Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

बग आली माझ्या कोडा

प — पाषाणभेद, Tue, 03/26/2024 - 18:15

धाव धाव टीम लिडरा
बग आली माझ्या कोडा

किती आता गुगलावे?
एआय मदतीला घ्यावे?

डेडालाईन मृत्यू भासे
चहा कॉफी नरडी डाचे

आता उद्धरण्या केवळ
तूच येई धावत सबळ

पाषाणाच्या चुकल्या कोडी
टेस्टर, क्यू.ए. इग्नोर करी

- पाभे
२६.०३.२०२४


  • Log in or register to post comments
  • 5361 views


वाचनखूण लावा
| 5361 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
र
रामचंद्र Tue, 03/26/2024 - 19:58 नवीन
मस्तच, पण टीम मेंबरांच्या मदतवजा हस्तक्षेपाचीपण मजा यात येऊ द्या की.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 03/26/2024 - 21:29 नवीन
अशा परिस्थितीत अनुभव सर्वाधिक उपयोगी ठरतो. रचना आवडली.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 03/27/2024 - 08:04 नवीन
कविता आवडली..
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 03/27/2024 - 14:40 नवीन
वा !
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 03/27/2024 - 18:28 नवीन
अरे अरे टीम मेंबरा कशाला फुका आरडाओरडा आळशा आधार बार्ड वापर की जरा कार्ड (पक्षी - डोके) कमी कर टंगळ मंगळा झडकरी काम उरकी बाळा ऑफिस आता बंद होई बायको घरी वाट पाही रामे म्हणे ऐशा नरा माराव्या मोजुनी पैजारा
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Wed, 03/27/2024 - 19:53 नवीन
वा, रामे, झकास!
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 03/27/2024 - 20:19 नवीन
मूळ कवितेवर प्रतिक्रियेने चार चंद्र लावले आहेत ;-).
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 03/28/2024 - 02:26 नवीन
प्रॉम्प्ट होता चांगला बार्ड तरीही गंडला बार्ड झाले जेमिनी आज झाले एनिमी वाटले जे गेम-चेंजिंग? निघाले ते नेम-चेंजिंग गपटाचे धरता पाय भरकटे तोही हाय.. अपॉलॉजीचा नुसता पूर सोल्यूषण राहिले दूरदूर..
  • Log in or register to post comments
N
nutanm Wed, 03/27/2024 - 23:27 नवीन
खरच प्रतयक्षाहून प्रतिमा (प्रतिक्रिया) सुंदर !!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 03/28/2024 - 05:01 नवीन
पाषाणाच्या जरी चुकल्या कोडी टंकाळली बोटं कडाकडा मोडी भंजाळले डोके तरी सुटेना कोडे वारंवार लिडरा डोळे मोडी काय करू आता सांगा तुम्ही पाषण म्हणे.... अरे अरे पाषाणा .... फुका फोडशी टाहो झडकरी शरण जा हो बेतुक्या माजी म्हणे मेंबर.... उठ उठं पाषाणा काढ धुम्रकांडी सोडी गोल गोल धुम्रवलये भराभरा बार्ड,जेमिनी आणी चाटगपटं सारे वाकतील चरणी पटापट खोडा सुटेल कोडाचा झटपट बेतुक्या म्हणे..... निसंदेह सुटेल कोडा, सत्वर नवस फेडा चकणा,उदक सोडा बेतुक्या मुखी. -बेतुक्या
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 03/28/2024 - 07:55 नवीन
अपॉलॉजीचा नुसता पूर सोल्यूषण राहिले दूरदूर.--सुरेख सत्वर नवस फेडा चकणा,उदक सोडा बेतुक्या मुखी.---ही सुचवणी पण जबरदस्त
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश गुरुवार, 03/28/2024 - 08:42 नवीन
चूक झाली कुठं गावंना बोलल्या बिगर रहावना बु्जलिया डोळ्यांची भोकं न खाजवा की तुम्ही खाजवा की जरा खाजवा की बग शोधायला डोकं न खाजवा की बग शोधायला डोकं Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/28/2024 - 12:51 नवीन
आवडले
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Fri, 03/29/2024 - 04:42 नवीन
कवितेवर कवितांचा प्रतिसाद पाहून डोळे ओले झाले. वाटते कवितेला आता अच्छे दिन आले.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा