सुपरहिरो क्लॉ-एक्स वर एक लघुपट

मित्रांनो,
बर्‍याच लोकांना आठवत असेल की राज कॉमिक्स एक शॉर्ट फिल्म घेऊन आली होती, बहुधा फक्त 2, प्रत्येकाकडून पैसे गोळा केले होते, त्यांच्याकडे कोटींची मालमत्ता असताना, ज्यांनी मास
फंडिंग दिले त्यांना क्रेडिट सुद्धा मिळाले नाही (असे असावे)
डोगा लोक शॉर्ट फिल्म बद्दल माहितीही नव्हती
आणि काही प्रकाशन त्यांच्या व्यक्तिरेखेची शॉर्ट फिल्म काढणार होते,
राज कॉमिकचे नाव विसरले लोकांनी नागराजची सिरीयल घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांना नकार मिळाला आणि मालिका खूप चांगली निघाली . चला, motu patlu प्रसिद्ध झाले, raj कॉमिक्समुळे लोक फक्त भाऊंच्या भांडणात अडकले आहेत,

चंद्रकांत सखाराम चव्हाण कोण .......

दिव्याचे तेज डोळ्यांचे वेज कोण तिथे जाळीत आहे
शंभर वर्षांनंतर कोण माझी कविता वाचीत आहे?

वा रा कांत

चंद्रकांत सखाराम चव्हाण कोण होते म्हणून विचारले तर पुष्कळ लोकांना माहीती नसेल. एखादा वात्रट पोरगा म्हणेल चव्हाणांचा चंद्या.

११७ वर्षापुर्वी ठाण्याच्या वसई तालुक्यात अर्नाळा गावी चंद्रकांत सखाराम चव्हाण यांचा जन्म ९ जुन १९०६ साली झाला.(आज ९जुन आहे)

ग्रंथ प्रकाशन सोहोळा - अज्ञात पानिपत

प्रकाशन समारंभाची तारीख ठरविताना एक मोठा योग्य जुळून आला. ज्येष्ठ इतिहास-संशोधक मा. श्री. गणेश हरी उर्फ तात्या खरे यांच्या स्मृतीनिमित्त भारत इतिहास संशोधक मंडळ दर वर्षी काही ना काही कार्यक्रम आयोजित करत असते. यावेळी त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत माझे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी मला मिळते आहे, हा एका अर्थाने तात्यांचा आशीर्वादच आहे असे मी समजतो.

भारताबाहेरचा भारत -अंदमान २

आधीचा भाग-- भारताबाहेरचा भारत -अंदमान १

आज सहलीचा दुसरा दिवस. रात्रभर मस्त झोप झाल्यामुळे ताजेतवाने वाटत होते.
b

रॉँग नंबर--२

चहा पिऊन ताजा तवाना होतोय तेव्हढ्यात फोन आला.
“हॅलो अमुक. मी तुझ्यावर भयंकर रागावले आहे. का आला नाहीस? किती वाट पाहायला लावायची?” आवाजावरून तरी कोमल-१ वाटत होती.
“कोमल एक तर तू फ्रॉड आहेस किंवा मी म्याड आहे.” मी माझ्या आवाजावर नियंत्रण ठेवत बोललो.
“अर्थात तू म्याड आहेस. ते राहू दे. आज तुला हा साक्षात्कार व्हायचे काही खास कारण?” ती खोडकरपणाने बोलली.

ग्रॅण्ड शो

नवं शैक्षणिक वर्षं उजाडलं, आम्ही नोटीस बोर्डासमोर जमलो. बघतो तर लोचा! आम्हाला दिलेला वर्ग साक्षात जुन्या इमारतीत आणि नवे विद्यार्थी (नी) मात्र नव्या इमारतीत. ही फाळणी कुणालाच मंजूर नव्हती. काही लडीवाळ शब्दांची देवाण घेवाण झाली आणि सर्वांची पाऊले हॉलिवुड कडे वळली. हॉलिवुड म्हणजे आमच्या कॉलेजची मागची बाजू. मोठा नयनरम्य परिसर. ईमारतीच्या भिंतीलगत हिरवळ आणि काही शोभिवंत झाडं. अशोक, गुलमोहर आणि नारळाचे उंच वृक्ष. दुसर्‍या म्हणजे खाडीलगतच्या बाजूला सलग बांबूची बेटं. मधे पायवाट. टोकाला खाडी, डावीकडे वळलं की आमच्या नव्या इमारतीला वळसा घालून कला, वाणिज्य च्या इमारती आणि पुढे कँटीन.

'अज्ञात पानिपत'

मर्वेन टेकनोलॉजीज् यांच्याद्वारे प्रकाशित 'अज्ञात पानिपत' या माझ्या आगामी मराठी पुस्तकाची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरु झाली आहे. या पुस्तकाविषयी अनेकांना उत्सुकता आहे. या पुस्तकाचे स्वरूप काय, ते कोणाला उपयुक्त ठरेल याविषयी थोडक्यात पुस्तक-परिचय इथे करून देतो आहे.