Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

प
पाषाणभेद
Sat, 09/17/2022 - 18:18
💬 75 प्रतिसाद
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. (नावे त्यांच्या उपस्थितीच्या वेळेनुसार नाहीत.) चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन कुलकर्णी, प्रशांत (मालक), अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (जुना आयडी: वल्ली), कुमार१ , चौथा कोनाडा, रामचंद्र, बिपीन सुरेश सांगळे, MipaPremiYogesh, मुक्त विहारी (ऑनलाईन उपस्थिती). मिपाकट्टा पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो १ मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर सर्वात आधी प्रचेतस- वल्ली हे अचूक दहाच्या आधीच पोहोचले होते. त्यानंतर साधारण १०:०५ ला मी पोहोचलो. तेथील लेण्याच्या खोलगट भागात पावसाचे पाणी साठलेले होते. ते मी बघत खाली गेलो तेव्हा त्यांनीच मला मिपाकर का? असे संबोधले. मागे मिपाकट्टा आवाहन धाग्यात सतिश गावडे जसे बोलले तसेच होत गेले. ("तिथे एखादा लोकांचा घोळका असेल तर "तुम्ही मिपाकर का?" असे बिनधास्त विचारायचे. घोळका नाही दिसला तर घोळका बनण्याची वाट पहा. भिडस्त नसाल तर एकट्या दुकट्या व्यक्तीलाही "तुम्ही मिपाकर का?" असे विचारु शकता.") त्यानंतर जो जो येत गेला त्याला कुणालाही फोन करण्याची किंवा आम्हाला शोधण्याची गरज पडली नाही. आंतरीक इच्छा असेल तर एक मिपाकर दुसर्‍या मिपाकराला बरोबर ओळखतो हे सिद्ध झाले. असो. मिपाकट्टा पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो  २ मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा आज पावसाने बर्‍यापैकी उघडीप दिली होती. मधूनच भुरभुरत तो येत होता पण त्यात काही जोर नव्हता. नंतर लगोलग इतर मिपाकर येत गेले. त्यात कर्नल तपस्वी, चष्मेबद्दूर, अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, MipaPremiYogesh आले. मी अमरेंद्र बाहूबलीला या आधी नाशिक मध्ये भेटलो आहे. पण यावेळी त्यांनी चष्मा लावलेला असल्याने त्यांना ओळखताच आले नाही. अर्थात नंतर ओळख पटली. त्यानंतर इतर म्हणजे टीपीके, धनावडे, अनिकेत वैद्य, कुमार १, MipaPremiYogeshआले. थोडे उशीरा राजेंद्र मेहेंदळे व चौथा कोनाडा आलेत.स्वःत मिपामालक- प्रशांत उपस्थित झाले हा कौतूकाचा अन आनंदाचा धक्का सर्वांनाच बसला. अमरेंद्र बाहूबली हे त्यांच्या ओरीसातील प्रोजेक्टचे काम थांबवून खास कट्याला येण्यासाठी परवा पुण्यात आले! काल देखील ते मुलाच्या आजारपणामुळे रात्री चार पर्यंत झोपूही शकले नसतांना कट्याला आज उपस्थित होते. त्याच दरम्यान बिपीन सुरेश सांगळे उपस्थित झालेत. रामचंद्र मात्र त्यांच्या घरी काम असल्याने कट्यातील एक दोन जण कट्टा संपला तेव्हा निघून गेले होते तेव्हा आले. (उपस्थित प्रत्येक सदस्यांच्या लेखातील संदर्भ देऊन त्यांनी ओळख करून दिली. प्रत्येकाचे लेखन त्यांच्या लक्षात आहे हे कौतूकास्पद आहे.) मिपाकट्टा पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो ३ मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा जसजसे मिपाकर येत होते तसतशी ओळख होत होती. काही पुणेकर मिपाकर एकमेकांना आधीच भेटून परिचीत होते. त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी निघत गेल्या. पाऊस भुरभुरत होता. त्याच दरम्यान कर्नल तपस्वींनी व्हिडीओ फोन करून मुक्त विहारी यांना सामील करून घेतले. (आज फेसबूक लाईव्ह वगैरे करता आले नाही. त्यामुळे क्षमस्व.) त्यांच्या फोननंतर पाऊस थोडा सुरू झाल्याने आम्ही पाताळेश्वर लेण्यातील एका छत असलेल्या भागात थांबलो, बसलो. तेथे कर्नल तपस्वींनी चितळेंचे पेढे व बाकरवडी आणली होती त्याचा आस्वाद घेतला. तेथे परत एकदा ओळख परेड झाली. पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण अधे मधे फोटो काढले गेले. अर्थात फोटो काढण्यापेक्षा मंडळींना गप्पांतच जास्त रस असल्याचे जाणवले. त्यामुळे हा धागा वाचकांना खुपसार्‍या फोटोंचा आस्वास घेता येणार नाही. जे काढले ते अपलोड केले आहेत. कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली. आम्ही मुख्य मंदीर असलेल्या लेण्यात गेलो. तेथे प्रचेतस यांनी लेणी, किल्ले, भटकंती इत्यादी केलेल्या अभ्यासाचा परिचय झाला, म्हणजे त्यांनी आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला. सदर लेणी (एकच लेणी कोरलेली आहे, व समोर नंदीसाठीचे मंदीर (दगडाचा स्लॅब असलेले व खांबार तोललेले) आहे. ही लेणी एकाच अखंड दगडातून कोरलेली आहे हे वैशिष्ठ मानावे लागेल. लेण्यात सप्तमातृका, हत्ती वरील शिल्प, शंकराची पिंड असलेले मंदीर, कोरलेले सारीपाट, द्वारपाल बाहेरील भागातील देवनागरीतील शिलालेख इत्यादींची ओळख प्रचेतस (वल्ली) यांनी करून दिली. पाताळेश्वर लेण्यातील भाग पाताळेश्वर लेण्यातील भाग पाताळेश्वर लेण्यातील भाग पाताळेश्वर लेण्यातील भाग पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदीगृह - मोठा फोटो पाताळेश्वर लेण्यातील नंदीगृह - मोठा फोटो मंदीरातील कर्मचार्‍याने बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही मंदीरासमोरील भागात आलो. तेथेच मोठे कोंडाळे करून आम्ही उभे राहीलो. तेव्हा बिपीन सांगळे यांनीदेखील आणलेल्या पेढ्यांचा पुडा फोडला. पुन्हा एकदा कर्नल तपस्वींनी व बिपीन सांगळे यांनी आणलेल्या खाऊचा आस्वाद घेत मंडळी गप्पा मारत उभी राहील. कुमार१ यांना उभे राहण्याचा थोडा त्रास जाणवत होता तरीदेखील ते उभे राहून गप्पांत सामिले होत राहीले. तेथे निघालेल्या आठवणी व चर्चांतील विषय: - प्रशांत (मालक) यांना मिपाकर चित्रमिपाकर पॅरीस मध्ये अचानक भेटले. तोपर्यंत त्यांना प्रशांत हे मिपाकर आहेत वगैरे माहीत नव्हते. त्यांनी साक्षात मालकांनाच मिपावर सदस्य व्हा वगैरे आवाहन केले. मग तुम्ही कोण वगैरे प्रश्न चित्रगुप्तांनी विचारल्यावर प्रशांत यांनी त्यांची मिपासंदर्भात ओळख करून दिली. - इतर आधी भेटलेले सदस्य जुन्या आठवणी काढत होते. - कुणी काय लिहीले, कसे लिहीले, त्यांचा आवडलेला धागा - काही जण फक्त वाचक असतांनासुद्धा तेथे उपस्थित होते हे कौतूकास्पद आहे. - चौथा कोनाडा यांची चित्रकारी. लॉकडाऊन मध्ये मिपाकरांची ऑलनाईन झुम मिट झाली त्यावेळी त्यांनी काढलेल्या चित्राची आठवण झाली. - मिपा व इतर संकेतस्थळांमधील सदस्यांतील फरक - दिवाळी अंक लेखन तसेच मिपामध्ये काय बदल अपेक्षित आहेत त्या सुचना मालकांच्या कानावर प्रत्यक्ष गेल्यात. - मिपाचे नवे व्हर्जन, त्यात फोटो अपलोड करण्याची सुविधा असणार आहे. - ऑनलाईन लेखन करणारे लेखक व ऑफलाईन लेखन करणारे (वृत्तपत्र, मासिक यांत प्रसिद्ध होणारे साहित्य) यांत काय तफावत आहे त्याबद्दल चर्चा. बिपीन सांगळे हे खूप अनुभवी व ऑफलाईन लेखन प्रकाशित करणारे लेखक आहेत. त्यांनी त्यांचे या संदर्भात अनुभव व्यक्त केले. - कर्नल तपस्वी हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर हिंदीतून मराठी लेखन करण्याकडे कसे वळाले याचा परिचय - अमरेंद्र बाहूबली यांचे सध्याचे लेखन - तमिळनाडूचा इतिहास यावर माहिती - मिपाचा इतिहास साक्षात मिपामालकांकडून ऐकणे, तात्यांची आठवण - पुन्हा कधी भेटणे यावर चर्चा, - भेटीचे नवे ठिकाण जे बसून बोलण्यायोग्य असेल ते या व इतर अनेक विषयांवर चर्चा, बोलणे होत गेले. बारा वाजलेले असल्याने व आधीचे ठरलेले काम असल्याने चष्मेबद्दूर, राजेंद्र मेहेंदळे, प्रशांत, कुमार१ बिपीन सांगळे, चौथा कोनाडा, MipaPremiYogesh, नितीन सोलापूरकर इत्यादी हळूहळू बैठकीतून बाहेर पडले. जेवण, खादाडीचे काहीच प्रयोजन नसल्याने, व जेवणाबद्दल इतरांचे आधीच ठरल्याने या कट्यात खादाडी झाली नाही. त्याच वेळी रामचंद्र आलेत. त्याचे उशीरा येण्याचे कारण व प्रत्येक सदस्यांचे लेख, संदर्भ लक्षात ठेवण्याची हातोटी वर उल्लेखलेलीच आहे. त्यानंतर मी, प्रचेतस, कर्नल तपस्वी, अनिकेत वैद्य, धनावडे, बिपीन कुलकर्णी, रामचंद्र इत्यादी लेण्यांच्या गेटवर आलो. बाहेरच्या गेटवर एक दगडात कोरलेले शिल्प भटकंती व लेणी प्रेमी, इतिहासाची आवड इत्यादी नजर असल्याने प्रचेतस यांच्या नजरेने हेरले. त्याचे त्यांनी फोटो काढले. पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली. पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली. नंतर आम्ही पाचच जण उरलो, मी, अमरेंद्र बाहूबली, धनावडे, रामचंद्र व बिपीन कुलकर्णी. समोरच आम्ही चहा घेत गप्पा मारल्या. तेथे पुन्हा एकदा चर्चेला बहर आला. रामचंद्र यांनी बाबा आढाव यांच्या एका पुस्तकाची ओळख करून दिली. रामचंद्र यांच्या पुण्यातील टेकड्यांवरच्या पायी भटकंतीचे किस्से, अमरेंद्र बाहूबली यांच्या वजन कमी करण्याच्या पद्धतीविषयी चर्चा, धनावडे यांनी वाईला कट्टा करण्याचे आवाहन इत्यादी विषयी बोलणे झाले. वरील फोटोंत रामचंद्र यांचा एकही फोटो नाही. कट्यात उपस्थितांपैकी कुणाच्या मोबाईल मध्ये असल्यास तो अपलोड करावा. जवळपास दीड, पावणेदोन वाजले होते. त्यानंतर आम्ही पाच जणांनी एकमेकांचा निरोप घेऊन मिपाकर भेटीची, कट्याची यशस्वी सांगता झाली. कट्टा आयोजनात व वृत्तांतलेखनात काही उणीव असल्यास आपण आम्हाला क्षमा कराल ही अपेक्षा. पुढील कट्टा या पेक्षा मोठा, गाजत वाजत करूया या सदिच्छा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 28418 views

💬 प्रतिसाद (75)
ब
बिपीन सुरेश सांगळे Sat, 09/17/2022 - 18:20 नवीन
अरे वा ! मस्त - आला कि वृत्तांत ! पाभे कौतुक न आभार .
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 09/17/2022 - 18:33 नवीन
मस्त वृत्तांत !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 09/17/2022 - 18:51 नवीन
मस्त झालेला दिसतोय कार्यक्रम! प्रकाशचित्रे दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
स
सुमो Sat, 09/17/2022 - 18:51 नवीन
पण माझा गणेशा झालाय बहुतेक 😕
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 09/17/2022 - 19:46 नवीन
कट्टा आयोजित होणार या पाभेंच्या घोषणेनंतर व त्यावर झालेल्या उहापोह वरून एक वेगळाच अनुभव असणार याची कल्पना आली.पुढे पर्जन्यराजाच्या अतीकृपेमुळे एक दिवस आगोदर पर्यंत कट्टा होतो किंवा नाही साशंकच होतो. पाभेंच्या दृढनिश्चय पुढे वरुणराजाने नांगी टाकली व कट्ट्याच्या दिवशी संपूर्ण शरणागती पत्करून मिपाकरानां भेटण्याची मुभा दिली. मी जरा दूरच रहात असल्याने थोडा लवकर निघालो पण मित्रांना पहिल्यांदाच भेटणार रिकाम्या हाताने कसे जायचे म्हणून सुदाम्याचे पोहे घ्यावे या विचाराने पुण्यातल्या नामी बल्लवाच्या(चितळे) दुकानात घुसलो. कदाचित माझ्या दृढनिश्चयाची परीक्षा घ्यावी या उद्देशातून वरुणराजाने अचानक आघाडी उघडली. पण हाडाचा सैनिक, सगळी शस्त्र अस्त्र बरोबर होती. रेनकोट चढवला व दुचाकीवरून पुढील प्रवास सुरू केला. शेवटी वरूणालाच काय वाटले त्याने आपली सर्व कुमक परत बोलावून घेतली. या सगळ्यात टाईमीग चुकलेच. पण नागरी आयुष्यात आता पुर्ण पणे रूळल्यामुळे उशीर झाला तरी फारसे वाईट वाटून घेतले नाही. दुचाकी लेण्या समोरच पार्क केली. आतमधे गेल्यावर एक दोन ठिकाणी घोळके दिसले पण सुरक्षारक्षाच्या नजरेतून बघुन मिपाकर कोण याचा आदांज घेत एका घोळक्यात घुसलो. आदांज बरोबर निघाला. असो, स्वताचा परिचय दिल्यावर घोळक्यातल्या प्रत्येकाचे चेहरे निरखत असताना असे भाव दिसले की "किती जुनी ओळख आहे आपली". मोकळ्या गप्पा सुरू झाल्या. माझ्या मनात प्रत्येक सदस्याबद्दल त्यांनी दिलेल्या प्रतिसादा वरून एक पुर्व प्रतिमा होती त्याला धक्का बसला. प्रचेतस यांचे लिखाण व ज्ञान बघुन कोणीतरी ढुढ्ढाचार्य असेल असे वाटले होते. उलट निघाले तरूण तुर्क निघाले. पाभे एक तिशीचा यंग एनर्जेटीक उतावळा तरूण असावा. पण उलट मध्यमवयीन, शांत, मृदुभाषी व आत्मविश्वास आणी आत्मीयता ठासून भरलेले व्यक्तिमत्व दिसले. आणी असेच बाकीच्या सदस्यांबद्दल. चश्मेबद्दूर यांचे लेखन किवा प्रतीसाद न वाचल्यामुळे काहीच कल्पनाच नव्हती ,नवीनच ओळख झाली. प्रसन्न व्यक्तिमत्त्व व आत्मीयता या दोन गोष्टी मनावर छाप सोडून गेल्या.. आयुष्य डाॅक्टर जाती बरोबरच घालवल्यामुळे कुमारएक यांना ओळखण्यास वेळ लागला नाही. सर्वांबद्दल लिहीत बसलो तर एक वेगळाच धागा काढावा लागेल. तरीसुद्धा अबा, अमरेन्द्र बाहुबली यांच्यावर लिहील्या शिवाय पुढे जाऊच शकत नाही. अबा एक दबंग, भांडखोर मोठ्ठा माणूस असेल उलट हॅण्डसम,चार्मींग व अफेक्शनेट व्यक्तिमत्त्वाचा उमेदितला तरूण मनावर कायमची छाप सोडून गेला. अल्झायमर झाला तरी त्याला विसरू शकणार नाही. एक आश्चर्याचा धक्काच बसला जेव्हा रामचंद्र यांनी प्रत्येकाचे लिखाण व त्यावरील त्यांचे प्रतिसाद या बरोबरच ओळख करून घ्यायला सुरवात केली. प्रचंड उत्साह व सामान्य ज्ञान व आत्मीयता पाहून आनंद झाला. असे मिसळून गेले की दुधात साखर. एक आणखीन खास निरक्षणाअंती असे दिसले की सर्व सदस्य फिजीकली फिट व हसमुख होते. कदाचित माझीच प्राॅपर्टी(तोंद) जास्त होती. इतके दिवस आवरून ठेवल्याने तीने सुद्धा बंड पुकारले आहे. बाकी कट्ट्यावर काय झाले हे पाभेंनी स्वविस्तर लिहीलेच आहे. थोडक्यात,आजच पुणे मिपा कट्टा संपन्न झाला. एक वेगळाच अनुभव होता. "कट्ट्यावरती गंध पसरला नाते मनाचे कोणीच कोणा ठावे नसता जुळती बंध रेशमांचे" परवलीचा शब्द होता," मिपाकर का?". नवल वाटले. शेवटपर्यंत होतो,चहा पिला व मगच गेलो. या चारपाच तासात माझे वय मी विसरलो एवढे मात्र नक्कीच. खादंन्ती नव्हती मग जवळच्याच प्रसिद्ध हाटेलातून दोन प्लेट वांग्याची भाजी,ज्वारीची भाकरी ,झणझणीत ठेचा व मिक्स भजी घेऊन घराकडे प्रस्थान केले. कट्ट्यावर बरेच नवीन मित्र मिळाल्याने मी खुश होतो. चुलतसासूबाईंची(स्वयंपाक) आराधना करावी लागली नाही म्हणून गृहमंत्रालय पण खुश. एकुण दिवस मस्तच गेला.
  • Log in or register to post comments
श
शशिकांत ओक Sat, 09/17/2022 - 20:21 नवीन
आपल्या चुरचुरीत लिखाणातून कट्टा रंगला होता हे जाणवले. अचानक एन्ट्री घेऊन आपण सरप्राईज दिले ते भावले. अखिल मंडई गणेशोत्सव मंडळाने निवृत्त सेनादलाच्या व्यक्तींचा गौरव केला त्या कार्यक्रमात सहभागी झाल्याने येता आले नाही. पावसाने दडी मारल्याने सोय झाली. असो.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 09/18/2022 - 05:35 नवीन
कट्टा उपवृत्तांत आवडल्या गेल्या आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/22/2022 - 14:41 नवीन
सुंदर उप - वृतांत !

💖

कर्नलसाहेब, कट्ट्यामध्ये तुम्हाला भेटून जाम एनर्जेटीक वाटले. झाल्या त्या गप्पा कमीच वाटल्या. पाहूया पुन्हा भेटायचे योग कधी येतात ते !
  • Log in or register to post comments
इ
इंद्रधनू Sat, 09/17/2022 - 19:50 नवीन
छान वृत्तांत पुण्यात असूनही या वेळी नाही जमले याची खंत आहेच पुढील कट्टा नक्की मलाही फोटो दिसत नाहीत
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Sat, 09/17/2022 - 20:11 नवीन
छान वृत्तांत.. फोटो का दिसत नाहीत बरे?
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 09/17/2022 - 20:21 नवीन
फोटोचा गणेशा का झालाय ते समजले नाही. उद्या दुरूस्ती करतो. तो पर्यंत कृपया वाट पहावी.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sat, 09/17/2022 - 20:21 नवीन
फोटोचा गणेशा का झालाय ते समजले नाही. उद्या दुरूस्ती करतो. तो पर्यंत कृपया वाट पहावी.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sat, 09/17/2022 - 23:16 नवीन
वृत्तान्त आवडला..
कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली.
यालाच घाबरून जुनेजाणते मिपाकर आले नाहीत असे सूत्रांनी सांगितले Image removed.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 09/18/2022 - 03:33 नवीन
पुढील कट्ट्यास नक्की येणार.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 09/18/2022 - 04:24 नवीन
लयी धमाल केलेली दिसतेय! पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत. पुण्याच्या एखाद्या कट्ट्याला नक्की येणार!
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Sun, 09/18/2022 - 07:11 नवीन
पातळेश्वरचे फोटो कमाल आलेत.
तुम्हाला ह्या लेखातील फोटो कसे काय दिसले ? म्हणजे काय डिव्हाईस व ब्राऊझर वापरून? मला माझ्या लॅपटॉपवरून अथवा मोबाईलवरून, दोन्ही ठिकाणी क्रोम वापरून ते दिसत नाही आहेत. एज वापरून पाहिले तरीही ते दिसत नाही आहेत. (हा प्रामाणिक प्रश्न आहे, खिल्ली उडवणारा नाही).
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 09/18/2022 - 04:39 नवीन
पण, व्हिडियो काॅल मुळे, ती कसर भरून निघाली ...
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 09/18/2022 - 05:34 नवीन
भारी झाला कट्टा. मात्र प्रचि दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 09/18/2022 - 06:16 नवीन
मी पण खरं तर आलो होतो, पण उशिरा पोचलो.. नाहीतर भेट झाली असती..
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 09/18/2022 - 06:43 नवीन
मुख्य वृत्तांत आणि उप-वृत्तांत यातून चित्र उभं राहिलं... पण मुख्य चित्रे का बरं दिसेनात!! गॅस शेगडीच्या बंद बटणासारखं दिसतंय.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 09/18/2022 - 07:07 नवीन
अभियंता दिनाच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून एका कॉलेज मध्ये परिक्षक होतो. हा पूर्व नियोजित कार्यक्रम सरकवता न आल्याने कट्ट्याला येता आले नाही, पण व्रृत्तांत वाचून छान वाटले. पुढील वेळी नक्की येणार. फोटो दिसत नाहीत..
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 09/18/2022 - 08:13 नवीन
कालच्या फोटोंचा गणेशा झाल्याने बराचस हिरमोड झाला. आता ते फोटो येथे डकवतो आहे. Image removed. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर Image removed. लेणीचा परिसर या फोटोत दाखवणे हा उद्देश आहे. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर Image removed. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, कुमार१, प्रचेतस (वल्ली), चौथा कोनाडा Image removed. मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा Image removed. पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण Image removed. पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण Image removed. Image removed. पाताळेश्वर लेण्यातील लांबलचक ओवरी Image removed. पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह Image removed. पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली Image removed. सर्वात शेवटी रामचंद्र आले, तो पर्यंत बरेचसे मिपाकर निघून गेले होते. लेण्याबाहेरील जंगली महाराज रस्त्यावरील फोटो. डावीकडून: अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, मिपाप्रेमी योगेश, रामचंद्र, धनावडे, अनिकेत वैद्य, टीपीके, पाषाणभेद सर्वांना भेटून खूप आनंद झाला. भेटूया पुढील कट्टा भेटीत.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 09/18/2022 - 09:41 नवीन
या प्रतिसादातील सुद्धा एकही प्रकाशचित्र दिसत नाही.
  • Log in or register to post comments
र
रामचंद्र Sun, 09/18/2022 - 14:18 नवीन
मलाही दिसत नाही. मात्र धाग्याची सुरुवात करणाऱ्या पाभे यांच्या लेखातील दहा प्रचि दिसत आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 09/18/2022 - 08:21 नवीन
फोटोच्या लिंका (इमेज अ‍ॅड्रेस) बरोबर वाटत नाही आहेत.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 09/18/2022 - 08:22 नवीन
आता मला फोटो व्यवस्थित दिसत आहेत. फोटो मस्त.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Sun, 09/18/2022 - 08:29 नवीन
मला तर मिपावर लॉगईन असतांनाच फोटो दिसत आहेत. नक्की काय गडबड आहे समजत नाही. इतरांनाही मिपावर लॉगईन असतांनाच दिसत असावेत. कमीत कमी तेवढ्यानेही दिसत असेल तर ठिक आहे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 09/18/2022 - 09:36 नवीन
फोटो पाहण्यासाठी मिपावर लॉग इन होण्याची गरज नाही. मी लॉग आऊट करून पाहू शकलो. गुगल लॉग इन आवश्यक आहे का? ते तपासायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sun, 09/18/2022 - 10:44 नवीन
सर्व फोटोज नव्याने अपलोड केले आहेत 👍 मला काल रात्री वृत्तांत वाचला तेव्हाही सगळे फोटोज व्यवस्थित दिसत होते. अत्ता काहीजणांचे फोटो दिसत नसल्याचे सांगणारे प्रतिसाद वाचल्यावर सर्व फोटोज आधी डाउनलोड आणि मग अपलोड करून धाग्यातल्या लिंक्स अपडेट केल्या आहेत. आता सर्वांना फोटो दिसत असावेत अशी अपेक्षा करतो. अवांतर: कालच्या कट्ट्याला मी, माझी बायको आणि मिपाकर ज्योती अळवणी असे तिघेजण येणार होतो आणि त्यादृष्टीने तयारीही केली होती, पण वरुणराजाने अवकृपा केल्याने आम्ही नाही येऊ शकलो ह्याची खंत आहे. आमच्यावर अवकृपा झाली असली तरी कट्टेकऱ्यांवर कृपा झाल्याचे वाचून आनंद झाला आणि ह्या सुखद कट्टानुभवाला मुकल्याचे दुःखही! असो, कट्ट्याचा सचित्र वृत्तांत आवडला आहे हे.वे.सा.न.ल. पुणे कट्ट्याचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्दल पाषाणभेद ह्यांचे आणि सर्व उपस्थित मिपाकरांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 09/18/2022 - 11:00 नवीन
पुन्हा कधी जरूर यावे. 🙏
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh Mon, 09/19/2022 - 13:05 नवीन
तुमची आठवण काढली होती
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Tue, 09/20/2022 - 06:39 नवीन
@ MipaPremiYogesh
तुमची आठवण काढली होती
🙏 कट्ट्याला यायची खूप इच्छा होती, पण नाही येऊ शकलो! पुन्हा कधी तरी भेटूच... 👍
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sun, 09/18/2022 - 10:56 नवीन
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 09/18/2022 - 11:07 नवीन
आता मुख्य लेखातील प्रकाशचित्रे दिसताहेत.
  • Log in or register to post comments
य
यश राज Sun, 09/18/2022 - 12:18 नवीन
पुण्यात नसल्याने कट्टा मिसला. फोटो व कट्ट्याचा वृत्तान्त छान. मजा आली वाचून .
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 09/18/2022 - 13:40 नवीन
वृत्तांत चाळला. तपशीलवार वाचला नै. पण, भारी कट्टा झालेला दिसतो. सर्वांना पाहुन बरं वाटलं. चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. ( हे राम) बाकी, ते कुमार १ काका मनमोकळे वगैरे असतील असे असतील अशी अपेक्षा करतो. (पळा) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 09/18/2022 - 15:52 नवीन
चश्मेबद्दूर कोणी पुरुष, डु आयडी असेल असे वाटायचे. (हे सिता)
अगदी. अगदी.
  • Log in or register to post comments
च
चष्मेबद्दूर Sun, 09/18/2022 - 18:28 नवीन
चला म्हणजे माझा हेतू सफल झाला असे म्हणते. पण मी सोडून एकही महिला, अतिविशाल किंवा नविशाल कोणीही, का बरे आली नाही याचं आश्चर्य वाटले. असो, अडदीच गालबोट लागू नये म्हणून का होईना माझा सहभाग होता याचं बरं वाटलं. बाकी कट्टा कट्ट्यासारखाच झाला. आवडला. नवीन ओळखी झाल्या. मी अगदीच नवीन आल्याने श्रवणभक्ती करायला मजा आली. परत भेटायला नक्कीच आवडेल. सर्वांना धन्यवाद.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त्_यात्री Sun, 09/18/2022 - 14:05 नवीन
आणि उप-वृत्तांत !
  • Log in or register to post comments
स
सुरिया Sun, 09/18/2022 - 14:16 नवीन
जोरात झाला की कट्टा. मस्तच.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 09/18/2022 - 14:31 नवीन
एकदम खुसखुशीत वृत्तांत. काही मिपाकर आधीपासून ओळखीचे होतेच, तर काही मिपाकरांशी नव्याने ओळख झाली. गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, त्याअनुषंगाने देखील काही गप्पा झाल्या. पाभे यांनी कट्ट्याचे नेमके आयोजन केले होते त्याबद्दल त्यांचे खास आभार. दिवाळीच्या आधी पुन्हा एकदा एक पुणे कट्टा आयोजित करण्याचा विचार सुरू आहे अर्थात वेगळ्या ठिकाणी. त्याबाबद्दल नियोजन करून जाहीर करूच.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 09/18/2022 - 16:26 नवीन
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले, मलाही खुप आनंद झाला. फार दुरचे नाही, अ चा भाऊ ब ब चा भाऊ क मग अ क चा कोण अगदी तसेच. मिपामुळे ते आता खुपच जवळचे झाले.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Sun, 09/18/2022 - 16:45 नवीन
कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले,
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sun, 09/18/2022 - 18:36 नवीन
म्हणजे त्यांनाही छान छान म्हणणे आले आता. ;) एकूणच सावध राहणे आले. आजकाल कुठून पदर कसा लागेल, कुठली फांदी कुठे रुजली कळतच नाही अगदी. कट्ट्याचा तोही एक फायदाच म्हणा. :) आरारा रा, इतक्या खालच्या पातळीवर जाल कल्पनाच केली नव्हती. सुरैया जी आपल्या आकलेचे दिवाळे निघाल्या सारखे वाटते. या संकेतस्थळावर बहुतांशी सर्व एकमेकांस लिखाणा वरूनच ओळखतो. प्रकाशित होणारा प्रत्येक लेख, लेखकाच्या व्यक्तीमत्वाचे प्रतिबिंब सुद्धा बरोबर घेऊन येतो. असे कट्टे होतात,योगायोग की अचानक कुणी कुणाला भेटते.विचार जुळल्यास जवळीक होते. टोपणनावाने सर्व लिहीतात. कोण पुरूष, कोण स्त्री, वयाने लहान मोठा काहीच कळण्यास मार्ग नाही. अशा परिस्थितीत सर्वचजण एकाच पातळीवर मानून प्रत्येक जण सभ्यतेच्या मर्यादा पाळून आपआपले प्रतीसाद लिहीतात.ते लेखनावर असतात व्यक्तीवर नाही. मी गेली दोन वर्षांपासून या संकेतस्थळावर वावरत आहे. प्रचेतस माझ्या खुप आगोदर पासुन इथे आहे. बरेच वेळा मी त्यांना सर म्हणून संबोधले. नम्रपणे त्यांनी मला सर नका म्हणून म्हणले. कट्टा झाला म्हणून नातेसंबंध कळाले. नाहीतर कळण्यास काहीच मार्ग नव्हता. हिच गोष्ट मी सुद्धा लिहू शकलो असतो पण नाही लिहीले कारण अशा अपरिपक्व प्रतिसाद येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.आणी माझी शंका आपण खरी ठरवली. बारा गावचे पाणी पिलेला मी.... प्रचेतस एक हसमुख,सरळमार्गी,आपल्या विषयात पारंगत ज्याला संपुर्ण संकेतस्थळा मानते. सरळ स्वभावानुसार आनंदात त्याने आमच्या नातेसंबंधाचा प्रतिसादामधे उल्लेख केला. सहाजिकच आहे. आपण मला किंवा मी आपल्याला व्यक्तीगत पातळीवर अजीबात ओळखत नाही. दुसरे आसे की आमची बॅटिंग झाली ,एक्स्ट्रॉ ओव्हर पण संपल्या. सामना संपायची वाट बघतोय. स्वानंदासाठी जगणे हाच उद्देश. चांगलं म्हणता येत नसेल तर वाईट, अपरिपक्व प्रतिसाद सुद्धा आपल्याजवळच ठेवा. स्वयंभू आहे. थोडक्यात काय शानसे जिते है ,शानसे ही मरेंगे l गालबोट लावू नका. हर दिन नया था हर साल चुनौती। कभी जशन मनाया कभी लगी पनौती। बाऱीश देखी सुखा देखा खुब लगी धूप। जीदंगी के झमेले मे पापड भी बेले खुब। किसी ने दिया साथ तो किसी ने बढने से रोका। मीला किसीका आशिश तो किसीसे मीला। धोका। खुब कमाया खुब लुटाया खाया मिल बाँट के । कभी किसीका रंज न किया जिंदगी गुजारी ठाठसे। कभी किये फाँखे कभी खायी रस मलाई। सारी माया प्रभूकी जीसने ऐश करायी। तसं पण आपल्या सारख्यांच्या फडतूस प्रतिसादाची काय पत्रास . उत्तर देण्याची जरूर होती,प्रचेतस कदाचित देणार नाहीत पण कुठल्याच प्रकारचे "शिट" कधीच जवळ बाळगले नाही ज्याचे त्याला देऊन टाकले तसेच आपले आपल्याला. कदाचित आपण हल्के घ्या म्हणाल पण एवढे मोठे ओझे हलके घेऊ शकत नाही. पूर्णविराम.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Sun, 09/18/2022 - 20:09 नवीन
वर्दीला विनोदाचे वावडे हे पटवले बघा पुन्हा. . पूर्णविराम ऐवजी विश्राम घ्या. सतत सावधान नसावे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 09/19/2022 - 15:50 नवीन
वर्दीला विनोदाचे वावडे "आता उनाड शब्द वळावयास लागले ! ..सारे लबाड अर्थ कळावयास लागले",
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/22/2022 - 14:25 नवीन
गप्पा मारता मारता कर्नलतपस्वी हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचे समजले
आपण पण दूरचे नातेवाईक आहोत की काय ही तपासून पहायचे राहिलेच त्या दिवशी :-)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 09/22/2022 - 14:39 नवीन
अगदी :) गप्पांच्या नादात तो विषय बाजूलाच पडला.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 09/18/2022 - 15:49 नवीन
मला आता मूळ धाग्यातील फोटो दिसायला लागेल आहेत. मला पहिल्याच फोटोतील पाषाणभेद यांचा मांडी घालून मस्त रिलॅक्स मोड मधला प्रसन्न चेह-यातला फोटो आवडला. लागलीच प्रतिसाद टाकला. आता पुढचे फोटो बघतो.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 09/19/2022 - 08:32 नवीन
कट्टा चांगलाच यशस्वी झाला हे पाहून आनंद झाला. पाषाणभेद यांचे विशेष कौतुक. मी शनिवारपर्यंत कट्ट्याच्या धाग्यावर प्रतिसाद देणे टाळले कारण रविवारचे काम नक्की होत नव्हते. अखेर रविवारीही न टाळता येण्यासारखे काम मागे लागल्यामुळे येता आलेच नाही. असो, पुढच्या वेळी नक्की प्रयत्न करीन. सं - दी - प
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days ago
  • सुंदर !!
    2 days ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा