Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

माझी ट्रेन माझी प्रेयसी (२)

ह
हेमंतकुमार
Fri, 08/19/2022 - 07:56
💬 266 प्रतिसाद
भाग १ इथे. नमस्कार रूळगाडी मित्रांनो ! आज ट्रेनधाग्याच्या पहिल्या भागाला पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने हा नवा धागा काढत आहे. 2017 मध्ये माझे मिपावर आगमन झाले. त्यानंतर महिनाभरात हा ट्रेनचा धागा काढला. त्यावर ‘प्राडॉ.दिबि’ यांचा एकमेव उत्साहवर्धक प्रतिसाद आला होता. त्यानंतर जवळपास दीड वर्ष धागा अडगळीत पडला होता. 2019 मध्ये धाग्याला ऊर्जितावस्था आली. मग आपल्यातील अनेकांनी या विषयावरील आपापले अनुभव आणि मते उत्साहाने लिहीली. त्यानंतर आजपर्यंत ट्रेनचा हा धागा एक्सप्रेस गतीने; कधीकधी तर राजधानी-गतीने धावत आहे. इथल्या चर्चेत सहभागी होणारे सर्वजण त्याचा आनंद घेत आहेत. आतापर्यंत चर्चेत सहभागी झालेल्या सर्व धागाप्रवाशांचे आभार ! या नवीन भागाचेही नवे आणि जुने वाचक स्वागत करतील अशी आशा आहे. तर येउद्यात ट्रेनसंबंधी......... काय वाट्टेल ते ........... ! ok

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 71306 views

💬 प्रतिसाद (266)
ह
हेमंतकुमार Sat, 09/10/2022 - 07:31 नवीन
भारतीय रेल्वेतून पाळीव प्राणी( कुत्रा व मांजर) नेण्यास परवानगी - फक्त १ एसी या वर्गातून आणि तेसुद्धा संपूर्ण 4 सीट्स आरक्षित करून. आरक्षण प्रवासाच्या आधी काउंटरवर जाऊन करावे लागणार. प्राण्याच्या वजनानुसार पैसे आकारणार.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 09/10/2022 - 08:03 नवीन
वरील माहिती पाळीव प्राणी 'प्रवाशांसोबत' नेण्यासंदर्भात आहे.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Tue, 09/13/2022 - 07:50 नवीन
ह्याच संदर्भातली हि एक अतरंगी बातमी दुवा १ दुवा २ दुवा ३
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 09/13/2022 - 08:25 नवीन
कठीण आहे ! घोडा मालकाला अटक झाली ते योग्यच
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 09/10/2022 - 08:40 नवीन
संदर्भ :- Indian Railways: Third Vande Bharat train completes trial! Likely to run between THESE cities

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong." — LeBron James
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/12/2022 - 13:50 नवीन
आधुनिक सिग्नल आणि संपर्क व्यवस्था असतानाही रेल्वेची एक जुनीपुराणी पद्धत अजून चालू असल्याचे वाचून अचंबा वाटला. जेव्हा एखादी ट्रेन स्टेशनमध्ये घेण्यास जागा नसते तेव्हा ती मागे काही अंतरावर (होम सिग्नल) उभी करून ठेवतात. जर का असा थांबवून ठेवण्याचा कालावधी 15 मिनिटांपेक्षा जास्त असल्यास गार्डने आपल्या ट्रेनच्या मागे सुमारे 1.2 किलोमीटरपर्यंत जाऊन रुळांवर स्फोटके ठेवायची असतात. जर का मागून एखादी ट्रेन येत असेल तर तिला पहिल्या ट्रेनला पुढे अडथळा आहे हे समजावे म्हणून. ही दुसरी ट्रेन त्या स्फोटकांवरून गेल्यावर ती फुटतात. आता या जुन्यापुराण्या पद्धतीवर रेल्वे पुनर्विचार करत आहे हे चांगले.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/14/2022 - 16:10 नवीन
जगातील सर्वात उंचीवरील रेल्वे पूल असलेल्या चिनाब पुलाचे नवे फोटो रेल्वेने प्रसिद्ध केले आहेत.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/16/2022 - 13:58 नवीन
भारताची हायड्रोजन इंधनावर चालणारी पहिली ट्रेन 2024 मध्ये येणे अपेक्षित आहे. त्यासाठी विविध उद्योगांमध्ये पूर्वतयारी सुरू झालेली आहे Image removed.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/23/2022 - 12:53 नवीन
उद्या अहमदनगर ते आष्टी मार्गावर पहिली प्रवासी रेल्वे धावणार,
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/26/2022 - 12:01 नवीन
दक्षिण आफ्रिकेतील पहिली सौरऊर्जेवर चालणारी ट्रेन तिथल्या 20 पौगंडावस्थेतील मुलांनी मिळून तयार केली आहे. आता तिच्यावर पुढील प्रयोग होतील <
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/26/2022 - 12:02 नवीन
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 09/26/2022 - 12:03 नवीन
https://techxplore.com/news/2022-09-safrica-teens-solar-power-commuters.html
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 09/28/2022 - 17:09 नवीन
ओमान ते यु ए इ रेल्वेचा प्रस्ताव दोनशे किलोमीटरच्या वेगाने ते अंतर 100 मिनिटात कापणार https://www.thearabianstories.com/2022/09/28/you-can-soon-travel-from-oman-to-uae-in-just-100-minutes-by-train/
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Fri, 09/30/2022 - 13:19 नवीन
माननीय पंतप्रधान ह्यांच्या हस्ते ह्या नव्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखून उदघाटन करण्यात आले. ह्यावेळी पंतप्रधानांनी गांधीनगर ते अहमदाबाद असा रेल्वे प्रवासही केला.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Fri, 09/30/2022 - 13:21 नवीन
ह्यापूर्वी दिल्ली ते वाराणसी आणि दिल्ली ते कटरा ह्या दोन मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु असून हि तिसरी वंदे भारत एक्सप्रेस आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 09/30/2022 - 13:26 नवीन
तिसरी वंदे भारत एक्सप्रेस >>छान ! ....... आता थोडी करमणूक : हे पहा... झोपेतून उठवणार उचलून नेणार ?? https://www.maharashtranama.com/business-tourism/irctc-railway-ticket-booking-starts-destination-alert-wake-up-alarm-check-details-30-september-2022/ "या सुविधेचा फायदा कोणी घेऊ शकतो. यामध्ये रेल्वे स्टेशनवर पोहोचण्यापूर्वी वीस मिनिटे आधी तुम्हाला उचलून नेण्यात येणार आहे. यासाठी फक्त तीन रुपये मोजावे लागतील" (ते फोन करून वीस मिनिट आधी आपल्याला झोपेतून उठवणार आहेत !) :)))))))
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 10/01/2022 - 00:01 नवीन
.रेल्वे सेवा ठप्प होण्याच्या मार्गावर. तीव्र इंधन तुटवडा संपूर्ण देशात फक्त दोन प्रवासी गाड्या धावत आहेत
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 10/26/2022 - 11:19 नवीन
नॉर्वेमधील ध्रुवीय प्रकाश पाहण्यासाठी ट्रेन सेवा उपलब्ध https://www-euronews-com.cdn.ampproject.org/v/s/www.euronews.com/travel/amp/2022/10/18/flight-free-travel-the-best-places-in-europe-to-see-the-northern-lights-by-train?amp_gsa=1&amp_js_v=a9&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16667755589567&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.euronews.com%2Ftravel%2F2022%2F10%2F18%2Fflight-free-travel-the-best-places-in-europe-to-see-the-northern-lights-by-train
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 10/30/2022 - 09:05 नवीन
स्वित्झर्लंड मधील रेल्वेला 175 वर्षे पूर्ण होत असल्याने ते आता एक विक्रम करीत आहेत. जगातील सर्वात लांब असलेली प्रवासी ट्रेन (1,910m) त्यांच्याकडे धावणार आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/11/2022 - 03:57 नवीन
भारतीय रेल्वेच्या एकूण ब्रॉडगेज मार्गांपैकी 82 टक्के भागाचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. छान
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/11/2022 - 03:57 नवीन
भारतीय रेल्वेच्या एकूण ब्रॉडगेज मार्गांपैकी 82 टक्के भागाचे विद्युतीकरण पूर्ण झालेले आहे. छान
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 11/11/2022 - 05:28 नवीन
हा घाट चढताना घ्यावा लागतो मागे एंजिनं जोडण्यासाठी. पण तो अधिकृत स्टॉप असेलच असे नाही.(इथून तिकिट मिळणार नाही.) डेक्कन एक्सप्रेस ११००७ चार हा स्टॉप काढला आहे. नेरळचा स्टॉप आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/11/2022 - 09:19 नवीन
काही महत्त्वाच्या स्थानकांचे नूतनीकरण होणार आहे. तिथल्या रेल्वे मार्गा ंमध्ये पारंपरिक दगडांचा वापर न करता काँक्रीट पद्धतीचे मार्ग बनवले जाणार आहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 11/11/2022 - 09:45 नवीन
पण आता बायो टॉइलेट्समुळे गाड्या जिथे बराच वेळ थांबतात त्या स्टेशनांतील रुळांवर जमा होणारी घाण जवळपास नष्ट झाली आहे. उदाहरणार्थ कल्याण,पुणे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 11/11/2022 - 09:52 नवीन
बरोबर एकेकाळी सकाळच्या वेळी या स्थानकांवर गेले असता दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावूनच हिंडावे लागत असे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 11/12/2022 - 02:27 नवीन
मुंबईमध्ये सातवे रेल्वे टर्मिनस लवकरच होणार…. जोगेश्वरीला https://marathi-hindusthanpost-com.cdn.ampproject.org/v/s/marathi.hindusthanpost.com/social/7th-railway-terminus-to-be-start-in-mumbai-soon/102264/amp/?amp_gsa=1&amp_js_v=a9&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16681576670967&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fmarathi.hindusthanpost.com%2Fsocial%2F7th-railway-terminus-to-be-start-in-mumbai-soon%2F102264%2F
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sat, 11/12/2022 - 06:29 नवीन
भारतात सर्वात जास्त अंतर कापणार्‍या श्रीमाता वेष्णोदेवी कटरा ते कन्याकुमारी, हिमसागर एक्सप्रेसने मी जम्मु ते कन्याकुमारी १४ नोहेंबरला प्रवास करणार आहे. ही ट्रेन ४ दिवसात तीन हजार सातशे नव्वद कि.मी अतंर कापून कन्याकुमारीला पोहचते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 11/12/2022 - 06:35 नवीन
तुमच्या या लांबवरच्या प्रवासाला शुभेच्छा ! अनुभव जरूर लिहा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/12/2022 - 07:09 नवीन
https://www.india.com/travel/articles/5-longest-train-journeys-in-india-railways-travel-railgadi-5641050/ 5. Vivek Express – Dibrugarh to Kanyakumari Vivek Express from Dibrugarh (Assam) to Kanyakumari (Tamil Nadu) is the longest route of the Indian Railways network both in terms of distance and time. This weekly train is currently the longest train route in the Indian Subcontinent. It covers a total distance of 4,286 kilometres with a running time of 80 hours and 15 minutes.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 11/12/2022 - 07:10 नवीन
Kashmir Himsagar Express – Kanyakumari and Shri Mata Vaishno Devi Katra Kashmir Himsagar Express is a weekly express train running between Kanyakumari (Tamil Nadu) and Shri Mata Vaishno Devi Katra (Jammu and Kashmir). It is currently the second longest running train in terms of distance and time. The train covers a distance of 3,787 kilometres in 72hours passing through 12 states.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार गुरुवार, 11/17/2022 - 04:47 नवीन
UTS ॲप वापरून जनरल तिकीट काढणाऱ्या प्रवाशांना आता स्थानकापासून २० किलोमीटरपर्यंत दूर असताना देखील असे तिकीट काढता येणार आहे. पूर्वी ही मर्यादा दोन किलोमीटर होती.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 11/20/2022 - 14:43 नवीन
Airoli and Rabale रेल्वे स्थानकांच्या नावांमधील घोळामुळे तिकीट आरक्षण करताना प्रवाशांना त्रास
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/21/2022 - 06:53 नवीन
जीपीएस आणि इंटरनेट लागतं. ते भरोशाचं नाही. *********** करोनामधून मुंबईकर सुटले पण रेल्वेच्या मेगा ब्लॉकमध्ये अडकले. रात्री नऊ ते सकाळी नऊ दूर जाणाऱ्या गाड्या पनवेल/पुणे वरून सोडतात/पर्यंतच चालवतात.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Mon, 11/21/2022 - 06:55 नवीन
जीपीएस आणि इंटरनेट लागतं. ते भरोशाचं नाही.
स ह म त .
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य Mon, 11/21/2022 - 07:01 नवीन
<< रात्री नऊ ते सकाळी नऊ दूर जाणाऱ्या गाड्या पनवेल/पुणे वरून सोडतात/पर्यंतच चालवतात. >> नक्की कोणत्या गाड्या? १९, २० नोवेंबर रोजी मेगाब्लॉक असल्याने बर्याच गाड्या पनवेल, पुणे, दादर पर्यन्तच होत्या. कायमस्वरुपी पनवेल, पुणे पर्यन्त थंबणार्‍या/निघणाय्रा गाड्या कोणत्या?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 11/21/2022 - 08:52 नवीन
Train shedule पाहू नका. कुर्ला टर्मिनस आणि छ.शिवाजी मी.टर्मिनसच्या बऱ्याच गाड्या पनवेल/पुणे ला कापल्या आहेत. पण 12201 कुर्ला - कोशुवेली त्रिवेंद्रम आज कुर्ला येथूनच आहे. दादरच्या गाड्या पूर्ण चालत आहेत. अगदी 16345/46 नेत्रावती रात्री ९ ते सकाळी नऊ मध्ये नाही तरी पनवेलला कापली आहे. तुमच्या गाडीचे आरक्षण मिळते का पाहा. ते नसणार आणि ठळक सूचना येते. उदाहरणार्थ नेत्रावती गाडीचे ठाणेपासून आरक्षण मिळत नाही,पनवेल विचारल्यावर येते. प्रवासी दुरून येणार आणि पनवेलला उतरवणार म्हणजे कठीणच. एकूण मुंबईतील गर्दी पनवेलला ढकलण्याची खटपट वाटते आहे. उप्रकडे जाणाऱ्या गाड्या आगामी काळात ठाकुर्ली टर्मिनस/कल्याण वरून सोडण्याचा रेल्वेचा विचार आहे. टॅक्सीवाल्यांना बरे दिवस येणार. पनवेल ते मुंबई. कारण लोकल ट्रेनने जाणे शक्य नाही. दीड तासाच्या रेल्वे प्रवासाला ट्राफिकमधून पाच तास लागतील.
  • Log in or register to post comments
अ
अनिकेत वैद्य गुरुवार, 12/08/2022 - 09:07 नवीन
बातमी मुंबई: लोकमान्य टिळक टर्मिनसवर वर्षभरात दोन नवीन फलाट; मेल-एक्स्प्रेस सोडण्याची क्षमता वाढणार सदर बातमीत उल्लेख केल्याप्रमाणे, "एलटीटीत नवीन फलाट बांधण्याचे काम सुरू असल्याने नेत्रावती, मत्स्यगंधा, कामख्या एक्स्प्रेस सध्या पनवेलमधून सोडण्यात येत आहेत. १२ डिसेंबरनंतर या गाड्या पुन्हा एलटीटीमधून सोडण्यात येणार आहेत." हे कारण असावे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 11/22/2022 - 03:56 नवीन
रेल्वे रुळावर टाकण्यात येणारे दगड मेट्रोच्या रुळावर का टाकले जात नाहीत? https://www.loksatta.com/explained/why-local-train-tracks-have-stones-unlike-mumbai-metro-tracks-how-railway-tracks-cross-paths-explained-svs-99-3277421/
  • Log in or register to post comments
व
विजय_आंग्रे Tue, 11/22/2022 - 06:32 नवीन
शकुंतला रेल्वे -- शकुंतला रेल्वे -- हि रेल्वे चालवण्यासाठी २०१६ पर्यंत भारतीय रेल्वेला ब्रिटीशांना रॉयल्टी द्यावी लागत होती.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 11/22/2022 - 06:55 नवीन
भारतीय रेल्वेही माहिती देत नाहीत. माथेरान रेल्वे सुरुवातीला खासगीत होती. पण नंतर ती मध्य रेल्वेने घेतली. पण त्याचा उल्लेख करायचं रेल्वे टाळणे.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Tue, 11/22/2022 - 07:24 नवीन
१८६२ ला बैलाद्वारे ओढली जाणारी ट्रामवे म्हणून शुभारंभ झालेल्या प्रोजेक्टची लातूर ते मिरज व्हाया बारसी टाउन अशी बारसी लाईट रेल्वे कंपनीची ३२५ कीमी ची नॅरोगेज लाईन १८९७ पासून १९५४ पर्यंत खाजगीच होती. १९५४ ला ती भारतीय रेल्वेने विकत घेतली.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 11/26/2022 - 07:05 नवीन
सध्या भारतीय रेल्वेचे एकूण 19 कार्यकारी विभाग (zones) आहेत. त्यामध्ये आता नव्या एकाची भर पडणार आहे तो म्हणजे: South Coast Railway Zone त्याचे मुख्यालय विशाखापट्टणम असेल.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sun, 11/27/2022 - 12:17 नवीन
विजयवाडा जंक्शन का नाही? अमरावती आंध्राची नवीन राजधानी इथे बांधत आहेत. म्हणून East coast railway चे दोन भाग करून दक्षिण भागाचे मुख्यालय तिथे काढायला हवे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 11/27/2022 - 12:44 नवीन
गरजेनुसार वळणावर कलणाऱ्या गाड्या वंदे भारतसाठी निर्मिती होणार : https://m-economictimes-com.cdn.ampproject.org/v/s/m.economictimes.com/industry/transportation/railways/india-to-get-first-tilting-trains-by-2025-26-technology-to-be-used-in-100-vande-bharat-trains/amp_articleshow/95768907.cms?amp_gsa=1&amp_js_v=a9&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16694564977767&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fm.economictimes.com%2Findustry%2Ftransportation%2Frailways%2Findia-to-get-first-tilting-trains-by-2025-26-technology-to-be-used-in-100-vande-bharat-trains%2Farticleshow%2F95768907.cms
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 12/03/2022 - 07:09 नवीन
रेल्वेची घरपोच पार्सल सेवा : गतीशक्ती एक्सप्रेस कार्गो रेल्वे व टपाल प्रशासनाने एकत्र येऊन ही सेवा द्यायचे ठरवले आहे. घरी येऊन पार्सल घेणार व प्राप्तकर्त्याच्या घरी पोचवणार . अशा सेवेची ट्रेन गरज भासल्यास संपूर्ण पार्सल रेल्वे असेल. त्याच्या डब्यांची रचनाही वेगळी केलेली असेल. जानेवारी 2023 पासून पुणे शहरात चालू होणार.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 12/04/2022 - 16:47 नवीन
बातमी ‘युनेस्को’च्या पुरस्कारास पात्र ठरलेली दुसरी वास्तू म्हणजे, मुंबईतील मध्य रेल्वेवरील भायखळा रेल्वे स्थानक होय. रोजचा प्रवास करीत असताना ब्रिटिश काळात उभारलेल्या अशा ऐतिहासिक बांधकामांकडे लक्ष देऊन पाहिले जात नाही; त्यामुळे त्यांचे स्थापत्यसौंदर्य नजरेस पडत नाही. भायखळा स्थानकाचे बांधकाम १८८७मध्ये सुरू करून १८९१मध्ये पूर्ण झाले. याचाच अर्थ असा, की हे स्थानक १२५ वर्षे जुने आणि भारतातील सर्वांत जुने रेल्वे स्थानक आहे
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 12/13/2022 - 15:30 नवीन
रेल्वे चाहत्यांसाठी रेल्वेचे तीन अक्षरी वर्डल : https://irfca.org/irfca-wordle/ ज्या स्थानकांचा संकेत तीन अक्षरी असतो तशी स्थानके नेहमीच्या पद्धतीने ६ प्रयत्नात ओळखणे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 12/16/2022 - 03:55 नवीन
83 टक्के पूर्ण झाले आहे असे दिसते https://swarajyamag-com.cdn.ampproject.org/v/s/swarajyamag.com/amp/story/infrastructure%2Felectrification-push-83-per-cent-of-indian-railways-network-now-electrified?amp_gsa=1&amp_js_v=a9&usqp=mq331AQIKAGwASCAAgM%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16711590856850&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fswarajyamag.com%2Finfrastructure%2Felectrification-push-83-per-cent-of-indian-railways-network-now-electrified
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sun, 01/01/2023 - 05:29 नवीन
यात्रीगण कृपया ध्यान दें!' .. रेल्वे स्टेशनवर ऐकू येणारा हा आवाज कोणाचा? हा गोड आवाज सरला चौधरी यांचा आहे. त्यांनी ही उद्घोषणा प्रथम १९८२ मध्ये केली. .... सर्व रेल्वेप्रेमी तसेच सर्व मिपाकरांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Wed, 01/25/2023 - 03:23 नवीन
लवकरच या मार्गावरील शताब्दी बंद होऊन त्याऐवजी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे तिचा वेग 110 किलोमीटर प्रति तास एवढाच असेल प्रवासी भाड्यात मात्र 40 ते 50 टक्के वाढ होणार आहे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा