अंबानीचे लग्न: उधळपट्टी की गुंतवणूक
मुकेश अंबानी ने मुलाच्या प्री वेडिंग सेरेमनी मध्ये 700 ते 1500 कोटी खर्च केले असे म्हटले जाते. अनेकांना प्रश्न पडला अशी पैशांची उधळपट्टी गुज्जू मुकेश अंबानी ने का केली असेल. हा पैसा गरिबांना वाटला असता किती उत्तम झाले असते.
गुजराती व्यक्ती कधीही पैसा व्यर्थ उडवत नाही. त्याची विचारसरणी त्याच्या सोबत त्याच्या समाजालाही जास्तीस जास्त फायदा झाला पाहिजे ही असते. जुनागड भगवान दततात्रेयांचे शक्तिपीठ आहे. अंबानी ने जुनागड मध्ये १४ मंदिरे बांधली. धार्मिक पर्यटन जुनागड मध्ये वाढणार. अंबानी ने चालवीत असलेल्या जानवरांच्या हॉस्पिटलचा प्रसार प्रचार ही भरपूर झाला. जुनागड चे आंबे ही प्रसिध्द झाले आहे. पर्यटक पाच दहा लिटरच्या बाटल्यांत पर्यटक सोबत घेऊन जाण्यासाठी आंब्याचे ज्यूस विकत घेतात. प्रसिध्द विदेशी पाहुण्यांना स्थानिक हस्तशिल्प इत्यादी उपहार दिले. गुजरातच्या हस्तशिल्पाची मागणी ही विदेशात वाढेल. त्याच्या फायदा जुनागड आणि गुजरातला होणार. गेल्या वर्षी सर्वात जास्त १८ लक्ष विदेशी पर्यटक गुजरात आले होते. त्यांची संख्या बहुतेक वीस ते पंचवीस लाख पर्यंत दोन-तीन वर्षात पोहोचणार, हे निश्चित. याशिवाय अंबानी त्या परिसरात विभिन्न व्यवसायात गुंतवणूक करेल. दुसऱ्या शब्दात खर्च केलेला पैसा आठ दहा वर्षात सूद समेत वसूल करणार. आपले काय मत आहे.