विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-२०२३
विश्वचषकाचा खरा रोमांच आजपासून सुरु होत आहे. रोहीटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाशी आज भारतीय प्रमाण वेळीस भिडली.ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ वर कोसळला आणि भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. पण ०२ धावांवर आपण ०३ विकेट्स गमावल्यावर भारतीय संघाच्या नावाने बोटे मोडली पण पुढे कोहली आणि के.एल.रावल्याने डाव सांभाळलाच नाही तर विजयाच्या दिशेने संघाला घेवून निघाले आहेत. ३३ षटकात १३९ धावांवर ०३ बाद ही संख्या आहे. संघ विजयी होईल त्यासाठी शुभेच्छा.
वेळापत्रक संपादक धाग्यात टाकतील आणि मिपाकर रनींग कॉमेंट्री करीत धाग्याला क्रिकेट विश्वविजेता होईपर्यंत धावता ठेवतील अशी अपेक्षा.
गुणतालिका अपडेट दि. १३-११-२०२३
| Teams | Mat | Won | Lost | Tied | NR | Pts | NRR |
|---|---|---|---|---|---|---|---|
| India (Q) | 9 | 9 | 0 | 0 | 0 | 18 | 2.57 |
| South Africa (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 1.261 |
| Australia (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 0.841 |
| New Zealand (Q) | 9 | 5 | 4 | 0 | 0 | 10 | 0.743 |
| Pakistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.199 |
| Afghanistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.336 |
| England (E) | 9 | 3 | 6 | 0 | 0 | 6 | -0.572 |
| Bangladesh (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.087 |
| Sri Lanka (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.419 |
| Netherlands (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.825 |
🗣 चर्चा
(151)
प
प्रचेतस
Sun, 10/29/2023 - 12:22
नवीन
खेळपट्टी खूपच खराब आहे, दोनशे धावाही आव्हानात्मक ठरतील असे दिसते.
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 10/29/2023 - 12:33
नवीन
२०५-२१० होतील. पण आपले बॉलर्स वचपा काढतील. दीडशेच्या आत इंग्लंड घरात. खेळपट्टी अशीच असणार त्यांना पण.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/29/2023 - 12:35
नवीन
२४० विनिंग स्कोअर होईल असा अंदाज
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/29/2023 - 12:37
नवीन
पडली विकेट. आता अवघड हे.. २५० झाले तरी पुष्कळ आहेत आता.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 10/29/2023 - 15:31
नवीन
आपले अंदाज योग्य ठरत आहेत. स्कोरचा अंदाज दहानेच चुकला आणि बॉलर्स वचपा काढतील हा अगदी अचूक ठरला.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/29/2023 - 15:35
नवीन
अगदी. पिच लैच खराब झालंय,
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 10/29/2023 - 15:43
नवीन
हो. अर्थात याबद्दल काही नशिबाचा भाग मानण्याची गरज नाही. इंग्लंडने पहिली बॅटिंग घेतली नाही. त्यांना चॉईस होता. आपल्याला देखील काही प्रमाणात तो फटका बसलाय.
आपल्या बॉलर्सना श्रेय आहेच.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sun, 10/29/2023 - 16:21
नवीन
Man of the match रोहित होईल बहूतेक.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/29/2023 - 12:36
नवीन
शेवटच्या धा ओव्हर्समधे ८० तरी धावा व्हाव्यात.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 10/29/2023 - 14:48
नवीन
इंग्लंड ३३/३(८)
आता स्टोक जसा आऊट झाला, त्यावरून इंग्लंड कदाचित २०० पर्यंत जाऊ शकणार नाही.
- Log in or register to post comments
य
योगेश कोलेश्वर
Mon, 10/30/2023 - 05:57
नवीन
इंडिया जितला
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/31/2023 - 05:39
नवीन
तर, अशा त-हेने श्रीलंकेच्या 241/10 (49.3 Overs) या धावसंखेचा पाठलाग करीत अफगान संघाने (45.2 Overs) मधे सात गडी राखून निर्वीवाद धडाकेबाज विजय मिळवला.
गुणतालिकेत इंडिया १२ गुण मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे तर, दुस-या क्रमांकावर १० गुण घेऊन द. अफ्रिका रनरेटाने अग्रक्रमावर आहे. न्युझिलंड आष्ट्रेलिया अनुक्रमे तीन आणि चार क्रमांकावर आहेत. मला वाटतं, या चार संघात अजून काही क्रमांक बदलतील का ते येत्या राहीलेल्या प्रत्येकाच्या तीन सामन्यांमधील निकालांनी कळेलच. काळात कळेलच.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
B
Bhakti
गुरुवार, 11/02/2023 - 15:14
नवीन
भारताचा ३३३ स्कोर पाहून म्हटलं होतं श्रीलंका ३३ रन पण करणार नाही, आणि ते खरं होईल बहूतेक ;)
- Log in or register to post comments
य
योगेश कोलेश्वर
गुरुवार, 11/02/2023 - 20:43
नवीन
श्रीलंका 55 वर ओल आऊट..फारच एक तर्फी मॅच झाला..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/05/2023 - 13:40
नवीन
आज भारत आणि द. अफ्रिका यांच्यातील सामन्यातील पहिल्या पन्नास षटकातला खेळ संपला आहे. भारताने नाणेफेक जिंकून पन्नास षटकात ३२६ धावा ०५ गड्यांच्या मोबदल्यात केल्या आहेत. आजच्या सामन्याचं वैशिष्ट्ये म्हणजे विराट कोहलीचं शतक आणि सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी झाली. विराटच्या १०१ संयमी फलंदाजी. सोबत रोहीटच्या वेगवान ४० धावा, गील, अय्यर, राहुल आणि शेवटी जडेजाच्या सोबत आणि गतीमुळे ३२६ धावांवर भारताची धावसंख्या पोहचली. पीच स्लो असले आणि वाढदिवसाचं गीफ्ट चांगलं असलं तरी, स्वार्थी फलंदाजीच आज पुन्हा दिसली,असे वाटून गेले. मैदानावर तग धरणे आणि संयमाने फलंदाजी महत्वाची असली तरी. मागील काही सामन्यात जाणवावा अशी ती व्यक्तीगत फलंदाजी दिसत आहे, असे मला वाटते. अर्थात, विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि शतकी फलंदाजीबद्दलही अभिनंदन.
अफ्रिकेला आपले गोलंदाज कसे गुंडाळतात त्यावर विजय अवलंबून आहे. अफ्रिकेची फलंदाजी बहरलेली आहे. विश्वचषक क्रिकेट २०२३ मधे डीकॉक फलंदाजीत अग्रक्रमावर आहे, त्यामुळे भारताचा विजय इतका सोपा नाही असे वाटते. देखेंगे आगे आगे होता है क्या.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 11/05/2023 - 13:44
नवीन
अहो मुख्य म्हणजे टिकला, विकेट घालवली नाही आणि त्यामुळे दुसऱ्या बाजूने श्रेयस, सूर्या आणि जडेजाला मुक्तपणे फलंदाजी करता आली, ह्या पिचवर हा विनिंग स्कोअर आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/05/2023 - 13:56
नवीन
आपलं म्हणनं खरं असलं तरी संघाच्या चाळीस धावा त्याच्यामुळे कमी झाल्या आहेत असे वाटते. एकही षटकार नाही आजच्या शतकी १०१ धावांसाठी १२१ चेंडु घेतले हे अजिबात झेपलं नाही.
>>> ह्या पिचवर हा विनिंग स्कोअर आहे.
अफ्रिकेची फलंदाजीही भक्कम आहे. बुमरा-बीमरा, शमी, सिराज, कुलदीप कसे चालतात त्यावर आपला विजय अवलंबून आहे. अधुन-मधुन धाग्यावर येत राहु. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 11/05/2023 - 14:02
नवीन
आफ्रिका दबावाखाली ढेपाळते हे तर आपल्याला माहितंच आहे, तेव्हा आजचा दिवस आपलाच.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sun, 11/05/2023 - 15:06
नवीन
अंपायर का विनाकारण व्हिलनसारखे वागत आहेत ;)
१०० च्या आत गुंडाळतो वाटतं अफ्रिकेला.आपले बोलर कमालीची गोलंदाजी करत आहेत.
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 11/05/2023 - 15:21
नवीन
भारताने इतर सर्व टीम्सची शोचनीय अवस्था करून टाकली.
आणखी एक गेला.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/06/2023 - 05:02
नवीन
आपल्या संघाचा खेळ पाहता आता विश्वचषक २०२३ दूर नाही असे वाटायला लागले आहे. काल अफ्रिकेचीही गोलंदाजांनी वाताहात केली. फलंदाजांची उत्तम सुरुवात, मधल्या फळीची जवाबदारीची फलंदाजी आणि मग गोलंदाजीत कमाल होऊन जाते आणि विजय सहज दृष्टीक्षेपास येतो. अर्थात, एखाद्या दिवशी ही सर्व एखाद्या संघाविरुद्ध मोडतोड व्हायला वेळ लागत नाही, अर्थात एक भारतीय क्रिकेट प्रेमी म्हणून असे होऊ नये इतकीच अपेक्षा आपण करुया.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/07/2023 - 06:10
नवीन
काल बांगलादेश आणि श्रीलंकेच्या सामन्यात विश्वचषकीय वेगळ्याच घटनेची नोंद झाली. खेळ भावना आणि नियमांच्या बाबती कोणी नियमांच्या बाजूने असेल तर कोणी खेळभावनेच्या बाजूने. बांग्डाने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकुन प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेची टीम काय तशीही नीट खेळत नै ये. पंचवीसाव्या षटकाट समरविक्रमाने शकीब अल हसनला एक चौकार मारला आनि त्यानंतरच्याच चेंडूवर शकीबच्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यानम्तर अँजेलो मॅथ्यूज मैदानात आला होता मॅथ्यूजच्या हेल्मटची पट्टी तुटली होती तो दुस-या हेल्मेटची वाट पाहात थांबला. बांग्लाच्या कर्णधार शकीबने उशिर झाल्यामुळे टाइम-आउटच्या नियमांचा आधार घेत पंच एरास्मूस आणि रीचर्ड इलिंगवर्थन यांच्याकडे दाद मागितली त्यांनीही त्याबद्दल मॅथ्यूजला विचारणा केली, पण त्याला बाद दिले.
एकही चेंडू न खेळता मॅथ्यूज तंबूत परतला. श्रीलंकेने ४९.३ षटकात २७९ धावा केल्या प्रत्युतरात बांगलाने ४१.१ षटकात ७ बाद २८२ धावा करीत विजय संपादन केला आणि श्रीलंकेचं आव्हानही संपूष्टात आणलं.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 11/07/2023 - 11:27
नवीन
बांगला देश ही खेळी रडकी खेळले आहेत.
आता अफगाणीस्तान ने ऑस्ट्रेलिया ला हरवले आणि न्यूझिलंड ने श्रीलंकेला हरवले तर आपले आशाळभूत शेजारी गप्प बसु शकतील
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Tue, 11/07/2023 - 11:29
नवीन
पाकडे हरावेत यासाठी रविवारी इंग्लंडला पाठिंबा द्यायचीही तयारी आहे.
- Log in or register to post comments
र
राघव
Tue, 11/07/2023 - 12:39
नवीन
भारतानं सर्व सामने जिंकल्यामुळे आणि २-३ अगदीच एकतर्फी जिंकल्यामुळे सध्या मीम्स ना ऊत आला आहे! कल्पनाभराऱ्या जोरदार चालू आहेत! खास करून वेलकम सिनेमातील सिक्वेन्स चा वापर करून तयार केलेले २ मीम्स अगदी धुमाकूळ घालताहेत! :-)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/07/2023 - 17:03
नवीन
अफगाणिस्तान आणि ऑष्ट्रेलिया सामन्यात अफगाणिस्तान प्रथम फलंदाजी करीत २९२ धावा केल्या प्रत्युतरात ऑष्ट्रेलियाचा संघ गडगडला होता पण मॅक्सवेल तीन जीवदानाच्या बळावर १२६ धावांवर खेळतोय २१६ धावांवर ७ बाद आहेत. मॅक्सवेल सामना जिंकून देईल अशी परिस्थिती आहे, ७३ मधे ७६ धावा हव्या आहेत, सामन्याचा नूर थोड्याच वेळात कळेल पण मॅक्सवेलने गेलेला सामना ओढला अशी तरी आत्ता स्थिती आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
B
Bhakti
Tue, 11/07/2023 - 17:48
नवीन
मॅक्सवेल शो!ब्राव्हो!
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 11/07/2023 - 17:48
नवीन
ग्लेन मॅक्सवेल...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/07/2023 - 17:57
नवीन
मॅक्सवेल २०१ धावा. अद्भूत खेळला. ९१ धावांवर ७ विकेट्स पडलेल्या होत्या आणि १८ षटक चालू होतं तेव्हापासून तो खेळत होता. अद्भूत फटकेबाजी केली. पाय आखडून गेलेला होता. तीन झेल सोडले अफगाण्यांनी एक तर हातातला सोड्ला त्या मूझीबने. आणि अफगाणि संघाची गोलंदाजीच्या मर्यादा उघड पडल्या. बरं असं म्हणावं तर, सुरुवातीला विकेट्स काढल्या त्यांनी. पण, त्यानंतर मॅक्सवेल पुढे हतबल झाले सर्व गोलंदाजी नंतर सुमार झाली आणि क्षेत्ररक्षणही सुमार झालं.
अफगानी जिंकावे वाटत होते. :/ असो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 11/08/2023 - 01:21
नवीन
अफगाणांनी सामना गमावला, जखमी मॅक्सवेल नुसता जागेववर उभं राहून टोलवत होता. अफगाण अगदी केविलवाणे झाले होते. झेल तर सोडलेच अफगाणांनी पण स्ट्रॅटेजीमध्ये कमी पडले, मोहम्मद नबीला खूप उशिरा बॉलिंगला आणले, फिल्डिंग चेंजेस, बॉलिंग चेंजेस त्यांना नीट जमले नाही.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 11/08/2023 - 01:39
नवीन
अफगाणीस्तानकडे स्पिन अॅटॅक असता किंवा त्यानी ऑफस्टंपबाहेर गोलंदाजी केली असती तर बराच फरक पडता.
पण हे आपण मैदानाबाहेर उभे राहून बोलतोय. काही म्हणा अफगाणी पोरांची जिगर मानायला हवी. नवे आहेत. डावपेचात जर्रा कमी पडले इतकेच.
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 11/08/2023 - 05:43
नवीन
भारत पाक उपांत्य फेरीत परत भिडणार की काय?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 11/13/2023 - 05:35
नवीन
इंडियाचा फार्म बघता आपण न्युझीलंडला हरवतो. जिंकण्याची शक्यता. ८५ -१५ अशी आहे. अफ्रिका ऑष्ट्रेलियात ऑष्ट्रेलिया फार्मात आलाय त्यामुळे त्यांची जिंकण्याची शक्यता ६०-४० अशी वाटते.
भारतीय संघाच्या उपांत्यफेरीच्या सामन्याला अंतिम फेरीत पोहचण्यासाठी शुभेच्छा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Mon, 11/13/2023 - 05:39
नवीन
फायनल भारत दक्षिण आफ्रिका व्हावी असे वाटते. ऑस्ट्रेलियन एकदम त्वेषाने खेळतात. मात्र सध्याचा आपला फॉर्म बघता कोणत्याही संघाला आपण हरवू शकतो ह्याची खात्री वाटते.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Mon, 11/13/2023 - 05:59
नवीन
यंदा तरी ते बाद फेरीत चांगला खेळ करतील का?
ते जेव्हा चांगला खेळ खेळतात, तेव्हा त्यांना नशीब दगा देते. आणि नशीब चांगले असेल तर ते ऐनवेळी कच खातात.
- Log in or register to post comments
ब
बाबुराव
Wed, 11/15/2023 - 04:18
नवीन
भारत विश्वविजेता होईल. शुभेच्छा.
ड्यूटीमुळे धाग्यावर येऊ शकलो नाही.
सर्वांचे आभारी आसे.
दिवाळीच्या सगल्यांना शुभेच्छा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 11/15/2023 - 10:51
नवीन
नाणेफेक जिंकून उत्तम सुरुवात झाली आहे, ३५० च्या वर धावा होतील असा अंदाज.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 11/15/2023 - 11:33
नवीन
मग एकीकडे बॉल ओला होऊन फिरकी गोलंदाजी अवघड होणार, दुसरीकडे बॉल व्यवस्थित बॅट वर न येणं आणि सीमापार जाताना हळू जाणं हे प्रकार झाल्याने ३५० कदाचित चांगले टार्गेट असेल. ३०० पेक्षा कमी म्हणजे खूपच कमी होईल.
(मॅक्सवेलचा चमत्कार झाला नसता तर ऑस्ट्रेलियाला देखील येथे पाठलाग अवघड गेला होता)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 11/15/2023 - 11:47
नवीन
वानखेडेवर पाठलाग करताना पहिल्या 15/20 ,ओव्हर्स खूपच अवघड जाणार किवींना. बॉल वेड्यासारखा मूव्ह होत असतो.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 11/15/2023 - 13:38
नवीन
फक्त चमत्कार झाला तरच किवी जिंकू शकतील
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Wed, 11/15/2023 - 18:53
नवीन
३२ ओवर्स मध्ये २२०/२ असताना न्यूझीलंडला बऱ्यापैकी संधी होती. दव न पडल्याने आणि चेंडू हवेत मूव्ह होणं बंद झाल्याने 18 षटकात 180 असं अवघड पण प्रयत्न करता येईल असं टार्गेट होतं. पण शमीने दोन विकेट घेतल्या आणि तो प्रयत्न अवघड होईल, याची तजवीज केली. पुढे फिलिप्स आऊट झाला आणि सगळं संपलं.
70-80 च्या दशकात वेस्टइंडीजच्या फास्ट बॉलर चौकडीचा जो दरारा होता तसा या वर्ल्डकप मध्ये बुमरा, शमी आणि सिराज या भारतीय तिकडीचा आहे.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 11/16/2023 - 13:52
नवीन
दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली, पण २१२ असा सामान्य स्कोर करता आला. नेहमीप्रमाणे चोकर्स हे बिरूद सार्थ करतात की काय आता?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/17/2023 - 05:04
नवीन
उपांत्यफेरीचा पहिला सामना भारत आणि न्युझीलंड हाही रंगतदार तर चोकर्स म्हणून प्रसिद्द असलेले अफ्रिका आणि ऑष्ट्रेलिया यांचाही सामना छानच झाला. न्युझीलंडबरोबर खेळतांना भारताने टॉस जिंकून फलंदाजी घेतली इथेच आपल्या विजयाने पाया रचायला सुरुवात केली. ठरल्याप्रमाणे सुरुवात रोहीटने धुवाधार सुरुवात केली. २९ चेंडुत ४७ धावा, शुभमन ६५ मधे ७९, कोहल्याचे ११३ मधे ११७ ( चालु दे तुझं टुकुटुकु ) श्रेयस तर जब्रा खेळला ७० मधे १०५ आणि के एल रावल्या २० मधे ३९ सगळेच चांगले खेळले पण अजून वीस तीस धावा वाढल्या असत्या जर कोहल्या शतकाजवळ आल्यावर टुकुटुकु नसता खेळला तर, ५० षटकात ३९७ चांगला स्कोर होता.
न्युझीलंड एक सज्जन आणि शिस्तीवाली टीम. पहिल्या दोन विकेट्स ३९ धावांवर गेल्या तेव्हा आपण रीलॅक्स झालेलो. पण २०० धावा झाल्या तरी विकेट्स पडेना देवाचा धावा करावा लागलेला. मैदानावरील प्रेक्षकांचा आणि आपला आवाज म्यूट झाला होता. तिसरी आणि चौथी विकेट पडली २२० धावांवर आणि मग पुढे 'शमीने' केलेली अफलातून गोलंदाजी त्याच्या सात विकेट्सने आपण फायनलला पोहचलो आपण निश्चिंत झालो. आपण जिंकल्याचा आनंद आहे, तसा न्युझीलंड हरल्याचे दु़;ख आहेच.
ऑष्ट्रेलिया आणि अफ्रिकेच्या सामन्यात सुरुवातीपासुनच फलंदाजी घेवून अफ्रिकेने माना टाकायला सुरुवात केली. चोकर्स म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या अफ्रिकेनं आपलं काम सार्थ केलं. 212/10 (49.4 Overs) हा काही सामना जिंकवणारा स्कोर नव्हता. पण, पुढे जिद्दीने अफ्रिकेने सामना खेचायचा प्रयत्न केला अजून दोन एक विकेट्स लवकर मिळवल्या असत्या तर कदाचित अफ्रिका जिंकलीही असती. क्रिकेट अनिच्छिताओ का खेल म्हणून प्रसिद्ध त्यामुले जर तर क्रिकेटमधे चालत नाही.
तर, २०२३ विश्वचषक क्रिकेट अंतिम सामना भारत आणि ऑष्ट्रेलियात रविवारी होतोय. मला तर, अफ्रिका न्युझीलंड आणि इतर संघापेक्षा भारतीयभारतीय संघ चोकर्स वाटतो, अजिबात विश्वासू टीम वाटत नाही. न्युझीलंडने आपला घसा कोरडा पाडला होता. आपला संघ लै भारी वगैरे मान्य तरीही भारतीय संघाला विजयी होण्यासाठी शुभेच्छा. रंगतदार सामना बघायला मिळावा.
एवढे बोलून उपांत्यफेरीचं मनोगत पूर्ण करतो.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 11/17/2023 - 05:10
नवीन
कोल्याचे हे स्वार्थी शतक होते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 11/17/2023 - 05:40
नवीन
मला अज्याबात सैन नै होऊ राहिला तो आता. :(
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ग
गवि
Fri, 11/17/2023 - 05:55
नवीन
शतक होण्याच्या जस्ट आगोदर आणि नंतर यातील त्याच्या फटकेबाजीतला फरक नेहमीच ढळढळीत असतो. त्याच्या टॅलेंटबद्दल कोणताच वाद नाही. पण आधी उल्लेख केल्याप्रमाणे चक दे इंडिया चित्रपटातल्या कोमल चौताला आणि प्रीती सबरवाल यांची आठवण होतेच. इथे सुदैवाने अटीतटीची वेळ नव्हती. एकेक बॉल तितकासा किंमती नव्हता. खरे तर कोणताच बॉल स्वस्त नसतो. पण असो.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Fri, 11/17/2023 - 08:38
नवीन
अय्यर मूळे ३५० चे ३९८ झाले. ३५० च्या आसपास चा स्कोअर त्यांनी आरामात केला असता.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sun, 11/19/2023 - 04:08
नवीन
यंदाचा भारतीय संघ एकदम परफेक्ट वाटते.शमी,जडेजा,सिराज आणि फलंदाजांची मोठी फळी.आजही ८०% पारडं आपलंच जड आहे फक्त २०% मनोवृत्ती नुसार ओस्ट्रेलियाचे फायनलचे रेकॉर्ड पाहून थोडं डामाडौल आहे . अर्थात यंदाची ओस्ट्रेलिया तो 'दरारक' संघ वाटतच नाही.
भारतीय संघाला विजयासाठी खुप खुप शुभेच्छा!!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/19/2023 - 04:34
नवीन
भारत आणि ऑष्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी तयार झाले आहेत. आपणही तयार झालेलो आहोत. दुपारी सामन्यादरम्यान अधुन-मधुन इकडे दळन टाकू. भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक विजेता २०२३ होण्यासाठी शुभेच्छा.
जुडेगा इंडिया तो जितेगा भारत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 11/19/2023 - 12:04
नवीन
तीनशे प्लस तरी धावा व्हाव्यात. आता रावल्या आणि जड्डू टीकून आहेत १७० -०४ in ३४. ४
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »