Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

3d visualisation: making of rainy night (बदलुन)

स
स्पा
गुरुवार, 12/13/2012 - 11:27
💬 72 प्रतिसाद

Book traversal links for 3d visualisation: making of rainy night (बदलुन)

  • ‹ 3D
  • Up
  • 3d visualisation : गणपती ›
लाईफ ऑफ पाय पहिल्यापासून डोके भिरभिरलेले होते .. चायला जमाना कुठे चाललाय आणि मी कुठे . काहीतरी आपण पण हटके ३डी करायचे असे ,मनाशी वाटत होते . अर्थात मी जे नेहमी काम करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे , हटके , जे मला आनंद देईल असे. विचार करत बसलो मग मागे कधीतरी डोक्यात आलेल्या कथेचा प्लॉट आठवला. एक जुनाट हॉटेल ची रूम , भयानक पावसाळी रात्र , एक भयकथा लिहिणारा लेखक.. त्याच लिखाणाच टेबल , काही विन्ग्लीश पुस्तकं पडलेली , त्याच सिगरेट च पाकीट , एका बाहेरगावच्या मित्राने दिलेली आफ्रिकेतली एक भयानक मूर्ती (बहुतेक त्याच्या नवीन कथा संग्रहातल महत्वाच पात्र) , लाईट गेल्याने एक जळणारी मेणबत्ती.. पण अचानक अस काहीतरी घडत आणि त्या मूर्तीचे हावभाव , रंग बदलायला लागतात .. आणि त्याच वेळी भर पावसात एक विकृत , भयाण आकृती खिडकीतून डोकावून जाते .. हो .. त्याच्या हाताचे पंजे त्या धुकट काचेवर स्पष्ट दिसतायेत .. कोण असेल ? हम्म... एवढ सगळं लिहायला सोप्प आहे , पण ते तेवढ्या प्रभावी पणे कसे मांडणार? ते वातावरण बघ्ण्यार्याला बघता क्षणी जाणवायला हवं अस वातावरण कि जे गूढ , अंधार, धुकट. (इतके दिवस चकाचक stores करण्याची सवय होती .) लाईटिंग आणि तेकश्रिंग महत्वाचे होते . मग नेट वरून पावसाचे बरेच रेफरन्सेस काढले. अंधार्या खोल्या बघितल्या आणि सुरुवात केली . आधी बेसिक रूम तयार करून घेतली . मग बाकी गोष्टी हळू हळू add केल्या , टेबल , काही पुस्तकं , एक आफ्रिकन मूर्ती , सिगारेट च पाकीट वेग्रे . बर्याच प्रयत्नांनी लायटिंग जमलं , आणि इमेज rendar झाली . पण अशा सिन्स साठी मजबूत "पोस्ट - प्रोडक्शन" लागत, कारण बरेसचे चेंजेस ३डी मध्ये करता येत नाहीत .म्हटलं आपण करण्यापेक्षा या क्षेत्रातला एक्स्पर्ट जो आहे त्याची मदत घेऊ. सौरभ शी बोललो , तो मदतीला तयार झाला , त्याने अवघ्या काही मिनिटात भन्नाट "री - टच" करून सीन पाठवला. आधी काच फक्त धुकट दिसत होती , त्याने त्यावर पाउस दाखवला, हाताचे ठसे दाखवले .. कलर करेक्शन केलं, एकूण सीन ५०% नि इम्प्रुव केला. एकूण वातावरण जे माझ्या डोक्यात होतं, त्याच्या ८०% तरी मिळवलेल होतं . फायनल सिन मागे केलेल्या प्रयोगात काही त्रुटी राहिलेल्या होत्या , त्या परत जमेल तसं सुधारलेल्या आहेत , एक क्यामेरा अजून वाढवलाय , आता त्या हॉटेल मधली रूम सुद्धा दिसतेय , एक पडलेली मोडकी खुर्ची , जुनाट भिंती , पडदे .. सिगरेट ची थोटक , वेग्रे काही काही डिटेल अधिक वाढवलेत . az adf रेन्दर्स vb hn सौरभ ने दणकून एडिटिंग केलंय , त्याचे पेशल आभार . a ax

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 15136 views

💬 प्रतिसाद (72)
स
स्पा Sat, 12/15/2012 - 09:26 नवीन
धन्स लोक्स. सर्व बदल नोंदवून ठेवलेत मिपाकर लैच क्रिएटीव आहेत , हे परत सिद्ध झाले :) अपडेटेड इमेज सोमवारी टाकतो
  • Log in or register to post comments
म
मोदक Sat, 12/15/2012 - 10:13 नवीन
अपडेटेड इमेजची वाट बघतोय रे...
  • Log in or register to post comments
भ
भिकापाटील Sat, 12/15/2012 - 10:38 नवीन
स्पाकाका त्या झोळ्या तेवढ्या खाली सरकव जरा. बाकी बेस्टच
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 12/15/2012 - 10:45 नवीन
प्रयत्न आवडला. हा,माझा प्रांत नव्हे, तरी काही सुचवतो: या चित्रात प्रमुख्याने प्रकाशाचे दोन स्त्रोत आहेतः १. खिडकीतून येणारा निळसर, ग्रे अन्धुक प्रकाश आणि २. मेणबत्तीचा पिवळट, जास्त स्पष्ट प्रकाश. या दोन्ही प्रकाशांचा योग्य समतोल जेंव्हा साधेल तेंव्हा चित्र खरे वाटेल. मूर्तीच्या चेहर्‍यावर मेणबत्तीचा प्रकाश दिसत नाहीये. मूर्तीचे डोळे जर उघडे, चमकदार (भयानक) दाखवता आले, तर चित्रात एकदम जिवंत पणा येइल, असे वाटते. तसेच मि. स्पा च्या नावाच्या पट्टीवर वरच्या कडेवर प्रकाश हवा. खिडकीच्या फ्रेमच्या पट्ट्या फार चकाचक आखीव वाटतात, त्या जरा जुनाट दिसल्या, तर वातावरण निर्मितीत भर पडेल. तशी तुमची मूळची इमेज जास्त गूढ वाटते. त्यात फक्त काचेवरील पाउस, हाताचे पंजे, आणि मूर्तीवर पडणारा मेणबत्तीचा हलकासा प्रकाश, एवढेच हवे होते. हाताच्या पंजांचा आकार रक्षापात्राच्या संदर्भात लहान वाटतो (लहान मुलाचे पंजे?) तसेच जमिनीपासून खिडकी अडीच ते तीन फुटावर सुरु होते असे मानले, तर पंजे नेमके कुठे हवेत? (मोठ्या माणसाचे पंजे साधारणतः जमिनीपासून साडेचार-पाच फुटावर येतील.) अर्थात हे सर्व सहज सुचले ते लिहिले, फारसे मनावर घेउ नका.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 12/15/2012 - 12:23 नवीन
@ चित्रगुप्त साहेब , मूर्तीच्या चेहर्‍यावर मेणबत्तीचा प्रकाश दिसत नाहीये. मूर्तीचे डोळे जर उघडे, चमकदार (भयानक) दाखवता आले, तर आपले हे निरिक्षण परफेक्ट आहे.यात तांत्रिक बाब अशी की. मेणबतीची ज्योत हा 3ds max मधे लाईट सोर्स आहे. तो कोणत्या प्रकारचा ओमनी, स्पॉट की डिरेक्शनल यावर त्याचा आसमंतावरचा प्रभाव अवलंबून असतो. माझ्या मते तो ओमनी या सारखा डिफाईन केला नसेल तर त्याचा प्रभाव त्या बाहुलीच्या बॉडीवर दिसेल तोडावर दिसणार नाही.स्पॉट व डिरेक्शनल लाईट चा झोत मर्यादित असतो ओमनीचे तसे नाही. उदा सांगायचे झाले तर सूर्य का ओमनी लाईट सोर्स आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 12/16/2012 - 01:18 नवीन
लै भारी, स्पाशेठ!
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Sun, 12/16/2012 - 21:49 नवीन
खतरनाक राहिलेल्या भय कथेचा पुढचा भाग अश्याच चित्रा सह येऊ दे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 12/18/2012 - 08:03 नवीन
छान छान. आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रीत-मोहर गुरुवार, 12/20/2012 - 17:12 नवीन
आवडले रे स्पावड्या :)
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Fri, 12/21/2012 - 10:56 नवीन
पुस्तकांची बायडींग उलटी का आहे ? आम्ही सॉफ्ट्वेअरात औंरंगजेब !!!!!
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Fri, 12/21/2012 - 13:49 नवीन
जबराट!! शेवटचा फोटो तर खास जमलाय.
  • Log in or register to post comments
च
चाफा Fri, 12/21/2012 - 22:53 नवीन
लै भारी स्पावड्या :)
  • Log in or register to post comments
च
चिगो Sat, 12/22/2012 - 08:29 नवीन
खतरा जमलंय.. बाकी तू जाणकारांच्या प्रतिसादांवरुन सुधारणा करुन त्येला 'लैच खतरा' बनवशील हा विश्वास आहे..
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 01/07/2013 - 07:29 नवीन
झक्कास... आणि प्रतिसादानुसारच नव्हे तर त्या प्रतिसादांमधले योग्य पॉईंट्स घेऊन त्यात तुझी आणखी कल्पनाशक्ती आणि कला वापरुन आणखीनच उत्कृष्ट काम सादर केलंस. धन्यवाद आणि कौतुक..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 01/07/2013 - 08:03 नवीन
नवे चित्र छानच झालेय. पण लाल रंगसंगतीचा वापर किंचीत कमी करायला हवा होतास असे वाटते.
  • Log in or register to post comments
ह
ह भ प Mon, 01/07/2013 - 07:43 नवीन
नादखुळा.कॉम.. झबरदस्त.
  • Log in or register to post comments
प
पियुशा Mon, 01/07/2013 - 08:45 नवीन
जबरा !!!
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Mon, 01/07/2013 - 08:50 नवीन
आमचाही कुर्निसात स्वीकारावा __/\__ लय भारी
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 01/07/2013 - 10:14 नवीन
दुसरं बी दिन्ही फोटू भारी हायाती :-)
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Mon, 01/07/2013 - 12:10 नवीन
ये बास आता. लय भ्या वाटुन झाल. आता एक गाण्याचा ऑडिओ टाक.
  • Log in or register to post comments
क
कवितानागेश Mon, 01/07/2013 - 19:54 नवीन
ये हुई ना बात! जबर्रा!! :)
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 01/08/2013 - 00:37 नवीन
हे खतरनाक जमलय. सही रे स्पावड्या. अर्धवटराव
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 21 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 34 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 37 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 40 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा