Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
कलादालन

प्रतिबिंब

स
सूर्य
Tue, 04/12/2011 - 17:36

खुप दिवसानी मिपावर कलादालनात फेरफटका मारतोय. इतके दिवस वाचनमात्रच रहावे लागले होते. आता देव्हार्‍यात ठेवलेला कॅमेरा बाहेर काढायचा विचार आहे व कलादालनात वरचे वर येण्याचा विचार आहे. हे चित्र जुनेच आहे. परंतु कुठे शेअर केले नव्हते. नवीन चित्रे लवकरच टाकेन. हे आवडले तर जरुर कळवा.

Seagull

सांग दर्पणा , मी कसा दिसतो..?

मुळ चित्र इथे आहे
http://farm6.static.flickr.com/5181/5612876057_a06a5bb650_b.jpg

- सूर्य


  • Log in or register to post comments
  • 6514 views


वाचनखूण लावा
| 6514 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सर्वसाक्षी Tue, 04/12/2011 - 17:46 नवीन
परिणाम चांगला साधला आहे, चित्र आवडले
  • Log in or register to post comments
स
सूर्य Tue, 04/12/2011 - 18:01 नवीन
धन्यवाद साक्षीजी. (आपल्याला आवडले म्हणजे ते चांगलेच असणार) - सूर्य.
  • Log in or register to post comments
D
Dhananjay Borgaonkar Tue, 04/12/2011 - 17:56 नवीन
मस्त आला आहे फोटो. लवकरच बाकीचे पण टाक :)
  • Log in or register to post comments
स
सूर्य Tue, 04/12/2011 - 18:01 नवीन
धन्यवाद धन्या. टाकतो लवकरच. - सूर्य.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 04/12/2011 - 17:57 नवीन
छान. (पण मला जरा जास्तच गजबजलेले वाटले. मी वरील चित्र कातरून बघितले, आणि पक्षी-प्रतिबिंबाच्या कथानकावर क्षेत्र केंद्रित केले. ते मला अधिक आवडले.)
  • Log in or register to post comments
स
सूर्य Tue, 04/12/2011 - 18:03 नवीन
धन्यवाद. ते चित्र सुद्धा टाकावे. तुलना करता येईल. - सूर्य.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 04/12/2011 - 20:07 नवीन
अनुमती दिल्याबद्दल धन्यवाद. हे कसे वाटते? Image removed. मला तरी ही अधिक मिताक्षरी लघुकथा वाटते.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 04/13/2011 - 09:43 नवीन
हे शिर्षकाशी अधिक सुसंगत आहे. धन्यवाद. यापुढे अनुमतीची वाट बघु नये ही विनंती :) - सूर्य
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/13/2011 - 14:36 नवीन
कातरलेला फोटो जास्त आवडला. पुढच्या पक्ष्याची सावलीही त्यात कापलेली आहे त्यामुळेही असावं.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/13/2011 - 14:51 नवीन
कातरलेला फोटो आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/13/2011 - 17:55 नवीन
अतिशय टाईट क्रॉपिंग व मूळ सब्जेक्टच अर्धवट कापला गेल्यामुळे फोटोचे हे व्हेरियेशन खास आवडले नाही.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 04/12/2011 - 18:02 नवीन
फोटो आवडला सूर्य. मी मध्ये असलेला पक्षी जऽऽरासाच कोपर्‍यामधे प्लेस केला असता. :)
  • Log in or register to post comments
स
सूर्य Tue, 04/12/2011 - 18:06 नवीन
उजवीकडे का? मुळ फोटो कसा वाटतो आहे? इथे थोडा कंप्रेस झाल्यासारखा वाटतोय. - सूर्य.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Tue, 04/12/2011 - 18:11 नवीन
मूळ फोटो फ्लिकरवरला ना? हां, तो पाहूनच सांगितले. :) म्हणजे पाहणार्‍याच्या डावीकडे प्लेस केला असता. उजवीकडे केला तर फ्रेममधून सब्जेक्ट बाहेर जात आहे असे वाटते, डिस्ट्रॅक्ट होते. फ्रेममध्ये सब्जेक्ट येत आहे/ आहे असे वाटले पाहिजे. ( हे सद्ध्याच एक फोटोग्राफीविषयक वर्कशॉपमध्ये मिळालेले ज्ञान पाजळले आहे ;) )
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 04/12/2011 - 18:45 नवीन
फोटो आवडला. ( कोप-यातला पक्षी पूर्ण फ्रेम मधे यायला पाहिजे होता असे वाटले) कॅमेरा बाहेर काढायचा विचार आहे व कलादालनात वरचे वर येण्याचा विचार आहे. विचार चांगलाच आहे. :) मालक तुम्ही छायाचित्रातांच्या बाबतीत जाणकार असल्यामुळे क्यामेरा, त्याचा तो फोकस, त्याची ती लेन्स, फ्लॅश, अशी जी काही तांत्रिक माहिती असते ती टाका ना राव. मला तांत्रिक गोष्टी काही कळत नाही. पण तांत्रिक गोष्टी ज्यांना कळतात त्यांना ते उपयोगाचे ठरेल असे वाट्ले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सूर्य Tue, 04/12/2011 - 19:10 नवीन
प्रतिसादाबद्दल धन्यवाद सर. पुढील चित्रात तांत्रिक माहीती नक्की टाकतो. - सूर्य.
  • Log in or register to post comments
प
प्रास Tue, 04/12/2011 - 19:59 नवीन
.
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 04/12/2011 - 20:21 नवीन
सांग दर्पणा , मी कसा दिसतो..? असे कॅप्शन टाका त्याला. मस्त फोटो.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 04/13/2011 - 09:46 नवीन
अर्रे वा मस्त आहे कॅप्शन. - सूर्य.
  • Log in or register to post comments
च
चित्रा Wed, 04/13/2011 - 01:20 नवीन
चित्र आवडले.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 04/13/2011 - 04:16 नवीन
प्रतिबिंब आवडेश.
  • Log in or register to post comments
म
मराठमोळा Wed, 04/13/2011 - 09:47 नवीन
मस्तच रे... बर्‍याच दिवसांनी मोकळा वेळ मिळालेला दिसतोय. :) येऊ दे आणखी..
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 04/13/2011 - 09:51 नवीन
धन्यवाद चित्रा, वल्ली, ममो. :)
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Wed, 04/13/2011 - 09:52 नवीन
फोटो आवडला. तसे दोन्ही (मूळ आणि धनंजयांनी बदललेला) आवडले पण बदललेला फोटो शीर्षक डोळ्यासमोर ठेवून केल्या सारखा वाटला तर मूळ फोटोत फक्त एकाच पक्ष्याच्या प्रतिबिंबावर केंद्रित न होता दोन्ही पक्षी, आकाश वगैरेंचं प्रतिबिंब तर दिसतंच शिवाय फोटोत त्या दोन पक्ष्यांच्या एका छोट्याशा जगाचं प्रतिबिंब प्रकट झाल्यासारखं वाटतं.
  • Log in or register to post comments
स
सूर्य Wed, 04/13/2011 - 10:05 नवीन
शिवाय फोटोत त्या दोन पक्ष्यांच्या एका छोट्याशा जगाचं प्रतिबिंब प्रकट झाल्यासारखं वाटतं. मस्त दृष्टीकोन. - सूर्य.
  • Log in or register to post comments
प
परिकथेतील राजकुमार Wed, 04/13/2011 - 15:12 नवीन
काय रे सूर्याजी आलास का ? नविन फटू घेउन लवकर हजेरी लावावी. अन्यथा.... हा फटू आवडला आपल्याला. दूसरा पक्षी पहिल्याच्या प्रतिबिंबाकडे असूयेने बघतो आहे असे वाटले.
  • Log in or register to post comments
ल
लंबूटांग Wed, 04/13/2011 - 15:32 नवीन
यशोधरा आणि इतर काहीजणांनी सांगितलेच आहे. त्यालाच फोटोग्राफी मध्ये rule of thirds म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर कॅमेरा चा LCD screen अथवा viewfinder 3x3 च्या grid मध्ये विभागाला आहे असे समजावे व जेथे तुम्हाला लक्ष वेधून घ्यायचे आहे तो भाग मधोमध न ठेवता त्या ९ आयतांच्या ४ intersection points पैकी एका वर ठेवावा (मराठी शब्द सुचले नाहीत ऐन वेळी). उदा. खालील चित्रामधील लाल + चिन्हांच्या जागी Image removed. वर यशोधरा यांनी सांगितल्याप्रमाणे तो फोटोमध्ये डाव्या बाजूला असता तर अजून जास्ती छान दिसले असते.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 04/13/2011 - 17:52 नवीन
intersection points - छेदबिंदू? rule of thirds - तृतियांशाचा नियम? LCD screen - याला सुचले नाही :( viewfinder - यालाही :( grid - जाल म्हणावे का? मस्त समजावला आहे तृतियांशाचा नियम.
  • Log in or register to post comments
स
सूर्य गुरुवार, 04/14/2011 - 05:10 नवीन
लंबुटांग रुल ऑफ थर्ड बद्दल धन्यवाद. सर्वांना प्रतिसादाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. - सूर्य.
  • Log in or register to post comments
प
प्राजक्ता पवार गुरुवार, 04/14/2011 - 12:52 नवीन
प्रतिबिंब आवडले.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 04/14/2011 - 13:04 नवीन
फोटॉ दिसला नाही.. रिप्लाय वरुनच फोटो कसा आहे हे जाणुन घेतले..
  • Log in or register to post comments
स
सूर्य Fri, 04/15/2011 - 07:21 नवीन
धन्यवाद प्राजक्ता गणेश, तुम्हाला मुळ लिंकवर सुद्धा फोटो दिसला नाही का? खव मधे बोलु. - सूर्य.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Fri, 04/15/2011 - 15:49 नवीन
है शाब्बास! क्यामेर्‍यावरची धूळ झटकली ते उत्तम केले हो महाराज! आता तो पार्कातलाही फोटो येऊ द्या लवकर. :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा