Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

शेअर बाजार २०२४: नियोजन, चर्चा, अंदाज

व
वामन देशमुख
Mon, 12/18/2023 - 03:47
🗣 76 प्रतिसाद
इशारा: सदर धागा लेखक अर्थतज्ज्ञ, गुंतवणूक तज्ज्ञ, बाजार सल्लागार इ. नाही. हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचून कुणी गुंतवणूक केल्यास व त्यातून आर्थिक किंवा इतर नुकसान झाल्यास हे संस्थळ, सदर लेखक, प्रतिसादक इ. जबाबदार असणार नाहीत. --- बाजारात सध्या तेजीचा बैल चौखूर उधळतोय. महिन्याभरातच सुमारे ९ टक्क्यांनी वाढून मागच्या आठवड्याच्या शेवटी निफ्टी २१,४५६.६५ वर बंद झालाय. अर्थातच, रिलायन्स, एचडीएफसी बँक, आइसीआइसीआइ बँक, इन्फी, टीसीएस सहित सगळ्याच प्रमुख कंपन्यांनी या आठवड्यात पाच टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली आहे. अदानींचे स्टॉक्स हिंडेनबर्गच्या ग्रहणातून बाहेर पडू लागलेत. या पार्श्वभूमीवर या आठवड्यात (१८ डिसेंबर २०२३) या महिन्यात, पुढच्या तिमाहीत आणि मुख्यतः २०२४ या वर्षात बाजाराचे चित्र कसे असेल, व्यापाराचे, गुंतवणुकीचे दिशा आणि धोरण काय असावे याची चर्चा मिपावर व्हावी या हेतूने हा धागा काढत आहे.* स्फूट नोंदी: इरेडा आइपीओची वर्गणी भरली होती. एकच लॉट मिळाला. ३२ च्या भावाने मिळालेल्या ४६० स्टॉक्सपैकी ८५ च्या भावाने १७३ स्टॉक्स विकून टाकले आणि भांडवल मोकळे केले. सध्या २८७ स्टॉक्स आहेत. १२३ पर्यंत गेलेला भाव सध्या ११० च्या खाली आलाय. ऍक्सेंट मायक्रोसेल आइपीओची वर्गणी भरली होती. एकही लॉट मिळाला नाही. नेट अवेन्यू आइपीओची वर्गणी भरायची होती, तिसऱ्या दिवशी पेमेंट करणे झाले नाही. १८ चा भाव ३४ वर गेलाय. प्रेस्टनिक इंजिनीअरिंग, डॉम्स इंडस्ट्रीज आइपीओची वर्गणी भरली आहे. सुतोवाच करण्यासाठी काही प्रश्न: सुझलॉन वर्षभरात थोडा थोडा करून सरासरी १४ वर घेतला होता, मध्यंतरी ३० वर थोडा विकला होता, आज अजून ३८ वर घ्यावा असा विचार सुरु आहे. दसरा-दिवाळीपर्यंत पन्नाशी पार करेल का? येसबँक या वर्षाच्या सुरुवातीला १६ वर घेतला होता, अजून ठेवला आहे. २०२५ च्या सुरुवातीपर्यंत पन्नाशी पार करेल का? मार्चमध्ये चाळीशीच्या खाली असलेला बँकनिफ्टी काळ अट्ठेचाळीशीवर गेला, येत्या मार्च-जूनपर्यंत पन्नाशी पार करेल का? रेल्वेला सेवा / उत्पादने पुरविणाऱ्या कंपन्यांत सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का? भारत सरकार अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला उत्तेजन देत आहे. त्यांतील कंपन्यांत वर्ष-सहा महिन्यांसाठी गुंतवणूक करावी का? अमेरिकेच्या बाजाराचे चित्र पुढच्या तिमाहीत कसे असेल? २०२४ लोकसभा निवडणुकांपर्यंत अडाणीचे स्टॉक्स वधारतील का? * 'बाजारात काहीही निश्चित नसते' वगैरे ढिसक्लेमर्स धरून / बाजूला ठेऊन मिपा तज्ज्ञांनी योगदान द्यावे ही विनंती. चर्चेतून झालाच तर मिपाकरांचा फायदा होईल आणि अजून वर्ष-सहा महिन्यांनी आपापले अंदाज किती बरोबर-चूक ठरले याची पडताळणी करून पाहता येईल. मिपावर राजकीय धुळवंड सुरु नाहीय, आर्थिक लठ्ठालठ्ठी सुरु करायला काय हरकत आहे? आखाडा सुरु झाल्यावर चार-दोन गुद्दे देता-घेता येतील ;-) चूभूदेघे. --- सध्या तरी बाजारात "काठोकाठ भरू द्या प्याला फेस भराभर उसळू द्या" अशी स्थिती आहे; एवढ्यातच "मानस का बधिरावे हे? बघतसे खिन्न जगता" असे होऊ नये ही श्री वेंकटेश्वर स्वामी चरणी प्रार्थना.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19047 views

🗣 चर्चा (76)
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/31/2024 - 18:33 नवीन
बायकोचं काहीही ऊत्पन्न नाही. त्यामुळे तिला गिफ्ट करून ३ लाखा पर्यंतच्या एक्सम्पशन मध्ये काहीही टॅक्स लागणार नाही ना?? मी हिंदाल्को ३९१ चा भावाने ४०० घेतले होते. आता त्यावर जवळपास ७५ हजार नफा आहे. मी विकले तर २० टक्के टॅक्स लागेल. ५०० ते हजार खर्चय गिफ्टला. मेहेंदळे सरांनी सांगीतल्याप्रमाणे दुसर्या डीमॅटला ट्रांसफर करता येईल पण शेवटी माझ्याच खात्यात पडून असतील. आज ना ऊद्या टॅक्स लागणारच.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 02/01/2024 - 03:43 नवीन
नाही, तिथेच तर गोम आहे. बायकोला फुकट शेअर किंवा इतर काहीही दिले तर त्यातून मिळणारे उत्पन्न तुमचाच नावावर taxable होते. ह्याला clubbing म्हणतात टॅक्स भाषेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/01/2024 - 04:12 नवीन
काॅमी हे पहा, https://youtube.com/shorts/ubN3Rs4CiHc?si=pFSqwGzMhX1kw0aB
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 02/01/2024 - 04:33 नवीन
बाहुबली, ह्या व्हिडिओ मधला मॅटर वेगळा आहे. व्हिडिओ बरोबरच आहे, की पत्नीला शेअर दिल्यावर गिफ्ट रकमेवर बायकोला टॅक्स लागत नाही, हे तर बरोबरच आहे. मी सुद्धा गिफ्ट केलेल्या शेअरच्या रकमेबाबत बोलत नाहीये. मी तुमच्या पत्नीने शेअर विकून आलेल्या कॅपिटल गेन बद्दल बोलतोय. पत्नी किंवा मुलांना एखादी गोष्ट गिफ्ट दिली, आणि ती विकल्यावर कॅपिटल गेन झाला तर clubbing provision नुसार ते उत्पन्न तुमच्या उत्पन्नात वाढवले जाते. लॉजिक हेच की नुसते दाखवायला शेअर किंवा प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर करून कॅपिटल गेन वाचवता येत नाही.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Wed, 01/31/2024 - 13:57 नवीन
दुसर्‍या तुमच्या आवडीच्या डीमॅट अकाऊंट मधे शेअर्स ट्रान्स्फर करा. एन एस डी एल च्या /सी डी एस एल च्या वेबसाईटवर ती प्रोसेस मिळेल असे मला कोणीतरी म्हटले आहे. मी अजुन करुन पाहीले नाही. (मलाही ते करायचे आहे.) इन्फ्लेशन, टॅक्स आणि ब्रोकरेज यातुन कोणीही वाचले नाहीये. म्हणुन नफ्याचे गणित मांडताना हे नेहमीच वजा करावेत. थोडक्यात कुठलीही गुंतवणुक साधारण १०-११ टक्क्यापेक्षा जास्त वार्षिक परतावा देत असेल तरच त्यात मजा आहे. नाहीतर तुमचे पैसे वाढण्यापेक्षा कमीच होतील.
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 01/31/2024 - 14:46 नवीन
मला ह्या वर्षी बर्यापैकी प्रोफीट आहे होल्डींगवर. ते शेअर्स जर विकले तर त्यावर २० टक्के टॅक्स हे सूलतानी सरकरा घेईल बऱ्यापैकी नफा होत असेल तर सरकार टॅक्स घेणार असेल तरी हरकत नाही. टॅक्स वाचवण्यासाठी उगाचच भलतिकडे जास्त गुंतवणूक करावी लागते. टॅक्स भरायचा आणि शेअर मध्येच पैसे गुंतवावे. शेअर्समध्ये दीर्घकालीन गुंतवणूक कधीही योग्य.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 01/31/2024 - 15:41 नवीन
+१ अजुन एक आगंतुक सल्ला देता येइल पण अबांचा मराठी बाणा त्याआड येउ शकतो त्यामुळे जाउदे... 😀
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Wed, 01/31/2024 - 16:59 नवीन
असेही शेअर्स वरील दीर्घकालीन नफ्यावर १० % इतका कमी टॅक्स लागतो, एक लाख नफा असेल तर शून्य टॅक्स! अजून काय हवे? सरकारला टॅक्स द्यायचाच नसेल तर घरातील प्रत्येक व्यक्तीच्या नावाने एक खाते उघडा आणि प्रत्येक खात्यात समान गुंतवणूक करा. प्रत्येकाला एक लाख नफ्यावर शून्य टॅक्स लागेल. ( प्रत्येकाचा इन्कम सोर्स दाखवायची वेळ आल्यास तशी पूर्वतयारी ठेवणे.)
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 01/31/2024 - 10:04 नवीन
>>>>... त्यावर २० टक्के टॅक्स हे सूलतानी सरकरा घेईल व वरून मला काहीही सोयी सुविधी देणार नाही, असो. मिपावरील आजवरचे उत्कृष्ट विधान. सरकार काहीही सुविधा देत नाही असे सांगण्याची सोय सुद्धा काही देशांत नाही हे जाणवून जीव हरखला.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 01/31/2024 - 10:30 नवीन
सरकार काहीही सुविधा देत नाही असे सांगण्याची सोय सुद्धा काही देशांत नाही हे जाणवून जीव हरखला. आणी काही “लोकशाही” असलेल्या देशांत सरकार अत्यूत्तम सुविधा देतं ह्याकडे दुर्लक्ष करतो का तो एकांगी जीव?
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 01/31/2024 - 15:16 नवीन
>>>आणी काही “लोकशाही” असलेल्या देशांत सरकार अत्यूत्तम सुविधा देतं ह्याकडे दुर्लक्ष करतो का तो एकांगी जीव? आमच्या देशात सरकार आणि सेबी टी+० आणि तत्काळ शेअर्स जमा करण्याची जगातील कोणत्याही लोकशाही, हुकुमशाही, अराजन, निर्नायकी सरकारांनी न दिलेली सुविधा देण्याच्या विचारात असतांना अशा तथाकथित देशांतील काही लोक खोडा घालत आहेत.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 01/31/2024 - 12:19 नवीन
एक जिज्ञासू बाजार गुंतवणूकदार या नात्याने सदस्यांना कळकळीची विनंती - या धाग्यावर असंबद्ध राजकीय चर्चा करू नये. वाद होतील अशी विषयाशी असंबंधित विधाने करू नयेत. सुदैवाने चर्चा चांगली सुरु आहे, वाचकांना काही ना काही तरी गुंतवणूक clues मिळत आहेत. त्यामध्ये खंड पडेल असे काही करणे टाळावे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 01/31/2024 - 15:12 नवीन
सुदैवाने चर्चा चांगली सुरु आहे, वाचकांना काही ना काही तरी गुंतवणूक clues मिळत आहेत. त्यामध्ये खंड पडेल असे काही करणे टाळावे.
+१ धागा फॉलो करतोय. प्रतिसादात अनुभवाधारीत लिहिण्यासारखे बरेच काही आहे पण वाचकांना 'यशोगाथा' वाचण्यात रस असतो 'अपयशाची गाथा' कशाला कोण वाचेल असा विचार करुन ते टाळत आलो 😀 सर्व प्रतिसाद वाचले. त्यातल्या सुबोध खरेंच्या "आमचं असं का होतं ते कळत नाही" आणि आंद्रे वडापाव ह्यांच्या "या फायनान्शिअल वर्षात (अजून" ह्या दोन आणि अन्य प्रतिसादांशी बहुतांशी सहमत असल्याने त्यांचा उल्लेख करतोय, पण ह्याचा अर्थ असा नाही की बाकिच्यांचे प्रतिसाद पटले/आवडले नाहीत. पण तशा प्रकारचे व्यवहार केले/करत नसल्याने (आणि करण्याची इच्छाही नसल्याने) त्यावर वैयक्तिक मतप्रदर्शन करणे योग्य ठरणार नाही. उद्बोधक चर्चा अशीच सुरु रहावी...
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 01/31/2024 - 16:36 नवीन
वाचकांना 'यशोगाथा' वाचण्यात रस असतो 'अपयशाची गाथा' कशाला कोण वाचेल असा विचार करुन ते टाळत आलो
यशोगाथेतून काय करावे हे कदाचित कळेल, अपयशगाथेतून मात्र काय करू नये हे नक्की कळेल. टर्मिनेटर भौ, तुमचे लिखाणांच्या अनेक पंख्यांमध्ये मी पण आहे. ल्हिवा, मिपा आपलाच असा.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 02/01/2024 - 14:06 नवीन
"यशोगाथेतून काय करावे हे कदाचित कळेल, अपयशगाथेतून मात्र काय करू नये हे नक्की कळेल."
😊 +१ १९९४ साली कॉलेज शिक्षण सुरु असताना घडलेल्या एका घटनेतून शेअर बाजाराविषयी निर्माण झालेले आकर्षण - पुढे कमवायला लागल्यावर 'किरकोळ गुंतवणूकदार' म्हणून ट्रेडींगला केलेली सुरुवात - त्यापुढे एका सब-ब्रोकिंग फर्ममध्ये 'सायलेंट पार्टनर' बनण्यातून मिळालेल्या अमर्याद 'मार्जीन'च्या जोरावर केलेली बेफाम 'सट्टेबाजी', आणि त्या मूर्खपणातून स्वतःचे करून घेतलेले मोठे आर्थिक नुकसान - त्यानंतर शेअर बाजाराला ठोकलेला 'राम राम' अशा पहिल्या अपयशी इनिंग नंतर पुढे बाजारात हयात घालवलेल्या काही गुरुतुल्य व्यक्तींचे लाभलेले मूल्यवान मार्गदर्शन आणि पूर्वी केलेल्या घोडचुकांचे सिंहावलोकन केल्यावर 'आता पुन्हा नव्याने सुरुवात करावी' अशा निर्णयावर येऊन पोचलो आणि जवळपास दीडेक दशकाच्या 'मार्केट संन्यासाला' तिलांजली देत साधारण तीन वर्षांपुर्वी बहीण आणि बायको अशा कुटुंबातील दोन व्यक्तींचा 'सल्लागार' म्हणून पुनरागमन करत सुमारे दोन वर्षांपासून ट्रेडिंगच्या दुसऱ्या इनिंगला सुरुवात केली आहे. पुर्वाश्रमीच्या चुकांची पुनरावृत्ती कटाक्षाने टाळत वाटचाल सुरु असल्याने अद्याप तरी काही नुकसान झाले नसून फायदाच दिसतोय पण "मार्केट कोणाच्या बापाला कळलेले नाही" ही वस्तुस्थिती विसरून चालणार नसल्याने सेकंड इनिंग यशस्वी ठरली आहे वगैरे विधान करणे घाईचे ठरेल. त्यामुळे गेल्या जवळपास तीन दशकांत आलेले 'मार्केटचे' बरे-वाईट अनुभव, 'BOLT'* वर भेटलेल्या काही 'व्यक्ती आणि वल्ली' (आणि त्यांच्याकडून खरंतर शिकण्या सारख्या, पण त्यावेळी दुर्लक्ष केलेल्या काही गोष्टी), त्यांच्या गमती-जमती वगैरे गोष्टी टप्प्या-टप्प्यांत सवडीने खाली प्रतिसादांत लिहितो, त्यातून नवीन लोकांना तुम्ही म्हणाल्या प्रमाणे (तुमच्या मूळ वाक्यात थोडा बदल करून 😀) "अपयशगाथेतून मात्र काय करू नये हे कदाचित कळेल." * BOLT हा शब्द BSE शी निगडित असला आणि फर्मच्या ऑफिसमध्ये BSE पेक्षा NSE वरच सर्वाधिक व्यवहार होत असले तरी हा शब्दच तोंडवळणी पडला असल्याने ह्या आणि पुढच्या प्रतिसादांतही तोच शब्द वापरणार आहे, आणि हो... ह्या आणि भावी प्रतिसादांत काही अवांतर वाटल्यास आगाऊ क्षमस्व!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 02/01/2024 - 14:35 नवीन
हाहाहा. सहमत. मी देखील कोल ओप्शनमध्ये बरेच गमावून बसलोय. आता इक्विटीत बरेच काढलेत. हिंदाल्को ३९१ ला ४०० घेऊन ठेवलेत. नी जे पी पावर ७ च्या भावाने आठ दहा हजार गोळा केलेत, हडफक, रिलायन्स, नी आयच्याआयचीआय मध्ये प्रोफीट असला तरी अपेक्षीत परतावा नाही. सूझलोन ४ ला घेऊन ८ ला फूकल्या गेले नाहीतर आज सूझलोन चा मालक असतो. (खी खी, विनोद हं)
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 02/01/2024 - 06:48 नवीन
चांगली चर्चा! म्या स्वयंपाक घरातील पामराने,रचनाताई रानडे यांना गुरू करतं, महिन्याची सिप ,वर्षात दोन लमसम म्युच्युअल फंड करायचं व्रत घेतलं आहे.तेव्हा समस्त गृहिणी भगिनींनी या धाग्यातून बोध घेत, उन्नती करावी असं आवाहन करीत खाली बसते!
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 02/02/2024 - 07:11 नवीन
सुझलॉन वर्षभरात थोडा थोडा करून सरासरी १४ वर घेतला होता, मध्यंतरी ३० वर थोडा विकला होता, आज अजून ३८ वर घ्यावा असा विचार सुरु आहे. दसरा-दिवाळीपर्यंत पन्नाशी पार करेल का?
हा धागा काढला तेव्हा ३८ वर असलेल्या सुझलॉनने आज पन्नाशी पार केलीय! https://www.google.com/finance/quote/SUZLON:NSE
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 02/02/2024 - 07:55 नवीन
यावर सध्या माझे लक्ष आहे १. एच डी एफ सी आणि रिलायन्स ईंडस्ट्री हे नेहमीच मार्केट लीडर राहीले आहेत. हे २ शेअर्स मार्केट वरखाली नेत असतात. सध्या एच डी एफ सी बँक आणि होम लोन्स च्या विलिनीकरणामुळे नेट प्रॉफिट कमी दिसत आहे म्हणुन शेअर ची किम्मत घसरली आहे असे तज्ञ सांगताहेत. पण एन पी ए वगैरे फंडामेंटल मजबूत असल्याने काळजी नको. नेस्ले १:१० स्प्लिट झाला आहे म्हणुन घ्यायचा विचार आहे. सहसा कोणताही शेअर स्प्लिट झाला की बेंचमार्क बदलतो आणि नंतर किंमत पुन्हा वाढायला लागते असा अनुभव आहे. २. पॉवर सेक्टर तसाही जोमात असतो पण सुझलॉन कमी पैशात जास्त युनीट्स मिळतात (टाटा पॉवर वगैरे पेक्षा) ३. बँकांमध्ये स्वस्त आणि मस्त सेंट्रल बँक मस्त धावतोय (सध्या रुपये ६० च्या आसपास) हजारेक घ्यायला हवेत थोडे थोडे करुन ४.पैसालो नावाचा एक शेअर आहे(बहुतेक एन बी एफ सी आहे). लोकसत्ता मध्ये दर सोमवारी एक शेअर्स सुचवतात , त्यात होता. सध्या रु.१२५ . एक महिन्यात ३०% /६ महिन्यात ६०% /९ महिन्यात ९०% परतावा दिलाय. ५. पटेल इंजिनीयरिंग हा सुद्धा मस्त धावतोय. सध्या रु. ७० १ महिन्या १२%/ ३ महिन्यात ४४% /६ महिन्यात ५२ % परतावा ६. हॅपिएस्ट माईंड काहीतरी करा हो ह्याला. कंपनी चांगली आहे. मी एक अ‍ॅव्हरेज धरुन बसलोय. पण १००० च्या वर जातच नाहीये. कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 02/02/2024 - 17:28 नवीन
अरेच्चा! सेंट्रल बँकेकडे कसे लक्ष गेले नाही! हा स्टॉक तर सातत्याने वाढत आहे! https://www.google.com/finance/quote/CENTRALBK:NSE या अणि इतर स्टॉक्सचा थोडा अभ्यास करून विचार करेन.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/02/2024 - 15:55 नवीन
हवशे नवशे आणि गवशे चढत्या बाजारात भरपूर पाहायला मिळतात. बाजार उतरू लागला हे सर्व गायब होतात असे मी बाजाराच्या तीन आवर्तनात पाहिले आहे. तेंव्हा आजच्या चढत्या बाजारात नफा केला म्हणून खूष होणारे अनेक लोक बाजार खाली आला कि दृष्टीआड होतील हेही माहिती आहे माझा पहिला अनुभव नजर लागण्यासारखा आहे. पॅन्टलूनचे समभाग (१९९३ च्या आसपास) १० रुपयाला at par घेतलेले शेवटी त्यावर मिळणाऱ्या बोनस समभागासकट (२००३) विकले असता नक्त नफा २ लाख ३७ हजार झाला होता. हा पैसा माझ्या सर्वोच्च न्यायालयातील लढाईसाठी कामास आला होता. यानंतर २००६ मध्ये लष्करातून निवृत्त झाल्यावर आलेले भविष्य निर्वाह निधी चे पैसे साफ बुडाले असे गृहीत धर ( तुला दोन वेळच्या जेवणाची कधीही ददात पडणार नाही हि हमी देऊन) असे पत्नीला सांगून मी बाजारात गुंतवले. म्हणून असा अनुभव परत येणार नाही हे १०० % सत्य आहे तेंव्हा पासून बाजारात अतिरिक्त पैसे गुंतवत आलो आहे. साधारण १४-१५ % वार्षिक या दराने मला नफा मिळाला आहे. यात मी संपूर्ण समाधानी आहे. आता या गुंतवणुकीवर आयुष्यभर बसून खाता येईल अशी स्थिती आहे. हे सर्व पैसे केवळ गुंतवणूकीतुन मिळालेले आहेत. यात सट्टा ट्रेडिंग ऑप्शन्स इ कधीही केले नाही. माझे अनेक समभाग गेल्या एक वर्षात १०० % नि वाढलेले आहेत( हि सूज आहे असे माझे मत आहे). त्यातील काही समभाग फार उच्चि वर असल्याने मी अर्धे विकले आहेत. मी कोणत्याही गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्याचा विपरीत वागत आलो आहे. माझ्या खात्यात एकंदर १४० वेगवेगळ्या कंपन्यांचे समभाग आहेत. यात दारू आणि सिगरेट विकणाऱ्या कंपन्या नाहीत. एवढ्या समभागांवर लक्ष ठेवता येत नाही हा गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला मी साफ धुडकावून लावतो. आपण आपली क्षमता पाहावी. बहुसंख्य गुंतवणूक सल्लागार हे झापडबंद सल्ला देत असतात असे मी बऱ्याच वेळेस सहज सिद्ध करून दाखवलेले आहे. मी कोणालाही कसलाही सल्ला देत नाही. आणि जवळच्या लोकांचा सल्ला अमलात आणल्याने केवळ नुकसानच झाले असे लक्षात आल्यावर कुणाचाही सल्ला अमलात आणत नाही.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Fri, 02/02/2024 - 17:37 नवीन
हवशे नवशे आणि गवशे चढत्या बाजारात भरपूर पाहायला मिळतात. बाजार उतरू लागला हे सर्व गायब होतात
--- मतभिन्नतेच्या आदरासहित: एखादा विशिष्ट स्टॉक म्हणजे काही आपली लग्नाची बायको* नाही. नांदते आहे तोपर्यंत नांदावायची, नाहीतर... एकूणच बाजार म्हणजे आपले कार्यक्षेत्र; कधी वर कधी खाली होतंच असते, ते सोडून कसे चालेल? हा ट्रेडरचा दृष्टिकोन आहे. अर्थातच गुंतवणूकदाराचा दृष्टिकोन भिन्न असतो याची कल्पना आहे. --- * मी पुरुषाच्या दृष्टिकोनातून असे लिहीत आहे. एखादी स्त्री काय लिहील याची कल्पना नाही.
  • Log in or register to post comments
अ
अतरंगी Fri, 02/09/2024 - 05:33 नवीन
साधारण १४-१५ % वार्षिक या दराने मला नफा मिळाला आहे >>> हे लिहिल्याबद्दल धन्यवाद. सोशल मिडईयावर शेअर्स बद्दल लिहिणार्‍या अनेक गुंतवणूकदारांना मी त्यांना मिळालेल्या CAGR विशयी विचारले. कोणालाही कधीच हे आकडे सांगता आले नाही.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 02/03/2024 - 03:41 नवीन
रचनाने बजेटनुसार पर्यटन, सौरऊर्जा, डिफेन्स,रेल्वे विभागातले stock सांगितले आहेत.यूट्यूब चानैलचा comment विभागही बघा अजून stock समजतील. https://youtu.be/zYftky9E7yE?si=BCb_vao1o3gAE33J CA Rachana Ranade(Marathi)असा तिचा व्हाटसपवर चानैल आहे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 02/08/2024 - 15:37 नवीन
आज निफ्टी २१२ व बँकनिफ्टी ८०४ अंशांनी खाली आले आहेत. उद्या आठवड्याचा शेवटच्या दिवशी अजून १०० व २०० अंशांनी खाली येतील का? --- रिझर्व्ह बँक गव्हर्नर दास - "सगळ्या शुल्कांसह कर्जाच्या संपूर्ण किंमतीबद्दल कर्जदारांना माहिती देणे बँकांना बंधनकारक होणार". हे एक समजले. गव्हर्नर अजून काय म्हणाले ते एखाद्या मिपाखराने सोप्या भाषेत समजावून सांगावं ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 04/29/2024 - 16:15 नवीन
मार्चमध्ये चाळीशीच्या खाली असलेला बँकनिफ्टी काळ अट्ठेचाळीशीवर गेला, येत्या मार्च-जूनपर्यंत पन्नाशी पार करेल का?
बँकांच्या चढत्या आलेखामुळे आज बँकनिफ्टी पन्नाशीच्या घरात गेलाय! बातमी बँकनिफ्टी निफ्टी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा