द केरल स्टोरी: परीक्षण व चर्चा
आत्ताच द केरल स्टोरी हा बहुप्रतीक्षित, बहुचर्चित चित्रपट पाहून आलो आणि थेट लिहायला बसलोय. चित्रपट परीक्षण पहिल्यांदाच लिहितोय, मिपावरही पहिल्यांदाच लिहितोय; मायबाप मिपाकर वाचक सांभाळून घेतील ही अपेक्षा.
पॅरामेडिक कॉलेजात शिकण्यासाठी हॉस्टेलच्या एका खोलीत असलेल्या इतर तीन तरुणींसोबत राहायला आलेली शालिनी उन्नीकृष्णन ही चित्रपटाचे मुख्य पात्र आहे. केरळी हिंदू कुटुंबात वाढलेली निरागस शालिनी इसिस दहशतवादाच्या सापळ्यात सापडते आणि मग तिच्या आयुष्याची कशी फरफट होते ही या चित्रपटाची कथा आहे. चित्रपट भारतातील आणि भारताबाहेरील दहशतवादाचे वास्तव बटबटीत स्वरूपात प्रेक्षकांपुढे ठेवतो.
चित्रपटाचे चित्रीकरण अप्रतिम आहे. सुरुवातीचा केरळातील सुंदर हिरवा निसर्ग आणि नंतरच्या अफगाणिस्तानातील रखरखीत करड्या पर्वतरांगा शालिनीच्या जीवनप्रवासाचा मार्ग दाखवतात. अदा शर्मा (शालिनी) आणि सोनिया बालानी (आसिफा बा) यांचा आणि इतर कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहे. दोन काळातले फ्लॅशबॅक वापरून कथा सादर करण्याचे तंत्र चांगले जमून आले आहे. वेगवान कथानक प्रेक्षकाला खिळवून ठेवते. एक तरुणी आणि तिचा नवरा यांना त्या तरुणीने लिपस्टिक लावले या कारणामुळे क्रूर शिक्षा देण्यात येते. असे प्रसंग बीभत्स वाटले तरी परिणामकारक आहेत.
धर्मांतरणाचे भीषण रूप आणि त्याचे त्याहूनही भीषण परिणाम सादर करण्याचा सुदिप्तो सेनचा (दिग्दर्शक) प्रयत्न चांगला आहे. पण काही ठिकाणी ते प्रयत्न कमी पडतात. शालिनीला चित्रपटात दहशतवादी सिद्ध करण्यात येते. प्रत्यक्षात ती केवळ दहशतवाद्यांसोबत (स्वतःच्या इच्छेविरुद्ध) राहत असते, ती स्वतः कोणत्याही गुन्ह्यात सामील होत नाही. हा विरोधाभास जाणवण्यासारखा आहे. बलात्काराचे स्पष्ट आणि दीर्घ चित्रीकरण दाखविण्याची गरज नव्हती. काही ठिकाणचे पार्श्वसंगीतही टाळता आले असते.
चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही. "ज्या देवाचा पुत्र सुळावर चढविला जातो आणि त्या पुत्राला देव वाचवत नाही असा देव तुम्हाला काय वाचवेल?", "जो देव आपल्या मृत पत्नीचे कलेवर घेऊन मदतीच्या शोधात वणवण भटकतो तो देव तुमची काय मदत करेल?" असे प्रश्न हा चित्रपट विचारतो पण त्यांच्या उत्तरांची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देतो. अश्या प्रश्नांची उत्तरे सर्वसामान्य प्रेक्षकांना सापडतीलच असे नाही.
---
रेटिंग : ४.२/५
- चित्रीकरण *****
- अभिनय *****
- दिग्दर्शन ****
- पटकथा ****
- परिणामकारता ****
🗣 चर्चा
(125)
च
चौकस२१२
Mon, 05/08/2023 - 09:20
नवीन
".....अतिउच्च शिक्षित माणसाला नसावे..."
मोदींच्या भाजपच्या एकाद्या धोरणावर यांनी अभ्यासपूरने टीका केली तर समजू शकतो पण ज्यात त्यात मोदी आणणे ... केवळ कलुषित मन /द्वेषमूलक
सरांचा हा "हेट जिहाद" दिसतोय
पालथ्या घड्यावर पाणी
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/08/2023 - 09:21
नवीन
ब्वॉरं.....! धन्यवाद. आपल्या पटणा-या आणि न पटणा-या मताचा आदर आहेच. लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 05/08/2023 - 05:59
नवीन
आता पुढे 'लोकसभा २०२४' असा एखादा सिनेमा येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
भावना नाही पोचल्या,,, इस्कटून इस्कटून सांगावे
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 05/08/2023 - 06:10
नवीन
चित्रपटातून प्रेक्षकांना काही दिशादर्शन मिळावे, मार्ग मिळावा ही अपेक्षा चित्रपट पूर्ण करत नाही.
प्रेक्षकांना निदान हे कळावे कि अश्या गोष्टी घडत आहेत एवढे घडले तरी पुरे
हिंदूंचे विभाजन आणि धार्मिक परिवर्तन होते आहे हे सत्य आहे
चित्रपतातून ते कसे दाखवयाचा तो निर्माता आणि दिग र्शकाचा निर्णय असतो
हे उदाहरण अनेकांनी पहिले असेल "विभाजन आणि धार्मिक परिवर्तन"
नसेल तर बघा
https://www.youtube.com/watch?v=MSprAZJWf18&t=72s
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Mon, 05/08/2023 - 06:59
नवीन
एक नंबर चित्रपट! केवळ भारतीयांनीच नाही तर जगातल्या प्रत्येक व्यक्तीने बघावा असा चित्रपट आहे.
जावा फुल स्टॅक तुम्ही परीक्षण थोडक्यात पण छान लिहिले आहे 👍
काल हा चित्रपट पाहिला आणि केवळ प्रतिसादातून ह्या कलाकृतीवर मतप्रदर्शन करणे अवघड असल्याने ह्याच विषयावर एक स्वतंत्र लेख लिहीण्याचा विचार करत आहे त्याबद्दल क्षमस्व!
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/08/2023 - 07:45
नवीन
परीक्षण आवडले.
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Mon, 05/08/2023 - 08:53
नवीन
ज्यांना गदारोळ करायचा असतो त्यांनी कशावरूनही गदारोळ केलाच असता, ३२ वरून नाहीतर ७२ वरून!
---
बाकी अजूनही, "ना ज़मीं मिली, ना फ़लक मिला है सफ़र में अंधा परिंदा" या ओळी आणि त्यामागची दाहकता मनातून जात नाहीय.
---
"हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत" याचीच हा सिनेमा पाहून प्रचीती येतेय.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Mon, 05/08/2023 - 09:00
नवीन
अगदी...अगदी...
काल हा चित्रपट पाहील्याला आता १५ तास उलटुन गेलेत पण ह्या गाण्याचा हँगओव्हर काही अजुन उतरत नहीये! ह्यावर कुठला उतारा घ्यावा अशा विचारात पडलोय 😀
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Mon, 05/08/2023 - 09:01
नवीन
मागे काही महीन्यांआगोदर मालवणचे 'ते' प्रसिध्द आमदार ह्या विषयाबाबत बोलत होते. तेव्हा त्यांनी उल्लेख केला की अशा 'कामा'साठी काही मुले पैसे घेतात. ब्राम्हण मुलीचे वेगळे पैसे, मराठा असेल तर वेगळे, गुजराती असेल तर वेगले असे पैसे दीले जातात. हे ऐकुन मला थक्क व्हायला झाले व खुप रागही आला.
असे करण्याचे कारण, उद्देश हा हींदु लोकसंख्या कमी करणे असतो. मुलगी कुठे काय करतेय ह्याकडे बारीक लक्श असणे फार गरजेचे आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Wed, 05/10/2023 - 09:28
नवीन
झालेल्या जन जागृतीमुळे ब्राम्हण आदि लोक काळजी घ्यायला लागले आहेत. आणि उगीचच त्रास नको म्हणुन या लव्ह-जिहाद वाल्या लोकांनी आपली स्ट्र्टेजी बदलली आहे.
हल्ली ते आंबेडकरी आणि तत्सम मुलींवर ( आर्थिक दृष्ट्या निम्न स्तरातल्या ) निशाणा साधतात. त्यांना जाळ्यात पकडणे त्या मानाने सोपे असते. परत थोडे बहुत मारहाण, त्रास दिलेले ही चालते कारण आसपास त्या तेच पहात असतात.
अजुन दहा वर्षात त्यांची संख्या बदलली असेल. मग हेही लोक जागे होतील
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 05/08/2023 - 09:25
नवीन
इसिस बरोबर लग्न
https://www.youtube.com/watch?v=Q_GIUbyyuRw
हे पहा
आणि आता काय येथे मजूर सरकार आल्यामुळे त्यांचे रिहदय पिळवटून निघाले आहे आणि या महिलांना परत आणण्याचा प्रयत्न चालू आहे
also love how EVERY one of the brides has an excuse.
I was tricked.
I was on vacation.
I was trying to help.
I made a wrong turn.
- Log in or register to post comments
स
स्वप्निल रेडकर
Mon, 05/08/2023 - 09:56
नवीन
गेल्या ९ वर्षात महामानव मोदीजी आणि लोहपुरुष शाहजी ,सुपरस्पाय डोवाल जी यांच्या नेतृत्वाखालच्या बलशाली भारतामध्ये ३०००० मुलीच धर्मांतर किंवा देशाबाहेर अपहरण झालं आणि त्या जोडगोळीला ज्याचा पत्ता लागला नाही आणि याकिश्चित सिनेमाच्या दिग्दर्शकाकडे या प्रकरणाची इत्यंभूत माहिती आहे हे म्हणजे हि वरची लोक अकार्यक्षम ठरलेत असा स्पष्ट आरोप होतोय आणि याचा तीव्र णिशेध अध्यक्ष महोदय !!इथे लोकांच्या फ्रिज मध्ये काय आहे हे अख्खा देशाला मीडिया वाले बोंबलून दाखवत असतात आणि एवढा मोठा प्रकार होऊन ९ वर्षांनी सिनेमा मधून सांगावं लागतंय . आणि ३ कि ३०००० याने काय फरक पडतो म्हणणार्यांना एकच प्रश्न आहे ,ज्याला सत्य दाखवायचं आहे तो जेव्हा खोटेपणाचा आधार घेतोय तेव्हा त्याच्या हेतूंबद्दल शंका घेतली जाणारच ,
NCRB report: Maharashtra in top three in crimes against women, Delhi most unsafe metro city
In the abetment to suicide of women cases, Maharashtra tops the list with 927 cases, followed by Madhya Pradesh (758) and West Bengal (456). August 30, 2022,
त्या ३ मुलीबद्दल कळवळा आहे हे स्वागतार्ह पण जेव्हा हिंदू नवरा किंवा पुरुषांकडून हिंदू महिलांचं शोषण ,फसवणूक,बलात्कार किंवा हत्या होते तेव्हा तो नॅशनल चिंतेचा विषय कसा नसतो तिथे ब्रिजभूषण ,सेनेगार सारख्या लोकावर आरोप झाले कि मात्र पुरावे कुठे आहेत?कोर्ट चौकशी करेल ,संविधान वगैरे सोयीस्कररीत्या आठवत !
मुस्लिम रिलेटेड काही आलं कि तिथे रेटून अजेन्डा ढकलायचा ,इस्लामिक राष्टफळांना ढिकाना !महाराष्ट्रात रेप चे आरोपी मंत्री आहेत मंत्री मंडळात आणि बार पीडित पण हिंदूच तिथे नाही पूजा चव्हाण स्टोरी ,हाथरस स्टोरी ,उन्नाव स्टोरी ..
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/08/2023 - 10:43
नवीन
अहाहा ! कसला उत्तुंग हानलाय बघा.
-दिलीप बिरुटे
( निशब्द)
- Log in or register to post comments
स
स्वप्निल रेडकर
Mon, 05/08/2023 - 10:08
नवीन
आणि एक बायोपिक drdo च्या कुरुळकरावर पण कधी येतो याची वाट बघायची...
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 05/09/2023 - 05:37
नवीन
हो, तो आलाच पाहिजे.
म्हणजे कोणापासून सावध राहायचे हे देखील सगळ्यांना कळेल.
गेला बाजार डॉक्युमेंटरी तरी.
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Mon, 05/08/2023 - 10:14
नवीन
चला, चांगल्या सिनेमाचं, संयमित आणि चांगलं परीक्षण करणाऱ्या, चांगल्या धाग्याचं, काश्मीर केरळ होण्याकडे वाटचाल सुरू झाली म्हणायचं!
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/08/2023 - 10:19
नवीन
सगळ्यांनी माना डोलवणे अपेक्षित आहे काय ? काय चुकीचे किंवा असंबंधीत लिहिले आहे तक्रार करायला ?
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Mon, 05/08/2023 - 10:32
नवीन
कॉमीराव,
तसं नाही हो पण चर्चा -
हा सिनेमा बघण्यालायक आहे की नाही, सिनेमातल्या कोणत्या बाबी चांगल्या वाईट, दिग्दर्शन अभिनय कथानक संगीत या बाजू... अशी न होता वेगळाच अंगाने जात आहे म्हणून धाग्याचे काश्मीर केरळ असं म्हटलं.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 05/08/2023 - 10:58
नवीन
बरोबर. शेवटी मोदी-शहांना आणलंच आणि चित्रपट लांबच राहिला.
पुन्हा एकदा यशस्वीपणे धाग्याचा मूळ विषय कचऱ्यात फेकून अत्यंत चतुराईने धागा मोदी-शहांकडे वळविल्याबद्दल नेहमीच्याच यशस्वी कलाकारांना त्रिवार मुजरा!
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 05/08/2023 - 13:55
नवीन
इथे आकडेवारीवर तावातावाने प्रतिसाद द्यायला वेळ आहे, मूळ फूस लावून आणि धाक वापरून हिंदूंचे धर्मातर होते हे मात्र या उदारमतवादी लोकांना दिसत नाही किंवा त्यावर बोलायला वेळ नाही... दुर्दैव
काँग्रेस काळात सेन्सर सरकार विरुद्ध काही टीका करणारे केलं तर जी बंदी आणत होते ते दिवस ज्यांनी सहन केलेत त्यांनी आता हे हि दिवस गपगुमान सहन करावे
कुरतडत कुरतडत हे दोन अब्राहमीक धर्म हिंदूंचे दमन करणार ... आणि आपण असेच मारामाऱ्या करीत राहणार
इन्शाअल्लाह , जशी प्रभूची इच्छा
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/08/2023 - 14:01
नवीन
इथेच आपल्यात फरक आहे. विदा आणि आकडेवारी शिवाय तोंड उघडण्यात माझ्या दृष्टीने शून्य अर्थ आहे. कारण जर anecdotes वरून जायचे असेल तर माझा निष्कर्ष खूप वेगळा येईल तुमच्यापेक्षा. द्या बघू तुम्ही आकडेवारी.
- Log in or register to post comments
T
Trump
Mon, 05/08/2023 - 15:32
नवीन
ते धर्म नसुन पंथ (किवा जात ) आहेत. धर्माची शिकवण वेगळी असते आणि पंथाची वेगळी असते.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/08/2023 - 11:11
नवीन
चला, खरया विदा कडे बघू. वर वामनजी विचारत होते म्हणून गुगल करून पाहिला आणि चटकन सापडला.
मिसिंग पर्सन रिपोर्ट २०२०. (होम पेज लिंक, pdf लिंक)
प्रकाशक - नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरो, भारत सरकार.
तक्त्यामध्ये किती लोकं बेपत्ता झाले आणि किती लोक सापडले ह्याची थेट आकडेवारी आणि किती लोक सापडले ह्याची टक्केवारी दिली आहे.
केरळमध्ये २०२० शेवटी बेपत्ता असणारे एकूण लोक - १६२४ (त्यातील केवळ ४७८ स्त्रिया आहेत.)
केरळचा बेपत्ता व्यक्तींना शोधण्याचा दर - एकूण ८५%, स्त्रियांसाठी ९४% - दोन्ही दर भारतामध्ये सर्वोच्च दर.
भारताचा सरासरी दर - ५०%.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/08/2023 - 11:32
नवीन
म्हणजे केरळ हे हरवलेल्या लोकांना शोधण्यात भारतातले सर्वोत्कृष्ट राज्य आहे.
असे असताना सिनेमा बनवणाऱ्या माणसाने हे ३०००० ५०००० आकडे आणले कुठून ?
जर मुद्दामून सत्ताधारी पक्षाला न मिळवता येणाऱ्या राज्याला बदनाम करण्यासाठी वाट्टेल ते दावे करणारा सिनेमा बनवला जात असेल तर I am sorry, मी त्या दाव्यांना दुर्लक्षित करून नुसते दिग्दर्शन कसे आहे आणि संगीत कसे आहे ह्यावर चर्चा नाही करू शकत.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/08/2023 - 11:52
नवीन
या आकडेवारीचा नक्की रेलेव्हन्स काय? लव्ह जिहादला बळी पडणार्या मुली वेगळ्या आणि बेपत्ता व्यक्ती वेगळ्या. नाही म्हणजे दोनमध्ये थोडासा ओव्हरलॅप असू शकेल म्हणजे लव्ह जिहादला बळी पडलेली मुलगीच बेपत्ता होणे अशाप्रकारचा (त्याचा आणखी लहान सबसेट म्हणजे लव्ह जिहादला बळी पडून अफगाणिस्तान/सिरीया किंवा अन्य कुठे गेलेल्या मुली). अन्यथा लव्ह जिहादला बळी पडणार्या मुली बेपत्ता व्यक्तींमध्ये कुठे शोधायला गेलात? लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुली 'बघा मी कित्ती कित्ती उदारमतवादी. मी कि नै दुसर्या धर्मातील मुलाशी लग्न केले' असे म्हणत जन्मापासून ज्या घरी वाढली ते घर, ज्यांनी आपल्याला लहानाचे मोठे केले ते आईवडील, त्यांचे संस्कार, त्यांचा धर्म कसा टाकाऊ, ते लोकं कित्ती कित्ती चांगले आणि तुम्ही कित्ती कित्ती वाईट असे तत्वज्ञान पाजळत समाजाताच राहत असतात. त्यांना बेपत्ता लोकांमध्ये कुठे शोधायला गेलात?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/08/2023 - 11:57
नवीन
पण बेपत्ता असणे हा सुद्धा दावा आहे ना ? तो अड्रेस केलाय.
बर. तुमच्याकडे विदा असेल लव जिहाद ला बळी पडणाऱ्या मुलींबद्दल तर जरूर द्या. ते सोडा, लव जिहाद दूर. निव्वळ किती हिंदू मुलींनी मुस्लिम मुलांशी लग्न केले हा विदा असला तरी चालेल, त्यातल्या १००% केसेस लव जिहादच्या नाहीत हे खरेतर तुम्हाला पण मान्य असायला हवे, पण तरी, काय विंडो मध्ये खरा विदा असणार हे तरी समजेल.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 05/09/2023 - 07:17
नवीन
YOU CAN PROVE ANYTHING AND EVERYTHING WITH STATISTICS
EXCEPT TRUTH.
बाकी वाममार्गी लव्ह जिहाद नाहीच हे सिद्ध करण्यात धन्यता मानतात
- Log in or register to post comments
क
कॉमी
Tue, 05/09/2023 - 07:34
नवीन
लॉल
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 05/08/2023 - 13:39
नवीन
एक था टायगर, दोन्ही पार्ट
फॅमिली मॅन, सर्व सीझन्स
१६ डिसेंबर चित्रपट
स्पेशल ops सर्व सीझन्स
इतर असंख्य चित्रपट, मालिका यामधे पाकिस्तानी लष्कर किंवा त्यांची गुप्तचर संघटना, किंवा अगदी आयासिसच्या नावाने कोणत्याही स्टोरीज, कारस्थाने दाखवली गेली. कितीतरी तरुणांना कट्टर बनवून भरती करणे, त्यांना वापरून भयंकर मिषन्स, अगदी देशातील मुख्य ठिकाणे, शहरे उडवून देणे, गॅस गळती करण्याचे कारस्थान, ओलीस ठेवलेल्या नर्सेस, ....,...., सर्व कथा मनोरंजन म्हणून लोकांनी बघितल्या.
त्यातही विशिष्ट धर्माकडे, संघटनांकडे स्पष्ट रोख होता.
हे काल्पनिक आहे किंवा तत्सम declare देखील केले होते.
Regardless of whether Kerala stories is a propaganda or not (which it very well can be, not even denying that possibility), कोणत्याही इतर तत्सम चित्रपटाच्या वेळी नेमके आकडे, सत्यता पुरावे अशी चर्चा का झडली नसावी? काश्मीर फाईल्स, केरळ यात मात्र झडते आहे. काश्मीर फाईल्स सुद्धा भारतातला अंतर्गत विषय असेल तर तो बाजूला ठेवता येईल. तूर्त केरळ बद्दल हा प्रश्न येतो.
या प्रश्नांत whataboutery उर्फ तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म, हा दोष आहे हे मान्य करतो.
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/08/2023 - 13:58
नवीन
एखाद्या दुसऱ्या पात्राची गोष्ट म्हणून दाखवलेले वेगळे, आणि ब्रॉड सांख्यिकी दावा वेगळा. खेरीज, जसे तुम्ही म्हणता, की त्या गोष्टी काल्पनिक म्हणूनच लिहिल्या आहेत.
आणि पिकिंग योर बॅटलस हे सुध्दा आले. उघड उघड प्रोपोगंडा होतो तिथे जोरात ओरडणे महत्वाचे.
- Log in or register to post comments
ग
गवि
Mon, 05/08/2023 - 14:08
नवीन
एखाद्या दुसऱ्या पात्राची गोष्ट म्हणून दाखवलेले नव्हे. एक संघटना, आख्खी दिल्ली- वायुगळती , अणुबाँब. दुल्हन की बिदाई का वक्त बदलना है इ इ. नेमक्या किती लोकांना ठार करायचा बेत होता?
केरळ स्टोरी बाबत देखील काल्पनिक असे जाहीर केले आहे असे कुठेतरी वाचले आणि ते गृहितक धरून वरील प्रश्न होता. तसे नसेल तर बाद.
इन फॅक्ट फॅमिली man वगैरे तर चक्क inspired by true stories / events किंवा तत्सम दाखवत असे.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Mon, 05/08/2023 - 14:23
नवीन
Lol... चला वादासाठी आपण मान्य करू कि हा प्रोपगंडा चित्रपट आहे!
मग आजपर्यंत एकाबाजूने चालवलया जाणाऱ्या प्रोपगंडाला अशा 'काउंटर प्रोपगंडाने' दिले जाणारे उत्तर सहन होत नसल्याने ह्या खेळातल्या जुन्या खेळाडूंकडून चित्रपटावरील बंदीची मागणी, आकडेवारी वगैरे निरर्थक गोष्टींवरून वरून आरडा-ओरडा आणि रडारड चालू आहे असे मानण्यास काही वाव आहे का? 😂 😂 😂
अवांतरः बाकी चित्रपटच्या बॉक्स ऑफिस वरील कमाईची आकडेवारी मात्र चांगली वाढत आहे हे कशाचे द्योतक असावे?
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/08/2023 - 14:30
नवीन
बंदी वैगरे आणावी असे मला आजिबात वाटत नाही. मी जनरली फ्री स्पीच समर्थक असतो. BBC डॉक्युमेंट्री, इतर सिनेमे यांवर बंदी आणली की गप्प बसणारे लोक वेगळे.
हाहाहाहा. आकडेवारी निरर्थक गोष्ट ? कोपरापासून नमस्कार.
कशाचे द्योतक मानायचे ? पठाण ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली हे कशाचे द्योतक मानायचे ?
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Mon, 05/08/2023 - 14:47
नवीन
विषय एका चित्रपटाचा असल्याने सिनेमॅटीक लिबर्टी विचारात घेतल्यास इथे आकडेवारी ही गोष्ट मलातरी निरर्थक वाटत असल्याने कोपरापासूनच्या नमस्काराचा आनंदाने स्विकार करतो 😀
मी पठाण पाहीला नसल्याने काही कल्पना नाही बुवा! आणि तुम्हीही द केरला स्टोरी पाहीला नसल्याने त्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीत तरी काही हरकत नाही, अन्य कोणाकडुन ते मिळाले तरी चालेल...
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/08/2023 - 15:11
नवीन
आकडेवारी ही नक्कीच निरर्थक गोष्ट नसते. मात्र आकडेवारी परिपूर्ण आहे का, लोकं दहशतीमुळे किंवा अन्य कोणत्या कारणाने झालेल्या गोष्टी रिपोर्ट करायला पुढे येत नाहीयेत अशी परिस्थिती नाही का, पोलिसांनी तक्रारच नोंदवून घेतली नाही अशी परिस्थिती आहे का वगैरे गोष्टी पण बघायला लागतात. तेव्हा हातात असलेली आकडेवारी विश्वासार्ह आणि परिपूर्ण आहे का हे तपासून बघायला नको? त्या गोष्टी बघायला गेले नाही तर मग पूर्ण दिशाभूल करणारी अनुमाने निघतात.
आता हेच बघा ना. आज केरळच्या उत्तरेकडील मलबार विभागात (तोच कासारगोड, मलापुरम, वायनाड वगैरे भाग) इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम संख्या कशी आणि कुठून आली? दोन वर्षांपूर्वी चिकमंगळूरला फिरायला गेलो होतो. तिथे आमच्या रिसॉर्टचा मालक सोडला तर जो बघावा तो मुसलमान होता. हे कुठून झाले? तर टिपू सुलतानने हिंदूंच्या मोठ्या प्रमाणावर कत्तली आणि सक्तीची धर्मांतरे त्या भागात केली. नेहमीप्रमाणे नंतरच्या काळातले हिंदू मुलखाचे बावळट निघाले आणि त्यांनी सक्तीने धर्मांतरीत झालेल्यांना परत हिंदू करून घेतले नाही. आज केरळमध्ये मलबार आणि कर्नाटकात चिकमंगळूर वगैरे भागात इतके मुस्लिम दिसतात ते तेव्हा धर्मांतरीत झालेल्यांचेच वंशज आहेत. पण टिपू सुलतानने नक्की किती लोकांच्या कत्तली आणि धर्मांतरे केली? याविषयी फार तर अंदाज उपलब्ध असतील. नक्की आकडा उपलब्ध असणे जवळपास अशक्य आहे. आता त्याने जे काही केले त्याचे परिणाम समोर दिसत असूनही केवळ आकडेवारी नाही म्हणून टिपू सुलतान कित्ती कित्ती चांगला होता (किमान वाईट नव्हता) असे अनुमान विचारवंत लोक काढतातच ना? की सक्तीची धर्मांतरे करणे वाईट हेच मुळात मान्य नसते? तसे असेल तर मग अशा लोकांना हिंदूद्वेष्टे म्हटले जाणारच. इलाज नाही.
या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार न करता नुसते आकडेवारीवर विसंबून राहिले की दुसरे काय होणार? केवळ हातात उपलब्ध असलेल्या आकड्यांवरच अवलंबून राहून निष्कर्ष काढायला गेले तर माणसाचा रघुराम राजन होतो.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Mon, 05/08/2023 - 15:16
नवीन
सक्तीची धर्मांतरे करणे वाईट हेच मुळात मान्य नसते? तसे असेल तर मग अशा लोकांना हिंदूद्वेष्टे म्हटले जाणारच. इलाज नाही.
मुद्याचे बोललात १००%
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/08/2023 - 15:30
नवीन
नक्की मान्य आहे. पण असे म्हणायला सुध्दा पुरावा नको का ? का सिलेक्टिव्हली न आवडणाऱ्या किंवा आपले म्हणणे न रेटणाऱ्या आकडेवारीच्या वेळीसच आकडेवारी कशी विसंबाण्याजोगी गोष्ट नाही असे म्हणायचे?
ह्याची कितीतरी करणे असू शकतात. कम ऑन. मायग्रेशन, आजवर आर्थिक परिस्थिती नसलेले लोक उद्योगात पैसे गुंतवण्याक्षम झाले इती. लगेच हिंदूंना जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करायला लावले असा कसा निष्कर्ष निघेल ?
ऐतिहासिक बाबी आणि अध्याच्या बाबी ह्यांमध्ये बराच फरक नाही का ? ऐतिहासिक बाबींमध्ये आकडे मिळवणे अवघड असणार. बाकी, टिपू सुलतानने नक्की किती लोकांवर अन्याय केला हे माहीत नसले तरी बऱ्याच लोकांवर अन्याय केला हे जरूर माहिती आहे.
????? हे अतिशय वाईट strawman आहे बुवा तुमचे. अर्थातच वाईट आहे.
आकडेवारी वर न विसंबाण्याचे कारण असेल तरी जर आपण ब्रॉड सांख्यिकी दावे करणार असू तर बेस म्हणून तरी आकडेवारी हवीच.नाहीतर सगळे मनाचे खेळ.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/08/2023 - 15:57
नवीन
मग तो आकडा २१ आहे हे वर म्हटले आहेत ते नक्की कोणत्या आधारावर? २१ हा आकडा कुठून आला मला माहित नाही. पण तुमच्या इतर आकडेवारीला प्रचंड महत्व द्यायच्या आग्रहावरून वाटते की तो आकडा कुठेतरी कागदोपत्री असावा. त्यावरच अवलंबून राहावे हा आग्रह हा पण सिलेक्टिव्ह पणा झाला नाही का?१८ च्या वरील वयाच्या मुली लव्ह जिहादला बळी पडल्या तरी त्याची तक्रार पोलिस दाखल करून घेऊ शकणार नाहीत त्यामुळे कागदोपत्री खरा आकडा कळणे अशक्य आहे हे पण मान्य नाही का? तो आकडा ३२ हजार आहे की किती मलाही माहित नाही. म्हणूनच अगदी सुरवातीला- तो आकडा किती आहे असा दावा केला असता तर तो मान्य केला असता हा प्रश्न विचारला होता. तरीही २१ हाच आकडा आहे या आग्रहाला नक्की काय म्हणावे?
मायग्रेशन कुठून होणार? आजूबाजूच्या प्रदेशातून. तिथे इतक्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोक नव्हते पण एकदम मलबार आणि कर्नाटकच्या काही भागात आहेत याचे कारण मायग्रेशन? वा वा. आर्थिक परिस्थिती नसलेले लोक उद्योगात पैसे गुंतवायला सक्षम झाले असतील तर नक्की कोणते उद्योग त्या भागात होते/आहेत?
हे असले प्रश्न डाव्यांना पडतात म्हणूनच त्यांना सरसकट हिंदूद्वेष्टेच म्हणावेसे वाटते. नुसता मलबारच नाही तर सध्याचा भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या मोठ्या प्रदेशात तो आकडा वाढला तो थायलंड, श्रीलंका वगैरे देशात बौध्द धर्मियांचा आकडा वाढला त्याप्रमाणे म्हणजे आध्यात्मिक प्रेरणेने वाढला असे म्हणायचे आहे की अरबस्तानातून मायग्रेशन झाले? केरळमध्ये टिप्याच्या आधी काही शतके एक राजाने स्वतःहून तसे धर्मांतर केले होते पण तो पूर्ण प्रदेशाचा विचार करता अपवाद होता.
समजा टिपू सुलतानच्या वेळेस कोणी विचारवंत असते तरी समोर दिसत असलेल्या गोष्टी नाकारल्या असत्या आणि आज नक्की आकडे मिळणे शक्य नाही म्हणून त्याच लोकांचे वैचारीक वंशज टिपूला चांगला म्हणतात की काय समजत नाही.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Tue, 05/09/2023 - 05:03
नवीन
जगभर "वहाबी करण" कसे चालू आहे हे उदारमतवाद्यांन बघायचे असले तर मलेशिया च्या जवळील एक छोटा आणि प्रचंड श्रीमंत देश म्हणे "ब्रुनेई"
तो आधीच मुस्लिम आहे , पण त्याना जसे इंडोनेशिया ला धर्म जरी मुस्लिम असला तरी आपली सॅन्कृती काही अरब नाही / वर्नानें आपण अरब नाही याची पुरेपूर कल्पना आहे पण ब्रुनेई चा सुलतान जसा धार्मिक होऊ लागलला तसे त्याने काढलेली फर्मान प्रमाणे ठेवील पाट्या अरेबिक लिपी ( आणि बहुतेक भाष पण अरबी ) मध्ये आहेत ! काही मोजके लोक सोडणे तर ब्रुनेई मध्ये बहुतेक लोकांना अरबी येत नाही .. घाई हे उदाहरण,, तर जर अगादरच मुस्लिम असलेल्या देशाचे हे अंतर्गत वहाबीकरण होत आहे तर भारतासारख्या हिंदू देशाचे काय घेऊन बसलात
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
Mon, 05/08/2023 - 14:53
नवीन
पठाण ने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली हे कशाचे द्योतक मानायचे ?
बेशरम रंग लोकांना आवडला असेच म्हणावे लागेल.
पंतप्रधानांनीं काश्मीर फाईल आणि केरला स्टोरी ची स्तुती केली. OTT वरील अशा प्रकारच्या मालिकांवर त्यांनी कधी भाष्य केल्याचे आठवत नाही. अर्थात नाही करत तेच बरे आहे.
- Log in or register to post comments
अ
अजिंक्यराव पाटील
Mon, 05/08/2023 - 15:15
नवीन
आत्मपरीक्षण करण्याची नितांत गरज आहे हिंदूंना.
१. आपल्या मुळीच दूधखुळ्या आहेत का? आपले सो कॉल्ड संस्कार कमी पडत आहेत का?
२. भाजपभक्ती करताना आपण आपल्या घरातच लक्ष देत नाही आहोत का?
३. चित्रपटात दाखवलेल्या गोष्टी खऱ्या असतील तर आपले ५६ इंची सरकार काय करत आहे? आपण त्यांना निवडून देऊन चूक केली आहे का?
४. सदानकदा आपणच मुस्लिमांना दुजाभावाची वागवत आलोय, त्यांच्याकडून होणाऱ्या ह्या कृती आपल्याच वागण्याची प्रतिक्रिया नसेल हे कश्यावरुन?
- Log in or register to post comments
स
सामान्यनागरिक
Wed, 05/10/2023 - 09:36
नवीन
सदानकदा आपणच मुस्लिमांना दुजाभावाची वागवत आलोय, त्यांच्याकडून होणाऱ्या ह्या कृती आपल्याच वागण्याची प्रतिक्रिया नसेल हे कश्यावरुन?
१. मुस्लिमांचा राष्ट्रीय संपत्तीवर अधिकार पहिला असे म्हणणारे पंतप्रधान
२. त्यांना मिळणार सोयी सवलती.
३. वाटेल तिथे नमाझ पढणार, मजारी बांधणार, बेकायदेशीर मशीदी बांधणार
एवढे करुन परत दहशतवादी कृत्ये करणार आणि दहशत्वादाला धर्म नसतो हे म्हणणार !
पण तरीही दुजाभावाची ओरड करणार !
एकदा ईस्लाम काय आहे हे समजुन घ्या. कुठेही काफिर दिसला की त्याला मारुन टाका हे शिकवणारा धर्म आहे हा !
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 05/08/2023 - 15:19
नवीन
तामिळनाडू पाठोपाठ बंगालमध्येही केरळ स्टोरी या चित्रपटावर बंदी जाहीर झाली आहे.
चित्रपट नियामक मंडळाने मान्यता दिलेल्या चित्रपटावर राज्यांनी प्रतिबंध घालणे कायदेशीर आहे का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 05/08/2023 - 16:02
नवीन
मुळात केरळ उच्च न्यायालयाने या चित्रपटावर प्रतिबंध आणण्यास नकार दिलाय. पण ही बाहेरची राज्येच प्रतिबंध आणताहेत.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/08/2023 - 16:07
नवीन
तसे करता येत असावे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी भिती वाटून १९९२-९३ च्या दंगलींवरील बॉम्बे या चित्रपटाला १९९५ मध्ये मुंबईत तत्कालीन पोलिस आयुक्तांनी (नाव विसरलो) एक आठवड्यासाठी दाखवायला बंदी आणली होती.
- Log in or register to post comments
N
Nitin Palkar
Mon, 05/08/2023 - 16:39
नवीन
अतिशय संयत परीक्षण, अजेंडा प्रतिसादकांचे अपेक्षित प्रतिसाद आणि त्यांना ठोकून काढणाऱ्यांचे रट्टे.
लगे राहो.
चित्रपट बघण्याची उत्सुकता मात्र नक्की वाढली.
- Log in or register to post comments
स
स्वप्निल रेडकर
Mon, 05/08/2023 - 17:48
नवीन
एक प्रयत्न करतो उत्तर केरळ किंवा आपण ज्याला मलबार रिजन म्हणतो तिथल्या मुस्लिम लोकसंख्येविषयी स्पष्टीकरण द्यायचा. केरळ हे साधारण साडेतीन कोटी लोकसंख्येचे तुलनेने छोटे राज्य आहे, परंतु त्यात मुस्लिमांचे प्रमाण (27%, बहुतेक सुन्नी) संपूर्ण भारतापेक्षा (14%) जास्त आहे; उत्तर मलबार जिल्ह्यातील अनेक गावे आणि शहरांमध्ये मुस्लिम बहुसंख्य आहेत .याच मूळ दडलंय ते मसाल्याच्या व्यापारामध्ये .अगदी ७व्य ८ व्या शतकापासून अरब व्यापारी मलबार प्रांतात व्यापारासाठी येत होते आणि अनेक अरब व्यापारी केरळमध्ये स्थायिक झाल्यामुळे ते या प्रदेशाच्या संस्कृतीचा आणि समाजाचा अविभाज्य भाग बनले.स्थानिक लोकांमध्ये रोटीबेटी व्यवहार वाढले आणि बहुतांश लोकांनी मुस्लिम धर्म स्वीकारायला सुरुवात केली ,पूर्ण हिंदुस्थानात विशेषतः उत्तर हिंदुस्तानात जशी सक्तीची धर्मांतर झाली तशी सगळीकडे झाली असं नाही बरीच वेळेला लोकांनी सामाजिक विषमता किंवा आर्थिक परिस्थिती किंवा मुस्लिम धर्मातली तत्व आवडल्यामुळे इस्लाम स्वीकारला (जस आपण पौर्वात्य
देशातल्या नागरिकांनी हिंदू धर्म स्वीकारल्याची बातम्या ऐकून खुश होतो किंवा इस्कॉन मध्ये गोरे लोक बघून अभिमान वाटतो तसाच काही झालंही असेल )
तोपर्यंत इस्लाम बऱ्यापैकी एस्टॅब्लिश'झाला होता ,आणि त्यानंतर
१७६६ मध्ये मलबार वर हैदर अलीच्या नेतृत्वाखाली कुप्रसिद्ध आक्रमण झालं आणि त्यानंतर टिपूच्या सैन्याने हत्याकांड आणि धर्मांतर आणि जबरदस्ती ने हिंदू बायकांबरोवर लग्न लावून दिली . आणि हा इतिहास नाकारायचं काही कारण नाहीय .टिपूने तेव्हा हे कांड केलं म्हणून आता स्वतंत्र भारतात पूर्ण भारतच इस्लामीकरण होईल याची लोकांना भीती दाखवणं हा शुद्ध संघी हलकटपणा आहे,
आता येऊ आकडेवारीकडे .तर 1991-2001 या कालावधीत मुस्लिम लोकसंख्या 15.8% वाढली जी 2001-2011 या कालावधीत 12.83% पर्यंत घसरली. केरळमधील ख्रिश्चन लोकसंख्या 1991-2001 या कालावधीत 7.7% दराने वाढली, तर 2001-2011 या कालावधीत त्यांची लोकसंख्या 1.38% च्या अल्प दराने वाढली.आणि मुस्लिम टक्का एवढा असून पण केरळ शिक्षण ,आरोग्यसेवा,कायदा सुव्यवस्था ,बालमृत्यू निवारण ,कुपोषण निवारण यात देशातल्या बर्याच राज्यांपेक्षा प्रगतिशील आहे
उच्च मानवी विकास निर्देशांक (0.79)
उच्च आयुर्मान (७४ वर्षे)
कमी दारिद्र्य दर (7.05%)
सुरक्षित पिण्याचे पाणी असलेल्या कुटुंबांची उच्च टक्केवारी (94%)
इष्टतम लिंग गुणोत्तर (1000 पुरुषांमागे 1084 महिला)
उच्च साक्षरता
अत्यंत कमी बालमृत्यू दर.
स्वच्छ राज्य
यात युपी सारखी बीजेपी शासित राज्य जवळपास देखील नाहीत .
सध्या आपल्याकडे रोजच्या जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीपेक्षा भीतीचा बागुलबोवा दाखून राजकारणी फायदा घेताहेतभ आणि लोक डोळे मिटून पाठीमागे जयजयकार करत चाललेत ,पुराण इतिहास म्हणून दाखवली जाताहेत आणि इतिहासाला वास्तुनिष्ठरित्या न बघता जिंगोईजम आणि ऐतिहासिक पात्रांचे दैवतीकरण चालय .आणि इतिहास अगदी अभ्यासपूर्ण इतिहास देखील व्यर्थ आहे जर तो मांडणाऱ्याचा हेतू कलुषित असेल आणि इथे तर सिनेमा आहे जो सत्य घटनेवर आधारित म्हणून ज्याचं प्रमोशन केलं गेलं\आणि मग कोर्टात फिक्शन आहे असं सांगावं लागलं कारण सत्यघटना म्हंटल्यावर पुरावे ,सोर्स द्यावे लागतात ते देऊ शकले नाहीत निर्माते .आणि आता प्रेक्षक ती सत्यघटना आहे असं बाकीच्यांना सांगताहेत हे सगळं थोर आहे .
- Log in or register to post comments
क
कॉमी
Mon, 05/08/2023 - 17:52
नवीन
धन्यवाद.
फिरायला/कामानिमित्त गेल्यावर हॉटेल्स वैगरे मध्ये जास्त मुस्लिम दिसले ह्यावरून जबरदस्तीने धर्मांतर झाले असणार ह्या निष्कर्षावर काय बोलावे असे माझे झालेले, शब्दशः बोलती बंद झाली.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/08/2023 - 18:48
नवीन
काहीही वाईट झाले नाही. अगदी उत्तम झाले. तुमची अज्ञानमूलक गोष्टी पसरवणारी बोलती अशीच बंद झालेली असू दे.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/08/2023 - 18:47
नवीन
बोंबला. कुठे शिकलात हो असले काही?
भारताकडे ब्रिटिश आणि इतर युरोपियन लोक आकर्षित झाले त्यामागे एक कारण भारतात होणारे मसाले हे एक होते असे मी तरी शाळेत असताना शिकलो आहे बुवा. मसाले काय फक्त केरळमध्ये होत होते का? मग इतर ठिकाणी ते अरब व्यापारी का नाही गेले? केरळविषयीच बोलायचे झाले तर ते व्यापारी फक्त मलबारमध्ये स्थायिक झाले बरं का. कोचीन आणि त्रावणकोरमध्ये नाही का? याची तर्कसंगती कशी लावायची?
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »