विश्वचषक क्रिकेट स्पर्धा-२०२३
विश्वचषकाचा खरा रोमांच आजपासून सुरु होत आहे. रोहीटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाशी आज भारतीय प्रमाण वेळीस भिडली.ऑस्ट्रेलियाचा संघ १९९ वर कोसळला आणि भारतीय संघ सहज जिंकेल असे वाटले होते. पण ०२ धावांवर आपण ०३ विकेट्स गमावल्यावर भारतीय संघाच्या नावाने बोटे मोडली पण पुढे कोहली आणि के.एल.रावल्याने डाव सांभाळलाच नाही तर विजयाच्या दिशेने संघाला घेवून निघाले आहेत. ३३ षटकात १३९ धावांवर ०३ बाद ही संख्या आहे. संघ विजयी होईल त्यासाठी शुभेच्छा.
वेळापत्रक संपादक धाग्यात टाकतील आणि मिपाकर रनींग कॉमेंट्री करीत धाग्याला क्रिकेट विश्वविजेता होईपर्यंत धावता ठेवतील अशी अपेक्षा.
गुणतालिका अपडेट दि. १३-११-२०२३
| Teams | Mat | Won | Lost | Tied | NR | Pts | NRR |
|---|---|---|---|---|---|---|---|
| India (Q) | 9 | 9 | 0 | 0 | 0 | 18 | 2.57 |
| South Africa (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 1.261 |
| Australia (Q) | 9 | 7 | 2 | 0 | 0 | 14 | 0.841 |
| New Zealand (Q) | 9 | 5 | 4 | 0 | 0 | 10 | 0.743 |
| Pakistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.199 |
| Afghanistan (E) | 9 | 4 | 5 | 0 | 0 | 8 | -0.336 |
| England (E) | 9 | 3 | 6 | 0 | 0 | 6 | -0.572 |
| Bangladesh (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.087 |
| Sri Lanka (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.419 |
| Netherlands (E) | 9 | 2 | 7 | 0 | 0 | 4 | -1.825 |
🗣 चर्चा
(151)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 06:58
नवीन
आफ्रिकेने काल इंग्लंडला धु धु धुतले. आफ्रिकेने पन्नास षटकात सात बाद ३९९ धावांचा डोंगर उभा केला आणि प्रत्युत्तरात इंग्लंड १७० धावात झोपले. आफ्रिकेच्या क्लासेनचं क्लास शतक पाहण्यासारखं होतं.
आज धरमशालात आपण न्युझीलंडला भिडू आज आपली खास परिक्षा आहे. इतक्या दिवस सोपे पेपर होते आज खरी परिक्षा असेल. आपला संघ सध्या फार्मात आहे. चार-पाचशे धावा काढू शकतो असे वाटत असते. ( खयाली पुलाव) त्यामुळे आज न्युझीलंडला आपण कसे धुतो आणि आपली गोलंदाजी चोपून चापून टाकतो त्यावर सर्गळं अवलंबून असेल. फलंदाजीत रोहीट, कोली, रावल्या बरे चालू राहीले. बुमरा, कुलदीप आणि जड्डू धावा कंट्रोल मधे देत आहे.
लग तो रहा है, की इंडिया जितेगा. अपनी तरफसे ६-४ अंदाज.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 12:36
नवीन
नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्विकारणा-या भारतीय संघाने सुरुवातीला दोन फलंदाज बाद (१९ /०२ ) केल्यावर जरा निवांत झालो होतो. पण मिचल ५० आणि रविन्द ५९ यांनी डाव सावरला. २७ षटका १३० धावा झाल्या आहेत.
हे दोघे असेच खेळले आणि टीकले तर ३०० च्या पुढे जातील असे वाटते. आणि आपल्याला नखं कुरतुडत देवाचा धावा देव काहीही मदत करीत नसला तरी, त्याचा धावा करावा लागेल असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 13:13
नवीन
तिसरा तर गेला आता तरी तीनशे पार करतील असे दिसतेय. किवीज मात्र खूपच सभ्य खेळाडू आहेत. मगाशी ओव्हरथ्रोचा रन होत असूनही परत फिरले,
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 12:52
नवीन
तिस-या पंचास,चेंडू जर सरळ स्टांपवर जातांना दिसत असेल आणि तो दांडी उड़वत असेल तर फलंदाज सरळ बाद दिला पाहिजे. आऊट साइड दी पीच, अंपायर डिसीजन... साला चांगल्या खेळाचं वाटोळं आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 13:14
नवीन
बाकी काही असो, धागालेखक मात्र धागा टाकून गायब झाले ते झालेच.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 13:17
नवीन
बुमराने एक झेल सोडला आणि सुमार क्षेत्ररक्षण आज बोंगाड्या बुमरा कडून बघायला मिळत आहे.
१८७ / ०३ ( ३५ Overs )
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 13:19
नवीन
तीन कॅच सोडले हो एकूण
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 13:28
नवीन
तिन्ही बुमराने ? अवघड आहे. विश्वचषकाचा दर्जाचा खेळ बघायला कधी मिळणार ?
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 14:02
नवीन
तिन्ही बुमराने नै हो, भारतीय संघाने मिळून
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 13:44
नवीन
मिचेलची जबरा फलंदाजी १०० नाबाद. भारी खेळतोय. २२२/ ०४ [ ४१ Overs₹]
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 10/22/2023 - 15:07
नवीन
टार्गेट फार अवघड नाही. फार सोपेही नाही.
होईल. भारतीय संघ जोमात आहे सध्या.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 10/22/2023 - 15:23
नवीन
पावणे तीनशे जास्त चांगले.
पण धर्मशाला सारख्या थंड ठिकाणी रात्रीची फलंदाजी कितपत चांगली होईल ते बघू..
- Log in or register to post comments
ग
गवि
Sun, 10/22/2023 - 15:27
नवीन
चार सहा चार सहा असे हाणत आहेत (तूर्त).
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 16:24
नवीन
रात्रीच्या धुक्यामुळे खेळ बंद पडल्याची घटना पहिल्यांदाच घडली असावी.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sun, 10/22/2023 - 16:52
नवीन
आता २३ ओवर्स झाल्या आहेत आणि ESPNcricinfo दोन्ही संघांना जिंकण्याची शक्यता ५०-५०% दाखवत आहे.
दर षटकामागे एकतरी ४-६ चालू असल्याने दबाव येत नाहीये, पण तिघेही चांगल्या सुरुवातीनंतर आऊट झालेत.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 17:30
नवीन
इंडिया १८२ वर ०४ आणि बत्तीस षटकं संपली आहेत. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 17:38
नवीन
कोहलीचे पन्नास धावा झाल्यानंतर एका उत्तम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कोहलीशेठने सुर्यकुमारचा धावबाद देऊन बळी घेतला.
भावा आता विजयाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी तुझी.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 17:46
नवीन
क्रिकेटमध्ये अशा गोष्टी होत असतात. संतनरची उत्तम फिल्डिंग. बाकी तुम्ही हल्ली बॅडमिंटन खेळता की नै?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 17:50
नवीन
२०१ वर ०५ आणि ओवर्स झाल्या ३६
८४ चेंडुत ७३ धावा.
>> बाकी तुम्ही हल्ली बॅडमिंटन खेळता की नै ?
आता बंद के बराबर. :(
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 17:56
नवीन
अजूनही जिंकू असे वाटते, कोलीला तर आता जिंकून देण्याशिवाय पर्याय नै. बाकी खेळत राहा भो तुम्ही अधूनमधून
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 18:04
नवीन
कोली है तो मुमकीन है. ६६ चेंडुर ५२ धावा हव्यात विजयासाठी.
कोहली ७० तर, जडू १६ धावांवर खेळत आहेत.
धावसंख्या २२३.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 18:09
नवीन
फिल्डिंग जबरदस्त करताहेत किवी.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 18:24
नवीन
अचानक लैच टुकूटुकू खेळायलेत
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 18:27
नवीन
खेळु दे....टुकूटुकू...मागं कोणी नै ये.
मागं बुमरा आहे.
२८ मधे २४ लागतात. चांगला सांभाळला डाव.
आणि विजयाच्या जवळ जडू आणि कोहली घेवून जात आहेत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 18:35
नवीन
अहो आता कोळीचं शतक होतं।की नै हाच मुद्दाय
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 10/22/2023 - 18:42
नवीन
गड आला पण सिंह गेला, शुरा ऑल
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 18:47
नवीन
>>> गड आला पण सिंह गेला
हम्म.
शुरा.
- दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/22/2023 - 18:46
नवीन
कोहली आणि जड़ू यांची अतिशय सूजबुझ की बारी. कोहलीचं शतक हुकलं. मोठा फटका मारण्याच्या नादात झेल गेला पण विजयाचं श्रेय कोहलीचं.
चला सामना मस्त झाला. भारत जिंकला तरी मनं न्यूझीलंडनेही जिंकली. न्यूझीलंडने मस्त झुंजवलं. शिस्तबद्ध संघ, उत्तम गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि उत्तम संघ.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ब
बाबुराव
Mon, 10/23/2023 - 04:26
नवीन
वर्ल्ड कप क्रिकेट धागा काढ़लेला परंतु कामामुळे सहभागी
होता येत नाही. माफ़ी असावी.धागा काढून टाकला तरी चालेल.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Mon, 10/23/2023 - 05:41
नवीन
मला एक सांगा कोहली कोण कोणते रेकोर्ड यंदाच्या वल्डकपला मोडू शकतो? खुपच फिट आहे तो.ब्राव्हो!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/23/2023 - 13:16
नवीन
अशी त्याची फलंदाजी पाहतांना वाटते. जुने कोणते रेकॉर्ड मोडेल हे इतकं करेक्ट माहिती नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/23/2023 - 13:15
नवीन
पाक १८९ वर ०४ बाद. ४० ओवर्स.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/23/2023 - 15:14
नवीन
पाकच्या २८३ ला अफगानने चांगली सुरुवात केलीय.
०७ षटकात ३८ धावा. आजचा धक्कादाय विजय होतो का ते बघावे लागेल.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/23/2023 - 16:13
नवीन
पाकिस्तान हरतंय वाटतं आज. १२८ वर ०
वीस षटकं संपली आहेत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Mon, 10/23/2023 - 16:36
नवीन
असाच एक दोन धक्कादायक निकाल आणि एक दोन लकी बहिष्कार यांच्या बळावर केनियाचा संघ २००३ वर्ल्डकप मध्ये उपांत्य फेरीत पोहचला होता!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 10/23/2023 - 18:34
नवीन
अफगानी संघाने पाकिस्तानचा गड़ी राखून धुव्वा उडवला. जब्राट सामना.
विश्वचषकातला धक्का देणारा सामना. अफगानी संघाने चिवट फलंदाजी करुन विजय मिळवला
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 10/23/2023 - 18:38
नवीन
बीसीसीआय चा संघ ( ज्याला अनअधिकृत रित्या भारतीय संघ संबोधलं जातं) सर्व मॅच जिंकलाय वगैरे असं कलीग्स सोबत जेवायला बसल्यावर त्यांच्या क्रिकेटचा चर्चातून कळलंय. नी ते फार खुश होत होते. असे अनेक लोक असतील. मुळात भारतीय संघं सेमीफायनल पर्यंत पोहोचला नाही तर किती कोटींचं नूकसान होईल ह्याचा अंदाज लावनं अनेकांच्या कुवतीबाहेर आहे, भारतीय संघं हरनं हे आर्थीकदृष्ट्या स्पर्धेला परवडनारं नाहीये, त्यामुळे भारतीय संघं सुरवातीच्या मॅच जिंकनारच हे गृहीत धरूनच चालायला हवं, जर बाहेर पडला तर ही स्पर्धा आर्थीकदृष्ट्या तिथेच संपेल ना मैदानात कूत्रं येईल ना जाहीरातदार ढूंकून पाहतील. क्रिकेट हा खेळ आहे असं समजनार्यांनी नोकरीच करावी, धंद्यात काही यश येत नाही लेकाहो तुम्हाला. :)
भारतीय संघं जिंकतोय हे पाहून आनंदं वाटनार्यांबद्दल मला आश्चर्य नी कौतूक वाटतंय. :)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/24/2023 - 08:13
नवीन
क्रिकेटचे आम्ही लोक पंख्या कल्बात मोडतो. कधी काळी क्रिकेटच्या सामना फिक्सींगच्या काळातल्या घटना ऐकून निराश झालो होतो. आपण जीवतोडून त्या खेळाचा आनंद घेतो आणि आपल्या भावनांचा चुराडा झालेला पाहुन क्रिकेट पाहु वाटत नव्हते, कितीतरी दिवस कोण खेळाडु येतो कोण खेळतो हे बघत पण नव्हतो. पण, पुढे आयपीएलच्या सामन्याने ती मरगळ झटकली. आता ती पूर्वीची उत्कंठा नसली तरी क्रिकेट वेड मात्र कमी झालं नाही.
क्रिकेट, क्रिकेटचं राजकारण, खेळाडुंचं राजकारण, निवड समित्या, त्याचबरोबर येणारा सट्टा बाजार, आर्थिक उलाढाली, भारतीय क्रिकेटचा धंदेवाईकपणा हा सगळं क्रिकेटमधे असेलही पण खेळ म्हटला की त्यातली हारजीत उत्कंठा असते तेव्हा क्रिकेटचं जे काय असेल ते मान्य करुनही क्रिकेटचा आनंद सोडता येत नाही.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/24/2023 - 11:08
नवीन
डेलीसोपचं ही असंच असतं, सर्व काही आपल्याला माहीत असते पण तरी ऊत्कंठा असते. कारण एक्टर्स ची एक्टींग, स्क्रिप्ट रायटरचा जबरजस्त स्क्रिप्ट ह्या सर्वाला आपण भूलतो. :)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 10/24/2023 - 14:07
नवीन
सहमत आहे...
अजून एक गोष्ट म्हणजे, कुणाला तरी एकाला हीरो बनवायचे..
सध्या विराट हीरो आहे.
कुठल्याही संघाची मॅच असो... समालोचक ,विराट बद्दल काही ना काही बोलणारच...
आजची मॅच, बांगलादेश आणि साऊथ आफ्रिका, यांच्यात असून देखिल, विराट बद्दल बोलत होतेच..
तेच कालच्या मॅच बाबतीत...
उद्या जर, टिंबक्टू आणि मालदीव, यांच्यात मॅच झाली तरी, येन केन प्रकारेण, विराटचे नाव घेतील...
व्यक्ती पूजा भारताला नेहमीच घातक ठरत आली आहे...
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Tue, 10/24/2023 - 14:49
नवीन
एकंदरीत भारतीयांना ऐनकेन प्रकारे क्रिकेटशी बांधुनच ठेवतात लेकाचे. मुळात भारतीय संघ जिंकवायचा तर कुणाला तरी चांगलॅ खेळावंच लागनार. (खेळवावंच लागनार) मग भारतीय खुश होनार नी विराट विराट करत सुटनार. भारतीय क्रिकेट फॅन्स फारच भोळे असतात.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 10/24/2023 - 15:04
नवीन
सहमत आहे...
आधी कपिलदेवचा उदो केला मग सचिन आणि आता विराट...
शिवाय, उदारमतवादी क्रिकेटर असेल तर मग सोन्याहून पिवळे... मग रिटायरमेंट नंतर, समालोचक म्हणुन वर्णी लागायची शक्यता जास्त..
बेदी पण कमी न्हवता... ड्रॉ होत असलेली मॅच, पाकिस्तानला जिंकायला दिली...
आधी मी पण ह्याला भुललो होतो... सध्या दूरच राहतो... गुंतत नाही...
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/24/2023 - 08:25
नवीन
भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार, सत्तरच्या दशकात फ़िरकी गोलंदाजीचा धुरा सांभाळणारा महान फ़िरकीपटू बिशन सिंग बेदी यांचं काल ७७ व्या वर्षी निधन झालं. बिशन सिंग बेदी यांनी १९६७ ते १९७९ या काळात ६७ कसोटी सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. आपल्या १३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्यांनी २६६ विकेट्स घेतल्या. त्याशिवाय तेव्हा नुकत्याच सुरू झालेल्या एकदिवसीय क्रिकेटमध्येही त्यांच्या नावावर सात विकेट्स आहेत.भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डशी त्यांचे कायम मतभेद राहीले आपली ठाम मतं मांडत राहीले. अनेक नवोदित खेळाडु त्यांनी तयार केले.
इरापल्ली प्रसन्ना, बी. एस. चंद्रशेखर आणि एस. वेंकटराघवन यांच्यासह बिशन सिंग बेदी ही चार नावं भारतीय फिरकीच्या इतिहासात अजरामर झाली आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये फिरकीचं एक नवं युग या चौघांनी सुरू केलं. त्यात बिशन सिंग बेदी यांचा वाटा मोठा होता. भारताच्या पहिल्या वहिल्या एकदिवसीय सामन्यात बिशन सिंग बेदी यांच्या अद्भुत अशा स्पेलमुळे भारतानं विजय साकारला होता. (लोकसत्ता)
क्रिकेट जगतातील महान खेळाडुस. आदरांजली.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Tue, 10/24/2023 - 14:31
नवीन
हिंदू धर्म के खिलाफ अभद्र टिप्पणी पड़ी भारी, भारत से भगाई गई ये पाकिस्तान महिला एंकर
https://navbharattimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/zainab-abbas-famous-pakistani-female-sports-presenter-deported-from-india-over-anti-hindu-tweets/articleshow/104283027.cms
-----
मोहम्मद रिजवान के खिलाफ मैदान पर नमाज पढ़ने के लिए शिकायत दर्ज, मुश्किल में पड़ सकते हैं पाकिस्तानी कीपर
https://navbharattimes.indiatimes.com/sports/cricket/icc-world-cup/news/supreme-court-advocate-file-complaint-against-mohammad-rizwan-for-namaz-on-ground-world-cup-2023/articleshow/104480797.cms
-------
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/27/2023 - 19:26
नवीन
पाकच्या २७० धावांचा पाठलाग करीत दमछाक झालेल्या आफ्रिकेने शेवटपर्यन्त झुंज देत एक विकेट राखून पाकचा पराभव केला.
-दिलीप
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sat, 10/28/2023 - 02:29
नवीन
आता पाकडे बाहेर पडले की कसं?
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/28/2023 - 03:36
नवीन
पाकिस्तानचे अजून तीन सामने बाकी आहेत. या तीन्ही सामन्यांमध्ये जर पाकिस्तानने विजय मिळवला तर त्यांचे १० गुण होतील. सध्या दक्षिण आफ्रिका रनरेटच्या जोरावर टॉपवर आहे, भारत अनुक्रमांक दोनवर आहे. दोघाचे १० गुण झालेले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या अजूनही पाकिस्तानला सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे,असे वाटते.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sat, 10/28/2023 - 03:50
नवीन
हे राम आहे का चान्स अजून, घरांच्याना सांगावं लागलं.काल भारताच्या सामान्यपेक्षा जास्त टेन्शन पाक हरावा म्हणून घेतलं होतं ;)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 10/28/2023 - 15:05
नवीन
ऑस्ट्रेलियाच्या ३८८ धावांचा पाठलाग करत ३८३ धावा न्यूझीलंडने केल्या. रोमांचकारी सामना. असे सामने झाले तर विश्वचषक सामने रंगत जातील. न्यूझीलंडने दिल जीत लिया...
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/29/2023 - 12:15
नवीन
आजच्या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजी ढासळली आहे. १५६ धावांवर ०४ फलंदाज परतले आहेत ३५ .४ ओव्हर्स संपल्या आहेत. रोहिट ८७ तर, सूर्यकुमार २३ धावांवर खेळत आहेत.
२७० तरी व्हावेत असे सध्याची परिस्थिती पाहता वाटत आहे.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »