Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

लाल सिंग चढ्ढा

स
सोत्रि
Sun, 08/14/2022 - 11:28
💬 207 प्रतिसाद
बहिष्काराच्या गदारोळात अडकलेला आणि त्यामुळे गाजावाजा झालेला लाल सिंग चढ्ढा सिनेमा पाहायचा की नाही ह्या वादात न पडता एक सिने कलाकृती म्हणून जमलेच तर हा सिनेमा बघायचे ठरवले होते. पण ह्या बहिष्काराच्या गदारोळाने माझाही किंचितसा बेंबट्या झाला होता बरं का, उगाच खोटं का बोला. अमिरमुळे नाही, पण करीनाच्या, "नका बघू मग आमचे सिनेमे" ह्या नेपोटिजम वरच्या मुक्ताफळामुळे! तर ते एक असो. काल हा सिनेमा बघितला. ज्या मूळ सिनेमाचे, फॉरेस्ट गंपचे, रीतसर हक्क विकत घेऊन हिंदीत पुनर्निर्मिती केली, तो सिनेमा बघून बराच काळ लोटल्याने तो सिनेमा विस्मृतीत जाऊन तपशील आठवत नव्हते. पण ते बरंच झालं, लाल सिंग चढ्ढा फॉरेस्ट गंपच्या छायेत न बघता स्वतंत्र सिनेमा म्हणून बघता आला. सिनेमा प्रचंड आवडला. अतिशय शांत वाहणाऱ्या नदीप्रमाणे प्रवाही आणि संयत कथानक एक स्वच्छ आणि मन शांत करणारा अनुभव देऊन जातं. आलिकडच्या वेब सिरीजच्या अंगावर येणाऱ्या अतिरंजित कथानकांच्या पार्श्वभूमीवर ह्या सिनेमाचे कथानक एका मंद हवेची झुळूक यावी तसे वाटते. अतुल कुलकर्ण्यांना लेखनाचे पैकीच्या पैकी मार्क. १९७१ ते २०१८ ह्या काळातल्या महत्त्वाच्या घटनांची गुंफण कथानकात एकजीव होऊन एकदम फक्कड जमलीय. ह्या सगळ्या घटनांचा साक्षीदार असल्याने त्या जुन्या आठवणी जाग्या होऊन दर्शक सिनेमात (पक्षी: लालसिंगच्या गोष्टीत) गुंतत जातो. लाल सिंग चढ्ढा पंजाबी असल्याने सिनेमात पंजाबी भाषेचा तडका आहे आणि तो त्या भाषेच्या लहेजामुळे लाल सिंग चढ्ढाच्या व्यक्तिमत्त्वाला उचलून धरून खुलवतो. सर्वच कलाकारांनी समरसून कामं केलीत. अमीर त्याचं काम चोख पार पाडणार होताच आणि तो ते तसंच पार पाडतो. लाल सिंग चढ्ढाच्या पात्राची निखळता, वेगळेपण आणि त्यातले पैलू दाखवणं आमिरसारख्या कसदार अभिनेत्याला काय कठिण जाणार? मोना सिंग छाप पाडण्यात यशस्वी झाली आहे. कणखर आई अतिशय ताकदीने उभी केलीय तिने. करीना ठीकठाक. पैसा हाच एकमेव निकष लावून आयुष्याकडे बघण्याच्या नादात होणारी रूपाच्या आयुष्याची फरपट तिने ठीकठाक उभी केलीय, दिग्दर्शकाने जितकं सांगितलं तितकं आणि तसं! . बाकीचे सगळे कलाकार आपापली कामं चोख पार पाडतात. जे काही आक्षेप ह्या सिनेमावर घेतले आहेत (लष्कराचा, शिखांचा, देशाचा अपमान वगैरे...वगैरे...) ते सिनेमा बघताना कुठेही जाणवत नाहीत. कथानकाच्या अनुषंगाने त्या घटना येतात आणि सिमेना कथानकात गुंतवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याने त्या घटना घडताना कुठेही काही खटकत नाही. लाल सिंग चढ्ढा हे पात्र फारच निष्पाप आहे. त्याची निरागसता आणि त्याचं ते निष्पाप असणं सिनेमा बघताना लक्षात आलं की ह्या सगळ्या बाबी गौण होऊन जातात. सोशल मीडियाच्या गदारोळात सहभागी न होता, कुठलेही पूर्वग्रह न ठेवता, कोरी पाटी घेऊन सिनेमा पाहायला गेल्यास एक नितांत सुंदर सिनेमाचा अनुभव पदरी पडेल. लाल सिंग चढ्ढा त्या दर्जाचा सिनेमा नक्कीच आहे!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 66892 views

💬 प्रतिसाद (207)
च
चिंतामणी Wed, 11/09/2022 - 10:10 नवीन
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 11/09/2022 - 10:10 नवीन
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 11/09/2022 - 12:28 नवीन
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 11/09/2022 - 12:30 नवीन
  • Log in or register to post comments
B
Bhakti Fri, 09/02/2022 - 19:18 नवीन
लाल सिंग निमित्ताने फोरेस्ट गंप सुंदर सिनेमा पाहिला.Tom चा अभिनय अप्रतिम!
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 11/09/2022 - 10:06 नवीन
सोत्रीजी आक्षेप चित्रपटात काय काय आहे याबद्दल नसून अमीर खानच्या दुटप्पी वागण्यावर आहे. कारणे नक्कीच माहित असणार आहेत याची खात्री आहे. विरोध उर्मट करीना कपूर खानला आहे. "बघायचा असेल तर बघा. तुम्हाला आमंत्रण नाही दिले" असे मायबाप प्रेक्षकांना म्हणण्याबद्दल आहे हे समजून घ्या. मूळ चित्रपट सोत्रीजी तुम्ही विसरला असल्याने जास्त कॉमेंट करीत नाही. पण त्यात हिरो कोणाला वाचवतो हे आठवा. थोडासा मेंदूला ताण द्या. या चित्रपटात हिरो कोणाला वाचवतो हे नक्कीच आठवत असेल. तो अतिरेक्याला वाचवतो. आणि पुढे त्या अतिरक्याचे उदात्तीकरण केले आहे. विरोध त्याला आहे.
  • Log in or register to post comments
च
चिंतामणी Wed, 11/09/2022 - 10:06 नवीन
सोत्रीजी आक्षेप चित्रपटात काय काय आहे याबद्दल नसून अमीर खानच्या दुटप्पी वागण्यावर आहे. कारणे नक्कीच माहित असणार आहेत याची खात्री आहे. विरोध उर्मट करीना कपूर खानला आहे. "बघायचा असेल तर बघा. तुम्हाला आमंत्रण नाही दिले" असे मायबाप प्रेक्षकांना म्हणण्याबद्दल आहे हे समजून घ्या. मूळ चित्रपट सोत्रीजी तुम्ही विसरला असल्याने जास्त कॉमेंट करीत नाही. पण त्यात हिरो कोणाला वाचवतो हे आठवा. थोडासा मेंदूला ताण द्या. या चित्रपटात हिरो कोणाला वाचवतो हे नक्कीच आठवत असेल. तो अतिरेक्याला वाचवतो. आणि पुढे त्या अतिरक्याचे उदात्तीकरण केले आहे. विरोध त्याला आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    2 days 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    2 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    2 days 20 hours ago
  • सुंदर !!
    2 days 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    2 days 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा