बंगाली (बेगानी) शादीमे "खुर्शीद" दिवाना
बांगलादेशातील "बंधूनी" बांगला बंधू चा पुतळा पडून जो उन्माद चालवला आहे , देशाचं पंतप्रधानांच्या घरात घुसून त्यांचे ( ते सुद्धा स्त्री चे) अंत्वस्त्र फडकवणे ( बंगाल संस्कृतीचे हे घृणास्पद दृश्य ) असे "चाळे " केले ते बघून काही महा महिमानां "मोदींचे हि हेच होईल " "भारतात हेच होऊ शकते" अशी विधाने करावीशी वाटली .. हे विरोधक असे करून भाजप किंवा देशाचं पंतप्रधांनाचा अपमान करीत नसून अख्या देशाचा अपमान करीत आहेत , भारतात कशीहि असली (व्हॉ लाटा इल) तरी लोकशाही आहे , नसती तर २०२४ वर्षी निवडणूक झालय नसत्या , पत्रकार मोकळे नसते , १९७५ प्रमाणे सर्व विरोधक तुरुंगात असते , काँग्रेस वर बंदी असती वैगरे
हे लोक हे विसरतात कि इतिहासात बघता १९७७ साली देशाची जनता इंदिरा गांधींवर नाराज होती पण जनतेने त्याना लोकशाही मार्गाने हटवले , जाऊन त्यांचं घरावर हल्ला नाही केला कि त्यापेक्षाही बीभत्स प्रकार केला नाही जो बांग्लादेशात झाला...
एकवेळ पाकिस्तान परवडला सरळ तो काय करणार हे माहित तरी असते , पण हे "अहसनफररा मोश" बंगाल बंधू नको असे झालाय
हे विसरतात कि एकाच धर्माचे असणाऱ्या गोऱ्या पंजाबी पाकिस्तानी मुसलमानांनी बंगाल्यांना काळे आणि बुटके म्हणून हिणवले होते
आता या बेगानी शादीत "लीडर ऑफ ऑपॉसिझिशन" काय नाचतील ते बघणे नशिबी आहे ... हे राम