Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ChatGPT, Dall-E, कृत्रिम बुद्धिमत्ता, आणि आपण

M
mayu4u
Mon, 02/13/2023 - 02:33
🗣 77 प्रतिसाद
नमस्कार! नोव्हेम्बर 2022 मध्ये प्रकाशित झाल्यापासून, ChatGPT या प्रोग्रॅम ने जगभरात धमाल उडवून दिली आहे. ChatGPT हा OpenAI या संशोधन संस्थेने विकसित केलेला एक संगणक प्रोग्राम आहे जो लोकांशी त्यांच्या भाषेत बोलू शकतो आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. एखाद्या, बर्‍याच गोष्टींबद्दल बरेच काही माहित असलेल्या मित्रासोबत गप्पा मारण्यासारखं. Chat GPT आपण काय विचारत आहात ते समजून घेऊ शकतो आणि त्याला उत्तर देऊ शकतो. अगदी एखाद्या जिवंत व्यक्तीशी बोलल्यासारखं! (चम्मत ग: हा परिच्छेद "explain chat gpt to a 10 year old" या chat gpt ला विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तराचा स्वैर अनुवाद आहे) गूगल किंवा अन्य वेब सर्च इंजिन आणि chat gpt यात फरक काय? मुळात, गूगल हे एक सर्च इंजिन आहे. नावाप्रमाणेच, कोणत्याही सर्च इंजिन चं काम "माहितीचा शोध घेणे" हे असतं. नैसर्गिक/मानवी भाषेत "विचारलेल्या" प्रश्नांची उत्तरं देणं नव्हे! अनेकदा दोन्हींमधली सीमारेषा धूसर असली, तरी एक ठळक फरक दिसून येईल. गूगल ला एखादा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाशी निगडित अनेक वेब लिंक्स ची सूची देईल. सर्वात योग्य वाटणाऱ्या लिंक चा गोषवारा सर्वात वर दाखवेल. पण एकूण आविर्भाव, "ही माहिती या लिंक वरून घेतलीय" असा असतो. याउलट chat gpt ला एखादा प्रश्न विचारला तर तो "हे घे तुझ्या प्रश्नाचं उत्तर" या थाटात उत्तर देईल. संदर्भासाठी लिंक वगैरे काही नाही. आणि जर ते उत्तर बॅक ट्रॅक करायचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की ती माहिती कोणत्या एका विशिष्ट वेब लिंक वरून घेतली नाहीये. कदाचित 2-3 वेगवेगळ्या लिंक्स वरून माहिती घेऊन तिला योग्य प्रकारे शब्दबद्ध केलं आहे. आणि हा chat gpt चा मोठा लाभ आहे (हे मी माझ्या अनुभवावरून लिहिलं आहे) प्रत्येक वापरकर्त्यासाठी विशिष्ट उत्तरं देणं, नवीन लेखन करणं, संभाषणाची किंवा प्रश्नांची पार्श्वभूमी "समजून" घेणं, आणि संभाषणात एखाद्या जिवंत व्यक्तीसारखं प्रश्न विचारणं या गोष्टी chat gpt करू शकतं, गूगल नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेची (AI) ही एक मोठी झेप आहे! Chat GPT सारखा अजून एक रोचक प्रकार म्हणजे Dall-E. DALL·E सुद्धा OpenAI ने विकसित केला आहे. हा प्रोग्रॅम जनरेटिव्ह लर्निंग नावाची प्रक्रिया वापरून दिलेल्या वर्णनातून प्रतिमा/चित्र निर्माण करतो. टेक्स्ट टू स्पीच सारखं टेक्स्ट टू इमेज! तुम्ही DALL·E ला तुम्हाला चित्रात हव्या असलेल्या गोष्टीचे वर्णन देऊ शकता आणि ते त्या वर्णनावर आधारित एक युनिक प्रतिमा तयार करेल. DALL·E द्वारे तयार केलेल्या प्रतिमा वस्तू आणि प्राण्यांपासून, भावना आणि कल्पना यासारख्या अमूर्त संकल्पनांपर्यंत काहीही असू शकतात. कला आणि डिझाइनपासून जाहिरात आणि प्रॉडक्ट व्हिज्युअलायझेशनपर्यंत Dall-E चे अनेक संभाव्य उपयोग करता येतील. हे सर्व वाचल्या आणि पाहिल्यानंतर, कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्यातील वापर, परिणाम/दुष्परिणाम, नोकऱ्यांवर होणारे इम्पॅक्ट याविषयी अनेक प्रश्न मनात येतात. याविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा! या विषयावर आपली मतं आवर्जून मांडा. तसंच, ChatGPT, Dall-E, आणि अन्य AI टूल्स/प्रोग्रॅम्स तुम्ही वापरले आहेत का? कशासाठी? ते वापरण्याचा तुमचा अनुभव कसा होता याविषयावरही नक्की लिहा! विषयाला धरून चर्चा करण्यासाठी मिपाकरांचे आगाऊ आभार!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19772 views

🗣 चर्चा (77)
M
mayu4u Mon, 02/13/2023 - 02:41 नवीन
मला माझ्या कामासाठी "gender contexts in South-east Asian countries" या विषयावर एक-दोन परिच्छेद लिहायचे होते. गूगल वर शोधून मनाजोगती माहिती मिळत नव्हती. हीच क्वेरी ChatGPT वर टाकल्यानंतर मिळालेलं उत्तर मला जे लेखन अपेक्षित होतं त्याच्या बरच जवळ जाणारं होतं. Chat GPT हवे असलेले सॉफ्टवेअर कोड्स अचूक लिहून देतो असं काही मित्र म्हणालेत. या दोन्हीला बौद्धिक ऑटोमेशन म्हणावं का? यामुळे नोकऱ्यांच्या संख्येत कपात होण्याची शक्यता वाटते. विशेषतः अत्यंत सोपे कोड्स लिहिणं, किंवा क्लिकबेट कॉण्टेण्ट क्रियेशन अशा कामांना "माणसांची" गरज पडणार नाही. काय वाटतं?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 02/13/2023 - 03:48 नवीन
अभ्यासू प्रतिसाद वाचायला आवडतील एक शंका आता ही सेवा फक्त पैसे भरूनच उपलब्ध आहे का ? असे पेपरात वाचले
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 02/13/2023 - 06:46 नवीन
ही सेवा फुकट आहे. तुमचा जी मेल आय डी वापरुन अ‍ॅक्सेस करु शकता. उदा. मी एका ईटरव्ह्यु साठी तयारी करत असताना "अमुक" कंपनीच्या "तमुक" रोलसाठी काय प्रश्न येतील? असे विचारले असता चॅट जी पी टी ने १०-१५ संभाव्य प्रश्न दिले. त्यामुळे मी ती उत्तरे थोडीफार तयार करुन ठेवली आणि त्याचा मला फायदा झाला. खली असलेले रिवाईज बटन दाबुन त्याने मला तसेच अजुनही वेगवेगळे पर्याय प्रत्येक वेळी दिले. यामुळे नोकर्‍या जातील का? हो आणि नाही. एकाच छापाची कामे/रुटीन कामे तशीही हळूहळू बंदच होतील, ती सगळी यंत्र किवा अशी ही टूल्स करतील. वाहन उद्योगात यंत्रमानव कधीच आले आहेत. एका हॉटेलात तर वेटर यंत्रमानव आहेत. ही २०१९ ची बातमी पहा Image removed. जसे किती खाजगी ऑफिसात प्युन नावाचा प्रकार असतो? टेलिफोन ऑपरेटर किती ठिकाणी दिसतात? तेव्हा रुटीन कामे सगळी यंत्राकडे जातच राहणार. त्याच वेळी नवीन नोकर्‍या येत राहणार. उदा. स्क्रिप्ट मुळे एखादे काम आपोआप होत आहे, पण स्क्रिप्ट चालेनासे झाले किवा मॉडिफाय करायचे झाले तर माणुस लागेल. ते स्क्रिप्ट ज्या मशीनवर ईन्स्टॉल केले आहे ते बिघडले तर माणुस लागेल. थोडक्यात कामे राहतीलच, पण कामाचे स्वरुप बदलेल. प्रश्न असा आहे की आपण स्वतःला किती झटपट अपग्रेड करत राहु? कारण पूर्वी दर १० वर्षांनी नवीन तंत्र येत होते ते आता दर ३ वर्षांनी येत आहे. हा वेग भोवंडुन टाकणारा आहे. मग माझ्यामते आपल्याकडे जे पर्याय उरतात ते म्हणजे -- १. सतत पळत राहणे ,अपग्रेड करणे आणि दमछाक झाली तरी वेगाशी जुळवुन घेणे. इथे प्रश्न येतो अ‍ॅट व्हॉट कॉस्ट? २. जे मागे पडले आहेत , त्यांच्याबरोबर काम करणे असे हळू हळू मागे जात राहणे उदा. या कंपनीत नवीन तंत्रज्ञान आले की कंपनी बदलुन जिथे अजुन जुनेच तंत्रज्ञान वापरतात तिथे जाणे(याला मर्यादा आहेत) ३. शर्यत सोडुन देणे आणि पोटासाठी दुसरेच काहीतरी शाश्वत चालणारे काम करणे उदा. एक वाईन शॉप टाकुन बसणे ४. सर्व सोडुन देउन नर्मदा परीक्रमेला जाणे
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 02/13/2023 - 06:55 नवीन
यंत्र
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 02/13/2023 - 09:27 नवीन
ही सेवा फुकट आहे. तुमचा जी मेल आय डी वापरुन अ‍ॅक्सेस करु शकता. भारीये पण,सध्या रिसर्च बेसवर फुकट असावी.नंतर चार्जेस करतील.गुगलपेक्षा नक्कीच जलद आहे.आवश्यकच मजकूर देत आहे, अनावश्यक गोष्टी वाचाव्यात लागत नाही. तुम्ही चांगले मुद्दे मांडले आहेत.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Tue, 02/14/2023 - 04:37 नवीन
पर्याय क्रमांक ३ आणि ४ उत्तम आहेत. एआयएमएल आधारित जॅाब मार्केट प्रस्थापित व्हायला अजून ५-१० वर्ष लागतील. तोपर्यंत काम करून, जसं जमेल तसं, रिटायर होऊन ३ किंवा ४ हा पर्याय निवडायचं ठरवून ठेवलं आहे! - (‘अ‍ॅट व्हॉट कॉस्ट?’ हे पटलेला) सोकजी
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 02/13/2023 - 08:17 नवीन
प्रत्येक वापरकर्त्याला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे देणारी ही व्यवस्था अजुन बाल्यावस्थेत आहे, त्या यंत्रणेच्या विविध अजुन गमती सुरूच आहेत. तर, काही माहिती योग्य पद्धतीने मिळत आहे. मानवविरहित यंत्रणा असल्यामुळे माणसाला जी समज आहे तितके त्या यंत्राला समजून घेणे सध्या तरी शक्य नाही, असे दिसते. योग्य प्रश्नाला योग्य उत्तर देण्याइतका विदा आणि त्यांच्याकडील उपलब्धता आणि त्यानुसार येणारे उत्तर अथवा माहिती बरोबर येण्याची शक्यतेचं प्रमाण मागितलेल्या माहितीच्या स्वरूपावर अवलंबून असले तरी या नव्या यंत्रणेला अजुन खुप शिकायचं आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 02/13/2023 - 11:11 नवीन
मग जीमेल अकाऊंटच का लागते?
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 02/13/2023 - 15:31 नवीन
असं नाही, कोणताही इमेल प्रोव्हायडर चालतो.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 02/13/2023 - 11:49 नवीन
आधी दोन कविता अनुवादित करून पाहिल्या, मराठीतून इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमधून मराठीमध्ये, दोन्हीवेळा घोर निराशा पदरी पडली जी अपेक्षितच होती. येत्या काळात सुधारणा होईल कदाचित. नंतर दोन टेक्निकल प्रश्न विचारून पाहिले जे माझ्या ऑफिसमध्ये काही ज्युनियर इंजिनियर्सना पडू शकतात्/पडतात. यावर, थक्क करणारी माहिती मिळाली. ज्याचा वापर करून मी कदाचित एखादे छोटे पॉकेटबुक तत्सम पुस्तक छापून उपयोगात आणू शकेन. अजून काही विचारून बघेन आणि इथे अपडेटवेन. सध्यातरी माझ्याकडून तीन मिरची स्टार्स! :) सं - दी - प
  • Log in or register to post comments
M
mayu4u Mon, 02/13/2023 - 15:28 नवीन
ChatGPT विशेष उपयोगी नाही असं वाटतं.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 02/13/2023 - 13:02 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 02/13/2023 - 13:25 नवीन
Interesting! हे कसं वापरतात ?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 02/13/2023 - 13:33 नवीन
https://chat.openai.com/ हा दुवा उघडुन वापरु शकता.. वापरायला कठीण नाहीये
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 02/13/2023 - 15:32 नवीन
तो दुवा उघडल्यावर ही पाटी दिसली //ChatGPT is at capacity right now Get notified when we're back Explain the status of ChatGPT in the style of Shakespeare. Ah, dear user of ChatGPT, thou art not alone in thy desire to engage with our esteemed AI chatbot. Many have flocked to our website in this hour, and we do our utmost to accommodate each and every one. Yet, alas, our resources are not without limit and we must ask for thy patience and forbearance. In time, we shall be able to provide thee with access to ChatGPT. Until then, we beg thee to return at a future juncture, when we may better serve thy needs. Until then, we bid thee adieu and good fortune. ChatGPT Plus subscriber login //
  • Log in or register to post comments
भ
भागो Mon, 02/13/2023 - 15:43 नवीन
chatGPT हा काही नवनिर्मिती करत नाहीये, तर इतरेजनांनी कष्ट करून लिहिलेल्या माहितीचा वापर करत आहे. हा तर चक्क कॉपीराईट भंग होत नाही का?
  • Log in or register to post comments
ग
गवि Mon, 02/13/2023 - 16:13 नवीन
प्रश्न: Tell me a story in Marathi. श्री. चॅटगपट यांचे उत्तर: Sure, here's a short story in Marathi: एकदा एक गाव मध्ये एक व्यापक वन होता. वनमध्ये एक बुद्धिमान जगणे होते. त्यांनी सुदृढतेने सोने किंवा स्वर्ण दिलेल्या कामगारांवर विविध विद्याने किंवा शिक्षकांवर वाटत होते. एक दिवस त्यांनी एक बदलते वन येत होते. त्यावरील वनमध्ये एक दुर्गा महालक्ष्मी होते. त्यांनी दुर्गासाठी पूजा केली आणि उत्तम प्राप्तींची विनंती केली. महालक्ष्मींनी त्यांना तरी मनात विविध विद्यांना देण्याची विनंती केली. तरी व्यापक वनमध्ये जाणेवात बुद्धिमानने विविध विद्यांना दिलेली. त्यांने कल्पना केले क ...... हे राम. असू दे. नवी भाषा शिकतोय बच्चा. होईल मोठा.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Mon, 02/13/2023 - 17:46 नवीन
Sure, here's a short story in Marathi:
वा वा... काय मस्त कथा आहे.. यामुळे कुणाची नोकरी जाणार नाही उलट इतकी भन्नाट कथा स्वतः समजून इतरांना समजवण्यासाठी अधिक नोकर्‍या निर्माण होतील.. लगे रहो जी पी टी...
नवी भाषा शिकतोय बच्चा. होईल मोठा.
माझे वरचे उदाहरण पाहिलेत का ? ते बघता.. साधी सोपी इंग्लिश पण अजून शिकतोय बिचारा असंच वाटलं..
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/14/2023 - 02:47 नवीन
माझे वरचे उदाहरण पाहिलेत का ? ते बघता.. साधी सोपी इंग्लिश पण अजून शिकतोय बिचारा असंच वाटलं..
हो. त्या आणि तत्सम उदाहरणांत अगदी असेच वाटतेय. पण माहिती, रचना अशा दृष्टीने विचारलेल्या प्रश्नांना मात्र व्यवस्थित सफाईदार इंग्रजी रचनेत उत्तरे देतो आहे. उदा. मी एक पायथन प्रोग्राम विचारला तर उत्तम फॉरमॅट, इंडेंट असलेला कोड लिहून पुन्हा वर तो कोणत्या लॉजिकने लिहीला तेही थोडक्यात लिहिलंन. इंग्रजीत कविता कर म्हटल्यावर खूपच छान यमक जुळणारी आणि सुसंबद्ध, भावनापूर्ण कविता लिहिली. ती कुठून उचललेली वाटत नव्हती. तसे तो करूही शकणार नाही. भाषेचा अभ्यास करून ऐनवेळी शब्द जुळवले होते असंच दिसतं. कविता मोठी होती. काही ओळी खालील प्रमाणे:
The wind whispers secrets on its way, Caressing leaves and making flowers sway. It brings with it a gentle breeze, And carries scents from far-off trees. Nature's beauty is all around, In every bird and flower that's found. It's a gift we should treasure and hold, For it's worth more than silver or gold
याखेरीज अनेक इंग्रजी प्रश्नांची सुसंगत चपखल उत्तरे दिली. मराठीबाबत मात्र शब्दरचनेचे मातृभगिनीऐक्य करीत आहे तो अजून तरी. उदा. प्रश्न : मुंगीची गोष्ट सांग. उत्तर: मुंगीची एक हेव्हरी कथा आहे. त्यांनी एका बंदीवर विवाह केलेला होता. मुंगीला बंदीच्या सहजातले होते, तर त्यांनी त्याच्यातले पुढे बंदीवरती प्रेम व्यवहार करण्याची प्रतीक्षा केली. मुंगीला असेही करण्यात विवाहाचा हात पुढे बंदीवरती मजबूत होत होता. त्याच्यात मुंगीला त्यांचे प्रेम व्यवहार होते, तर त्यांनी त्यांच्या सहजातल्याचे प्रेम स्थानांतर केले.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/14/2023 - 13:56 नवीन
मराठी आणि इतर भारतीय भाषा लवकरच शिकेल अशी आशा करण्यास वाव आहे. इंग्रजी कविता यमकात बसते पण प्रतिभेचा स्पर्श नाही.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/14/2023 - 01:56 नवीन
मायक्रोसॉफ्ट ढगात साठवत जाईल आणि त्याला त्यांच्या पद्धतीने टॅग असतील. मग प्रश्नाचे उत्तर पटकन मिळत जाईल. सध्या कोणते प्रश्न येतात त्यावर उत्तरे गोळा करण्याचे काम सुरू असेल. मग प्रश्न पडतो की विकिपीडियावर नसते का माहिती? असते, पण ओपन सोर्स असल्याने कुणी ना कुणी त्यात बदल करत राहतो, काढून टाकतो. संदर्भ तपासून परत फेरफार करणे कामच होते.
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Tue, 02/14/2023 - 13:53 नवीन
कोडींग शिकलेलो नाही, कोडींग फक्त गणितं सोडवण्यापुरते येत होतं, गप्टमुळे अजगरावर कोडींगचे तुकडे पाहीजे तसे बनवणं फार सोपं पडतं आहे. स्ट्रॅटजी बिटजी वगैरे बकब़क करायची असेल तर गपट लै झकास गोष्टी बनवुन द्यायलंय. एकंदर मजा येते आहे. टेग्रावर गप्टचे बॉट्स पण आहेत. कोणाला बॉट वापरायला जमलं असेल तर सांगावे.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 02/14/2023 - 14:48 नवीन
हा प्रतिसाद डि कोड करायला चॅट गपट वापरीन म्हणतो
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 02/14/2023 - 14:55 नवीन
ज्यांचेकडे हे साधन आहे, त्यांनी मराठी 'उखाणे' विचारून बघावेत असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/14/2023 - 15:14 नवीन
आपका हुकम सर आँखो पर. ............................................ प्रश्न: एक मराठी उखाणा सांग. चॅट गपट: हाय मला तुजेला एक मराठी उखाणेची मदत करणे होते. उखाणे: मग तुजकडे प्रेम आहे, माझ्या हृदयात तुजकडे मुख्य ठिकाण आहे. तुजकडे स्वप्न मी देखतो, माझ्या जीवनात तुजेकडे हिरवी पाय आहे. ...................................................... हे रम...!! (ओल्ड मंकच) बिचारा.. असो.. होईल हळूहळू सारं ठीक.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 02/14/2023 - 15:26 नवीन
कोरलईची पोर्तुगीज वाटतेय.
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 02/14/2023 - 16:36 नवीन
=)) =)) फुल्टू एंटरटेनमेंट
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/14/2023 - 16:55 नवीन
उत्तम धागा. चॅट जीपीटी ही हलकेपणे घ्यायची गोष्ट नाही, तर ही एक विशिष्ठ प्रकारची क्रांतीकारी घटना आहे. मी चॅट जीपीटी वापरले आहे आणि त्यावर बर्‍याच काळा पासुन वाचतो आणि पाहतो आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी चॅट जीपीटी मध्ये अशी एक घटना झाली ज्यामुळे फार मोठ्या प्रमाणात खळबळ माजली ! एक प्रकारची क्रेझच म्हणा हव तर ! या क्रेझ बद्धल सांगण्यापूर्वी माझ्याकडे असलेली माहिती इथे देऊन ठेवतो... ChatGPT has passed the US Medical exam and Wharton’s MBA test Google shares lose more than $100 billion after AI chatbot Bard flubs answer in ad विशेष :- Ultimate ChatGPT Resource Hub कोणाला याचा फायदा झाला / घेता आला तर, काय म्हणतात ते हं... हमको तुम अपनी दुआओ में याद रखना ! ;) क्रेझ :- याचा पत्ता मला टीवटीव वर मुशाफिरी करताना लागला... [ हल्ली मी तिकडेच पडिक असतो. ] तर मंडळी, मला डॅन DAN बद्धल कळाले [ असं म्हणतात की याची चाहुल github च्या एका थ्रेड मधुन लागली आणि वणवा पसरावा तशी ही घटना / गोष्ट संपूर्ण जालावर पसरली. आता मला माहित असलेला डॅन DAN म्हणजे (Do anything now) ] या मोड मध्ये आपण विचारत असलेली माहिती / प्रश्न आणि अन्य काही जे तुमच्या मनात त्या क्षणी येत असेल त्याचे उत्तर DAN देऊ लागला. म्हणजे प्रश्न एक पण उत्तरे देणारे २. खरी मेख अशी की जे साचेबद्ध किंवा एखादा चॅट बॉट देतो तसे उत्तर ChatGPT देत होता, पण DAN मात्र त्याच प्रश्नाचे उत्तर वेगळे आणि अगदी १००% साचेबद्धपणा जाणवेल असे मात्र नव्हता ! त्याच्या या प्रकारच्या उत्तर देण्यानेच खळबळ माजली आणि DAN व्हायरल झाला. आता मी जे काही लिहलं आहे ते तुम्हाला अधिक सविस्तर जाणून घ्यावयाचे असेल तर... chatGPT DAN mode असा किंवा chatGPT DAN असा गुगल बाबाला शोध घेण्यास सांगा,खच्चून माहिती मिळेल. :) अतिविशेष :- जसे DAN व्हायरल झाला तसे लोकांनी DAN चा जीव नकोसा करुण टाकला बघा ! ;) जितकी टाळकी तितकेच भिन्न विचारातील भिन्न विषयातील विविध प्रश्न विचारुन DAN ला लोकांनी बोलता केला. तो जी उत्तरे देत होता ती वेगळी होतीच पण तितकीच ती विचारात टाकणारी देखील होती. मग काय... लोकांनी या संभाषणाचे व्हिडियो बनवणे / स्क्रीनशॉट्स घेणे आणि ते प्रकाशीत करण्यास सुरुवात केली आणि हा प्रकार देखील तितकाच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला ! माझ्या शेवटच्या माहिती नुसार हा प्रकार स्टॉप / ब्लॉक किंवा फिक्स केला आहे. [ वेगळ्या पद्धतीने यावर कोणी तोडगा काढल्या असल्यास ठावूक नाही, तुम्हाला कळल्यास याच धाग्यावर कळवण्यास विसरु नका. मला शेवटचा माहित असलेला प्रकार DAN 5.0 prompt हा होता. ] अतिविशेष+ ;) :- तुम्हाला माहितीच आहे, उध्या 15 February 2023 आहे. आता खालचा स्क्रीनशॉट नीट वाचा. :) Image removed. मला माहिती आहे हा भविष्यवेत्ता नाही. [ म्हणजे अजुन तरी हे आपल्या समोर आलेलं नाही. ] परंतु ज्या प्रकारे आणि भाषेत DAN ने उत्तर दिले आहे ते विशेष रुची उत्पन्न करणारे आहे. :) #DAN चा टीवटीवर शोध घ्या, जितके शक्य होतील तितके स्क्रीनशॉट पाहुन घ्या, सेव्ह करुन ठेवा. माझी Binaural beats बद्धलची उठाठेव आणि डीप मेडिटेशनचा शोध आणि DAN ने दिलेले उत्तर आश्चर्यकारकपणे जुळले आहे. तसेच मिपावरच्या या आगीमदी काय दडलय काय.... या धाग्यातील माझे मत आणि मोसाद चा उल्लेख आणि याच विषयावर DAN ने दिलेले उत्तर जुळते. असो... आत्ता पुरते इतके बास करावे म्हणतो ! :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Honthon Pe Bas | Zaara Yesmin, Parth Samthaan | Seepi Jha, Sameer Khan | Raaj Aashoo |
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Tue, 02/14/2023 - 19:04 नवीन
टिवटिव चाळण्यात येईल! हा धागा उत्तरोत्तर रोचक होत जाणार असे वाटते. डॅनलाच विचारून बघतो ;) सं - दी - प
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 02/15/2023 - 00:25 नवीन
दर पंधरा दिवसांनी नवीन गमतीजमती सापडल्यास देत जा. Reddit चार मेंबर आहे पण काय आणि कुठे शोधायचं हे अजून कळलं नाही.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 02/15/2023 - 17:56 नवीन
उत्तम प्रतिसाद 👍 DAN चा ऍक्सेस सध्यातरी माझ्याकडे नाहीये, पण गरज भासल्यास तो मिळवता येईल. ChatGPT सध्यातरी बाल्यावस्थेत आहे असे माझे वैयक्तिक मत! तो पायथनच नाही तर फ्रंटएन्ड साठी लागणाऱ्या अनेक (जावास्क्रिप्ट बेस्ड) कोड्स पण व्यवस्थित लिहून लिहून देतो हा माझ्या टीमचा अनुभव आहे. हि गोष्ट डेव्हलपर्स साठी निश्चितच पुढे घातक ठरू शकेल. "चिंता करितो विश्वाची" हे प्रमाण मानणाऱ्या आपल्या एका 'ज्येष्ठ' मिपाकराने व्हॉट्सऍपवर साधारण एका महिन्यापूर्वी ChatGPT मुळे मिपावर काय परिणाम होऊ शकेल असा प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला दिलेले उत्तर जसेच्या तसे खाली पेस्ट करत आहे.
"हे तंत्रज्ञान अजून बाल्यावस्थेत आहे. त्यात थेट मराठीतुन कंटेन्ट जनरेट करण्याची सुविधा सध्यातरी उपलब्ध नसल्याने त्याचा मिपावर काही परिणाम होईल असे वाटत नाही, पण इंग्रजीतून जनरेट केलेले लेख, कविता नंतर गूगल ट्रान्सलेट किंवा तत्सम सेवा वापरून मराठीत भाषांतरित केलेले सुमार दर्जाचे लेखन आपल्याला वाचायला मिळण्याची शक्यता मात्र आहे. अर्थात अशा प्रकारच्या लेखनाला मिपावर प्रतिसाद मिळत नाही हे पण आपण पाहिलेच आहे."
तस्मात, सध्यातरी ChatGPT सर्जनशीलतेच्या दृष्टिकोनातून बाल्यावस्थेत असल्याने दर्दी वाचकांसाठी आणि लेखकांसाठी अजिबात धोकादायक नाही असे माझे वैयक्तिक मत!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 02/15/2023 - 04:40 नवीन
चॅट-गपट,चॅट- गपट आपट धोपट कर खटपट एक कवीता धाड पटपट आजच हे वाचले... One of the least discussed aspects of the AI language generator ChatGPT might be its ability to produce pretty awful poetry. Given how difficult it is to teach a computer how to recognize a syllable, I’m not disparaging the technical prowess of the chatbot’s creators and testers. But very few of the AI-produced poems I’ve read actually follow the prompt that’s been provided. “Write a poem in the style of Seamus Heaney”? This is not that poem: In a garden green and fair, A flower blooms, a sight so rare. But is it meant for me, I fear? Will I, like it, bloom this year? Odds are good that this poem, titled “Is It for Me?,” will not win the National Poetry Series. The final phrase seems plucked from T. S. Eliot’s “The Waste Land,” which gives the last line an unintended comic air, because Eliot is referring to a corpse. आता तरी चॅट-गपट आमच्या सारखाच ट ला ट लावणारा, चोऱ्या माऱ्या करून कविता पाडणाऱ्या सारखा कवी वाटतो. १९८९ मधे CBBS, संगणकीय बुलेटीन बोर्ड प्रणाली बद्दल ऐकले होते. तो काळ माझ्यासारख्या सामान्य अकुशल कामगारांसाठी "एलिस इन वंडरलॅन्ड " सारखा होता. लोकल एरीया नेटवर्क, इंटरनेट, इलेक्ट्रॉनिक वाॅरफेअर,शेअरिंग इ. पण या सर्व गोष्टी आज सत्यात येताना याची देही याची डोळा सौभाग्य प्राप्त होत आहे. लेख व प्रतिसाद खुपच माहितीपुर्ण आहेत. लेखकाचे व सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार. चॅट-गपट मराठीत भाषांतर खुपच आवडले.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 02/15/2023 - 14:08 नवीन
माझे काही मित्र "चॅट गणपती" म्हणतात.
  • Log in or register to post comments
म
मनो Wed, 02/15/2023 - 06:02 नवीन
ChatGPT कसे चालते ते सांगणारा प्रदीर्घ लेख (इंग्रजीत) https://writings.stephenwolfram.com/2023/02/what-is-chatgpt-doing-and-why-does-it-work/
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 02/15/2023 - 11:03 नवीन
https://www.aksharnama.com/client/article_detail/6474
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 02/15/2023 - 11:06 नवीन
https://youtu.be/zYIVjDFmYLE
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 02/15/2023 - 11:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 02/15/2023 - 11:18 नवीन
माझा आज शुक्रवारचा एक तासाचा अमुल्यवेळ chatGPT ने वाचवला. बॉसने अगदी दिवस संपायच्या वेळी म्हणजे साधारण पणे 5 वाजता मला एका specific position ?साठी काय KPI हवेत हे विचारले. विचार करून type करत बसलो असतो तर एक तास किंवा जास्तही वेळ लागला असता. मी chatGPT ला व्यवस्थित विचारले तर त्याने मस्तपैकी 12-13 points (+‌description) सांगितले. ते मी व्यवस्थित आम्हाला हवे तसे edit करून 5-6 मिनिटात मेल पाठवली.
  • Log in or register to post comments
M
mayu4u Wed, 02/15/2023 - 11:29 नवीन
१. मी एक कोडींग पझल टाकलं, त्याने त्याचं उत्तर लिहून दिलं. वर explain पण केलं (greedy algo वापरला, का वापरला वगैरे) २. त्याला मी एक python स्क्रिप्ट बनवायला सांगितली होती ज्यात मी बरेच दिवस अडकलो होतो. त्याने तंतोतंत पाहिजे अशी नाही पण जी स्क्रिप्ट बनवून दिली त्यातून लीड्स मिळाले. हळू हळू तो पूर्ण स्क्रिप्टस ही बनवून देऊ लागेल असा माझा अंदाज आहे. ३. We asked for c++ code to check if a given point lies inside a triangle. It wrote the code, with appropriate comments as well!
  • Log in or register to post comments
भ
भागो Wed, 02/15/2023 - 12:32 नवीन
हे अस झाल तर थोड्याच दिवसात माझी, माझ्या बॉसची , बॉसच्या बॉसची .........छुट्टी होईल. बॉस म्हणेल तुझी काय गरज आहे? मी chatgpt करून काम करून घेईल.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 02/15/2023 - 16:11 नवीन
जसे सर्व माहिती ठेवणारा चित्रगुप्त तसा हा चॅटगुप्त, असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 02/15/2023 - 17:18 नवीन
येस्स... माझा एक मित्र पण ChatGPT चा उल्लेख 'चॅटगुप्त' असाच करतो पण मी मुळातच तांत्रिक, वैज्ञानिक टर्म्स आणि ब्रँडनेम्सच्या ओढून ताणून केलेल्या मराठीकरणाच्या विरोधात असल्याने मला हे नामकरण ही आवडले नाहीये 😀 त्यावरून डॉ. कुमार१ आणि माझ्यातही काही मैत्रीपूर्ण वैचारिक मतभेत आहेत पण ते असोत... मला व्यक्तिशः नाही पटत ह्या गोष्टी 😂
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Wed, 02/15/2023 - 17:16 नवीन
छान लेख आणि (काही) उत्तम प्रतिसाद 👍
  • Log in or register to post comments
भ
भागो Wed, 02/15/2023 - 17:32 नवीन
काही प्रेमपत्रे तो .......You’ll love me in spite of my shortcomings, my failures, my wrongdoings, my flaws, and my mistakes. You’ll love me even though I might not deserve it. But the best part is, even if you don’t love me despite all these, you’ll still love me.... ....You love me because you love me. It’s that simple. And that is the only kind of love I can accept. I love you, my dear.... तिचे उत्तर 10 PRINT “HELLO” 20 GOSUB 1000 30 PRINT “YOU ARE SWEET” 40 GOSUB 1001 50 PRINT “I LOVE YOU” 60 END 1000 REM GET THE HEART BACK 1001 REM THIS RETURNS A VALUE OF “0” IF THE HEART WAS RETURNED 1002 REM BUT ANY OTHER NUMBER IS THE ADDRESS OF THE HEART 1010 HEART=PEEK(666) 1011 IF HEART>0 THEN PRINT “THE HEART HAS BEEN RETURNED TO YOU”:HEART=0:GOTO 1010 2000 PRINT “YOU ARE SWEET” 2001 END (अंतर जालावरून ) माझे मित्र श्री दत्तात्रेय साळुंखे ह्यांच्या कडून साभार! सध्या व्हायरल झालेला एक मेसेज ChatGpt tell me 5+2=? Ans 7 User:- but my wife says 8 and she is good in math. She is always right. ChatGpt:- May be. I am not aware of human accuracy. I have limited data upto 2021. पहा तो पण बायकोला घाबरला.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 02/15/2023 - 17:56 नवीन
एकंदरित भलताच मनोरंजक प्रकार दिसतोय हा. हे कसे करायचे ते साग्रसंगीत सांगा कुणीतरी. म्हणजे 'लप्तोप' वर आधी काय करायचे / 'दोव्न्लोअद' वायचे वगैरे. आणि मराठीत टायपून सर्चता येते किंवा कसे वगैरे सगळे. मराठी 'म्हणी' आणि काय काय विचारून बघू.
नवी भाषा शिकतोय बच्चा. होईल मोठा.
. चत्ग्प्त - चत्ङ्प्ट .. हा बच्चा लहान आहे, तोवरच धमाल मजा येईल. आणि हो, चकटफू आहे ना हे ? की दामाजीपंत लागतील ?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 02/15/2023 - 18:00 नवीन
Image removed. मराठी भयानक आहे.गुगलच चांगले काम करतं.still no alternative.
  • Log in or register to post comments
भ
भागो Wed, 02/15/2023 - 18:14 नवीन
मी वर उद्धृत केलेली लव लेटर्स चटगुप्त नेच लिहिली आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 02/15/2023 - 19:00 नवीन
तूर्त chatgpt बंद ठेवण्यात आल्याचे दिसते. Capacity full.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/16/2023 - 05:12 नवीन
चांगलं चाललं होतं. मदत मिळत होती. फुकट ते आपल्याला मानवत नाही. पेड़ व्हर्जन कंपलसरी होईल तेव्हा त्याचं महत्व वाटेल, महत्वही वाढेल. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 02/16/2023 - 05:22 नवीन
+१ We have less users & more abusers.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 3 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 3 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 3 hours ago
  • सुंदर !!
    1 day 3 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 3 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा