Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

तो पाऊस निराळा असतो..!

र — राघव, Fri, 07/01/2022 - 23:35

पावसाकडे बघून आलेले हे विचार.. शेवटी आपण सर्व अनुभव मनानेच जगतो.
हा मनातला पाऊस कितीतरी वेगवेगळ्या रुपांत जाणवतो. रुपं अनेक आहेत, त्यातली काही मांडण्याचा एक प्रयत्न. :-)

रखरखत्या रेताड धरेचा येतो वर्षाकाळ..
मुरमाड मनाच्या मशागतीला मायेचा फाळ..
तो रुततो, खुपतो, नांगरट धरतो, आनंदे वर्षतो..
तो पाऊस निराळा असतो..

मनामनांतील भाव-धारणा जेणे अंगारती..
स्वराज्य विचारे उभ्या ठाकती, लक्ष-लक्ष ज्योती..
राष्ट्रभावना जागृत धरतो, मनगटांत वळतो..
तो पाऊस निराळा असतो..

राष्ट्र उभारावया प्रकटते पुरुषार्थाला साद..
कोटी-कोटी आहुती, गर्जती, प्रणवाचा नाद..
तो त्याग वर्षतो, सिंचतो, घडवतो.. राष्ट्र उद्धारतो..
तो पाऊस निराळा असतो..

----

उरातले ते शर काटेरी.. मुरवते जे पाणी,
त्या पाण्याची कावड निर्मळ, प्रेमार्द्राची वाणी..
मायेच्या अभ्रातून झरतो, रुजतो, ओथंबतो!
तो पाऊस निराळा असतो..

राघव


  • Log in or register to post comments
  • 2485 views


वाचनखूण लावा
| 2485 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
ग
गणेशा Sat, 07/02/2022 - 20:26 नवीन
तो पाऊस निराळा असतो.. छान.. ------
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 07/03/2022 - 03:07 नवीन
उरातले ते शर काटेरी.. मुरवते जे पाणी, त्या पाण्याची कावड निर्मळ, प्रेमार्द्राची वाणी.. मायेच्या अभ्रातून झरतो, रुजतो, ओथंबतो!
_/\_
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 07/06/2022 - 11:16 नवीन
धन्यवाद गणेशा आणि भक्तीतै. :-)
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 07/06/2022 - 12:02 नवीन
छान कविता आवडली, पाउस म्हटले की आठवे एक माणूस, भिजत भिजत पाडला ज्याने वक्तृत्वाचा पाउस ज्यास उभा महाराष्ट आठवतो तो पाउस निराळा असतो पाउस म्हटले की एक पुतणे आठवती कोरडी धरणे टाहो फोडूनी रडती ती भरण्याची जो एक युक्ती सांगतो तो पाउस निराळा असतो पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 07/06/2022 - 13:26 नवीन
या वर्षीचा पाऊस काही निराळाच होता आसामच्या डोंगर दर्‍यातून मुंबईत कोसळला होता. मर्सडीज पाण्यात बुडाली रिक्शा तरंगत होता.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 07/06/2022 - 16:49 नवीन
भारीये पैजारबुवा, विवेकशेठ! :-)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा गुरुवार, 07/07/2022 - 03:47 नवीन
वाह व्वा !
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 07/07/2022 - 14:08 नवीन
आवडली कवीता. गुदस्ता कमी पडला तवा टिपं गळली औंदा जास्त पडला तवा पिकं जळली तुला कळत कसं नाही किती पाऊस पाडावा खळं भरून जाऊन बळीराजा घडावा प्रत्येकाचा पाऊस निराळा
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 29 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 41 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 43 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 45 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 49 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा