकाचक stores करण्याची सवय होती .) लाईटिंग आणि तेकश्रिंग महत्वाचे होते . मग नेट वरून पावसाचे बरेच रेफरन्सेस काढले. अंधार्या खोल्या बघितल्या आणि सुरुवात केली . आधी बेसिक रूम तयार करून घेतली . मग बाकी गोष्टी हळू हळू add केल्या , टेबल , काही पुस्तकं , एक आफ्रिकन मूर्ती , सिगारेट च पाकीट वेग्रे . बर्याच प्रयत्नांनी लायटिंग जमलं , आणि इमेज rendar झाली . पण अशा सिन्स साठी मजबूत "पोस्ट - प्रोडक्शन" लागत, कारण बरेसचे चेंजेस ३डी मध्ये करता येत नाहीत .म्हटलं आपण करण्यापेक्षा या क्षेत्रातला एक्स्पर्ट जो आहे त्याची मदत घेऊ. सौरभ शी बोललो , तो मदतीला तयार झाला , त्याने अवघ्या काही मिनिटात भन्नाट "री - टच" करून सीन पाठवला. आधी काच फक्त धुकट दिसत होती , त्याने त्यावर पाउस दाखवला, हाताचे ठसे दाखवले .. कलर करेक्शन केलं, एकूण सीन ५०% नि इम्प्रुव केला. एकूण वातावरण जे माझ्या डोक्यात होतं, त्याच्या ८०% तरी मिळवलेल होतं . फायनल सिन मागे केलेल्या प्रयोगात काही त्रुटी राहिलेल्या होत्या , त्या परत जमेल तसं सुधारलेल्या आहेत , एक क्यामेरा अजून वाढवलाय , आता त्या हॉटेल मधली रूम सुद्धा दिसतेय , एक पडलेली मोडकी खुर्ची , जुनाट भिंती , पडदे .. सिगरेट ची थोटक , वेग्रे काही काही डिटेल अधिक वाढवलेत . az adf रेन्दर्स vb hn सौरभ ने दणकून एडिटिंग केलंय , त्याचे पेशल आभार . a ax

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15136 views

💬 प्रतिसाद (72)
व
विश्वनाथ मेहेंदळे गुरुवार, 12/13/2012 - 11:34 नवीन
गणेशा झाला माझा. काही दिसत नाहीये.
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 12/13/2012 - 11:35 नवीन
माझापण. नंतर कळलं की त्याच्या लिंका गंडल्या होत्या. :)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Mon, 01/07/2013 - 07:33 नवीन
अजुनही लिंका गंडल्यात कां, आमच्या हापीसातल्या नतद्रष्ट नेटवर्क वाल्यांनी माती खाल्लीय, काही कळत नाही. असो, आज घरी गेल्यावर एकदा बघायलाच हवे.
  • Log in or register to post comments
घ
घाशीराम कोतवाल १.२ गुरुवार, 12/13/2012 - 11:34 नवीन
आयला स्पावडु मस्त आहे रे झक्कास
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 12/13/2012 - 11:35 नवीन
फ्लीम तुटल्याली हाय काय ? पडद्याव काईच दिसत न्हाई !
  • Log in or register to post comments
ह
हारुन शेख गुरुवार, 12/13/2012 - 11:37 नवीन
जबरी जबर..कमाल आहे एका दृश्य पण वेगळ्या वातावरणात घेऊन जातंय. लय भारी.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 12/13/2012 - 11:42 नवीन
आली खोली समोर .स्टीफन किंगची खोली दिसतेय अगदी !
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश गुरुवार, 12/13/2012 - 11:43 नवीन
मस्तच. :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा गुरुवार, 12/13/2012 - 11:45 नवीन
कुठलं सॉफ्टवेयर वापरलं कसं वापरलं त्याचे धडे पण द्या की.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 12/14/2012 - 12:53 नवीन
कोणचं सॉफ्टवेअर ? आवंगणपा, त्ये 3ds max हाय ! त्याचा अभ्यास टकूरं फिर्वून शान टाकतो पघा ! अनुभवी चौ रा
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Fri, 12/21/2012 - 05:15 नवीन
मला पण हे सॉफ्टवेअर शिकायचा उत्साह आला होता पण बऱ्याच दिवसांपूर्वी फोटोशॉपचे धडे टाकले होते ते आधी करून बघायचे राहिले आहेत ते आठवले आणि बेत रद्द केला :) ...
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन गुरुवार, 12/13/2012 - 11:54 नवीन
स्पांडुरंगा लयच जबरी!!!!
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 12/13/2012 - 11:55 नवीन
जबर्याटच चित्र आहे
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार गुरुवार, 12/13/2012 - 12:04 नवीन
स्पावड्या अ‍ॅट हिज बेस्ट ! बाकी रुमला एकच खिडकी दाखवली असतीस तर अजून भारी वाटले असते असे एक प्रेक्षक म्हणून वाटते. साधारण असे काहीतरी :- Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 12/14/2012 - 12:53 नवीन
अगदी अगदी...सहमत. खोली भयाण घाणेरड्या कळकट हॉटेलची वाटत नाहीये. पण जी आहे ती कमी भीतीदायक अजिबात नाही. स्पावड्या.. एकदम चित्तथरारक काम केलं आहेस. रूम आणि वातावरण भीतीदायक वाटतंय फारच. आता तुझ्या कथांमधे अशी चित्रंही बनवून पेरणार की काय?? रामरामरामरामराम...
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 12/15/2012 - 03:59 नवीन
आता तुझ्या कथांमधे अशी चित्रंही बनवून पेरणार की काय?? - असेल असेल, मा.श्री.मिस्पाजी व त्यांचे काही परममित्र असे प्रयोग करणा-या एका संस्थळाचे संस्थापक सदस्य आहेत अशी अफवा आहे आंतरजालावर खरं खोटं माहित नाही.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 12/15/2012 - 09:21 नवीन
हुम्म.. खरंय , अपडेट करतो आहेच धन्स रे
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 12/14/2012 - 12:38 नवीन
तात्या विंचू कशाला तयार करतोस रे हे?
  • Log in or register to post comments
J
jaypal Fri, 12/14/2012 - 12:59 नवीन
जबराट, खतरनाक असे सगळे शब्द ओवाळुन टाकीन स्पा तुझ्या या कलेवर पण ती २ भांडी हातात का गेउन बसलास ते आधी सांग
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 12/14/2012 - 13:03 नवीन
त्यात 'रक्त गाभुळलेल्या चिंचा' असाव्यात असा आमचा होरा आहे.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 12/14/2012 - 13:15 नवीन
कुठाय कलेवर? मला नाही दिसल चित्रात.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Fri, 12/14/2012 - 12:59 नवीन
शिग्रेटी फुकाया लागलास व्हय रं? थांब तुझ्या आईलाच नाव सांगतू.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 12/15/2012 - 09:21 नवीन
ओ गणपा "तो मी नव्हेच "
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Fri, 12/14/2012 - 13:02 नवीन
मस्तच ...
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Fri, 12/14/2012 - 13:05 नवीन
मस्त रे स्पावड्या!
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Fri, 12/14/2012 - 13:10 नवीन
एकनंबर जबरा काम केलंय. ते खिडकीवर जमलेलं धुकं, त्यातून ओघळणारं पावसाचं पाणी, त्यावर उमटलेले हाताचे पंजे... फोटोच दिसतोय तो अगदी. कीप ईट अप!
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Fri, 12/14/2012 - 14:01 नवीन
जो प्रयोग केलाय तो सुरेखच आहे. पण चित्र पुन्हा पाहिल्यावर वाटलं की टेबलावर सगळं नुसतं ठेऊन दिल्यासारखं आहे. तिथे कधी माणूस वावरल्याच्या खुणा म्हणून अ‍ॅश-ट्रे मधे थोडी राख आणि सिगरेटचे १-२ तुकडे, एखादी जुनाट उघडी पडलेली डायरी असं टाकलं तर आणखी परिणाम साधेल.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 12/15/2012 - 09:23 नवीन
जबरदस्त सूचना खर हे मला सुचायला हव होतं , पण असो :) आता बरेच बदल करतोय सीन मध्ये , त्यामुळे या गोष्टी पण बदलेन
  • Log in or register to post comments
स
स्पा Mon, 01/07/2013 - 07:15 नवीन
@ स्मिता : बदल केलेत :)
  • Log in or register to post comments
स
स्मिता. Mon, 01/07/2013 - 10:14 नवीन
बदल केल्यानंतरचे फोटो आणखी परिणामकारक झाले आहेत. शेवटून दुसरा खासच!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Fri, 12/14/2012 - 13:14 नवीन
मिश्टर एस. पी. ए. त्या शेगरेटी ऐवजी चिरुट (पक्षी चिलीम) टाकुन बघा. नाही जरा भारदस्त वाटत. एकदम मस्त. शेवटच चित्र बरच काही डोक्यात आणुन गेल. त्यात "ते" अजुन यायच आहे हे ही आल.
  • Log in or register to post comments
न
नि३सोलपुरकर Fri, 12/14/2012 - 13:22 नवीन
स्पावड्या मस्त जमलय .. अभिनंदन तुझे आणी सौरभचेही
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Fri, 12/14/2012 - 14:08 नवीन
झक्कास जमलाय रे...आता एखादी भयकथा पण येउदे लगोलग ! Image removed.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Sat, 12/15/2012 - 06:09 नवीन
.आता एखादी भयकथा पण येउदे लगोलग ! >> माल्या , त्या पेक्षा जी अर्धवट आहे ती पुर्णत्वास नेली तरी चालेल म्हण ;)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Mon, 12/17/2012 - 14:30 नवीन
कवटीची हास्यमुद्रा लहानपणी लै हसरी वाटायची, त्यामुळे प्राथमिक शाळेत असताना वहीत कायम हाडाचे सापळे काढत असे, त्याची यानिमित्ताने आठवण झाली. पर्फेक्ट स्केलेटॉर कवटी आहे ही ;)
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Mon, 12/17/2012 - 15:03 नवीन
कवटीची हास्यमुद्रा लहानपणी लै हसरी वाटायची
पुर्वी डेंजरच साइन म्हणून पेंटरवाले रस्त्याच्या कडेला पाट्यांवर कवटी रंगवायचे. बहुतेक वेळा त्याकडे बघून हसूच यायचं. बाकी शरीराचं मातीत विघटन झालं की कवटी अखंड न रहाता त्याचे सुटे भाग होतात कारण त्यांचे खुपशे जोड स्नायुंनी बनलेले असतात असं एका डाग्दर मित्रानी सांगितलं होतं. पण सिनेमात कवट्या अगदी जबड्या सकट हसताना वगैरे दाखवतात.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 12/14/2012 - 16:36 नवीन
शेवटच्या चार फोटोंमधला प्रवास आणि शेवटच्या फोटोमधला इफेक्ट जबराट! मेणबत्तीच्या ज्योतीचा प्रकाश थोडा कमी केला तर गडद छटा येऊन आणखिन परिणामकारक होईल असे वाटतेय. -(मल्टी डिमेंशनल) सोकाजी
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 12/15/2012 - 09:24 नवीन
मेणबत्तीच्या ज्योतीचा प्रकाश थोडा कमी केला तर गडद छटा येऊन आणखिन परिणामकारक होईल असे वाटतेय
ह्म्म्म.. ओके सर्र पाहतो करून , थोडं लायटींग बदलाव लागेल
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Fri, 12/14/2012 - 16:39 नवीन
लई भारी रे !
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 12/14/2012 - 16:39 नवीन
स्पारायण धारप!!!!!!!!!!!!!!!!!! _/\_
  • Log in or register to post comments
व
विकास Fri, 12/14/2012 - 16:44 नवीन
सॉलीड! असं जमलं पाहीजे असे वाटते. पण... :(
  • Log in or register to post comments
ह
हुकुमीएक्का Fri, 12/14/2012 - 17:18 नवीन
मेणबत्ती चा इफेक्ट आवडला... hats off
  • Log in or register to post comments
न
नानबा Fri, 12/14/2012 - 17:27 नवीन
स्पा, एक नंबर एडिटींग राव... चायला मी पण बरेच दिवस 3ds max शिकायचा (घरच्या घरी) निष्फ़ळ प्रयत्न केलाय.. आता तुमच्या कडूनच धडे गिरवावे म्हणतो....
  • Log in or register to post comments
द
दादा कोंडके Fri, 12/14/2012 - 19:15 नवीन
_/\_ खत्राच! काही वर्षापुर्वी थ्री डी मॅक्स, थ्री डी मार्क, ब्लेंडर, माया, फ्लॅश शिकण्याचा प्रयत्न केला. पण कल्पकता आणि एका जागी बूड टिकवण्याच्या गोळ्यांचा अद्याप शोध लागला नसल्यानं काहीच जमलं नाही. :(
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 12/14/2012 - 19:23 नवीन
चान चान !! पण ती बै भांडी का घेऊन बसलीये कळलं नाही.
  • Log in or register to post comments
स
स्पा Sat, 12/15/2012 - 09:24 नवीन
:D मलाही कळलेलं नाहिये :P
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Fri, 12/14/2012 - 19:33 नवीन
थ्री डी मॅक्स, थ्री डी मार्क, ब्लेंडर, माया, फ्लॅश शिकण्याचा प्रयत्न केला.
एवढं सगळं एकदम? दादा, लोकं एकेका एप्लीकेशन मध्ये जिंदगी घालवतेत. ;)

स्पावड्या भारीय रे. मस्त जमलेय.

(आणि तेवढे दादांना त्या कल्पकतेच्या न बूड टिकवायच्या गोळ्या देउन टाक बाबा.;) )
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 12/15/2012 - 03:43 नवीन
स्पांडु रंग महाराज की जय....! @एक जुनाट हॉटेल ची रूम , भयानक पावसाळी रात्र , एक भयकथा लिहिणारा लेखक..>>> Image removed.
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Sat, 12/15/2012 - 03:58 नवीन
लई भारी रे, आवडलं.
  • Log in or register to post comments
म
मितभाषी Sat, 12/15/2012 - 05:54 नवीन
एकदम खत्री..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 45 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    19 hours ago
  • सुंदर !!
    20 hours 1 minute ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 4 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा