Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कल्पकता

य
युयुत्सु
Tue, 01/28/2025 - 05:24
💬 101 प्रतिसाद
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली. डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे... ============= कल्पकता ====== माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं). भांडणाचा विषय होता - चिनी अर्थव्यवस्था! आपल्याकडच्या निवडणूका जाहिर होण्या अगोदर बहुतेक संघोट्यांनी सूताने स्वर्ग गाठला होता. अर्थव्यवस्था उतरंडीला लागल्याने चीन पुरता गाडला गेल्याची त्यांची भावना निर्माण झाली होती आणि भारताशिवाय जगाला सहारा नाही. या भ्रमाने या सर्वांना ग्रासले होते. प०पू० सरसंघचालक पण अशीच वक्तव्ये करत होते. प्रत्येक देशाचे अर्थचक्र असते. ते परमोच्च बिंदू गाठल्यावर उतरंडीला लागते. त्यात मोठी पडझड होते. ही अपरिहार्य असते. या पडझडीतून सावरण्यासाठी कुशल आणि मुत्सद्दी नेतृत्व लागते. तसेच आडात नसेल तर पोहर्‍यात येत नाही. मी माझ्या मूर्ख मित्राला माझी भूमिका समजावून सांगितली. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. भारतात श्रेयलंपटपणा, राजकीय हितसंबंधाना असलले विषारी महत्त्व इ० कारणे त्यामागे आहेत. मार्टीन गार्डनर नावाचा एक प्रसिद्ध गणिती म्हणायचा की देशाची बुद्धीमत्ता त्या देशात शुद्ध गणितात संशोधन करणार्‍यांच्या संख्येवर ठरते. तसेच देशाची कल्पकता "डिझाईन" या शाखेला किती प्रतिष्ठा आहे त्यावर ठरते, असे माझे ठाम मत आहे. रेशीमबागेतील ’विद्वानांना’ डिक्शनरी उघडी ठेऊन इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता आले तरी खूप आहे. चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. तसेच त्यांच्या यशाची अनेक रहस्ये त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीच्या यशामध्ये असतात, असे मला एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात कळले. त्यांचा अंमलबजावणी दर ८०-८५% असतो. अशी असामान्य कल्पकता ज्या देशात असते तो देश आर्थिक समस्यांना नक्कीच तोंड देऊ शकतो. मी त्याला म्हटले, "मला फक्त २-३ वर्षे दे. आपण परत भेटू आणि आढावा घेऊ या". त्याने त्याचा हटवादीपणा सोडला नाही आणि आमच्या मैत्रीचा कडवट शेवट झाला. पण आता बातम्या येत आहेत की, - परदेशी गुंतवणूकदार परत चीनकडे वळत आहेत. - आज ही बातमी वाचली IMF lifts China's 2024 growth forecast to 5% "China's economic growth is projected to remain resilient at five percent in 2024 and slow to 4.5 percent in 2025," the IMF said in a press release, adding the decision was "driven by strong first-quarter GDP data and recent policy measures". (https://www.moneycontrol.com/.../imf-raises-china-2024...) सूज्ञांस अधिक सांगणे न लगे... =================== टीप - सदर टीपणास निवडणूकपूर्व उन्मादाचे संदर्भ आहेत. ते बेदखल केले जाऊ नयेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19179 views

💬 प्रतिसाद (101)
अ
अनन्त अवधुत Fri, 01/31/2025 - 08:27 नवीन
"Where does gold stand in different investment options for a common man?"
हा तुमचा प्रश्न, पण उत्तरात सोन्याला मॉडरेट जोखीम म्हणून एकाच शब्दात बोळवण केली आहे एआयने. जेव्हा कि तुमच्याच म्हणण्यानुसार "ए०आय० तुम्हाला सर्व बाजूनी मुद्देसूद उत्तरे देतो" पण इथे एआय सोन्यातल्या गुंतवणूकीला मूर्खपणा म्हटले नाही, तोटे सांगितले नाहीत. उलट गुंतवणूक का करावी असे सांगितले आहे. प्रश्न पाहिला तर सोन्याच्या गुंतवणूकी संदर्भात अधिकची चर्चा अपेक्षित होती. फायदे, तोटे, गुंतवणूकिचे पर्याय वगैरे तपशिल पण असायला हवा होता. एआय ने तुम्हाला गंडवले आहे,
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/31/2025 - 09:40 नवीन
कुठच्याही प्रकारची गुंतवणुक सदासर्वकाळ चांगली किंवा सदासर्वकाळ वाईट नसते. आपण कोणत्या वेळेस विकत घेतो यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असतात. उदाहरणार्थ बजाज फायनान्सच्या शेअरने २०१५ ते २०२१ या काळात चांगला २० पटींनी परतावा दिला पण गेले साडेतीन वर्षे तो साईडवेज जात आहे. २०१५ मध्ये त्या शेअरमध्ये शिरणे हा खूपच शहाणपणाचा निर्णय होता पण २०२२-२३ मध्ये शिरल्यास फारसा परतावा मिळणार नाही- कदाचित नुकसानच होईल. Image removed. तीच गोष्ट सोन्याची. २००० मध्ये २६० डॉलर/औंस असलेले सोने आता २८०० च्या घरात आहे. त्यातही २०११ ते २०२२ या काळात सोन्यात शिरणे हा फारसा शहाणपणाचा निर्णय नव्हता- कदाचित २०१५ च्या सगळ्यात खालच्या पातळीला शिरणे ठीक होते पण त्या दशकात नंतर कधी शिरणे हा शहाणपणाचा निर्णय नव्हता. पण २०२२ च्या शेवटापासून आतापर्यंत सोन्यानेही चांगलाच परतावा दिला आहे. Image removed. अगदी डाऊनट्रेंड मध्ये असलेले गधे शेअर्ससुध्दा योग्य वेळेला आत शिरल्यास भरपूर परतावा देऊ शकतात. रिलायन्स पॉवर हा भारतीय शेअरबाजारातील एक मोठा गधा होता/आहे. पण कोविडकाळात मे २०२० मध्ये अगदी दोन-अडीच रूपयांना मिळणारा तो शेअर ऑक्टोबर २०२४ मध्ये ५० पार करून गेला होता. Image removed. मुळात कोणत्याही गुंतवणुकीच्या पर्यायाला मूर्खपणा म्हणणे हाच मूर्खपणा आहे. It's all about timing. एवढी साधी गोष्ट न कळणारे लोक स्वतःला सर्वज्ञ समजून इतर लोक कसे मूर्ख आहेत यावर भाष्य करायला लागतात तेव्हा कीवही करावीशी वाटत नाही. असो.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 01/31/2025 - 09:56 नवीन
जे लोक ग्राफ पाहताना लॉगरिथमिक स्केल वापरत नाहीत ते लोक प्रचंड गंडलेले असतात
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/31/2025 - 11:12 नवीन
सोन्याच्या गुंतवणूकीला मी मूर्खपणा म्हणालो नाहिय. तसे हे तुमच्या लक्षात आले असेलच, पण तरीही सांगितले. ज्याला जिथे हवी तिथे त्यांनी गुंतवणूक करावी. ज्याचा त्याचा पैसा, ज्याची त्याची जोखीम. I ain't no judge to them.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 09:43 नवीन
या धाग्याचा विषय एआय, सोन्यातील गुंतवणूक, कल्पकता वगैरे नाही हे अजून लक्षात आले नाही का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 01/30/2025 - 12:14 नवीन
आपल्या शेठची कल्पकता...हमारे यहा बच्चा मा को AI कहता है. AI ची कल्पकता दूवा =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 01/30/2025 - 12:35 नवीन
अजुन ५ वर्षे तरी तुम्हाला प्रत्येक धाग्यावर असे विषयाला अनुसरून नसलेल्या प्रतिक्रिया देता येतील. प्रतिक्रिया देण्यात कल्पकता दाखवा म्हणजे वाचकांना पण मजा येईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/30/2025 - 12:46 नवीन
ते अत्यंत कल्पक आहेत. कोणत्याही विषयाचा संबंध (अमेरिकेत लागलेले वणवे किंवा विश्वचषक सॉकर स्पर्धा किंवा इतर कोणताही विषय) मोदींंशी जोडून दाखविण्याची अविश्वसनीय कल्पकता त्यांच्याकडे आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 01/30/2025 - 21:22 नवीन
प्रतिसाद ठराविक साच्याचा होतो. त्यामुळे प्रतिसाद वाचनात अर्थ रहात नाही. असो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 01/30/2025 - 13:21 नवीन
हमारे यहा बच्चा मा को AI कहता है. खिक्क!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 01/30/2025 - 14:00 नवीन
१
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं
२
संघ कार्यकर्ते दिशाभूल करणे आणि गोलपोस्ट सतत हलवत राहणे यात कसे हूशार असतात याचे हे नमूनेदार उदाहरण आहे.
संघ स्वयंसेवक हे मंदबुद्धी आहेत की हुशार आहेत हे काय ते एक ठरवा. दिशाभूल करु नका आणि गोलपोस्ट सतत हलवत राहू नका. --- या डाव्या वाळवीला धड आपला शत्रू (तो त्यांनीच ठरवलेला!) हुशार आहे की मंदबुद्धी आहे हेही नीट ठरवता येत नाही आणि निघालेत AI, सोने, बुद्धी, जनुकीय दृष्ट्या वंश श्रेष्ठता वगैरे कल्पक तीर मारायला!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/30/2025 - 14:07 नवीन
कल्पकता, एआय वगैरे या धाग्याचा विषयच नाही. संघाला शिव्या देणे हा धाग्याचा विषय आहे. धागा वाचून काही मूर्ख संघद्वेष्ट्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आणि ते सुद्धा आता हिरिरीने संघद्वेषाची गरळ टाकत आहेत.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 01/30/2025 - 14:32 नवीन
या डाव्या वाळवीला धड आपला शत्रू (तो त्यांनीच ठरवलेला!) हुशार आहे की मंदबुद्धी आहे हेही नीट ठरवता येत नाही
😀 एवढंच नाही! धाग्यात आणि प्रतिसादांत नक्की काय म्हणायचंय हेच त्यांना स्वतःला अजुन समजलेले नाहीये. त्यांनी नुसते गोलपोस्टच बदलले नाहीत तर आपणच मांडलेल्या मुद्द्यांना छेद देणारे प्रतिसादही दिले आहेत. त्यातुन मस्त करमणुक झाली 😂 अत्ता प्रवासात आहे, मोबाईलवर मला जास्त टंकायला जमत नाही, त्यामुळे घरी पोचल्यावर येतो थोड्याच वेळात त्या मुद्द्यांचाही समाचार घ्यायला 😂 'दुरात्मा' गांधी वरही एक लेख अर्धवट लिहुन झालाय, तो ही आजच पुर्ण करुन इथे टाकायचा आहे, लैच कामं बाकी आहेत राव.... 😀
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 01/30/2025 - 17:32 नवीन
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं).
--- तो 'मंदबुद्धी संघोटा' सुद्धा जर मिपाकर (किंवा आणखीकाहीतरी 'कर') असेल तर हीच घटना कशी सांगेल ? " माझ्या एका अहंमन्य, आक्रस्ताळ्या, स्वतः ला अतिहुशार, सर्वज्ञ समजणार्‍या 'पढतमूर्ख' माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला, आणि मला हाकलून लावले ...
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 01/31/2025 - 06:16 नवीन
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या एक मंदबुद्धी संघोट्या सत्तेत आला 2014 आधी देशात 2500 किमी Optic फायबर केबल होत्या. आज 41 लाख किमीच्या वर आहे. भारतीय अर्थव्यवस्था करोंना काळात वाचली त्याचे कारण दुर्गम परदेशातून ही लोकांनी वर्क फ्रॉम होम केले जे अमेरिकेत ही शक्य नव्हते. देशात २०१३ मध्ये ४२२७ पेटेन्त दिल्या गेले आणि 2024 मध्ये 1 लक्ष. देशात सर्वांना बँक खाते मिळाले. सर्व सबसिडी डिजिटल असल्याने खर्‍या गरजू लोकांना पोहचतात. 100 पैकी 100 रुपये. आज प्रधानमंत्री आपल्या कार्यालत बसून ही प्रोजेक्टस संबंधित सर्व पक्षांशी संवाद साधून कार्य तीव्र गतीने संपादित करतात. मंदबुद्धी संघोट्यानी देशाच्या विकासात भूतो न भविष्याती प्रगति घडवून आणली आहे. हे वेगळे जे अज्ञानी आणि अशिक्षित आहेत त्यांना प्रगति दिसणार नाही. बाकी काही लोकांच्या मते बुद्धिमता म्हणजे अङ्ग्रेजी स्पेलिंग पाठ करणे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 01/31/2025 - 08:09 नवीन
संघोट्याने इतरांच्या लंगोट्या धोक्यात आणल्या मुळे....
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/31/2025 - 08:23 नवीन
बाकी काही लोकांच्या मते बुद्धिमता म्हणजे अङ्ग्रेजी स्पेलिंग पाठ करणे. काहींची तर टेलेप्रॉम्प्टर बंद पडला तर ' बोलती ' बंद होते. आता बोला !
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Fri, 01/31/2025 - 07:03 नवीन
अमेरिकेने चिप तंत्रज्ञानावर बंदी घातल्याने, चीन च्या शास्त्रज्ञानी कमी ताकतीचे चिप वापरून ९५% कमी खर्चात , जवळजवळ ओपन ए आय च्या जवळपास जाणारे तंत्रज्ञान केले ... भारताने सुद्धा यातून बोध घेऊन चीनच्याही पेक्षा जास्त कुशल पण चीन पेक्षा कमी खर्चात ए आय तयार करावे ... ही काशिनाथा चरणी प्रार्थना .. चीन आता खऱ्या अर्थाने विश्वगुरू म्हणून पुढे आला आहे तंत्रज्ञानात ...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 08:42 नवीन
वॉशिंग्टन डी सी येथे झालेला अपघात संघोट्यांमुळेच कसा झाला या विषयावर एक नवीन धागा येऊ दे. धागा आला रे आला की नेहमीचेच यशस्वी कलाकार अनुमोदन द्यायला धावत येतीलच.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 01/31/2025 - 11:07 नवीन
वॉशिंग्टन डी सी येथे झालेला अपघात...
पूर्वी केवळ भारतापुरत्या मर्यादित असलेली पण २०१४ नंतर पंचखंडांत पोहोचलेली मनुवादी विचारधाराच या अपघाताला जबाबदार आहेत यात काही शंकाच नाही. त्या संघप्रणीत मनुवादी विचारधारेचा बिमोड करणे हे ट्रम्प, मोदी, पुतीन व नेत्यानाहू यांना जमणार नाही. त्यासाठी पुरोगामी शक्तींनी एकत्र येऊन लढा उभारायला हवा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 11:13 नवीन
मंदबुद्धी मनुवादी असे लिहा. नुसते मनुवादी नको.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 01/31/2025 - 13:43 नवीन
पुरोगामी शक्ती म्हणजे फुशाअं चा जप करणारे बारामतीचे काका , एम आय एम , रा गा, सुसू ताई. उबाठा , आणि त्यांचे सर्वेसर्वा बोलके संपादक .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 10:00 नवीन
सोन्यामुळेच १९९१ या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेला आधार मिळाला होता.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 01/31/2025 - 10:07 नवीन
मानवी संस्कृती पैसा वापरायला लागल्यावर सुरवातीच्या काळात शंख-शिंपले वगैरे गोष्टी वापरल्या जात असल्या तरी काही काळात सोने-चांदीची नाणी वापरली जात नव्हती का? कागदी नोटा वापरायला जायला लागल्यापासूनही अगदी १९७० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत त्या कागदी नोटा सोन्यावर 'बेस' केलेल्या होत्या. पहिले महायुध्द, अमेरिकन यादवी युध्द वगैरे काही काळ वगळला तर कागदी नोटा सोन्यावरच बेस केलेल्या होत्या- १९७० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत. म्हणजे मानवी संस्कृतीच्या अर्थकारणात इतकी महत्वाची भूमिका बजावलेला धातू अगदी निरूपयोगीच होता असे या महाशयांचे म्हणणे दिसते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Fri, 01/31/2025 - 10:25 नवीन
आत्ताही चलनात नोटा वापरणे कमी झालेले आहे. बाजारात दुकानदाराकडे ५०० रुपये सुट्टे नसतात. भाजीवालेही , रिक्षावाले हीए युपीआय ने पैसे देतात , घेतात, अजून दोन तीन वर्षानी कागदी चलन दिसणे आणखी कमी कमी होईल.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 01/31/2025 - 10:38 नवीन
हा धागा आता टिळक श्रेष्ठ की आगरकर श्रेष्ठ या वळणावर लवकरच येऊन स्थिरावेल अशी दाट शक्यता दिसते
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 10:58 नवीन
हे होणारच होते कारण मुळात धाग्याचा हेतूच खोडसाळ होता. गांभीर्याने धागा लिहिला असता तर प्रगल्भ प्रतिसाद आले असते. परंतु संघाला शिव्या देण्यासाठी एआयचा बुरखा पांघरून धागा काढला तेव्हाच तो भरकटणार हे नक्की होते. संघाला शिव्या द्यायच्या असतील तर काही आक्षेप नाही, परंतु धाग्याचा विषय आणि आतील गाभा संघनिंदा हाच असू द्या. नाहीतर विषय असायचा अमेरिकेतील विमान अपघात आणि गाभ्यात संघाला शिव्या.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/31/2025 - 14:36 नवीन
सोने आयातीवर अवलंबून असणाऱ्या भारतासारख्या देशातील नागरिकांनी धातुरुपी सोन्यात गुंतवणूक करणे हे आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. एकतर टणावरी सोने हे दागिन्यांच्या रूपात असते किंवा देवस्थानात पडून असते ज्यातून उत्पादन होत नाही. परंतु सोने आयातीमुळे व्यापारी तूट वाढते, परदेशी चलनाचा साठा कमी झाल्याने रुपयावर दबाव येऊन त्याची किंमत कमी होते, आयात महाग झाल्याने अनेक वस्तू महाग होतात, लोकांची क्रयशक्ती कमी होते. ह्या सगळ्याला धातुरूपी सोन्यातील बिनडोक गुंतवणूक जबाबदार आहे. सोन्यामध्येच गुंतवणूक करायची असेल तर gold ETF किंवा gold bond मध्ये करावी. अर्थात ज्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेची काही देणेघेणे नाही त्याच्या करता धातूरुपी सोने गुंतवणूक हा उत्तम पर्याय आहे . मंदिराचे कळस, बाबाचे आसन, देवांचे दागिने हे तर अजून चांगले पर्याय आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेला तारायला.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 14:50 नवीन
हे ठीक आहे हो, पण यात लेखकाने संघ कशासाठी आणला?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 01/31/2025 - 16:15 नवीन
केली अपेक्षा संघाकडून तर काय बिघडले? तीन अपत्य जन्माला घालायचा सल्ला जे देऊ शकतात त्यांनी जनतेला सोन्याबद्दल सल्ला दिला तर काय बिघडेल? उलट सरकारला फायदाच होईल. इथले मिपाकर सोने गुंतवणुकीचे समर्थन करताना दिसत आहेत. संघ हे निमित्त आहे .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 16:22 नवीन
फक्त संघाकडून अपेक्षा? इतरांकडून नाही?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 02/01/2025 - 04:46 नवीन
ही महत्त्वाची बाजू उजेडात आणल्याबद्दल अभिनंदन! पण हे किती लोकाना समजेल याची शंका आहेच. हिंदूच्या हितावर गस्त घालणारी संघटना हिंदूच्या हिताच्या अर्थशास्त्राची दखल घेऊ शकत यासारखा दैवदूर्विलास नाही. सोन्यातील गुंतवणूकीचे समर्थन करणार-यांकडून फिजिकल सोने आणि डिमॅट सोने यातील फरकाची मी अपेक्षा ठेवली, ही माझीच चूक झाली!
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 02/01/2025 - 04:48 नवीन
छोट्या स्क्रीनवर टंकताना चूका झाल्या त्या लक्षात आल्याने परत ... ही महत्त्वाची बाजू उजेडात आणल्याबद्दल अभिनंदन! पण हे किती लोकाना समजेल याची शंका आहेच. हिंदूच्या हितावर गस्त घालणारी संघटना हिंदूच्या हिताच्या अर्थशास्त्राची दखल घेऊ शकत नाही यासारखा दैवदूर्विलास नाही. सोन्यातील गुंतवणूकीचे समर्थन करणार-यांकडून फिजिकल सोने आणि डिमॅट सोने यातील फरक कळवा ही मी अपेक्षा ठेवली, ही माझीच चूक झाली!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/01/2025 - 05:32 नवीन
संघनिंदा या मूळ विषयावर धागा परत आणल्यासाठी धन्यवाद! येऊ दे अजून.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 02/05/2025 - 03:46 नवीन
https://www.moneycontrol.com/news/business/personal-finance/sgbs-discontinued-in-budget-2025-what-s-the-best-way-to-invest-in-gold-now-12930675.html#goog_rewarded कधी नव्हे ते ह्या योजनेचे कौतुक केले होते, पण शेवटी सरकारने माती खाल्लीच. ह्याच कारणामुळे ह्या सरकारवर विश्वास नाही. योजना कशी असावी तर मनरेगासारखी.विरोधी पक्षही सत्तेत आला तरी बंद करू शकणार नाही अशी दोषमुक्त.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 02/05/2025 - 04:53 नवीन
सुवर्णरोखे योजना अकल्पक हिंदूंची होती, मनरेगा योजना कल्पक चिन्यांची होती, असे काही म्हणायचे आहे का? मूळ लेखाचा आशय तसाच काहीसा आहे, नाही का?
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 02/05/2025 - 15:14 नवीन
सुवर्णरोखे योजना अकल्पक हिंदूंची होती, मनरेगा योजना कल्पक चिन्यांची होती, असे काही म्हणायचे आहे का? मनरेगा काँग्रेसचे अपत्य, काँग्रेस= पुरोगामी/डावे= देशद्रोही. त्यांना चीनी म्हणू शकता, कारण अशी कल्पकता त्यांच्याकडेच आहे. मूळ लेखाचा आशय तसाच काहीसा आहे ना?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 02/05/2025 - 05:35 नवीन
the central government has discontinued the Sovereign Gold Bond (SGB) scheme, citing the high cost of borrowing associated with the instrument.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 02/05/2025 - 09:41 नवीन
citing the high cost of borrowing associated with the instrument. हा अचानक साक्षात्कार सरकारला आताच कसा काय झाला? व्याज दरात तर काहीच वाढ केली नाही. मग borrowing कशी काय महाग वाटू लागली? तुम्हाला समजले असेल तर आम्हालाही सांगा.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Sat, 02/22/2025 - 07:12 नवीन
citing the high cost of borrowing associated with the instrument. ह्यावर अद्याप खुलासा केला नाही तुम्ही. नसेल समजले तर तसं सांगा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 02/22/2025 - 07:24 नवीन
A senior government official had earlier highlighted the high returns that investors have received on SGBs. “We have given 9-11% return per annum, and on top of that an interest of 2.5%,” the official said. https://www.moneycontrol.com/budget/centre-discontinues-sovereign-gold-bond-scheme-due-to-high-cost-of-borrowing-article-12927498.html
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Tue, 02/25/2025 - 16:37 नवीन
अहो लिंक कशाला देताय? सरकारचे म्हणणे तुम्हाला समजले/पटले असेल असे वाटल्याने मी तुम्हाला विचारले होते की. ' सरकारला borrowing कशी काय महाग वाटू लागली ? तुम्हाला समजले असेल तर आम्हालाही सांगा '. एक तर ९-११ % रिटर्न सरकारने नव्हे मार्केटने द्यायला लावला. ही दीर्घकालीन गुंतवणूक योजना आणताना सरकारने स्वतःचा आणि गुंतवणूकदाऱ्यांच्या फायद्याचा विचार केला असेलच ना ? दीर्घकालीन गुंतवणूक असल्याने त्यातील संभाव्य जोखमींचा आणि त्यावरील उपायांचाही विचार केलाच असेल. मग अचानक सरकारला ही योजना महाग का वाटू लागली ? सरकारकडे ह्यावर उपाय नसेल तर बिनडोकपणा आहे सगळा. सरकारने म्हटले महाग वाटते म्हणून आपणही मान डोलवायची का ?
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 01/31/2025 - 13:57 नवीन
त्या निमित्ताने 'संघ समजून घेताना' या पुस्तकाचे ले़खक दत्तप्रसाद दाभोळकर यांची मुलाखत https://youtu.be/hPs1OIyze7Q?si=Hs_58edXT4al8w-5
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 14:09 नवीन
लेख व चर्चा कल्पकता या विषयावर नव्हतीच. संघ हाच विषय होता. त्यामुळे चर्चा घसरली असे म्हणता येत नाही.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Sat, 02/01/2025 - 06:21 नवीन
धन्यवाद! इल्युमिनेटींग आणि मर्मभेदक
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/04/2025 - 14:57 नवीन
जगातले सर्व ज्ञान हुशारी आणि कल्पकता केवळ काही संस्थांची मक्तेदारी आहे आणि जगातील बाकी सर्व मूर्खच आहेत असे समजणाऱ्या सर्वज्ञ माणसांनी लिहिलेला लेख असावा तसाच आहे. आपला एकांगी द्वेष अशा लेखात दिसू नये इतकी मूलभूत काळजी सुद्धा घेतलेलीच नाही. आता हेच विधान पहा. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. According to historical estimates, during the 16th century, India generally had a larger GDP than China, with some sources indicating that India's economy was significantly bigger in the early part of the century before China gradually overtook it towards the end; however, both economies remained relatively close in size throughout the period. सोळाव्या शतकाच्या अखेर पर्यंत भारत जवळ जवळ सर्वत्र मुघलांच्या अधिपत्याखाली आला होता यानंतर चीनची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे गेली असे इतिहास सांगतो. मग १६ व्य शतकापर्यंत कल्पकताशून्य भारत चीनच्या पुढे कसा काय होता? आणि १६ व्य शतकापासून ते २० व्या शतकापर्यंत रा स्व संघ हा शब्द सुद्धा अस्तित्वात नव्हता. मग भारताची कल्पकता कुणाच्या मुळे लयास गेली ( अर्थात मुळात अस्तित्वातच नव्हती तर लयास कशी जाणार हि मल्लिनाथी येईलच. अर्थात याचे उत्तर या महाशयांना देता येणार नाही मग शब्दांचा डोंगर रचून आपणच किती शहाणे आणि इतर लोक कसे मूर्ख आहेत हेच पालुपद चालू राहील. बाकी दर महा १० टक्के चक्रवाढ व्याजाने परतावा देणारा अल्गोरिदम ची मी चातकासारखी वाट पाहतो आहे. ( गेल्या सहा महिन्यात बाजाराने बहुतेकांना दरमहा एक टक्का सुद्धा परतावा दिलेला नाही) पण तो मोदींचा दोष आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/04/2025 - 22:29 नवीन
चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. हे त्यांना कसे काय शक्य झाले?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 02/05/2025 - 06:56 नवीन
हे त्यांना कसे काय शक्य झाले? चीन मध्ये गुणशाही (मेरीटोक्रसी) आहे. आपल्याकडे नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/05/2025 - 09:53 नवीन
आपल्याकडे जातशाही (कास्टोक्रसी) आहे.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 02/05/2025 - 15:29 नवीन
चीनमध्ये गुणशाही का रूजली याचे उत्तर हवे असेल तर त्यासाठी चीनमधल्या इंपिरीयल एक्झामिनेशन सिस्टीमची माहिती मिळवावी. https://www.youtube.com/watch?v=f8qaxnBXo4g
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा