ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.
लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)


प्रत्येक वेळी त्याच्या अर्जावर स्वाक्षरी करणारे समर्थक आमदार/खासदार त्याला कसे मिळत होते?श्रिगुरूजी, तेव्हा आमदार खसदार ह्यांची सही असण्याचे बंधन नव्हते. कुणीही ऊभा राहू शकत होतं.सुब्रह्मण्यम स्वामी अत्यंत बुद्धिमान आहेत.ते बरोबर आहे हो. पण अध्येमध्ये ते भाजपला घरचा आहेर देत असतात. मग त्यांच्यावर टिका करायला नको?विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचे धाडस करणार नाही कारण त्या निवडणुकीत सुद्धा गुप्त मतदान असते.२०१९ ला पहाटे च्या शपथेनंतर कोर्चाने आदेश दिला की हात वर करून मतदान घ्या. नी लगेच दुसर्या दिवशी राजिनामा! खिक्क. :)हे सरकार लवकरात लवकर जायलाच पाहिजे.वाट बघा.