Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • धागा भरकटण्याचा धोका
  • तरीही....(विडंबन)
  • सैल धागे
  • टवाळी
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • ऑपरेशन अबॉर्शन
  • मी कोण? - एक प्रयोग
  • आयटी मधली नोकरी आणि पन्नाशीतील पिढी !
  • क्लीन बोल्ड
  • गोल्डमेडल
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

आली जरी रात सजणी...

D — Deepak Pawar, Mon, 12/19/2022 - 06:08
आली जरी रात सजणी पण नभी हे चांदणे तुझिया मनातील गुज मज सांगती तव कंकणे. हा गार वारा बिलगता झाकता तू लोचने हे मेघ ही बरसले तव पाहता ते लाजणे. का डोलती या लता? ही वाट झाली धुंद का? तू चालता छेडताती सुर तुझी ती पैंजणे. डोळ्यात डोळे मिसळुनी तू मला गे पाहता नाही जरी बोललो हृदयात या झंकारणे. रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे. . . दीपक पवार.

  • Log in or register to post comments
  • 3272 views


वाचनखूण लावा
| 3272 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/19/2022 - 10:23 नवीन
आवडली कविता. लिहिते राहावे....!
रेंगाळतो दीस माझा रूसुनी बसताच तू तेव्हा मला आवडे ना ते तुझे गे वागणे.
अर्रर्र...! हे तर लै त्रासदायक. कचाकचा भांडण परवडलं पण, त्यांचे ते 'रुसणे' बाप रे....! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Tue, 12/20/2022 - 04:50 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Tue, 12/20/2022 - 07:18 नवीन
सरांशी सहमत. वपुंनी सांगितल्याप्रमाणे स्त्रीयांचे सगळ्यात प्रभावी अस्त्र म्हणजे अबोला. कविता आवडलीच पण तव ,गे ह्या शब्दांमुळे जुन्या काळातल्या कवीने लिहिल्यासारखी वाटली.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 12/20/2022 - 06:38 नवीन
तुमची कवीता आवडली. डोक्यात एक विचार चमकून गेला..... दिपक पवार काॅलेज कुमार डोक्यात घोळतो एकच विचार ती सध्या कुठे असते ती सध्या काय करते मस्त हलकेच घ्या.
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Tue, 12/20/2022 - 09:45 नवीन
कर्नलतपस्वी सर,कानडाऊ योगेशु सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भागो Tue, 12/27/2022 - 12:40 नवीन
ही पण आवडलीच!
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Tue, 12/27/2022 - 13:39 नवीन
भागो सर मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 19 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 20 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 23 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 26 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सुहास गदादे
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 14:58
  • सदस्य: Anandsam
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 13:29
  • सदस्य: SUNILKUMAR PANDE
    नोंदणी: Sun, 05/14/2023 - 19:46
  • सदस्य: Shaileshp
    नोंदणी: Fri, 05/12/2023 - 06:37
  • सदस्य: Rohit Gaidhani
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 15:38
  • «
  • ‹
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा