तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....( २)

अर्ध्या तासापूर्वी झालेल्या त्या सगळ्या मरणप्राय प्रसव वेदनांचा विसर पडला तोंडाचे बोळके दाखवणार्‍या निष्पाप हसण्याने. जणू माझाच जन्म झाला असावा असे वाटले. डोळ्यातून अश्रुंच्या धारा लागल्या होत्या. अनहद असा एक नाद असतो म्हणे. देवांच्या वाद्यांचा. कशावरही आघात न करता हा नाद होतो. तसा नाद कुठेतरी उमटला. तो तसा अनुभव येत असेल तर काहीही करायला तयार होऊ आपण

क्रमशः
मागील दुवा https://www.misalpav.com/node/53375

पहिले ‘काव्य’ प्रसवताना . . .

वयाचे एकविसावे वर्ष पूर्ण झालेलं होतं आणि नुकताच मतदानाचा अधिकार मिळाला होता (तेव्हा तो 21व्या वर्षी मिळायचा, 18व्या नव्हे). त्यामुळे झालो बाबा आपण एकदाचे प्रौढ, ही मनात सुखद भावना. पदवी शिक्षण शेवटच्या टप्प्यात आलेलं. त्याच दरम्यान लेखन उर्मी अगदी उफाळून आली. तशी ती त्यापूर्वीच्या काही वर्षांत मनात धुमसत होतीच परंतु लेखणीपर्यंत काही पोचत नव्हती. वसतिगृहाच्या एकंदरीत सामाजिक वातावरणातून लेखनाची ठिणगी पडायला चांगली मदत झाली. मग सुरुवातीस वहीतच काही खरडकामे झाली आणि त्यानंतर सार्वजनिक लेखनात पदार्पण केले ते वृत्तपत्रातील वाचकांच्या पत्रांमधून.

कथा : तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?

---------- अलिकडं ------------

सगळ्यात आधी त्यांना जाणवला तो निसर्गाच्या सर्व हालचालींनी गजबजलेला एकांत. कुठलाही गोंगाट नाही. काटेरी झुडुपांवरून सर्र असा आवाज करत वाहणारे वारे. पक्षांची किलबिल. तळपायाखाली एखाद्या सपाट दगडाची रुतणारी ऊब.

शहरातल्या घरातल्या मधल्या डिजिटल भिंतींना कंटाळून ते इथे भटकत होते. त्या भिंतींच्या आत तीच रोजची 32k पिक्सेलमधली भांडणं करून ते वैतागले होते. ज्या ज्या त्रासदायक आठवणी ते काढत त्या त्या भिंतींवर लगेच प्रोजेक्ट होत. ती किंचाळायची, “तू मला कंट्रोल करू बघतोस”. तो किंचाळायचा, “तुझ्यापेक्षा माझी डॉलच परवडली”.

तेरी नजरो से आज नजर मिलाना चाहती हुं....

दार लाव गं जरा... गोपिकाबाई करवादतात. त्यांना स्वतःलाच त्याचा आवाज परका वाटतो. कुठूनतरी दुरुन आल्यासारखा , कोणातरी दुसर्‍याचाच.
इतका परका की त्यानाच कोणीतरी दार लावायला सांगितले असावे असा. क्षणभर अचंभीत व्हायला होते. कोण आलंय या वेळेला म्हणून त्या इकडे तिकडे पहातात.

पुस्तक परिचय : शाश्वत: लेखक संजीव कोटकर

पुस्तक परिचय
शाश्वत : लेखक संजीव कोटकर
कथासंग्रह
प्रकाशकः हेडविग मिडीया हाऊस