Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

हट्टांचे नेमके प्रकार किती?

काथ्याकूट

हट्टांचे नेमके प्रकार किती?

सदस्य
— लेखन
— प्रतिक्रिया
2026 पासून
📅
सदस्य झाले
13 March 2026

या सदस्याने अद्याप परिचय लिहिलेला नाही.

या सदस्याचे लेखन पाहण्यासाठी येथे Views block ठेवा.

माहितगार
Tue, 02/13/2024 - 15:39
🗣 0 प्रतिसाद

हट्टी व्यक्ती, समुह किंवा संस्थेची समजूत काढणे कठीण जाते तेव्हा आग्रहाची जागा हट्टाने घेतली असे म्हणता येऊ शकते का? आधी ऊस तोडून मागणार आणि तुटलेला ऊस आधीसारखा करून हवा म्हणून हट्ट धरल्यामुळे, राज हट्ट, स्त्री हट्ट आणि बाल हट्ट या पैकी बाल हट्ट अवघड कसा याची आपण सर्वांनीच कथा ऐकलेली असते. हट्ट आणि हट्ट करणार्‍यांचे हे तीनच प्रकार आणि उपप्रकार असतात की आणखीही?

या चर्चेचा उद्देश कोणत्याही विशीष्ट हट्टाचे नकारात्मक मूल्य जोखण्याचा (value judgement) किंवा हट्ट केलेल्यांच्या हट्टांना कमी लेखण्याचा नाही तर केवळ हट्टांचे प्रकार शक्य तेवढे स्थल- काल- परिस्थिती निरपेक्षपणे लक्षात घेण्याचा आहे. (अर्थात कुणालाही दुखावण्याचा उद्देश्य निश्चितपणे नाही त्यामुळे त्यामुळे कोणत्याही विशीष्ट हट्टाबदल चर्चा घसरून हायजॅक होणार नाही याची काळजी घेण्याचे सहकार्याचे आवाहन आहे.)

* राज हट्ट
* न्याय संस्था हट्ट
* कायदा हट्ट वेगळा असतो कि राज-न्याय संस्था हट्टाचा प्रकार असतो? याचे शब्द-प्रामाण्य आणि ग्रंथ प्रामाण्याशी नाते काय असते?
** कर्मठता हट्ट वेगळा की हट्टाचेच वेगळे नाव? लकीर के फकीर असणारा कर्मठता-हट्ट वेगळा कि शब्द-प्रामाण्य, ग्रंथ प्रामाण्य आणि कायदा हट्टाशी निगडीत असतो? (# कर्मठता शब्दात केवळ धार्मिक नव्हे तर धर्मेतर बाबतीतील कर्मठता ही गृहीत धरल्या आहेत)
* उपद्रवमुल्य-दर्शन हट्ट असतात तसे शांतता-दर्शन केवळ आग्रह असतो की समजूत न घालता येणार्‍या हट्टाचीही जागा घेऊ शकतो?
* भांडवलशहांचे हट्ट असं काही असते असे तुम्हाला वाटते का? असेल तर काही उपप्रकारही शक्य आहेत का?
* मध्यवर्ती बँका (आरबीआय, आयएमएफ) च्या आग्रहांना हट्ट म्हणावे का?
* समुह हट्ट किंवा जनहट्टाचे किती उपप्रकार असू शकतील? जसे की संघटनांनी धरलेले हट्ट अजून काही सुचततात का?
* व्यक्ती हट्टांचे कोणकोणते उपप्रकार असू शकतील? नेतृत्व हट्ट, बॉस हट्ट हे एकच की वेगवेगळे? गुरुजन हट्टांना व्यक्ती हट्टात धरावे कि संस्था हट्टात? संस्थासंचालक हट्ट व्यक्ती हट्टाचा प्रकार की संस्था हट्टाचा? कुटुंब प्रमुख किंवा टिम लिडर हट्ट हा संस्थात्मक हट्ट कि व्यक्तीगत हट्ट असतो?
** पितृ हट्ट, मातृहट्ट, मोठ्या भावा बहीणीचे हट्ट लहान भावा बहींणंचे हट्ट, जावई हट्ट सासूहट्ट सूनहट्ट सासराहट्ट पतिहट्ट पत्नी हट्ट, पुत्रहट्ट, कन्याहट्ट,
** भाई-दादा-डॉन हट्ट
* न्यायाधिश, स्थानिक नागरी संस्था विधान सभा ते लोक-राज्य सभांच्या अध्यक्ष सभापतींचे हट्ट हे व्यक्ती हट्टाचे प्रकार की संस्था हट्टाचे?
* व्यक्ती हट्ट, संस्था हट्ट आणि समुह हट्टांचे नाते कसे असते?
* संस्था हट्टांचे स्वरूप आणि उपप्रकार काय असतात?

* तुम्हाला अजून काही हट्टांचे प्रकार-उपप्रकार सुचतात का?

* उद्देश्य विषयास धरून अभ्यासपूर्ण चर्चेचा आहे.
* व्यक्तिगत आणि समुह टार्गेट करणार्‍या टिका, विषयास धरुन नसलेल्या आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.

  • Log in or register to post comments
  • 8650 views
🗣 चर्चा

Recent comments

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा