लव्ह जिहाद, एक उच्चवर्णीय फँटसी !
गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा.
या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे.
महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला.
नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले.
स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला.
या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे.
केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?
वस्तुस्थिती नाकारणे हा अत्यंत वाईट पुरोगामी दळभद्रीपणा आहे.
इस्लाम धर्म मध्ययुगीन काळातला अधोगमी धर्म आहे.+ ७८६ म्हणून तर या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोरपंथात कोणालाही जाण्यास बंदी असावी, या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथानुयायांचे फाजिल लाड करण्यास बंदी असावी आणि या मध्ययुगीन काळातील अधोगामी अघोर पंथातून कोणास सुटका हवी असेल तर त्यांना पाठिंबा व मदत द्यावी.