Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ३)

च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 06/22/2022 - 12:50
🗣 186 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती. एकनाथ शिंदे यांनी अपक्ष मिळून आपल्या गटात ४६ आमदार आहेत असा दावा केला आहे. तसेच आपणच शिवसेनेचे गटनेते आहोत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला असून भारत गोगावले यांची विधीमंडळ पक्षाच्या प्रतोदपदावर त्यांनी नियुक्ती केली आहे. शिवसेनेचे आणखी चार आमदार गुवाहाटीच्या मार्गावर तर काँग्रेसचे आठ आमदारही गोव्याच्या मार्गावर आहेत अशा बातम्या आहेत. शिवसेनेने सगळ्या आमदारांची संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावली आहे. त्या बैठकीला अनुपस्थित राहणार्‍यांवर कारवाई केली जाईल असे शिवसेनेने म्हटले आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 38586 views

🗣 चर्चा (186)
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/23/2022 - 06:21 नवीन
गिरीश कुबेर भांग्/गांजा पिऊन लोक्सत्तेत अग्रलेख लिहितात की काय असे नेहमी संशय येतो. आजचा अग्रलेखही तसाच. ३६/४० हुन अधिक सेनेच्या आमदारांना उद्धव ह्यांचे नेतृत्व/सध्याची प़क्षाची भूमिका नको आहे ही वस्तुस्थिती आहे. हे असे का झाले ह्यावर चर्चा करण्यापेक्षा सक्तवसुली संचलनालयाचा दट्ट्या.. म्हणत भाजपावरच टीका केली आहे. हे कुबेर आयकर भरतात का? की त्या करालाही 'आयकर खात्याच्या दट्ट्या" म्हणतात? जर नेत्यांचे व्यवहार स्वच्छ नसतील तर ई.डी.ने नोटिस का पाठवू नये? ह्यावर कुबेर/मीडिया मूग गिळून गप्प. चौकशीला सामोरे जा.. कारवाई झाली नाही तर लोकांत येऊन "कारवाई चुकीची होती" असे सांगा की.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 06/23/2022 - 06:23 नवीन
गेल्या 2.5 वर्ष सेना काशी वाईट आहे,सेनेत कसे भ्रष्ट लोक आहेत.सेना कशी दगाबाज आहे . अशी टीका bjp वाले करत होते. अगदी उद्धव ठाकरे ना शिव्या देण्या पर्यंत पण ह्यांची मजल गेली होती. आता हेच बघायचे आहे ह्या नालायक सेने चा पाठिंबा घेवून सुसंस्कृत bjp सत्तेवर येते का? सेना सोडली म्हणून सेने चे आमदार काही पवित्र होत नाहीत. यांचा पण पाठिंबा सू संस्कृत bjp नी घेवू नये.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 06/23/2022 - 06:43 नवीन
१९९१ मध्ये भुजबळ फुटले तेव्हा स्वतः भुजबळ हे एकटेच मुंबईतून विधानसभेवर निवडून गेले होते. बाकीचे ११ आमदार(*) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून निवडून गेले होते. त्यावेळी शिवसेनेचा मुंबई, ठाणे आणि कोकण या बालेकिल्ल्यातील एकही आमदार सोडाच कोणी नगरसेवक आणि शाखाप्रमुखही फुटला नव्हता. कोणीही जाहीरपणे भुजबळांचे समर्थन केले नव्हते. त्यावेळेस मी ठाण्यात राहायला होतो. भुजबळ फुटल्यानंतर दोन दिवसांनी सकाळी शाळेत जाताना स्थानिक शिवसैनिकांकडून रस्त्यावर काही पोस्टर लावली होती ती अजूनही आठवतात. एका पोस्टरमध्ये उल्लेख होता- मोराचे पीस लावले म्हणून कावळा मोर बनत नाही आणि दुसर्‍या पोस्टरमध्ये उल्लेख होता- ज्या पानात खाल्ले त्याच पानात.... एकंदरीतच एकूण शिवसैनिकांची त्यावेळी भुजबळांविरोधात अगदी तिखट प्रतिक्रिया होती. २००५ मध्ये नारायण राणे आणि नंतर राज ठाकरे फुटले तेव्हा शिवसैनिकांची प्रतिक्रिया तिखट होती पण १९९१ मध्ये भुजबळ फुटले तेव्हा होती तितकी तिखट नव्हती. जास्त करून सामनामधून नारायण राणेंविरोधात गटारगंगा वाहात होती पण भुजबळांविरोधात जशी रस्त्यावर प्रतिक्रिया होती तितक्या प्रमाणावर प्रतिक्रिया राणेंविरोधात नव्हती. काही प्रमाणात नारायण राणेंचे 'राणे एकच अंगार बाकी सब भंगार' वगैरे समर्थनही झाले होते. भुजबळांचे जाहिर समर्थन करायची हिंमतच कोणाची नव्हती तशी परिस्थिती नारायण राणे बाहेर पडले तेव्हा नव्हती. बहुतेक १९९१ ते २००५ या काळात बाळ ठाकरे अधिक वृध्द झाले होते आणि एकूणच शिवसेनेची जुनी धार कमी झाली होती हे कारण असू शकेल. यावेळेस मात्र अगदी रस्त्यावर एकनाथ शिंदेंचे समर्थन चालू झाले आहे. ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीमध्ये पुढील प्रकारची पोस्टरही लागली आहेत Image removed. या पोस्टरमध्ये केवळ बाळ ठाकरे आणि आनंद दिघे यांची चित्रे आहेत. उध्दव ठाकरे आणि आदूबाळ यांचा उल्लेखही नाही हे विशेष. पूर्वी भुजबळ आणि राणे फुटले तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदार फुटलेले नव्हते. पण यावेळी मात्र पक्षाचे अगदी दोन-तृतीयांश आमदार बरोबर घेऊन आपला गट म्हणजेच खरी शिवसेना हा दावा करायची संधी एकनाथ शिंदेंना मिळत आहे. *: शिवसेनेच्या ५२ पैकी भुजबळांसह सुरवातीला १८ आमदार फुटले होते. पण त्यानंतर ६ आमदार स्वगृही परतले. तेव्हा पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत भुजबळ आणि इतर ११ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने केली होती. पण विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी निर्णय दिला की शिवसेनेच्या ५२ पैकी सुरवातीला १८ आमदार फुटले आणि या १८ आमदारांच्या गटापैकी ६ आमदार परत फुटले आणि शिवसेनेत परत गेले आणि कोणाचेच सदस्यत्व रद्द केले नाही.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/23/2022 - 06:58 नवीन
जास्त करून सामनामधून नारायण राणेंविरोधात गटारगंगा वाहात होती त्यावेळी सामनातून राणेंविरोधात जितकं घाणेरडं लिहिलं होतं तितकं घाण लेखन मी त्यापूर्वी किंवा त्यानंतर कधीही वाचले नाही. राणेंविरूद्ध अत्यंत घाण लिहून व पोटनिवडणुकीत स्वतः बाळ ठाकरेंनी राणेंविरोधात राणेंच्या मतदारसंघात सभा घेऊनही सेनेच्या परशुराम उपरकरांविरूद्ध राणे ८५,००० हून अधिक मताधिक्याने जिंकले होते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/23/2022 - 07:48 नवीन
हरणं जिंकणं चालूच असतं. आता पहाना सातारा ह्या सेनेच्या मतदारसंघातील जागा बळकावून भाजपने ऊदयनराजेंना ऊभे केले साक्षात मोदी येऊनही पराभव पहावा लागला.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 06/23/2022 - 07:11 नवीन
बारामतीच्या काकांनी राउतांचा खूपच छान वापर करून घेतला. इतका की ते त्यांना अजूनही समजत नाहिय्ये. ज्या दिवशी समजेल तोवर वेळ निघून गेलेली असेल.
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 06/23/2022 - 07:44 नवीन
बारामतीच्या काकांनी राउतांचा खूपच छान वापर करून घेतला.
हे सगळ्या दुनियेला उघड उघड दिसत आहे. फक्त स्वतः राऊत, ठाकरे आणि त्यांचे समर्थक यांनाच ते दिसत नाहीये. महाभकास आघाडी सरकारची अर्धी कारकिर्द संपली तरी त्यांचा अजूनही १०५ ना घरी बसविले, १०६ ना घरी बसविले हाच घोषा चालू आहे. मागे म्हटल्याप्रमाणे शिवसेनेच्या सत्तेतून चार आण्याचा फायदा व्हायचीही सुतराम शक्यता नसलेले लोकही अजून १०५-१०६ चाच जप करत आहेत. त्यांचा असा अ‍ॅटिट्यूड असेल तर मग शिवसेनेच्या सत्तेचा फायदा ज्यांना होत आहे ते आणि त्यापेक्षाही जास्त स्वतः सत्तेत असलेले लोक किती अ‍ॅटिट्यूड दाखवत असतील. अशा अ‍ॅटिट्यूडची नशा डोक्यात चढली की समोर दिसत असलेल्या अगदी स्पष्ट असलेल्या गोष्टीही त्यांना दिसणे बंद होते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/23/2022 - 07:49 नवीन
चांगलंय की. महाराष्ट्राच्या हितासाठी राऊत पवार एकत्र आले नाहीतर सर्व कार्यालये गुजरातला हलवले असते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 06/23/2022 - 07:13 नवीन
एक प्रश्न मनात येतोय. इथे उल्लेखले आहे तसे जर शिंदींची सेना ही अधिकृत सेना मानली गेली तर सम्जय राउत याम्च्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचे काय होईल? ते अपक्ष असतील की शिवसेनेचे
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 06/23/2022 - 07:16 नवीन
शिंदेंची सेना अधिकृत सेना मानली तर मग ठाकरेंच्या सेनेसाठी शिवसेना(टी) वगैरे काहीतरी बिरूद लागेल आणि त्या गटाचे खासदार म्हणून संजय राऊत वावरतील.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 06/23/2022 - 07:15 नवीन
55 पैकी १०-१५ आमदार फुटणे एकवेळ समजू शकतो परंतु एकाच वेळी ४० च्या आसपास आमदार फुटणे तेही सत्ताधारी पक्षातून आणि तेही सत्ताधार्यांना माहिती न होता हे न समाजण्यापालिकडचे आहे. ह्यात अब्दुल सत्तार, बचू कडू सारखे आमदार हे केवळ आणि केवळ सेने मुळेच मंत्री झालेत हे पण आहेत. ह्यात ED मुळे फुटले असतील हे जितकं खोटं वाटतय तितकंच निधी मिळत नव्हता म्हणून फुटले असतील हे पण खरं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/23/2022 - 07:19 नवीन
पस्तीस चाळीस आमदार फुटून सुरत ला जातात एवढे होऊन सुद्धा गृह खात्याला त्याची साधी कुणकुण सुद्धा लागली नाही याबद्दल श्री शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. साहेब काहीही करू शकतात (धृपद) पण हे कसे समजले नाही ( अर्थात पहाटे शपथविधीसाठी आपला पुतण्या जातो हेही त्यांना समजले नव्हते) पण साहेब काहीही करू शकतात (धृपद) त्यावर गृह खात्याकडून असे उत्तर आले आहे कि हि गोष्ट गेले ६ महिने चालू होती आणि त्याबद्दल चार पाच वेळेस मुख्यमंत्र्यांना कळवले होते आणि एकदा विस्तृत अहवाल पाठवला होता परंतु मुख्यमंत्र्यानी त्याकडे दुर्लक्ष केले. गृह खाते राष्ट्रवादी कडे आहे आणि पहिले गृहमंत्री तुरुंगात आहेत पण दुसरे सुद्धा श्री दिलीप वळसे पाटील हेही राष्ट्रवादीचेच आहेत. पण साहेबाना काहीच माहिती नव्हती. आमदार आणि मंत्र्यांना हत्यारी पोलिसांची सुरक्षा असते आणि तरी सुद्धा गृह खात्याला काहीच समजले नाही? साहेब काहीही करू शकतात (धृपद)
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 06/23/2022 - 07:30 नवीन
अग्निपथ या धाग्यावर झालेल्या राड्याने वाईट वाटले. राजकारण कळत नाही,राजकारण करत नाही. "चंसुकु" याच्या "ताज्या घडामोडी" वाचतोय. वाचकांची राजकारणातील समज उत्तर प्रतीउत्तर वाचताना पदोपदी जाणवत आहे. भाषेवरील संयम व प्रतिसादाची मांडणीवरून ते किती अपडेटेड आहेत ते कळते. विषयाची खोलवर माहीती आसल्यामुळेच कुठेही तोल जाताना व अतार्किक दिसत नाही. लिहीत रहा जमल्यास काही शिकण्याचा प्रयत्न करतो. अर्थात खुप उशीर झालाय पण ज्ञानवर्धन व मनोरंजन दोन्ही उद्देश सफल होतायत. साधोवाली,फाजिल्का,हुसैनिवाला सीमेवरील पाकिस्तानी रेजंर्स व भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची आठवण आली.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 06/23/2022 - 07:35 नवीन
सत्ता आहे मंत्री पद आहे तरी बंड ? का? ते पण मोठ्या संख्येने? ते पण कट्टर शिव सैनिक असणाऱ्या नेत्याचे? हे पचायला अवघड जात आहे. मागणी काय तर आघाडी सोडा आणि bjp ल पाठिंबा ध्या. उद्या उद्धव नी ही मागणी मान्य केली कार्यकर्त्यांना आघडि नको. माझा नाईलाज आहे म्हणून मागणी मान्य केली तर. हा डाव पण असू शकतो. पण एकट्या सेनेचा नाही राष्ट्रवादी चा पण . सेनेला बरोबर घेवून मत मागणे राष्ट्रवादी साठी पण कठीण आहे आणि सेने साठी पण काँग्रेस लं बरोबर घेवून हिंदुत्व आणि सर्वधर्म समभाव . असा फरक आहे ना
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/23/2022 - 07:53 नवीन
सेनेच्या एकूण आमदारांपैकी २/३ आम्दारांना उद्धव नको आहेत.त्यांनी दोन पक्षांबरोबर केलेली युती आवडलेली नाही. त्यांनी २.५ वर्षे वाट पाहिली पण बदल झाला नाही. निवडणूका येतील तेव्हा सेनेच्या आमदारांनी कुठल्या तोंडाने मतदारांना सामोरे जायचे ?"तुम्हाला मत देण्यापेक्षा काँग्रेस्/राष्ट्रवादीला मत का नाही द्यायचे? कारण तुमची युती आहे" असा प्रश्न मतदार विचारणार ना ? शिवसेनेच्या आमदारांना जी मते मिळाली होती त्यात त्यांची स्व्तःची काही(), काही भाजपाच्या समर्थकांची तर काही मते 'राष्ट्रवादी/काँग्रेस नको म्हणून तुम्हाला मत " म्हणणार्यांची. आता भविष्यात भाजपा समर्थकांची मते मिळणार नाहीत. शिवाय 'काँग्रेस नको' म्हणणार्यांचीही मते मिळणार नाहीत.कारण ते लोक कदाचित भाजपाला मत देतील. म्हणजे सेनेची एकूणच मते कमी होणार.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/23/2022 - 08:03 नवीन
कपटी मित्रा पेक्षा दिलदार शत्रू बरा ह्या ततव्नार सेनेने काॅग्रेस राष्ट्रवादी सोबत युती केली. पाच वर्षे “राज्नामा द्या“ म्हणून भाजपेयी सेनेला टोमणे मारायचे. सोनेनो राजिनामा दिला तर “हिंदूत्वा” शी गद्दारी केली बोलायचे. भाजप म्हणजे हिंदूत्व. व्वा. भाजपने हिंदूंसाठी कधी काडीचे कार्य केले नाही. ऊलट प्रचंड महाग पेट्रोल डिझेल करून बहुसंख्य असलेल्या हिंदूंचेच कंबरडे मोडलेय. भाजपचे हिंदूत्व फक्त मते मागण्यासाठी असते. गोव्यात पर्रीकर बिफ कमी पडू देनार नाही म्हणतात पण युपीत भाजपेयी गोहत्याबंदीचा मागणी करतात. असा दुतोंड्या पक्ष जगात भाजप हा एकमेव असावा. त्यामुळे भाजपने स्वतला हिंदूत्ववादी म्हणणे सोडावे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/23/2022 - 08:07 नवीन
आमदार बाहेर पडण्याची काही मुख्य कारणे १) आमदारांनाच कशाला मंत्र्यांना सुध्दा मुख्यमंत्र्यांशी संपर्कच करता येत नव्हता. रात्री १० ते सकाळी ११ पर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन बंदच असे. याचे एक उदाहरण मी मागे मिपावर लिहिलेले आहे.( शोधकांनी शोध घ्यावा). करोना काळात श्री राजेश टोपे हे ससून रुग्णालयात मध्ये गेलेले असताना त्यांना मुख्यमंत्र्यांशी काही तातडीचे बोलायचे होते. पण काही केल्या फोन लागतच नव्हता. म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकाला फोन करून साहेबांशी तातडीने बोलायचं आहे म्हणून सांगितले. त्यानंतर तिकडून जे उत्तर आले ते ऐकून श्री टोपे यांचा चेहरा उतरला आणि ते ससून सोडून निघून गेले. हे तेथे प्रत्यक्ष हजर असलेल्या एका व्यक्ती ( जी माझ्याकडे रुग्ण म्हणून येते) ने मला स्वतः सांगितले. हीच स्थिती आरोग्य खात्यातील अनेक वरिष्ठांनी करोना काळात तातडीचे निर्णय घेण्यासाठी संपर्क साधताना होणारी कुचंबणा आणि दिरंगाई बोलून दाखवलेली होती २) मतदार संघासाठी निधी मिळत नव्हता. कारण अर्थ खाते राष्ट्रवादीकडे होते( अर्थ मंत्री जयंत पाटील). श्री एकनाथ शिंदे याना सुध्दा मतदारसंघातील कामे करण्यासाठी निधी हवा होता त्यांना पैसे मिळत नसत पण शेजारच्या मतदारसंघात श्री आव्हाड यांना मात्र त्यांच्या मुंब्रा या मुस्लिम बहुल मतदारसंघासाठी निधीची कमतरता पडत नव्हती. आपल्या मतदारांना सत्तेत मंत्री असून हि निधी मिळत नाही कामे रखडली आहेत हे समजावणे आमदार / मंत्र्यांना अधिकाधिक कठीण होत चाललेले होते. शेवती उद्या तिकीट मिळाले तरी स्वतः काम केलेले नसले तर निवडून येणे अशक्य होते हे जुन्या मुरलेल्या नेत्यांना चांगले माहिती असते. ३) ज्या तर्हेने युतीचे राज्य चालले होते त्यात जर पुढच्या निवडणुकीत शिवसेनेची दोन्ही काँग्रेस बरोबर युती झाली तर मिळणाऱ्या जागा फारच कमी होतील आणि आपला पत्ता कट होणार हे बऱ्याच लोकांना समजत होते. मग मतदार संघात काम करण्यासाठी पैसे नाहीत, अधिकार पद नाही, असले तरी त्यात अधिकार नाहीत आणि पुढच्या निवडणुकीत तिकीट मिळण्याची खात्री नाही. मग आमदार व्हायचेच कशाला? जनतेची सेवा वगैरे रिकाम्या खिशाने होत नाही. सत्ता हातात असली तर खरी जनसेवा सुद्धा करणे जास्त सोपे असते हि सुद्धा वस्तुस्थिती आहे. ४) मूळ हिंदुत्वापासून शिवसेनेने घेतलेली फारकत हि अनेक आमदारांना अजिबात मान्य नव्हती. शिवसेनेने पालघरच्या साधूंच्या हत्येबद्दल घेतलेले बोटचेपे धोरण किंवा अजान स्पर्धा भरवणे, मशिदीवरचे भोंगे उतरवण्याबाबत घेतलेली बोटचेपी भूमिका, जनाब औरंगजेब, टिपू सुलतान जयंती साजरी करणे या गोष्टी त्यांच्या मनात असलेल्या इतिहासाशी फारकत घेणाऱ्या होत्या. ५) मुळात युती हि शिवसेना आणि भाजपची होती आणि अनेक शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघात त्यांच्या विजयासाठी भाजप आणि संघाचे स्वयंसेवक राबले त्यांनी स्वतः पाहिलेले होते. त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलेला त्यांना आतून कुठे तरी टोचणी देत होता. अशी अनेक कारणे आहेत
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ गुरुवार, 06/23/2022 - 08:53 नवीन
४, ५ येस अगदी सहमत भाजपनं सत्ता स्थापू नये नवी निवडणूतिची मागणी करावी पण ते कदाचित या ४० ना परवडणार नाही
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 06/23/2022 - 09:09 नवीन
युती असताना आणि फडणवीस मुख्यमंत्री असताना पण हीच तक्रार होती. सेने च्या आमदार ना निधी मिळत नाही. सेने च्या आमदार च्या मतदार संघातील योजने ना मंजुरी मिळत नाही. पुढल्या निवडणुकीत तीन पक्षाशी युती म्हणजे सेनेच्या वाट्याला कमी जागा येणार युती केली तर दोन च पक्ष जादा जागा मिळू शकतात. म्हणून बंड. हे कारण असू शकते. मुख्यमंत्री उपलब्ध होत नाहीत हा आरोप आहे . स्वतः मुख्यमंत्री आजारी होते,परत covid ची साथ होती त्या मुळे भेट न होणे नॉर्मल आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/23/2022 - 09:34 नवीन
मूळ हिंदुत्वापासून शिवसेनेने घेतलेली फारकत हि अनेक आमदारांना अजिबात मान्य नव्हती. खिक्क. भाजपशा फारकत म्हणजे हिंदूत्वाशी फारकत. कैच्या कै डाक्टर. मूळ हिंदूत्व ख्या ख्या ख्या.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 06/23/2022 - 09:47 नवीन
Bjp सारखा महा स्वार्थी पक्ष जेव्हा स्वतःला हिंदुत्व वादी म्हणतो त्या पेक्षा मोठा जोक नाही. राम मंदिर बांधले की हिंदू हीत होत नाही. Bjp चे राज्य देशात आल्यावर च हिंदू कमजोर झाला हे सत्य आहे. Bjp ल हिंदुत्व शी काही देणे घेणे नाही. उद्योगपती आणि हे स्वतः मिळून देश लुटणे आणि लोकांना भावनिक प्रश्न मध्ये गुंतवणे हेच ह्यांचे अंतिम उद्दिष्ट आहे
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 06/23/2022 - 08:09 नवीन
तुम्ही परत निवडून येऊन दाखवाच असे आव्हान संजय राऊतांनी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांना दिले आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shivsena-leader-sanjay-raut-slams-eknath-shinde-and-rebal-shivsena-mlas/articleshow/92403485.cms संजय राऊत म्हणजे नक्की काय चीज आहे हे या एका आव्हानावरून समजून येईल. स्वतः संजय राऊत एकदाही कसलीही निवडणुक लढलेले नाहीत. कधीही लोकांपुढे स्वतःसाठी मते मागायला गेलेले नाहीत. नुसत्या हवेतल्या फुशारक्या मारून उंटावरून शेळ्या हाकणे आणि सामनामधून एक तर अर्वाच्य शिव्या देणे किंवा मोठेमोठे दावे करणे यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही. त्याउलट एकनाथ शिंदे १९९७ मध्ये पहिल्यांदा ठाणे महापालिकेत नगरसेवक बनले होते. त्यानंतर २००२ मध्येही ते परत ठाणे महापालिका निवडणुक जिंकले. २००४ ते २०१९ या चार विधानसभा निवडणुक जिंकले. २०१७ मध्ये महापालिका निवडणुकांमध्ये ठाणे वगळता इतर कुठेही शिवसेनेला एकहाती बहुमत मिळाले नव्हते ते एकनाथ शिंदेंनी मिळवून दिले. अशा जमिनीवरील नेत्याला कोण आव्हान देत आहे तर संजय राऊत. आहे की नाही मज्जा?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 06/23/2022 - 09:50 नवीन
खरेच बंड खोरी झाली असेल हे राजकीय नाट्य नसेल तर. बंडखोर लोकांना bjp मध्ये प्रवेश करणे हा एकमेव पर्याय आहे. संजय राऊत योग्य बोलत आहेत. बंडखोर स्वतःचे वेगळे अस्तित्व राखून निवडणुका जिंकू शकतं नाहीत. हे सत्य आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 06/23/2022 - 09:51 नवीन
खरेच बंड खोरी झाली असेल हे राजकीय नाट्य नसेल तर. बंडखोर लोकांना bjp मध्ये प्रवेश करणे हा एकमेव पर्याय आहे. संजय राऊत योग्य बोलत आहेत. बंडखोर स्वतःचे वेगळे अस्तित्व राखून निवडणुका जिंकू शकतं नाहीत. हे सत्य आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 06/23/2022 - 08:41 नवीन
एकनाथ शिंदेगटाला आठ कॅबिनेट मंत्रीपदं आणि पाच राज्यमंत्रीपदाची ऑफरच्या बातम्या धडकत आहेत त्याचबरोबर केंद्रात दोन पदंही दिली जाणार आहेत. लोकसत्ताचा अग्रलेख 'सत्ताकारणाची 'बद' सुरत' -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 06/23/2022 - 09:55 नवीन
जुना धागा: शिवसेनेचे हे काय चाललय: https://www.misalpav.com/node/47483 -- प्रत्येकाने आपाआपले आखाडे पारखुन घ्यावेत.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 06/23/2022 - 10:13 नवीन
1)देशाचे सरकार आपल्याच राज्यात भेद भाव करत आहे.२) देशाचे सरकार आपल्याच देशातील राज्यांना कमजोर करत आहे.आपल्याच देशातील राज्य सरकार अडचणीत यावीत म्हणून ताकत लावत आहे. आपल्याच राज्यांचा विकास रोखत आहे. ३) देशाचे सरकार देशातील आपल्याच राज्यातील स्थिती बिघडली जावी म्हणून केंद्रीय एजन्सी वापरत आहे. ४) देशाचे सरकार आपल्याच देशातील लोकात भेदभाव करत आहे काही घटकांची प्रगती,त्यांचे हक्क नाकारले जात आहेत ५) देशाचे सरकार गुंड टोळ्या सारखे आपल्याच देशातील आपल्याच राज्यातील आमदार चे अपहरण करत आहे सरकारी यंत्रणा वापरून. हे कोणते देश प्रेम आहे. हे असले देश प्रेम आणि राष्ट्र निष्ठा फक्त भारतात च असावी . पाकिस्तान सरकार पण आपल्याच राज्या ना कमजोर करत नाही.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 06/23/2022 - 10:20 नवीन
वेगळा गट करणार्या आमदारांचे हे पत्र पाहता,शिवसेनेतील अंतर्गत खदखद बर्याच काळापासून होती हे स्पष्ट होतेय,दुर्लक्षाचा धडा हे उदाहरण आता राजकारणात ओळखलं जाईल. https://www.tv9marathi.com/politics/rebel-shiv-sena-mla-sanjay-shirsats-letter-to-chief-minister-uddhav-thackeray-au122-742462.html
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 06/23/2022 - 10:20 नवीन
वेगळा गट करणार्या आमदारांचे हे पत्र पाहता,शिवसेनेतील अंतर्गत खदखद बर्याच काळापासून होती हे स्पष्ट होतेय,दुर्लक्षाचा धडा हे उदाहरण आता राजकारणात ओळखलं जाईल. https://www.tv9marathi.com/politics/rebel-shiv-sena-mla-sanjay-shirsats-letter-to-chief-minister-uddhav-thackeray-au122-742462.html
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/23/2022 - 10:38 नवीन
तशी खदखद असल्याशिवाय एवढ्या संख्येने आमदार शिंदे ह्यांच्या बाजूने जाणार नाहीत. भाजपा/ई.डी वगैरे गौण मुद्दे आहेत.भविष्यात होणार्या निवडणूकांना सामोरे कसे जायचे हा त्यांचा मुख्य प्रश्न असणार. आमदार काही दुधखुळे नसतात. अनेकांना २०-२५ वर्षांचा अनुभव आहे. लोकांच्या तक्रारी असतील, निधी मिळत नसेल, कामे होत नसतील तर त्यांनी काय करायचे?
  • Log in or register to post comments
क
क्लिंटन गुरुवार, 06/23/2022 - 10:44 नवीन
२००३ मध्येच बाळ ठाकरेंना वयोमानानुसार पूर्वीइतकी धावपळ करणे शक्य राहिले नाही आणि त्यांनी उध्दव ठाकरेंना शिवसेनेचे कार्याध्यक्ष केले. त्यानंतर हे सगळे प्रश्न अगदी प्रकर्षाने पुढे आले. उध्दव ठाकरे कितीही बढाया मारत असले तरी त्यांचा स्वभाव असाच तुसडा आहे. २००५ मध्ये राज ठाकरे बाहेर पडले तेव्हाही त्यांनी अगदी हीच खंत व्यक्त केली होती- माझे भांडण विठ्ठलाशी नाही तर त्याच्याभोवतीच्या बडव्यांशी आहे. या बडव्यांमध्ये एक प्रमुख नाव होते- संजय राऊत. राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसैनिकांनी संजय राऊतांच्या गाडीवर हल्ला करून गाडीच्या काचाही फोडल्या होत्या. उध्दव कार्याध्यक्ष झाल्यावर त्यांनी नारायण राणेंचेही महत्व कमी करायचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला होता. शिवसेनेत अगदी पहिल्या दिवसापासून असलेले ठाण्याचे सतीश प्रधान आणि पार्ल्याचे रमेश प्रभू हे सुध्दा नेमके उध्दव कार्याध्यक्ष झाल्यावर का बाहेर पडले? सुधीर जोशी हे शिवसेनेचे तळमळीचे कार्यकर्ते होते. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले त्यापूर्वी त्यांचे नाव किमान २० वर्षे बातम्यांमध्ये येणेच बंद झाले होते. शिवसेनेच्या बैठकांनाही त्यांना बोलावले जायचे की नाही काय माहित. शिवसेना आपण मराठी माणसांना नोकर्‍या मिळवून दिल्या या ज्या टिमक्या मारत असते ते काम सुधीर जोशींच्या स्थानिय लोकाधिकार समितीने केले होते. एका माजी मंत्र्याचे निधन झाल्यावर त्यांना विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांमध्ये नियमाप्रमाणे श्रध्दांजली वाहायची असते तशी श्रध्दांजली सुधीरभाऊंना द्यायला हवी याकडेही मुख्यमंत्री कार्यालयाचे दुर्लक्ष झाले होते असे वाचल्यासारखे आठवते. पूर्वी सक्रीय असलेले रामदास कदम, दिवाकर रावते वगैरे नेते अडगळीतच टाकले आहेत ना? आता शिवसेनेत नेते कोण आहेत? तर संजय राऊत, वरूण सरदेसाई, आदित्य ठाकरे वगैरे. ज्यांनी कधीच लोकांमध्ये जाऊन संघटना बांधायचे काम कधीच केलेले नाही. फक्त उध्दव ठाकरेंच्या मर्जीतले किंवा नात्यातले हे एक क्वालिफिकेशन. एकूणच काय बाळ ठाकरेंनी अनेक वर्षे एकेक माणसे वेचून संघटना उभी केली पण पुत्रमोहामुळे त्यांनी उध्दव या तुसड्या माणसाकडे संघटनेची सुत्रे दिली. तसेही उध्दवला राजकारणात कधीच रस नव्हता. त्याला फोटोग्राफीत रस होता. मग करू द्यायची ना फोटोग्राफी. तसा उध्दवचा जयदेव हा एक भाऊ आहे. त्याचे कधी राजकारणात नाव असते का? तसेच उद्धवलाही करता आले असते की. राज ठाकरेंनी शिवसेना कशी सांभाळली असती हा जर-तरचा मुद्दा झाला आणि जर-तरला विशेष अर्थ नसतो. पण राज उध्दवइतका तुसडा नसावा असे वरकरणी तरी वाटते. निदान राज्यसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर कोणीकोणी आमच्याशी 'दगाबाजी' केली असे जाहीरपणे बोलून त्या आमदारांना दुखावणार्‍या संजय राऊतसारख्याला तरी त्याने इतके पुढे येऊ दिले नसते असे वाटते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/23/2022 - 11:11 नवीन
सेना ऊध्दव ठाकरेंना ऊत्तमरीत्या सांभाळलीय. पाच वर्षे शिवसेनेची अवहेलना करनार्या भाजपला राऊतांनी चांगला धडा शिकवून १०५ घरी बसवले. तुमची ही खदखद त्या रागातून आलीय.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 06/23/2022 - 11:30 नवीन
सेना ऊध्दव ठाकरेंना ऊत्तमरीत्या सांभाळलीय. पाच वर्षे शिवसेनेची अवहेलना करनार्या भाजपला राऊतांनी चांगला धडा शिकवून १०५ घरी बसवले. तुमची ही खदखद त्या रागातून आलीय.
महाराष्ट्र वाचवला हे राहिले.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/23/2022 - 11:34 नवीन
तो मोदींच्या गुरूंनी वाचवलाय :)
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 06/23/2022 - 11:36 नवीन
भारतात राहतं असाल तर काहीच दिवसात नळा नी पाणी येणे बंद होईल . अजून पावूस नाही.. शिंदे,मोदी ,शाह घरात पाणी भरून देणार नाहीत. त्याची काळजी करा.
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 06/23/2022 - 11:41 नवीन
भारतात राहतं असाल तर काहीच दिवसात नळा नी पाणी येणे बंद होईल .
बरोबर. माविआ घेउन येईल पाणी ते.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/23/2022 - 11:39 नवीन
अदानी-अंबानीनी देश ताब्यात घेतलाय असे सुप्रिया सुळे लोकसभेत म्हणाल्या होत्या. गेल्या आठवड्यात बारामतीला एका समारंभाला गौतम अदानीना शरद पवारांनी आमंत्रण दिले होते. सुळे कुटुंबियान्कडे अदानींचे/रिलायन्सचेच १/२ लाख शेयर्स आहेत असे नंतर प्रसिद्ध झाले होते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/23/2022 - 16:33 नवीन
सुळे कुटुंबियान्कडे अदानींचे/रिलायन्सचेच १/२ लाख शेयर्स आहेत माई इथे असं काही लिहायचं नाही. इथल्याच काही उच्च पदस्थांचा पापड मोडेल
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० गुरुवार, 06/23/2022 - 17:50 नवीन
ह्या कंपन्यांचे शेअर सुळे आणि पवार ह्यांनी का घेऊ नये? मी सुद्धा अडाणी आणि अंबानींच्या विरोधात असून त्या कंपन्यांचे शेअर घेतो विकतो. काय चुकीचे आहे?
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 06/23/2022 - 19:59 नवीन
वायलं. वायलं.
  • Log in or register to post comments
य
यश राज गुरुवार, 06/23/2022 - 12:02 नवीन
वेगळा गट करणार्या आमदारांचे हे पत्र पाहता,शिवसेनेतील अंतर्गत खदखद बर्याच काळापासून होती हे स्पष्ट होतेय,दुर्लक्षाचा धडा हे उदाहरण आता राजकारणात ओळखलं जाईल
अगदी अगदी, एवढा निष्क्रिय कारभार करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच बघितला नसेल. जनतेच्या मनात असलेली खदखद त्यांच्याच पक्षात असलेल्या आमदारांच्या पत्रातून बाहेर पडते आहे. जी लोकं आपल्या पक्षात रात्रंदिवस झटणाऱ्या कर्यकत्यांसोबत उभी राहू शकत नाहीत ते जनतेसाठी काय ऊभे राहतील.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/23/2022 - 11:24 नवीन
Video : कंठ दाटला...उरंही भरून आला...'वर्षा'चा कर्मचारी मुख्यमंत्र्यांसमोर हात जोडून उभा राहिला https://zeenews.india.com/marathi/maharashtra/employee-of-varsha-bunglow-stood-in-front-of-the-chief-minister-with-folded-hands/632454
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/23/2022 - 11:35 नवीन
दक्षिणेत विशेष करून तामिळनाडूत ही अशी रडण्याची पद्धत आहे. करूणानिधी ह्यांनी सरकारी निवास्स्थान सोडले तेव्हा बागेत काम करणारा माळी दोन दिवस जेवला नव्हता अशी बातमी होती.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/23/2022 - 11:39 नवीन
चांगला नेता असेल तर जनतेच्या डोळ्यात पाणी येतेच.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 06/23/2022 - 11:40 नवीन
माई त्या साठी राज्यावर अतोनात प्रेम असावे लागते. दक्षिण मधील प्रतेक राज्यातील लोक त्यांच्या राज्यावर खूप प्रेम करतात.. महाराष्ट्र मधील नालायक लोकांना स्वतःच्या राज्यावर प्रेम नाही ..हे पण त्यांना समजत नाहीत आपले अस्तित्व च आपल्या राज्यावर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 06/23/2022 - 11:41 नवीन
+१ महाराष्ट्रातील काही नेते मुंबईतील कार्यालये अहमदाबादला हलवायला मदत करतात.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/23/2022 - 13:19 नवीन
'जाणते राजे' अहमदाबादच्या 'मराठी द्वेष्ट्या'उद्योगपतींना आमंत्रण का देतात? गौतम अदानींना मुंबई विमानतळावर रिसिव्ह करायला रोहित पवार गेले होते. गाडी चालवत. एवढी हुजरेगिरी? https://www.jansatta.com/business/gautam-adani-reached-baramati-pawar-nephew-himself-drove-the-car-and-reached-the-airport-to-receive/2227714/ Image removed. https://www.hindustantimes.com/cities/pune-news/bizman-gautam-adani-attends-inauguration-of-innovation-centre-in-pawar-home-turf-baramati-101655402600951.html
  • Log in or register to post comments
T
Trump गुरुवार, 06/23/2022 - 13:21 नवीन
अडानी मेरे अच्छे दोस्त: इससे पहले मई की शुरुआत में शरद पवार ने जैन अंतरराष्ट्रीय व्यापारिक संगठन (JITO) में कारोबारी गौतम अडानी की प्रशंसा की थी। उन्होंने कहा था कि गौतम अडानी मेरे अच्छे दोस्त हैं उन्होंने शून्य से शुरुआत की थी। पहले केवल टाटा और बिड़ला का नाम अमीर लोगों में शामिल होता था, लेकिन अब एक जैन व्यक्ति देश का सबसे अमीर कारोबारियों में से एक बन गया है और वह गौतम अडानी है।
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 06/23/2022 - 12:50 नवीन
"महाराष्ट्र मधील नालायक लोकांना स्वतःच्या राज्यावर प्रेम नाही" राज्यावर आहे पण राज्यातील नेत्यांवर नाही असे म्हणा. करूणानिधी असोत वा जयललिता वा एन टी रामाराव, त्यांचे पक्ष आपल्या राजकीय भूमिकांशी ते शेवट्पर्यंत ठाम असत. शिवसेना/मनसे/राष्ट्रवादी आपल्या राजकीयभूमिकांशी कधीही प्रामाणिक राहिले नाहीत.कम्युनिस्टांना संपवायला कधी काँग्रेसकडुन सुपारी घे.. हिंदुत्वाचे वारे वहायला लागले की जा अयोध्येला, काढ मशीदीवरील भोंगे.. मोदी/शहांना औरंगझेब म्हण तर कधी दिल्लीला जाउन त्यांची भेट घेऊन गुणगान गा ..ह्या अशा १८० कोनातल्या भूमिकांमुळे अनेक मतदार त्यांच्यापासुन दुरावले. वाय एस आर कोंग्रेस्/द्रमुक्/टी.आर एस च्या नेत्यांना कधी अयोध्या/मशीदीवर बोलताना पाहिलेय ? मोदी/शहांवर गलिच्छ टीका करताना ऐकलय? ह्या तिन्ही पक्षांचे नेते नालायक आहेत म्हणून ही अशी अवस्था झाली.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 06/23/2022 - 13:29 नवीन
बरोबर लिहिलंय माई. ना सेना कधी मराठीवादी होती ना कधी हिंदुत्ववादी होती. कायम दुसऱ्या पक्षांच्या मदतीने सत्ता मिळविणे व आम्हीच स्वबळावर सत्ता मिळविली अशा फुशारक्या मारणे एवढंच यांनी आजवर केलंय. कधी मुस्लिम लीगशी युती कधी कॉंग्रेसशी कधी भाजपशी कधी राष्ट्रवादीशी कधी शेकापशी . . . . कायमच दुसऱ्याने केलेली शिकार पळविणे किंवा दुसऱ्याने अर्धवट खाऊन सोडलेली शिकार पळवून पोट भरणे हीच यांची मर्दुमकी. पण आम्हीच झडप घालून शिकार केली या फुशारक्या मोठ्या तोंडाने सांगणार.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा