सर्वम - भारतीय ए०आय०
सर्वम् या भारतीय ए०आय० कडे लोकांनी पाठ फिरवल्याचे वृत्त वाचले. म्हणून उत्सूकता निर्माण झाली. मला त्यांच्या वेबसाईटवर संवादक (चॅटबॉट) सापडला नाही. मग लोक वापरून बघणार कसे?
हा ए० आय० डावी कडे की उजवीकडे झुकला आहे, याची उत्सूकता होती.
त्यांच्या वेबसाईटवर भारतीय भाषांचे टेक्स्ट-टू-स्पीच तंत्रज्ञान कसे वापरायचे याचे डेमो उपलब्ध आहेत. मी मराठी मजुकराचे वाचन कसे होते ते तपासले तेव्हा ते बरे वाटले. पण तोच मजकूर इतर भाषेतील वक्ते - उदा० एखादी बंगाली अथवा कानडी व्यक्ती कशी वाचेल हे तपासले तेव्हा हा ए० आय० पूर्ण गंडला!
संदर्भ
१. https://www.sarvam.ai/
२. https://www.youtube.com/watch?v=yMu1uS2dMAw
एक कंपनी बंद पडली म्ह० फुगा फुटायला लागला असा अर्थ काढणे हास्यास्पद ठरेल. जगाची दोन वर्गात वेगाने विभागणी होत आहे - १. ए० आय० वापरून स्वतःची उत्पादकता वाढवणारा एक वर्ग २. ए० आय० ला शिव्या देऊन स्वतःलाच आउट्डेट करणारा वर्ग ए० आय० च्या वापराने उत्पादकता वाढते यावर माझी अढळ श्रद्धा आहे. आपण कोणत्या वर्गात येतो हे ज्याने त्याने स्वतःच शोधायचे आहे...