Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

कल्पकता

य
युयुत्सु
Tue, 01/28/2025 - 05:24
💬 101 प्रतिसाद
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना डीपसिक या नवजात चिनी कंपनीने अमेरीकेच्या तंत्रवर्चस्वाला हादरवणारे "अल्प मोली बहुदुधी" असे नवीन आर१ हे मॉडेल बाजारात आणले आणि अनेक मातब्बर कंपन्यांचे शेअर्स गडगडायला सुरुवात झाली. डीपसिकच्या या उपलब्धीने अनेक जागतिक समीकरणे आता बदलतील. मागील वर्षी २९ मे रोजी मी "कल्पकता" या विषयावर एक टिपण लिहीले होते. त्याची सर्व संबंधीताना आठवण राहावी म्हणून परत प्रसृत करत आहे... ============= कल्पकता ====== माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने माझ्याशी एकदा कचाकचा भांडण केलं, मला अद्वातद्वा अपमानकरक बोलला (आणि मग मी त्याला हाकलून दिलं). भांडणाचा विषय होता - चिनी अर्थव्यवस्था! आपल्याकडच्या निवडणूका जाहिर होण्या अगोदर बहुतेक संघोट्यांनी सूताने स्वर्ग गाठला होता. अर्थव्यवस्था उतरंडीला लागल्याने चीन पुरता गाडला गेल्याची त्यांची भावना निर्माण झाली होती आणि भारताशिवाय जगाला सहारा नाही. या भ्रमाने या सर्वांना ग्रासले होते. प०पू० सरसंघचालक पण अशीच वक्तव्ये करत होते. प्रत्येक देशाचे अर्थचक्र असते. ते परमोच्च बिंदू गाठल्यावर उतरंडीला लागते. त्यात मोठी पडझड होते. ही अपरिहार्य असते. या पडझडीतून सावरण्यासाठी कुशल आणि मुत्सद्दी नेतृत्व लागते. तसेच आडात नसेल तर पोहर्‍यात येत नाही. मी माझ्या मूर्ख मित्राला माझी भूमिका समजावून सांगितली. चीनला शतकानुशतकांचा कल्पकतेचा इतिहास आहे. मी चीनीवंशाला जनुकीय दृष्ट्या श्रेष्ठ वंश मानतो, ते याच कारणामुळे. भारतीय समाजात अशी कल्पकता कधीही निर्माण होणं शक्य नाही. भारतात श्रेयलंपटपणा, राजकीय हितसंबंधाना असलले विषारी महत्त्व इ० कारणे त्यामागे आहेत. मार्टीन गार्डनर नावाचा एक प्रसिद्ध गणिती म्हणायचा की देशाची बुद्धीमत्ता त्या देशात शुद्ध गणितात संशोधन करणार्‍यांच्या संख्येवर ठरते. तसेच देशाची कल्पकता "डिझाईन" या शाखेला किती प्रतिष्ठा आहे त्यावर ठरते, असे माझे ठाम मत आहे. रेशीमबागेतील ’विद्वानांना’ डिक्शनरी उघडी ठेऊन इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता आले तरी खूप आहे. चीनी कल्पकतेचे मोजमाप त्यांनी उभ्या केलेल्या पेटंट्च्या एव्हरेस्टमध्ये दिसते. तसेच त्यांच्या यशाची अनेक रहस्ये त्यांच्या पंचवार्षिक योजनांच्या अंमलबजावणीच्या यशामध्ये असतात, असे मला एका आंतरराष्ट्रीय परिसंवादात कळले. त्यांचा अंमलबजावणी दर ८०-८५% असतो. अशी असामान्य कल्पकता ज्या देशात असते तो देश आर्थिक समस्यांना नक्कीच तोंड देऊ शकतो. मी त्याला म्हटले, "मला फक्त २-३ वर्षे दे. आपण परत भेटू आणि आढावा घेऊ या". त्याने त्याचा हटवादीपणा सोडला नाही आणि आमच्या मैत्रीचा कडवट शेवट झाला. पण आता बातम्या येत आहेत की, - परदेशी गुंतवणूकदार परत चीनकडे वळत आहेत. - आज ही बातमी वाचली IMF lifts China's 2024 growth forecast to 5% "China's economic growth is projected to remain resilient at five percent in 2024 and slow to 4.5 percent in 2025," the IMF said in a press release, adding the decision was "driven by strong first-quarter GDP data and recent policy measures". (https://www.moneycontrol.com/.../imf-raises-china-2024...) सूज्ञांस अधिक सांगणे न लगे... =================== टीप - सदर टीपणास निवडणूकपूर्व उन्मादाचे संदर्भ आहेत. ते बेदखल केले जाऊ नयेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19179 views

💬 प्रतिसाद (101)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 01/28/2025 - 13:42 नवीन
हेराफेरीमधील डायलॉग उधार घेउन विचारते- तुम्हारा नक्की समस्या क्या है ? कल्पकता, रेशीमबाग की ए आय? भारतात कल्पकता निर्माण होणे शक्य नाही म्हणता, मग सत्तेवर रेशीमबाग असो की लालबाग असो. बरोबर ना ?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 01/28/2025 - 14:59 नवीन
बरोबर ओळखलंस गं माईडे. खरी समस्या कल्पकता, कृत्रिम बुद्धिमत्ता, चीनची भरारी, अमेरिकेला दणका वगैरे नसून रेशीमबाग ही समस्या आहे व मनातील संघविरोधातील गरळ ओकण्यासाठीच लेखन केले आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 01/28/2025 - 14:09 नवीन
रेशीमबागेतील ’विद्वानांना’ डिक्शनरी उघडी ठेऊन इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता आले तरी खूप आहे.
इनोव्हेशनचे स्पेलिंग सांगता येण्यावरुन विद्वत्ता मोजण्याची कसोटी रोचक आपलं ते हे कल्पक आहे. बाकी चालू द्या. --- जगाला पोखरणाऱ्या डाव्या वाळवीची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Tue, 01/28/2025 - 14:55 नवीन
माझा सध्या प्रॉब्लेम एकच - बिलबाबा ची नवी भविष्यवाणी - https://economictimes.indiatimes.com/news/international/global-trends/another-pandemic-to-strike-soon-bill-gates-stark-warning/articleshow/117598505.cms?from=mdr आजपासून ४-५ वर्षानी नवी महामारी येणार तेव्हा लोकसंख्या वाढलेली असेलच पण तेव्हाचं सरकार कसं असेल, याची चिंता जास्त...
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 01/29/2025 - 06:54 नवीन
असंख्य भारतीय पापक्षालनासाठी गंगेत डुबक्या मारत असताना.
हे राम...! बाय द वे, डीपसीक इन्स्टॉल केले. आज सर्वच दैनिकांनी चीनच्या डिपसीकबद्दल चर्चा केली आहे कौतुक केलं आहे. डीपसीकमुळे 'बाजार गडगडला' पासून ते अमेरिकेच्या अध्यक्षांच्या 'डीपसीक हा अमेरिकेतील कंपन्यांसाठी इशारा आहे' वगैरे पर्यंत गवगवा झाला आहे. डीपसीकच्या संस्थापकाचं कौतुक वाटलं. जगाशी भिडण्याची ताकद निर्माण केली पाहिजे. व्हीजन सत्तेचाळीस आणि प्रयागातील डुबक्यांमुळे असं एखादं तरी, असं यश मिळावं अशी गंगा, यमुना, सरस्वतीकडे प्रार्थना करतो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 01/29/2025 - 07:27 नवीन
अति सीक प्रतिमापुजक, मुर्ती पुजक यांनी या निमित्ताने आता गंगासंगमात डीप बुडी मारावी. पुढील भविष्य फक्त कल्पक राष्ट्रजनांचेच आहे ... तेथे "हमारे पास पैलेसेही हैं" अश्या फुशारक्या मारणार्‍या पुजापाठहोमयज्ञमंत्रस्त्रोत्रपोर्णिमाअमावस्या असल्या लोकांचे काम नोहे !
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 01/29/2025 - 08:07 नवीन
शाळा-कॉलेज-विद्यापीठांमध्ये भरती झालेली गोबरवादी शिक्षक मंडळी अध्ययन अध्यापन संशोधन हे सोडून भलतीच कामे करत असतील तर त्यांनी उत्पादन केलेले दुय्यम दर्जाचे विद्यार्थी पुढे जाऊन काय दिवे लावू शकणार? आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 01/29/2025 - 08:16 नवीन
माझ्या एका मंदबुद्धी संघोट्या माजी मित्राने...
अरेच्चा! इतक्यावरच थांबलात? अच्छा, मनुवादी, फॅसिस्ट, पितृसत्ताक, सनातनी, बहुसंख्यवादी, अंध भक्त, मूक भक्त, बधीर भक्त, दिव्यांग भक्त हे सगळं प्रतिसादांमधून येणार आहे का?
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Wed, 01/29/2025 - 10:08 नवीन
मुळात भारतात कल्पकतेची वानवा नाही. आता हा लेखच पहा, एक ए आय टूल आणि संघ यांचा किती कल्पकतेने मेळ घातला आहे. ते एक असोच. मी डीपसिक ला प्रश्न विचारला की डीपसिक वर चीनी सरकारचे नियंत्रण आहे काय ? तर त्याने बराच वेळ लाऊन उत्तर दिले की ही एक चीनी कंपनी आहे. अधिक माहितीसाठी त्यांचे अधिकृत संकेतस्थळ पहा. म्हणजे प्रश्नाला बगल देण्याची जी कल्पकता आहे त्याने मी अगदी चाट पडलो. :)
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 01/29/2025 - 10:46 नवीन
कल्पकतेचे एकमेव व्यवच्छेदक लक्षण म्ह० "वेगळा विचार" करायची क्षमता! ही क्षमता चिनी लोकांमध्ये पदोपदी अगदी साध्यासाध्या गोष्टीत दिसते. याला शतकानुशतके उत्तेजन मिळाल्याने आज त्यांच्याकडे ’गुणशाही’ (मेरीटोक्रसी) व्यवस्थित रुजली आहे. आपल्याकडे वेगळा विचार करण्यास उत्तेजन देण्य़ाऐवजी व्यवस्थेशी जुळवून घेण्यास उत्तेजन दिले जाते. नवीन कल्पनांचे राजकीय परिणाम तपासून मग त्यांची योग्यता ठरते. २०१४ नंतर जे झालं आहे ते फारच जुजबी आहे. ते आवश्यक होते पण पुरेसे नाही. कल्पकतेच्या जागतिक क्रमवारीत आपण फक्त ४० व्या स्थानी आहोत (https://www.wipo.int/.../global.../en/gii-2024-results.html ) कल्पकता जगात सर्वत्र आढळते, पण ती उपयोगात आणण्यासाठी काही केले जात आहे असे वाटत नाही. आफ्रिका कदाचित जगात सर्वात श्रीमंत प्रदेश असेल पण केव्हा? त्यांनी जमिनीखालचे सोने, जडजवाहिर बाहेर काढले तरच. भारतीयांनी पण त्यांचे अनावश्यक सोने जर विद्यापीठांच्या उत्कर्षासाठी वापरले तर इथे पण वेगळे चित्र दिसेल... श्रेयलंपटपणा हे आपल्या पिछाडीचे आणखी एक कारण आहे.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 01/29/2025 - 10:27 नवीन
जिज्ञासू व्रुत्ती आणि कल्पकतेचा अभाव भारतात प्रामुख्याने विज्ञान/गणित/अभियांत्रिकीत पुर्वापार आहे. प्रचलित,लोकप्रिय विचारधारेशी/राजकीय प्रणालीशी त्याचा संबंध नाही. गेले २५/३० वर्षे चीनकडुन सादर केल्या जाणार्या पेटंटची संख्या पाहिली तर चीन आपल्या खूप पुढे आहे. Image removed. आणी चीनमध्ये तर कम्युनिस्ट विचारधारा आहे. "गप्प बसा संस्कृती' मग कसे काय हे शक्य होते?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 01/29/2025 - 10:37 नवीन
<आणी चीनमध्ये तर कम्युनिस्ट विचारधारा आहे. "गप्प बसा संस्कृती' मग कसे काय हे शक्य होते?> कारण चीनमध्ये गुणशाही (मेरीटोक्रसी) आहे. त्यांच्याकडे लहानपणा पासून जीवनाच्या प्रत्येक कोप-यात गुणवत्ता रूजवली जाते यावर मला सविस्तर लिहायचे आहे. चीनी लोक जनुकीय दृष्ट्या एक श्रेष्ठ वंश म्हणून का उत्क्रांत झाले असावेत या बद्दल माझी मते लवकरच मांडेन
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 01/29/2025 - 10:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 01/29/2025 - 10:58 नवीन
भारत चीनची बरोबरी का करू शकणार नाही याचे परखड विश्लेषण https://www.youtube.com/watch?v=zrFWHAyI2W0
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/29/2025 - 13:55 नवीन
लेख आवडला! प्रतिक्रियात काही लोकांचा असा होरा दिसतोय की भारत अप्रगत आहे मान्य पण आमच्या श्रद्धास्थानाना दोष देऊ नका! हे म्हणजे बकरी मरतेय मान्य पण खाटकाला दोष देऊ नका म्हणण्यासारखे आहे. असो. आपल्या देशाने बरीच संकटे झेललीत हे संकटही जाऊन चांगले सरकार येईल नी कल्पकतेला वाव मिळेल अशी अपेक्षा ठेऊयात.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/29/2025 - 14:03 नवीन
कोण म्हणतोय भारतीय लोकांकडे कल्पकता नाही? "भारतीय लोकांकडे कल्पकता नाही" ही मेलेली बकरी आणि संघ हा खाटीक ही अफाट कल्पनेची भरारी एका तरी चिन्याला सुचली असती का?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 01/29/2025 - 14:16 नवीन
<कोण म्हणतोय भारतीय लोकांकडे कल्पकता नाही?> भारतीय लोक सोन्याची अक्षम्य आणि अनुत्पादक साठवणूक करत आहेत, त्यावर संघाच्या एकाही चिंतन शिबिरात विचार होऊ शकला नाही आणि प्रभावी उपाय शोधला गेला नाही हे "कल्पकता नाही" याचे प्रातिनिधीक उदा० आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/29/2025 - 14:24 नवीन
संघाच्या किती चिंतन शिबिरात उपस्थित होता आपण? इतर कोणत्या भारतीय सरकारी/असरकारी संस्थामध्ये हा विषय चर्चिला गेला आहे?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/30/2025 - 04:58 नवीन
संघाच्या किती चिंतन शिबिरात उपस्थित होता आपण?
संघ कार्यकर्ते दिशाभूल करणे आणि गोलपोस्ट सतत हलवत राहणे यात कसे हूशार असतात याचे हे नमूनेदार उदाहरण आहे. मी चिंतन शिबीराला उपस्थित होतो की नाही याला महत्त्व नाही, संघाने ’सोन्यातील अनुत्पादक गुंतवणूक’ या गंभीर प्रश्नावर किती ठाम आणि जाहिर भूमिका घेतली, किती प्रबोधन केले याला महत्त्व आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/30/2025 - 05:27 नवीन
आपण संघशिबिरांचा उल्लेख केला म्हणून विचारले की आपण संघशिबिरात उपस्थित असता का? सोन्यातील अनुत्पादक गुंतवणूक या विषयावर संघ वगळता इतर कोणी काय भूमिका घेतली आहे? संघ का स्थापन झाला, संघाचे कार्य काय, संघ कोणत्या क्षेत्रात काम करतो याची आपणास माहिती आहे का?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/30/2025 - 05:51 नवीन
राष्ट्रस्वतंत्रता ध्येयं यथा साध्यं च साधनं अभ्युत्थानाय हिंदुनामयं पंथ: प्रवर्तित:। असे कुठेतरी हेडगेवारांच्या छायाचित्राखाली वाचल्याचे स्मरते. सोन्यातील निर्बुद्ध गुंतवणुकीचा आणि हिंदुंच्या अभ्युत्थानाचा काहीही संबंध नाही, अशी भूमिका असल्यास तसे जाहिर करावे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/30/2025 - 08:35 नवीन
सोन्यातील गुंतवणूक निर्बुद्ध आहे व सोन्यातील गुंतवणूक काढून घेतल्यास हिंदूंचे अभ्युत्थान होईल हे दोन्ही मुद्दे सिद्ध करावे ही नम्र विनंती.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/30/2025 - 10:53 नवीन
श्रीगुरुजी, तुमच्या फोनवर व्हॉट्स अप मध्ये मेटा एआय असेल. त्यावर Why investment in gold is stupid? असा प्रश्न टंकावा. असे उत्तर मिळेल- A provocative question! While gold has been a traditional store of value and a popular investment option, there are some arguments against investing in gold. Here are a few reasons why some people might consider investing in gold "stupid": 1. No dividends or interest: Unlike stocks or bonds, gold doesn't generate any income or dividends. You won't earn any interest on your gold investment, which means you're relying solely on price appreciation. 2. No growth potential: Gold is a commodity, and its value is largely driven by supply and demand. Unlike companies, which can grow and expand, gold's value is relatively static. You're not investing in a business or economy that can grow and compound over time. 3. High storage and maintenance costs: Physical gold requires secure storage, which can be expensive. You may need to pay for a safe deposit box, insurance, or other security measures to protect your investment. 4. Illiquidity: While gold is a widely recognized and traded commodity, it can be difficult to sell quickly or at a fair price, especially if you're holding physical gold. 5. No intrinsic value: Unlike some other investments, gold has no intrinsic value beyond its aesthetic appeal and industrial uses. Its value is largely driven by sentiment, speculation, and historical significance. 6. Volatility: Gold prices can be volatile, and market fluctuations can result in significant losses if you buy at the wrong time. 7. Opportunity cost: Investing in gold means tying up your money in a relatively unproductive asset. You might be missing out on other investment opportunities that could provide higher returns or growth potential. 8. Counterfeiting and authenticity risks: When buying physical gold, there's a risk of counterfeiting or authenticity issues, which can be difficult to verify. 9. Tax inefficiency: In some countries, gold investments may be subject to capital gains taxes, which can reduce your returns. 10. Lack of transparency: The gold market can be opaque, making it difficult to determine the true value of your investment or the fees associated with buying and selling gold. It's essential to note that these arguments don't necessarily mean investing in gold is always "stupid." Gold can still be a valuable addition to a diversified investment portfolio, particularly as a hedge against inflation, currency fluctuations, or market volatility. Before making any investment decisions, it's crucial to assess your individual financial goals, risk tolerance, and circumstances. It's also essential to consult with a financial advisor or conduct your own research to determine the best investment strategy for your needs. Would you like to discuss alternative investment options or explore the potential benefits of investing in gold?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/30/2025 - 11:53 नवीन
भारतात कल्पकता का नाही हा प्रश्न, तसेच संघासंबधी सर्व प्रश्न असेच AI ला विचारावे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/25/2025 - 15:09 नवीन
हायला सर्वज्ञ महाशय संघ शिबिरात जाऊन तावातावाने वादविवाद करत आहेत हि कल्पना डोक्यात आणल्यानंतर मला अजूनही हसू आवरत नाहीये! मुळात ते तिथे गेले कशाला हाच विचार माझ्या मनात सारखा येतो आहे. ह ह पु वा! बाकी फुरोगाम्यांची राजकीय ठसठस आणि डावी वैचारिक गळवं कुठे फुटतील याचा काही नेम नाही हेच खरं!
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 01/29/2025 - 15:16 नवीन
संघाचे माहीत नाही, परंतु सरकारने ' सुवर्ण रोखे ' योजना सुरू करून ह्याबाबत आपण जागरूक आहोत हे दाखवून दिले. लेखातील मुद्यांवर सहमत.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 01/30/2025 - 08:21 नवीन
"भारतीय लोक सोन्याची अक्षम्य आणि अनुत्पादक साठवणूक करत आहेत"
तुमचा तो मंदबुद्धी संघोटा (माजी) मित्र, संघ, आणि त्यांची चिंतन शिबिरे वगैरे चुलीत जाऊ देत, त्यात मला स्वारस्य नाही, पण "भारतीय लोक सोन्याची अक्षम्य आणि अनुत्पादक साठवणूक करत आहेत" ह्या आपल्या वरील मत / निष्कर्षावर आपण ठाम आहात का? हे तपासून घ्यायला आवडेल. जर वरील मत / निष्कर्षावर तुमची अढळ श्रद्धा असेल तर तुमच्यासमोर मी (खालीलप्रमाणे) दोन प्रस्ताव ठेवतो. त्या दोनपैकी कुठलाही एक प्रस्ताव मान्य केलात तरी तुमच्यासाठी विन-विन सिच्युएशन आहे!
  1. तुम्ही बुद्धिमान आहात, त्यामुळे सोन्याची खरेदी आणि त्याची अनुत्पादक साठवणूक करण्याचा अक्षम्य गुन्हा तुम्ही केला असण्याची अजिबात शक्यता नाही पण तुमच्या कुटुंबात, नातेवाईकांत किंवा मित्रपरिवारात काही निर्बुद्ध लोकांनी हा अक्षम्य अपराध नक्कीच केला असेल, त्या लोकांना तुमचे मत / निष्कर्ष पुराव्याने शाबीत करून देण्यासाठी त्यांनी गेल्या पाच, दहा, पंधरा, वीसच काय तर पन्नास-शंभर किंवा त्यापेक्षाही जास्ती वर्षांपूर्वी खरेदी करून साठवणूक केलेल्या सोन्याची मी त्यांच्या खरेदी पावतीवर त्यावेळची जी काही किंमत लिहिली असेल त्याच किमतीला खरेदी करण्यास तयार आहे. (आणि हा सोने खरेदी आणि त्याच्या साठवणुकीचा त्यांचा निर्बुद्धपणा केवळ अनुत्पादकच नाही तर नुकसानकारक सुद्धा आहे हे देखील सिद्ध करून दाखवायचे असल्यास पावतीवरील किमतीपेक्षा कमी भावात ते खरेदी करण्यासही मी तयार आहे)
  2. वरील प्रस्ताव तुमच्यासाठी वैचारिक / तात्त्विकदृष्ट्या फायद्याचा असला तरी तुम्ही पकडून आणलेल्या 'बकऱ्यां'साठी व्यावहारिकदृष्ट्या काहीच फायद्याचा नाही. त्यामुळे "एखाद्या व्यवहारात सहभागी असलेल्या सर्वच पक्षांना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात होणारा लाभ म्हणजे 'प्रॉफिट' अर्थात फायदा" ह्या आदर्श निकषाला जागून त्यांचे नुकसान न करता थोडाफार का होईना पण फायदा करून देण्यासाठी म्हणून त्यांच्या पावतीवरील सोन्याच्या प्रतिग्रॅम किमती व्यतिरिक्त प्रतिग्रॅम १०० रुपये अतिरिक्त किंमत देऊन ते खरेदी करण्याची माझी तयारी आहे. ह्या प्रस्तावात "बघा, इतके वर्ष साठवूनही तुम्हाला प्रतिग्रॅम केवळ १०० रुपये नफा मिळाला" असे ऐकवून तुमचे सोन्याची साठवणूक अनुत्पादक असल्याचे मत सिद्ध करून दाखवता आल्याचा तुम्हाला मानसिक समाधानरूपी फायदा होईल, पाच, दहा, पंधरा, वीसच काय तर पन्नास-शंभर किंवा त्यापेक्षाही जास्ती वर्षांपूर्वीच्या खरेदी किमतीपेक्षा 'बकऱ्यां'ना प्रतिग्रॅम १०० रुपयांचा घसघशीत आर्थिक फायदा होईल, आणि खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असलेल्या माझ्यासारख्या किरकोळ व्यापाऱ्यालाही चहा-पाणी, विडी-काडी, पान-सुपारीचा खर्च सुटण्यापुरते चार पैसे मिळून जातील, अजून काय पाहिजे? आहे कि नाही हा सर्वांसाठी फायदेशीर ठरणारा प्रस्ताव 😀
वरील दोनपैकी आपण कुठला प्रस्ताव स्वीकारताय हे जाणून घेण्यास अधीर झालो आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपले उत्तर कळवावे अशी णम्र इनंती... स्वगत: अन्नाऐवजी नियमितपणे सकाळी न्याहारीला 'दास कॅपिटल'ची चार पाने, दुपारच्या आणि रात्रीच्या भोजनात अनुक्रमे १५-२० पाने छान चावून चावून खाल्ली कि मेंदू मस्तपैकी बधिर होऊन प्रत्यक्ष जीवनात आणि व्यावहारिक पातळीवर न टिकणाऱ्या एकसे एक भन्नाट अर्थशास्त्रीय कल्पना सुचायला लागलेला माणूस स्वतःला 'बुद्धीमंत', 'ज्ञानी' वगैरे समजायला लागतो म्हणे! सुचेनात का, अशा 'ज्ञानी' लोकांचे विचार पटून काही 'बकरे' स्वतःहून हलाल व्हायला तयार होणार असतील तर आमच्यासारख्या 'कॅपिटलिस्ट' लोकांच्या ते पथ्यावरच पडणार असल्याने प्रस्ताव द्यायला आपल्या बापाचे काय जाते? कुठलाही स्वीकारला तरी अपनी तो "पांचो उंगलीया घी में और सिर कढाईमे" ही होगा ना... 😂
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 01/30/2025 - 08:35 नवीन
आपल्याला ऑफर आली तर मलाही सांगा. मला नातीच्या लग्नासाठी थोडेफार सोने घ्यावे म्हणतो. तसेच सरकारला पण सांगू की तुम्ही जो सोन्याचा साठा देशात व परदेशात साठवला आहे तो पण काढून टाका म्हण्जे सरकारचे,पर्यायाने करदात्यांचे बरेच पैसे वाचतील.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/30/2025 - 10:06 नवीन
श्री० टर्मीनेटर यांस, नमो नमः| तुम्ही मला कोंडीत पकडण्यासाठी जी शक्कल लढवली आहे, ती कौतुकास्पद आहे. पण त्यात एक गोची झाली आहे- आता बघा माझ्या सुदैवाने माझ्या आईवडीलांना सोन्याचे आकर्षण नव्हते, त्याशिवाय सोन्यातील गुंतवणुकीवर कोणताही परतावा (रीटर्न) मिळत नाही, हे सत्य त्यांना माहित असल्याने त्यांनी सोन्याचांदीत कधीच गुंतवणूक केली नाही. त्यांनी गुंतवणूक केली ती दूरदृष्टीने चांगल्या उद्योगांमध्ये ... माझ्या पत्नीने दुबईत एका बॅंकेत "गोल्ड ब्रांच" मध्ये नोकरी केलेली असल्याने तिचे पण सोनं बघून डोळे विटलेले आहेत. साहजिक आमच्या मुलीला पण सोन्याचे आकर्षण नाही. आता राहता राहिला मुद्दा आमच्याकडे जे काही किडूकमिडूक ठेवले आहे ते केवळ त्याचे ऐतिहासिक आणि भावनिक मूल्याबद्दल... उदा० माझ्या कडे एक १किलो वजनाचे चांदीचे ताट आहे, ते ताट माझ्या आईने तिच्या स्वत:च्या पगारातून आजीआजोबांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला भेट दिले असा त्यावर उल्लेख आहे. माझ्या आजीला आईच्या भेटीचे खूप अप्रूप होते. आजीने ते ताट माझी आई निवर्तल्यावर त्याच्या आठवणींसह माझ्याकडे ते सन्मानपूर्वक दिले. अशा भावनिक महत्त्व असलेल्या वस्तूना मी तुम्ही ठरवलेली किंमत लावून गमवायला मी मूर्ख नाही. तेव्हा पुढच्या वेळेला मला कोंडीत पकडताना दहा वेळा विचार करा...
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 01/30/2025 - 08:30 नवीन
भारतीय लोकांच्या कल्पकतेमधे सर्वात मोठा अडसर असेल तर आपल्या युनिव्हर्सिट्या. दर वर्षी किमान पाच सहा हजार लोक पी एच डी करत असतील. पण हे सर्व संशोधन रद्दीत जाते. किंवा सिनिओरिटीच्या नावाखाली दडपले जाते
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/30/2025 - 10:58 नवीन
खरे आहे पण विज्ञान्/गणित /अभियांत्रीकी ह्यांत आपण ७५ वर्षात नविन्/भरघोस अशी भर घातली नाही. अनेक कारणे आहेत. संशोधन करण्यासाठी लागणारी मानसिकता आपल्या समाजात नाही हे मुख्य कारण. पण कला,चित्रकला, पाकक्रुती,संगीत अशा अनेक शाखांमध्ये ती नक्कीच आहे. भाषांचेच उदाहरण घ्या, ३०हुन अधिक अधिकृत भाषा भारतात आहेत. किती जण मातृभाषा/इंग्रजी पलिकडे नविन भारतिय भाषा शिकायचा प्रयत्न करतात ?
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 02/25/2025 - 09:34 नवीन
भारतीय विद्यापिठे इतर भारतीय भाषा शिकायला प्रोत्साहन देतात?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 02/25/2025 - 15:01 नवीन
किती जण मातृभाषा/इंग्रजी पलिकडे नविन भारतिय भाषा शिकायचा प्रयत्न करतात ? आजच्या युगाचीच कशाला जुन्या काळाची भाषा सुध्दा "धन धन" हिच आहे! सर्वे गुण: कांचनम आश्रयते ! तेंव्हा उगाच बंगाली किंवा तेलगू किंवा तामिळ शिकून कोण कशाला आपला वेळ फुकट घालवेल? त्यातून काय पैसे मिळणार का? उगाच दुसऱ्या भाषेतील "उच्च साहित्य वाचून आत्मिक समृद्धी" वगैरे भरल्या पोटाचे खेळ आहेत. आपलॆ मातृभाषासुध्दा धड येत नाही अशा अनेक मुली मी रोज पाहतो. बाळाच्या हृदयाचे ठोके "एकशे अडुसष्ट किंवा एकशे अठ्ठेचाळीस" आहेत हे सांगितले कि म्हणजे वन सिक्सटी एट किना वन फोर्टी एट असं तिची "मम्मी" सांगते. कोण कशाला तिसरी भाषा शिकायला जाईल
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/25/2025 - 15:27 नवीन
भाषांचेच उदाहरण घ्या, ३०हुन अधिक अधिकृत भाषा भारतात आहेत. किती जण मातृभाषा/इंग्रजी पलिकडे नविन भारतिय भाषा शिकायचा प्रयत्न करतात ? माईडे, तुला आणि तुझ्या 'ह्यां'ना कोणकोणत्या भाषा येतात?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 01/30/2025 - 10:48 नवीन
२००३/२००४ च्या आसपास सोन्याचा दर ६५०० रुपये होता. आता ८०,००० च्या वर आहे. सोन्यात गुंतवणूक करा/गोल्ड बॉण्डमध्ये गुंतवणुक करा असे तज्ञच सांगत असतात. "वर संघाच्या एकाही चिंतन शिबिरात विचार होऊ शकला नाही" संघाने कशाला हे सांगायला हवे? ज्यांना सोन्यात गुंतवणुक फायदेशीर वाटत नाही त्यानी म्युच्युल फंड वगैरे ईतरत्र गुंतवणुक करावी. ते डीप सीक हे एल एल एम आहे, विशाल भाषा प्रतिक्रुती म्हणजेच एक न्युरल नेटवर्क आहे एवढी माहिती मिळाली. जसे जी पी टी आहे. हळूहळू अभ्यास करत जाउया एकडेच.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/30/2025 - 10:57 नवीन
A provocative question! While gold has been a traditional store of value and a popular investment option, there are some arguments against investing in gold. Here are a few reasons why some people might consider investing in gold "stupid": 1. No dividends or interest: Unlike stocks or bonds, gold doesn't generate any income or dividends. You won't earn any interest on your gold investment, which means you're relying solely on price appreciation. 2. No growth potential: Gold is a commodity, and its value is largely driven by supply and demand. Unlike companies, which can grow and expand, gold's value is relatively static. You're not investing in a business or economy that can grow and compound over time. 3. High storage and maintenance costs: Physical gold requires secure storage, which can be expensive. You may need to pay for a safe deposit box, insurance, or other security measures to protect your investment. 4. Illiquidity: While gold is a widely recognized and traded commodity, it can be difficult to sell quickly or at a fair price, especially if you're holding physical gold. 5. No intrinsic value: Unlike some other investments, gold has no intrinsic value beyond its aesthetic appeal and industrial uses. Its value is largely driven by sentiment, speculation, and historical significance. 6. Volatility: Gold prices can be volatile, and market fluctuations can result in significant losses if you buy at the wrong time. 7. Opportunity cost: Investing in gold means tying up your money in a relatively unproductive asset. You might be missing out on other investment opportunities that could provide higher returns or growth potential. 8. Counterfeiting and authenticity risks: When buying physical gold, there's a risk of counterfeiting or authenticity issues, which can be difficult to verify. 9. Tax inefficiency: In some countries, gold investments may be subject to capital gains taxes, which can reduce your returns. 10. Lack of transparency: The gold market can be opaque, making it difficult to determine the true value of your investment or the fees associated with buying and selling gold. It's essential to note that these arguments don't necessarily mean investing in gold is always "stupid." Gold can still be a valuable addition to a diversified investment portfolio, particularly as a hedge against inflation, currency fluctuations, or market volatility. Before making any investment decisions, it's crucial to assess your individual financial goals, risk tolerance, and circumstances. It's also essential to consult with a financial advisor or conduct your own research to determine the best investment strategy for your needs. Would you like to discuss alternative investment options or explore the potential benefits of investing in gold?
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 01/30/2025 - 12:26 नवीन
सोन्यात गुंतवणूक का करावी या बद्दल मेटा एआयचे मत खाली दिले आहे. ह्यातले काही मुद्दे तुम्हाला दिलेल्या उत्तराच्या विरोधी आहेत. अर्थात प्रश्न विचारताना कल्पकता लागते. बाकी ज्याचे त्याचे दुराग्रह. प्रश्नः Why to invest in gold? Here are the top reasons to invest in gold: # 1. Hedge Against Inflation and Currency Devaluation Gold tends to increase in value when inflation rises or currencies depreciate. # 2. Diversification and Risk Management Gold's performance is often uncorrelated with other assets, making it an excellent addition to a diversified portfolio. # 3. Store of Value and Wealth Preservation Gold has historically maintained its purchasing power over time, making it a reliable store of value. # 4. Safe-Haven Asset Gold is often sought after during times of economic stress, geopolitical tensions, or market volatility. # 5. Limited Supply and Increasing Demand The total amount of gold in existence is limited, and demand from central banks, investors, and industries is increasing. # 6. Tangible Asset with No Counterparty Risk Gold is a physical asset that is not dependent on any institution or government, reducing counterparty risk. # 7. Long-Term Growth Potential Gold has historically provided long-term growth opportunities, making it a popular choice for investors. # 8. Protection Against Market Volatility Gold's value can help offset losses in other assets during market downturns. # 9. Easy to Invest Gold can be invested in through physical gold, ETFs, mining stocks, mutual funds, and more. # 10. Liquidity Gold is widely recognized and easily convertible to cash, making it a liquid asset. Before investing in gold, consider your financial goals, risk tolerance, and overall investment strategy. It's essential to consult with a financial advisor or conduct your own research.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु गुरुवार, 01/30/2025 - 13:36 नवीन
कोणताही शहाणा गुंतवणूक सल्लागार एकूण गुंतवणूकीच्या ५ ते १०% पेक्षा जास्त गुंतवणूक सोन्यात असू नये असं सांगतात. मला आता नाव आठवत नाही पण माझे एक आवडते ते आणि इतर अनेक गुंतवणूक तज्ञ असं नेहेमी म्हणतात की, "सोन्यात पैसे टाकून तुम्हाला कधीही श्रीमंत होता येत नाही, पण तुम्ही श्रीमंत असाल तर तुम्हाला सोने विकत घेता येते." याचा अर्थ ज्याला जेव्हा समजेला त्याला तेव्हा आर्थिक मोक्ष नक्की प्राप्त होतो.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 01/30/2025 - 21:19 नवीन
मतितार्थ इतकाच कि एआय तुम्ही विचारलेल्या प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर देते. तुम्ही सोन्यातल्या गुंतवणूकीला मुर्खपणा म्हणालात, एआय ने तुमचा समज बळकट होईल असेच उत्तर दिले. मी गरज विचारली तर मला तसे उत्तर मिळाले. सोन्यातली वा इतर कोठलीही गुंतवणूक ही ज्याच्या त्याच्या जोखीम घेण्याची क्षमतेवर, उपलब्ध संधी, संसाधने, आणि लक्ष्य यावर अवलंबून असते. बाकी धाग्याचा विषय (टायटल) कल्पकता आहे, त्यामुळे अवांतर प्रतिसाद आवरतो.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 01/31/2025 - 04:49 नवीन
मिपावरच्या अशा चर्चातून लोकमानसात ए०आय० सारख्या तंत्रज्ञानाबद्दलची मते काय आहेत, हे समजायला मदत होते. "ए०आय० तुम्हाला हवं तसं सांगतो" या समजूती मागचं खरं वास्तव "ए०आय० तुम्हाला सर्व बाजूनी मुद्देसूद उत्तरे देतो" हे आहे. या गुणाला लोक अवगुण मानत असतील तर या तंत्रज्ञानामुळे नवविषमता का निर्माण होईल हे समजते. Where does gold stand in different investment options for a common man? असा प्रश्न विचारून बघा. सोन्याचे गुंतवणूकीतले नेमके स्थान कळेल. जाता जाता: चीनने ए०आय० सार्वजनिक केल्याने भारत सरकार खडबडून जागे झाल्याने अंमळ मौज वाटली आणि २७ वर्षांपूर्वी रविवार सकाळ मध्ये मीच लिहिलेल्या कथेची आठवण झाली. https://www.misalpav.com/node/9295
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 05:13 नवीन
हा लेख एआय संदर्भात होता का?
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 01/31/2025 - 05:48 नवीन
डीपसीक वरील गर्दी आणि कुंभमेळ्यातील गर्दी यांचा तुलनात्मक अभ्यासाचा होता. लागा कामाला आता. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 01/31/2025 - 05:51 नवीन
हा हा हा हा!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 01/31/2025 - 06:06 नवीन
डीपसीक वरील गर्दी आणि कुंभमेळ्यातील गर्दी यांचा तुलनात्मक अभ्यासाचा होता. :)
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/31/2025 - 08:40 नवीन
आणलाच कुंभमेळा शेवटी. अर्थात हे अपेक्षितच आहे. इतकी अफाट कल्पनाशक्ती दुसऱ्या कोणाकडे असणार. चालू दे.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Sat, 02/01/2025 - 04:55 नवीन
गणित आणि विज्ञान ऑप्शनला टा़कले की अशी तुलना अ‍ॅप्पल अँड ऑरेंजेस तुलना सुचते.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/31/2025 - 06:50 नवीन
तुम्ही एआय ला विचारलेला प्रश्न तुमच्या पूर्वग्रहाला अनुसरून होता. मी त्याच्या विरोधातला प्रश्न विचारून विरुद्ध उत्तर त्याच एआय मॉडेल कडून मिळवले. आपण दोघांनी विचारलेले प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहिली कि "ए०आय० तुम्हाला हवं तसं सांगतो" ह्याचा योग्य अर्थ कळेल. "Where does gold stand in different investment options for a common man?" इतके अवघड न करता, "टेल मी प्रोज अँड कॉन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट इन गोल्ड" असे विचारले तरी आपल्याला सोन्यातल्या गुंतवणूकीचा विचार करावा लागेल इतके मुद्देसूद उत्तर (दोन्ही बाजुने) मिळते. एआयकडून योग्य उत्तर मिळण्यासाठी कसे प्रश्न विचारावे हा एक कल्पक विषय आहे, त्याला प्रॉम्प्ट इंजिनीअरिंग असे म्हणतात.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 01/31/2025 - 06:59 नवीन
मी जो प्रश्न विचारला आहे तो अतिशय विचारपूर्वक विचारला आहे. त्याच्या उत्तरात मला सोने या गुंतवणूक पर्यायाच्या श्रेणी विषयी माहिती मिळते. मला फक्त फायदे आणि तोट्यांची चर्चा अपेक्षित नाही.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Fri, 01/31/2025 - 07:40 नवीन
इथे डकवता का?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Fri, 01/31/2025 - 08:06 नवीन
As a common man, you have various investment options to choose from, each with its unique characteristics, benefits, and risks. Here's a simplified ranking of investment options, considering factors like risk, return, liquidity, and ease of investment: *Low-Risk Investments* 1. *High-Yield Savings Account*: Liquid, low-risk, and easily accessible. 2. *Fixed Deposits (FDs)*: Low-risk, fixed returns, and relatively liquid. 3. *Government Bonds*: Low-risk, fixed returns, and relatively liquid. *Moderate-Risk Investments* 1. *Gold*: Relatively low-risk, potential for long-term appreciation, and easily investible through gold ETFs or physical gold. 2. *Debt Mutual Funds*: Moderate risk, relatively stable returns, and easy to invest. 3. *Real Estate Investment Trusts (REITs)*: Moderate risk, potential for rental income and capital appreciation. *Higher-Risk Investments* 1. *Stocks*: Higher risk, potential for high returns, and relatively liquid. 2. *Equity Mutual Funds*: Higher risk, potential for high returns, and easy to invest. 3. *Peer-to-Peer Lending*: Higher risk, potential for high returns, but relatively illiquid. *Alternative Investments* 1. *Cryptocurrencies*: High-risk, high-potential returns, but highly volatile. 2. *Commodities*: High-risk, potential for high returns, but subject to market fluctuations. Considering these options, gold stands out as a relatively low-risk investment with potential for long-term appreciation. It's easily investible through gold ETFs or physical gold, making it accessible to common investors. When allocating your investment portfolio, consider the following: 1. *Diversification*: Spread your investments across different asset classes to minimize risk. 2. *Risk tolerance*: Invest according to your comfort level with risk. 3. *Financial goals*: Align your investments with your short-term and long-term goals. 4. *Time horizon*: Invest for the long-term to ride out market fluctuations. Remember, investing always involves some level of risk. It's essential to educate yourself, set clear financial goals, and consult with a financial advisor if needed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा