💬 प्रतिसाद
प
प्रभाकर पेठकर
Tue, 02/19/2008 - 09:15
नवीन
गरम-गरम पावभाजीवर चीझ किसून घातले की ते जरा वितळतेच. भाजीत हळू-हळू मिसळत खायचे.
- Log in or register to post comments
ल
लिखाळ
Tue, 02/19/2008 - 16:11
नवीन
पेठकरकाका
वर्षाभरापूर्वी मनोगतावर पावभाजीची पाककृती वाचून मी ती बनवली होती. आणि चांगली झाल्याचे लगेच आपल्याला कळवले होते.
आता या कृतीत थोडा बदल वाटतो आहे. बहुधा आपण सतत प्रयोग करुन पदार्थ चविला आणि दिसायला कसा चांगल्यात चांगला होईल हे पाहत असता. आता एकदा चीझ-पावभाजी सुद्धा करुन पाहिन आणि आपल्याला कळवेन.
पालकराईस ची वाट पाहतो आहे :)
--लिखाळ.
शुद्धलेखन आणि शुद्ध लेखन यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Tue, 02/19/2008 - 18:14
नवीन
धन्यवाद श्री. लिखाळ,
मनोगतावरील पावभाजी जशीच्या तशी इथे 'चिटकवली' नाही. नवनविन प्रयोग तर सतत चालूच असतातंच. पाककृतीत थोडेफार मागे-पुढे झाले तरी अंतिम उद्दीष्ट्य एक चवदार पदार्थ सादर करण्याचे असते त्या पासून लक्ष्य विचलित होऊ देता कामा नये.
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
- Log in or register to post comments
अ
अंजली
Sun, 10/19/2008 - 05:52
नवीन
पेठकर काका,
ही पावभाजीची चेपणी कुठे मिळेल? बाजारात ज्या चेपण्या पाहिल्या त्या खूपच तकलादू वाटल्या शिवाय त्याला जाळीही होती. त्यामुळे मटार वगैरे नीट भरडले जाणार नाहीत असे वाटते. (जाळीतून वर येतील असे वाटते). पावभाजीवाल्याकडे असते, तशी मोठी, जाळी नसलेली चेपणी कुठे मिळेल?
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Sun, 10/19/2008 - 18:59
नवीन
उपहारगृहासाठी लागणार्या सामानांचे एक दुकान असते. तिथे अशी व्यावसायिक चेपणी मिळू शकेल. पण ती जड असते. आपल्याला हवी तशी चेपणी एखाद्या लोहाराकडून बनवून घेता येते.
कँपात 'अगरवाल' नावाचे दुकान आहे. त्याच्याकडे मिळू शकेल. त्याचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक शोधून तुम्हाला व्य. नि . पाठवतो.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
- Log in or register to post comments
अ
अमेयहसमनीस
Tue, 10/21/2008 - 14:16
नवीन
काका,
आपल्या कृतीप्रमाणे मागे पावभाजी केली होती .आज आपण सांगितल्यानुसार चीझ पावभाजी करीत आहे.काका, मलेशियात के.एल्.ला आपली एखादी शाखा सुरु करावी ही विनंती.आपल्या चिरंजीवांना सांगावा आमचा हा निरोप ! इथे खूप मराठी कुटुंबे आहेत. आपल्याला दुवा देतील हो!
- Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर
Wed, 10/22/2008 - 15:41
नवीन
धन्यवाद अमेयहसमनीस,
मुलाचे (वय वर्षे २३) पाय अजून पाळण्यात दिसत नाहीत. पण आपल्या निमंत्रणाबद्दल आभारी आहे. पावभाजीचे क्रमांक एकचे गिर्हाईक गुजराथी, दुसर्या क्रमांकावर मराठी आणि तिसर्या क्रमांकावर तामिळ आहेत. तशी सरमिसळ तिथल्या कम्युनिटीत असेल तर पावभाजीचे दुकान नक्कीच चालेल.
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
- Log in or register to post comments
प
परीसा
Sat, 05/02/2009 - 13:34
नवीन
रेसिपी खुप छान आहे. खरतर पावभाजीत कोण कोण अजुन भाज्या घालतात. पण तुम्ही ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या माझ्या आवडीच्या आहेत. त्यामुळे अशी पावभाजी मी मनापासुन खाईन.
(पावभाजी वेडी)
परीसा
- Log in or register to post comments
म
मुक्ता
Sat, 05/02/2009 - 19:44
नवीन
आत्ता कळ्ल माझ्या भाजीचा रंग लाल भडक का दिसत नाही ते...
केप्रचा मसाला सर्व मसाल्यात उजवा आहे अस मत वेगवेगळे मसाले वापरुन पाहील्यावर माझं बनल आहे.
या मसाल्यामुळे चव अगदी गाडीवरच्या भाजीसारखी येते.
../मुक्ता
- Log in or register to post comments
स
समिधा
Sat, 05/02/2009 - 20:13
नवीन
पेठकर काका, खुपच छान आहे रेसिपी. :)
आता नक्की करुन बघेन. (फोटो बघुन तर कधी करुन बघते असं झाल आहे.)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
- Log in or register to post comments
स
समिधा
Sat, 05/02/2009 - 20:13
नवीन
पेठकर काका, खुपच छान आहे रेसिपी. :)
आता नक्की करुन बघेन. (फोटो बघुन तर कधी करुन बघते असं झाल आहे.)
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
- Log in or register to post comments
क
काजुकतली
Fri, 05/15/2009 - 08:06
नवीन
काल रात्री पावभाजी केली (मायनस चिझ.. खुपच हेवी होईल ह्या भीतीने :) ) सहीसही हीच रेसिपी वापरुन.. खाऊन झाल्यावर ताटांवर जराही खुण उरली नाही, ह्यातुन कोणी काही पदार्थ खाल्लाय म्हणुन......... शनिवारी परत पाहिजे अशी मागणीही झाली... एकदम हिट रेसिपी :)
तुमचे खुप खुप आभार..
साधना
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2