Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सर्वम - भारतीय ए०आय०

य
युयुत्सु
Wed, 05/28/2025 - 07:44
🗣 31 प्रतिसाद
सर्वम् या भारतीय ए०आय० कडे लोकांनी पाठ फिरवल्याचे वृत्त वाचले. म्हणून उत्सूकता निर्माण झाली. मला त्यांच्या वेबसाईटवर संवादक (चॅटबॉट) सापडला नाही. मग लोक वापरून बघणार कसे? हा ए० आय० डावी कडे की उजवीकडे झुकला आहे, याची उत्सूकता होती. त्यांच्या वेबसाईटवर भारतीय भाषांचे टेक्स्ट-टू-स्पीच तंत्रज्ञान कसे वापरायचे याचे डेमो उपलब्ध आहेत. मी मराठी मजुकराचे वाचन कसे होते ते तपासले तेव्हा ते बरे वाटले. पण तोच मजकूर इतर भाषेतील वक्ते - उदा० एखादी बंगाली अथवा कानडी व्यक्ती कशी वाचेल हे तपासले तेव्हा हा ए० आय० पूर्ण गंडला! संदर्भ १. https://www.sarvam.ai/ २. https://www.youtube.com/watch?v=yMu1uS2dMAw

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 6287 views

🗣 चर्चा (31)
य
युयुत्सु Wed, 05/28/2025 - 07:47 नवीन
वर दिलेले #२ चा दूवा चुकून भलताच टाकला गेला आहे. तो असा आहे https://www.youtube.com/watch?v=6cELK1YG4iM&t=833s
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 05/28/2025 - 07:50 नवीन
https://www.youtube.com/watch?v=N0BprFdID6g
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/28/2025 - 17:23 नवीन
कृत्रिम नामक सुद्धा आहे.
  • Log in or register to post comments
र
रीडर Wed, 05/28/2025 - 23:06 नवीन
मराठीमध्ये उत्तर देणारा कुठला AI tool चांगला आहे?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/29/2025 - 03:15 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/29/2025 - 03:59 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/29/2025 - 04:02 नवीन
माझा सविस्तर प्रतिसाद प्रकाशित होत नाहिये. याचे कारण काय असावे ? त्यात ChatGpt मधे केलेल्या कामाचे दुवे आहेत, म्हणून तर नव्हे ?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/29/2025 - 04:02 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/29/2025 - 04:05 नवीन
बरेचदा विस्तृत प्रतिसाद (प्रतिमांसह) प्रकाशित करण्याचा प्रयत्न करता दर वेळी खालील उत्तर येते आहे: The website encountered an unexpected error. Please try again later.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/29/2025 - 04:06 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 05/29/2025 - 04:09 नवीन
पुन्हा एकदा फक्त मजकूर (प्रतिमा काढून टाकून) चोप्य्पस्ते करण्याचा प्रयत्नही फसला. याचा अर्थ चत्ग्प्त मधला मजकूर इथे जसाच्यातसा चोप्य्पस्ते करता येत नाहीसे दिसते.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/29/2025 - 05:55 नवीन
Marathi literature is one of the richest and oldest literary traditions in India, with roots stretching back over 1,000 years. It encompasses a wide range of genres, styles, and philosophical themes, evolving through various periods of history while retaining a strong connection to Marathi culture and identity.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/29/2025 - 05:56 नवीन
झालं कॉपी पेस्ट
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/30/2025 - 04:44 नवीन
माझ्या चत्ग्प्त मधून का चोप्य्पस्ते होत नसावे बरे ?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/30/2025 - 04:47 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/30/2025 - 04:49 नवीन
इथे फक्त एक प्रतिमा देऊन बघता ते झाले आहे. ( ही प्ततिमा चत्ग्प्त ला आवाहन करून बनवली आहे. )
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/30/2025 - 05:28 नवीन
अवांतर ए आय चा फुगा फुटायला सुरुवात झालेली दिसते आहे का? https://the420.in/builder-ai-bankruptcy-global-shutdown-investor-losses-microsoft/ माय्क्रोस्फोटने पैसा ओतलेली बिल्डर डॉट ए आय परवा बंद पडली. जे काही वाचतेय त्यावरुन एवढे कळतय की बहुतांशी कंपन्या,ए आय स्टार टप, ओपन-एआय वापरतात आणि चॅट-जी पीटीचा रॅपर बनवुन प्रॉड़क्ट म्हणून बाजारात आणतात. ह्यातील सगळी अ‍ॅप्स मायक्रोसॉफ्टच्या अ‍ॅझ्युअर ह्या ढगात आहेत. ओपन-ए आय-मायक्रोसॉफ्ट--आणि मग एन.व्हिडियाच्या चीप्स.. अशी ही साखळी आहे. जाणकारानी प्रकाश टाकावा. डॉट-कॉम फुग्याचीच आठवण होत आहे.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 05/30/2025 - 12:29 नवीन
माई, कंपनी बंद पडण्याचं कारण 'ए आय' नसून अपरिपक्व बिजनेस मॉडेल आणि चुकीची सेल्स प्रोजेक्श्नन्स हे आहे. एक कंपनी बंद पडली म्हणून ए आय चा फुगा फुटायला सुरुवात झालेली दिसते आहे असं म्हणणं जरा अतिशयोक्त अणि घाईत होतंय. - (ए आय समर्थक) सोकाजी
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 05/30/2025 - 07:38 नवीन
ए आय चा फुगा फुटायला सुरुवात झालेली दिसते आहे का?
एक कंपनी बंद पडली म्ह० फुगा फुटायला लागला असा अर्थ काढणे हास्यास्पद ठरेल. जगाची दोन वर्गात वेगाने विभागणी होत आहे - १. ए० आय० वापरून स्वतःची उत्पादकता वाढवणारा एक वर्ग २. ए० आय० ला शिव्या देऊन स्वतःलाच आउट्डेट करणारा वर्ग ए० आय० च्या वापराने उत्पादकता वाढते यावर माझी अढळ श्रद्धा आहे. आपण कोणत्या वर्गात येतो हे ज्याने त्याने स्वतःच शोधायचे आहे...
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/30/2025 - 11:24 नवीन
ए० आय० च्या वापराने उत्पादकता वाढते यावर माझी अढळ श्रद्धा आहे. आपण कोणत्या वर्गात येतो हे ज्याने त्याने स्वतःच शोधायचे आहे...
-- सहमत. मी नुक्तेच दरमहा २० डॉलरला उपलब्ध असलेले चत्ग्प्त (ChatGPT) घेऊन प्रयोग सुरु केले आहेत. माझी रुची प्रतिमा निर्माण करण्यत आहे. कल्पनातीत प्रतिमा बनत आहे. अर्थात मी सध्या ते शिकत आहे, त्याबरोबरच चत्ग्प्त पण शिकत आहे, असे वाटते. काही दिवसांनंतर मी करत असलेल्या प्रयोगांबद्दल लिहीन. मात्र काल तिथून इथे चोप्य्पस्ते करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. याचे कारण काय असावे ?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 05/30/2025 - 11:50 नवीन
<मात्र काल तिथून इथे चोप्य्पस्ते करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. याचे कारण काय असावे ?> तुम्हाला नक्की काय अडचण कोणत्या ठिकाणि आली त्याचा काहीच अंदाज येत नाहीये.
  • Log in or register to post comments
र
रीडर Fri, 05/30/2025 - 13:17 नवीन
चित्रगुप्त सर, मराठी AI साठी काही लिंक पस्ते केली होती का? दिसत नाहीये. ॲपच नाव सांगू शकाल का? की chatgpt च वापरता येतो? माहितीसाठी धन्यवाद
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 05/30/2025 - 16:30 नवीन
@ रीडर, chatGpt Marathi असे करा. मलासे वाटते विनामूल्य पर्यायात नुस्त्या मजकुरासाठी काही मर्यादा नसावी. प्रतिमा मात्र २४ तासात फक्त दोनच बनवू शकतो. ते काम दोन मिनीटात होते, त्यामुळे मी पैसे भरून केले आहे. सध्या त्यात काय काय करता येते, ते बघतो आहे. मराठी पर्यायात रोमन लिपीत मराठी लिहीले, तरी उत्तर देवनगरीत येते. चांगले आहे.
  • Log in or register to post comments
म
मिसळपाव Fri, 05/30/2025 - 22:03 नवीन
"भातुकलीच्या खेळामधली" गाण्याबद्दल अधिक माहीती विचारली तर त्या गाण्याचे बोल काय दिलेत बघा!! स्वतःच रचून दिलेन का काय देव जाणे. असो. असे अनुभव कोडींगसाठी मदत मागितली तेव्हा सुद्धा येतात. १०-१५ वर्षांची मुलं हे तंत्रज्ञान बहुदा सर्रास वापरत असतील. "जे झोळीत पडेल ते खरं/योग्य" अशी मानसिकता त्यांची होईल बहुदा हे फार त्रासदायक आहे.... आणि चित्रगुप्तराव, हे असं कॉपी/पेस्ट करता आलं. पोस्ट केल्यावर नीट दिसतं का बघतो. --------------------------- गीताचे पूर्ण बोल: Copy Edit भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधली... मिठीत माझ्या ठेवून तुझ्या स्वप्नांतील राणी सात जन्म मी शोधीन तुला, अशी दिली शपथं ज्ञानी आणि विरहात फुलवून का हो ठेवली ती निशाणी? भातुकलीच्या खेळामधली... डोळ्यांतले ते स्वप्न मिटले, हातामधले हात सुटले गंध विरलेल्या आठवणींचे रेशीम पुन्हा विणत बसले तू गेल्यावर उरली पाठमोरी सावलीच मणी भातुकलीच्या खेळामधली... टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 06/02/2025 - 17:29 नवीन
मराठी ए आय साठी दीपसिक अतिशय उत्तम आहे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 05/31/2025 - 02:50 नवीन
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sat, 05/31/2025 - 02:53 नवीन
मी: malhar rao holkar yanchya baddal maahiti dya. ChatGPT said: मल्हारराव होळकर हे मराठा साम्राज्यातील एक प्रसिद्ध सरदार व सेनापती होते. त्यांचा जन्म इ.स. १६९३ मध्ये झाला. ते मूळचे महाराष्ट्रातील चोंढी (जिल्हा अहमदनगर) या गावचे होते. मल्हारराव हे होळकर घराण्याचे संस्थापक मानले जातात, जे नंतर इंदूर (सध्याचे मध्यप्रदेश) येथे स्थायिक झाले. मल्हारराव होळकर यांचे महत्त्वाचे कार्य: मराठा साम्राज्यातील योगदान: मल्हाररावांनी पेशव्यांच्या अधिपत्याखाली अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आणि उत्तरेकडील भागांमध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांनी माळवा, बुंदेलखंड आणि राजस्थानातील मोहिमांमध्ये सहभाग घेतला. इंदूरचा विकास: मल्हाररावांनी इंदूर हे शहर वसवले आणि त्याला एक प्रशासकीय केंद्र बनवले. त्यांचे घराणे पुढे जाऊन इंदूरचे राजघराणे बनले. राजकारण आणि प्रशासन: ते फक्त योद्धे नव्हते तर एक कुशल प्रशासकही होते. त्यांनी इंदूर भागात चांगले प्रशासन राबवले आणि जनतेच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना केल्या. पानिपत युद्धात सहभाग: तिसऱ्या पानिपत युद्धात (१७६१) त्यांनी अहमदशहा अब्दालीविरुद्ध मराठा फौजेसोबत सहभाग घेतला. हे युद्ध मराठ्यांसाठी अत्यंत निर्णायक ठरले. मृत्यू: मल्हारराव होळकर यांचे निधन २० मे १७६६ रोजी झाले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सून अहिल्याबाई होळकर यांनी प्रशासनाची धुरा सांभाळली आणि पुढे इंदूरच्या इतिहासात सुवर्णयुग निर्माण केले. जर तुला अजून माहिती हवी असेल, तर नक्की विचार. You said: जर तुला अजून माहिती हवी असेल, तर नक्की विचार. hoy. havi ahe. ChatGPT said: हो, नक्कीच! खाली मल्हारराव होळकर यांच्याबद्दल अधिक सविस्तर माहिती दिली आहे: मल्हारराव होळकर यांचा लष्करी कारकिर्दीचा प्रवास: पेशवे बाजीराव प्रथम यांच्या काळात मल्हाररावांनी मराठा फौजेत प्रवेश केला. त्यांची युद्धातील कुशलता आणि रणनीतीमुळे त्यांना लवकरच मोठे स्थान मिळाले. त्यांनी उत्तर भारतात मराठा साम्राज्याचा प्रभाव वाढवण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले. विशेषतः दिल्ली, आग्रा, कानपूर, लखनऊ अशा भागांत मराठा सत्ता स्थापन करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. त्यांच्या नावाने मराठा सैन्यातील एक विभाग “होळकर फौज” म्हणून ओळखला जाऊ लागला. प्रशासकीय धोरणे: मल्हाररावांनी इंदूरच्या आसपासचा प्रदेश सुव्यवस्थित केला, शेतीस चालना दिली आणि कर व्यवस्थेत पारदर्शकता आणली. त्यांनी न्यायव्यवस्था मजबूत केली. गरीब, शेतकरी आणि सामान्य लोकांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या. त्यांनी मंदिर बांधकाम, सरोवर खोदकाम आणि रस्ते निर्माण यांसारखे सामाजिक कार्य हाती घेतले. कौटुंबिक माहिती: त्यांच्या पत्नीचे नाव गौतमीबाई होते. त्यांचा मुलगा खांडेराव होळकर होता, जो युद्धात शहीद झाला. खांडेरावच्या मृत्यूनंतर त्यांची सून अहिल्याबाई होळकर यांनी राज्याची जबाबदारी घेतली. अहिल्याबाई यांचे नाव भारतीय इतिहासात एक आदर्श राजकर्त्री म्हणून घेतले जाते. वैयक्तिक गुणधर्म: मल्हारराव हे अत्यंत शिस्तप्रिय, न्यायप्रिय आणि धोरणी व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा स्वभाव कठोर पण न्यायनिष्ठ होता. त्यांनी अनेक वेळा आपल्या वैयक्तिक हितापेक्षा सामूहिक हिताला प्राधान्य दिले. मल्हारराव होळकर यांचे जीवन म्हणजे युद्ध, शासन, निष्ठा आणि देशभक्ती यांचे उत्तम उदाहरण आहे. जर तुला त्यांच्या कोणत्या विशिष्ट मोहिमे, कौटुंबिक सदस्य, किंवा इंदूरमधील त्यांच्या वास्तव्याबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर जरूर सांग. You said: कौटुंबिक सदस्य, किंवा इंदूरमधील त्यांच्या वास्तव्याबद्दल अधिक माहिती हवी असेल, तर जरूर सांग. ChatGPT said: हो, मल्हारराव होळकर यांच्या कौटुंबिक सदस्यांबद्दल आणि इंदूरमधील त्यांच्या वास्तव्याबद्दल अधिक माहिती खाली दिली आहे: कौटुंबिक माहिती (Hoḷkar Khaṇḍāṇāchi Māhitī): पत्नी – गौतमीबाई होळकर: गौतमीबाई या मल्हाररावांच्या पत्नी असून, त्यांनी घर व कुटुंब एकत्र ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्या धार्मिक वृत्तीच्या, पारंपरिक संस्कार असलेल्या स्त्री होत्या. मुलगा – खांडेराव होळकर: खांडेराव हे मल्हाररावांचे एकमेव पुत्र होते. खांडेराव यांनी अनेक लढायांमध्ये भाग घेतला, परंतु १७५४ मध्ये कुंभेरच्या लढाईत (राजस्थान) त्यांचा मृत्यू झाला.त्यांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांना खूप दु:ख झालं. सून – अहिल्याबाई होळकर: अहिल्याबाई या खांडेरावांच्या पत्नी व मल्हाररावांच्या सून. खूप बुद्धिमान, धर्मशील व न्यायप्रिय स्त्री होत्या.खांडेरावांच्या मृत्यूनंतर मल्हाररावांनीच अहिल्याबाईंना पुढील कारभारासाठी तयार केलं. मल्हाररावांच्या मृत्यूनंतर (१७६६), अहिल्याबाईंनी इंदूरच्या राज्याची सूत्रे हाती घेतली आणि एक सुवर्णयुग घडवलं. नात – मुक्ताबाई: अहिल्याबाई व खांडेराव यांची मुलगी. तिच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे, परंतु अहिल्याबाईंच्या जीवनात ती एक आधार होती. इंदूरमधील वास्तव्य व प्रशासन: मल्हाररावांनी इंदूर वसवलं तेव्हा ते एक लहान गाव होतं. त्यांनी त्या भागाचा विकास करून त्याला एक केंद्रबिंदू बनवलं. त्यांचे मुख्यालय महेश्वर येथे होते, जे नर्मदा नदीच्या काठावर वसलेलं आहे. त्यांनी तिथे किल्ला बांधला. इंदूरमध्ये त्यांनी प्रशासकीय यंत्रणा उभी केली, न्यायव्यवस्था राबवली आणि व्यापाराला चालना दिली. मल्हाररावांच्या कारकिर्दीत इंदूरच्या आसपास शेती, जलसंधारण व मंदिर बांधकाम यांना विशेष महत्त्व दिलं गेलं. जर तुला अहिल्याबाईंच्या राज्यकारभाराची, महेश्वरच्या स्थापत्यशास्त्राची, किंवा होळकर घराण्याच्या इतर पुढील पिढ्यांची माहिती हवी असेल, तर मला नक्की सांग. You said: hoy havi ahe. ChatGPT said: छान! खाली अहिल्याबाई होळकर, महेश्वर, आणि होळकर घराण्याच्या पुढील पिढ्या यांची सविस्तर माहिती दिली आहे: अहिल्याबाई होळकर (1725–1795): ओळख: अहिल्याबाई होळकर या भारतातील एक आदर्श, न्यायप्रिय आणि धर्मशील राणी म्हणून ओळखल्या जातात. त्या मल्हारराव होळकरांच्या सून आणि खांडेराव होळकरांच्या पत्नी होत्या. खांडेराव व मल्हारराव यांच्या निधनानंतर त्यांनी इ.स. १७६७ मध्ये इंदूर राज्याचा कारभार हाती घेतला. प्रशासन व कार्य: त्यांनी महेश्वर येथून राज्यकारभार चालवला. न्यायव्यवस्था अत्यंत पारदर्शक आणि लोकाभिमुख होती. अहिल्याबाईंनी अनेक धार्मिक स्थळांचे जीर्णोद्धार केले – काशी, गया, सोमनाथ, द्वारका, रामेश्वरम्, त्र्यंबकेश्वर, यासारख्या ठिकाणी त्यांनी मंदिरे बांधली. त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, विधवा पुनर्विवाहासाठी आणि गरीबांसाठी अनेक सुधारणा केल्या. महेश्वर – होळकर घराण्याचे सांस्कृतिक केंद्र: महेश्वर हे नर्मदा नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. इथे अहिल्याबाईंचे दरबार, राजवाडा (किल्ला) आणि त्यांचा घाट अजूनही प्रसिद्ध आहेत. महेश्वरचा हस्तमागाचा साड्यांचा उद्योग (Maheshwari sarees) आजही जगप्रसिद्ध आहे – हे कार्य अहिल्याबाईंनी प्रोत्साहन दिलं. त्यांनी इथे धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण केलं जे आजही जपलं जातं. होळकर घराण्याच्या पुढील पिढ्या: मालेराव होळकर: अहिल्याबाईंच्या मुलाचा (खांडेराव) मुलगा. तो अत्यंत तापट आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता.त्याचा कारभार फारसा यशस्वी नव्हता; अल्पकालातच त्याचं निधन झालं. तुकोजीराव होळकर: अहिल्याबाईंनी तुकोजीराव होळकर यांना दत्तक घेतलं आणि राज्यकारभारात सहभागी केलं. तुकोजीराव यांनीही युद्धात आणि प्रशासनात महत्त्वपूर्ण कामगिरी केली.पुढे त्यांच्या वंशजांनी इंदूरवर शासन केलं. इंदूर संस्थानाच्या नंतरच्या राजे: तुकोजीराव दुसरे, शिवाजीराव होळकर, यशवंतराव होळकर, हे राजे पुढील काळात आले. यशवंतराव होळकर यांनी इंग्रजांविरुद्ध मोठं लढा दिला. पुढे १९४८ मध्ये इंदूर संस्थान भारतात विलीन झालं. -- तुला यामध्ये काही विशिष्ट काळ, व्यक्ती किंवा घटना अधिक तपशीलवार हवी असेल का? उदाहरणार्थ — यशवंतराव होळकरांची इंग्रजांविरुद्धची लढाई, अहिल्याबाईंची न्यायव्यवस्था, किंवा महेश्वरचे मंदिर स्थापत्य?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 05/31/2025 - 07:19 नवीन
ए० आय० ची थापेबाजी ही काळापूर्वी एक मोठी समस्या बनली होती. आता प्रचलित असलेल्या नवीन मॉडेलमध्ये योग्य ते 'मोड' निवडले तर थापेबाजी बरीच कमी होते, असा माझा अनुभव/निरीक्षण आहे. जेव्हा उपलब्ध माहिती शोधून प्रश्नाच्या अनुषंगाने संकलित करायची असते (याचे उदा० म्हणजे वरील होळकरांविषयीचा प्रश्न) तेव्हा सर्च्/डीपसर्च हे मोड वापरावे आणि जेव्हा समस्यापूर्ती (रिझनिंग महत्त्वाचे असते) करायची असते तेव्हा 'थिंक्/डीपथिंक' हे मोड वापरावे. असे केल्याने बर्‍यापै़की विश्वासार्ह उत्तरे मिळतात. 'रिझनिंग'ची प्रक्रिया आपल्या डोळ्यादेखत असल्याने उत्तर चुकले असल्यास किंवा शंकास्पद वाटल्यास तपासता येते. डीपसिकमध्ये दोन्ही मोड एकत्र वापरता येतात. ग्रोकमध्ये एकावेळेला एकच मोड वापरता येते. मी ग्रोकचे सशुल्क सभासदत्व घेतले आहे आणि माझे पैसे एका महिन्यात वसूल झाले.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 07/08/2025 - 10:55 नवीन
इतर भारतीय एआय स्टार्ट अपसच्या सद्य अडचंणींबद्दल हा लेख आहे analyticsindiamag.com वर
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Tue, 07/08/2025 - 12:41 नवीन
वरील दुव्याबद्दल धन्यवाद! वाचून फारसे आश्चर्य वाटले नाही. अल्पमोली बहुदुधी आखुडशगी कमी खाणारी...गायीच्या शोधात भारतीय उद्योजक असल्यामुळे फार वेगळे काही चित्र अजून ४-५ वर्षे दिसेल असे वाटत नाही. मला जे स्मरते त्यावरून रिलायन्स डेटा-सेंटरची स्थापना करणार होते. पण भारतात विश्वासार्ह डेटा गोळा होणे पण एक समस्याच आहे.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 07/08/2025 - 11:06 नवीन
मुकेश अंबानी कृत रिलायन्सने एआय क्षेत्रात मोठी आर्थीक गुंतवणूक केल्याच्या बातम्या मध्यंतरी ऐकल्या होत्या. त्यांच्या एआयचे सद्य स्टेटस बद्दल कुणाला काही कल्पना आहे का? परकीय एआय पेक्षा भारतीय एआय मी केव्हाही प्रिफर करेन.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 20 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 24 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 27 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा