Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

फिफा विश्वचषक २०२२

प
प्रचेतस
Tue, 11/22/2022 - 13:48
🗣 142 प्रतिसाद
मिपावर फुटबॉल विश्वचषकाचा धागा किंवा त्यावर चर्चाही कशी नाही याचे आश्चर्य वाटले त्यामुळे आपणच त्याविषयी धागा काढू असा विचार केला. अपेक्षेप्रमाणे गट फेरीत त्या त्या गटातील बलाढ्य संघांनी विजय मिळवला पण आज अनपेक्षितरित्या मेस्सीच्या अर्जेन्टिनाला दुबळ्या सौदी अरेबियाने २-१ असा झटका दिला. मात्र त्यांच्या गटातील इतर दोन संघ मेक्सिको आणि पोलंड असल्याने त्यांना हरवण्यास अर्जेन्टिनाला फारशी अडचण येणार नाही असे वाटते. विश्वचषक 2022 चे पूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळापत्रकानुसार) गट फेरी 20 नोव्हेंबर 2022 - कतार वि इक्वाडोर, रात्री 9.30, अल बायत स्टेडियम - 21 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध इराण संध्याकाळी 6:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 21 नोव्हेंबर 2022 - सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स रात्री 9:30 अल थुमामा स्टेडियम 22 नोव्हेंबर 2022 - यूएसए वि वेल्स, पहाटे 12.30, अल रेयान स्टेडियम 22 नोव्हेंबर 2022 - डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 22 नोव्हेंबर 2022 - मेक्सिको विरुद्ध पोलंड रात्री 9.30 स्टेडियम 974 23 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया दुपारी 3.30 लुसेल स्टेडियम 23 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहाटे 12.30, अल जानोब स्टेडियम 23 नोव्हेंबर 2022 - जर्मनी विरुद्ध जपान संध्याकाळी 6.30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 23 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध कोस्टा रिका रात्री 9.30 अल थुमामा स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया दुपारी 3.30 अल बायत स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध कॅनडा, पहाटे 12.30 अल रेयान स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून दुपारी 3:30 अल जानोब स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 24 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल वि घाना रात्री 9.30 स्टेडियन 974 25 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध सर्बिया पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम 25 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इराण, दुपारी 3.30, अल रेयान स्टेडियम 25 नोव्हेंबर 2022 - कतार विरुद्ध सेनेगल 6:30 अल थुमामा स्टेडियम 25 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध इक्वाडोर रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध यूएसए, पहाटे 12:30, अल बायत स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.30 PM अल जानूब स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी 6.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 26 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क रात्री 9.30 स्टेडियन 974 27 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको पहाटे12:30 लुसेल स्टेडियम 27 नोव्हेंबर 2022 - जपान विरुद्ध कोस्टा रिका दुपारी 3:30 PM अल रेयान स्टेडियम 27 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध मोरोक्को 6:30 PM अल थुमामा स्टेडियम 27 नोव्हेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध कॅनडा रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध जर्मनी, पहाटे 12.30, अल बायत स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - दक्षिण कोरिया वि घाना संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 28 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड संध्याकाळी 6.30 स्टेडियन 974 29 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम 29 नोव्हेंबर 2022 - इक्वाडोर विरुद्ध सेनेगल रात्री 8:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 29 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री 8.30, अल बायत स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - इराण विरुद्ध यूएसए पहाटे 12:30 अल थुमामा स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इंग्लंड, पहाटे 12:30, अल रेयान स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क रात्री 8:30 अल जानूब स्टेडियम 30 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स 8:30 एज्युकेशन सिटी स्टेडियम 1 डिसेंबर 2022 - पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, पहाटे12:30 , Stadion 974 1 डिसेंबर 2022 - सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको 12:30 लुसेल स्टेडियम 1 डिसेंबर 2022 - कॅनडा विरुद्ध मोरोक्को रात्री 8:30 अल थुमामा स्टेडियम 1 डिसेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम रात्री 8.30 वाजता अल रेयान स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - जपान विरुद्ध स्पेन पहाटे 12:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30 वाजता, अल जानोब स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 2 डिसेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध ब्राझील पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम 2 डिसेंबर 2022 सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड पहाटे 12:30 स्टेडियन 974 बाद फेरी- १६ सामने (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 3 डिसेंबर 2022 A विरुद्ध 2B खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम रात्री 8.30 वाजता 4 डिसेंबर 2022 - 1C विरुद्ध 2D पहाटे 12:30 अल रेयान स्टेडियम 4 डिसेंबर 2022 - 1D वि 2C रात्री 8:30 PM अल थुमामा स्टेडियम 5 डिसेंबर 2022 - 1B वि 2A पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम 5 डिसेंबर 2022 - 1E विरुद्ध 2F रात्री 8:30 PM अल जानौब स्टेडियम 6 डिसेंबर 2022 - 1G विरुद्ध 2H पहाटे 12:30 उशीरा, स्टेडियन 974 6 डिसेंबर 2022 - 1F विरुद्ध 2E, रात्री 8:30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 7 डिसेंबर 2022 - 1H विरुद्ध 2G पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम उपांत्यपूर्व फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 9 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम 10 डिसेंबर 2022 - दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम 10 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, अल थुमामा स्टेडियम 11 डिसेंबर 2022 - रात्री 12:30 उशिरा, अल बायत स्टेडियम उपांत्य फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 14 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30 , अल बेयट स्टेडियम 15 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30, लुसेल स्टेडियम तिसरे स्थान सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 17 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम अंतिम सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार) 18 डिसेंबर 2022 - रात्री 8:30, लुसेल स्टेडियम

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 34432 views

🗣 चर्चा (142)
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/18/2022 - 17:47 नवीन
फ्रांसचे दोन गोल. म्याच् मधे मजा वाढली -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 12/18/2022 - 17:54 नवीन
एम्बापेची फुल स्ट्रेच किक प्रेक्षणीय होती.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 12/18/2022 - 18:02 नवीन
आता धसमुसळा खेळ चाललाय, जिरुडला बाकावर बडबड केली म्हणून पिवळे कार्ड मिळाले.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/18/2022 - 18:05 नवीन
हे लैच भारी होतं. आवडलं. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/18/2022 - 18:08 नवीन
पीतपत्रांचा पाऊस पडतोय. आता बहुतेक काही जणांना ताम्रपत्र प्रदान होईल.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/18/2022 - 18:06 नवीन
फ्रान्सचा अविश्वसनीय खेळ. मुख्य वेळात सामना २-२.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 12/18/2022 - 18:25 नवीन
फायनल हरल्यानंतर हताश चेहऱ्याचा मेस्सी बघून अतिशय वाईट वाटले होते. ते तसे यंदा होऊ नये हीच इच्छा! सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/18/2022 - 18:31 नवीन
अप्रतिम गोल. तीन-दोन. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 12/18/2022 - 18:32 नवीन
हा गोल खरंच भारी होता, ऑफसाईड मिलीमीटरने हुकली
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 12/18/2022 - 18:39 नवीन
हाताला बॉल लागल्याने पेनल्टी ३-३
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/18/2022 - 18:42 नवीन
०३ - ०३ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 12/18/2022 - 18:45 नवीन
पेनल्टी शूट औटचा तान घेऊ नका आता, झोपा, उद्या पेपरला रिझल्ट पहा,
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 12/18/2022 - 18:46 नवीन
आता पेनल्टी शूटआऊट
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 12/18/2022 - 18:57 नवीन
अर्जेंटीना विश्वविजेता..०४ - ०२ -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 12/18/2022 - 18:57 नवीन
मेस्सीच्या खात्यात वर्ल्डकप, आता खऱ्या अर्थाने लिजेंड होईल.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 12/18/2022 - 20:04 नवीन
तुम्हारा रोनाल्डो झिंदाबाद है इससे हमें कोई ऐतराज नहीं पर हमारा मेस्सी झिंदाबाद था, झिंदाबाद है और झिंदाबाद रहेगा! ;) सं - दी - प
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 12/19/2022 - 03:10 नवीन
हा हा ! copied.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 12/18/2022 - 19:08 नवीन
मेस्सी नंबर १० अल्वेज rock :) :)
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sun, 12/18/2022 - 20:11 नवीन
तोंडावर ऑक्सीजन मास्क लावायची वेळ आणली ह्या मॅचने. मेस्सी हरला असता तर उद्या ऑफिसवर काय तोंड घेऊन गेलो असतो. एंबाप्पेचा खेळ चांगला झाला पण पहिल्या हाफमध्ये तर कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये सुद्धा नाही आला अन्यथा निकाल फ्रान्सच्या बाजूने लागण्याची शक्यता होती. असो, मेस्सी अखेरच्या वर्ल्ड कप मध्ये यशस्वी ठरला आणि तेही स्वतःच्या हिमतीवर, हा ठेवा आयुष्यभर पुरेल. ____/\____ सं - दी - प
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 12/19/2022 - 03:09 नवीन
बाडिस!आयुष्यभर पुरेल. माझं तर ह्रदयच तुटलं असतं.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/19/2022 - 10:11 नवीन
पहिल्या हापमधे अर्जेंटीनाच्या सर्वच खेळाडुंची बॉलवर पकड होती. पहिल्या हाफमधे जेव्हा दोन शुन्यने अर्जेंटीनाने आघाडी घेतली तेव्हा आता अर्जेंटीना जिंकणारच असे वाटले होते. पण दुस-या हाफमधे जरा अर्जेंटीनाचा कंफिडन्स जास्तीचा वाढला आणि बॉलवरची पकड सैल झाली आणि मग कॅमे-याच्या फ्रेममधे एंबाप्पे दिसायला लागला आणि त्याने तीन गोलही केले. आता तो फार दिसू नये असे वाटायला लागले इतका शेवटच्या काही मिनिटात फ्रान्सचा परफॉर्म्स उंचावला. फ्रान्सला मिळालेली पेनल्टी, त्यांनी केलेला दुसरा तिसरा गोल अप्रतिम होते तेव्हा अर्जेंटीना मैदानावरच नाही असे वाटावे इतका तो खेळ दर्जेदार झाला. पेनल्टीशुटाऊटमधे अर्जेंटीनाच्या गोलकिपरने एक गोल वाचवला आणि एक किक बाहेर गेली त्यामुळे अर्जेंटीना जिंकली. विश्वचषक सामन्याचा अंतिम सामना रोमहर्षक झाला. एक प्रेक्षक म्हणून आपल्याला अंतिम सामन्याचा उच्च आनंद लुटता आला. अर्जेंटीना जिंकावी असे वाटत होते आणि जिंकली म्हणून तो क्षण आयुष्यभरासाठी साठवता आला. जे जे सामने बघता आले ते ते सर्व सामने अप्रतिम होते. मजा आली. आता पुढील विश्वचषकाची फक्त वाट पाहणे...! धागालेखकाचेही आभार. वेळापत्रक दिल्यामुळे सामने पाहता आले. चर्चा करता आली, मजा आली. सर्वांचे तहेदिलसे शुक्रिया. आभार. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 12/19/2022 - 10:28 नवीन
पहिला पेनल्टी वादग्रस्त होता असे वाटते. क्षणचित्रे येथे पाहा, कदाचित हा पेनल्टी दिला नसता तर निकाल काही वेगळाच लागू शकला असता असे वाटते. ग्रिझमन, जिरुड फेल गेले, एम्बापे सेकंड हाफमध्ये कमालीचा खेळला.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/19/2022 - 10:40 नवीन
पळत्या खेळाडूला डीमधे धक्का लागला आणि तो पडला. फूटबॉल खेळाडू काहीही निमित्त करुन पडतात नाटकं करतात हे खरं असलं तरी तो पेनल्टी दिला गेला. तसेच ७८ व्या मिनिटाला फ्रान्सला दिलेला पेनल्टीही तसाच वादग्रस्त वाटावा इतका तो फूळ्ळक होता. पण, खेळ म्हटला की जर तर चालायचेच. जिरुडला तर बाकडावर बसल्यावर यल्लो कार्ड दाखवले. माय गॉड हहपुवा झाली. बाकी एम्बापे सेकंड हाफमधे लै जबरा खेळल्या इतक्याच मताशी सहमत आहे. बाकी फ्रान्स हरल्यामुळे फ्रान्सचे चाहते म्हणून तुमचं दु:ख समजू शकतो. काळजी घ्या तब्येतीला जपा. (ह. घ्या) ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 12/19/2022 - 11:20 नवीन
फ्रान्सचा चाहता असल्याचा प्रश्नच नाही, तसंही फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात, बहुतेक सारे स्थलांतरीतच आहेत, शिवाय त्यांची विशिष्ट अशी लकब नाही, नजाकत नाही, ताकद आणि स्टॅमिना मात्र प्रचंड. बाकी अर्जेटीना जिंकल्यामुळे तुम्हाला झालेला आनंद समजू शकतो.
  • Log in or register to post comments
T
Trump Mon, 12/19/2022 - 17:58 नवीन
फ्रान्सचा चाहता असल्याचा प्रश्नच नाही, तसंही फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात, बहुतेक सारे स्थलांतरीतच आहेत, शिवाय त्यांची विशिष्ट अशी लकब नाही, नजाकत नाही, ताकद आणि स्टॅमिना मात्र प्रचंड. बाकी अर्जेटीना जिंकल्यामुळे तुम्हाला झालेला आनंद समजू शकतो.
मुळचे फ्रेंच म्हणजे गोरे का? कृपया हा वर्णद्वेष सोडावा.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 12/20/2022 - 01:29 नवीन
अज्ञः सुखमाराध्यः सुखतरमाराध्यते विशेषज्ञः । ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्मापि तं नरं न रञ्जयति ॥
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 12/19/2022 - 02:28 नवीन
मा(बा)पे चांगलाच खेळाडू. त्यांच्यामुळेच फ्रान्सला टिकता आलं. पेनल्टी किकांना पर्याय सुचवतो. तीन वि. तीन खेळाडुंना सहा मिनिटे खेळायची संधी द्यायची आणि ठरवायचे. हा इमेल कुणीतरी फिफा'ला करा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/19/2022 - 09:52 नवीन
Image removed. आपला फेवरेट या टूर्नामेंटमधला. माझा भौ. ;) ( छायाचित्र जालावरुन) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/19/2022 - 09:54 नवीन
Image removed. पेनल्टीशुटाऑउटमधे एक किक गोल पोष्टबाहेर गेली आणि एक वाचवली म्हणून इतकी मस्ती तर येणारच...! :) (छायाचित्र जालावरुन) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/19/2022 - 10:02 नवीन
Image removed. (फिफावरुन) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 12/19/2022 - 10:31 नवीन
तुमच्या भावाने तो काळा कोट का बरे घातलाय?
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 12/19/2022 - 11:34 नवीन
हा... हा... =)) सं - दी - प
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/19/2022 - 12:45 नवीन
कतारच्या किंवा फूटबॉल संघ संयोजकांच्या शास्त्रात-मनात एखाद्याचा सन्मान करायचा असल्यास अशी वस्त्रे घालण्याचा प्रघात असावा. बक्षीस वितरणप्रसंगी त्यांना अशी वस्त्र घालून सन्मानाने विश्वचषक सोपवण्यात आल्याचे दृश्य काल दूरदर्शनवर बघितले. अधिकृत माहिती नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 12/21/2022 - 18:30 नवीन
बिश्ट काय आहे? कतार टूर्नामेंट आयोजन समितीचे महासचिव हसन अल थवाडी यांनी बीबीसी स्पोर्ट्सला सांगितलं की, हा अधिकृत समारंभासाठी परिधान करावयाचा पोशाख आहे. मेस्सीच्या विजयातील योगदानासाठी त्याला हा पोशाख देण्यात आला. त्यांनी पुढे सांगितलं, वर्ल्ड कप हा आमच्यासाठी अरब विश्व आणि मुस्लीम संस्कृतीला जगाला जोडणारा दुवा आहे. मेस्सीला देण्यात आलेला हा पोशाख फक्त कतारतर्फे नाही तर या भागात आयोजित महोत्सवाचं प्रतीक आहे. मेस्सीला जो पोशाख देण्यात आला त्याला बिश्ट असंही म्हणतात. अरब देशांमधला हा एक सांस्कृतिक पोशाख आहे. खास प्रसंगीच हा पोशाख घातला जातो. रविवारचा अर्जेंटिनाचा विजय मेस्सीच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे. हे लक्षात घेऊनच त्याला हा पोशाख देण्यात आला. जाळीदार असा काळा-सोनेरी रंगाचा हा पोशाख आहे. ( माहिती जालावरुन साभार) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 12/22/2022 - 04:13 नवीन
माहितीबद्द्ल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 12/22/2022 - 06:24 नवीन
पोशाखच्या माहितीसाठी धन्यवाद सर. पण ते अजिबात नाही आवडलं,ती काय वेळ होती का बिश्ट देण्याची.आमचा मेस्सी बघा किती समजूतदार ,आदर ठेवला त्यांचा.खेळ संस्कृती आहे पण उगाच ग्लोबल मार्केटिंग बिश्ट द्वारे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 12/22/2022 - 15:25 नवीन
मॅडमजी...आता काय बोलायचं...! आपल्या मताशी सहमत आहे. आपण जो मार्केटींगचा उल्लेख केलाय ना, ते आता जगभर सुरुच आहे. खेळ आणि खेळभावना वाढीस लागाव्या अशा गोष्टी व्हायला पाहिजेत असं आपल्याला वाटत असतं. पण, काही तरी नेमकं वेगळ करणारी मंडळी जगभर दिसून येतेच येते. म्हणजे आपल्या पुण्यात स्पर्धा झाल्या असत्या तर आपण सर्व खेळाडुंना पगड्या घातल्या असत्या. द्वारकेत वगैरे झाल्या असत्या या स्पर्धा तर, मोरपीसाच्या टोप्या खेळाडूंना घातल्या असत्या. शंक फुंकले गेले असते.....त्या त्या भागाच्या परंपरा संस्कृती, इतिहास-भूगोल. दंतकथा त्यातली प्रतिकं अशावेळी हटकून बाहेर येतात आणि मग काय बिघडलं असं सुरु होतं. अर्थात हे कशासाठी ? सांगायची गरज पडत नाही. आता बघा, अंतिम सामना बघीतल्यावर सामना अर्जेंटीनाने जवळ जवळ एक हाती जिंकलाच होता. ऑलीव्हर जिरु, देम्बले मैदानाबाहेर आलेले होते. फ्रान्सच्या संघाच्या कपड्याच्या बॅगा भरल्याच होत्या. देहबोली हरलेली दिसत होती. पण सामना संपायला वीसेक मिनिटे बाकी होती तेव्हा कॅमाविंगा आणि किंगज्ले मैदानात उतरले आणि इतका वेळ कुठेच नसलेल्या एम्बापेचा प्रतिकार असा काही वाढला की आता अर्जेंटीना खपले असे वाटले. एम्बापेने पहिला पेनल्टीचा जाऊद्या पण दुसरा केलेला गोल अविश्वसनीय अप्रतिम होता. हं तर, आपण बोलत मार्केटींगबद्दल. फ्रान्स हरले. तर, सामना संपल्या नंतर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे सहानुभूती दाखवायला आले. मला वाटतं ते एम्बापेशी संवाद करीत आहे, आणि एम्बापे दूर कुठेतरी पाहतोय असा एक फोटो वृत्तपत्रात आला होता. मॅक्रॉन यांनी आपल्या प्रचारासाठी संघाचा वापर केला अशी टीका नंतर झालेली बघायला मिळते. एम्बापे दुस-या संघाकडून खेळणार होता आणि मॅक्रॉन यांनी त्याच्यावर दबाव आणला अशी एक बातमी होती. वर एका प्रतिसादात माझ्या मिपाकर मित्राची प्रतिसादात एक ओळ होती की, 'फ्रान्सच्या संघात मूळचे फ्रेंच खेळाडू अभावानेच दिसतात' आणि 'नजाकत ताकद स्टॅमिना' बद्दलही काही भाष्य होतं. . मतं-प्रतिकुल आणि वादाची मतं त्यावरही येऊ शकतात. प्रश्न नुसता रंगाचा नसतो तर प्रश्न संधीचाही असतो. एम्बापेच्या खेळाचं, ताकदीचं, आणि नजाकतीचं फुटबॉल जगताने मार्केटींग केलं नाही तर त्याचं काही नवल वाटू नये. मैदानाबाहेर बसलेल्या आणि संघात कधी स्थान- संधी मिळणार नाही असे वाटणा-या खेळाडूंना एम्बापे आयकॉन आदर्श असणार आहे. उत्तम खेळणा-यांना खेळात तरी समान संधी मिळते असे वाटणा-या तो एक आश्वासक चेहरा असणार आहे. अर्थात, येत्या काळात ते सगळं दिसेलच असे वाटते. अर्जेंटीनाचा मेस्सी भारीच होता. पण, एम्बापे काही कमी नव्हता यासाठी हा विश्वचषक कायम लक्षात राहील. इतकेच. लिहितांना काही चुकलं असेल तर जरुर लिहा मॅडमजी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 12/22/2022 - 16:12 नवीन
वाह सर एम्बापे इतर गोष्टींविषयी छान माहिती दिली.बिचार्यावर खुपचं अन्याय झाला म्हणजे :( फारच सुकला होता त्याचा चेहरा. मला एवढंच म्हणायचं होतं की अंतिम सामन्यात तो कोट देऊन खेळातला त्यांचा अतिउच्च दिवसात लुडबुड नको होती इतर वेळी ,इतर सामान्यात दिला असता तर काहिच इश्यू नव्हता.हे असंच चालू राहिलं आणि पुण्यात ओलिंपिक झालं विजेत्यांना पुणेरी पगड्या घातल्या तरी मला चालणार आहे ;) ्
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 12/23/2022 - 04:12 नवीन
प्रश्न नुसता रंगाचा नसतो तर प्रश्न संधीचाही असतो.
इथं रंग कुठून मध्येच आणलात भो? फ्रेंच संघात नॉर्स खेळाडू असते तरीही मी हेच म्हटले असते. उद्या भारतीय क्रिकेट संघातून रोहिंगे, चिनी, श्रीलंकन, ब्रिटिश, पोर्तुगीज खेळाडू खेळताना दिसले असते तरीही मी हेच म्हणालो असतो. मूळ फ्रेंचांमध्ये फूटबॉल गुणवत्तेची कमी दिसतेय हे साहजिकच आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Tue, 12/20/2022 - 05:10 नवीन
शेटजीने मेस्सीचे अभिनंदन का म्हणून केले असावे: मेस्सीच्या हातावर कमळाचे चिन्ह शेटजीने जिंकला वर्ल्ड काम आज.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 12/20/2022 - 06:33 नवीन
एकंदरीत मस्तच सामने झाले. छोट्या देशांच्या संघांनी सुद्धा कमालीचा खेळ दाखवला. या खेळात थरार शेवटपर्यंत कायम असतो त्यामुळेच शेवटच्या क्षणापर्यंत इन्टरेस्ट टिकून राहातो. काश भारतीय संघ या खेळात आसता तर. मस्तच दिवस रात्र गेले. या कालावधीत बिग बाॅस सारखे प्रक्षेपण बंद ठेवल्यास खेळांचे पुर्नप्रसारण,चर्चा सत्र बघण्यास टि व्ही ची उपलब्धता फुटबॉल प्रेमींना जास्त होईल. एक पिडीत.....
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 12/27/2022 - 06:22 नवीन
फिफा वर्ल्डकप सामने मस्तच झाले पण मिपावरील या धाग्याचे व प्रतिसादकांचे विषेश आभार कारण सामन्यांचे समीक्षण आणी आवांतर माहीती मुळे जास्त मजा आली.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 6 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 6 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 6 hours ago
  • सुंदर !!
    1 day 6 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 7 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा