Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

शाळेतील गमती जमती

स
स्वाती राजेश
गुरुवार, 02/21/2008 - 16:25
💬 92 प्रतिसाद

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 99131 views

💬 प्रतिसाद (92)
ल
लेले Mon, 03/03/2008 - 06:29 नवीन
मि चौथित असेल तेव्हा आम्हाला बाई॑नी ग्रूहपाठ करुन आणयला सा॑गितला होता...... आणि नेहमिप्रमाणे मि काहि केला नव्ह्ता...... न॑तरच्या तासाला मग बाई॑ना कोणितरी सा॑गितला कि मिएका मुलिला 'LOVE LETTER' लिहीला म्हणुन......... मग काय तेव्हा बाई काहि बोलल्या नाहि पण न॑तर जेव्हा ग्रुहपाठ विचारायला आल्या तेव्हा मला त्या॑नि खुप छड्या मारलेल्या... आणि त्या॑च वेळी त्या म्हणालेल्या....."कि तुम्हि मुला॑ना ग्रुहपाठ करायला वेळ नाहिए आणि इथे मुली॑ ना 'LOVE LETTER' लिहायला मात्र जमत॑य" पण खर॑च मि कोणालाच कोणतही 'LOVE LETTER' वगैरे काहिही लिहीला न व्हता. पण शाळा म्ह॑टली कि मला ..........
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 03/04/2008 - 04:41 नवीन
चौथ्या वर्गात "प्रिया आज माझी नसे साथ द्याया" हे गाणे म्हटल्याने आमच्या बाईंचा खूप मार खाल्ला होता. असो. - सर्किट
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 03/04/2008 - 08:12 नवीन
आमचे उप शालाप्रमुख ( शाळेनंतर हा शब्द प्रथमच लिहीला) सबनीस सर्..त्याना का कोणास ठाउक सगळे शंभो असे म्हणत तसे म्हणताना एक्दा मी सापडालो.त्यानी मला वर्गाबाहेर अंगठे धरुन उभे केले. येणारे जाणारे प्रत्येक सर मॅडम मला का उभे केले आहे असे विचारत. मी त्याना मी सबनीस सराना शंभो असे म्हणालो म्हणूनउभे केले आहे असे खरे सांगायाला लागलो. त्यावर येणारे जाणारे प्रत्येक सर मॅडम जाताना वर्गात पाहुन हसत जात राहीले... त्या प्रकाराला कंटाळून मला सबनीस सरानी वर्गात परत बोलावुन घेतले. आणि शि़क्षा संपविली
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 03/04/2008 - 14:53 नवीन
त्यांना होणारी शिक्षा त्यांनी लवकरच संपवली हे बरे झाले!!;))) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विवेकवि Wed, 03/05/2008 - 16:21 नवीन
अतिशय ऊत्तम मिनु जोशी.
  • Log in or register to post comments
अ
अनामिका Tue, 04/08/2008 - 15:20 नवीन
कविता खुपच छान आहे. अगदी मनाला स्पर्श करणारी आणि पुन्हा मनाने शाळेत नेवुन बसवणारी. मला अजुन आठवतय अश्या काही कविता कुणी केल्या कि आम्ही त्या फळ्यावर लिहायचो. फळा लिहिणे एक मोठे कार्य असायचे पण मन लावुन (प्रसंगी वेळ काढुपणा करत केवळ तास बुडवायचा म्हणुन)ते करायचो आम्ही. शाळेच्या इमारतीच्या प्रत्येक कोपर्‍याशी काहि ना काहि आठवणी निगडीत आहेत. शाळा या विषयावर खुप काहि लिहिता येइल.लिहुन कढायचा मानस देखिल आहे . वेळ मिळाला की लिहिन. याच कवितेचा उर्वरित भाग "बालपण देगा देवा" या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ आता थोडा कळायला लागलाय, तो बरोबर आहे ना.. हे विचारयला... मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय सौजन्य -ऑरकुट अनामिका
  • Log in or register to post comments
ॐ
ॐकार Sat, 04/19/2008 - 05:27 नवीन
पावसाळ्यात एकदा अर्थशास्त्राच्या तासाला (हल्ली तासिका वगैरे म्हणतात) आम्ही ४-५ कार्ट्यांनी मिळून तब्बल सव्वादोनशे होड्या बनवल्या होत्या. त्यासाठीचा कच्चा माल आधीच्या हस्तकलेच्या तासाला गोळा केला होता. चालू तासाला होड्या बनवणं मोठ कठीण! आम्ही आपले लाकडी बाकांच्या खणात हात घालून (आणि लक्ष फळ्याकडे देत) होड्या बनवत बसलो होतो. --- वक्तृत्वस्पर्धेला मी आणि माझा मित्र गूळ खात होतो. हॉल मध्ये खाली बसून जाम कंटाळा आला होता. भाषणं तीच ती. आम्हाला जमिनीवर एक डोंगळा दिसला. तासभर आम्ही त्या डोंगळ्याने गूळ खावा म्हणून त्याला सारखं गुळाच्या खड्याजवळ ढकलत , खेळवत होतो. शेवटी पी.टी. च्या सरांनी आम्हाला उचलला आणि बुकलला. --- एका बाईंना ( हल्ली मिस् म्हणतात) धडे वाचताना बाकड्यांच्या कडांना टेकून आणि रांगांमधून फिरत फिरत वाचायची सवय होती. आम्ही सगळ्या कडा डस्टर ने रंगवत असू. त्या बाईंना आपोआप काठ पदर पांढरा स्वच्छ होऊन मिळत असे. --- आमच्या वर्गात एकेमेकांना बापाच्या नावाने हाक मारायची टूम आली होती. बापाचं नाव काढलं की कोणीही भडकायचा. त्यामुळे मग भांडण, मारामार्‍या, मस्करी इ. चालायचं . वर्गातल्या मुलींना मात्र हा गमतीशीर प्रकार कधी कळला नाही. --- माझा एक मित्र - त्याला चित्रकलेचा प्रचंड वैताग! त्याचा मोठा भाऊही आमच्याच शाळेत, ३ वर्षांचं अंतर. चित्रकलेला एकच बाई, सॉरी मिस् होत्या! त्यांचा आणि ह्या दोघा भावांचा नेहमीच 'सुसंवाद' चालत असे. एकदा वैतागून त्या माझ्या मित्राला म्हणाल्या होत्या - " तू आणि तुझा भाऊ! किती फरक आहे. तुला चित्रकलेच्या तासाला दरवेळेस बर्गाबाहेर काधावं लागतं. तुझा भाऊ स्वतःहून वर्गाच्या बाहेर जातो." ह्यानंतर अख्खा वर्ग ५-७ मि. हसत होता. --- एकदा पी.टी. चे सर आणि इतिहासाच्या बाईंनी शिवाजी - जिजाऊ चा प्रसंग-संवाद त्यांच्या आवाजत ध्वनिमुद्रित केले होते. ते ऐकवायला ते वर्गात टेपरेकॉर्डर/प्लेअर घेऊन आले. पण कॅसेट वाजायच्या ऐवजी ए एम चालू झालं आणि त्यावर "चढ गया उपर रे.. गुटर गुटर" हे गाणं वाजू लागलं. त्यांचे लांब झालेले चेहरे आणि पोरांचं खिदळणं अजूनही लक्षात आहे.
  • Log in or register to post comments
न
नंदन Sat, 04/19/2008 - 08:09 नवीन
आमच्या वर्गात एकेमेकांना बापाच्या नावाने हाक मारायची टूम आली होती. बापाचं नाव काढलं की कोणीही भडकायचा. त्यामुळे मग भांडण, मारामार्‍या, मस्करी इ. चालायचं . वर्गातल्या मुलींना मात्र हा गमतीशीर प्रकार कधी कळला नाही. -- हेच. आठवी-नववीत याची भयंकर क्रेझ होती :) दुसरी टूम होती ती पेन-फायटिंगची. रेनॉल्ड्सची बॉलपेन्स घेऊन टिचकीने बेन्चवर असलेलं दुसर्‍याचं पेन पाडण्याचा हा खेळ शिक्षकांचा डोळा चुकवून खेळताना धमाल यायची.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
स
सुबक ठेंगणी Fri, 05/21/2010 - 00:17 नवीन
पेन फाईटसाठी मुद्दाम जड जड पेनं विकत घ्यायची, एनफाईट खेळताना ती निरागसपणे "बरोब्बर" एखाद्या बाकाच्या खाली घालायची, मग जाऊन घेऊन यायची...लई मजा केली. :)
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 04/19/2008 - 06:29 नवीन
शाळेत कारागीर पोरांची काही कमतरता नसते,,,,,बाकड्यावर करटकाने विविध आकाराचे खड्डे पाडायचे कशासाठी तर--बॉलबेअरिंग चा खेळ खेळण्यासाठी, आमच्यावेळी रामानदं सागरची अलिफ-लैला नावाची मालिका बर्‍याच पोरांना आवडायची,,,विशेष म्हणजे त्यातील नायका जवळ असलेली तलवारे सुलेमानी..... मग काय प्रत्येक बाकड्यावर त्या तलवारीची प्रतीमा करकटकाने खोदुन तयार.....(अगदी त्यावरील नक्षी सकट.) वर्गातील विशेष उध्योगः-- कागदाचे विमान तयार करायचे त्याचे टोक तोंडाने चाव चाव चावायचे आणि वर्गाच्या छतावर फेकुन मारायचे.....वर्गभर छताला चिकटलेली विमाने..... माझ्या वर्गातल्या बारी नावाच्या मुलाला तर मी मजबुत बुकलुन काढल्याचे मला स्मरते.....(मग माझ्या पालकांना घेऊन यावे असे फर्मान शाळेने काढले होते.....) (सावरकर प्रेम बहुधा माझ्या रक्तातच असाव....:))))) ) (ठाण्याच्या मो.ह.विध्यालयातील खट्याळ पोरगा) मदनबाण
  • Log in or register to post comments
ध
धनश्रीदिनेश Sat, 04/19/2008 - 08:46 नवीन
ह्या धकाधकीच्या जीवनात तुझ्या कवितेने, पुर्ण बालपण नजरेसमोरुन गेले, मी तर हे हि विसरलेली शाळेत माझ नाव स्वप्ना होत, माझी आठ् वण मला पड्लेले गणितात मार्क दहावीला असताना फक्त दिड मार्क, मग काय आमचा आणि गणिताचा ३६ चा आकडा, त्या सरांशीसुद्धा ३६ चा आकडा, नेहमिच वाकड, सरांनी सर्वांसमोर जी तारिफ केली वीचारता सोय नाही, ९४ ला आमच्या वर्गात ९४ च मुले एकत्र, तेच नेमके क्लास टिचर , त्यांचि ईच्छा ९४ सालात १०० % रिझल्ट लावायचा पण होता, रीझल्ट १००% च लागला, पण ९३ मुल पास झाले, कारण आमच्यातील एक तारा प्रकाशित होण्याआधिच निखळुन गेला प्रविण देसले हुशार, स्मार्ट, शांत, नेहंमीच सर्वांना मदत करणारा, तो सुद्धा आमच्या सेन्ड - ऑफच्या दिवशी , कॅन्सर झाला होता त्याला,तेव्हा मनात एक विचार येउन गेला आयुष्यात कॅन्सरच्या रोगा विरुध्द लढा द्यायचा, ठरवुन नाही, पण योगायोगाने आयुष्यात्,नर्स बनण्याचा योग आला, आणी पहील्या दिवसापासुन नोकरी लागल्यापासुन ते आजतागायत कॅन्सर युनिट मध्येच काम करतेय, फार फार् आभार देवाचे ज्याने मल एवढी चांगली सन्धी दिली
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/20/2010 - 18:28 नवीन
आपली सदस्यसंख्या एवढी प्रचंड आणि शाळेत दंगा केलेले आम्ही फक्त एव्हढेच? च्छ्या:! कलीयुग संपुन सत्ययुगाला सुरुवात झाली की काय? :D
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे गुरुवार, 05/20/2010 - 19:38 नवीन
ओ धमाल राव आम्ही आहोत की.. एकेकाच्या आठवणी वाचुन मनसोक्त हसलो.. साला शाळेच्या आठवणी निघाल्यावर माणुस हळवा होतोच. एवढे सगळ्यांनी लिहीले. आहो धोतर घालुन येणार्‍या मास्तरांच्या पाठीमागे शाईपेनाच्या तलवारी तुम्ही चालवत नव्हता का??? पकडले गेल्यास मार हमखास... आठवीतला एक प्रसंग... असाच एक ऑफ पिरेड कोणीच मास्तर फिरकले नव्हते आणि खेळायला मैदानात सोडले पण नव्हते. सगळ्यांनी शांत बसुन राहयचे आणि तो मॉनिटर नाव लिहुन घेत होता.. सगळे शांत चालु होते तेवढ्यात माझ्या बाजुला बसलेल्या प्रसादला खुसफुसायची हुक्की आली... तो माझ्या कानात बोलायला लागला तेवढ्यात मॉनिटरने आम्हाला पाहिले आणि आमचे नाव लिहुन घेतले. पाच एक मिनिटाने वर्गात फिरताना आमचा मॉनिटर पडला... झाले सर्व वर्ग हसुन हसुन बेजार.. तेवढ्यात शेजारच्या वर्गातले एक सर आले ते मारकुटे म्हणुन आधिच फेमस होते. त्यांनी मॉनिटरला विचारले "कोण गोंधळ घालत होते???" मॉनिटरने आमचे नाव सांगीतले... झाले आम्हाला समोर बोलवुन दोन दोन कानाखाली देण्यात आल्या... मग सर आम्हाला त्यांचा वर्गात घेउन गेले. आणि भरपुर शिव्या घालणे चालुच होते. शेवटी ते फळ्याकडे वळले... त्यांनी एक गणित तिकडे लिहिले होते. त्याकडे पाहुन परत तोंडाचा पट्टा सुरु झाला... हे गणित सोडवता येतच नसणार.. बाईंनी शिकवले नाही तर पुढचे आपण स्वःता करुन बघावे वैगेरे वैगरे... आम्ही आपले खाली मान घालुन उभे. एक खडुची मिसाईल आमच्या कडे आली आणि पुढच्या क्षणी मला ते गणित सोडवायला सांगीतले. गणित सोडवायला खडु हातात घेउन मी गणित सोडवायला लागलो तरी ह्यांची बडबड सुरुच होती "हा काय सोडवणार???" "ह्यांना नुसता दंगा करायला पाहिजे " मधेच पोर हसायला लागली तेव्हा त्यांनी पाहिले मी गणित सोडवुन खडुचे हात झटकत होतो... एकदम स्टाईल मधे.. सरांचा पारा भडकला जाम धुतले पुढे मला... त्याचा पुढे संरांनी चार वेळा एकच प्रश्न विचारला "एवढे गणित येते तर मग गोंधळ कश्याला करत होता???" मग माझ्यातही टिळक कुठुन संचारले माहीत नाही... "सर मी गोंधळ करत नव्हतो मी फक्त एकदाच ह्याचाशी बोललो तेव्हा मॉनिटरने माझे नाव लिहुन घेतले" परत दोन कानाखाली... शेवटी मॉनिटरला बोलावले खरे खोटे तपासण्यासाठी... खरे कळ्यालावर मॉनिटरला वाकवुन पाठीवर जाम गुंद्दे घातले... शेवटी कसाबसा तास संपला.... आणि आम्ही सुटलो.. त्या मॉनिटरने परत कधी नाव लिहिले नाही राव माझे... असे बरेच कीस्से आहेत .. मी एकुण सात वेळा शाळा बदलली आहे.. नवीन गाव नवीन शाळा नवीन मित्र मजा असते राव.. ;) (७ शाळांचा माजी विद्यार्थी)निखिल ================================ करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 05/20/2010 - 23:31 नवीन
असल्या गुर्जीला आमी बरोब्बर खोड्यात पकडायचो... डायरेक सहीची निवेदनं मुख्याध्यापकाच्या टेबलावर.. वर निवेदनात शब्दपण भारी.. "अन्याय..आपपरभाव..जातीयवाद..गावात वट नसलेल्या पालकांच्या मुलांवर जबरदस्ती" खंप्लीट विलेक्षानच्या टैमाचं राजकारण. दुसर्‍या दिवशी मास्तरनं निस्तं खुन्नस देऊ देऊ बघतच बसलं पायजे..आणि आपण त्याच्यापुढुन २२ इंची छाती ४२ इंची करुन फुगवुन तोर्‍यात चालायचं... असो.. एके काळी केलेला संप, पाठ्यपुस्तकाचं केलेल कॉमिक्स हे टाकतोच सवडीनं. :)
  • Log in or register to post comments
म
मस्त कलंदर गुरुवार, 05/20/2010 - 19:54 नवीन
आमच्या कन्या शाळेत एक जोशी आडनावाचे प्रचंड मारकुटे मास्तर होते.. ते म्हणजे एकदम धम्माल होती.. त्यांनी शेंडी राखली होती, आणि म्हणून ते टोपी घालायचे. कधी कधी ती शेंडी बाहेर डोकावे मग आम्हीही खुसुखुसु हसायचो.. हातात नेहमी पोहोची घालायचे.. बोलताना नेहमी तिच्याशी खेळायचे. स्वभावाने अतिशय कडक होते. मुली त्यांच्यासमोर जायला जाम घाबरायच्या.. एकदा ऑफ पिरियड्ला मी त्यांच्याच स्टाईलमध्ये टेबलावर जाऊन बसले. त्यांच्यासारखेच न थांबता एका दमात काहीतरी व्याख्या म्हणून दाखवत होते. नि मी ते शेंडी बाहेर येऊ नये म्हणून टोपी मागून सरकवत तशीच सरकवून त्यांचा टिपिकल शब्द "ध्यान द्या" म्हणायला नि तेच दारात दत्त म्हणून उभे रहायला गाठ पडली. आतापर्यंत खिदळणार्‍या कार्ट्या गप्प का म्हणून मागे पाहिले, तर लालबुंद डोळ्यांचे जोशी मास्तर समोर!!!!! मी... एकदम नि:शब्द!!!! तोवर तेच म्हणाले, "काय नाटकं लावली आहेस गं मके??? चल पळ जागेवर" हुश्श!!! मी जोरात धूम ठोकली. (त्याचाही खरंतर उपयोग नव्हता.. कारण अस्मादिकांना उंचीप्रमाणे नेहमीच प्रथम बाकावर बसण्याचा मान होता ) अजूनही बरेच किस्से आहेत.. पण टंकाळा आलाय म्हणून इथेच थांबते!! :) मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Fri, 05/21/2010 - 06:10 नवीन
आह ....लै भारी टॉपिक आलाय भो........ शाळेत तसा मी हुशार, सभ्य, शांत म्हणूनच प्रसिद्ध होतो. पण संधी आली की मस्ती सुचायची. मारामारी हा प्रकार मात्र नाही केला कधी. *इयत्ता ६ वी 'अ': मराठीला खिलारे सर होते. गृहपाठ झाला का ते तपासत बसले होते. सगळ्यांनी वह्या तयार ठेवल्या. मी मात्र सपशेल विसरलो होतो गृहपाठ करायला. सर मुलींच्या वह्या तपासत होते. मुलांचा नं. सुरू होईपर्यंत उरकुन टाकू म्हटले आणि घात झाला. त्यांनी मधेच मुलांच्या वह्या घेतल्या.....खल्ल्ल्ल्ल्ल्लास. बेदम मार खाल्ला त्यादिवशी. *इयत्ता ७ वी 'अ': बेंचवर पेन-फाईट खेळणे हा त्यावेळी वर्गातला जगप्रसिद्ध खेळ होता !!! यात एकमेकांच्या पेनला क्रॅक पडायचे. दर दोन दिवसांनंतर नवीन पेन विकत घ्यावा लागे. Rotomac च्या पेनने खुप दिवस साथ दिली होती. मुलींची मॉनिटर जाम नाटकं करायची. आम्ही खेळायला लागलो की स्टाफरूममधे जावून कोणालाही तासावर बोलवायची. मात्र या गेमची पण खासियत होती. दुसर्‍याचा पेन पाडताना आपल्या पेनने त्याला इतक्या जोरात शॉट मारायचा की तो पेन बाजूच्याच लाईनीत आवडत्या मुलीच्या बेंचखाली पडला पाहिजे. तेवढाच बोलण्याचा चान्स !!! सिद्धेश कामतेकरचा पोपटः या सिद्धेशने घरी पोपट पाळला होता. एकदा शाळा भरल्यावर तो वर्गात म्हणाला, "अरे यार, आज माझा पोपट उडाला रे" या अनपेक्षित वाक्याने आमची ह.ह.पु.वा. झाली. त्याला समजलंच नाही. तो तसाच पुढे म्हणत राहिला,"पिंजर्‍याचं दार उघडंच राहिलं माझ्याकडनं !!!" शाळा सुटेपर्यंत जाम ह.ह.पु.वा. झाली होती. =)) वडलांच्या नावावरून चिडवायची (बेकार)पद्धत आमच्याकडेही होती. त्या कॅटेगरीत 'शिबू' हे नाव जाम फेमस. पुढे या शिबूचं 'शडंबो' झालं (एका शनिवारी टी.व्ही.वर मिस्टर इंडिया लागला आणि मोगँबो चं यमक म्हणून शडंबो) *इयत्ता १० वी 'अ': आजारी पडलेल्या /(मुद्दामून) पडलेल्या मित्राला घरी सोडून यायची ट्रीक सुरू केली. एकदा स्वप्नील नावाचा मित्र कंटाळा आला म्हणून आजारी पडला. मधल्या सुट्टीत जितू स्वतःच्या वहीचा कागद फाडून स्वतः अर्ज लिहून वानखेडे टिचरांची सही घेऊन आला. गेटवर स्वप्नील ला सोडायला १०-१२ जणांचा घोळका. यात जितू सगळ्यांना मागे लोटतोय. मी डाव साधून स्वप्नीलची बॅग माझ्या हातात घेऊन स्वप्नीलच्याही आधी गेटच्या बाहेर !!! वॉचमनकाकाने बाकी सगळ्यांना परत वर्गाकडे पिटाळले. आईशप्पथ......जितूचे तोंड बघण्यासारखे झाले होते. आम्ही दोघं मग सायकलवर अख्खी सी.बी.डी. पालथी घालून आलो. त्याला घरी सोडून २ तासांनी वर्गात पोहोचलो. जितू धुमसतच होता.... :D इंग्लिशच्या वानखेडे टिचर आपल्या सर्वांत सर्वांत आवडत्या. काही शिक्षक व टोपणनावे: बीजगणिताच्या पाटील टिचर - कोकीजी कार्यानुभवच्या कासारे टिचर - प्रेमाशालिनी १० वी चे इतिहासाचे जाधव सर- ढगळ्या ६ वी च्या मराठीच्या पाटील टिचर- चिमणी (यांचा एकच डायलॉग-- ए पोरा,बुलु नको. यांच्या मराठीच्या तासाला तर गुपचुप मागच्या बेंचवर जाउन चोरून डबे खाण्याची बातंच निराळी. शिवाय आम्ही प्लॅस्टीकची २-३ रुपयांची छोटीशी चिमणी आणायचो वर्गात. तिच्यात पाणी भरुन शेपटीकडून वाजवली की अख्ख्या वर्गात शिट्टी 'दुमदुमायची'. ) स्वगतः एक हळवा कोपरा होता माझ्या मनाचा. पण कधीच बोलू शकलो नाही......तिचं लग्न झालं २ वर्षांपूर्वी #o - भारती विद्यापीठचा माजी
  • Log in or register to post comments
स
सोम्यागोम्या गुरुवार, 05/20/2010 - 23:19 नवीन
मिलिंद बोकील यांचं "शाळा" हे पुस्तक वाचा, लय जबरा आहे. त्यातली शिरोडकर तिच्यातर प्रेमातच पडलोय मी. फावड्या, सु-या, चिमण्या, अंबाबाई एकेक खतरनाक कॅरेक्टर आहेत. मी तर हातात घेतलं आणि संपवल्यावरच खाली ठेवलं ! B)
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Fri, 05/21/2010 - 00:37 नवीन
सॅन-फ्रान्सिस्को ते भारत आणि परत असे एकाच प्रवासात दोनदा सलग वाचले. आता जवळपास पाठही झाले आहे. सगळ्या व्यक्तिरेखा इतक्या जवळच्या आणि ओळखीच्या झाल्या आहेत, की आपणा पुन्हा शालेय जीवन जगतोय, असे वाटते. (शाळकरी)बेसनलाडू या पुस्तकावरच आधारीत 'गमभन' ही एकांकिका तितकीशी आवडली नाही. बरी वाटली. (रसिक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Fri, 05/21/2010 - 11:23 नवीन
'शाळा' वाचून कित्येक दिवस नॉस्टॅल्जीयातून बाहेरच येवू शकलो नव्हतो. पार खल्लास केला बोकीलांनी.
  • Log in or register to post comments
श
शुचि गुरुवार, 05/20/2010 - 23:45 नवीन
मी पोपट, प्रोफेसर आणि गणपती झाले होते नाटकात :) नेहेमी पहील्या बाकावर बसत असे. कधी दंगा नाही. सर्वात मागे ढ मुली बसत लांब लांब कानातले घालणार्‍या. होच मुळी आमच्या वर्गात तरी तसच होतं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Fri, 05/21/2010 - 04:20 नवीन
म्हणजे ही कविता :)
  • Log in or register to post comments
च
चिर्कुट Fri, 05/21/2010 - 07:31 नवीन
आमची पण (हजारोंमधील) एक आठवण.. आम्ही साता-याला 'रयत'च्या 'गुरूकुल' प्रकल्पात शिकत होतो. होस्टेल शाळेतच होतं. आमची रात्र अभ्यासिका असायची. या वेळेचा आमचा आवडता खेळ म्हणजे झोपलेल्यांना (खडू मारून) उठवणे. एकदा अशा अभ्यासिकेच्या वेळी ही मारामारी चालू होती. समोर खुर्चीत सर निवांत झोपले होते आणि अचानक एक खडू सरांना लागला. सर दचकून उठले आणि काय झालं ते कळाल्याबरोबर सगळ्यांचे हात बघत सुटले. एका मित्राला सर काय करत आहेत ते कळून त्याने हात पुसायच्या आधी सर तिथे हजर.. त्याचे खडूने पांढरे झालेले हात बघून आम्ही समजलो की हा गेला आता, पण शेवटी आमचाच मित्र!!! B) त्याने अतिशय गरीब तोंड करून आधीच सरांना हातातले खडू दाखवले आणि वर म्हणाला, "सर, मलाच कुणीतरी मारलेत!!" :)) काहीही न बोलता सर परत जाउन झोपले आणि आमचे चेकिंग ही वाचले..आजही त्या मित्राला भेटलो की ही आठवण हमखास निघतेच.. अवांतर : आमच्या मनाच्या हळव्या कोप-याचं परवा लगिन आहे.. :( --चिर्कुट (दहावी 'क')
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 05/21/2010 - 07:57 नवीन
परवाच हापिसात या 'रम्य' आठवणी निघाल्या होत्या. आमच्या वर्गातल्या पोरांनी एकदा पंख्यावर गुलाबाच्या पाकळ्या टाकल्या होत्या. आणि संस्कृतच्या बाईंना काही यायचं नाही म्हणून त्या शिरल्या शिरल्या पंखा सुरू करून दिला. आता गुलाबाच्या पाकळ्या उडवल्या म्हणून काय शिक्षा करायची का? वर्गात झोपा काढायची सवय मला ९-१०वीत लागली असेल. अशीच एकदा आराम करत होते तर आवाज आला, "अदिती, काय चाललं आहे?" मी साळसूदपणे काही सुरू नाही असं नाटक केलं, जे लवकरच उघडं पडलं. अर्थात बाई चांगल्या असल्यामुळे पाच मिनीटांच्या लेक्चरवर काम निभावलं. सगळ्यात हाईट्ट होती ती त्याच