डॉ सौ. आणि डॉ. श्री.
सध्या माझ्या वार्डात चौकाचौकातील फ्लेक्सवर अचानकच बऱ्याच माननीयांनी श्री. ऐवजी "डॉ . श्री ." व माननीयांच्या सौ. नी सौ. ऐवजी "डॉ. सौ," लावायला सुरुवात केलीये. यातील बरेचसे माननीय " ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट" (GoI ) वाले आहेत.
रोज रोज हे फ्लेक्स बघून काही प्रश्न पडलेत , जाणकार मिपाकर मदत करतील व करियर घडायला आणि भविष्याची चिंता मिटायला मदत होईल ह्या उद्देशाने हा धागा काढलाय , कृपया ज्यांना अधिक माहिती व मदत करायची इच्छा असेल त्यांनी खालील पैकी एका वा अनेक प्रश्नांची उत्तरे दिलीत तर फार उपयोग होईल.
१) नावापुढे "डॉ" लावण्यासाठी P.Hd. मिळवायला साधारणतः किती खर्च येतो ? कॅटेगरी प्रमाणे - अंगुठा छाप , सातवी पर्यंत शिकलेले , दहावी नापास , दहावी पस , बारावी नापास/पास , पदवीधर असे शिक्षण असेल तर रेट कसे कसे बदलतात?
२) मुक्त विद्यापीठात दहावी पास नंतर किती वर्षात पदवी मिळू शकते? masters किती वर्षात होता येते? तिथे ही रेट प्रमाणे काम करून देणारे agents असतात का?
३) अशी "अचानक " मिळालेली P.hd. , सरकार पोषित सिनियर कॉलेजमध्ये ( जिथे २ लाखावर पगार व मरेपर्यंत ६ आकडी पेन्शन मिळते) नोकरी मिळण्यासाठी ग्राह्य धरतात का? तशी नोकरी मिळविण्यासाठी वयाची काही अट असते का?
४) "अचानक " मिळविलेल्या P.hd . वर "GoI " वाल्या कॉलेज मध्ये किती पगाराची नोकरी मिळू शकते? तिथे नोकरीसाठी वयाची अट असते का?
५) "अचानक P.hd " देणारे खाजगी विद्यापीठ सुरु करायचे असल्यास कमीत कमी "इन्व्हेस्टमेंट" किती लागू शकते? त्यासाठी सरकार "स्टार्ट-up " योजनेखाली काही मदत करते का? काही अनुदान मिळत असेल तर ते परत करावे लागते का? व्याजदर किती असतो?
कृपया जाणकारांनी जास्तीत जास्त माहिती देऊन मदत करावी. ही चर्चा मी माझ्या भविष्यकालीन स्टेडी इनकम साठी एक व्यवहार्य option काय असू शकते व त्यासाठी काय करावे लागू शकते , returns किती मिळू शकतात याचा अंदाज येण्यासाठी सुरु केलीये.