💬 प्रतिसाद
आ
आनंदयात्री
Mon, 06/13/2011 - 21:17
नवीन
वाह वा. मस्त मजा केलेली दिसतेय !!
- Log in or register to post comments
ट
टारझन
Tue, 06/14/2011 - 07:18
नवीन
यात्री काकांशी सहमत. ! मजे करे गुरु .. ते फिप्टीसेंट दिसले नाही कुठे फोटो मध्ये फक्त ;)
बाकी अँबी व्हॅली रोडच्या बर्याच चकरा मारल्याची .. त्या नागमोडी वळणांवर फुटरेस्ट घासेस्तो बाईक झुकवल्याच्या आणि वेगाचा थ्रील घेतल्याच्या आठवणी ह्या लेखाच्या निमित्ताने जाग्या झाल्याचे या क्षणी णमुद करावेसे वाटते .
अंमळ रोमँटिक वातावरण आहे .. फक्त पोरंपोरं जाणं जमणार नाही ;)
-(रेड मिस्चिफ) टारझन
- Log in or register to post comments
म
मालोजीराव
Wed, 06/15/2011 - 11:19
नवीन
कंपनी चा डेस्क बडवत सहमती दर्शवत आहे
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/14/2011 - 05:55
नवीन
छे छे !! गाणं कसं विसरणार, या गाण्याचा शोध गडावरच तर लागला. आय मीन आठवण झाली. वृत्तांत अतिशय छान, फोटु उत्तम. वेळात वेळ काढून आपण हा लिहीलात त्याबद्दल आभार. हा गड ट्रेकसाठी निवडल्याबद्दल वल्ली महाशयांचे विशेष आभार. ट्रेकला जाण्याची तशी माझी ही पहिलीच वेळ, मूळगावातल्या खंडोबाच्या टेकाडावर जाऊन येत असू. पण तो ट्रेक काय, मिनी ट्रेक सुद्धा म्हणू नये.
आता पुढला ट्रेक कधी ??
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Tue, 06/14/2011 - 05:38
नवीन
एकदम झक्क्कास वृत्तांत, परत आठवणी ताज्या केल्यास. गडावरचा भर्राट वारा, कोसळणारा पाउस, उसळणारं धुकं, कंच हिरवाई सगळे एकदम वर्णनातीतच. पावसाळ्याच्या अगदी सुरुवातीला हा असा बेभान अनुभव येईल असे तिथे जाताना वाटलेच नव्हते.
तो मंदिरासमोरचा दगडी स्तंभ म्हणजे दीपमाळ-एकदम साधीशी. असाच स्तंभ राजमाचीच्या भैरवनाथाच्या मंदिरासमोरही आढळतो.
गडावर येण्याचा आणखी एक मार्ग म्हणजे आंबवणे गावातून येणारी वाट, ही जराशी अवघड आहे, दरीच्या कडेकडेने सरकणारी व मोठ्या प्रमाणा घसारा असणारी अशी आहे.
आता गडाच्या इतिहासाबद्दल- हा किल्ला शिवाजी महाराजांनी १६५७ मध्ये आदिलशाहीकडून जिंकला व गडावर भगवे निशाण लागले. गडावरील सद्यस्थितीतले पडिक वाड्यांचे, तटाबुरुजांचे अवशेष त्या काळातले. पण ह्या किल्ल्याचा इतिहास इतकाही अर्वाचीन नाही. हा किल्ला मुळात सातवाहनकाळातला. सुरुवातीच्या टप्प्यात लागणारी खोदीव गुहा, वरच्या टप्प्यातले एक पाण्याचे टाके, तसेच गडाच्या माथ्यावर पश्चिम बुरुजापाशी असलेली जमिनीच्या अतंर्भागात कडा वर ठेउन खोल खोल गेलेली पाण्याची टाकी ही सातवाहनकालीन रचना दर्शवते. मूळात हा किल्ला बांधला गेला तो सातवाहनकाळात चालत असलेल्या व्यापारावर कोकणातून वर येणार्या सवाष्णी आणि वाघजाई या दोन घाटवाटांवर लक्ष्य ठेवण्यासाठी. याच वाटांवर कोकणात खाली सरसगड, सुधागड, घाटमाथ्यावर घनगड, कोराईगड व पुढे तिकोना, तुंग हे किल्ले बांधले गेले. हे सर्व पूर्वीच्या भरभराटीला आलेल्या मार्गांचे संरक्षक दुर्ग.
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 06/14/2011 - 06:42
नवीन
वा..
त्या रस्त्याने इतक्या वेळा जाऊनही आसपास असा सुंदर गड आणि तोही चढून जाता येईल असा, आहे याची कल्पनाही नव्हती.
खूपच सुंदर वातावरण आहे. खादाडी पण झकास झालेली दिसतेय. विशेषतः ट्रेक संपल्यावर कडाडून भूक लागली असेल तेव्हा.. :)
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 06/14/2011 - 07:19
नवीन
फटु अन वृत्तांत दोनीबी ब्येष.....
अजुन अशाच वर्षा सहली आयोजिल्या जाव्यात अन त्यांना अमुचा उदंड प्रतिसाद असाच लाभत राहो....
हीच इ. प्रा..
- Log in or register to post comments
म
मनराव
Tue, 06/14/2011 - 07:28
नवीन
वाह.....!!!, सुरेख..............
फोटू पण झक्कास..... या पावसाळ्यात अणखी असे बरेच ट्रेक व्हावेत हिच सदिच्छा........ :)
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Tue, 06/14/2011 - 07:32
नवीन
मिसळपाव सदस्यांबरोबरची पहिलीच सहल, सगळ्यांना पहिल्यांदाच भेटत होतो पण पहिल्यांदा भेटतोय असं कधीच जाणवलं नाही.
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Tue, 06/14/2011 - 17:18
नवीन
अश्याच मस्त चवदार शंकरपाळ्यां पून्हा पून्हा घेऊन या आन बघा कधी कूठेही कोणाला पहिल्यांदाच भेटतोय असं जाणवलं तर ;)
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Tue, 06/14/2011 - 08:21
नवीन
अ प्र ति म
ट्रीप तर भन्नाटच झाली, वृत्तांतही झक्कास........
पुढच्या ट्रीपच्या प्रतिक्षेत.
- Log in or register to post comments
स
स्पा
Tue, 06/14/2011 - 08:48
नवीन
झकास वर्णन
आणि फोटो सुद्धा झकास
११ जून ला ट्रेक ला जातोय हे कळल्यावर हापिसातल्या काही ट्रेकर नि वेड्यात काढल
अरे इतक्यात का जातोयेस? अजून पावसाला सुरुवात तर होऊद्नेत, आता जाऊन काही मजा येणार नाही वगेरे वगेरे
पण......
नशिबाने मजबूत साथ दिली , ज्या दिवशी ट्रेक होता,त्याच्या अद्ल्यादिव्सा पासूनच मजबूत पावसाला सुरुवात झाली. सकाळी कल्याण ला पोहोचलो तेंव्हा सुद्धा धाक धुक होती.. कारण २ ३ ट्रेन रद्द केल्या होत्या. पण सुदैवाने इंद्रायणी वेळेवर पोहोचली, माझ्याबरोबर सूड होता, इंट्या ने तिकीट आधीच बुक केल्याने बसायला आरामात मिळाल. गप्पा टप्पा करत लोणावळा आल सुद्धा. लोणावळ्याला पोचल्यावर अजूनच आनंद झाला... वातावरण गारेगार झाल होत..
पावसाची रिप रिप सुरु होती.. बस स्थानकाजवळ अक्खा कंपू भेटला, किसन आणि गणेशा नंतर जॉईन झाले..
पण खरी मजा कोरीगडाच्या पायथ्याशी पोचल्यावर आली , अक्खा गड धुक्यात लपेटलेला होता, काहीच दिसत नव्हत.
पण वल्ली असल्याने रस्ता चुकायच काही टेन्शन नव्हत, आणि गड चढायला पण सोप्पा होता, सकाळी मजबूत चापलेल असल्याने, पोटोबा शांत होता :D
त्यानंतर जी काय पावसाला सुरुवात झाली , फुल रानटी ... :)
मध्ये एका ठिकाणी वल्लीने पाण्याच टाक, दाखवलं.. एकदम ताज. आणि गारेगार भूजल , वेगळीच चव होती ....
गणेशा तर पार येडा झालेला, :)
अर्ध्या तासात वर पोचलो, आणि निसर्गाने रौद्ररूप धारण केल, सोसाट्याचा वारा, अंधारलेल आकाश, जिकडे बघाव तिकडे ढगच ढग, १० फुटांच्या पुढच दिसत नव्हत, पाऊस खालून वरून कुठ्नही आदळत होता... अक्खा गड ओसाड पडलेला, आणि आम्ही फक्त बारा मावळे :)
वारा एवढा तुफान होता कि बास्स ... असा अनुभव मी तरी या पूर्वी घेतला नव्हता, साला हाच स्वर्ग .. बास्स... इकडे तिकडे नुसता बघत होतो , गूढ वातावरण झालेलं . पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता, तरीही आम्ही ती दीड दोन किलोमीटर ची तटबंदी चालत पूर्ण फिरलो , मग गडावरच्या कोराई देवीच्या देवळात आडोश्याला घुसलो. बाहेर मुसळधार पडणारा पाऊस, आता गाभार्यात देवीची करारी मुद्रा, आणि बाजूलाच शांतपणे जळणारा नंदादीप, नकळत हात जोडले गेले . आत्ता कुठे वल्ली ने कॅमेरा बाहेर काढला, मग काय सगळ्यांनी फोटो काढायची हौस भागवून घेतली,
थोड्या वेळाने बाहेर आलो, आणि परतीची वाट धरली. सगळ्यांना भूक सडकून लागली होती.
खाली एका हाटेलात किसान ने आणलेल्या शंकरपाळयांवर सर्वांनी ताव मारला, सोबतीला वाफाळलेला चाय, ओम्लेट आणि उकडलेली अंडी :)
बाकी वर हर्षद ने लिहिल्याप्रमाणे .......
पण खूप म्हणजे खूपच मजा आली, एक अविस्मरणीय ट्रेक
वल्ली चे विशेष आभार , वल्ली द लीडर :)
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Tue, 06/14/2011 - 09:01
नवीन
भले शाब्बास !
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 06/14/2011 - 09:35
नवीन
मला सांगितले असते तर मी सुद्धा आलो असतो की!!! :-|
जाऊ दे!!
पुढच्या वेळेस सांगा! जमल तर!!
बाकी, ट्रेक तर तुफानच झालेला दिसतोय!! :)
इनो घ्यावे लागणार आता!! :(
- Log in or register to post comments
व
वपाडाव
Tue, 06/14/2011 - 15:13
नवीन
म्हणुनच तर नाही ना सांगितले....
२ कवी एकत्र आल्यनंतर त्यांनी काय केले असते हे आम्हाला तुर्तास तरी पाहावयाचे नव्हते....
असो...
@स्पावड्या :: तिथे (गडावर) मुग गिळल्याबद्दल अन इथे (धाग्यावर) भडभड वकल्याबद्दल स्पष्टीकरण मागणेत येत आहे.... सविस्तर चर्चा व्यनिद्वारे....
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 06/14/2011 - 19:24
नवीन
>>२ कवी एकत्र आल्यनंतर त्यांनी काय केले असते हे आम्हाला तुर्तास तरी पाहावयाचे नव्हते
म्हणजे? गणेशाने बौद्धीक घेतले की काय तुमचे?
- Log in or register to post comments
म
मनराव
Wed, 06/15/2011 - 07:14
नवीन
नाही.......
तसा चान्स त्याला दिल्या गेला नाही............. :)
- Log in or register to post comments
म
मॅक
Tue, 06/14/2011 - 11:02
नवीन
खुपच मस्त,
चला वर्षा विहार चालू झाले....
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Tue, 06/14/2011 - 11:09
नवीन
जळवा (जळूचे अनेकवचन नाही) तेज्यायला.
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Tue, 06/14/2011 - 12:48
नवीन
इनो घ्या.
(जळवा लागल्या असतील तर तंबाखूचे पाणी लावा)
- Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते
Tue, 06/14/2011 - 11:25
नवीन
छान!
- Log in or register to post comments
प
पियुशा
Tue, 06/14/2011 - 13:21
नवीन
एकुनच मस्त झालेला आहे ट्रेक :)
- Log in or register to post comments
व
विसोबा खेचर
Tue, 06/14/2011 - 13:53
नवीन
मस्त.. :)
बाय द वे, मयत साप कोणत्या जातीचा वाटतो आहे?
तात्या.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/14/2011 - 13:59
नवीन
कोब्रा !! :D
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 06/14/2011 - 14:17
नवीन
हॅहॅहॅ..
धामण दिसते आहे.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 06/14/2011 - 14:19
नवीन
असो.
- Log in or register to post comments
ग
गवि
Tue, 06/14/2011 - 14:23
नवीन
कळले होते हो देवरुखकर.. तुम्हाला काय म्हणायचे होते..
;)
जातिवाचक चर्चेस फाटा फोडण्यासाठी कमेंटलो.. ;)
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 06/14/2011 - 15:30
नवीन
फोटू आणि वृत्तांत छान.
पावसाचे फोटू भारी आहेत.
- Log in or register to post comments
इ
इंटरनेटस्नेही
Tue, 06/14/2011 - 17:06
नवीन
वा वा चान चान
- Log in or register to post comments
प
प्रभो
Tue, 06/14/2011 - 17:28
नवीन
भारी रे!!!!
- Log in or register to post comments
आ
आत्मशून्य
Tue, 06/14/2011 - 20:23
नवीन
वल्ली (द-वाइल्ड-लीडर) यांचा साहसी मोहीमांचा अनूभव आणी ५०फक्त यांची केवळ उपस्थीती म्हणजेच आवश्यक गरजांचा काटेकोरपणे विचार व नीयोजन आधीच झाले असल्याची खात्री, म्हणूनच ट्रेक मस्तच होणार याबाबत शंकाच न्हवती.
पण निसर्ग आणी मिपाकरांच्या उपस्थीतीने खरी रंगत भरली... ज्यात दाक्षीणात्य चीत्रपट सृष्टीचे आद्य अभ्यासक, उपासक, प्रशंसक वपाडाव (अयो ऐयय्यो न्हवे) यांच्याशी झालेल्या चर्चा असोत, की किसन शिंदेंनी (गणेशापासून) व्यवस्थीत सांभाळून आणलेल्या शंकरपाळया खाणे असो... साहसांची आवड व ध्रूढ्नीश्चयता जोपासूनही कवीमनाची तरलता जिवंत ठेवणारे स्पश्टवक्ते मनराव असोत, की मिश्कीलता जपणारे व नेमकं बोलून मजेशीर फिरकी घेणारे व वातावरण सतत "हॅपनींग" ठेवणारे प्यारे१ असोत. विंडचीटरमधे गडावर हूंदडताना पाठमोर्या आकृतीत कॅप्टन जॅक स्पॅरो शी साधर्म्य भासणारे, व स्वभावाने मिश्कील पण काहीसे (तात्पूरते ) शांतस्वरूप धारण केलेले स्पा असोत की.... दीलखूलास हास्य व मोकळ्या स्वभावाने समोरच्याला लगेच आपलेसे करणारे सूधांशू देवरूखकर व अन्या दातार असोत. टेकसॅव्ही इंट्या व रॉकेट रायडर गणेशा सूध्दा भारीच.... सोबतीला सूसाट पाऊस आणी वारा... आणी लोणावळ्यातील हवामानात चमचमीत नाश्टा .... बस आणखी काय हवय एखादा ट्रेक यशस्वी करायला ? आपली तर रोज तयारी आहे... असा ट्रेक करायची ... आणी "मिपाकरांची सोबत म्हणजेच आयूष्याला रंगत" या म्हणीचा पून्हा पून्हा प्रत्यय घ्यायची :)
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 06/15/2011 - 05:40
नवीन
आपली तर रोज तयारी आहे... असा ट्रेक करायची ... आणी "मिपाकरांची सोबत म्हणजेच आयूष्याला रंगत" या म्हणीचा पून्हा पून्हा प्रत्यय घ्यायची
जे बात :)
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
Wed, 06/15/2011 - 07:45
नवीन
काही लोक मिपाकरणींबद्दल जास्तच आपुलकीने बोलत असल्याचे निदर्शनास आणुन देउ इच्छितो! ;)
- Log in or register to post comments
ट
टारझन
Wed, 06/15/2011 - 08:42
नवीन
=)) =)) =)) हे बाकी खरे हो !!
____________________________
- साखर्या ( गरीबांचा गोबो*)
*गोडबोल्या
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/15/2011 - 09:14
नवीन
अन्या, सांमकें खरें उलयलें तुवें !!
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 06/15/2011 - 09:23
नवीन
काही लोक मिपाकरणींबद्दल जास्तच आपुलकीने बोलत असल्याचे निदर्शनास आणुन देउ इच्छितो!
सर्व सोडून "स्पा"च्याच प्रतिक्रियेखाली हे विधान लिहिण्याचे प्रयोजन कळले. :) ;)
- Log in or register to post comments
५
५० फक्त
Wed, 06/15/2011 - 09:33
नवीन
याला म्हणतात 'खाया नाय पिया नाय गिलास तोडा बारा आना' , बिच्चारा स्पा, त्यानं फक्त खाण्यासाठी अन +१ म्हणायला तोंड उघडलं होतं आख्या दिवसात. असो, काय करणार आता.
आणि त्यानं भेळ आणली नाही याचा पण राग असेल ओ गवि, बरोबर बरोबर आता आठवलं.
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/15/2011 - 09:39
नवीन
लेकी बोले सुने लागे टाईप आहे हे गवि!!
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 06/15/2011 - 10:14
नवीन
लेकी बोले "सुडे" लागे का? ;)
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/15/2011 - 10:37
नवीन
या स्पावड्याच्या बाजूने बोलायची पण सोय नाही. गवि, वेस्टर्नची लोकल सेंट्रलला कुठं आणताय ?? :D
- Log in or register to post comments
म
मुलूखावेगळी
Wed, 06/15/2011 - 11:30
नवीन
मला तर असे कळले कि स्पावड्याकडे मिपाकरणींची डिरेक्टरीच आहे ;)
- Log in or register to post comments
अ
अन्या दातार
गुरुवार, 06/16/2011 - 12:23
नवीन
मुवे, त्या डीरेक्टरीच्या कॉपीज निघाल्या असाव्यात. अनेक सदस्यांनी त्यातले रेफरंसेस दिले ट्रेक च्या दरम्यान :D
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 06/15/2011 - 10:15
नवीन
लेकी बोले "सुडे" लागे का?
=))
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/15/2011 - 10:46
नवीन
अपेक्षित कृती, आपण नेहमी कुंपणावरच असता हे ठाऊक आहे आम्हांस.
- Log in or register to post comments
ग
गवि
Wed, 06/15/2011 - 10:50
नवीन
मुळात मुंबैवरुन गेलेले तुम्ही तिघे (किंवा पाच).
त्यात तू, स्पा गणेशा आणि किसन शिंदे "सेंट्रल"लाईनचे..
मग वेस्टर्न.. ?! ................... ओके ओके.. आलं लक्षात.. ;)
चालायचंच..
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 06/15/2011 - 10:54
नवीन
खुप वेळ घेता राव तुम्ही सगळं समजायला..:)
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 06/15/2011 - 10:56
नवीन
आपण नेहमी कुंपणावरच असता हे ठाऊक आहे आम्हांस.
मग आपणास "कुम्पणी" द्यावयास नको का कोण :D
- Log in or register to post comments
स
सूड
Wed, 06/15/2011 - 11:02
नवीन
मग चुकताय तुम्ही, त्यासाठी कुंपणाच्या अलिकडे की पलिकडे हे स्वतःचं मत असावं लागतं आणि तुमची 'कुंपणी' ?? मला वाटतं माझी राहूची महादशा सुरु व्हायला वेळ आहे अजून. :D
- Log in or register to post comments
स
स्पा
Wed, 06/15/2011 - 11:08
नवीन
मग चुकताय तुम्ही, त्यासाठी कुंपणाच्या अलिकडे की पलिकडे हे स्वतःचं मत असावं लागतं आणि तुमची 'कुंपणी' ?? मला वाटतं माझी राहूची महादशा सुरु व्हायला वेळ आहे अजून.
आमची कुम्पणी कुठे म्हटलंय आम्ही.. तुमची कुम्पणी हो....
आणि तुमची अशी दशा असताना , कोण राहू येणारे त्रास द्यायला तुम्हाला =))
असो बाकी वाद व्यनीत घालू, उगा विषयांतर नको
- Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा
Wed, 06/15/2011 - 11:24
नवीन
ह्या आमच्या घरगुती कामांच्या तर आयलाऽऽऽऽ....
गेल्या वर्षीच्या कोराईगडाच्या भटकंतीच्या आठवणी फिकुटतात न फिकुटतात तोवर पुन्हा पावसाळा आला, आणि हा हा म्हणता गडभेटीचे मनसुबे पक्के झाले. ऐनवेळी आमच्या नशीबानं घात केलाच पण. माशी शिंकली ती शिंकलीच!
मजा केलीत लेको...हेवा वाटतोय.
काय रे, आणि त्या तळ्यात उतरला नाहीत काय रे? भरगच्च धुक्यातून त्या तळ्यातून चालताना लै मज्जा येते राव.
@वल्ली: च्यायला, ग्यांगला मैदानातल्या तोफा नीट ठेवायच्या कामाला नाही का लावलं रे? ;)
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »