लव्ह जिहाद, एक उच्चवर्णीय फँटसी !
गेली अनेक वर्षे या संकल्पनेने धुमाकूळ घातला आहे. वास्तविक पहाता असले काहीही अस्तित्वात नाही, पण तरीही शिकले सवरलेले लोक तावातावाने हा विषय मांडतात त्याचा थोडासा मागोवा.
या विषयी एक दरपत्रक व्हायरल झाले होते. ते खोटे दरपत्रकही ज्याने लिहिले त्याचा जात्याभिमान त्याला लपवता आला नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे त्याने विविध वर्णाचे दर ठरवले, जास्त दर कोणाचा हे सांगणे नलगे.
महाराष्ट्रात एका शहरात असा आंतरधर्मीय विवाह दोन्ही कुटूंबांच्या सहमतीने झाला होता. तेव्हाही रिकामटेकड्या मध्यमवयीन उच्चवर्णीय व्हॅट्स अॅप अंकल्स नी ती पत्रिका व्हायरल केली व दोन्ही कुटुंबांना मनस्ताप झाला.
नुकतेच उत्तरेत एका अक्षरशः भीक मागून जगणार्या महिलेने एका मुस्लिमाशी प्रेम विवाह केला व धर्म बदलला. तिच्या डोक्यावर छप्पर आले, दोन घास मिळू लागले ही खरे तर चांगली गोष्ट, पण विहिंप वाल्याने तक्रार केली व आता एफ आय आर वगैरे सुरू आहे. लव्ह जिहाद च्या संशयावरून आत टाकलेल्या एका मुलीचे तर मिस कॅरेज झाले.
स्वरा भास्कर ( कट्टर हिंदुत्ववादी दिवसभर तिला ट्रोल करतात ) ने एका मुस्लिमाशी लग्न केले. करो बापडी, पण स्वतःला साध्वी म्हनून घेणार्या एका भाजप नेत्रीने ट्विटर वर इतकी गरळ ओकली की तिला साध्वी तरी का म्हणावे असा प्रश्न पडला.
या लव्ह जिहाद कल्पने मध्ये आमच्या मुलींना अक्कल नसते, हे गृहितक अध्याहृत आहे.
केरला स्टोरी च्या निमित्तने या विषयावर पुन्हा एकदा सोमी वर थयथयाट सुरू झाला यात आश्चर्य ते काय ?
वर तर उनाड म्हणत आहेत की हा शब्द उच्चवर्णीय लोकांचा कांगावा आहे म्हणून... अर्थात पुरावे काही देत नाहीयेत यामुळे ते धादांत खोटे असायची शक्यता जास्त.धादांत खोटंच आहे ते. उच्चवर्णीय (म्हणजे ब्राह्मण) द्वेष हे यामागील प्रमुख कारण आहे।धर्मांतराला व्होकल विरोध करणारे बहुसंख्य लोक ब्राह्मण (किंवा स्यूडो ब्राह्मण) असतात. त्यांचा विरोध मुख्यत्वे दोन कारणाने असतो, एकतर धर्मांतर झाले तर देवळात येणारी संख्या कमी होईल व आपले तूप कमी होईल , दुसरे म्हणजे आपली पायरी ओळखून असलेले दलित दुसर्या धर्मात गेले की बरोबरीला येऊन बसतात.- आफले बकरे कमी होतील म्हणून धर्मगुरूंनी कांगावा सुरू केला, धर्मांतर झाले तर आपले तूप कमी होईल म्हणून ब्राह्मणांनी विरोध व कल्पनाविलास सुरू केला असले तारे तोडलेत. बरं, याविषयीचे पुरावे व विदा शून्य. अनेकदा मागूनही पुरावे व विदा देत नाही कारण मुळातच सर्व खोटारडेपणा आहे. हा खोटारडा व ब्राह्मणद्वेषी आहे हे अनेकदा चघड होऊनही काही जण याची हिरिरीने पाठराखण करताहेत. धन्य आहे.विदा मागू नये.कारण आम्ही बिनबुडाच्या थापा मारतो. विदा असलाच तर आम्ही देणार ना? ना आमच्याकडे विदा ना पुरावे, पण थापा मात्र भरपूर आहेत बुवा.