(सिंह कधी रागीट असतो का ?)
नुकतेच श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी नुतन संसदभवनावर बसवण्यात येणार्या अशोकचिन्हाचे उद्घाटन केले. त्या चिन्हचे ट्विटर वर पाहण्यात आलेले हे फोटो >>
महुआ मोईट्रा ताईंनी ट्विट केलेला हा फोटो : ताई पुढे जाऊन सत्यमेव जयते चा संघमेव जयते इथवर प्रवास पुर्ण झालेला आहे असेही म्हणाल्या !
>>>
हा वायेसार ने ट्विट केला फोटो :
>>>
एक रुपाया दंड फेमस प्रशांत भूषण म्हणाले - "From Gandhi to Godse; From our national emblem with lions sitting majestically & peacefully; to the new national emblem unveiled for the top of the new Parliament building under construction at Central Vista; Angry lions with bared fangs.
This is Modi's new India!"
हा विकिपेडीयावर सापडलेला सारनाथ चा मुळ फोटो :
>>>
एकुणच सगळा टिवटिवाट पाहुन देशहिताचे काही ज्वलंत प्रश्न उभे रहातात >>>
खरेच सिंह कधी रागीट असतो का ? सिंह कधी मस्युलर , पिळदार स्नायु असलेला, बलदंड असतो का ? की गर्जना करणारा सिंह म्हणजे हिंदुत्ववादी अन गप्प बसलेला सिंह सेक्युलर असे असते ना ? राष्ट्रचिन्हावरचा सिंह कसा प्रेमळ असायला हवा , त्याच्या चेहर्यावर बकरीच्या सारखा करुण भाव असायला हवा , त्याचे सुळे तर अजिबात दिसता कामा नयेत. उलट लॅब्रॅडोर कसं जीभबाहेर काढुन लाळ घोटतं अन कधीही येऊन चाटेल असे वाटतं तसे काहीसे भाव असायाला हवेत सिंहाच्या चेहर्यावर !
आम्हाला तर वाटते कि राष्ट्रचिन्हावरील सिंह असा असायला हवा >>>
तुम्हाला काय वाटते ?
;)
तुम्हाला काय वाटते ?
;)
याचा पुरावा द्या. आणि तसा पुरावा तुमच्याकडे नसेल तर जिथेतिथे जाऊन कबुतराप्रमाणे घाण करणे बंद करा.एबीपी माझाची बातमी आहे, तो विडीओ माझ्याकडे आहे. मिपावर विडीओ अपलोड करायची सोय नसल्याने मी तो विडीओ तुम्हाला कायप्पावर पाठवलाय. चेक करा. आणखी कुणाला हवा असल्यास मला आपला नंबर व्यनि करा.हे दोन्ही समान आहे हे फक्त मॉंटेसरी पातळीवरचा मुलगा समजेल.-- 😂 😂मला काही तो व्हिडिओ मिळालेला नाहीतुम्हाला मुळात पुरावा पहायचाच नाहीये. तसं नसतं तर तुम्हा एव्हाना मला मॅसेज करून पुरावा पाहीला असता. तसं असेल तर कृपया हा विषय ऊगाळने बंद करा किंवा मला वाट्सअप सा मॅसेज करू पुरावा घ्या.