Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

कोणतेही लेखन नाही.
  • «
  • ‹
  • 4773
  • 4774
  • 4775
  • 4776
  • 4777
  • 4778
  • 4779
  • 4780
  • 4781

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

अबोला..

प — प्राची अश्विनी, Tue, 09/20/2022 - 12:32

तुझ्या एका अबोल्यानं
उदासली फुलदाणी.
जीव झाला वेडापिसा
आणि काळजाचं पाणी..

तुझ्या एका अबोल्याची
कशी खुलावी रे कळी?
सुचेनासे होते काही
लोकं म्हणतात खुळी.

तुझ्या एका अबोल्यात
किती चंद्र गेले वाया..
अरे वेड्या, पाऊसही
आता आला नं संपाया!

तुझ्या एका अबोल्याशी
आता माझाही अबोला,
बघतेच किती वेळ
झुलतो हा खेळझुला!


  • Log in or register to post comments
  • 8192 views


वाचनखूण लावा
| 8192 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
B
Bhakti Tue, 09/20/2022 - 12:44 नवीन
तुझ्या एका अबोल्याशी आता माझाही अबोला, बघतेच किती वेळ झुलतो हा खेळझुला
सुंदर!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Tue, 09/20/2022 - 14:46 नवीन
क्या बात..
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 09/20/2022 - 15:18 नवीन
तुझ्या एका अबोल्याशी आता माझाही अबोला, बघतेच किती वेळ झुलतो हा खेळझुला! डेंजर सिच्युएशन, कुणीतरी पाढंर निशाण लवकर दाखवा. छान, आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बाबुराव Tue, 09/20/2022 - 17:48 नवीन
तुझ्या एका अबोल्याशी आता माझाही अबोला, बघतेच किती वेळ झुलतो हा खेळझुला! अहाहा...!
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Tue, 09/20/2022 - 21:57 नवीन
तुझ्या एका अबोल्याशी आता माझाही अबोला, बघतेच किती वेळ झुलतो हा खेळझुला!
छानच!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/21/2022 - 05:41 नवीन
तुझ्या एका अबोल्याशी आता माझाही अबोला, बघतेच किती वेळ झुलतो हा खेळझुला! ह्या ओळी वाचताना काळजात हलकिशी कळ उमटली. भावना कशी चपखल उतरली आहे शब्दात. प्राचीताई शब्दांच्या जादुगार आहेत खर्‍या, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Wed, 09/21/2022 - 08:38 नवीन
सुरेख कविता! त्याने धरला म्हणून नको धरू तू अबोला आर्त नजरेत एका जाई विरुन अबोला.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 09/21/2022 - 08:45 नवीन
त्याने धरला म्हणून नको धरू तू अबोला तुझ्या धारदार नजरेने एका जाईल विरुन अबोला. (धारदार नजरेच्या धारेखाली आयुष्य कंठणारा) पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 09/22/2022 - 14:08 नवीन
हाहा!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Wed, 09/21/2022 - 09:42 नवीन
.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 09/21/2022 - 15:29 नवीन
व्वा, सुंदर! आवडला अबोला, पण लवकर संपवा बुवा !
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 09/22/2022 - 14:08 नवीन
:):)
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Wed, 09/21/2022 - 15:40 नवीन
खेळझुला.. वाह! नादमयी!
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/22/2022 - 05:32 नवीन
खूपच सुरेख
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी गुरुवार, 09/22/2022 - 14:04 नवीन
सर्वांना मनापासून धन्यवाद!
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप गुरुवार, 09/22/2022 - 15:46 नवीन
प्राचीतैंची अजून एक सुंदर रचना. वाखूसा आहे. मीही मागे एक अबोल्यावर अबोला नावाचीच एक कविता लिहिली पण ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. ही मात्र पुन्हापुन्हा वाचावी अशीच आहे. सं - दी - प
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Fri, 09/23/2022 - 12:56 नवीन
प्राचीतैंची अजून एक सुंदर रचना. वाखूसा आहे. मीही मागे एक अबोल्यावर (मुलिंनी धरु नये अबोला) नावाचीच एक कविता लिहिली ती पण अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. ही मात्र पुन्हापुन्हा वाचावी अशीच आहे. पै - जा - र - बु - वा - ,
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Fri, 09/23/2022 - 13:18 नवीन
मा - ऊ - ली _________/\_________ सं - दी - प
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री गुरुवार, 09/22/2022 - 16:41 नवीन
कविता वाचत असल्याचा भास झाला!
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 09/26/2022 - 15:20 नवीन
खरेच मलाही अगदी हेच वाटले.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Fri, 09/23/2022 - 05:59 नवीन
चांदणे संदीप आणि अनंतयात्री, धन्यवाद!
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Mon, 09/26/2022 - 11:39 नवीन
खूप सुरेख कविता!
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया Mon, 09/26/2022 - 17:42 नवीन
सुरेख कविता.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 10/01/2022 - 02:47 नवीन
विजुभाऊ, अभिजित आणि श्वेता.. धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: मिसळपाव पंचायत समिती
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 08:15
  • सदस्य: आर्य चाणक्य
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 06:08
  • सदस्य: ख्रेडूत
    नोंदणी: Tue, 09/11/2007 - 03:28
  • सदस्य: सरपंच
    नोंदणी: Mon, 09/10/2007 - 14:05
  • «
  • ‹
  • 5805
  • 5806
  • 5807
  • 5808
  • 5809
  • 5810
  • 5811
  • 5812
  • 5813
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा