स्वसंपादनाचे अधिकार
प
Fri, 07/30/2010 - 17:44
नवीन
लेखन करुन प्रसिद्ध केल्यानंतर पहिला प्रतिसाद येईपर्यंत ते संपादित करता येण्याची सोय लेखकाला हवी.ही सोय होती पण हे सर्व करण्यात बरीच टेक्निकल एनहॅन्समेंट लागते असे आठवते. २,३ मुद्द्यांबद्दल माहिती नाही पण प्रस्ताव चांगला आहे. असो. आता एक सांगा प्रतिसाद संपादन करता येते परंतु त्याला उपप्रतिसाद मिळाला की प्रतिसाद लॉक होतो. उद्या तेही संपादन द्या असा धोशा होईल. तसे करावे काय? :)
Fri, 07/30/2010 - 17:58
नवीन
म्हणूनच कुठेतरी अटकाव घालायचा असतो. स्वसंपादनाने झालेले घोळ आपण भोगतो आहोतच. इतर स्थळांवर अशा सुविधा नाहीत. इथले बरेच सदस्य तेथेही आहेत. अशा अवास्तव मागण्या करत नाहीत.
हे सर्व फक्त इथेच होते. "आम्ही वाकवू शकतो." अशी गुर्मी तर नाही ना येथे? ;)
घासकडवींशी माझे या संदर्भात बोलणे झाले. जमल्यास आता किंवा संध्याकाळी पेस्ट करेन. चुका करतात हे लोक, साईटच्या किंवा मॉड्यूलच्या केपेबिलिटिज, ते इम्प्लिमेंट करण्यासाठी लागणारा वेळ आणि कष्ट यांच्याशी यांना देणेघेणे नसते. केवळ संपादनावर टिका करणे हा हेतू असतो असे दिसते.
Fri, 07/30/2010 - 18:13
नवीन
साईट आणि मॉड्यूलच्या लिमिटेशन्स नक्कीच आहेत आणि तज्ञांवर येणारा ताण हाही मान्यच आहे.
इतर साईटींवर अशा सुविधा नाहीत ही सुद्धा लक्षात घेण्याजोगी बाब आहेच.
'मदत करताहेत तर कडेवरच घ्या' असा हेका दिसतो आहे असे दिसले तर सुविधा देण्यात अर्थ नाही! ;)
सर्व संपादकांनी मिळवून धोरण ठरवून त्या धाग्यावरच संपादक मंडळ आयडी कडून एक उत्तर तयार करुन ती चर्चा थांबवूयात, धागाही वाचनमात्र करुन टाकू! ;)
Fri, 07/30/2010 - 18:44
नवीन
Participants: प्रियाली and राजेश घासकडवी
राजेश घासकडवी
30 जुलै 2010 - 06:48 इतका विरोध का? वाईट उपयोग करणारी खोडसाळ उदाहरणं किती आहेत? आणि सगळेच वाईट वागतील असं गृहीतक का?
प्रियाली
30 जुलै 2010 - 06:56 विरोधाला अनेक कारणे आहेत आणि असे झालेले पाहिले आहे.
१. आधी काहीतरी लिहून लोकांनी आक्षेप दाखवल्यावर "मी तो नाहीच" असा स्टँड
२. आपल्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाले नाहीत तर लेख काढून टाकणे.
३. मागे संपादनाला एक "सेन्सिटिव" लेख दाखवून मग टाकताना त्यात बदल करून टाकण्यात आले.
४. लोकांना थोडी शिस्त हवी. घाईत काहीतरी लिहिण्यापेक्षा विचारपूर्वक लिहावे.(मीच सर्वात पहिली बेशिस्त)
५. गैरसमज - मध्यंतरी लेख/ चर्चा गायब का झाल्या असा प्रश्न लोकांना पडला. मग संपादकांच्या नावे गहजब. संपादकही एकमेकांना विचारत होते "तू काढला का?" मग कित्येकांना स्पष्टीकरणही हवे असते. च्या**! सुखाने जगू द्या एक दिवस तरी. ;-) (ह. घ्या हं! वैतागून नाही लिहित पण खरे लिहिले आहे.)
असे अनेक मुद्दे आहेत. स्वसंपादन नको यावर मी ठाम आहे. :-)
तुम्ही म्हणता सगळेच वाईट वागतील असे गृहित का धरावे? असे म्हटले तर माणसाला कायद्यांची गरज नाही. गुन्हे करणारे खरेच थोडे असतात नाही का? पण सूट मिळत असेल तर गुन्हेगारी वाढेल तसेच हे देखील आहे.
राजेश घासकडवी
30 जुलै 2010 - 08:04
तुम्ही दिलेल्या उदाहरणांपेक्षा कितीतरी जास्त उदाहरणं मला माहीत आहेत ज्यांत मामूली बदल सुचवले गेले आणि लेखकाने ते स्वयंसंपादन करून दुरुस्त केले. तुमचा लेख हा मी तुमच्यासाठीच उदाहरण म्हणून वापरला. पण तुम्ही 'मला बदल झाला नाही तर काही पडलेली नाही' असं म्हटल्यावर काय म्हणायचं?
>
असे म्हटले तर माणसाला कायद्यांची गरज नाही. गुन्हे करणारे खरेच थोडे असतात नाही का?हे टोकाचं आर्ग्यूमेंट झालं. संपादक मंडळांचं अस्तित्व पोलिसांसारखं आहेच, मोठे गुन्हे रोखायला. मी म्हणतो आहे ते थोडं घरगुती स्वरूपाचं झालं. एखाद्या घरात अपराध म्हणजे काय हे ठरवण्याचा हक्क पालकांना असतो - तसं काहीसं. किंवा एखाद्या हाउसिंग सोसायटीचे नियम असतात, व त्याप्रमाणे ते कारभार करतात. काही गंभीर गुन्हा झाल्याशिवाय पोलिस त्यात लक्ष घालत नाहीत. >
संपादकही एकमेकांना विचारत होते "तू काढला का?"ती लांच्छनास्पद परिस्थिती आहे. संपादक मंडळाने काहीतरी प्रोटोकॉल ठेवायला हवा. धागा उडवल्यास 'मी अमुक अमुक धागा उडवला' असा पाटिलकीचा धागा वगैरे... किंवा संपादक मंडळ आयडीतर्फे लेखकाच्या खवत खरड. पण मंडळात तेवढी कल्पकता व शिस्त नाही म्हणून सामान्य सदस्यांच्या हक्कावर गदा का? सध्याच्या क्लायमेटमध्ये तर संपादकांची, व्यवस्थापनाची प्रतिमा आणिबाणीच्या चौकडीसारखी आहे. असं असताना जर जनतेला स्वत:च्या म्याटरवर काही कंट्रोल दिला तर बरं वाटेल असंही वाटतं. बघा विचार करून. या विषयावर एक कौल टाकायचा मानस आहे. तेव्हा तुमची स्वयंसंपादनाच्या बाजूची ऑफिशियल मतं कळवावीत. जी मला दुसऱ्या बाजूची म्हणून वापरता येतील. नाहीतर कौल एकांगी होईल. प्रियाली 30 जुलै 2010 - 15:08
हे टोकाचं आर्ग्यूमेंट झालं. संपादक मंडळांचं अस्तित्व पोलिसांसारखं आहेच, मोठे गुन्हे रोखायला. मी म्हणतो आहे ते थोडं घरगुती स्वरूपाचं झालं.आपले लेख उडवून टाकणे हे देखील टोकाचे झाले आणि ज्यांच्याकडून झाले तेच हे कौल काढत आहेत यातच सर्व आले. बरे केल्याबद्दल खंत नाही हा मुजोरपणा आहेच.
ती लांच्छनास्पद परिस्थिती आहे. संपादक मंडळाने काहीतरी प्रोटोकॉल ठेवायला हवा. धागा उडवल्यास 'मी अमुक अमुक धागा उडवला' असा पाटिलकीचा धागा वगैरे... किंवा संपादक मंडळ आयडीतर्फे लेखकाच्या खवत खरड. पण मंडळात तेवढी कल्पकता व शिस्त नाही म्हणून सामान्य सदस्यांच्या हक्कावर गदा का?मला वाटतं मंडळात ते होतं परंतु तरीही ड्रुपल किंवा मिपावर इतक्या ऑटोमेटेड सुविधा नाहीत की डिलिट करणार्याचा किंवा केल्या गेलेल्या साहित्याचा ट्रेस मागे राहील. तेव्हा संपादकांना दूषणे देणे कृपया थांबवावे. शिस्त सदस्यांत नाही हे जाहीर दिसून आलेले असताना संपादकांना दूषणे देणे खेदजनक आहे. असो. या निरोपावर अधिक उत्तर देणे थांबवते. Delete message राजेश घासकडवी 30 जुलै 2010 - 18:39 >
बरे केल्याबद्दल खंत नाही हा मुजोरपणा आहेच.हा हा हा... जर अधिकाराचा योग्य वापर केला असं वाटत असेल तर त्याबद्दल खंत कशाला? माझ्या पोराला कोपऱ्यात उभं करण्याची शिक्षा दिली तर पोलिसांनी स्वयंशिक्षा वापरल्याबद्दल, व त्याबद्दल खंत न केल्याबद्दल मला मुजोर म्हणण्यासारखं आहे. मुजोर या शब्दाची व्याख्या तपासून बघावी.
इतक्या ऑटोमेटेड सुविधा नाहीत की डिलिट करणार्याचा किंवा केल्या गेलेल्या साहित्याचा ट्रेस मागे राहील. मी म्हणतो त्यासाठी ऑटोमेटेड सुविधांची गरज नाही. संपादकांनी आपण लेख उडवल्यावर एक पाटीलकीचा धागा काढला की झालं. तसा धागा दिसला नाही तर तो लेखकाने उडवला. लेखकाने लेख उडवल्यावर त्याला 'मी तो लेख उडवला' असं जाहीर करण्याची सक्ती करावी. इतकं सोपं तंत्रज्ञान आहे. Delete message Block author प्रियाली 30 जुलै 2010 - 18:50
लेखकाने लेख उडवल्यावर त्याला 'मी तो लेख उडवला' असं जाहीर करण्याची सक्ती करावी.तुम्ही धागा काढलात तेव्हा तसे केले होते का? असो. मला वाटतं या विषयावर आपले विचार पटत नाहीत तेव्हा न बोलणे इष्ट. Delete message राजेश घासकडवी 30 जुलै 2010 - 19:07
तुम्ही धागा काढलात तेव्हा तुम्ही तसे केले होते का?तुमच्या या शेवटच्या प्रश्नाला उत्तर देऊन मी या चर्चेला तुमच्या इच्छेप्रमाणे विराम देतो. (नवीन काही प्रश्न विचारत नाही) सक्ती नव्हती. या बाबतीतलं धोरण ठरवून ते कोणी जाहीर केलं नव्हतं. मला टारझननी अत्यंत हीण शब्दांत त्याबद्दल विचारलं तरी मी सरळ उत्तर दिलं होतं. संपादकांनी विचारलं असतं तर नक्कीच दिलं असतं. अशा ज्वलंत प्रश्नाबाबत धोरण तयार करण्याची जबाबदारी संपादकांची अथवा व्यवस्थापनाची असं माझं स्पष्ट मत आहे. ------------- कशी गंमत आहे बघा. अधोरेखित वाक्ये वाचा. यांना कसलीही सक्ती नको असते पण संपादकांनी कळवावे, निरोप लिहावेत, सुविधा द्याव्यात हे सर्व हवे असते. स्वतःवर आले की "मी त्यातला नाहीच."
Sun, 08/01/2010 - 09:32
नवीन
स्वयंसंपादन असावे असे माझे मत आहे. पण, लेखन स्वत:च काढून टाकणे हा स्वयंसंपादनाचा दुष्परिणाम होता. प्रमोद देव, मदनबाण, अवलिया, यांनी आपापले सर्व लेखन काढून टाकले. [ उदाहरण विचारल्यास ही नावे द्यावीत] वरील लेखकांचे सर्व लेखन आणि त्यावर सदस्यांनी लिहिलेले अनेक प्रतिसाद नष्ट झाले आहेत. त्यामुळे स्वंयंसपादनातील लेखन काढून टाकण्याची सोय त्यांना देऊ नये. मात्र संपादनाची द्यावी, आता ते कसे करता येईल हे मला माहित नाही.
अवांतर : अडीच दिवस सुटीवर असल्यामुळे जालाशी संपर्क नव्हता. त्यामुळे पाटीलकीत योगदाने देऊ शकलो नाही. करिता माहितीस्तव सादर. :)
-दिलीप बिरुटे
Sun, 08/01/2010 - 13:30
नवीन
प्रमोद देव, मदनबाण, अवलिया, यांनी आपापले सर्व लेखन काढून टाकले. [ उदाहरण विचारल्यास ही नावे द्यावीत] वरील लेखकांचे सर्व लेखन आणि त्यावर सदस्यांनी लिहिलेले अनेक प्रतिसाद नष्ट झाले आहेत.केवळ एवढेच? इतर संपादकांना आणखी नावेही माहित असावीत. ही घ्या माझ्या माहितीतील आणखी नावे - शुचि राजेश घासकडवी जयंत कुलकर्णी वरील दोन सदस्यच करून सवरून संपादक मंडळाला नावे ठेवत आहेत.
Sun, 08/01/2010 - 17:56
नवीन
वरदा वैद्य म्हणून (मला वाटते मिपावर दोन वरदा आहेत). ही न्यूजर्सीची आहे.
वरदा वैद्य [सध्या बहुधा पेनेसिल्वेनिया] या जुन्या मनोगती आणि विनुकाकांच्या आज्ञेतल्या आहेत. त्यामुळे त्या मिसळपावावर लेखन करणार नाहीत. त्यांचा एक लेख - मी ती वरदा नाहीच (म्हणजे तात्या वरदा हा आयडी घेऊन लिहित आहेत असा त्यांचा आरोप असणारा एकच लेख मिपावर होता, जो मिपाकरांनी हाणला कारण दुसरी व्यक्ती [न्यू जर्सीतील वरदा] ही खरी असल्याचे अनेकांना माहित होते.)
Sun, 08/01/2010 - 23:37
नवीन
वरदा : http://www.misalpav.com/user/73/track
यांचा सिग्नेचर धागा :
ऑफिस मधे काहीच काम नसल्यावर तुम्ही काय करता?
वरदा वैद्य : http://www.misalpav.com/user/499
यांचा मिपावरील एकमेव धागा :
निवेदन- नावातील साधर्म्य
Sun, 08/01/2010 - 18:16
नवीन
वरील नावांबरोबर अजून जी काही नावे असतील ती सर्व त्या चर्चेत यायला हवी होती. ’विदा आहे का’ असे विचारल्यावर वरील सर्वांची नावे आणि अंदाजे त्यांचे एकूण लेख आणि त्यावरील अनेकांनी आपला वेळ काढून लिहिलेले अनेक प्रतिसाद 'रागाच्या भरात' किंवा ’विचार करुन केलेल्या कृतीत’ अनेक प्रतिसाद विनाकारण उडवल्या गेले आहेत त्यामुळे व्यवस्थापकांना स्वंयसंपादनाचा अधिकार काढावा लागला. हे जरा स्पष्ट व्हायला हवे होते.
असो, आता लिहिले असते. पण धागा मागे पडला आहे. पण जेव्हा चर्चेत सहभागी होईन तेव्हा मला संपादकांनी सपोर्ट करावा. ''हो..हो, त्यामुळेच असे करावे लागले” असे म्हणावे. संपादक म्हणून मला चर्चेत एकटे पाडू नका...! :)
अवांतर : निलकांत लेखकाला संपादन करता यावे मात्र लेख काढता येऊ नये यासाठी काही करता येते का ? सदस्यांच्या भावना पाहता संपादनाची सोय देणे गरजेचे आहे.
-दिलीप बिरुटे
Sun, 08/01/2010 - 18:27
नवीन
’विदा आहे का’ असे विचारल्यावर वरील सर्वांची नावे आणि अंदाजे त्यांचे एकूण लेख आणि त्यावरील अनेकांनी आपला वेळ काढून लिहिलेले अनेक प्रतिसाद 'रागाच्या भरात' किंवा ’विचार करुन केलेल्या कृतीत’ अनेक प्रतिसाद विनाकारण उडवल्या गेले आहेत त्यामुळे व्यवस्थापकांना स्वंयसंपादनाचा अधिकार काढावा लागला. हे जरा स्पष्ट व्हायला हवे होते.ज्यांना पटवून घ्यायचे नाही ते ही १०-१२ नावे पुढे केली म्हणून पटवून घेणार नाहीच. उलट "हं! ४-५०० लेखकांपैकी केवळ १० असे करतात म्हणून आम्हाला शिक्षा" असे म्हणतील. घासकडवींचे निरोप येथे लावले ते दुटप्पीपणा दाखवण्यासाठीच. "विदा द्या" हा धोशा लावणारे लोक हे जाणून नाहीत का की मिसळपावाचे मॉड्यूल किंवा रिपोर्टस असा विदा गोळा करत नसेल आणि असा विदा गोळा करणे हे बहुधा मॅन्युअल एफर्टस आहेत. घासकडवी, थत्ते किंवा नाईल वगैरेंसारखे लोक हे सर्व जाणून असतात. संपादक इतर जबाबदार्या सांभाळून हे काम करतात हे देखील त्यांना ठाऊक असते पण डोळ्यांवर पट्ट्या बांधून घ्यायचे ठरवले की सर्व दिसेनासे होते. अशा लोकांसाठी आपण खपणे हे मला मान्य नाही.
निलकांत लेखकाला संपादन करता यावे मात्र लेख काढता येऊ नये यासाठी काही करता येते का ? सदस्यांच्या भावना पाहता संपादनाची सोय देणे गरजेचे आहे.संपादन करता यावे म्हणजे काय? एखादे वाक्य चुकून दोनदा पडले म्हणून एक वाक्य ठेवून दुसरे काढले आणि ५०० शब्दांच्या लेखातील सर्व ५०० शब्द काढून लेख काढून टाकला यात काहीच फरक नाही. :) अशी कोणतीही सोय की लेखातील केवळ १०% शब्द संपादित करता येतील वगैरे सहज सोपी असेल असे वाटत नाही. त्यापेक्षा, काळजीपूर्वक वाचून लेख टाकणे. मोठ्या सुधारणा असतील तर संपादकांना सांगणे. लहान सुधारणा प्रतिसादांतून सुधारणे. हे सोपे आणि सरळ उपाय वाटतात.
Sun, 08/01/2010 - 18:34
नवीन
काळजीपूर्वक वाचून लेख टाकणे.
मोठ्या सुधारणा असतील तर संपादकांना सांगणे.
लहान सुधारणा प्रतिसादांतून सुधारणे.
हे सोपे आणि सरळ उपाय वाटतात.
वोक्के......!
अवांतर : आता कोणी 'भावश्या' मला खरड करुन गेला की, मला कवितेचे संपादन करायचे आहे म्हणून मला खरड टाकून गेला. आता काही सांगेल. थोड्या वेळाने सांगेल. गायब झाला. मी तासभर वाट पाहात बसलो. ही डोकीदुखीच आहे ना ?
-दिलीप बिरुटे
Mon, 08/02/2010 - 12:33
नवीन
एकतर लेखन करतानाच जबाबदारीने करावे. फुटकळ चुकांसाठी दुरुस्त करा म्हणून धोशा लावू नये, ज्या काही सुधारणा कराव्याशा वाटत असतील त्या एकाच वेळी सांगाव्यात.
मिपावरचे लेखन म्हणजे काही शास्त्रीय माहितीचे निबंध नव्हेत की जे वाचून त्यातली माहिती किंवा विदा वापरल्याने मोठे घोळ होणार आहेत! तेव्हा अशा गोष्टींसाठी किती खपावे ह्याला मर्यादा आहेतच.
@नीलकांत,
धोरणामधे असे स्पष्ट करावे की -
संपादनाचे अधिकार हे लेखन प्रसिद्ध झाल्यावर पहिली प्रतिक्रिया येईपर्यंतच उपलब्ध असतील. लेखन जबाबदारीने आणि काळजीपूर्वक करावे.
संपादन आवश्यकच असल्यास संपूर्ण लेखनात कुठे आणि काय बदल हवे आहेत ते एकदाच सांगावे.
शुद्धलेखनाच्या चुका संपादन करण्यास सांगू नये.
Mon, 08/02/2010 - 13:49
नवीन
सहमत आहे..
(सहमत)केशवसुमार
आपण ऐकतो आहोत म्हणून हे लोक डोक्यावर चढायल लागले आहेत.. दुर्लक्ष करा ..जस्ट इग्नोर देम..
असे ३-४ जण सोडून गेले तर मिपावर काही ही परणाम होणार नाही. निलकांता एक दोन आठवडे आणिबाणी आणून हे सगळे नासके कुछके कांदे मिपावरून हकलू दे रे बाबा.. म्हणजे थोडे दिवस थोडा मनस्ताप कमी होईल..
(लोकशाहिने त्रस्त)केशवसुमार
गेले २-३ दिवसापासून बरेच नवे आयडी बरेच अॅक्टिव झालेले दिसतात..
(काळजीत)केशवसुमार