माझे पहिले कवितेचे पुस्तक Nightingale in the Shadows गुलामांच्या भाषेतच

चित्र
या महिन्यात मी माझे पहिले पुस्तक इंग्रजी भाषेत प्रकाशित केले. त्यामागची कथा अशी आहे— सुमारे वर्षभरापूर्वी माझ्या सौ.ची बहीण, वय 80च्या पुढे असलेली, मला म्हणाली: “विवेक, तुझ्या कविता उत्तम आहेत. त्या इंग्रजीत अनुवाद करून पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित कर. लागेल तर मी त्यांचे संपादन करून देईन.” माझ्या सौ.ची आतेबहीण, डॉ. उषा बंदे— आयआयएएस शिमला येथील माजी फेलो—गेल्या 50 वर्षांपासून विविध इंग्रजी वृत्तपत्रे आणि मासिकांत नियमित लेखन करत आहेत. मराठी असल्यामुळे त्या दुर्गप्रेमीही आहेत. हिमाचलमध्ये स्थानिकांना देखील माहीत नसलेले 300 हून अधिक दुर्ग त्यांनी शोधून काढले आणि पुस्तकरूपाने प्रकाशित केले आहे.

मी जवळपास 40 कविता आणि तेवढ्याच गोष्टी इंग्रजीत स्वतः अनुवादित केल्या. आवश्यक वाटले तेथे ChatGPT ची मदत घेतली. डॉ. उषा बंदे यांनी स्वखुशीने त्या सुधारून दिल्या. सुरुवातीला एकच पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार होता. पण अचानक BookLeaf Publishing चे जाहिरात पाहिले. 2000 रुपयांच्या आत ई-बुक आणि पेपरबॅक दोन्ही उपलब्ध. खर्च कमी असल्यामुळे आधी फक्त कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. गोष्टींचे पुस्तक नुकतेच दुसऱ्या प्रकाशकाला दिले आहे. दोन-तीन महिन्यांत तेही इंग्रजीत प्रकाशित होईल.
सौ.साठी लिहिलेली एक कविता इंग्रजीत अनुवादित झाल्यावर अधिक सुंदर वाटते.

Spring in Her Eyes”

Today, in the spring sun,
The whole world bathed anew.
From winter’s silent slumber,
Even the poem stirred and woke.

On the aging tree,
Fresh leaves gently unfurled.
In the fifth melodic note,
The koel sang her song.

Seeing her, I softly whistled.
Seeing me, she blushed—just a little.
No words, just glances,
And a smile tucked in her cheek.

Let there be storms,
Let worldly toil be endless—
Still, in her eyes,
Spring blossoms forever.

पुस्तक खरेदी करण्यासाठी लिंक.

https://amzn.in/d/bYns1hd - Amazon Link

https://ebooks.bookleafpub.com/product-page/nightingale-in-the-shadows - E-Book