संस्कृतच्या बाईंची! त्या नवनीत गाईडमधून सगळं उतरवून द्यायच्या; तर आमच्या वर्गातली एक दोन पोरं गाईडच समोर धरून बसली होती! नेमकं बेंचेसच्या रांगातून फिरताना ते गाईड बाईंना सापड्लं. मग काय महाराजा, गाईडच जप्त! ज्याचं गाईड "पळवलं" होतं तो दोन दिवस शांत होतं; दोन-तीन दिवसांनी पोरांचा दंगा सुरू झाला तर नंतर समजलं. दुसर्‍या एका पोराला याच बाईंनी त्यांच्या लॉकरमधून काहीतरी आणायला सांगितलं, तर त्याला लॉकरमधे दोन गाईड्स सापडली, एक पोराचं आणि एक बाईंचं! शाळेत गाईडवर बंदी, पण या पठ्ठ्याने दोन्ही गाईड्स उचलून आणली! बाईंनी दोन दिवस शिक्षण-संप पुकारला ... आणि नंतर साळसूदपणे गाईड परत केल्यावर म्हणे, "दहावीच्या मुलांचं नुकसान नको असं मुख्याध्यापकांनी सांगितल्यामुळे मी पुन्हा शिकवायला सुरूवात करत आहे." पोरं जी खोखो हसली होती तेव्हा ...! माझ्या "कारकीर्दी"तला उच्चांक हा: आमच्या शाळेत कसलीही स्पर्धा असेल तर लगेच सगळ्यांना ती कंपल्सरी करण्याची वैट्ट सवय! सुंदर चित्र काढणार्‍यांना सक्तिने विज्ञानाच्या परीक्षा द्यायला लावायच्या, माझ्यासारख्या गद्य लोकांना चित्रं काढायला लावायची वगैरे वगैरे! मला चित्रं काढायचा पूर्वीपासूनच कंटाळा, आता जीवशास्त्रात ठीक होतं, नावं-बिवं देता येतात. असंच एक मोठं वादवजा भांडण घरी केलं आणि एका अशाच सक्तीच्या चित्रकलेच्या परीक्षेसाठी शाळेत गेले. रागबिग आला नव्हता, पण दंगा करायची सवय जुनीच! तर परीक्षेला काय काय विषय होते चित्रांचे, एक होता 'रामायणातील एक प्रसंग'. माझी तिरकस खोपडी लगेच विचार करायला लागली ... काय करावं. मग चित्रं काढायला घेतलं, एका तासात संपवलं आणि सायकलवरून आख्खं ठाणं (तेव्हा आमचं ठाणं लहान होतं हो!) उंडारायला बाहेर पडले. घरी आले, बाबांना प्रश्न पडला एवढ्यात कसं काय हिचं चित्रं पूर्ण करून झालं! माझं उत्तर तयार, "अहो बाबा, सोप्पंय! मी 'रामायणातला एक प्रसंग' काढला." बाबा: काय काढला प्रसंग? लहानपणी तुम्हाला दोघांना 'गीत रामायणा'तलं गाणं आहे ना, 'अनुपमेय हो सुरू युद्ध हे ..' त्यातली 'हाणा मारा कापा तोडा' ही ओळ खूप आवडायची. मी: नाही हो, तसलं काही नाही केलं मी! बाबा: (चेहेर्‍यावर भलं मोठं प्रश्नचिन्ह) मी: अहो काही नाही! एक झोपडं काढलं, दोन-चार झाडं काढली आणि वर एक लाईन मारली (च्च्च ... जीभ चावत), नाही म्हणजे एक आर्क काढली, तिच्यातून ठिणग्या बाहेर पडत आहेत असं दाखवलं.... बाबा: आणि मग काय सीता आणि रावण .... मी: नाही नाही! वर टीप लिहीली. "राम आणि लक्ष्मण हरणाच्या पाठी गेले आहेत आणि सीतेला रावणाने पळवून नेलं आहे, तेव्हाची झोपडी!" बाबा आणि मी पोट दुखेपर्यंत हसलो. आख्ख्या वर्गासमोर माझी एकदाच पूजा बांधली गेली होती! अदिती
  • Log in or register to post comments
भ
भारद्वाज Fri, 05/21/2010 - 11:28 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) एक नंबर.....
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Tue, 12/17/2013 - 08:37 नवीन
वेळ असला की मी जुने लेख वाचत बसतो. म्हणुन खरडवहीत जुने मी. पा. कार कुठे गेलेत ते लिहले आहे. गेले दोन तास हा लेख वाचत होतो खुपच नॉस्टॅलजिक झालो. आज्च्या मी.पा. च्या नविन सद्स्यांना हा धागां माहित व्हावा आणि त्यांनी काही तरी आप्ल्या शाळेचे लिहावे म्हाणुन हा धागा वर काढतोय. तुम्ही लिहीपर्यंत मी ही काही तरी खरडतोच.
  • Log in or register to post comments
म
मी-सौरभ Tue, 12/17/2013 - 14:21 नवीन
:)
  • Log in or register to post comments
म
मिनेश Wed, 12/18/2013 - 06:01 नवीन
न केलेल्या चुकीसाठी एकदा प्रचंड मार खाल्लाय शाळेत.....बाकीच्या आठवणी एक वेळ विस्मरणात जातील पण ही आठवण नाही....
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानव Wed, 12/18/2013 - 07:53 नवीन
हाताच्या बोटांमध्ये ४ खडू ठेऊन मग शेक हेंड करायचे आणि मुलगा बोम्बलला की शिकवता शिकवता "ए ओरडतो कशाला?" हि शिक्षा झालीय का कुणाला ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 12/18/2013 - 08:16 नवीन
आणि प्रतिसाद.... शाळेतील आठवणींनी हळवा झाल्याने तुर्त इतकेच.
  • Log in or register to post comments
त
तिरकीट Wed, 12/18/2013 - 15:23 नवीन
आमच्या ठाकुर सरांची आठवण झाली....त्यांचा १ डायलॉग होता....................... "सरपाळे, तु जोपर्यंत दहावी पास होत नाहीस तोपर्यंत मी दाढी करणार नाही (स्वतःची)" अक्षर लैच भारी होतं राव त्यांचं
  • Log in or register to post comments
म
मंदार कात्रे गुरुवार, 12/19/2013 - 07:38 नवीन
आम्हाला नववी ला मराठी शिकवायला एक म्याडम होत्या . त्यान्ची खासियत म्हणजे धडा किम्वा कविता शिकवताना त्या अगदी बाबामहाराज सातारकरान्प्रमाणे रसाळ प्रवचन करायच्या ! आणि त्या आख्यानात आपल्या घरात घडणार्या घटनान्चा उल्लेख करून भरपुर माल-मसाला टाकलेला असायचा . त्याना आत्मप्रौढी मिरवण्याची भारी हौस! प्रत्येक वर्शी येणार्या विद्यार्थ्याना ''यन्दा आम्ही कार (चारचाकी गाडी ) घेणार'' असे सान्गायच्या . शेवटी वैतागून एका मुलाने त्याना ऊत्तर दिले... बाई ,गेली दहा वर्शे आम्ही ऐकतोय गाडी घेणार म्हणून , साधी बैलगाडी तरी घेणार का या वर्शी? ......मग काय ? तो मुलगा त्या वर्शी मराठीत नापास!!! याच बाईनी कुत्री पाळली होती , त्या बाई वर्गात तासाला येण्यापूर्वी धावत ती कुत्री यायची आणि टेबलाखाली बसायची .....मग काय? कुत्री दिसली रे दिसली की पोरे कल्ला करायची ..... क्षक्षक्ष बाई आल्या रे ! ;)
  • Log in or register to post comments
प
परिंदा गुरुवार, 12/19/2013 - 09:55 नवीन
असेच आम्हाला विज्ञानाला साळसकर सर होते. ते विज्ञान कमी आणि इतर बाताच जास्त मारत बसायचे. कुठल्याही गोष्टीचा संबंध ते आपल्या मित्रांशी लावायचे. माझ्या एका मित्राकडे हे आहे आणि ते आहे. ह्या सगळ्या गोष्टी निव्वळ थापाच असायच्या हे देखील सर्वांना माहिती होते. :) एकदा सौरउर्जेविषयी सांगताना म्हणाले होते, "एकदा मित्राकडे जेवायला गेलो होतो, तेव्हा भात कमी झाला. तिने पटकन सौरकुकर लावला आणि १० मिनीटात भात तयार!" हा १० मिनीटात भात तयार करणारा कुकर खरोखरच सौरकुकर होता की प्रेशरकुकर हे साळसकर सर आणि त्यांचा मित्रच जाणो.
  • Log in or register to post comments
ए
एम.जी. गुरुवार, 12/19/2013 - 10:20 नवीन
नूमवि... भूगोलाच्या भिडे सरांना " मामा" का म्हणायचे माहीत नाही..पण म्हणायचे. अशाच एका ऑफ तासाला मामा भिडे वर्गासमोरून जात असताना एकाने त्यांना " ए मामा " म्हणून हाक मारली. ते आत आले आणि त्या पोराला यथेच्छ झोडपले... सर वर्गाबाहे निघाले तर दुसर्‍याने " ए काका " म्हणून हाक मारली. सर पुन्हा वळले आणि त्या पोराला धरले.. त्याला मारण्यासाठी हात उचलणार तेव्हढ्यात तो म्हणाला..." सर..सर.. मी काका म्हणालो..मामा नाही म्हणालो.." इतक्या प्रामाणिक कन्फेशननंतरही त्याला सरांनी वेडेवाकडे बडवून काढले.
  • Log in or register to post comments
व
वैशाली माने Fri, 12/20/2013 - 09:04 नवीन
अतिशय सुंदर कविता...
  • Log in or register to post comments
द
देव मासा Tue, 12/24/2013 - 08:52 नवीन
शाळेतला सर्वात पुचाट विनोद, आपन पेनातलि शाहि संपल्यावर, मित्राला विचारावे ''ए तुज्ह्या जवळ दोन पेन आहेत ?'' मित्र ''आहे ना आपन केविलवाणी नजरेणने म्हनावे ''एक दे ना मला.... आपले मित्र '' दोन पेन आहे रे , पण एक घरि ठेवला आहे. ... आनि मग संधि आणी आपलि वेळ आल्यावर हाच आहेर आपन पुढे करायचा
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानव Tue, 12/24/2013 - 08:56 नवीन
वाचून शिक्षणावरची वासना अकाली का उडाली त्याचे उत्तर सापडते. पण शाळेतल्या शिक्षकांमध्ये प्रेम आणि आत्मीयता होती म्हणून तेच आठवतात. महाविद्यालयीन "कर्मचारी"(पद्धतीचे शिक्षक)फारसे लक्षात राहत नाहीत.
  • Log in or register to post comments
ध
धडपड्या Sat, 12/19/2015 - 18:49 नवीन
हा कसा काय राहिला होता? नंतर देवाकडे टवाळखोरीच्या रसायनाची कमतरता पडली होती का काय?
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Sun, 12/20/2015 - 07:13 नवीन
मला भाषण एइकताना अक्षरशः झोप यायची खास करूँ आमच्या मुख्याध्यापकांचे आत्ता इथेच थांबतो काम आहे परत केव्हा तर संदर्भासहित स्पष्टीकरण.
  • Log in or register to post comments
च
चिनार Mon, 12/21/2015 - 05:55 नवीन
http://www.misalpav.com/node/31086 हा दुवा पहावा !
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Mon, 12/21/2015 - 06:55 नवीन
मिपावर पूर्वी असा आणखी एक धागा आला होता. त्यावरील प्रतिक्रिया इथे चोप्य-पस्ते करत आहे. १. आम्ही दहावीत असताना सगळ्यांना क्रिकेट खेळायचे वेड लागले होते.आमची शाळा दुपारची असे.तेव्हा शाळा भरायच्या आधी तासभर, मधल्या सुटीत आणि शाळा सुटल्यावर तासभर क्रिकेट खेळणे हा कार्यक्रम असे. त्यासाठी आमच्या वर्गातील गोखले अडनावाचा एक मुलगा बॅट घेऊन येत असे.एकदा आमच्या गणित शिकविणाऱ्या शिक्षिकांनी पोर्शन पुढे न्यायला म्हणून इतर कोणा शिक्षकाकडून तास मागून घेतला.पण तास सुरू होऊन १० मिनिटे होताच त्यांचे गोखल्याकडील बॅटकडे लक्ष गेले.आणि ती बॅट कशाला, कधी खेळता या सगळ्या प्रश्नांची माहिती करून घेऊन तासाचा उरलेला सगळा वेळ ’दहावीच्या वर्षात परीक्षा इतकी जवळ आलेली असताना क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवणे कसे अयोग्य आहे’ यावर त्यांनी लेक्चर दिले.गणिताचा पोर्शन पुढे नेणे बाजूलाच राहिले. दुसऱ्या दिवशी शिक्षकांच्या खोलीत आमच्या वर्गातील मुले क्रिकेट खेळण्यात वेळ वाया घालवतात यावर चर्चा झाली.त्यानंतर इंग्रजी शिकविणाऱ्या आपटे बाईंनी ताबडतोब गोखल्याकडील बॅट जप्त केली आणि त्याला सांगितले की मार्चमध्ये परीक्षा संपल्यावर येऊन बॅट घेऊन जा आणि तोपर्यंत बॅट अजिबात मिळणार नाही. अजून दोन दिवसांनी गणिताचा तास होता. गोखल्याकडे बॅट नाही हे बघून गणिताच्या बाईंना वाटले असावे की आपल्या लेक्चरचा परिणाम म्हणून त्याने बॅट आणली नाही आणि क्रिकेट खेळणे बंद केले. त्यांनी गोखल्याला विचारले,"काय गोखले, आज बॅट कुठे आहे"? आणि त्यावर गोखल्याची इन्स्टन्ट प्रतिक्रिया होती--"आपटे बाईंनी ढापली". यावर सगळ्या वर्गात जोरदार हशा पिकला हे सांगायलाच नको. २. एकदा मराठी शिकविणाऱ्या बाईंनी ’कलंक मतीचा झडो दुराभिमान सारा गळो’ या ओळी एकाला वाचायला सांगितल्या. त्याने मतीचा ऐवजी ’कलंक मातीचा झडो’ असे म्हटले.बाईंनी परत वाचायला सांगितल्यावरही तो ’कलंक मातीचा झडो’ असेच वाचत होता.त्यावर बाईंनी त्याला विचारले की तुला या ओळी वाचताना काही वेगळे वाटत नाही का? यावर माझ्या मित्राची उत्स्फुर्त प्रतिक्रिया होती--’त्याच्या मतीचीच माती झाली असल्यामुळे त्याला मतीऐवजी माती असेच दिसत आहे’.
  • Log in or register to post comments
G
gogglya Mon, 12/21/2015 - 09:22 नवीन
असे आणी शाळा सुटल्याची घंटा झाली रे झाली कि दप्तराचा बंद खांद्यावर अडकवून सुसाट पळत घरी जात असे. एके दिवशी मी त्याच्या दप्तराचे बंद सोडवून बाकाभोवती गुंतवून परत बांधून ठेवले. शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर तो अक्षरशः बाक सोबत ओढुन घेत वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला, मग कुठे त्याला जाणवले की बाक सुद्धा त्याच्याबरोबर येत आहे. ७ वी मध्ये असताना छोट्या डबीमध्ये नीळ आणी लिंबू मिसळून एका कोनाड्यात / कचराकुंडीत लपवून ठेवत असू. नंतर पुर्ण वर्गात दुर्गंधी पसरत असे.
  • Log in or register to post comments
G
gogglya Mon, 12/21/2015 - 10:18 नवीन
असे आणी शाळा सुटल्याची घंटा झाली रे झाली कि दप्तराचा बंद खांद्यावर अडकवून सुसाट पळत घरी जात असे. एके दिवशी मी त्याच्या दप्तराचे बंद सोडवून बाकाभोवती गुंतवून परत बांधून ठेवले. शाळा सुटल्याची घंटा झाल्यावर तो अक्षरशः बाक सोबत ओढुन घेत वर्गाच्या दारापर्यंत पोहोचला, मग कुठे त्याला जाणवले की बाक सुद्धा त्याच्याबरोबर येत आहे. ७ वी मध्ये असताना छोट्या डबीमध्ये नीळ आणी लिंबू मिसळून एका कोनाड्यात / कचराकुंडीत लपवून ठेवत असू. नंतर पुर्ण वर्गात दुर्गंधी पसरत असे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 43 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 55 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 59 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा