अबोला..
तुझ्या एका अबोल्यानं
उदासली फुलदाणी.
जीव झाला वेडापिसा
आणि काळजाचं पाणी..
तुझ्या एका अबोल्याची
कशी खुलावी रे कळी?
सुचेनासे होते काही
लोकं म्हणतात खुळी.
तुझ्या एका अबोल्यात
किती चंद्र गेले वाया..
अरे वेड्या, पाऊसही
आता आला नं संपाया!
तुझ्या एका अबोल्याशी
आता माझाही अबोला,
बघतेच किती वेळ
झुलतो हा खेळझुला!
💬 प्रतिसाद
B
Bhakti
Tue, 09/20/2022 - 12:44
नवीन
सुंदर!
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 09/20/2022 - 14:46
नवीन
क्या बात..
- Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी
Tue, 09/20/2022 - 15:18
नवीन
तुझ्या एका अबोल्याशी
आता माझाही अबोला,
बघतेच किती वेळ
झुलतो हा खेळझुला!
डेंजर सिच्युएशन,
कुणीतरी पाढंर निशाण लवकर दाखवा.
छान, आवडली.
- Log in or register to post comments
ब
बाबुराव
Tue, 09/20/2022 - 17:48
नवीन
तुझ्या एका अबोल्याशी
आता माझाही अबोला,
बघतेच किती वेळ
झुलतो हा खेळझुला!
अहाहा...!
- Log in or register to post comments
श
श्रीगणेशा
Tue, 09/20/2022 - 21:57
नवीन
छानच!
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/21/2022 - 05:41
नवीन
तुझ्या एका अबोल्याशी
आता माझाही अबोला,
बघतेच किती वेळ
झुलतो हा खेळझुला!
ह्या ओळी वाचताना काळजात हलकिशी कळ उमटली. भावना कशी चपखल उतरली आहे शब्दात.
प्राचीताई शब्दांच्या जादुगार आहेत खर्या,
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 09/21/2022 - 08:38
नवीन
सुरेख कविता!
त्याने धरला म्हणून
नको धरू तू अबोला
आर्त नजरेत एका
जाई विरुन अबोला.
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 09/21/2022 - 08:45
नवीन
त्याने धरला म्हणून
नको धरू तू अबोला
तुझ्या धारदार नजरेने एका
जाईल विरुन अबोला.
(धारदार नजरेच्या धारेखाली आयुष्य कंठणारा) पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 09/22/2022 - 14:08
नवीन
हाहा!
- Log in or register to post comments
श
श्वेता२४
Wed, 09/21/2022 - 09:42
नवीन
.
- Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा
Wed, 09/21/2022 - 15:29
नवीन
व्वा, सुंदर!
आवडला अबोला, पण लवकर संपवा बुवा !
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 09/22/2022 - 14:08
नवीन
:):)
- Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 09/21/2022 - 15:40
नवीन
खेळझुला.. वाह! नादमयी!
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 09/22/2022 - 05:32
नवीन
खूपच सुरेख
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
गुरुवार, 09/22/2022 - 14:04
नवीन
सर्वांना मनापासून धन्यवाद!
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
गुरुवार, 09/22/2022 - 15:46
नवीन
प्राचीतैंची अजून एक सुंदर रचना. वाखूसा आहे.
मीही मागे एक अबोल्यावर अबोला नावाचीच एक कविता लिहिली पण ती अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. ही मात्र पुन्हापुन्हा वाचावी अशीच आहे.
सं - दी - प
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Fri, 09/23/2022 - 12:56
नवीन
प्राचीतैंची अजून एक सुंदर रचना. वाखूसा आहे.
मीही मागे एक अबोल्यावर (मुलिंनी धरु नये अबोला) नावाचीच एक कविता लिहिली ती पण अतिशय गंभीर स्वरूपाची आहे. ही मात्र पुन्हापुन्हा वाचावी अशीच आहे.
पै - जा - र - बु - वा - ,
- Log in or register to post comments
च
चांदणे संदीप
Fri, 09/23/2022 - 13:18
नवीन
मा - ऊ - ली
_________/\_________
सं - दी - प
- Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री
गुरुवार, 09/22/2022 - 16:41
नवीन
कविता वाचत असल्याचा भास झाला!
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Mon, 09/26/2022 - 15:20
नवीन
खरेच मलाही अगदी हेच वाटले.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Fri, 09/23/2022 - 05:59
नवीन
चांदणे संदीप आणि अनंतयात्री, धन्यवाद!
- Log in or register to post comments
श
श्वेता व्यास
Mon, 09/26/2022 - 11:39
नवीन
खूप सुरेख कविता!
- Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया
Mon, 09/26/2022 - 17:42
नवीन
सुरेख कविता.
- Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी
Sat, 10/01/2022 - 02:47
नवीन
विजुभाऊ, अभिजित आणि श्वेता.. धन्यवाद!
- Log in or register to post comments