Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

प
पाषाणभेद
Sat, 09/17/2022 - 18:18
💬 75 प्रतिसाद
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत. (नावे त्यांच्या उपस्थितीच्या वेळेनुसार नाहीत.) चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन कुलकर्णी, प्रशांत (मालक), अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (जुना आयडी: वल्ली), कुमार१ , चौथा कोनाडा, रामचंद्र, बिपीन सुरेश सांगळे, MipaPremiYogesh, मुक्त विहारी (ऑनलाईन उपस्थिती). मिपाकट्टा पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो १ मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो उभे असलेले मागची रांग (डावीकडून): प्रशांत (मालक), प्रचेतस (वल्ली), टीपीके, कुमार१, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, धनावडे, अमरेंद्र बाहूबली. बसलेले खालची रांग (डावीकडून): मिपाप्रेमी योगेश, राजेंद्र मेहेंदळे, बिपीन सुरेश सांगळे, चौथा कोनाडा, पाषाणभेद,चष्मेबद्दूर सर्वात आधी प्रचेतस- वल्ली हे अचूक दहाच्या आधीच पोहोचले होते. त्यानंतर साधारण १०:०५ ला मी पोहोचलो. तेथील लेण्याच्या खोलगट भागात पावसाचे पाणी साठलेले होते. ते मी बघत खाली गेलो तेव्हा त्यांनीच मला मिपाकर का? असे संबोधले. मागे मिपाकट्टा आवाहन धाग्यात सतिश गावडे जसे बोलले तसेच होत गेले. ("तिथे एखादा लोकांचा घोळका असेल तर "तुम्ही मिपाकर का?" असे बिनधास्त विचारायचे. घोळका नाही दिसला तर घोळका बनण्याची वाट पहा. भिडस्त नसाल तर एकट्या दुकट्या व्यक्तीलाही "तुम्ही मिपाकर का?" असे विचारु शकता.") त्यानंतर जो जो येत गेला त्याला कुणालाही फोन करण्याची किंवा आम्हाला शोधण्याची गरज पडली नाही. आंतरीक इच्छा असेल तर एक मिपाकर दुसर्‍या मिपाकराला बरोबर ओळखतो हे सिद्ध झाले. असो. मिपाकट्टा पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो  २ मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा आज पावसाने बर्‍यापैकी उघडीप दिली होती. मधूनच भुरभुरत तो येत होता पण त्यात काही जोर नव्हता. नंतर लगोलग इतर मिपाकर येत गेले. त्यात कर्नल तपस्वी, चष्मेबद्दूर, अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, MipaPremiYogesh आले. मी अमरेंद्र बाहूबलीला या आधी नाशिक मध्ये भेटलो आहे. पण यावेळी त्यांनी चष्मा लावलेला असल्याने त्यांना ओळखताच आले नाही. अर्थात नंतर ओळख पटली. त्यानंतर इतर म्हणजे टीपीके, धनावडे, अनिकेत वैद्य, कुमार १, MipaPremiYogeshआले. थोडे उशीरा राजेंद्र मेहेंदळे व चौथा कोनाडा आलेत.स्वःत मिपामालक- प्रशांत उपस्थित झाले हा कौतूकाचा अन आनंदाचा धक्का सर्वांनाच बसला. अमरेंद्र बाहूबली हे त्यांच्या ओरीसातील प्रोजेक्टचे काम थांबवून खास कट्याला येण्यासाठी परवा पुण्यात आले! काल देखील ते मुलाच्या आजारपणामुळे रात्री चार पर्यंत झोपूही शकले नसतांना कट्याला आज उपस्थित होते. त्याच दरम्यान बिपीन सुरेश सांगळे उपस्थित झालेत. रामचंद्र मात्र त्यांच्या घरी काम असल्याने कट्यातील एक दोन जण कट्टा संपला तेव्हा निघून गेले होते तेव्हा आले. (उपस्थित प्रत्येक सदस्यांच्या लेखातील संदर्भ देऊन त्यांनी ओळख करून दिली. प्रत्येकाचे लेखन त्यांच्या लक्षात आहे हे कौतूकास्पद आहे.) मिपाकट्टा पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो ३ मिपाकट्टा: पुणे सप्टेंबर २०२२ गृप फोटो मागची रांग (डावीकडून): चष्मेबद्दूर, टीपीके, धनावडे, बिपीन सुरेश सांगळे, प्रशांत (मालक), मिपाप्रेमी योगेश खालची रांग (डावीकडून): अमरेंद्र बाहूबली, कर्नल तपस्वी, नितीन सोलापूरकर, पाषाणभेद, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचेतस (वल्ली), कुमार१, चौथा कोनाडा जसजसे मिपाकर येत होते तसतशी ओळख होत होती. काही पुणेकर मिपाकर एकमेकांना आधीच भेटून परिचीत होते. त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी निघत गेल्या. पाऊस भुरभुरत होता. त्याच दरम्यान कर्नल तपस्वींनी व्हिडीओ फोन करून मुक्त विहारी यांना सामील करून घेतले. (आज फेसबूक लाईव्ह वगैरे करता आले नाही. त्यामुळे क्षमस्व.) त्यांच्या फोननंतर पाऊस थोडा सुरू झाल्याने आम्ही पाताळेश्वर लेण्यातील एका छत असलेल्या भागात थांबलो, बसलो. तेथे कर्नल तपस्वींनी चितळेंचे पेढे व बाकरवडी आणली होती त्याचा आस्वाद घेतला. तेथे परत एकदा ओळख परेड झाली. पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण पाताळेश्वर लेण्यातील आम्ही बसलो ते ठिकाण अधे मधे फोटो काढले गेले. अर्थात फोटो काढण्यापेक्षा मंडळींना गप्पांतच जास्त रस असल्याचे जाणवले. त्यामुळे हा धागा वाचकांना खुपसार्‍या फोटोंचा आस्वास घेता येणार नाही. जे काढले ते अपलोड केले आहेत. कोरम पूर्ण भरल्यानंतर प्रचेतस (वल्ली) यांनी सुत्र हातात घेतली. आम्ही मुख्य मंदीर असलेल्या लेण्यात गेलो. तेथे प्रचेतस यांनी लेणी, किल्ले, भटकंती इत्यादी केलेल्या अभ्यासाचा परिचय झाला, म्हणजे त्यांनी आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला. सदर लेणी (एकच लेणी कोरलेली आहे, व समोर नंदीसाठीचे मंदीर (दगडाचा स्लॅब असलेले व खांबार तोललेले) आहे. ही लेणी एकाच अखंड दगडातून कोरलेली आहे हे वैशिष्ठ मानावे लागेल. लेण्यात सप्तमातृका, हत्ती वरील शिल्प, शंकराची पिंड असलेले मंदीर, कोरलेले सारीपाट, द्वारपाल बाहेरील भागातील देवनागरीतील शिलालेख इत्यादींची ओळख प्रचेतस (वल्ली) यांनी करून दिली. पाताळेश्वर लेण्यातील भाग पाताळेश्वर लेण्यातील भाग पाताळेश्वर लेण्यातील भाग पाताळेश्वर लेण्यातील भाग पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदी गृह पाताळेश्वर लेण्यातील नंदीगृह - मोठा फोटो पाताळेश्वर लेण्यातील नंदीगृह - मोठा फोटो मंदीरातील कर्मचार्‍याने बाहेर जाण्यास सांगितल्यानंतर पुन्हा एकदा आम्ही मंदीरासमोरील भागात आलो. तेथेच मोठे कोंडाळे करून आम्ही उभे राहीलो. तेव्हा बिपीन सांगळे यांनीदेखील आणलेल्या पेढ्यांचा पुडा फोडला. पुन्हा एकदा कर्नल तपस्वींनी व बिपीन सांगळे यांनी आणलेल्या खाऊचा आस्वाद घेत मंडळी गप्पा मारत उभी राहील. कुमार१ यांना उभे राहण्याचा थोडा त्रास जाणवत होता तरीदेखील ते उभे राहून गप्पांत सामिले होत राहीले. तेथे निघालेल्या आठवणी व चर्चांतील विषय: - प्रशांत (मालक) यांना मिपाकर चित्रमिपाकर पॅरीस मध्ये अचानक भेटले. तोपर्यंत त्यांना प्रशांत हे मिपाकर आहेत वगैरे माहीत नव्हते. त्यांनी साक्षात मालकांनाच मिपावर सदस्य व्हा वगैरे आवाहन केले. मग तुम्ही कोण वगैरे प्रश्न चित्रगुप्तांनी विचारल्यावर प्रशांत यांनी त्यांची मिपासंदर्भात ओळख करून दिली. - इतर आधी भेटलेले सदस्य जुन्या आठवणी काढत होते. - कुणी काय लिहीले, कसे लिहीले, त्यांचा आवडलेला धागा - काही जण फक्त वाचक असतांनासुद्धा तेथे उपस्थित होते हे कौतूकास्पद आहे. - चौथा कोनाडा यांची चित्रकारी. लॉकडाऊन मध्ये मिपाकरांची ऑलनाईन झुम मिट झाली त्यावेळी त्यांनी काढलेल्या चित्राची आठवण झाली. - मिपा व इतर संकेतस्थळांमधील सदस्यांतील फरक - दिवाळी अंक लेखन तसेच मिपामध्ये काय बदल अपेक्षित आहेत त्या सुचना मालकांच्या कानावर प्रत्यक्ष गेल्यात. - मिपाचे नवे व्हर्जन, त्यात फोटो अपलोड करण्याची सुविधा असणार आहे. - ऑनलाईन लेखन करणारे लेखक व ऑफलाईन लेखन करणारे (वृत्तपत्र, मासिक यांत प्रसिद्ध होणारे साहित्य) यांत काय तफावत आहे त्याबद्दल चर्चा. बिपीन सांगळे हे खूप अनुभवी व ऑफलाईन लेखन प्रकाशित करणारे लेखक आहेत. त्यांनी त्यांचे या संदर्भात अनुभव व्यक्त केले. - कर्नल तपस्वी हे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर हिंदीतून मराठी लेखन करण्याकडे कसे वळाले याचा परिचय - अमरेंद्र बाहूबली यांचे सध्याचे लेखन - तमिळनाडूचा इतिहास यावर माहिती - मिपाचा इतिहास साक्षात मिपामालकांकडून ऐकणे, तात्यांची आठवण - पुन्हा कधी भेटणे यावर चर्चा, - भेटीचे नवे ठिकाण जे बसून बोलण्यायोग्य असेल ते या व इतर अनेक विषयांवर चर्चा, बोलणे होत गेले. बारा वाजलेले असल्याने व आधीचे ठरलेले काम असल्याने चष्मेबद्दूर, राजेंद्र मेहेंदळे, प्रशांत, कुमार१ बिपीन सांगळे, चौथा कोनाडा, MipaPremiYogesh, नितीन सोलापूरकर इत्यादी हळूहळू बैठकीतून बाहेर पडले. जेवण, खादाडीचे काहीच प्रयोजन नसल्याने, व जेवणाबद्दल इतरांचे आधीच ठरल्याने या कट्यात खादाडी झाली नाही. त्याच वेळी रामचंद्र आलेत. त्याचे उशीरा येण्याचे कारण व प्रत्येक सदस्यांचे लेख, संदर्भ लक्षात ठेवण्याची हातोटी वर उल्लेखलेलीच आहे. त्यानंतर मी, प्रचेतस, कर्नल तपस्वी, अनिकेत वैद्य, धनावडे, बिपीन कुलकर्णी, रामचंद्र इत्यादी लेण्यांच्या गेटवर आलो. बाहेरच्या गेटवर एक दगडात कोरलेले शिल्प भटकंती व लेणी प्रेमी, इतिहासाची आवड इत्यादी नजर असल्याने प्रचेतस यांच्या नजरेने हेरले. त्याचे त्यांनी फोटो काढले. पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली. पाताळेश्वर लेण्याच्या गेट वरील शिल्प, ज्यावर प्रचेतस यांची पारखी नजर गेली. नंतर आम्ही पाचच जण उरलो, मी, अमरेंद्र बाहूबली, धनावडे, रामचंद्र व बिपीन कुलकर्णी. समोरच आम्ही चहा घेत गप्पा मारल्या. तेथे पुन्हा एकदा चर्चेला बहर आला. रामचंद्र यांनी बाबा आढाव यांच्या एका पुस्तकाची ओळख करून दिली. रामचंद्र यांच्या पुण्यातील टेकड्यांवरच्या पायी भटकंतीचे किस्से, अमरेंद्र बाहूबली यांच्या वजन कमी करण्याच्या पद्धतीविषयी चर्चा, धनावडे यांनी वाईला कट्टा करण्याचे आवाहन इत्यादी विषयी बोलणे झाले. वरील फोटोंत रामचंद्र यांचा एकही फोटो नाही. कट्यात उपस्थितांपैकी कुणाच्या मोबाईल मध्ये असल्यास तो अपलोड करावा. जवळपास दीड, पावणेदोन वाजले होते. त्यानंतर आम्ही पाच जणांनी एकमेकांचा निरोप घेऊन मिपाकर भेटीची, कट्याची यशस्वी सांगता झाली. कट्टा आयोजनात व वृत्तांतलेखनात काही उणीव असल्यास आपण आम्हाला क्षमा कराल ही अपेक्षा. पुढील कट्टा या पेक्षा मोठा, गाजत वाजत करूया या सदिच्छा!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 28418 views

💬 प्रतिसाद (75)
स
सस्नेह Mon, 09/19/2022 - 11:36 नवीन
जोरदार झाला कट्टा. बरेच दिवसांनी असा जबरी कट्टा वृ आला मिपावर. फोटो एकदम झकास!
  • Log in or register to post comments
M
MipaPremiYogesh Mon, 09/19/2022 - 13:11 नवीन
कट्टा एकदम मस्त पार पडला. बऱ्याच नवीन ओळखी झाल्या . बाकरवडी, पेढे ह्यांनी मजा अली. त्याबरोबच प्रचेतस कडून खूप मस्त माहिती मिळाली. गाव वाले (धुळेकर) भेटले आणि एकूणच २-३ तास मजेत गेले.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Mon, 09/19/2022 - 14:13 नवीन
छान फोटो आणि वृत्तांत.
  • Log in or register to post comments
ज
जुइ Mon, 09/19/2022 - 14:54 नवीन
वृतांत आणि फोटो दोन्हीं झक्कास!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 09/19/2022 - 19:11 नवीन
कट्ट्याच्या दिवशीच काम असल्यामुळे मी कट्ट्याला येऊ शकेन की नाही याची शेवट पर्यंत खात्री नव्हती ! त्यामुळे धाग्यावर कुठेच याबाबत बोललो नव्हतो. मागच्या प्राधिकरण कट्ट्याला उपस्थित होतो त्याला ७-८ वर्षे झाली होती ! त्यावेळी सौ सुद्धा सोबत असण्याचा योग आला ! तेव्हाची धमाल परत येणार होती ! इच्छा तेथे मार्ग या उक्तीनुसार काही ऍडजेस्टमेंट नंतर कट्ट्याला उपस्थित राहण्याची संधी मिळून गेली, सौ तिच्या व्यग्रते मुळे येऊ शकणार नव्हती ! पावसानं ही ब्रेक घेत सहकार्य केलं अन घाईत लोकल पकडून कट्ट्याला येऊन पोहचलो. पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरुवातीसच असलेल्या नंदी मंडपाचे प्रतिबिंब लोभस दिसत होते ! गर्दीच्या शहरातून कातळशिल्पाच्या आसमंतात शिरताना उल्हसित झालो होतो. मी अर्धा पाऊण तास उशिरा पोहचलो, बाहेर माणसांचे दोन तीन थवे दिसत होते ते मिपाकरांचे वाटत नव्हते .. मग थेट लेण्यांमध्ये पोहोचलो .... एक ग्रुप दिसला ... “कट्टा का ??” म्हणून विचारल्यावर “हो” असा गलका झाला. मी चौको अशी ओळख देताच जोरदार स्वागत झाले ... एका आयडी माझा ताबा घेऊन एक छोटी पिशवी माझ्याकडे सुपूर्द करून हुश्श केलं ! ते टीपीके होते, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने लगेच मला आपलेसे करून टाकले ! कंजूस सरांनी एक कला विषयक पुस्तिका माझ्या कडे देण्यासाठी त्यांच्या हाती दिली होती, पण दोघांच्याही कार्यबाहुल्यामुळे भेट होऊ शकली नव्हती ! बऱ्याच वेळा व्यनि व फोन संभाषण झाले होते पण भेट व्हायचे योग येत नव्हते , ते या कट्ट्याने आले. मी मागे चित्रकार अन्वर हुसेन यांच्यावर लेख लिहिला होता त्यासंदर्भात ती पुस्तिका होती ! धन्यवाद कंजूस सर ... पुस्तिका माझ्या पर्यंत पोहिचली ... धन्यवाद, टीपीके ! लगेचच “मी बिपिन” म्हणत बिपिन सांगळे यांनी उबदार स्वागत केले, त्यांच्याशी काही वेळा व्यनि आणि फोनवर संभाषण होत असल्यामुळे ही गोष्ट लेखक कसे दिसत असतील याची उत्सुकता होती ! मग यथावकाश इतर सर्वांशी “हॅलो हाय” झाले. मग सर्वजण लेण्याबाहेरील मोकळ्या जागेत आलो, एकेकाशी ओळख पटत होती ! ! मी उशिरा पोहोचल्यामुळे प्रचतेसवल्लीचा हेरिटेज वॉक मिसला (बेटर लक नेक्स्ट टाईम, कट्ट्याचा आनंद घेण्यास सुरुवात केली ! प्रशांत .. साक्षात “मिपा मालक” यांना भेटून, बोलून रोमांचित व्हायला झाले ! पाषाणभेद यांनी धडपड करून निर्धाराने हा मिपा कट्टा आयोजित केल्याबद्दल कौतुक केले ! लोकांना एकत्र करण्याचा " हाय पॉसिटीव्ह ऍटीट्युड" असणारे मनमोकळे पाभे मनाला भावून गेले ! पा भे, हॅट्स ऑफ .. हा सुंदर कट्टा आयोजित केल्याबद्दल ! कट्टा वृतान्त आणि प्रचि, दोन्ही मस्तच ! कुमार१ यांच्या ज्येष्ठज्ञानी व्यक्तिमत्वाने भारावून गेलो, त्यांचे कित्येक ज्ञानवर्धक, आरोग्य विषयक माहितीपूर्ण धागे डोळ्यासमोर तरळून गेले ! त्यांनी अंतर्नाद सारख्या नावाजलेल्या नियतकालिकात लेखन केले आहे ही भारावून टाकणारे होते ! अमरेंद्र बाहूबली, नितीन सोलापूरकर, अनिकेत वैद्य, राजेंद्र मेहेंदळे, प्रचतेसवल्ली यांच्याशी बोलून छान वाटले. नितीन सोलापूरकर आमचा जिल्हा पार्टनर असल्याने आपुलकी वाटली. कट्ट्यानंतर घरी परत जाताना नितीन बरोबर जायला मिळाले, खुप गप्पा मारता आल्या. थॅंक यू नितीन माझी अगदी “डोअर डिलिव्हरी केली ! पुढच्या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता आले ! कर्नलतपस्वी यांच्या कणखर लष्करी व्यक्तिमत्वाने आणि आपुलकीने खुप भारी वाटले ! अभ्यासू व्यक्तिमत्वाच्या “दि ओन्ली अनहिता इन कट्टा” प्रोफेसर वाटणाऱ्या जर्मन भाषेच्या शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या चष्मेबद्दूर यांच्याशी बातचीत करताना मजा आली ! पेढे व बाकरवडी यांनी आनंद द्विगुणित झाला ! थॅंक यू, कर्नल साहेब ! बिपिन सुरेश सांगळे यांच्याशी अधूनमधून संपर्क असल्याने त्यांच्या लेखनाचा परीघ माहीत झाला. त्यांनी इत्यादि सारखे दर्जेदार मासिक आणि दिलीप प्रभावळकर यांच्या सारख्या दिग्गज लोकांबरोबर काम केलेले आहे, त्याच बरोबर बालमित्र साठी प्रसिद्ध चित्रकार गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्याबरोवर कथा माला केली होती हे ऐकून त्यांच्या त्यांच्या या क्षेत्रातील दिग्गजपणा लक्षात यावा ! त्यांच्याबद्दचा आदर दुणावला ! कट्टयात मन रमून गेले होते पण एका कार्यक्रमासाठी परतायचे असल्याने निघणे भाग होते. अनायसे नि३ सोलापूरकर तिकडेच जाणार असल्याने त्याच्याबरोबर निघता आले, गप्पा झाल्या ! थॅंक यू नि३ फॉर लव्हली लिफ्ट ! Image removed. एकंदरीत कट्टा एक नंबर संस्मरणीय झाला ! मित्रांनो, भेटूयात पुन्हा ! - चौको
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Tue, 09/20/2022 - 00:10 नवीन
पुण्यात असतो तर कट्ट्याला आवर्जून हजेरी लावली असती. पाताळेश्वरच्या बऱ्याच आठवणी आहेत, कॉलेजच्या दिवसात अधून-मधून सकाळ-संध्याकाळ एखादी फेरी ठरलेली असायची. एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 09/20/2022 - 09:45 नवीन
एव्हाना मिपाआयडी (मिपावरील लिखाण) आणि प्रत्यक्षातील मिपाकर यांच्या जोड्या जुळवणं हा कठीण प्रश्न आहे याची सर्वांनाच जाणीव झाली आहे :-)
अगदी .... पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो ! श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Tue, 09/20/2022 - 21:32 नवीन
पण .. मिपा आयडीचे प्रत्यक्ष भेटल्यावर जाणवणारे व्यक्तिमत्व हा भारी अनुभव असतो !
हा अनुभव घ्यायला नक्कीच आवडेल. आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
श्रीगणेशा, पुढच्या कट्ट्याला यायचा प्रयत्न करा !
नक्कीच!
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 09/21/2022 - 09:07 नवीन
आणि "माझा पहिला मिपाकट्टा" असा लेखही लिहिण्याचे मनात आहे!
संकल्प करून ठेवलाय म्हणजे योग येणारच ! शुभेच्छा श्रीगणेशा
  • Log in or register to post comments
य
योगी९०० Tue, 09/20/2022 - 06:40 नवीन
जोरदार कट्टा... प्रत्येकाची मुळ नावे काय आहेत?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/20/2022 - 07:19 नवीन
म्हणजे त्यांनी कधी स्वत:च इकडे लेखनात सांगितले तरी सांगता येईल.
  • Log in or register to post comments
प
पाषाणभेद Tue, 09/20/2022 - 09:53 नवीन
मला कट्टा हा शब्द जरा निराळा वाटत आला आहे. त्यामुळे मी कट्टा भेट हा उल्लेख करत आलेलो आहे. कट्टा नियोजनात सर्वांनी माझे आभार मानले, माझे जरा जास्तच कौतूक होते आहे हे पाहून मला लाजल्यासारखे झाले आहे. मी तर खरेच काहीच केले नाही. फक्त कट्टा ठरवला व त्याला मिपाकरांनी साथ दिली. तसे पाहिले तर कोणताही कार्यक्रम, प्रसंग, इव्हेंट, सादरीकरण, प्रवास, भेट किंवा कोठेही साधे जायचे असेल तरी माझे नियोजन पक्के असते. तुम्ही सर्वांनी कुणी एकाचे ऐकून या कट्यात सहभागी झालात याचे मला अपृप, कौतूक आहे. मिपावरील अशा भेटी, कट्टा सांगून करण्यात मला आता अंदाज येत चालला आहे. काही ठोकताळे मनात पक्के झाले आहेत. यापुढील अशा नियोजनात मला माझा खारीचा वाटा उचलायला निश्चितच आवडेल. पुढील कट्टा यापेक्षा मोठा व्हावा, एखादे मंगलकर्यालय, हॉल भाड्याने घेण्याइतका समारंभ व्हावा किंवा साहित्यसंमेलनासारखा कार्यक्रम व्हावा या सदिच्छा.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 09/20/2022 - 10:05 नवीन
+१
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 09/21/2022 - 09:05 नवीन
पाभे +१०१
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Tue, 09/20/2022 - 14:59 नवीन
छानच वृत्तांत, फोटो
  • Log in or register to post comments
प
पर्णिका Wed, 09/21/2022 - 00:32 नवीन
आम्हाला पाताळेश्वर लेण्यातील साधारण इतिहास, तेथील शिल्पांचा मागोवा इत्यादींचा परिचय करून दिला.
मस्तच... मला फार आवडतात अशा गाईडेड टूर्स ! फोटो आणि वृत्तांत छानच... :) प्रतिसादही आवडले.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/21/2022 - 05:41 नवीन
तेव्हा काही जण अगोदरच जमा झालेले होते. पण त्यांना "मिपाकर का?" विचारावे लागले नाही कारण लहान थोर सर्व वयोगट होता आणि एक फलक झाडाला बांधत होते. - 'भारत इतिहास मंडळ' @पर्णिका, या गटाचा शोध घ्या. ( *डॉक्टर सुहास म्हात्रे यांनी बोलावलेला 'अनिवासी' यांच्याशी गप्पा कट्टा)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/22/2022 - 14:15 नवीन
मस्त होता कट्टा ऑडीयो क्लिपस नाही सापडल्या !
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 09/21/2022 - 03:59 नवीन
जोरदार झालेला दिसतोत पुणे कट्टा. मुख्य आयोजक पाषाणभेद साहेब व त्यांच्या सहकार्‍यांचे तसेच सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक अभिनंदन. फोटोज उत्तम आहेत. दहा वर्षांपूर्वीच्या मुंबईजवळच्या एका कट्ट्याच्या वृत्तांतातल्या फोटोजला काहींनी धुरकट म्हंटले होते. दहा वर्षांत छायाचित्रणाच्या (सरासरी) दर्जाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे असे निरीक्षण नोंदवतो.
  • Log in or register to post comments
N
nutanm Wed, 09/21/2022 - 22:59 नवीन
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 09/22/2022 - 14:20 नवीन
डोंबिवली येथे, (जागतिक केंद्र) , कट्टा आयोजित करू...
  • Log in or register to post comments
N
nutanm Wed, 09/21/2022 - 22:59 नवीन
कट्टा वृत्तांत वाचला, आपणही अशा कट्टयांना जावे वाटले पण सर्व कट्टे दूर भरतात, आमच्या ठाणे डोंबिवली ,कल्याण इथे आम्च्या ज‌ळ का भरवत नाहीत ठण्याला तर मुंब इकर. आम्ही ठाणे जिल्हावासिय सर्वानाच मध्यवर्ती होइल. मीहे मागे पण सूचित केले होते, पण मी नविन आयडी असल्यामुळे कोणीच लक्ष दिले नसल्याचे वाटत आहे , त्यांत मी फक्त वाचक म्हणूनच प्रतिसाद देत असते. लेखक नाही, म्णून सर्व ठरविणारे दुर्लक्ष करत असावेत का?
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 09/22/2022 - 04:31 नवीन
असे भेट कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील. पुणे कट्टा आयोजित करण्यात पाषाणभेद यांचा पुढाकार होता तर शिकागो साठी विजुभाऊ यांचा. आयोजनासाठी असे काही विषेश काही करावे लागत नाही. निर्लेप, निस्वार्थ, अपेक्षा विरहीत भेट आजकाल दुर्मीळच त्यामुळे अशी मित्र भेट झाली की आंनद होतो. आजची सामाजीक परीस्थीती काहीशी अशी आहे, मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा ? स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा ? आमच्या सारखे बॅटिंग पुर्ण करून बसलेल्याची या पेक्षाही वाईट परिस्थिती, मन कशात लागत नाही अदमास कशाचा घ्यावा ? अज्ञात झर्‍यावर रात्री मज ऐकू येतो पावा असे कट्टे थोडासा दिलासा देऊन जातात.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 09/22/2022 - 13:45 नवीन
कट्टे आयोजित करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यायचा व जवळपासचे ज्याना शक्य आहे ते नक्कीच एकत्र येतील.
+१
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 09/22/2022 - 04:47 नवीन
'मध्यवर्ती ठिकाण' व 'कट्टा' या शब्दांद्वारे मिपावर शोधल्यास सर्वाधिक कट्टे डोंबिवली येथेच आयोजित झाल्याचे आढळून येईल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 17 hours ago
  • सुंदर !!
    2 days 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा