Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)

ह
हेमंतकुमार
Fri, 08/19/2022 - 07:56
💬 266 प्रतिसाद
भाग १ इथे. नमस्कार रूळगाडी मित्रांनो ! आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार ! या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... ! ok

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 71306 views

💬 प्रतिसाद (266)
अ
अनिंद्य Mon, 07/17/2023 - 16:17 नवीन
मीनाक्षी एक्सप्रेसने अजमेर पर्यंत (आधी तिथपर्यंतच होती, पुढे जयपूर पर्यंत झाली) प्रवास करण्याचा योग आलाय. ब्रिटिशांनी उत्तर-दक्षिण जोडायला महायुद्धकाळात या पर्यायाची योजना + अंमलबजावणी योग्य केली. पातालपानी - कलाईकुंड दरम्यान तो प्रसिद्ध ४ च्या आकड्यासारखा ट्रॅक येतो.... मग कुंड ला कलाकंद. मग पुढे रतलाम ला 'मावाबाटी' / कुल्लडमधले गरम गुलाबजाम.... मग नासिराबादला तो भलामोठा सुप्पर तिखट 'कचोरा' ... मध्ये डॉ. आंबेडकरांमुळे प्रसिद्ध असलेले MHOW गाव, ते मिलिटरी हेडकार्टर ऑफ वॉर चे लघुरूप होते म्हणे .... आठवणीच आठवणी. BTW काचीगुडा / सिकंदराबाद ते पूर्णा ब्रॉड गेज पूर्ण झाल्यावर ही ट्रेन तिथवर ब्रॉडगेज डब्यांसकट येई. मग सर्व प्रवासी उतरून पुढे मीटरगेज बोग्यांची तशीच दुसरी मीनाक्षी उभी असे त्यात जाऊन बसत आणि प्रवास पुढे चालू होई. तासभर हा सोहळा चालत असे :-) हे अनेक वर्ष चालले.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 06/29/2023 - 16:38 नवीन
प्रवास एकदम मस्तच. पुरानी दिल्ली जोधपूर, जोधपूर पोखरण,जयपूर अलवर दिल्ली,गोहाट्टी(असाम) ते धर्मनगर (त्रिपुरा) व्हाया लामडिंग बदरपुर हाफ लाँग. असे मोठे मोठे मिटरगेज रेल्वेने प्रवास अनुभवले. खाण्यापिण्याचे हाल होत असत पण तेव्हा घरून दोन दोन दिवसाचे खाण्याचे पदार्थ व भरपूर पिण्याचे पाणी बहुतेक प्रवासी बरोबर ठेवत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/07/2023 - 08:13 नवीन
महाराष्ट्रात दोन महिन्यांत रेल्वेच्या चार दुर्घटना टळल्या. संबंधित सतर्क कर्मचाऱ्यांचा सत्कार.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 07/12/2023 - 00:55 नवीन
आता "वंदे साधारण" गाड्यांची निर्मिती होणार
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/13/2023 - 08:18 नवीन
काल पाहण्याचा योग आला. फक्त मालगाड्यांसाठी बनवलेलं Alstom -Indian Railways (75+25) ने बनवलेलं १२००० एचपीचं एंजिन. अशी दोन एंजिने जोडून स्टील पत्र्याच्या वजनदार गुंडाळ्या घेऊन मालगाडी बोरघाट उतरून खाली कर्जतला आली होती. (येताना पाहायला नाही मिळाली. ) निळी एंजिने फारच सुंदर दिसतात.
  • Log in or register to post comments
इ
इपित्तर इतिहासकार गुरुवार, 07/13/2023 - 14:22 नवीन
ह्याचा कारखाना बिहारमधील मधेपुरा येथे आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 07/14/2023 - 07:32 नवीन
गळक्या गाड्या, झुरळे अन् अस्वच्छतेने रेल्वे प्रवासी हैराण
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Mon, 07/17/2023 - 16:21 नवीन
रेल्वे चर्चा छान. त्या वंदे भारत ट्रेन्सचा मात्र धसका घेतलाय - म्हशींच्या धक्क्याने इंजिन ड्यामेज, पावसाचे पाणी गाडीच्या छतातून धो धो आत असे सगळे व्हिडियो / लाईव्ह स्ट्रीम बघितले. आजच एका वंदे भारतला लागलेली आग. हे 'वांदे भारत' जास्त दिसतंय :-) आता त्यात प्रवास करण्याची हिंमत होणार नाही !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 07/17/2023 - 17:48 नवीन
झालंय खरे तसे ..
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Tue, 07/18/2023 - 06:53 नवीन
बातमी
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 07/18/2023 - 17:11 नवीन
पार्सल डब्यातून मृतदेहाची वाहतूक
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 07/23/2023 - 12:22 नवीन
रेल्वे स्थानकांवर वीस रुपयात एका जेवणाची सोय. प्रवासादरम्यान एका गरीब मजुराचा उपाशीपोटी मृत्यू झाल्यानंतर रेल्वेने घेतलेला हा निर्णय.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 07/25/2023 - 16:40 नवीन
हावडा रेल्वे स्थानकाला हरित इमारतींसाठीचे सुवर्ण गुणांकन नुकतेच जाहीर झाले आहे. 169 वर्षे जुन्या असलेल्या या स्थानकात पर्यावरण रक्षणासाठी केलेल्या विविध उपाययोजनांसाठी हे देण्यात आलेले आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 07/28/2023 - 17:47 नवीन
गाडी वेगळ्या मार्गाने मनमाडला दीड तास लवकर पोहोचली आणि तिथून नियोजित वेळेप्रमाणे वेळेपर्यंत न थांबवता पुढे पळवली . मग काय झाले . . . गोवा ते निजामुद्दीन गाडीचा मजेशीर किस्सा.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 08/11/2023 - 12:08 नवीन
नवे अमरावती स्थानक तिसरे गुलाबी स्थानक !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 08/15/2023 - 03:46 नवीन
वर्षभर चाललेल्या या भागात चांगली चर्चा झाली. त्यात सहभागी झालेल्या सर्वांना धन्यवाद ! या पुढील चर्चा भाग ३ मध्ये करावी. सर्वांचे तिकडे स्वागत…
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा