Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

(सिंह कधी रागीट असतो का ?)

प
प्रसाद गोडबोले
Tue, 07/12/2022 - 20:49
🗣 107 प्रतिसाद
नुकतेच श्री. नरेंद्र मोदी ह्यांनी नुतन संसदभवनावर बसवण्यात येणार्‍या अशोकचिन्हाचे उद्घाटन केले. त्या चिन्हचे ट्विटर वर पाहण्यात आलेले हे फोटो >> महुआ मोईट्रा ताईंनी ट्विट केलेला हा फोटो : ताई पुढे जाऊन सत्यमेव जयते चा संघमेव जयते इथवर प्रवास पुर्ण झालेला आहे असेही म्हणाल्या ! >>> 4 हा वायेसार ने ट्विट केला फोटो : >>> 4 एक रुपाया दंड फेमस प्रशांत भूषण म्हणाले - "From Gandhi to Godse; From our national emblem with lions sitting majestically & peacefully; to the new national emblem unveiled for the top of the new Parliament building under construction at Central Vista; Angry lions with bared fangs. This is Modi's new India!" हा विकिपेडीयावर सापडलेला सारनाथ चा मुळ फोटो : >>> 4 एकुणच सगळा टिवटिवाट पाहुन देशहिताचे काही ज्वलंत प्रश्न उभे रहातात >>> खरेच सिंह कधी रागीट असतो का ? सिंह कधी मस्युलर , पिळदार स्नायु असलेला, बलदंड असतो का ? की गर्जना करणारा सिंह म्हणजे हिंदुत्ववादी अन गप्प बसलेला सिंह सेक्युलर असे असते ना ? राष्ट्रचिन्हावरचा सिंह कसा प्रेमळ असायला हवा , त्याच्या चेहर्‍यावर बकरीच्या सारखा करुण भाव असायला हवा , त्याचे सुळे तर अजिबात दिसता कामा नयेत. उलट लॅब्रॅडोर कसं जीभबाहेर काढुन लाळ घोटतं अन कधीही येऊन चाटेल असे वाटतं तसे काहीसे भाव असायाला हवेत सिंहाच्या चेहर्‍यावर ! आम्हाला तर वाटते कि राष्ट्रचिन्हावरील सिंह असा असायला हवा >>> 4 तुम्हाला काय वाटते ? ;)

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 24849 views

🗣 चर्चा (107)
स
सुक्या Tue, 07/12/2022 - 22:15 नवीन
नावडतीचे मीठे अळणी .. खरे दुखणे .. मोदींनी त्याचे अनावरण केले .. आणी आम्हाला नाय बोलावले हे आहे. गांधीजी चे सिंव्ह अगदी कोमल , शांतता प्रिय , अहिंसावादी वगेरे वगेरे होते ... मोदीनी त्यांना हिंसक केले .. कलियुग आहे हो कलियुग ... देश बुडवला पार .. मोदीने .. (छाती पिटणारी स्मायली)
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 07/13/2022 - 14:03 नवीन
गांधीजी चे सिंव्ह चरख्यावर सुत कताई देखील करत असत असं ऐकण्यात आलं होतं !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 07/13/2022 - 01:48 नवीन
ससा किंवा कोल्हा करायचा काय त्याचा?
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 07/13/2022 - 03:58 नवीन
बघतोस काय रागाने? ओव्हरटेक केलंय वाघाने.. असा काहीतरी प्रसंग झाला असेल, म्हणून चिड्ला असेल.
  • Log in or register to post comments
श
शिवाजी होळगे Wed, 07/13/2022 - 05:22 नवीन
  • Log in or register to post comments
श
शिवाजी होळगे Wed, 07/13/2022 - 05:22 नवीन
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 07/13/2022 - 05:37 नवीन
हा सुळे विचकलेला कार्लेचा सिंह बघा Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/13/2022 - 08:44 नवीन
श्या , कसले उग्र हिंदुत्ववादी संघी सिंह आहेत हे . =))))
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/13/2022 - 09:06 नवीन
श्या , कसले उग्र हिंदुत्ववादी संघी सिंह आहेत हे . =))))
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास Wed, 07/13/2022 - 06:52 नवीन
खिक्क. विरोध करायला काहीच नाही का म्हणून असे निरर्थक मुद्दे काढतात.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 07/13/2022 - 08:34 नवीन
काल नवभारत टाइम्स हिन्दी चॅनल वर मूर्तिकार देवरे यांची मुलाकात पाहिली. त्यांना हे काम सरकार ने नव्हे तर संसद भवन निर्माण करणार्‍या कंपनी ने दिले होते. त्यांनी सुरूवातीला म्हंटले एकच मोनालिसा कुणाला रोगी, कुणाला सुंदर आणि कुणाला रागीट दिसते. हा ज्याचा त्याचा दृष्टीकोण आहे. बाकी त्यांनी मूर्तीची छोटी प्रतिकृती वेगवेगळ्या अंगलने दाखवून मुलाकात घेणार्‍या पत्रकारचे समाधान केले. मूर्तीत कुठलाच बदल केलेला नाही. फक्त आकार मोठा आहे. बाकी विरोध करून जनतेचा रोष ओढवून आपल्याच पायावर कुडळ मारण्याचे कार्य विरोधी पक्ष व्यवस्थित करत आहे. भाजप प्रेमी ही खुश सिंह हा 'दहाड' मारणारा आहे.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Wed, 07/13/2022 - 09:09 नवीन
दिसत नाही
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 07/13/2022 - 11:33 नवीन
आधीचे (मूळ) सिंह आणि नवीन प्रतिकृती यात फरक दिसतो आहे. नवीन सिंहांचे जबडे अधिक वासलेले, त्यामुळे अधिक आक्रमक दिसत आहेत. मूळ चिन्ह प्रमाण मानूनच प्रतिकृती करण्याचा विरोधकांचा मुद्दा असावा. हवे तसे बदल करू नयेत., हे राष्ट्रध्वजाच्या बाबतीत तर अत्यंत कटाक्षाने पाळले जाते व बदल करून वापरल्यास कायद्याने शिक्षाही असावी कदाचित. बाकी आक्रमकता आपल्या सीमेवर पाहिजे, संसदेवरील चिन्हात असणे पुरेसे नाहीच.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 07/13/2022 - 12:20 नवीन
कुठलाही बदल नाही आहे. फक्त अप्रचार आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 07/13/2022 - 12:26 नवीन
आपल्याला शिल्प कलेतले काय पेट्रोल ते डॉलर सगळे कळते म्हणणाऱ्या भक्तांडा ना काय सांगावे? आम्हा महाराष्ट्रातील शिल्पकारांच्या उन्नतीसाठी सुरू केलेला एक व्हॉटसअॅप ग्रुप आहे. त्यावर शिल्पकार सुनील देवरेसुद्धा आहेत. त्यांना मी राजचिन्हच्या शिल्पाबाबत काही प्रश्न विचारले होते. ●सारनाथच्या मूळ शिल्पाची रेप्लिका बनवायची होती की सिंह करण्यासाठी काही फ्रीडम दिलं होतं? शिल्पकार सुनील देवरे सरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत हे सांगितलं आहे की त्यांनी सारनाथ येथे सापडलेल्या स्तंभशीर्षाची रेप्लिका बनवली आहे. किंवा तेच शिल्प मुख्य रेफरन्स आहे. कोणतेही आर्टिस्टिक एक्सप्रेशन्स किंवा शिल्पस्वातंत्र्य घेण्याचा प्रयत्न केलेला नाही ■आता मुख्य आक्षेप ◆मुख्य शिल्पाचे डोळे मोठे असून ते नाकपुडीच्या अगदी थोड्या वरच्या रेषेपर्यंत आहेत. नव्या शिल्पात रागीट भावामुळे भुवया आक्रसल्या आहेत त्यामुळे कपाळाच्या मधोमध पडलेल्या वळ्या या मुख शिल्पात कुठेही नाहीत. ◆एकूण मुख्य शिल्पाची सिमेट्रीकल आयाळ असून ती एखाद्या पॅटर्न प्रमाणे कोरलेली आहे अगदी जे नव्या शिल्पात रियलिस्टिक करण्याचा प्रयत्न वाटतो ◆जेंव्हा तुम्ही शिल्पाचा आकार अतिभव्य बनवता तेंव्हा पर्सपेक्टिव्हनुसार हेड मोठं करावं लागतं. पण इथे ते आहे त्याच्यापेक्षा पण लहान झालंय. डोक्याच्या दोन्ही बाजूला भरपूर आयाळ नसून पण भरपूर प्रमाणात आयाळ दाखलेली आहे जी पार पायापर्यंत वाढलेली आहे. ◆सारनाथचं स्तंभशीर्ष त्याच्या झिलईसाठी प्रसिद्ध आहे. मग ते मातीकामात तर सहज शक्य होतं. (मेटल कास्टिंग करताना तो परिणाम आला नाही तरी ते घासून बफिंग करू शकतो) ◆शिल्पाचे वेगवेगळे भाग जोडलेले एवढे स्पष्ट दिसत आहेत की ते घासून लेव्हल करण्याचे कष्ट ही घेतले नाहीत. हे खटकलं नाही का शिल्पकाराला आणि ते काम अप्रुव करणाऱ्या टीमला? ◆पायावर एवढ्या घोड्यासारख्या शीरा दाखवण्याचं नेमकं प्रयोजन काय? ◆खालचे घोडा आणि बैल (हत्ती आणि सिंह पलीकडल्या बाजूला आहेत) हे ज्या पद्धतीने मुख्य शिल्पात कोरले आहेत त्यासारखे नव्या शिल्पात अजिबात दिसत नाहीत. बैलाचा पुढच्या दोन पायांपैकी एक सरळ आणि एक हवेत का आहे? त्याचे खुर असे जाडे भरडे का केले आहेत हे न कळणारे आहे (मुख्य शिल्पात किती व्यवस्थित खाली टेकलेला पाय आहे.) या साध्या गोष्टी एक शिल्पकार म्हणून लगेच नजरेत भरतात. खरंतर मातीकामातच एवढे दोष आहेत की ते यावर काम करणाऱ्या अधिकारी वर्गाने अप्रुव्ह कसे केले हे कोडं आहे. आपलं राजचिन्ह जसं असायला हवं तसं ते झालं आहे का? अजिबात नाही. एखाद्या गणपतीच्या सिंहासनाचा सिंह करावा तसा काहीसा तो सिंह मला स्वतःला वाटतो. अशोक स्तंभावरचा सिंह नक्कीच नाही. ज्या शिल्पकामाचा आदर्श सांगितला गेला पाहिजे ते कामंच सदोष असेल तर आपण भारतीय, शिल्पकलेचा नेमका काय वारसा सांगणार आहोत? राजकीय लोकांना त्या आडून मोदींवर टीका करायची असेल किंवा अजून काही, त्याच्याशी आपल्याला देणे घेणे नाही. जे स्पष्ट दिसतं आहे ते बोलायला हवं. कारण शेवटी हा चौकातल्या एखाद्या शिल्पाचा विषय नसून संसदेवर लागणाऱ्या राजचिन्हाचा थोडक्यात देशाचा विषय आहे. (हे आक्षेप घेतल्यावर सकाळपासून अनेक ज्येष्ठ शिल्पकारांचे आणि शिक्षकांचे मला फोन आले. त्यांनी तर हे शिल्प तिथे लागण्याच्या ताकदीचं आणि लायकीचं नाही. ते खरंतर उतरवून नवं बसवणं गरजेचं आहे इथवर मतप्रदर्शन केलं आहे) फेसबुक पोस्ट जिथे फोटो सहीत हे बदल बघू शकता भूषण वैद्य ज्येष्ठ शिल्पकार , मुंबई
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 07/13/2022 - 13:13 नवीन
है शाब्बास ! आता कशी मजा आली . सगळेच एकाच बाजुने बोलणारे असल्यावर काय मजा येत नाही . मला वाटलेले की दुसरेच मिपाप्रसिध्द मोदीद्वेष्टे येऊन आपली प्रतिसाद मौक्तिके मांडतील पण ह्या वेळी तुम्ही चान्स मारलात ;) पण असो हरकत नाही. पण मुळातच सिंहा सारखा आक्रामक , हिंसक, असहिष्णु , परधर्मीय प्राण्यांचे लिटरली लिंचिंग करणारा प्राणी राष्ट्र चिन्हावर असणे हे मुळात किती अयोग्य ह्यावर बोला तुम्ही . शिवाय त्या चिन्हाखालील वाक्य सत्यमेव जयते हे देखील कोणतातरी मनुवादी उपनिषदातील आहे म्हणे. एवढंच कशाला , स्गळ्याच प्रमुख राष्ट्रीय संस्थांची घोषवाक्ये मनुवादी सनातनी संकृत ह्या मृतभाषेतुन घेतलेली आहेत . अहो एवढेच कशाला चक्क सुप्रीम कोर्टाचा मोट्टो - हा महाभारतील श्लोकातुन उचलेला आहे यतः कृष्णस्ततो धर्मो यतो धर्मस्ततो जयः। होय होय तोच कृष्ण ज्याला महात्मा फुलेंनी लंपट व्यभिचारी अन बाळबोध कृष्णाजी असे म्हणले आहे तो ! आता बोला ! एकुणच हे सगळे गांधीना अपेक्शित धर्मनिरपेक्षतेला अन गंगा जमना तहजीबला शोभणारे नाही. हे बीभत्स रागीट सिंह हटवा पण त्याच सोबत बाकीचेही सारे हटवले पाहिजे !! तुम्हाला काय वाटते ?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 07/13/2022 - 16:22 नवीन
हां श्लोक इकडून उचलला, तो मोटो तिकडून उचलला.. मग श्लोक , मोटो मधले शब्द बदलले आहेत की आहे तसेच वापरले आहेत ?? मुळात जर प्रतिकृती असेल तर मूळ शिल्पा बरहुकूम हवी.. त्यात बदल जाणीवपूर्वक केलाय की ती चूक आहे? भारत सरकारने कुठेही हे बदल जाणीवपूर्वक केलेत असे म्हणले नाही .. फक्त सिंह च नव्हे तर शिल्पात इतरही चुका आहेत.. फेसबुक पोस्ट वाचली तर त्यात फोटो सहीत उदाहरणे आहेत.. यात मोदी वगैरे काही संबंध नसून सरकार ने नेमलेल्या माणसा कडून झालेली चूक रेटून नेत आहेत एवढाच आहे
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/13/2022 - 17:03 नवीन
मूळ शिल्पात बदल केलेत हे कोणी ठरविले? मत प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. ही शिल्पकाराची मुलाखत वाचा. म्हणजे डोक्यात प्रकाश पडेल. https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/national/did-you-change-the-posture-of-ashoka-column-of-new-parliment-innguration-by-pm-modi-the-sculptor-made-it-clear-by-sunil-deore-a601/amp/
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 07/13/2022 - 18:08 नवीन
स्वतःची चूक मान्य करणार आहे का तो? भक्ताड !!
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/13/2022 - 18:32 नवीन
लॉजिक आणि आपला दुरूनही संबंध नाही हे आधीच लिहिले आहे.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 07/13/2022 - 13:55 नवीन
अरेच्चा! खरच की फेसबुकवरील शिल्प तज्ञांचे हे मुद्देही बरोबर आहेत. रिकामा उद्योग म्हणून या गोंधळाकडे ओम इग्नोराय नमः केलं होतं.पण नक्कीच मुळ सारनाथ स्तंभ अधिक देखणा आहे,ही कलाकृती त्याच्या खुप कमी वाटतेय.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 07/13/2022 - 14:00 नवीन
खरच की फेसबुकवरील शिल्प तज्ञांचे हे मुद्देही बरोबर आहेत. रिकामा उद्योग म्हणून या गोंधळाकडे ओम इग्नोराय नमः केलं होतं.पण नक्कीच मुळ सारनाथ स्तंभ अधिक देखणा आहे,ही कलाकृती त्याच्या खुप कमी वाटतेय.
  • Log in or register to post comments
श
शुभावि गुरुवार, 07/14/2022 - 07:52 नवीन
पण एवढी भव्यदिव्य मुर्ती घडवताना इतर शिल्पकारांचे मत विचारात घेत नाहीत का? हे तर टिम वर्क असेल ना?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/14/2022 - 08:00 नवीन
इतरांचे मत विचारात घेतले की नाही हे कोण सांगणार?
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Sat, 07/16/2022 - 12:41 नवीन
फेसबुक वरील फरक दाखवणारे फोटो पाहिले. शिल्पकार यांच्या म्हणण्याप्रमाणे मोठ्या आकारामुळे पहाण्याच्या कोनामुळे फरक दिसतो हे बरोबर आहे पण मुळ कलाकृती आणि नवीन शिल्प यात फरक दिसतोच आहे. मूळ कलाकृति अतिशय सुबक, सुरेख आणि उत्कृष्ट कलेचा नमुना आहे. नवीन बनवलेली कलाकृती ओबडधोबड बनवलेली दिसते. सिंहाचे डोळे निश्चितच वेगळे आहेत , आयाळ वेगळी आहे. पायाचे जॉईंट दिसताहेत. हत्तीचे पाय कसेतरीच बनवले आहेत. इतरही फेसबुक वर दाखवल्या प्रमाणे कामात सुबकता नाहीय. त्यामुळे नवीन राजचिन्ह मुळ स्तंभाप्रमाणेच आहे ह्या हे शिल्प घडवणार्‍या शिल्पकारांच्या म्हणण्यात तथ्य दिसत नाही.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 07/13/2022 - 14:07 नवीन
आक्रमकता आपल्या सीमेवर पाहिजे, संसदेवरील चिन्हात असणे पुरेसे नाहीच. ऑ , महात्मा गांधीचा देश आहे ना हा ? मग आक्रमकता वैगेरे कसे काय बोलु शकता तुम्ही ? बाकी तुम्हाला आक्रमकता आपल्या सीमेवर पाहिजे अस म्हणता तर आता पर्यंत झालेल्या (एक सोडुन) सर्व युद्धात भारतीय सैन्याने केलेल्या पराक्रमानंतर सुद्धा भारतीय सैन्याच्या आक्रमकतेवर तुम्हाला शंका आहे ? आता तुम्ही म्हणाल मला अस नव्हत म्हणायच, आक्रमकता ही नेत्यात असायला हवी ! ईतिहासात अशी फुसकी आक्रमकता काँग्रेसचे नेते खुप दाखवत आलेले आहेत. जसे की मणि शंकर अय्यर ज्यांनी पाकिस्तानात जाऊन मोदी विरुद्ध पाकिस्तानची मदत मागीतली होती. "मोदी को हटाके हम को वहा बिठाओ" अस पाकिस्तानला विनवणार्या मणिशंकर अय्यरच्या मते भारतातील सरकार पाकिस्तानातले राजकारणी ठरवत असावेत. त्याच्या अश्या समजाला कारणीभुत हामिद अंन्सारी नावाचा महा हलकट माणुस असावा. त्याने केलेले काळे कारनामे अखेर पाकिस्तानच्या पत्रकाराकडुनच ऊघड झाले. पुर्व उपराष्ट्रपती हामिद अंन्सारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पाकिस्तानचा पत्रकारा नुसरत मिर्झाला भारतात आमंत्रण दिले होते. तब्बल ७-८ वेळा हा पत्रकार भारतात येऊन रेकी करुन माहिती गोळा करुन पाकिस्तानातल्या आय एस आय च्या आकाला देत असे. सर्व साधारण पाकिस्तानच्या नागरीकाला भारताच्या व्हीजावर ३ शहरांना भेट देता येते, पण पुर्व उपराष्ट्रपती हामिद अंन्सारी यांनी विषेश निमंत्रण दिलेल्या ह्या पाकिस्तानी पत्रकाराला मात्र ७ शहर भेट द्यायची मुभा होती.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 07/13/2022 - 14:40 नवीन
हामिद अन्सारीला काय बोलायचे ते बोला पण आमच्या मणीशंकर अय्यरना काही बोलायचे नाही हा. आतापर्यंत दोनदा आयत्या वेळेस मणीशंकर अय्यरने पचकून आपल्या बाजूला भरपूर मते फिरवली आहेत- २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकींच्या पूर्वी मोदींना 'वो चायवाला' म्हणून आणि २०१७ मध्ये जड गेलेली गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात आलेला असताना मोदींना 'वो नीच आदमी' असे म्हणून. मी तर मणीशंकर अय्यरचा म्हणूनच मोठ्ठा पंखा आहे. त्यांनी वयाची ८० पार केली आहेत. त्यांनी सेंच्युरी मारावी या शुभेच्छा कायमच आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डँबिस००७ Wed, 07/13/2022 - 15:33 नवीन
म णि शंकर अय्यर एका साईडला तर दुसर्या साईडला दस्तुर खुद्द रा गा. ह्या दोघामुळेच भाजपा आज सत्तेत टिकुन आहे.
  • Log in or register to post comments
स
सुरिया Wed, 07/13/2022 - 12:20 नवीन
सिम्हामध्ये आक्रमकता आणि गर्जना करतानाचा आविर्भाव हवाच कारण मूळ कल्पना ही धर्मचक्रप्रवर्तणाची आहे. गौतम बुध्दांन शाक्यसिम्ह किंवा नरसिंह संबोधले आहे आणि ह्या धर्म चक्र प्रवर्तनाची द्वाही चारी दिशांना गर्जना करून सांगितली जात आहे. मूळ अशोक स्तंभ शीर्षात वर ३२ आरे असलेले धर्मचक्र ही होते. बुद्ध ३२ महामानवाच्या लक्षणानी परिपूर्ण होते त्याचे e द्योतक आहे. तेव्हा सिंह आक्रमक हवेतच. पण मूळ शिल्पावर मथुरा आणि गांधार शिल्प शैली चा प्रभाव असलेने ते सिंह रियालिस्तिक पद्धतीने घडवलेले नाहीयेत. सिंहाच्या मिशा पण बुध्दाच्या चूनिदार वस्त्राप्रमाने समांतर रेघांनी दाखवल्या आहेत. सिंहाच्या हसऱ्या चेहऱ्या चा पण भास होतो. पण ह्या शैलीत शिल्पात आयाळ, केस, स्नायू किंवा रक्त वाहिन्या (शिरा) अशा रियलिस्तिक पध्दतीने दाखवल्या जात नसत. मूळ शिल्प वेगळ्या शैलीत घडवले गेले होते. हे आधुनिक शिल्प वास्तववादी शैलितले वाटते आहे इतकाच तो फरक. ह्यावर फारसा वाद विवाद करण्याची ही गरज नाहीये. आयपीएस ऑफिसर ह्यांचे एम्बेलम, गाड्या वरचे स्टिकर किंवा टेबलावर ठेवलेले शो पीस मधले अशोक स्तंभाचे चिन्ह पाहता ओरिजिनाल पेक्षा वेगळ्या प्रचंड व्हरायत्या पाहायला मिळतील.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 07/13/2022 - 13:33 नवीन
या सिंहाबद्दल विश्वप्रवक्ते संजयजी राउतजी जोवर बोलत नाहीत तोवर मिडीया दखल घेणार नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/13/2022 - 13:50 नवीन
मार्कस ऑरेलियस, कुणाला तरी भारतातला सिंह मवाळच दिसायला हवाय. त्यांना इथे लंडनात ट्रफाल्गर चौकात सिंह बसवलेत ते मात्र सुळे दाखवीत डरकाळी फोडतांना दाखवलेले चालतात. Image removed. ( काय ती झाडी, काय ते डोंगार, काय ते हाटील, यकदम वक्के च्या चालीवर ) काय तो शिंव्ह, काय ती आयाळ, काय तो जबडा, विकराळ भोक्के आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 07/13/2022 - 14:09 नवीन
काय तो शिंव्ह, काय ती आयाळ, काय तो जबडा, विकराळ भोक्के

😃

  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 07/13/2022 - 14:21 नवीन
या दोन शिल्पात रंग हा मुख्य फरक दिसतोय. बाकी बहुतांशी साम्य आहे. जी प्रकाशचित्रे दिसत आहेत ती अगदी समान अंतरावरून, समान उंचीवरून व समान कोनातून घेतली तर अजिबात फरक दिसणार नाही. ही दोन्ही प्रकाशचित्रे समान अंतरावरून घेतली आहेत असे दिसत नाही. डाव्या बाजूचे प्रकाशचित्र काहीसे लांबून घेतल्यासारखे दिसते. तसेच ते काहीसे उभे खेचल्याने उभट व बारीक वाटत आहे. तस्मात या दोन प्रकाशचित्रांवरून तुलना करता येत नाही. एक उदाहरण देतो. वंदेमातरम् हे प्रख्यात गीत अगदी प्रथम एका चित्रपटात समाविष्ट केले होते. ते लता मंगेशकरांनी गायले होते. नंतर ते अधिकृतरित्या संसद. विधीमंडळ, विद्यालये अशा ठिकाणी एका वेगळ्या चालीत ऐकविले जाते किंवा गायले जाते. १९९७ मध्ये संगीतकार रेहमान यांनी हेच गीत अजून एका वेगळ्या चालीत प्रदर्शित केले. नवीन चालींना कोणीही विरोध केला नाही व नवीन चाली मूळ चालीपेक्षा भ्रष्ट किंवा वाईट आहेत असे कोणीही म्हणत नाही. समजा हे नवीन शिल्प मूळ शिल्पापेक्षा काहीसे वेगळे वाटत असेल (ते वेगळे आहे का हे अजून सांगता येत नाही), तरीसुद्धा एवढा कांगावा कशासाठी करायचा याचा विचार करावा.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन Wed, 07/13/2022 - 14:34 नवीन
समजा हे नवीन शिल्प मूळ शिल्पापेक्षा काहीसे वेगळे वाटत असेल (ते वेगळे आहे का हे अजून सांगता येत नाही), तरीसुद्धा एवढा कांगावा कशासाठी करायचा याचा विचार करावा.
कांगावा कशासाठी काय? मोदींच्या सरकारचा तो निर्णय आहे ना? एवढे एक कारण विरोध करायला पुरेसे नाही का?
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 07/13/2022 - 16:25 नवीन
हायला तुम्हाला सिंह हवाय कि बोकड. श्रीलंका सिंगापूर यांच्या चिन्हावर असलेले सिंह सुद्धा दात दाखवणारेच आहेत. श्रीलंकेचा तर हातात तलवार घेतलेला आहे. इराण इथिओपिया अफगाणिस्तान केनिया सारख्या असंख्य देशांच्या ध्वजावर सिंह आहेत . त्यातला कोणताही सिंह बायकोच्या ताटाखालचं मांजर असल्यासारखा नाहीये
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 07/13/2022 - 16:25 नवीन
अधिकृत गाणे उदा जण गण मन असेल किंवा इतर कोणतेही ते सरकारी कार्यक्रमात ए आर रेहमान वाले व्हर्जन वाजवतत की सरकार मान्य??
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 07/13/2022 - 14:55 नवीन
शिल्पावर भाष्य करणे माझ्या आखत्यारीत नाही पण मला एकच कळते जर संसदेत आक्रमकता आसेल तर सीमेवर सुद्धा आक्रमकता येईल. नाहीतर सोम्या गोम्या कडून दगड गोटे,गोट्या आणखीन काही खाऊन गप्प बसावे लागेल. बाकी चालू द्यात.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 07/13/2022 - 17:02 नवीन
कलाकृती अमान्य झाली तर ?? (( आता शिल्प स्विकृत होऊन जागेवर बसले आणि अनावरणही झाले ते सोडा.)) पण तसे झाले नसते तर यासाठी शिल्पकार इंन्शुरन्स काढतील. कमीतकमी ओतीवकाम,धातू ,वेळ याचे पैसे मिळतील.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Wed, 07/13/2022 - 18:20 नवीन
ज्यांना तो सिंह आक्रमक वाटतोय, त्यांनी त्या सिंहाच्या तोंडात गवताची पेंडी धरली आहे असे कल्पावे.(मनातल्या मनात). आणी एवढाच कळवळा असेल तर कोर्टात केस करावी कोणी अडवलेय??????
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 07/13/2022 - 20:00 नवीन
रागीट सिंह पाहून चीन घाबरेल असं मोदींजींना वाटलं असावं. :₹)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/13/2022 - 22:14 नवीन
सर्वात विनोदी सिंह पहायचे असतील तर खाली दाखवलेले इंग्लंडचे रॉयल आर्म्स बघावेत. Image removed. हे सिंह आहेत म्हणून सांगावं लागतं. अन्यथा त्या दाढीवाल्या लांबुळक्या मांजरी वाटतात. -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 07/13/2022 - 22:26 नवीन
दगडी सिंहांची तोंडे हा देशांतील सर्वांत चिंताजनक आणि वादग्रस्त विषय असेल तर देश सुस्थितीत आहे असे वाटते. भूषण सारखी मंडळी जी गाढवांना आणि डुकरांना आपले नेते मानतात त्यांनी सिंह ह्या प्राण्यांसंबंधी न बोललेले बरे. ह्याच्या उलट HPMSNMJ ह्यांचे चमचे. फोटोत म्हणे ४ नाही तर ५ सिंह आहेत. ह्यांचे चालले असते तर चिन्ह खालचा बैल काढून तिथे HPMSNMJ ह्यांचे तोंड लावले असते. लंडन च्या सिंहाची कथा : लंडन वस्तुसंग्रहालयाच्या बाहेर जो सिंह आहे त्याची कथा मनोरंजक आहे. ब्रिटिश सरकारने भारतातून एक सिंह लंडन मध्ये आणला. आणि शिल्पकाराला दिला. पण समुद्री प्रवास आणि लंडन चे हवामान इत्यादी ने तो मेला. पण शिल्पकाराने हि बातमी सरकारला दिली नाही. सिंहाच्या जागी एक मांजर बसवले आणि शिल्प पूर्ण केले. त्यामुळे त्या सिंहाचे पंजे मांजरा सारखे आहेत. [१] [१] https://www.mylondon.news/news/gruesome-story-behind-trafalgar-square-21824427
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 07/14/2022 - 19:17 नवीन
साहना, मांजरपंजा सिंहांचं तथ्य / गुपित इथे सांगितल्याबद्दल आभार! :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
श
शुभावि गुरुवार, 07/14/2022 - 06:56 नवीन
शिल्पा वर भाष्य करण्याएवढे ज्ञान मजजवळ नाही. पण तरीही काही गोष्टी खटकतात. 1 शिल्प सुरेख नाही खुप खरखरीत दिसत आहे. 2.अशोकचक्राचा रंग निराशावादी भासतो. 3. आयाळिवरील केसांची नक्षी विचित्र दिसते. 4.सिंह धष्टपुष्ट न दिसता Pedigree चे pet food खाल्ल्यासारखा दिसतो आहे. गुजरात राज्यातील Statue of Unity अधिक उठावदार आणि स्मुथ दिसतो. जर सामान्य नागरिकाला या गोष्टी खटकत आहेत तर हे शिल्प अनुमोदित करणार्‍यांना लक्षात येऊ नये का? बाकी मोदींना लक्ष करण्याचे काम चालुद्या.... हत्ती चालतो तर कुत्रे भुंकतात
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 07/14/2022 - 20:02 नवीन
4.सिंह धष्टपुष्ट न दिसता Pedigree चे pet food खाल्ल्यासारखा दिसतो आहे. लै बेक्कार हसलो याला. म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला? Pedigree चे pet food खाल्ल्यावर धष्ट्पुष्ट होत नाही काय? आणी सिंह कधीपासुन पेट फुड खायला लागला ??? Pedigree चे pet food खाल्लेला सिंह तुम्ही कुठे पाहीला ? खुसपट काढायचेच तर काहीही मुद्दा चालतो हे मात्र खरे ... म्हणजे बघा "2.अशोकचक्राचा रंग निराशावादी भासतो." हे पण एक कारण आहे. आशावादी व निराशावादी रंग पण असतात?
  • Log in or register to post comments
श
शुभावि Fri, 07/15/2022 - 07:15 नवीन
उपमा अलंकार या आणि इतर भाषा सौंदर्याचा आपण आस्वाद घेतलेला दिसत नाही. पण कमीतकमी पेट फुड खाल्लेले पाळीवप्राणी तरी पाहिले का? आणि रंगांचे म्हणाल तर जरा गुगळे बाबाला. विचारा की. उष्ण , शीत रंग असतात. खुसपट अधिकारी लोकांच्या कामातली आहे मोदींच्या नाही.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल रेडकर गुरुवार, 07/14/2022 - 15:50 नवीन
खर तर काही समर्थकांची पंचाईत असते नेहमी. बाबरी पाडल्यावर कसे आमचे निडर नेते ,कट्टर हिंदुत्व वगैरे छाती थोपटून घेतात समर्थक पण ती पाडणारे कोर्ट मध्ये शेपूट घालून आम्ही तिथे नव्हतोच आमचा काही संबंध नाही हे पटवून देतात. गोध्रा दंगलीत शेठ नि बरोबर बदला घेतला ,कसे तेच हिंदुह्रिदय सम्राट आहेत ,"त्यांची"कशी जिरवली म्हणून भक्त मंडळी नाचत असतात आणि कोर्टात शेठ चा काहीच हात नव्हता हे सिद्ध करून झाल्यावर सुप्रीम कोर्ट ने म्हटलंय म्हणजे बरोबर असणार , करावा लागतो असा गनिमी कावा अशा पळवाटा . या अशोक स्तंभ शिल्पा बद्दल तेच.भक्त मंडळी आता कसा सिंह बरोबर वाटतोय,त्याचा पवित्रा बदलला ,सिंह डरकाळी फोडतच असतो ,हि नवीन भारताच्या आक्रमक पॉलिसीज आणि आत्मविश्वासाची निशाणी आहे वगैरे वगैरे आत्ममग्न. त्या उलट एक केंद्रीय मंत्री सांगताहेत कि काही बदल नाही केलाय , फक्त पर्स्पेक्टिव्ह मुळे सिंह आक्रमक दिसताहेत,आर्टिस्ट स्वतः सांगतोय कि आम्ही फक्त रिप्लिका बनवलीय(ती जरा हुकलीय) कुठल्याही डोळे नीट असलेल्या माणसाला दिसेल कि पर्स्पेक्टिव्ह पेक्षा प्रपोर्शन मध्ये बदल झालेले आहेत . उद्या तिरंग्याचा रंग बदलून भगवा केला तरी त्याच्या समर्थनात पण असेच धागे निघतील आणि हुशार समर्थक ते बरोबर आहे हे पण पटवून देतील .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 07/14/2022 - 17:47 नवीन
बाबरी पाडल्यावर कसे आमचे निडर नेते ,कट्टर हिंदुत्व वगैरे छाती थोपटून घेतात समर्थक पण ती पाडणारे कोर्ट मध्ये शेपूट घालून आम्ही तिथे नव्हतोच आमचा काही संबंध नाही हे पटवून देतात. त्या नेत्यांनीच पूर्ण योजना आखून बाबरी पाडली होती. परंतु तेवढे पुरेसे नव्हते. त्याच जागेवर श्रीराममंदिर बांधणे हे अंतिम उद्दिष्ट होते. एकदा आधीचे मुख्य काम पूर्ण केल्यानंतर पुढील काम करण्यासाठी न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची गरज नव्हती. ते काम कोणी पार पाडले हे सर्व जगाने पाहिले होते. अर्थात आपल्या घरातून बाहेर पाऊलही न ठेवता आम्हीच हातोडे मारून बाबरी पाडली असे सातत्याने सांगणारे लबाड बोकेही जगाने पाहिले आहेत. गोध्रा दंगलीत शेठ नि बरोबर बदला घेतला ,कसे तेच हिंदुह्रिदय सम्राट आहेत ,"त्यांची"कशी जिरवली म्हणून भक्त मंडळी नाचत असतात आणि कोर्टात शेठ चा काहीच हात नव्हता हे सिद्ध करून झाल्यावर सुप्रीम कोर्ट ने म्हटलंय म्हणजे बरोबर असणार , करावा लागतो असा गनिमी कावा अशा पळवाटा . त्यात कसल्या पळवाटा? विरोधकांनी आणि अनेक तथाकथित निधर्मी संघटनांनी जंग जंग पछाडूनही मोदींना दंगल प्रकरणात अडकविता आले नाही. भारतात न्यायालये असल्याने तुम्हाला कोणी न्यायालयात खेचले तर तुम्हाला कायदेशीर मार्गानेच तुमची बाजू मांडावी लागते. त्या उलट एक केंद्रीय मंत्री सांगताहेत कि काही बदल नाही केलाय , फक्त पर्स्पेक्टिव्ह मुळे सिंह आक्रमक दिसताहेत,आर्टिस्ट स्वतः सांगतोय कि आम्ही फक्त रिप्लिका बनवलीय(ती जरा हुकलीय) कुठल्याही डोळे नीट असलेल्या माणसाला दिसेल कि पर्स्पेक्टिव्ह पेक्षा प्रपोर्शन मध्ये बदल झालेले आहेत . रेप्लिका हुकलीये असे शिल्पकाराने सांगितलेले नाही. मूळ साडेतीन फूट उंचीची प्रतिमा २१ फूट उंचीची केल्यावर सर्व बाजू त्या प्रमाणात वाढतातच. एखादे चित्र झूम केल्यावर ते मूळ चित्रापेक्षा जरा वेगळे दिसते. तसेच तुम्ही ज्या कोनातून प्रतिमा पाहता त्या कोनानुसार फरक दिसतो हे सुद्धा त्यांनी सांगितलंय. एखाद्याचा फोटो अगदी समोरून काढणे आणि स्टुलावर उभे राहून काढणे यात फरक असतो. मूळ व्यक्ती तीच असली उंचीवरून काढलेल्या फोटोत तीच व्यक्ती बुटकी वाटते. तसंच इथेही आहे.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल रेडकर गुरुवार, 07/14/2022 - 15:55 नवीन
आणि बाकी कसलं नसल तरी बीजेपी ला या गोष्टी साठी श्रेय द्यावच लागेल कि कसं विरोधक आणि सामान्य माणसाला फालतू मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवायचं. हे त्यांना पक्के कळलेलं आहे , बाकी वाढत चाललेली बेरोजगारी,महागाई,रुपयाचं अवमूल्यन ,चीनच्या कुरापती,पत्रकारांवरच्या कारवाया हे असले फालतू विषय कशाला डोक्यात येतील म्हणा.
  • Log in or register to post comments
स
स्वप्निल रेडकर गुरुवार, 07/14/2022 - 15:55 नवीन
आणि बाकी कसलं नसल तरी बीजेपी ला या गोष्टी साठी श्रेय द्यावच लागेल कि कसं विरोधक आणि सामान्य माणसाला फालतू मुद्द्यांमध्ये गुंतवून ठेवायचं. हे त्यांना पक्के कळलेलं आहे , बाकी वाढत चाललेली बेरोजगारी,महागाई,रुपयाचं अवमूल्यन ,चीनच्या कुरापती,पत्रकारांवरच्या कारवाया हे असले फालतू विषय कशाला डोक्यात येतील म्हणा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा