फिफा विश्वचषक २०२२
मिपावर फुटबॉल विश्वचषकाचा धागा किंवा त्यावर चर्चाही कशी नाही याचे आश्चर्य वाटले त्यामुळे आपणच त्याविषयी धागा काढू असा विचार केला.
अपेक्षेप्रमाणे गट फेरीत त्या त्या गटातील बलाढ्य संघांनी विजय मिळवला पण आज अनपेक्षितरित्या मेस्सीच्या अर्जेन्टिनाला दुबळ्या सौदी अरेबियाने २-१ असा झटका दिला. मात्र त्यांच्या गटातील इतर दोन संघ मेक्सिको आणि पोलंड असल्याने त्यांना हरवण्यास अर्जेन्टिनाला फारशी अडचण येणार नाही असे वाटते.
विश्वचषक 2022 चे पूर्ण वेळापत्रक (भारतीय वेळापत्रकानुसार)
गट फेरी
20 नोव्हेंबर 2022 - कतार वि इक्वाडोर, रात्री 9.30, अल बायत स्टेडियम -
21 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध इराण संध्याकाळी 6:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
21 नोव्हेंबर 2022 - सेनेगल विरुद्ध नेदरलँड्स रात्री 9:30 अल थुमामा स्टेडियम
22 नोव्हेंबर 2022 - यूएसए वि वेल्स, पहाटे 12.30, अल रेयान स्टेडियम
22 नोव्हेंबर 2022 - डेन्मार्क विरुद्ध ट्युनिशिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम
22 नोव्हेंबर 2022 - मेक्सिको विरुद्ध पोलंड रात्री 9.30 स्टेडियम 974
23 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया दुपारी 3.30 लुसेल स्टेडियम
23 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहाटे 12.30, अल जानोब स्टेडियम
23 नोव्हेंबर 2022 - जर्मनी विरुद्ध जपान संध्याकाळी 6.30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
23 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध कोस्टा रिका रात्री 9.30 अल थुमामा स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - मोरोक्को विरुद्ध क्रोएशिया दुपारी 3.30 अल बायत स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध कॅनडा, पहाटे 12.30 अल रेयान स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - स्वित्झर्लंड विरुद्ध कॅमेरून दुपारी 3:30 अल जानोब स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - उरुग्वे विरुद्ध दक्षिण कोरिया संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम
24 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल वि घाना रात्री 9.30 स्टेडियन 974
25 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध सर्बिया पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम
25 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इराण, दुपारी 3.30, अल रेयान स्टेडियम
25 नोव्हेंबर 2022 - कतार विरुद्ध सेनेगल 6:30 अल थुमामा स्टेडियम
25 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध इक्वाडोर रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
26 नोव्हेंबर 2022 - इंग्लंड विरुद्ध यूएसए, पहाटे 12:30, अल बायत स्टेडियम
26 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुपारी 3.30 PM अल जानूब स्टेडियम
26 नोव्हेंबर 2022 - पोलंड विरुद्ध सौदी अरेबिया, संध्याकाळी 6.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
26 नोव्हेंबर 2022 - फ्रान्स विरुद्ध डेन्मार्क रात्री 9.30 स्टेडियन 974
27 नोव्हेंबर 2022 - अर्जेंटिना विरुद्ध मेक्सिको पहाटे12:30 लुसेल स्टेडियम
27 नोव्हेंबर 2022 - जपान विरुद्ध कोस्टा रिका दुपारी 3:30 PM अल रेयान स्टेडियम
27 नोव्हेंबर 2022 - बेल्जियम विरुद्ध मोरोक्को 6:30 PM अल थुमामा स्टेडियम
27 नोव्हेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध कॅनडा रात्री 9:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
28 नोव्हेंबर 2022 - स्पेन विरुद्ध जर्मनी, पहाटे 12.30, अल बायत स्टेडियम
28 नोव्हेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध सर्बिया, दुपारी 3.30 वाजता, अल जानोब स्टेडियम
28 नोव्हेंबर 2022 - दक्षिण कोरिया वि घाना संध्याकाळी 6.30 एज्युकेशन सिटी स्टेडियम
28 नोव्हेंबर 2022 - ब्राझील विरुद्ध स्वित्झर्लंड संध्याकाळी 6.30 स्टेडियन 974
29 नोव्हेंबर 2022 - पोर्तुगाल विरुद्ध उरुग्वे पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम
29 नोव्हेंबर 2022 - इक्वाडोर विरुद्ध सेनेगल रात्री 8:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
29 नोव्हेंबर 2022 - नेदरलँड विरुद्ध कतार, रात्री 8.30, अल बायत स्टेडियम
30 नोव्हेंबर 2022 - इराण विरुद्ध यूएसए पहाटे 12:30 अल थुमामा स्टेडियम
30 नोव्हेंबर 2022 - वेल्स विरुद्ध इंग्लंड, पहाटे 12:30, अल रेयान स्टेडियम
30 नोव्हेंबर 2022 - ऑस्ट्रेलिया विरुद्ध डेन्मार्क रात्री 8:30 अल जानूब स्टेडियम
30 नोव्हेंबर 2022 - ट्युनिशिया विरुद्ध फ्रान्स 8:30 एज्युकेशन सिटी स्टेडियम
1 डिसेंबर 2022 - पोलंड विरुद्ध अर्जेंटिना, पहाटे12:30 , Stadion 974
1 डिसेंबर 2022 - सौदी अरेबिया विरुद्ध मेक्सिको 12:30 लुसेल स्टेडियम
1 डिसेंबर 2022 - कॅनडा विरुद्ध मोरोक्को रात्री 8:30 अल थुमामा स्टेडियम
1 डिसेंबर 2022 - क्रोएशिया विरुद्ध बेल्जियम रात्री 8.30 वाजता अल रेयान स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - कोस्टा रिका विरुद्ध जर्मनी पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - जपान विरुद्ध स्पेन पहाटे 12:30 खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - घाना विरुद्ध उरुग्वे, रात्री 8.30 वाजता, अल जानोब स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - दक्षिण कोरिया विरुद्ध पोर्तुगाल, रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
2 डिसेंबर 2022 - कॅमेरून विरुद्ध ब्राझील पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम
2 डिसेंबर 2022 सर्बिया विरुद्ध स्वित्झर्लंड पहाटे 12:30 स्टेडियन 974
बाद फेरी- १६ सामने (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
3 डिसेंबर 2022 A विरुद्ध 2B खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम रात्री 8.30 वाजता
4 डिसेंबर 2022 - 1C विरुद्ध 2D पहाटे 12:30 अल रेयान स्टेडियम
4 डिसेंबर 2022 - 1D वि 2C रात्री 8:30 PM अल थुमामा स्टेडियम
5 डिसेंबर 2022 - 1B वि 2A पहाटे 12:30 अल बायत स्टेडियम
5 डिसेंबर 2022 - 1E विरुद्ध 2F रात्री 8:30 PM अल जानौब स्टेडियम
6 डिसेंबर 2022 - 1G विरुद्ध 2H पहाटे 12:30 उशीरा, स्टेडियन 974
6 डिसेंबर 2022 - 1F विरुद्ध 2E, रात्री 8:30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
7 डिसेंबर 2022 - 1H विरुद्ध 2G पहाटे 12:30 लुसेल स्टेडियम
उपांत्यपूर्व फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
9 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, एज्युकेशन सिटी स्टेडियम
10 डिसेंबर 2022 - दुपारी 12:30, लुसेल स्टेडियम
10 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, अल थुमामा स्टेडियम
11 डिसेंबर 2022 - रात्री 12:30 उशिरा, अल बायत स्टेडियम
उपांत्य फेरी (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
14 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30 , अल बेयट स्टेडियम
15 डिसेंबर 2022 - पहाटे 12:30, लुसेल स्टेडियम
तिसरे स्थान सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
17 डिसेंबर 2022 - रात्री 8.30, खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियम
अंतिम सामना (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
18 डिसेंबर 2022 - रात्री 8:30, लुसेल स्टेडियम
🗣 चर्चा
(142)
श
श्रीगुरुजी
Sat, 11/26/2022 - 16:10
नवीन
पोलंडने सौदी अरेबियाला २-० हरविले. आता त्या गटात पोलंड ४, सौदी अरेबिया ३, मेक्सिको १ व अर्जेंटिना ० अशी गुणसंख्या आहे. अर्जेंटिनाला बाद फेरीत जाण्यासाठी पोलंड व मेक्सिको विरूध्दचे सामने जिंकावेच लागतील.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 11/27/2022 - 04:19
नवीन
अर्जेंटिनाने मेक्सिकोचा २-० असा पराभव केल्याने आपले आव्हान टिकविले आहे. आता पोलंड-अर्जेंटिना व सौदी अरेबिया - मेक्सिको हे या गटातील सामने शिल्लक आहेत. तांत्रिकदृष्ट्या चारही संघांना संधी आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/01/2022 - 05:11
नवीन
उपउपांत्यपूर्व फेरीचे चित्र बरेचसे स्पष्ट झाले आहे.
नेदरलँड्स, सेनेगल, इंग्लंड, अमेरिका, अर्जेंटिना, पोलंड, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल व ब्राझील या १० देशांनी बाद फेरीत प्रवेश केलाय.
पहिल्या सामन्यात सौदी अरेबिराकडून धक्कादायक पराभव झाल्यानंतरही मेक्सिको व पोलंडला हरवून अर्जेंटिनाने मुसंडी मारली.
ई गटात स्पेन (४), जपान (३), कोस्टारिका (३) व जर्मनी (१) यांच्यात खूप चुरस आहे. जर्मनीने कोस्टारिकाला व स्पेनने जपानला हरविले तल स्पेन व जर्मनी बाद फेरीत जातील.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 12/02/2022 - 01:21
नवीन
जर्मनीने कॉस्टिरिकाला ४-२ ने हरवले मात्र स्पेन जपानविरुद्ध पराभूत झाल्याने जर्मनी विश्वचषकातून बाहेर पडली.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/02/2022 - 04:10
नवीन
अरेरे. जर्मनी नाही हे पाहणे दु:खदायक आहे. यावेळी बेल्जियमबद्दल बरेच जण आशेवर होते. पण बेल्जियम सुद्धा बाहेर पडले.
स्पेन, मोरोक्को, जपान व क्रोएशिया बाद फेरीत आलेत. आता घाना, दक्षिण कोरिया, स्वित्झर्लंड व कॅमेरून यापैकी दोन संघ बाद फेरीत येतील. सर्बिया व उरूग्वे यांना सुद्धा संधी आहे.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 12/02/2022 - 04:37
नवीन
जर्मनी मागील विश्वचषकातसुद्धा प्राथमिक फेरीतच आटोपले होते. २०१४ नंतर त्यांची अधोगतीच होत आहे.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 12/02/2022 - 05:16
नवीन
जर्मनी मध्ये गुणवत्ता आहे पण संघ भावना किंवा एकत्र प्रॅक्टीस कमी आहे असा वाटला.
काल फिनिशिंग करता आले नाही. . क्रॉस पासेस ला रिसिव्ह करायला कोणी नव्हते . काहीजण तर पास न करता ग्लोरी शॉट्स मारत होते..
अन्यथा काल गोल डिफ्रन्स सहज भरून निघाला असता.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 12/02/2022 - 15:16
नवीन
सुंदर खेळ.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 12/03/2022 - 16:54
नवीन
पहिल्या हापमधे नेदरलँड ०२ तर युएसए ००
-दिलीप बिरुटे
(व्यस्त)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/03/2022 - 19:04
नवीन
नेदरलँड्सने अमेरिकेला ३-१ असे हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज दुसरा सामना अर्जेंटिना व ऑस्ट्रेलिया यांच्यात आहे. सामना मध्यरात्री १२:३० ला सुरू होणार असल्याने बघणे अवघड आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/09/2022 - 18:20
नवीन
उपांत्यपूर्व फेरी पहिला सामना -
ब्राझील १ - क्रोएशिया ०.
पहिली ९० मिनिटे ०-०. अतिरिक्त ३० मिनिटातील १३ व्या मिनिटाला नेमारने प्रैक्षणीय गोल केला.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/09/2022 - 18:31
नवीन
१-१
पेनल्टी शूटआऊट मध्ये जाणार बहुतेक.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/09/2022 - 18:38
नवीन
अतिरिक्त वेळातही १-१ बरोबरी.
आता पेनल्टी शूटआऊट.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Fri, 12/09/2022 - 18:48
नवीन
दबावात येऊन ब्राझीलने पेनल्टी दवडल्या, स्पर्धेतून बाहेर.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/09/2022 - 18:49
नवीन
क्रोएशिया जिंकले (४-२)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 12/09/2022 - 19:12
नवीन
नेमारची शेवटची विश्वचषक स्पर्धा?
पोर्तुगाल- मोरोक्को आणि इंग्लंड-फ्रान्स सामने उद्या आहेत.
आज अजून ४५ मिनिटांनंतर अर्जेंटिना-नेदरलँड्स हा दुसरा सामना आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/10/2022 - 03:29
नवीन
पूर्ण वेळात आणि अतिरिक्त वेळात २-२ बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊट मध्ये अर्जेंटिनाने नेदरलँड्सला ४-३ असे पराभूत केले.
आता हे सामने गोलकीपर्सचे होत आहेत.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Sat, 12/10/2022 - 10:22
नवीन
आता ब्राझील बाहेर. दोन दिग्गज बाहेर पडलेत.
उपांत्य फेरीसाठी शक्यता कोणत्या वाटतात?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 12/10/2022 - 18:03
नवीन
रोनाल्डिनोचा संघ परत
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/10/2022 - 18:52
नवीन
स्पेन, जर्मनी, बेल्जियम, ब्राझील पाठोपाठ पोर्तुगाल बाहेर.
उपांत्य फेरीत पोहोचणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन देश.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/11/2022 - 02:03
नवीन
इंग्लड फ्रान्स लढत जोरदार झाली. फ्रान्स २-१ ने विजयी, इंग्लंडने शेवटी एक पेनल्टी किक दवडली अन्यथा खेळ अतिरिक्त वेळेत जाऊ शकला असता.
आता अर्जेंटिना विरुद्ध कोएशिया आणि फ्रान्स विरुद्ध मोरोक्को अशा उपांत्य फेरीच्या लढती होतील.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 12/15/2022 - 01:51
नवीन
Kane Ableझाला नाही.
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Wed, 12/14/2022 - 10:01
नवीन
फुटबॉल वर्ल्ड कपचा धागा आत्ता पाहिला. असो, सगळे सामने हायलाईट्स मध्ये पाहिले.
फक्त काल रात्री माझ्या आवडत्या मेस्सीसाठी जागल्याचे सार्थक झाले. पेनल्टी घेताना माझा बीपी हाय झालेला. शेवटचा असीस्ट तर क्लासच.
अर्जेंटिना हा वर्ल्ड कप जिंकू दे रे देवा!
सं - दी - प
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 12/14/2022 - 10:27
नवीन
पेनल्टी किक आणि दुस-या हाफ मधे बॉल स्वतःकडे ठेवत गोल साठी दिलेला अफलातून पास. अहाहा.
फुटबॉलमधे यापेक्षा अजून कोणता सुखाचा क्षण असूच शकत नाही. काय नजाकत, अहाहा.
मेस्सी जब्रा रे भावा असाच खेळत राहा.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
र
राघव
Wed, 12/14/2022 - 13:40
नवीन
अगदी..!! रात्री जागल्याचे सार्थक झाले हे खरे! अफलातून असिस्ट!!
अल्वारेजचा आधीचा गोल सुद्धा मस्त होता! मजा आली!
अवांतरः
भारत कधी फिफा वर्ल्ड कप खेळणार कल्पना नाही. पण एकदा का होईना भारतीय फुटबॉल टीमसाठी वर्ल्ड कप मधे चीअर करायची ईच्छा आहे! :-)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 12/14/2022 - 16:19
नवीन
छाती फुटेपर्यंत?
- Log in or register to post comments
र
राघव
गुरुवार, 12/15/2022 - 13:35
नवीन
माझ्या मते स्टॅमिना, फिटनेस आणि स्ट्रेन्ग्थ यात आपण सहज कव्हर करू शकतो.
गरज आहे ती फुटबॉल कल्चरची. आणि मोकळ्या अन् जरा मऊ ग्राऊंड्सची.
प्रत्येक राज्यातून एक मोठा क्लब तयार झाला तर त्यातून चांगला बेस बनेल. नव्हे ISL मुळे ते काही प्रमाणात सुरू झालेलेच आहे.
पण या क्लब्स च्या मागे एक पॅशन गरजेची असते. लोकांना तो क्लब आपला वाटला पाहिजे. तर ते चक्र फिरायला लागते! :-)
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 12/14/2022 - 19:42
नवीन
कतार प्रमाणे आपण ही यजमानपद मिळवले तर भारत खेळेल..
अदानी अंबानी सारखे श्रीमंत लोक असताना हे शक्य आहे फक्त त्यांना यात आर्थिक फायदा दिसायला हवा.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 12/14/2022 - 15:55
नवीन
अल जंजिरा चानेलवर मालिका आहे.त्यातील मोरोक्को साठी
https://youtu.be/RpW45bgoc9s
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 12/14/2022 - 22:30
नवीन
चांगले खेळले. केळ उत्कंठावर्धक झाला.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 12/15/2022 - 01:15
नवीन
फ्रान्स मोरोक्कोच्या तुलनेत खूपच जास्त ताकतवान संघ आहे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
गुरुवार, 12/15/2022 - 01:49
नवीन
चांगल्या खेळाडूंसह सराव, स्पर्धा करायला मिळाली की खेळ सुधारण्याची शक्यता वाढते. आपल्या चालींना प्रतिस्पर्धी कसा विरोध करतो हे आजमावता येते. ते १४-१९ वयात मिळायला हवे. उशीर झाला तर शिकता येते पण शारिरीक चपळपणा तोपर्यंत जातो. (चांगल्या खेळाडूंशी खेळून बुद्धिबळात सुधारणा फारशी होईल ही शक्यता नसते. ती एक जात्याच कुवत असते आणि ती एका मर्यादेला गोठते.)
१)बॉल पायांत खेळवत पुढे नेण्याची कला यात ब्राझील आणि अर्जेंटिनाचे खेळाडू तरबेज,निष्णात आहेत. शिवाय
२)मी'च गोल करणार यापेक्षा 'आपला' गोल झाला पाहिजे हे ध्यानात ठेवणारे संघ यश मिळवतात.
(माझे मत)
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 12/15/2022 - 18:15
नवीन
एक आणि दोनशी सहमती आहेच.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
B
Bhakti
Sat, 12/17/2022 - 08:44
नवीन
२०१४ ला पाहिलेली फायनल आजही आठवतेय.मेस्सी हरला होता . यावेळी जिंकलाच पाहिजे.
फायनल-अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 12/17/2022 - 08:59
नवीन
अर्जेंटिना जिंकणार असे माझे भाकीत आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/18/2022 - 18:59
नवीन
भाकीत सत्य जाहले.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sat, 12/17/2022 - 23:18
नवीन
क्रोएशिया जिंकली. असंही साइडिंगचा सामना मग दोन्ही संघांकडून बऱ्याच खेळाडूंना बदलून संधी दिली.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/18/2022 - 01:15
नवीन
तिसऱ्या क्रमांकासाठी खेळवला जाणारा सामना निरर्थक आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/18/2022 - 06:26
नवीन
आपलं मत फिफाला मेल करुन पाठवतो. इतक्या दिवस त्यांच्या हे लक्षात आलं नसावं.
आता, ते लक्ष घालतील अशी अपेक्षा करुया. धन्यवाद.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कंजूस
Sun, 12/18/2022 - 07:03
नवीन
एक ए ग्रेडचा सामना खेळायला मिळणे हे नवीन संघासाठी हवेच असते.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/18/2022 - 06:32
नवीन
आज अंतिम सामना पारडं फ्रान्सचं जड आहे, मला मेस्सीची टीम जिंकावी असे वाटते.
फ्रान्स ६० % तर, ४० %अर्जेंटीना.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/18/2022 - 16:25
नवीन
अर्जेंटिना १ फ्रान्स ०
अर्जेंटिनाला अन्यायकारक पेनल्टी किक मिळाली. पेनल्टी किक देण्याइतके काहीही झाले नव्हते.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 12/18/2022 - 17:01
नवीन
रेफ्रीचा चुकीचा निर्णय
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/18/2022 - 16:39
नवीन
अर्जेंटिना २ फ्रान्स ०
अत्यंत प्रेक्षणीय गोल!
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/18/2022 - 17:01
नवीन
अर्जेंटीनाचं आक्रमण पाहता फ्रांसला अजुनही पहिला हाफ संपेपर्यन्त सुर गवसला नाही त्या तुलनेत आक्रमण पर आक्रमण मुळे अर्जेंटीना आघाडीवर... दोन शून्य ने पुढे. मला वाटतं लीड मोडणे इतकं आक्रमण करावे लागेल.. तरच फ्रांसचा निभाव लागेल.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Sun, 12/18/2022 - 17:51
नवीन
तो सूर सापडूच नये असे वाटत असतानाच कुठून कसे दोन गोल झाले कळालंच नाही. :(
सं - दी - प
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 12/18/2022 - 18:07
नवीन
मूडच गेला माझा. आता एक्स्ट्रा टाइमिंग.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sun, 12/18/2022 - 17:22
नवीन
फ्रान्सने सामना सोडून दिल्यासारखे दिसतेय.
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Sun, 12/18/2022 - 17:29
नवीन
विराट कोहली ह्यात नाहीत. त्यांनी मस्त गोल ठोकला असता त्यांना एवढा मोठा फुट्बॉल पण नाही लागणार. ह्या गावातुन मी मेस्सी भाऊंना पक्का आर्शिवाद देतो!
- Log in or register to post comments
श
शानबा५१२
Sun, 12/18/2022 - 17:35
नवीन
पहिल्याच गोलमध्ये.......रीझल्ट.......,मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्ड कप सामना आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »