Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

शालेय विषय निवडीबद्दल मार्गदर्शन

काथ्याकूट

शालेय विषय निवडीबद्दल मार्गदर्शन

ध

धर्मराजमुटके

सदस्य
46 लेखन
2113 प्रतिक्रिया
2009 पासून
📅
सदस्य झाले
16 July 2009
🕐
अखेरची भेट
12 Mar 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

धर्मराजमुटके
गुरुवार, 03/07/2024 - 07:42
🗣 0 प्रतिसाद

नमस्कार मंडळी,
वरील विषयाच्या अनुषंगाने मिपावर आणि इतरही संस्थळावर अनेक चर्चा झालेल्या आहेत, वाचल्या आहेत पण पाऊस पडायला लागल्यावर घर बांधायची तयारी करायची ह्या जन्मजात सवयीमुळे ऐनवेळीचा काथ्याकुट करत आहे तेव्हा अगोदरच माफी मागतो. बर्‍याच चर्चा SSC/ CBSE बोर्डाच्या अनुषंगाने आहेत. ICSE च्या अनुषंगाने देखील चर्चा व्हावी म्हणून देखील हा प्रपंच !

सर्वप्रथम मुलाविषयी :
मुलगा आता ९ वी मधे जाईल. शाळेत ICSE बोर्ड आहे आणि त्यांनी विषय निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. पण जेवढे निवड स्वातंत्र्य तेवढा अधिक गोंधळ अशी परिस्थिती आहे.
मुलगा बर्‍यापैकी हुशार / एकपाठी आहे. शाळेचा आग्रह आणि मुळातच वडिलांकडून मिळालेले कंटाळ्याचे संस्कार यामुळे अजुन बाहेरची शिकवणी लावलेली नाही तरीही 85% ते 90% पर्यंत गुण मिळवत आहे. (सायन्स, गणित सगळ्याच विषयात).

मुलाला पुढे जाऊन झुलॉजीस्ट बनायचे आहे असे तो म्हणतो. म्हणजे नक्की काय करायचे ते त्याला आणि मला देखील कळत नाही आणि ते करेलच याची शाश्वती वाटत नाही. अर्थात या वयात त्याच्याकडून लगेच तशी अपेक्षा नाही. ते असो.
मुळ विषय असा की त्याला गणितात बर्यापैकी गती आहे पण त्याला तो विषय आवडत नाहीये आणि घ्यायचा नाहिये.बर्‍याच जणांशी चर्चा केल्यानंतर गणित सोडू नये असे जवळजवळ 99% मंडळींचे मत पडले. यात गणितात ओ की ठो कळत नसलेले / त्याचे सध्याचे शिक्षक / इतर शिकलेली मंडळी या सगळ्यांचा समावेश असलेली मंडळी आहेत.

विषयांची विभागणी ४ भागांत आहे.
भाग 1 : अनिवार्य विषय : ( यातील सगळे विषय घ्यायचे आहेत.)
English Language
English Literature
Hindi
History Civics
Geography
-----

भाग २ : ऐच्छिक विषय : ( यातील कोणतेही दोन किंवा तीन विषय घ्यायचे आहेत.)
Science (Physics, Chemistry, Biology)
Environmental Science
Mathematics
Commercial Studeies
Economics

भाग ३ : ऐच्छिक विषय : ( यातील कोणतेही दोन विषय घ्यायचे आहेत )
Computer application (Java coding)
Commercial application
Economics Application
Environmental Application
Home Science
Physical Education
नोंद : यातील पहिल्या आणि शेवटच्या विषय घेऊ नये इतपत निर्णयावर घरातील सर्व सदस्यांचे एकमत झालेले आहे).

भाग 4 : श्रेणीबद्ध (ग्रेडेड) विषय : ( दोन्ही विषय घ्यायचे आहे पण पुढील वाटचालीच्या दृष्टिने यात मिळविलेल्या गुणांमुळे काही परीणाम होणार नाही. केवळ उत्तीर्ण होणे आवश्यक आहे)
Marathi
SUPW - Socially Usefull Productive Work

गुणविभागणी खालील प्रमाणे
Group 1
Theory Paper - 80 Marks
Internals - 20 Marks

Group 2

Theory Paper - 80 Marks
Internals - 20 Marks

Group 3
Theory Paper - 100 Marks
Internals - 100 Marks

वर जवळपास सगळीच माहिती दिली आहे तरीही काही निसटले असण्याची शक्यता आहे. मुळ मुद्दा असा की गणित विषय न घेतल्यास पुढील आयुष्यात किती नुकसान होईल ? पुढील आर्थिक स्थितीवर कितपत परींणाम होऊ शकतो.
गणित निवडले आणि त्यात अपयश आले तर किती नुकसान होऊ शकेल याचा अनुभव गाठीशी असल्यामुळे तेवढा भाग चर्चेला घेतलेला नाही पण तेव्हाचा आणि आताचा अभ्यासक्रम, करीअर ची क्षेत्र विस्तारीत / बदल झाल्यामुळे अचूकतेच्या जवळपास जाणारा अंदाज नाही.

प्रतिसादांच्या प्रतिक्षेत :

धन्यवाद !

  • Log in or register to post comments
  • 5995 views
🗣 चर्चा

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा