Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

कोल्हापुर वारी...

क
किसन शिंदे
Mon, 04/18/2011 - 15:17

  • Log in or register to post comments
  • 8820 views


वाचनखूण लावा
| 8820 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रभो Mon, 04/18/2011 - 15:28 नवीन
मस्त फोटू.. मिसळीचा फोटू न टाकल्याबद्दल निषेध!!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 04/18/2011 - 15:37 नवीन
मस्त फोटो! कोल्हापूरची सहल घडवल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
ग
गणपा Mon, 04/18/2011 - 15:37 नवीन
वारी आवडली. फोटु ही छान.. टंकायचा कंटाळा कमी करा आणि ती आख्याईका संगा बरं. ;) बाकी मिसळीचा फटु न टाकल्या बद्दल मंडळ अंमळ आभारी आहे. :)
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 04/18/2011 - 15:54 नवीन
फोटू टाकणारच होतु, पण कॅमेरा हातात घेऊन फोटू काढण्यापेक्षा पोटपूजा महत्वाची वाटली.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/18/2011 - 15:37 नवीन
छान व्रुत्तांत .. पण पन्हाळा हा गड आणि शिवा काशीद यांच्या बद्दलचा इतिहास वेगळा वाटतोय ...
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/18/2011 - 15:47 नवीन
प्रत्येक गडावर गेले की त्याबद्दलचा इतिहास जाणुन घेवुन.. छोटासा आपलाच अनुभव लिहिण्याची सवय असल्याने हे मुद्दे लक्षात आले.. तरीही चुक असल्यास सांगावे .. आणि फोटो येथे देता येत नसल्याने तेंव्हा असाच एक राहिलेला व्रुतांत येथे देत आहे.. त्यातील इतिहासाची शहानिशा करावी .. (आनि वरील फोटो मध्ये पन्हाळा पहावा) पन्हाळा . पन्हाळगडावर जाणारा सुखद हळुवार रस्ता गाडीने कधीच मागे टाकला होता .. हवेतील सुखद गारवा मनामध्ये रोमांच निर्माण करीत अलिंगण देत होता. जणु अनेक वर्षे तो, गडावर येणार्‍या प्रत्येक मराठी माणसाचे आदरतिथ्य असेच बिलगुन करतो असा भास झाला. प्रत्येक पावलागणीक इतिहास जींवत करण्याची आपसुक ताकदच पन्हाळ्यावर अस्तित्वात असल्याची जाणीव होत होती .. इतिहासामध्ये कधीच न पाहिलेल्या घटनांच्या, व्यक्तीमत्वांच्या प्रतिमा डोळ्यांसमोर उभ्या राहत होत्या. शिलाहार वंशीय भोजराज नृसिंह यांनी हा किल्ला ११७८-१२०९ या कालावधीत बांधला, आजही हिरवी लिपी पांघरुन.. गवताच्या हातात हात घेवुन बागडणारा पन्हाळा आपल्या मनात नवनिर्मितीचा उत्साह साठवत आहे असाच भास जाणवत होता. संभाजी महराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोठी पाहिली की मन कित्येक वर्षे मागे जाते, आणि रुबाबदार .. तेजस्वी राजपुत्राची एक ओझरती प्रतिमा डोळ्यासमोर तरळून जाते. आजही त्या रुबाबाच्या नशेत वावरणारा तेथील एकनएक कण मराठा साम्राज्याच्या सर्वात तेजस्वी आणि पराक्रमी राजपुत्राची आठवण करुन देताना मन अभिमानाने भरुन येते. आभाळाच्या उंची ला भेदुन, पराक्रमाची गाथा मातीच्या सुंगंधासहीत पावन करणारे शुर सेनानी बाजीप्रभू यांचा पुर्णाकृतीत असलेल्या पुतळा पाहिला की त्यांचा आवेश म्हणजे स्वामीनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ असणार्या शुर शेनानीची आपल्या कर्तव्याप्रती असणारी भक्ती आणि जीवाची बाजी लावुन राजनिष्ठा म्हनजे काय याची स्वराज्यात कोरली जाणारी ओळख स्पष्ट दिसते. चेहर्‍यावरील मर्दानी आवेश पाहुन मन १३ जुलै, इ.स. १६६० मध्ये गेल्या शिवाय राहत नाही ... अफजलखान या आदिलशहाच्या मुख्य सरदाराचा वध केल्यानंतर २८ नोव्हेंबर १६५९ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला, त्याला प्रत्युत्तर म्हणुन आदिलशहाने, ५०-६० हजार सैन्यानिशी सिद्धी जोहर या आपल्या सरदाराच्या सहाय्याने पन्हाळा ला वेढा घातला. ४ महिने,१० दिवस अडकुन पडल्यानंतर आणि गडावरील अन्न धान्य साठा संपु लागल्या नंतर, राज्यांना तेथुन निसटण्याचे प्रयत्न करावे लागले .. शिवा काशीद .. एक वीर मावळा, राज्यांच्या वेषात मुख्य दरवाजातुन आपल्या प्राणांची आहुती घेवुन सिद्धी जोहर कडे गेला आणि शिवाजी राजे पश्चीमेकडुन विशालगडाकडे निसटले. फसगत लक्षात येताच महाराजांना पकडण्यास घोडदळ धावले .. आणि यास रोखुन धरताना प्राण पणाने .. आवेशाने लढुन .. स्वताचे भाउ फुलाजी आणि मराठा मावळे यांच्या वीर मरणानंतरही, राजे विशाळगडावर पोहचेपर्यंत वीर बाजीप्रभु यांनी शत्रु सैनिकांना घोडखिंडीत (पावनखिंड) अडवुन ठेवले. स्वताच्या शरीरातील रक्ताचा एक थेंब असे पर्यंत फक्त राजेंच्या सुखरुप पोहचण्याची वाट पाहताना आपले बलिदान दिलेल्या या शुरवीर योध्यास मनापासुन प्रणाम . ६-७ तास चाललेल्या युद्ध संग्राम, बाजीप्रभुंच्या पुतळ्यातील आवेश पाहुन डोळ्यासमोरुन हालतच नाही, रक्त गरम होत होते.. आता ही छाती अभिमानाने फुलत होती ... समोर दिसणार्या हिरव्यागार दृष्याकडे ही नजर जात नव्हती , नजरेमध्ये तोच आवेश जाणवत होता .. स्वराज्यनिष्ठेचा . ---- गणेशा
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 04/18/2011 - 15:49 नवीन
क्षमा असावी दादुस, टंकण्याचा कंटाळा आल्यामुळे सिद्धी जौहर च्या एवजी राजा जयसिंग असे टाकले.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Mon, 04/18/2011 - 15:54 नवीन
भावा क्षमा कसली मागताय ... चालायचेच ... बरेच से किल्ले हे शिलाहार राज्याच्या काळात बांधले गेले असावेत असा माझा अंदाज आहे .. इतिहासाचा तसा माझा काही अभ्यास नाही .. पण वाचणावरुन नक्कीच हा किल्ला मुघलांनी नाही बांधलेला..
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Mon, 04/18/2011 - 15:44 नवीन
दादुस, वर सांगितल्या प्रमाणे हा सगळा इतिहास त्या गाइडने सांगितला जो तिथलाच स्थानिक होता.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Mon, 04/18/2011 - 15:46 नवीन
विहीरीची आख्यायिका सांगा की.
  • Log in or register to post comments
स
सुहास.. Mon, 04/18/2011 - 15:44 नवीन
ज ह ब ह रा !!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 04/18/2011 - 18:42 नवीन
किसनराव. पदार्पणातच मस्त लेख लिहिलात.
गाइडने सांगितलेल्या माहितीप्रमाणे हा गड शिवाजी महाराजांच्याही खूप आधी म्हणजे इ.स ८०० मध्ये एका मुघल राजाने बांधलेला होता आणि सर्वात आश्च्यर्याची गोष्ट म्हणजे त्या तीन दरवाजांपैकी एका दरवाजावर गणपती कोरलेला होता
गणेशाची सहमत. पन्हाळा शिलाहार भोज राजांच्या कारकिर्दीत साधारण १२०० वर्षांपूर्वी बांधण्यात आला. तेव्हाचे त्याचे नाव पन्नगालय, पर्णालदुर्ग असे होते. त्यामुळे गणपती कोरलाय यात काहीच आश्चर्य नाही. भोजराजांनी याचबरोबर वाईजवळील पांडवगड, कमळगड, वैराटगड इत्यादी दुर्गांची निर्मितीही केली तसेच अनेकानेक उत्तमोत्तम शिवमंदिरेही बांधली. रंकाळ्याचे स्वच्छ सुंदर रूप पाहून एकदम प्रसन्न वाटले.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Mon, 04/18/2011 - 16:45 नवीन
झक्कास फोटू!
  • Log in or register to post comments
५
५० फक्त Mon, 04/18/2011 - 18:34 नवीन
छान फोटो व माहिती, विशेषतः पन्हाळ्याची, मी पण फारसा फिरलेलो नाही गड किल्यांवर. फक्त एक दुरुस्ती सुचवु इच्छितो, श्री श्री शिवरायांचे हे एकमेव मंदिर नसावे, कारण सिंधुदुर्ग किल्यात श्री. राजाराम महाराजांनी एक मंदिर बांधलेले आहे, जे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. त्या मंदिरात एक प्रचंड तलवार आहे. जिथं जाउन अंगात काहीतरी संचारावं अशी माझ्या साठीची दोनच ठिकाणं एक तुळजाभवानीचं मंदिर आणि दुसरं हे सिंधुदुर्गावरचं श्री श्री शिवरायांचं मंदिर. बाकी लेख उत्तमच.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 04/19/2011 - 06:35 नवीन
हर्षद राव, शिवरायांची मंदिरे अजूनही असावीत पण वर्षातून फ़क़्त एकदाच त्यांच्या जयंतीला उघडणारे हे एकमेव मंदिर असावे.
  • Log in or register to post comments
श
शिल्पा ब Mon, 04/18/2011 - 22:43 नवीन
फोटो अन लेख दोन्ही छान. बाजीप्रभूंचा पुतळा भन्नाट आहे. राजांचे मंदिर उभारण्याचे कारण समजले नाही...काहीही झाले तरी त्यांचे नाव पुसले जाणे शक्य नाही. त्यांचे मंदिर असणे खुद्द राजांनाही मान्य झाले नसते असे वाटते. अवांतरः कोल्हापूरला मी फक्त काही तासच होते...मंदिर पहिले, चपला घेतल्या अन छानसे अस्सल कोल्हापुरी जेवण कुठे मिळेल म्हणून चप्पलवाल्यालाच विचारले तर त्याने एका गेस्ट हावुस बद्दल सांगितले आणि तिथे गेलो...मसालेदार, तिखट वगैरे काही नसून साधेच पण छान जेवण होते. असो, आता पुढच्या वेळी मिपाकरांचा सल्ला घेईन. :)
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 04/19/2011 - 00:20 नवीन
फोटू मस्तच आहेत सगळे. विशेषतः रंकाळ्याचे तर अतिप्रिय! (अजुनही जेंव्हा मी कोल्हापुरला जातो तेंव्हा रंकाळा हा माझ्यासाठी गविंच्या लेखातला पटवर्धन पूल असतो!) >>रांगेत असताना गाभाऱ्याच्या उजव्या बाजूला बाप्पाचं दर्शन झालं. त्याला साक्षी गणपती असे म्हणतात. मिसळीचा फोटू टाकला नाहित यासाठी मीही गणपाशेठप्रमाणे आभारी आहे. (मिसळ कुठे खाल्लीत?? हाटेलाचे नाव सांगा) गिर्‍हाईक मिळवण्यासाठी रिक्षावाल्यांचा लोचटपणा प्रत्येक शहरात्/गावात दिसून येतो; पण कोल्हापुरातील समस्त रिक्षावाले हे अत्यंत प्रामाणिक आहेत असे दिसून आले आहे. कोल्हापुरी बाबूमोशाय, अन्या
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 04/19/2011 - 06:42 नवीन
बाबूमोशाय, तसे कोल्हापुरात कोणत्याही लहानशा टपरीतली व हाटिलातली मिसळ हि चागलीच असते. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, कोल्हापूरला मुख्य स्थानकावर सह्याद्री नावाचे हॉटेल आहे तिथली मिसळ मला पेश्शल वाटली.
  • Log in or register to post comments
अ
अन्या दातार Tue, 04/19/2011 - 10:26 नवीन
चवीसाठी महालक्ष्मी मंदिराजवळच बुचडे यांचे खासबाग हॉटेल आहे. तिथली मिसळ मस्त झणझणीत तिखट असते. थोडी कमी तिखट मिसळ हवी असल्यास चोरगे यांची मिसळ तसेच हॉटेल करवीर येथील मिसळ; अशी काही बेंचमार्क ठिकाणे आहेत. पुढच्या वेळेस यातील काही ठिकाणे ट्राय करा. सगळ्यात भारी मिसळ खायची असेल तर थोडा जास्त वेळ बाजूला काढा आणि फडतरेची मिसळ खा.
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर Tue, 04/19/2011 - 06:55 नवीन
सुंदर फोटो, कोल्हापूर वारी घडवल्याबद्दल धन्यवाद अमोल केळकर
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Tue, 04/19/2011 - 08:00 नवीन
लेख आवडला. बर्‍याच वर्षात जोतिबा-पन्हाळ्याला गेलो नाही. आता पुन्हा जावे लागणार. पण पहिलाच फोटो महाद्वाराऐवजी भवानी मंडप म्हणून टाकलात. शिंदेसाहेब, भवानी मंडप ही वेगळी वास्तू आहे. तिचा महालक्ष्मी मंदिराशी दोनतीनशे मिटर अंतराचा संबंध आहे. या फोटोत महाद्वार आहे - (ज्याच्यावरून लै फेमस महाद्वार रोड या जगतास लाभला.) (भारताचे प्रथम ऑलिंपिक कांस्यपदक विजेते कुस्तीगीर) खाशाबा जाधवांचा पुतळा पाहिला नाहीत काय? बाकी पन्हाळा मोंगलांनी किंवा शाह्यांनी बांधलेला नाही. शिलाहार भोज राजा नृसिंह याच्या कारकिर्दीत तो बांधला गेला असे विकीपेडियावरून दिसते. त्यामुळे 'तीन दरवाजांपैकी एका दरवाजावर गणपती कोरलेला होता' यावर आश्चर्य नको.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 04/19/2011 - 08:08 नवीन
नाना, कोणतीही पूर्व नियोजित तयारी आणि माहिती नसताना पहिल्यांदाच कोल्हापूरला गेलो होतो त्यामुळे भवानी मंडप कि महाद्वार याचा गोंधळ उडाला.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Tue, 04/19/2011 - 10:15 नवीन
मला वाटते जाणकार मिपाकारंची मदत घ्यायला हवी होती. :(
  • Log in or register to post comments
प
पक्का इडियट Tue, 04/19/2011 - 10:19 नवीन
जबरा !!!
  • Log in or register to post comments
न
नरेशकुमार Tue, 04/19/2011 - 12:20 नवीन
काय बोलनार, निशब्द केले भावा ! इतिहास डोळ्यासमोरुन तरळुन गेला. धन्य ती लोकं, धन्य ते दिवस. भाग्यवान आहात अश्या लोकांच्या ठिकानी आपन जाउन आलात. जय भवानी, जय शिवाजी. जय दुर्गे माते, जय लक्ष्मी माता. हर हर महादेव.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 04/19/2011 - 13:36 नवीन
लय भारी हाय बग रं फटू किस्ना तुझ्यावाले.
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Wed, 04/20/2011 - 06:00 नवीन
बरीच माहिती विस्कळीत आहे भावा. वाईट नको वाटुन घेउ पण कोल्हापुरकरीन आहे मी. नायकिणीचा सज्जा इतका पडझड झाला? वाईट वाटल. जोतिबाच दर्शन दिल्याबद्दल धन्स. पन्हाळा बघायचा तर तुम्हाला कोल्हापुरात चांगले गाईड मिळतील. तुम्ही इंन्द्राज वा विनायक पाचलग यांना विचारुन जायच ना, काय आहे तुम्ही उतरल्यावर तुमचा बकरा कापायला कोणीही तयार असत, पण पुर्व नियोजन खुप माहिती अन समाधन कारक असत. तुम्ही बघितलात ते १/१० ही कोल्हापुर नव्हे भावा. अन किल्ल्याबद्दल जी माहिती रिक्षा चालकान दिली आहे ती पुर्णतः खोटी आहे. आता अश्या वेळी तो कोण होता हे जर मी उद्धृत केल तर ....नकोच ते. तुम्ही चुकिच्या माणसाच्या हातात पडलात. ज्या बुरुजा वरुन संभाजी राजे उडी मारुन पळाले ती जागा, तबक उद्यान, या जागा राहुन्च गेल्या.
  • Log in or register to post comments
क
किसन शिंदे Wed, 04/20/2011 - 06:09 नवीन
होय अपर्णा तै, वर सांगितल्याप्रमाणे जाणकार मिपाकारंची मदत घ्यायला हवी होती. :(
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 23 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 35 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 37 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 39 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 43 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा