ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग २)
आधीच्या भागात २५० प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील चर्चेसंदर्भात प्रतिसाद द्यायचा असल्यास त्या भागात आणि नवीन काही लिहायचे असल्यास या भागात लिहावे ही विनंती.
लोकप्रिय व्यक्तीमत्व अभिजीत बिचुकले यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उडी घ्यायचे ठरविले आहे. विविध राज्यातील १०० आमदारांचा पाठिंबा मिळविण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आपल्याला राज्यघटना आणि कायदा याची चांगली जाण असून आपण राष्ट्रपती व्हायला योग्य आहोत असा त्यांचा दावा आहे. आपली राष्ट्रपती व्हायची इच्छा आहे हे त्यांनी मागच्या वेळेस मोदींना सांगितले होते पण आयत्या वेळेस मोदींनी रामनाथ कोविंदांचे नाव पुढे आणल्याने त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला असे दिसते. असो. अभिजीत बिचुकलेंना हार्दिक शुभेच्छा. २५ जुलै रोजी नवे राष्ट्रपती म्हणून ते शपथ घेताना दिसतील का? आणखी एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती झाल्यास त्याचा आपल्या सगळ्यांनाच आनंद व्हायला हवा :)


🗣 चर्चा
(216)
श
शाम भागवत
Wed, 06/22/2022 - 09:11
नवीन
भाजपाने राजकारणासाठी इतर पक्षातून काही अयोग्य माणसे घेतली तरी त्या माणसांनी भाजपात येऊन नव्याने खाबूगिरी केली का हेही पहावे लागते. नंबरांचे गणित जुळवण्यासाठी "खाने नही दूंगा" या अटीवर अयोग्य माणसांना पक्षात घ्यायला काय हरकत आहे? अशा प्रकारची ती विचारसरणी वाटते. त्यांची टक्केवारी एकूणात २-४ टक्के असल्याने बिघडत नसावे.
२०१४ साली भाजपाने अशी काही माणसे घेतली तरी त्यांनी नव्याने भ्रष्टाचार केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे याअगोदर जे केले ते माफ करतो पण यापुढे नव्याने काही केले तर क्षमा नाही, हा व्यवहारी दृष्टिकोन ठेऊन राजकारण करणे सध्याच्या काळात आवश्यक झाले असावे.
खरेतर मला हा विचार पसंत नसला तरी सध्याच्या काळात ह्या विचारावर राजकारणे करणे ही स्वच्छ माणसांची अगतिकता असावी.
याच विचारावर आधारित चंद्रकांत दादा काल म्हणाले असावे की, "भाजप म्हणजे भजनी मंडळ नाही." :)
- Log in or register to post comments
प
प्रदीप
Wed, 06/22/2022 - 10:21
नवीन
रात्रीचे चांदणे व शाम भगवत, भाजपची आपण दोघांनी सांगितलेली अगतिकता समजण्यासारखी आहे. ह्या व तत्सम सिच्युएशन्सचे मूळ आपल्या लोकशाहीमधे आहे.
वास्तविक, लोकशाही राबवण्यास जी परिपक्वता लागते, ती आपल्याकडे तसेच, खरे तर आशियातील कुठल्याही देशांत नाही. त्यामुळे एकतर राजकीय पक्षांना कोलांट्याउड्या माराव्या लागतात, अथवा जातीपातीचे राजकारण करावे लागते-- किवा इतर काही आशियाई देशांत झाल्याप्रमाणे सैन्याने देशाच्या राज्यशकठहाठीचा ताबा घेणे व गव्हर्नन्स सुरळीत ठेवणे, हे करावे लागते (ही माझी गेल्या काही वर्षांपूर्वी, माझ्या निरीक्षणावरून, व माझ्या कुवतीनुसार केलेली थेयरी आहे). ह्याबद्दल येथे काही लिहीत नाही, कारण ते अवांतर होईल.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 06/22/2022 - 11:46
नवीन
तुमचे म्हणणे बरोबर आहे. युरोप अमेरिकेशी तुलना करता भारतातील लोकशाही नविन आहे. अविकसीतपणा, निरक्षरता हे जास्तीचे मुद्दे आहेतच.
त्यामुळे जो पक्ष देशाचे जास्तीत जास्त भले करू शकेल किंवा कमीत कमी नुकसान करू शकेल, कमीत कमी भ्रष्टाचार करेल अशा पक्षाला निवडून देणे एवढेच विचारी व सुसंकृत माणसाला सध्याच्या स्थितीत शक्य आहे.
आपल्याला चांगला पक्ष निवडायचा नाही आहे तर कमीत कमी वाईट पक्ष निवडायचा आहे. ;)
- Log in or register to post comments
स
सौन्दर्य
Wed, 06/22/2022 - 19:21
नवीन
"कमीत कमी वाईट पक्ष निवडायचा आहे." - प्रचंड सहमत
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 06/22/2022 - 19:35
नवीन
मला कमीत कमी वाईट पक्षातला कमीत कमी वाईट नेता चालेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 06/21/2022 - 20:30
नवीन
एकंदरीत एकनाथ शिंदेंच्या बंडातून फारसे काही साध्य झाल्याचे अजूनतरी दिसत नाही.
विक्रांत जोशी नावाच्या पत्रकाराचे भाकित आहे की आज रात्री अनिल परबांना अटक होईल व उद्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देतील.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Tue, 06/21/2022 - 20:42
नवीन
त्या विक्रांतचे अनेक अंदाज चुकले आहेत. ई.डी./सी बी आय्/आय बी/कॅबिनेट सचिव रोज ह्याला अपडेट देत असावेत असे त्याच्या बोलण्यावरुन अनेकदा जाणवते.
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Tue, 06/21/2022 - 20:45
नवीन
एकनाथ शिंदे नी बंड केले असेल तर सत्य स्वीकारा ..
ठाकरे नी स्वतः राजीनामा द्यावा..आणि आपल्या पक्षातील सर्व आमदार cha राजीनामा घ्याबा.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी ल आव्हान करावे त्यांनी पण सर्व आमदार cha राजीनामा घ्यावा..
विरोधी पक्ष च नसलेले भारताच्या इतिहासात कधीच जे घडले नाही ते घडू ध्या.
महाराष्ट्रात फक्त सरकार पण विरोधी पक्ष नाही.
जो काही गोंधळ घालायचा आहे तो त्यांना
घालू ध्या.
सत्य स्वीकारणे हेच शहाणपण.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/22/2022 - 00:16
नवीन
आला आहे.
हातातल्या फायलीऐवजी डिजिटल डायरी खिशात ठेवणे बरे नाही का? एडिटिंग सोपे पडेल.
गजराचे घड्याळही हातावर मनगटावर बांधता येत नाही. 'मी' बँड? नोटिफिकेशनस पाहायला सोपे.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 06/22/2022 - 05:39
नवीन
शिंदे आणी कंपनी आता सूरतहून गुवाहाटीला पोचली आहे. शिंदे ह्यांच्याबरोबर ४० आमदार असल्याचा दावा केला जात आहे. हे खरे असेल तर उद्धव पक्ष सांभाळण्यात सपशेल अपयशी ठरले असे म्हणावे लागेल. हे सगळे आमदार काही सत्ता हवी/पैसा हवा म्हणून बंड करत आहेत असे कोणाला वाटत असेल तर तो मूर्खांच्या नंदनवनात वावरत आहे असे म्हणावे लागेल.
नऊ वाजुन गेले आहेत अजूनही शेरो शायरी करणार्या संजय राउत ह्यांचा पत्ता नाही.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Wed, 06/22/2022 - 05:50
नवीन
त्यांना दिलेली भूमिका त्यांनी उत्तम वठवली आहे. ते काम आता झालंय.
आता दिग्दर्शक आणि निर्माते नवी पात्रे आणतील.
( बाकी हल्ली मराठी मालिका पहात नाही का तुम्ही? :))
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 06/22/2022 - 08:46
नवीन
+१
शिंदेंबरोबर १० ते १५ आमदार असते तर हे बंडं म्हटले गेले असते. मध्यावधी लावायची असेल तर अशी काहीतरी खेळी खेळणे भाग असते.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 06/22/2022 - 08:56
नवीन
शिवसेना + राष्ट्रवादी + काँग्रेस अशा युतीत राहून परत निवडून येणे अवघड आहे व आपल्याला राजकारणाचे दुकान कायमचे बंद व्हायची शक्यता आहे हे जाणवल्यामुळे शिंदेसाहेबांनी बाहेर पडायचे ठरवले असावे. नगरसेवकांकडून ही भिती आमदारांकडे व्यक्त केली गेली असावी व त्यातून नाईलाजाने ही खेळी खेळली गेली असावी.
- Log in or register to post comments
अ
अमोल निकस
Wed, 06/22/2022 - 05:40
नवीन
मिसळपाव समूहाचा whtsapp Group आहे का?
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/22/2022 - 05:46
नवीन
पण गुप्तपणे असेल.
- Log in or register to post comments
न
निनाद
Wed, 06/22/2022 - 06:20
नवीन
आहे.
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/22/2022 - 08:51
नवीन
मिसळपाव समूहाचा कोणताही अधिकृत गुप नाही. पण, मिपाचे लोक असलेले अनेक समुह आहेत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
अ
अमोल निकस
Wed, 06/22/2022 - 16:02
नवीन
क्रुपया सहभागी करून घ्यावे. ९६८९१०२३३८
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/22/2022 - 05:48
नवीन
हवा म्हणून बंड करत आहेत असे कोणाला वाटत असेल तर. . .
त्यासाठीच चालले आहे. प्रत्येकाची आडून सरकारी कंत्राटे आहेत बहुतेक.
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 06/22/2022 - 05:50
नवीन
काल सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष या दोन्ही बाजूंनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारांची घोषणा केली. सत्ताधारी पक्षाकडून झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री/परराष्ट्रमंत्री यशवंत सिन्हा हे उमेदवार असतील.
द्रौपदी मुर्मूंचे नाव मागच्या वेळेसही चर्चेत होते. पण त्यांना मागच्या वेळेस उमेदवारी न देता मोदींनी रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे आणले होते. तसेच मागच्या वेळेस सत्ताधारी पक्षाने कोविंद यांचे नाव पुढे आणल्यावर विरोधी बाजूकडून आधी चर्चेत असलेली गोपाळकृष्ण गांधी वगैरे नावे मागे पडून मीरा कुमार हे नाव पुढे आणले गेले. यावेळेस मात्र सत्ताधारी गोटातून उमेदवाराच्या नावाची घोषणा आधी केली गेली नाही. विरोधी पक्षांकडून दुपारी यशवंत सिन्हांचे नाव आले तर रात्री ८ च्या सुमारास सत्ताधारी पक्षाकडून द्रौपदी मुर्मूंच्या नावाची घोषणा झाली.
मुळच्या ओरिसाच्या असलेल्या द्रौपदी मुर्मू वनवासी समाजातील (tribal) आहेत. आपल्याच राज्यातील स्त्री उमेदवाराला विरोध करणे नवीन पटनायक यांना शक्य होईल असे वाटत नाही. त्याप्रमाणेच झारखंडमधूनही त्यांच्या नावाला समर्थन मिळू शकेल. झारखंड मुक्ती मोर्चाला त्याच tribal समाजातून मोठे समर्थन असल्याने त्या समाजातील उमेदवाराला विरोध कदाचित त्यांच्याकडूनही व्हायचा नाही. त्यामुळे द्रौपदी मुर्मूंची वाट सोपी दिसते.
या सगळ्या घडामोडींमध्ये अभिजीत बिचुकलेंचा पत्ता परत एकदा कापला गेला याचे वाईट वाटते :)
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 06/22/2022 - 08:31
नवीन
याबद्दल बिचुकलेला सुद्धा वाईट वाटले नसेल
- Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 06/22/2022 - 08:35
नवीन
:) :)
- Log in or register to post comments
स
साहना
Wed, 06/22/2022 - 06:20
नवीन
उधोजी ह्यांचा शिळ्यासेनेवर ताबा नाही आणि निव्वळ फोटोला थोबाड आणि हाराला गळा म्हणून हे नेते होते. त्यांत बाजूला चमचे मंडळींचा घोळका आणि राऊत सारखे वाचाब्रहस्पती. शिवसेनेचे ४० आमदार महाराष्ट्र सोडून गुजरात मध्ये क्या पोचतात आणि उधोजींना साधी बातमी सुद्धा लागत नाही ? ह्या संत्र्याना पोलीस संरक्षण नव्हते ? महाराष्ट्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा जी ह्याच्या साठी वसुलीचे काम करते त्यांना सुद्धा वित्तमंबातमी लागली नाही ?
पुढे काय होईल ठाऊक नाही पण उधोजीने शिंदे ह्यांच्या पुढे नाक घासले तर शिवसेनेवरची त्यांची पकड कायमची निघून जाईल. शिवसेनेचे खरे नेते शिंदे असून उधोजी फक्त उत्सवमूर्ती आहेत असे जनतेला सुद्धा कळून चुकेल. मग पैश्यांच्या बॅगा मातोश्रीवर पोचणार नाहीत तर शिंदे ह्यांच्या घरी जातील.
पुत्रमोह आणि सत्ता मोह कसा लोकांना खाली खेचतो ह्याचे उत्तम उदाहरण ठाकरे परिवार आणि शिळीसेना आहे.
- Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली
Wed, 06/22/2022 - 08:57
नवीन
शिळीसेना, पैशांच्या बॅगा मातोश्रीवर.
संपादर मंडळ हे वाचतंय की नाही?? भाजप विरोधी आयडींवर त्वरीत कारवाई होते.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Wed, 06/22/2022 - 09:01
नवीन
कचुरे साहेब तर आहेत की अजून मिपावर, कुठं झाली कारवाई
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 06/22/2022 - 07:00
नवीन
या सगळ्यात भाजप परत तोंडावर पडणार अशी मला दाट शंका आहे .. आणि परत राष्ट्रवादी मृतदेहाचं टाळू वरचे लोणी खाणारं
भाजप काही शिकली असले तर नवीन निडवणुकांची मागणी करेल तर इज्जत राहील
भाजपचं समर्थांकी खुश जरूर व्हावे पण सबुरीने ...
सेने बद्दल बोलायचे तर जसे काँग्रेस मध्ये काँग्रेस चाय कार्यकर्त्यांना नेहरू कुटुंबाशिवाय कोणी दुसरे केहाळत नाही तसेच सेनचं "कट्टर" कार्यकर्त्यांना ठाकरेंचं ठारच लागतात सेनेत मुळातच अंतर्गत लोकशाही नसल्यमुळे हे होणारच
जसे पुतण्यांचे पहाटेचं बंडाळी नंतर सुद्धा परत राष्ट्रवादी मध्ये स्वागत केले गेले तसे एकनाथशिंदेंचं परत स्वागत होणार सेनेत असे वाटते पण दुसरे मन म्हणते कि त्यांचा भुजबळ / राणे हे जसे गद्दार ठरेल तसे शिंदे गद्दार होणार
असो एकूण " परिपकव लोकशाहीत सर्वच पक्ष असे शेण खातात.. लाज वाटली पाहिजे आमदारांना हॉटेलात काय / नेले जाते / चार्टर विमान काय !
असा ऐकलंय कि ५ तारांकित हॉटेल नवे पॅकेजेस काढतात -- गटबाधान प्याकेज .... मज्जा आहे
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/22/2022 - 07:02
नवीन
शिवसेनेला खिंडार पडण्याची ही काही पहिली वेळ नाही. छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक, राज ठाकरे अशा थोरा-मोठ्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि आज एकनाथ शिंदे. आज जरी एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्ववादी सैनिक आहोत असे म्हणत असले तरी खिंडार पडले ते पड्लेच आहे. शिंदेसमर्थक आमदार भाजपाला पाठींबा देऊन भाजपाचे सरकार आणत असतील तर त्यांचे सरकार आघाडी येऊ देतील असे वाटते. अडीच वर्षानंतर आघाडीलाच त्याचा फायदा होईल, अर्थात ही शक्यता. आघाडीचं सरकार बनले त्या प्रत्येक दिवसापासून भाजपा महाआघाडीत फूट होईल याची वाट पाहात होते. दोन प्रयत्नानंतर शिंदे गटाच्या निमित्ताने भाजपाने उद्धव ठाकरे यांची खुर्ची अस्थिर केली आहे. भाजपा सत्ता स्थापन करेल असा दावा अजून तरी कोणी केला नाही. आणि करीत असेल तर महाविकास आघाडी ते करु देईल कारण आघाडीला याचा फायदा होईल असे वाटते. अर्थात राजकारणात निश्चित काहीच सांगता येत नाही. सत्ता टीकविण्याची महाआघाडी प्रयत्न करतील. हा खेळ आकड्याचा.
शिंदे गटाने आमचीच मूळ सेना आहे, असे म्हणून कोणालाही पाठींबा न देता तटस्थपणे राहतील असे काही वाटत नाही. भाजपा-सेनेचा संसार असतांना भाजपाने शिवसेनेचा कायम अपमान केला. त्या शिवसेनेतील निष्ठावंतांनी भाजपाचा हिशेब चुकता करायचा असा विडा उचलला आणि शिवसेनेने त्यांचा बदला घेतला. कायम भाजपा युतीत शिवसेनेचा जो अपमान भाजपा करीत होती. त्याचा बदला शिवसेनेने महाविकास आघाडीबरोबर संसार सुरु करुन घेतला, ते योग्य होते नव्हते. तो वेगळा विषय पण भाजपाला धडा दिला. कधीना कधी हा महाविकास आघाडीचा संसार मोडेल याची दरदिवशी भाजपा वाट पाहातच होती. मला वाटतं तो दिवस जवळ आला आहे. अध्यक्ष महोदय, हे योग्य नाही. अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही. आता थेट संधी मिळत आहे.
बाकी, इतिहासाची पुनरावृत्ती होते असे म्हणतात. महाराष्ट्रात इतिहासाच्या राजकारणात १९७७ मधे महाराष्ट्रात जनता पक्षाला 99 जागा मिळाल्या, पण त्या काही सत्ता स्थापनेसाठी पुरेशा नव्हत्या. कारण चव्हाण-रेड्डी काँग्रेसला ६९ आणि इंदिरा काँग्रेसला ६२ जागा मिळाल्या होत्या. महाराष्ट्रात पहिल्यांदाच त्रिशंकू स्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले. या सरकारमध्ये रेड्डी-चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री (वसंतदादा पाटील) आणि इंदिरा काँग्रेसचे उपमुख्यमंत्री (नासिकराव तिरपुडे) बनले. महाराष्ट्रात दोन पक्ष एकत्र येत आघाडी करून सरकार स्थापन करणं आणि महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री बनवणं, या दोन्ही गोष्टी पहिल्यांदाच यावेळी घडल्या. वसंतदादांच्या सरकारमध्ये उद्योगमंत्री असलेल्या शरद पवार यांनी सुशीलकुमार शिंदे, दत्ता मेघे आणि सुंदरराव सोळंके या मंत्र्यांसह एकूण 38 आमदारांना घेऊन भर अधिवेशनात बंडखोरी केली आणि दादासाहेब रुपवते यांच्या नेतृत्वात 'समांतर काँग्रेस' असा नवा गट स्थापन केला. या बंडखोरीने वसंतदादांचं सरकारच अल्पमतात आलं आणि ते पडलं. जनता पक्षाच्या पाठींब्यावर शरद पवार मुख्यमंत्री बनले. पुढे पुन्हा इंदिरा गांधी सत्तेवर आल्या आणि पुढे राष्ट्रपतीच्या शिफ़ारशीनंतर सरकार बरखास्त केलं आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.
मला वाटतं, महाराष्ट्रात पुन्हा एकदा तसेच चित्र निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीतला गोंधळ संपला नाही. भाजपाला सरकार स्थापन करता आले नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल. अर्थात ही सगळी मतं-मतांतरे, राजकारणात आणि क्रिकेटखेळामधे निश्चित काहीच सांगता येत नाही. काय घडते ते पाहात राहु या.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Wed, 06/22/2022 - 14:24
नवीन
या बंडखोरीने वसंतदादांचं सरकारच अल्पमतात आलं आणि ते पडलं. जनता पक्षाच्या पाठींब्यावर शरद पवार मुख्यमंत्री बनले.
हाच तो प्रसंग का ज्यामुळे काका बदनाम झाले?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 06/22/2022 - 14:37
नवीन
हा पहिलाच प्रसंग. नंतर अनेक वेळा खंजीर खुपसण्याचे प्रसंग घडले. आता तर पवार म्हणजेच विश्वासघात असं नातं तयार झालंय.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 06/22/2022 - 07:02
नवीन
बाकी शिवसेनेचे ठिक आहे, मात्र तो बच्चू कडू काय करतोय तिथे. तो विरोधक आहे ना भाजपाचा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 06/22/2022 - 07:16
नवीन
दोन वेगवेगळ्या फौजदारी खटल्यात तुरूंगवासाची शिक्षा मिळालेला बच्चू कडू, प्रताप सरनाईक अशांचा पाठिंबा भाजपने घेऊ नये.
- Log in or register to post comments
B
Bhakti
Wed, 06/22/2022 - 07:24
नवीन
+११
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
Wed, 06/22/2022 - 08:16
नवीन
बच्चू कडू, प्रताप सरनाईक अशांचा पाठिंबा भाजपने घेऊ नये.
--
सहमत !
मात्र सत्तेसाठी भाजपा काहीही करु शकतो.
- Log in or register to post comments
ड
डँबिस००७
Wed, 06/22/2022 - 07:04
नवीन
100% सहमत !!
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 06/22/2022 - 07:14
नवीन
आता सरकार पडेल . बंड केलेले त्या मध्ये यशस्वी होतील.
पण पुढे काय?स्वतः निवडून येण्याची ताकत ह्या बंडखोर पैकी किती लोकात आहे.
Bjp काही ह्यांना गरज संपल्यावर जास्त किँमत देणार नाही.
खरे तर राज ठाकरे नी बाळा साहेब ची जागा चालवायला हवी होती..
उद्धव ठाकरे मवाळ स्वभावाचे आहेत आणि शिवसेनेची ती ओळख नाही .
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/22/2022 - 07:16
नवीन
१००० ट्क्के सहमत.
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/22/2022 - 07:26
नवीन
बाळासाहेबांची शिवसेना आहे ती. उद्धव आणि आदित्य त्यांच्या स्वबळावर पुढे येतात , घराणेशाहीवर नाही ते सर्वांना माहिती आहे.
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
Wed, 06/22/2022 - 07:23
नवीन
राज्यपाल कोश्यारींना करोना झालाय अशी एक बातमी आहे.
गोव्याचे राज्यपाल प्रभारी राज्यपाल म्हणून काम करतील अशी शक्यता बोलली जातेय
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Wed, 06/22/2022 - 07:34
नवीन
एकनाथ शिंदे यांच्या गटाला मुख्यमंत्रीपद देउन भाजपा त्यांना बाहेरुन पाठींबा देईल, आणि अडिच वर्षे सत्ता चालवेल, अशी शक्यता नाही का?
तसेही विधानपरिषदेचे निकाल आल्या नंतर फडणविस म्हणाले होते "आमचा लढा जनतेसाठी आहे सत्तेसाठी नाही"
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 06/22/2022 - 07:53
नवीन
अगदी. आता तसेही दोघांचेही ब्लडगृप एकच निघाले आहे, त्यामुळे हा एक उत्तम पर्याय आहे. पण भाजपा केंद्रीय नेतृत्वास मान्य होणारा पर्याय नाही. आपण एवढी मरमर केली आणि आपला मुख्यमंत्री होणार नसेल तर त्यास केंद्रीय नेतृत्व मान्यता देणार नाही. पण मुख्यमंत्री शिंदे झाले तर, काठावर असलेले शिवसेनेचे आमदार शिंदे गटाला मिळतील.
अवांतर : बाकी. ४ कि.मी अंतर पावसात शिंदेंच्या तावडीतून निसटलेल्या आमदाराने सांगितली आपबिती.
अजून सुरस चमत्कारिक गोष्टींसाठी वाचत राहा. सबसे आगे, सबसे तेज. मिपा. ;)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 06/22/2022 - 09:42
नवीन
असला प्रकार राहूल गांधी यांनी कर्नाटकात केला होता.
मोदी-शहा हे राहूल गांधी एवढेच हुषार असतील तर तसे ही होईल. :)
- Log in or register to post comments
S
sunil kachure
Wed, 06/22/2022 - 07:46
नवीन
पण आताचे सरकार पडेल.
हे. मात्र खरे आहे.ओढून ताणून सत्तेत राहण्यात काही अर्थ नाही.
संकट येतात ती नवीन संधी घेवून च.
आता ही संधी कोण कसे साधते आहे.
ते बघायचे.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/22/2022 - 07:58
नवीन
भरपूर संधी आलेल्या आहेत हो.
- Log in or register to post comments
स
सुखी
Wed, 06/22/2022 - 08:29
नवीन
कायप्पा University
सेना भाजप युतीचे सरकार बननार. एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव उध्दव ठाकरे स्विकारणार. हे सगळे नाटक चालू आहे. सगळे आधीच ठरले आहे.
१) एकनाथ शिंदे बंड करणे शक्य नाही.
२) बंड केलेच तर 35 आमदार जाणे हे शक्य नाही.
शिवसेनेला भाजप बरोबर जायचेच आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाची संपली आहे. तसे ही करुन खुर्ची खाली करायचीच होती. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेण्यापेक्षा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री घेतलेले चांगले. याचे फायदे असे.
१) उपमुख्यमंत्री पद
२) वाढीव मंत्री पदे.
३) केंद्रात एखादे मंत्री पद
४) ईडी पासून चौकशी बंद होईल.
आणि सगळ्यात महत्वाचे सेना भाजप एकत्र येण्याचे कारण
५) *मुंबई महानगरपालिका ताब्यात राहणार.*
हे सगळे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ठरवून चालले आहे. पब्लिक येड्यासारखी टिव्ही समोर बसून आहे. सेनेला भाजपकडे जाण्यासाठी ठोस कारण पाहिजे. ते कारण म्हणजे
*एकनाथ शिंदे*
- Log in or register to post comments
स
सौंदाळा
Wed, 06/22/2022 - 08:37
नवीन
अगदी माझ्याच मनातले लिहिले आहे.
मुंबई महानगरपालिकेला पण कोंग्रेस, राष्ट्रवादीने आघाडी, जागावाटप तगादा लावला असता. सेनेचा पारंपारीक मतदार पण दुरावला आहेच. त्यामुळेच ठाकरेंच्या पाठींब्यानेच हे सर्व चालू आहे असे वाटते. तसे नसेल तर मात्र ठाकरेंच्या नेतृत्वावर मोठेच प्रश्नचिन्ह लागेल. आमदार सोडाच खासदार पण शिवसेना सोडून जातील.
- Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे
Wed, 06/22/2022 - 08:42
नवीन
समजा असच असेल तर लोकं परत सेना भाजपला मतदान करतील का? निवडणुकीत मतदार नक्किच हे लक्षात ठेवतील.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 06/22/2022 - 09:00
नवीन
उठांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी मोदी-शहा जुळवून घेण्याची अजिबात शक्यता वाटत नाही. शिंदेसाहेबांनी एवढी मोठी खेळी करण्याअगोदर याची चाचपणी अगोदर केली असण्याची शक्यता नक्कीच असणार.
- Log in or register to post comments
च
चौकस२१२
Wed, 06/22/2022 - 09:11
नवीन
"शिंदेसाहेबांनी एवढी मोठी खेळी करण्याअगोदर याची चाचपणी अगोदर केली असण्याची शक्यता नक्कीच असणार."
तर्कावर तसे वाटते पण काय भरोसा .. पहाटेचा अमंगल खेळ खेळताना भाजपच्या नेत्यांनी पवार काकांबरोबर " चाचपणी अगोदर केली होती का?
यावेळी फक्त एक गोष्ट वेगळी आह एकी एकनाथ शिंदे बरोबर बरोबर बरेच आमदार गेले आहेत .. हा तास म्हणाल तर धक्के आहे खरा भुजबळ किंवा राणे तसे करू शकले नवहते !
सिनेमा अजून संपला नाही
पण घरवापसी होणार आणि भाजप तोंडावर पडणार असेच वाटते
आणि मग काय काका खुश
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 06/22/2022 - 09:22
नवीन
बघुया काय होते आहे ते.
पण
घरवापसी झाली तर भाजपा राष्ट्रपती राजवट लावू शकतो. म्हणजे कारभार भाजपाकडेच राहतो. हेच काश्मीरमधे केले होते. यात भाजपाचे नुकसान नाहीच उलट भाजपा थोडा चांगल्या स्थितीत येतो. मुख्य म्हणजे पोलीस प्रशासन भाजपाला अनुकूल झाल्याने आत्ताच्या इडी + सीबीआय + आयकर कारवाया आणखी चांगल्या पध्दतीने सुरू होतील. सीबीआय वरची महाराष्ट्रबंदी उठेल. परिस्थिती अनुकूल झाल्यावर मध्यावधी केव्हांही लावता येऊ शकते.
भाजप कायम विन विन सिच्युएशन मधे असणार आहे. त्यामुळे भाजपाला प्रत्यक्ष सत्ता लागलीच नाही मिळाली तरी चालणार आहे.
मात्र
मोदी शहा फडणवीस हे सत्तालोलूप आहेत असं ज्यांना वाटते त्यांना हे पटणार नाही.
त्यासाठी थांबा व पहा हेच धोरण :)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Wed, 06/22/2022 - 09:31
नवीन
होय.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »