Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

हातात फक्त आठ वर्षे!

त
तर्कवादी
Tue, 06/14/2022 - 13:52
🗣 92 प्रतिसाद
भारतीय वृत्तमाध्यमांत पर्यावरणविषयक बातम्या वा चर्चा या खरेतर फक्त हवामान व पर्जन्य याबद्द्लच मर्यादित आहेत. पावसाचा अंदाज, पावसाचे वृत्त, पूर , भूस्खलन, चक्रीवादळे ईत्यादी बद्दलच्या संक्षिप्त बातम्या इतकंच काय ते पर्यावरणाला मिळणारं फूटेज. पण सध्याची परिस्थिती पाहता पर्यावरण हा अतिशय महत्वाचा व गंभीर आणि प्राधान्याने ज्यावर विचार व कृती करायला हवी असा विषय बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंग, कार्बन उत्सर्जन, भूजलाची घटती पातळी, वाढते जल व वायू प्रदूषण, प्लॅस्टीक व इतर कचर्‍याच्या समस्या, घटते जैववैविध्य , वाढते पूर, चक्रीवादळे असे अनेक उपविषय पर्यावरणात सामाविष्ट आहेत. त्यातही ग्लोबल वॉर्मिंग हा नावाप्रमाणेच सर्वात हॉट विषय असावा. आजच ओझोन प्रदूषणाविषयीचा एक धागा मिपावर आलाय. आपण (सन्माननीय अपवाद वगळता) जरी बहुधा या विषयातले तज्ञ नसलो तरी पर्यावरणाबद्दल जागरुकता असणंही चर्चा करण्याकरिता पुरेस आहे. चर्चा करत हळूहळू आपल्या ज्ञानात भर पडत राहील. पर्यावरणाचा विषय आला की संबंधित सरकारी धोरण हा महत्वाचा पैलू असणारच. पण तरी राजकारण्यांबद्दलची टिप्पणी (अगदीच आवश्यक असल्याखेरीज) टाळून चर्चा झाल्यास बरे. पुढचे आठ वर्षे हा धागा जिवंत रहावा ही अपेक्षा !! चर्चेच्या सुरुवातीला "हातात फक्त आठ वर्षे" या लोकसत्तातील लेखाचा दुवा देत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19052 views

🗣 चर्चा (92)
त
तर्कवादी Tue, 06/14/2022 - 14:17 नवीन
धाग्यात उल्लेखलेल्या लेखातील काही मुद्दे २०३० पर्यंत जगातील कर्ब-उत्सर्जन निम्मे केले आणि २०५० पर्यंत ते शून्यावर आणले तरच ही तापमानवाढ २०५० पर्यंत १.६ ‘डिग्री सेंटिग्रेड’पर्यंत रोखता येईल. नाही तर २०३० पासून पृथ्वीच्या दक्षिण आणि उत्तर ध्रुवामधील समुद्राच्या पोटातील, वरून फक्त शिखरे दिसणारे प्रचंड बर्फाचे पर्वत विरघळायला लागतील. ही प्रक्रिया चक्रवाढ गतीने होऊन जागतिक तापमानवाढ दोन किंवा तीन डिग्री किंवा त्यापेक्षा जास्त होईल. त्यावर नियंत्रण आणणे काय वाटेल ते केले तरी अशक्य होईल. एवढय़ा तापमानवाढीमुळे टोकाच्या नैसर्गिक आपत्ती ओढवून या शतकाच्या अखेपर्यंत सुमारे १०० कोटी (!) लोक विस्थापित होतील असे ‘आयपीसीसी’ने (युनोची तज्ज्ञ-समिती) म्हटले आहे. एवढे ‘पर्यावरणीय निर्वासित’ जगात निर्माण झाल्यास त्यातून जगात कल्पनातीत आर्थिक-सामाजिक ताण निर्माण होऊन जगभर अक्षरश: हाहाकार माजेल. तो टाळण्यासाठी जगात यापुढे जास्तीत जास्त ४०० गिगा टन (एक गिगा टन म्हणजे १०० कोटी टन) कर्बवायू वातावरणात सोडला तर चालणार आहे. सध्याच्या कर्बउत्सर्जनात वेगाने घट झाली नाही तर हे उरलेले ‘कार्बन-बजेट’ २०३० पर्यंत संपेल. वर्षांला कर्बवायू-उत्सर्जन सात टक्क्य़ांनी घटवायची गरज असताना उलट ते १.२ टक्क्य़ांनी वाढले आहे कर्बवायू हवेतून शोषण्याचे प्रमाणही वाढवायला हवे. त्यासाठीचे अभियांत्रिकी तंत्रज्ञान आज तरी व्यवहार्य नाही. त्यासाठी हरित-क्षेत्रे (जंगले, कुरणे, शेती इ.) वाढवणे हाच सध्या एकमेव पर्याय आहे. र्षिक, दरडोई कर्ब-उत्सर्जनाचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे – अमेरिका १६ टन, चीन आठ टन, युरोपीय महासंघ सात टन, भारत १.६ टन. गरीब-श्रीमंत सर्वाची मिळून सरासरी काढलेली ही आकडेवारी आहे. आजपर्यंतच्या जगातील एकूण कर्बवायू उत्सर्जनात – अमेरिका- २१ टक्के, युरोपीय महासंघ- १८ टक्के, चीन- १०.७ टक्के, भारत- २.८ टक्के असा वाटा आहे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 06/14/2022 - 15:26 नवीन
या विषयात सर्वात महत्वाचे काय असेल तर ” मी स्वतः २ घटकांबाबत संवेदनशील असून खालील कृती करतो : ( या धाग्यावरून इथे डकवतो) १. स्वतःचे स्वयंचलित वाहन कमीतकमी वापरणे >>>>> गेल्या २५ वर्षांत सर्वत्र वाहनजन्य प्रदूषण खूप वाढले. त्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम दिसू लागला. असे दिसते की या विषयावर लेखन, चर्चा, परिसंवाद आणि परिषदा अगदी भरपूर होतात, पण सर्वात गरजेची असलेली कृती मात्र अत्यल्प असते. बहुतेक सगळा मामला ‘लोका सांगे...’ असा असतो. अधूनमधून कृतीच्या छोट्या लाटा येतात अन लगेच त्या विरूनही जातात. कधी आपण ‘बस डे’ अनुभवतो, कधी सायकलची प्रभातफेरी पाहतो, तर कधी पाच वर्षातून एखाद्याच दिवशी आपले काही अत्यल्प खासदार संसदेत सायकलवरून जाताना फोटोत पाहतो! पण माझ्या पाहण्यात काही अपवादात्मक असे लोक आले. त्यापैकी काहींना स्वयंचलित वाहन परवडत असतानाही ते आजन्म सायकलनिष्ठ आहेत. मग मलाही काहीसे अपराधी वाटू लागले. पूर्णपणे स्ववाहनरहित आयुष्य जगणे कठीण होते, पण निर्धार केल्यास काही प्रमाणात स्ववाहन-संयम शक्य होता. मग पहिले पाऊल टाकले ते म्हणजे आठवड्यातून एक दिवस फक्त चालत अथवा सायकलचा वापर. सुरुवातीस हा शनिवार ठेवला होता, जेणेकरून दुखऱ्या पायांना रविवारी विश्रांती मिळावी. यातून आणखी एका गोष्टीची जाणीव झाली. शनिवारी कामाच्या ठिकाणीही सायकलवरच गेलो. इथे आपल्याला मात करावी लागते, ती म्हणजे कुठलीही लाज वाटणे याची. कारण आपले सर्व सहकारी स्वयंचलित वाहनातूनच येत असतात. त्यामुळे सुरुवातीस काही शेरे ऐकावे लागतात. त्यांची सवय करून घेणे हाही या निग्रहाचा एक भाग असतो. पुढच्या टप्प्यात सुटीच्या दिवशी काही कामे ठरवून दुपारच्या वेळात बसने जाऊन करू लागलो. तेव्हा आपण बसमध्ये शिरू शकतो! अखेर, विचारपूर्वक माझे वाहन-धोरण असे ठरले : १ कि.मी.पर्यंतची कामे चालत, त्यापुढच्या अंतराची बसने आणि फक्त तातडीची कामे स्वतःच्या वाहनाने करणे. 2. जमेल तितकी वीजबचत. यात काटकसर, चिक्कूपणा हे सर्व आले.
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Tue, 06/14/2022 - 15:27 नवीन
या विषयात सर्वात महत्वाचे काय असेल तर “ मी काय उपयुक्त कृती करतो व अजून काय करेन?” असे वाचावे.
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Tue, 06/14/2022 - 16:09 नवीन
वैयक्तिक पातळीवर फार मर्यादित स्वरूपात आपण हातभार लावू शकतो. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे, गरजे पुरता प्रवास करणे, शक्य तितकं आराम वाटण्यासाठी ऊर्जेचा वापर टाळणं जसे वातानुकूल यंत्र कमीत कमी वापरणे या गोष्टी आपण करू शकतो. पण प्रदूषणाच्या बाबतीत सर्वात मोठा प्रभावी घटक आहे तो म्हणजे सरकारी धोरणं. त्यामुळे या चर्चेत सरकारची प्रशंसा अथवा नालस्ती अपरिहार्य आहे. विद्यमान सरकारचे पर्यावरण धोरण ज्यामध्ये वन संवर्धन, डोंगर आणि टेकड्या वाचवणे, जल प्रदूषण कमी करणे या बाबतीतला इतिहास भूषणावह नाही. पुण्याच्या संदर्भात बोलायचे तर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नव्याने सुरु झाले नाहीत किंवा त्यांची क्षमता वाढली नाही. तसेच कचरा प्रकल्प देखील मागच्या कारभाऱ्यांपेक्षा काही वेगळे राबवले नाही. भरीला मेट्रो सारखा दिखाऊ प्रकल्प तयार करून रस्त्यावरील वाहतुकीला मंदगती करून ठेवले आहे. जाता जाता: मन्मोहन सरकाराची कुचकामी म्हनून खुप अवहेलना झाली. त्यामागे जयन्ति नटराजन यान्चे पर्यावरन मन्त्रि असणे कारणीभूत होते. ती टीका कशी अनाठायि होती ते लक्शात यावे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 06/14/2022 - 16:43 नवीन
त्यामागे जयन्ति नटराजन यान्चे पर्यावरन मन्त्रि असणे कारणीभूत होते.
जयन्ति नटराजन की जयराम रमेश ?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 06/14/2022 - 16:42 नवीन
आपण पर्यावरण बदल फक्त बातम्यांत वाचत आहोत असे नाही, आपल्या पैकी अनेकांनी गेल्या काही वर्षात पर्यावरणातले बदल अनुभवले असतील आपण स्वतः पर्यावरणातले काय बदल अनुभवले आहेत ते मिपाकर लिहू शकतात. काही महिने वगळता माझे पुर्ण आयुष्य पिंपरी-चिंचवड शहरात गेले. इथे पर्जन्यमानात होणारा बदल खूप ठळकपणे दिसतो आहे. गेले काही वर्षापासून वळवाचा पाऊस असा पडतच नाही. पुर्वी एप्रिल किंवा मे महिन्यात वादळी वार्‍यांसह मुसळधार वळवाचा पाऊस पडायचा. तसेच पावसाची सुरुवात जूनच्या पहिल्या आठवड्यात व्हायची. आज १४ जून आहे पण पाऊस अजून जवळपास पडलाच नाही. पावसाळा सुरु झाल्यावर मध्ये अनेक दिवस उघडीप असते आणि पावसाचे दिवस कमी झालेत हे ही जाणवते. दुसरा बदल (बहुधा) - मला आठवते त्याप्रमाणे मी लहानपणी वटवाघळे फारशी कधी बघितली नव्हती. पण मागील वर्षी मी निगडीत एकदा सायंकाळी आकाशात हजारो वटवाघळांचे थवे उडताना पाहिले. हा बदल पर्यावरणातील बदलाशी संबंधित असेल काय ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 06/14/2022 - 17:28 नवीन
माझेही आतापर्यंतचे आख्खे आयुष्य पिंपरीच चिंचवडमध्येच गेलंय. आपले निरीक्षण बरोबर आहे, यावर्षी वळीव बरसलाच नाही, शिवाय गेली दोन वर्षे अगदी कमी प्रमाणात होता.
पण मागील वर्षी मी निगडीत एकदा सायंकाळी आकाशात हजारो वटवाघळांचे थवे उडताना पाहिले. हा बदल पर्यावरणातील बदलाशी संबंधित असेल काय ?
ह्याबद्दल मात्र असहमत. येथे हजारो वटवाघुळांचे थवे आहेत. ह्यांची प्रमुख वस्ती चिंचवड टेल्कोच्या आवारातील झाडांत आहे. दररोज सायंकाळी तेथल्या आकाशात मावळतीला हे थवे बाहेर पडल्याचे वर्षानुवर्षे पाहतोय.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 06/15/2022 - 08:59 नवीन
दररोज सायंकाळी तेथल्या आकाशात मावळतीला हे थवे बाहेर पडल्याचे वर्षानुवर्षे पाहतोय
शक्य आहे... मग कदाचित वटवाघळांचा उडण्याचा मार्ग थोडाफार बदलला असल्याने पुर्वी मला ते निगडीला दिसले नाहीत व आता दिसलेत असं झालं असावं. पण तुम्हला चिंचवड टेल्कोच म्हणायचं आहे की पिंपरी टेल्कोच्या समोरील सुमंतसागर तळं आणि परिसर ?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Wed, 06/15/2022 - 10:32 नवीन
पण तुम्हला चिंचवड टेल्कोच म्हणायचं आहे की पिंपरी टेल्कोच्या समोरील सुमंतसागर तळं आणि परिसर ? चिंचवड टेल्कोच, मोरे प्रेक्षागृहाच्या समोरचं.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/14/2022 - 17:36 नवीन
पर्यावरण वगैरे फार लांबच्या चिंता करता राव तुम्ही , इथे आमच्यासारख्या सामान्य माणसांना आहे ह्या जिंदगीची गणिते सोडवता सोडवता नाकी ९ आले ! आर. टी. ओ सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यात अडवुन चिरिमीरी छापायचे थांबवतील त्यानंतर विचार करु ! पेट्रोल डिझेल अन अल्कोहोल जी. एस. टी च्या अखत्यारित येईल तेव्हा विचार करु ! टॅक्सेशन ऑन टॅक्स / डबल टॅक्सेशन बंद होईल तेव्हा विचार करु ! सबसीडी पॉलिटिक्स बंद होईल तेव्हा विचार करु ! पुराव्याने शाबित करता येतात ती सर्व मंदिरे हिंदुंना परत मिळतील तेव्हा विचार करु ! हाय वे वरचे टोलनाके बंद होतील किंव्वा आधीच उकळलेल्या रोड टॅक्स मधुन क्रेडिट्स घ्यायला लागतील तेव्हा विचार करु ! थोडक्यात काय तर सामान्य माणसाची जिंदगी तशीही झंड आहे , आता आठ वर्षांनी ती अजुन झंड झाली तरी काही जास्त फरक पडनार नाहीये !
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 06/14/2022 - 19:16 नवीन
मार्क साहेब, तुमचे म्हणणे खरे आहे. जिंदगी अजूनही वाईट (झंडचा अर्थ वाईट असावा असे धरून) झाली तर आपल्याला जरी फरक नाही पडला तरी आपल्या पुढच्या पिढीला तरी नक्की फरक जाणवेल, तेंव्हा त्यांच्या दृष्टीने तरी आपण काहीतरी करूया.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 06/14/2022 - 19:54 नवीन
थोडक्यात काय तर सामान्य माणसाची जिंदगी तशीही झंड आहे , आता आठ वर्षांनी ती अजुन झंड झाली तरी काही जास्त फरक पडनार नाहीये !
हो पण जिंदगी राहिलीच नाही तर ? आणि टॅक्स, पेट्रोलच्या किमती, सबसिडी वगैरे मुळे जिंदगी झंड झाली आहे असे तुम्ही समजता ? आमच्या सोसायटित साधारण तीन वर्षापुर्वी जुन्या सडक्या पाईपलाईनमुळे वापरायच्या पाण्याचा पुरवठा खूप विस्कळीत झाला होता .. वरच्या टाक्या भरायला इतका प्रचंड वेळ लागे की त्यामुळे कधी पाणी असेल कधी नसेल याची शाश्वती नसायची. सर्व रहिवाशांत खूप अस्वस्थता होती. आमच्या या तात्कालिक समस्येच्या अनेक पटीने गंभीर समस्या आताच अनेक गावांत दरवर्षी असते .. तुम्ही राहता त्या भागात जर पाण्याचे गंभीर दुर्भिक्ष्य झाले तर झंड ची व्याख्या तुम्ही नव्याने कराल आणि आता ज्या जिंदगीला तुम्ही झंड म्हणता ती स्वप्नवत सुंदर वाटू लागेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Tue, 06/14/2022 - 20:47 नवीन
झंड ची व्याख्या तुम्ही नव्याने कराल आणि आता ज्या जिंदगीला तुम्ही झंड म्हणता ती स्वप्नवत सुंदर वाटू लागेल.
एकझ्यॅक्टली! म्हणुनच म्हणतो की हे ग्लोबल वॉर्मिंग हे ब्लेसिंग इन डिसगाईज आहे ! होऊ दे चांगली पाणे पातळी मध्ये वाढ अन पोहचु दे समुद्राचे पाणी मुंबईच्या विधानभवनात . =)))) ह्या अलम दुनियेला शतअब्जावधी वर्षांचा काळ ओलटुन गेलाय , त्यात "जिंदगी " हा प्रकार इनमीन ४ अब्ज वर्ष जुना आहे , त्यातही मानवी अस्तित्व म्हणजे फार्फार्तर पन्नस लाख वर्षे असेल. म्हणजे अगदीच समंदर मे खसखस प्रकारचा. त्यामुळे - जिंदगी राहिली नाही तर खुप काही तरी महाभंयंकर होत आहे असे नाही. शांत व्हा .
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/15/2022 - 05:34 नवीन
निरुपयोगी प्रतिसाद
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 06/15/2022 - 13:15 नवीन
एकदम योग्य आहे तुमचे मत
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 06/15/2022 - 08:55 नवीन
त्यामुळे - जिंदगी राहिली नाही तर खुप काही तरी महाभंयंकर होत आहे असे नाही. शांत व्हा .
सहमत. पण जीवन संपण्याची प्रक्रिया एका झटक्यात नसेल तर खूपशी त्रासदायक असेल. ज्या गावात रोज दूरवरुन , तास न तास घालवून पाण्याचे हंडे भरुन आणावे लागतात तेथील लोकांना मरण परवडले असे कदाचित वाटत असेल पण त्रास सहन करत जगावे लागते. बाकी इथे अनेक लोक चाळिशी ओलांडलेले असतील, २०३० पर्यंत पन्नाशी ओलांडतील. बहुतेक जण आतापर्यंत आयुष्य भरभरुन जगलेही असतील पण तरीही "जिंदगी राहिली नाही" तरी काही हरकत नाही हे म्हणण्याचं धैर्य विनापत्य (चाईल्डफ्री) जीवनशैली जगणार्‍यांकडेच बहुधा असू शकेल.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Wed, 06/15/2022 - 10:04 नवीन
पण तरीही "जिंदगी राहिली नाही" तरी काही हरकत नाही हे म्हणण्याचं धैर्य विनापत्य (चाईल्डफ्री) जीवनशैली जगणार्‍यांकडेच बहुधा असू शकेल.
असं काही नाही , तुम्ही ह्या दुनियेकडे अलिप्तपणे पहायला शिकलात तर तुम्हालाही जमेल . आता आहे तैसा दिसतो प्रकार | पुढीला विचार देव जाणे || असं तुकोबा म्हणुन गेले आहेत त्यांनाही ३ पोरं होती की ! कल्पना करा , क्ष अक्सिस वर काळ घ्या आणि य अक्सिस वर १/एन्ट्रॉपी घ्या . आणि आता हा जो स्मूद कर्व्ह प्लॉट केला आहे ना त्यावर घसरगुंडीसारखे घरंगळत चालले आहे जग . अन त्या जगात आपल्या गमजा चालु आहेत ! तुम्ही वाट्टेल ते करु शकता पण ह्या घसरगुंडीवरुन घसरत जाणे थांबवु शकत नाही ! आणि घसरगुंडी संपली अन सगळं क्षणार्धात नष्ट झालं , हवेत विरुन गेलं तरी काय फरक पडतो , आपल्या परिप्रोक्ष्यातुन तो घसरगुंडीचा शेवट असेल बस्स, त्या नंतर नवीन घसरगुंडी सुरु होईल त्यावर घरंगळत जाणारे आपण तिथं नसु बस्स इतकाच फरक आहे ! न त्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपाः । न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ २-१२ ॥ इतक्या अलिप्तपणे दुनियेकडे बघायला शिकलात तर त्रासदायक त्रासदायक म्हणत आहात तो त्रास नक्कीच कमी होइल. असो. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे । गतासूनगतासूंश्च नानुशोचन्ति पण्डिताः ॥ बस इतके बोलुन मी माझे चार शब्द संपवतो.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 06/15/2022 - 10:21 नवीन
असं काही नाही , तुम्ही ह्या दुनियेकडे अलिप्तपणे पहायला शिकलात तर तुम्हालाही जमेल .
मघाच्या माझ्या वाक्याचा पुढचा भाग सांगतो.. तर अशी विनापत्य जीवनशैली जगणार्‍यांपैकी मी एक आहे.छान मजेत जगतोय. पण तरीही पुढच्या पिढीचा विचार करायला हवा असे मला वाटते. मुळात जीवन संपत असले तरी ते संपण्याचे दु:ख नाहीये . उद्या एखादा ग्रह वा भली मोठी उल्का येवून पृथ्वीला धडकली तर जीवन संपेलही कदाचित.. तसेही ते कधीतरी संपणार आहेच. पण जीवन शक्य असूनही मानवाच्या चुकांमुळे ते अकाली संपावे असे वाटत नाही .एखादा व्यक्ती नैसर्गिकरित्या आजाराने वा वृद्धापकाळाने मरण पावतोच पण आत्महत्या, खून, अपघात यामुळे आलेला अकाली मृत्यू जास्त वेदनादायी वाटतो तसेच काहीसे. अवांतर : विनापत्य राहण्याचा निर्णय अतिशय पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरण रक्षणातला मी माझा वाटा आधीच उचललाय असे म्हणता येईल :)
  • Log in or register to post comments
क
कोहंसोहं१० Wed, 06/15/2022 - 20:42 नवीन
> अवांतर : विनापत्य राहण्याचा निर्णय अतिशय पर्यावरणपूरक असल्याने पर्यावरण रक्षणातला मी माझा वाटा आधीच उचललाय असे म्हणता येईल :) हे मात्र पुर्णपणे खरयं!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Tue, 06/14/2022 - 18:22 नवीन
सामान्य नागरिक सायकलवर जाऊ दोन झाडे लाऊ गणपतीला घरच्याच बादलीत बुडवून ठेऊ असामान्य नागरिक दोन टेकड्या फोडीन हजार झाडे तोडीन पंधराव्या पिढीसाठी "आदर्श " घरे बांधीन सामान्य नागरिक फार काही करू शकेल आशी परीस्थीती नाही.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 06/14/2022 - 18:29 नवीन
कपडे धुणे या साध्या क्रिये मधून कित्येक टन प्लास्टीक हे जलप्रदुषन करीत आहे. ( आपल्या बहुतेक कपड्यांच्या धाग्यात रेयॉन नायलॉन वगैरे प्लास्टीक असते) हे प्लास्टीक आता समुद्री जीवांच्या शरीरात पोहोचले आहे. ते मायक्रो प्लास्टीक स्वरूपात मानवी रक्तातही सापडायला लागले आहे. इतकेच नव्हे तर हे प्लास्टीकचे मायक्रो कण आता थेट पावसातही सापडायला लागले आहेत. इतके करूनही कोणतेच सरकार प्लास्टीक बंदी करत नाही. तंबाखूपासून कर मिळतो म्हणून माहीत असतानादेखील त्यावर बंदी आणली जात नाही त्यातलाच हा प्रकार.
  • Log in or register to post comments
T
Trump Wed, 06/15/2022 - 16:33 नवीन
कपडे धुणे या साध्या क्रिये मधून कित्येक टन प्लास्टीक हे जलप्रदुषन करीत आहे. ( आपल्या बहुतेक कपड्यांच्या धाग्यात रेयॉन नायलॉन वगैरे प्लास्टीक असते) हे प्लास्टीक आता समुद्री जीवांच्या शरीरात पोहोचले आहे. ते मायक्रो प्लास्टीक स्वरूपात मानवी रक्तातही सापडायला लागले आहे
धन्यवाद. हा मुद्दा बर्याच वेळा सुटला जातो. कपडेधुवक पावडरमुळे जलपर्णिका नदीत आणि तळ्यात वाढल्या आहेत.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 06/14/2022 - 18:55 नवीन
पर्यावरण हानी ह्याला पूर्ण जबाबदार माणूस प्राणी. माणसं व्यतिरिक्त कोणताच प्राणी पर्यावरण साठी हानिकारक नाही. म्हणजे माणसांची संख्य खूप खूप कमी झाली तर पर्यावरण आपोआप वाचेल. पृथ्वी चे वातावरण बिघडले तर त्याची झळ सर्वांना नक्की बसेल. गरीब ,श्रीमंत,हा भेद असणार नाही जेव्हा तीव्र प्रमाणात पर्यावरणात बदल होईल. पावूस न पडणे,तापमानात वाढ ,प्रदूषित हवा, ह्या वर माणसांकडून उपाय शोधले जातील. तसे दावे इथेच काही आयडी काहीच दिवसात करतील. पाणी आम्ही बनवू . Ac च वापर वाढवू. ऊर्जा fusion नी निर्माण करू. पण पर्यावरण बदलाचा फक्त इतकाच परिणाम होणार नाही.. झाडांना फळं येणे बंद होतील. माती मध्ये कोणतीच पीक येणार नाहीत. आज पर्यंत जे विषाणू जिवाणू निद्रा अवस्थेत आहेत ते जागे होतील. अनेक महाभयंकर रोग माणसाला हैराण करतील. ऑक्सिजन चे प्रमाण कमी होईल. अगदी माणसाचा मेंदू विकसित होणे पण बंद होईल..हे सर्व निसर्ग करेल माणसाला काही करायची गरज नाही. आणि एक दिवस ही पृथ्वी निर्मनुष्य होईल.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 06/14/2022 - 19:33 नवीन
मी काय करतो - १. रेनवॉटर हार्वेस्टिंग सुरु केलंय. २. नेहेमीचे शॉवर हेड्स बदलून पाण्याची बचत होईल असे हेड्स लावलेत. ३. जेवण बनवताना भाजीपाला, तांदूळ, डाळ वगैरे धुतल्यावर पाणी बादलीत जमा करून झाडांना घालतो. ४. कन्व्हेन्शनल दिवे बदलून एल इ डी दिवे लावलेत. ५. कारचा वापर अगदी गरजेपुरताच करतो. ६. वॉशिंग मशीन आठवड्यातून एकदाच वापरतो. ७. घरामागच्या छोट्या जागेत लहानमोठी झाडे लावलीत. ८. घरातील खिडक्यांना तीव्र प्रकाश रोखण्यासाठी फिल्म तसे पडदे लावलेत. विजेचे बिल १०% तरी कमी झाले. ९. घरच्या घरीच कंपोस्ट खत बनवतो ज्या योगे घरातून थोडाही ओला कचरा घराबाहेर जात नाही. म्युनिसिपालटीचा ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा खर्च, इंधन वाचते. १०. स्मार्ट थर्मोस्टॅट लावल्यामुळे घरी नसताना वातानुकूलित यंत्र आपोआपच ऑप्टिमल लेव्हलवर सेट होते, विजेचा खर्च कमी झाला. काही कामे करायची अजून जी बाकी राहिलीत ती खालील प्रमाणे - १. टॉयलेटच्या ३.५ गॅलनच्या टाक्या बदलून, दोन कम्पार्टमेन्टच्या नवीन टाक्या बसवायच्या आहेत. छोटी टॅंक लघुशंकेनंतर वापरण्यासाठी व मोठी टॅंक इतर कामांसाठी. पाण्याची भरपूर बचत होईल अशी आशा आहे. २. घरावर सोलर पॅनल लावायचे आहेत.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 06/14/2022 - 19:43 नवीन
कन्व्हेन्शनल दिवे बदलून एल इ डी दिवे लावलेत.
आता बहुतेक सर्वच लोक एल इ डी दिवे वापरत असावेत. मी ही कारचा वापर खूप कमी करतो. बाईक मात्र थोडी वापरत असतो. अजून वर्क फ्रॉम होम चालू आहे त्यामुळे तसाही रोजचा प्रवास खूप कमी होतो.
स्मार्ट थर्मोस्टॅट लावल्यामुळे घरी नसताना वातानुकूलित यंत्र आपोआपच ऑप्टिमल लेव्हलवर सेट होते,
पण घरात कुणी नसतानाही वातानुकूलन यंत्र चालू ठेवता का ?
  • Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू Tue, 06/14/2022 - 23:48 नवीन
हे अधिक फायदेशिर असते म्हणुन. समजा बाहेर ४८ डिग्री तापमान आहे, घरात तुम्ही २८ डिग्री ठेवताय. आता समजा बाहेर गेले व यन्त्र बन्द केले तर तापमान परत ४५~४८ डिग्री ला जाईल व ते परत २८ डिग्री ला आणायला जास्त वीज वापर होतो. याउलट ते स्वनियन्त्रित असेल तर (२८ चे ३० झाले की सुरु, परत २८ आले की बन्द ) वापर कमी होते , असा अभ्यास आहे. अर्थात दिवस-रात, किती वेळ बाहेर आहात, यावर पण बरेच अवलम्बुन असते हेवेसानला...
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 06/15/2022 - 07:34 नवीन
हे अधिक फायदेशिर असते म्हणुन
असा विचार केला नव्हता. पण शक्य आहे. त्या त्या प्रदेशातील हवामान, वार्‍यांचा वेग, इमारतीची रचना यावर पण अवलंबून असेल. मी वातानुकिलित खोलीत होणारी उष्णतेची गळती थांबवण्याकरिता अ‍ॅमेझॉनवररुन ही टेप बोलावली आणि संलग्न न्हाणीघराच्या दरवाजाला , खोलीच्या दरवाजाला आणि एका खिडकीला लावली आहे. ही टेप लावण्यास सोपी आहे. यामुळे बाहेरुन आत येणारी उष्ण हवा किंवा खोलीतून बाहेत जाणारी थंड हवा अडवली जाते त्यामुळे वातानुकूलन यंत्राचा उर्जा खर्च कमी होतो.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 06/15/2022 - 08:16 नवीन
स्तुत्य _/\_
  • Log in or register to post comments
न
निनाद Wed, 06/15/2022 - 01:41 नवीन
गणपती सारखे सणवार सुरू झाले की नियमित पणे पर्यावरणाची काळजी करणारे असले लेख येतात. त्याची सुरुवात या वर्षी जरा आधी झाली असे दिसते आहे. म्हणजे मागच्या वर्षी फार काही उपद्व्याप या खोट्या पर्यावरणावाद्यांना करता आले नव्हते. त्यामुळे या वर्षी धोरणात्मक काही बदल झाला यांच्या बापांच्या संस्थांमध्ये झाला असावा. तो बदल आता पाझरतो आहे लेखांच्या रुपात. हाच लेख इंग्रजी भाषेत इतरत्र कुठे आला आहे का ते पण तपासा म्हणजे यांची पाळेमुळे लक्षात येतील. हे सगळे पेन्सिल पुशर्स स्वतः काहीही करत नाहीत. फक्त तुमचे आयुष्य कसे वाईट होणार आहे. हा निराशावद मनात भरण्यात मात्र तत्पर असतात. ज्यांनी १० झाडे लाऊन दहाच्या दहा झाडे दहा वर्षे जगवली आहेत. अशा लोकांनाच लेख लिहायला परवानगी दिली, तर हाताच्या बोटावर मोजण्या इतके लेख या विषयावर येतील. एखादा जादेव पायेंग असतो - पण असा माणूस लेख वगैरे लिहित नाही - विषयावर काम करतो. बाकी या फालतू लेखांना फाट्यावर मारायला आता आम्ही शिकलो आहोत. काम करणारे लोक आम्हाला माहित आहेत.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 06/15/2022 - 07:35 नवीन
बाकी या फालतू लेखांना फाट्यावर मारायला आता आम्ही शिकलो आहोत
फालतू प्रतिसादांना फाट्यावर मारायचं मी आता शिकत आहे :)
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Wed, 06/15/2022 - 12:39 नवीन
निनाद यांचा प्रतिसाद लोकसत्तामध्ये आलेल्या लेखाला होता. तुम्ही का उडत्या बाणावर बस्ताय?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 06/15/2022 - 13:08 नवीन
तर्क वादी ह्यांचे विचार योग्य आहेत निनाद हे कोणत्या तरी विचाराचे गुलाम आहेत.त्यांना स्वतःचे एक पण मत नाहीं गुलामगिरी,त्यांच्या रक्तात आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 06/15/2022 - 13:18 नवीन
तर्क वादी ह्यांचे मत अगदी योग्य आहे निनाद म्हणून जो आयडी आहे त्या ला स्वतःचे काहीच मत नाही कोणाची तरी गुलामगिरी तो आयडी करत आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 06/15/2022 - 13:18 नवीन
तर्क वादी ह्यांचे मत अगदी योग्य आहे निनाद म्हणून जो आयडी आहे त्या ला स्वतःचे काहीच मत नाही कोणाची तरी गुलामगिरी तो आयडी करत आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 06/15/2022 - 13:30 नवीन
निनाद यांचा प्रतिसाद लोकसत्तामध्ये आलेल्या लेखाला होता. तुम्ही का उडत्या बाणावर बस्ताय?
ओके.. आता मुद्देसूद प्रतिवाद १)
गणपती सारखे सणवार सुरू झाले की नियमित पणे पर्यावरणाची काळजी करणारे असले लेख येतात. त्याची सुरुवात या वर्षी जरा आधी झाली असे दिसते आहे.
लोकसत्तातील लेखात कुठेही गणेशोत्सवाचा संदर्भ नव्हता. त्यामुळे धार्मिक बाबींशी संबंध जोडण्याचे कारण नव्हते. तसेच लेख प्रसिद्ध झाला त्याला निमित्त ५ जून च्या जागतिक पर्यावरण दिनाचे असू शकते. निनाद यांनी म्हंटल्याप्रमणे कुठेतरी इंग्लिशमध्ये अशा प्रकारचा लेख प्रसिद्ध झालाही असेल कदाचित पण त्यामुळे केवळ लेख बिनमहत्वाचा ठरत नाही. आणि तरीही लेखातील मुद्दे पटले नसल्यास त्याचे मुद्देसूदपणे खंडन केले जावू शकते. २)
हे सगळे पेन्सिल पुशर्स स्वतः काहीही करत नाहीत. फक्त तुमचे आयुष्य कसे वाईट होणार आहे. हा निराशावद मनात भरण्यात मात्र तत्पर असतात
सत्य परिस्थिती माहित करुन घेणे त्याबद्दलची माहिती इतरांना याला निराशावाद म्हणावे का ? उद्द्या माझ्या घराच्या छताला ओल लागलीये ही दिसून आले , पुढे अधिक गळती लागण्याची शक्यता निर्माण झाली तर मी निराशावद नको म्हणत त्याकडे दुर्लक्ष करावे की उपाययोजना चालू कराव्यात ?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Wed, 06/15/2022 - 13:42 नवीन
अगदी योग्य उत्तर १)पर्यावरण म्हणजे का २)निसर्ग चक्र म्हणजे काय ३)माणसाला जगण्यास सर्वात महत्वाच्या गोष्टी कोणत्या पैसा,हिरे,संपत्ती नाही ..ह्या सर्व फालतू गोष्टी आहेत ऑक्सिजन,शुध्द पाणी,अन्न, योग्य तापमान हे माणसाला जगण्यास अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत ,हे सर्व नसेल तर संपत्ती,पैसा, माणसाला एक मिनिट पण जिवंत ठेवू शकत नाही. पर्यावरण,निसर्ग त्याचे महत्व फक्त स्वतःची बुद्धी आहे,जो ह्या पृथ्वी वर प्रेम करतो आणि फालतू स्वार्थ ह्याच्या मनात नाही तोच मानव हे पर्यावरण,निसर्ग ह्याचे महत्व समजू शकतो .
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 06/15/2022 - 14:47 नवीन
आत्ता गणपती आहे, का हे संस्थळ लोकसत्ता आहे इथे हा प्रतिसाद द्यायला ?!
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 06/16/2022 - 01:33 नवीन
जाम हसलो! नेमके शब्द लिहिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 06/15/2022 - 03:02 नवीन
स्वसंरक्षण आणी पुनर्जीवन हे निसर्गाचे दोन मुख्य गुणधर्म आहेत व त्या नियमा प्रमाणे प्रकृती आपले स्वस्थ जपत आसते.ते जपत असताना कधी कधी टोकाची भूमीका घेऊ शकते.जसे सुनामी,वर्षातून वगैरे, त्यामुळेच जीवसृष्टीवर विपरीत परिणाम होतो. पूर्वजांनी हे ओळखून निसर्ग पुजा व धर्म ,सामाजिक चालीरीती यांची सांगड घातली आहे. उत्तर भारतात श्रावणात हरियाली तीज या सणाला वृक्षारोपण हा एक मोठा सोहळा आसतो. आसे मला वाटते.
  • Log in or register to post comments
स
साहना Wed, 06/15/2022 - 09:45 नवीन
> विनाशकारी जागतिक तापमानवाढीचे महा-अरिष्ट येऊ घातले आहे. औद्योगिक क्रांतीनंतर ‘विकासा’सोबत वाढत गेलेल्या कर्बवायू-उत्सर्जनामुळे भारतात आणि इतर काही ठिकाणी आता जागतिक तापमान एक अंश सेंटिग्रेडने वाढले आहे. ह्या विषयावर मी इथे आणि इतर ठिकाणी विपुल लेखन केले आहे. ह्या प्रकारचे अवाजवी भीती पसरवणारे लेखन आणि "तज्ञ" मते वारंवार माध्यमातून पसरवली जातात. मजेची गोष्ट म्हणजे हा बागुलबुवा फारच जुना म्हणजे किमान ४० वर्षे जुना आहे. ह्यांची बहुतेक भाकिते पूर्णपणे तोंडघशी पडली आहेत. ह्या आधी लोकसंख्या विस्फोट, ओझोन लेयर गायब होणे इत्यादी बागुलबुवे येऊन गेले. आता "तापमान वाढ" हा बागुलबुवा निर्माण झाला आहे आणि त्याच्या असून आधुनिक वसाहतवाद पसरवला जात आहे. पर्यावरण रक्षण, सर्व गोष्टी काटकसरीने वापरणे, कुठल्याही गोष्टीला वाया जाऊ न देणे, वृक्ष आणि प्राणिजगताशी चांगले संबंध ठेवून राहणे इत्यादी गोष्टी महत्वाच्या आहेत आणि तापमान बदल हो किंवा ना हो, आपण ह्या पृथ्वीवर जबाबदार पणे वागणे महत्वाचे आहे. पण त्याच वेळी कुणी तरी अतिशय टोकाची माहिती पसरवत असेल तर त्याच्याकडे संशयास्पद नजरेने पाहणे आवश्यक आहे. युक्रेन-रशियन युद्धांतून रशियाने कश्या प्रकारे युरोप मध्ये पर्यावरणवादी संघटनांना हाताशी धरून आपला अजेंडा पुढे रेटला हे आपण पहिले आहे. भारतांत सुद्धा चर्च तसेच शांतताप्रिय समाज ह्यांनी विविध ठिकाणी महत्वाच्या आणि काही ठिकाणी राष्ट्रीय सुरॆषेच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पना पर्यावरणाचा विषय घेऊन कसा खो घातला आहे हे सुद्धा आपण पहिले आहे. मेधा पाटकर किंवा पूर्वीं केजरीवाल ह्यांनी आपली राजकीय खेळी पर्यावरण संबंधित विषयांना हाताशी धरूनच केली. मेधा पाटकर ह्यांचे नर्मदा आंदोलन फुसके निघाले. श्री लंका हे एक ज्वलंत उदाहरण आहे. ऑर्गेनिक च्या नदी लागून देशांत खायचे वांधे झाले. अमेरिकेत प्रचंड प्रमाणात शेतजमीन हि इथेनॉल साठी लागणाऱ्या मक्याच्या निर्माणासाठी वापरली जाते. पेट्रोल मध्ये इथेनॉल टाकायची गरज नाही पण पर्यावरणाच्या नावाखाली कंपन्यांवर हि जबरदस्ती केली गेली. ह्यामुळे अन्नाचे भाव विनाकारण वाढले. आज युद्ध परिस्थितीत हीच जमीन अन्नासाठी वापरून इतर देशांना अन्नपुरवठा केला जाऊ शकला असता. हवेंतील कार्बन वाढल्याने फक्त वाईट गोष्टी होतात असे नाही चांगल्या गोष्टी सुद्धा होतात. त्यामुळे वृक्षांची वाढ वेगाने आणि चांगली होते. शेतीला फायदा होतो. फ्रीमन डायसन ह्या महाविद्वान भौतिकशास्त्रज्ञांचे विचार एका : https://www.youtube.com/watch?v=fmy0tXcNTPs
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Wed, 06/15/2022 - 10:04 नवीन
"तापमान वाढ" हा बागुलबुवा निर्माण झाला आहे
तापमान वाढ हा बागुलबुवा म्हणायचा तर बदलते पर्जन्यमान, वाढते पूर, भूस्खलन, हिमस्खलन , ढगफूटी वा त्या सदृश घटना, चक्रीवादळे हे आपण अनुभवले ते खोटे म्हणायचे का ? २०२१ मध्ये भारतातील जवळपास प्रत्येक राज्याला पुराचा फटका बसला आहे. २०१० पुर्वी इतके व्यापक प्रमाणात पूर येत होते का ? "तापमान वाढ" झालीच नाही असे आपणास म्हणायचे आहे की ? तापमान वाढीचे दुष्परिणाम फारसे नाहीत असे आपणास म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 06/17/2022 - 08:28 नवीन
बदल हा वातावरणात नेहमीच होत राहिला आहे. हे बदल नेहमीच मानवी हस्तक्षेपाने होतात असे नाही तर नैसर्गिक कारणांनी सुद्धा होऊ शकतात. तथाकथित तापमानवाढीने पूर, वादळे वगैरे जास्त होतात आणि हे वाईट आहे असे सांगितले जाते. तापमान वाढीने पाण्याचे बाष्पीभवन जास्त होते त्यामुळे पाऊस जास्त पडतो. आता हि गोष्ट वाईट आहे का ? तर हि गोष्ट चांगली असण्याची शक्यता जास्त आहे. जगांत बहुतेक ठिकांणी पाण्याची कमतरता आहे तिथे पाऊस जास्त पडणे हि चांगली गोष्ट आहे. हा बदल होणार असे गृहीत धरून आम्ही आमच्या शहरातींल पायाभूत सुविधा विकसित केल्या पाहिजेत नाही तर प्रत्येक वेळी मुंबईत गटारे तुंबली कि त्याचे खापर हवामान बदलावर फोडले जाते. ह्याच प्रमाणे वातावरण बदलणे जगांत ज्या विविध गोष्टी बदलत आहेत त्या फक्त "बदल" म्हणून पाहण्याची गरज आहे "संकट" म्हणून नाही. मानवासाठी आणि पृथ्वीसाठी हे बदल नवीन नाहीत. "बागुलबुवा" अश्यासाठी शब्प्रयोग केला आहे कि तथाकथित हवामान तञ् अत्यंत बिनडोक पणे statistics वापरत आहेत. दररोज ५ पाकिटे सिगारेट फुंकणाऱ्याला ऑरगॅनिक खा म्हणजे कँसर होणार नाही असे सांगून फायदा आहे का ? मानवजातीला अनेक संकटाना/बदलांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे हवामान बदलला "संकट" म्हणून पाहण्याआधी इतर सर्व संकटांचा आढावा घेतला पाहिजे. त्यांच्या तुलनेने हा तथाकथित हवामान बदल किती मोठा आहे हे पाहणे महत्वाचे आहे. उदाहरण म्हणजे अमेरिकेतील येलोस्टोन ज्वालामुखी. हा अगदी कधीही म्हणजे उद्यासुद्धा फुटू शकतो आणि तो फुटला तर अर्धी अमेरिका बेचिराख होईलच पण त्यातून उत्पन्न होणाऱ्या राखेने संपुन मानवजातीचे अस्तित्व धोक्यांत येईल. कोविडचेच उदाहरण पहा. काही कोटी लोक थेट ह्यांच्यामुळे मृत्युमुखी पडले तरी ह्याच्या आर्थिक परिणामांनी आणखीन कोट्यवधी लोक येत्या ३-५ वर्षांत मरणार आहेत. हवामान बदलाने १० दशलक्ष लोक बेहगर होतील आशय प्रकारची आवई उठवली जाते. तथाकथित हवामान बदलाच्या भयाने पाश्चात्य राष्ट्रांनी आपले तेल खनन कमी केले. त्याचा परिणाम म्हणून रशियाची मुजोरी वाढली आणि त्यामुळे युद्ध उध्दभवले. ह्या युद्धांत असंख्य लोक मारले गेले आहेत आणि कोट्यवधी लोक बेघर आधीच झाले आहेत. एका अर्थाने ह्याचे खापर तथाकथित पर्यावरण वादी मंडळींवर फोडायला नको का ? टीप : पर्यावरण रक्षणात आघाडीवर असणारी मंडळी उद लिओनार्दो, आलं गोर इत्यादी मंडळींनी आपले समुद्रकिनाऱ्यावरचे बंगले अजून तरी विकले नाहीत. टीप २: आधी लिहिल्या प्रमाणे पर्यावरणाचे रक्षण आवश्यक आहे आणि आम्ही सर्वानी आपल्या परीने सर्व प्रकारचे कष्ट घेतले पाहिजेत. पण तारतम्य पाहिजे आणि तोडकाच्या भूमिका पसरवणार्यांना संशयास्पद नजरेने पाहणे गरजेचे आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 06/17/2022 - 12:39 नवीन
म्हणजे तापमानवाढ होत आहे हे तुम्हाला मान्य आहे पण ते तितकेसे मोठे संकट नाही असे तुम्हाला वाटते. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.
पण तारतम्य पाहिजे आणि तोडकाच्या भूमिका पसरवणार्यांना संशयास्पद नजरेने पाहणे गरजेचे आहे.
तारतम्य पाहिजे याबद्दल सहमत पण कुणाला तरी संशयास्पद नजरेने बघण्याची गरज आहे का ? त्या ऐवजी केवळ न पटणार्‍या मुद्द्यांचे खंडन करणे जास्त योग्य ठरेल. मागच्या एका प्रतिसादात तुम्ही ओझोन लेयरचा उल्लेख केला. पण शास्त्रज्ञांनी वेळीच सावध केले आणि ओझोन लेयरला हानिकारक अशा रेफ्रिजरेंट वायूंचा (क्लोरो फ्लोरो कार्बन , हाय्ड्रो क्लोरो फ्लोरो कार्बन) उपयोग टप्प्याटप्प्याने कमी केला त्यामुळे धोका टळला.
ह्या युद्धांत असंख्य लोक मारले गेले आहेत आणि कोट्यवधी लोक बेघर आधीच झाले आहेत. एका अर्थाने ह्याचे खापर तथाकथित पर्यावरण वादी मंडळींवर फोडायला नको का ?
पण पर्यावरण्वाद्यांनी युद्ध करा असे सांगितले नव्हते ना. पर्यावरणवादी पर्यावरणाच्या दृष्टीने काय योग्य काय अयोग्य हे सुचवत राहतात. काय केल्याने भविष्यात काय घडू शकेल हे दाखवतात. पण योग्य प्रकारे निर्णय घेण्याचे काम सरकारांचेच आहे ना. आपला निर्णय अर्थिक , राजकीय परिप्रेक्ष्यातून तपासून घ्यायला हवे. सहपरिणामांचा विचार करुन अंमलबजावणी करायला हवी. बाकी पर्यावरण वाद्यांचा कोणत्याही युद्धाला पाठिंबा असूच शकत नाही.
मानवजातीला अनेक संकटाना/बदलांना तोंड द्यावे लागते, त्यामुळे हवामान बदलला "संकट" म्हणून पाहण्याआधी इतर सर्व संकटांचा आढावा घेतला पाहिजे. त्यांच्या तुलनेने हा तथाकथित हवामान बदल किती मोठा आहे हे पाहणे महत्वाचे आहे
. काही अंशी सहमत. हा ही एक बदल असेल आणि पृर्थ्वी त्याला सामोरी जाईल, तो निभावून नेईल, जीवसृष्टीही टिकेल. अल्पायुषी प्रजातींचे म्युटेशन्स वेगाने होवून , उत्क्रांती होवून त्या प्रजाती बदलाशी लवकर जुळवून घेवू शकतील. पण मानवासारख्या दीर्घायुषी प्रजातींत उत्क्रांती व्हायला मोठा अवधी लागेल तोपर्यंत मानवाचे जीवन जास्त सघर्षमय असेल. अर्थात मानवानेही यापुर्वी संघर्ष केला आहे. पण गेल्या काही पिढ्यांत भौतिक पातळीवरचा संघर्ष वेगाने कमी होत गेला आहे. बहुसंख्य लोकांची खडतर आयुष्य जगण्याची सवय तुटली आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हा की जर आपण हे संकट प्रयत्नपुर्वक टाळू शकणार असू किंवा त्याची तीव्रता कमीत कमी ठेवणे आपल्याला शक्य होणार असेल तर त्या दृष्टीने विचार, नियोजन व कृती का करु नये ? उपाययोजना अगदीच शक्य नसल्यास एखाद्या संकटांचा जास्त विचार करण्यात अर्थ नाही पण उपाययोजना शक्य असूनही एखाद्या संकटाकडे दुर्लक्ष करणे अयोग्य होईल.
उदाहरण म्हणजे अमेरिकेतील येलोस्टोन ज्वालामुखी. हा अगदी कधीही म्हणजे उद्यासुद्धा फुटू शकतो आणि तो फुटला तर अर्धी अमेरिका बेचिराख होईलच पण त्यातून उत्पन्न होणाऱ्या राखेने संपुन मानवजातीचे अस्तित्व धोक्यांत येईल.
हे माहित नव्हते, याबद्दल अधिक माहिती घेतो. पण हा फुटण्याची शक्यता किती आहे ? तो लवकर फुटू नये किंवा फुटण्याची शक्यता कमीत कमी व्हावी म्हणून काही उपाययोजना शक्य आहेत काय ?
  • Log in or register to post comments
स
साहना Sat, 06/18/2022 - 05:25 नवीन
> पण पर्यावरण्वाद्यांनी युद्ध करा असे सांगितले नव्हते ना. पर्यावरणवादी लोकांच्या बागुलबुव्याने जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे युद्धाची शक्यता वाढली. माझा मुद्धा असा आहे कि प्रत्येक निर्णयाचे प्राथमिक परिणाम असतात तसेच दुय्यम पातळीवरचे परिणाम सुद्धा असतात. बहुतेक तद्न्य मंडळी फक्त प्राथमिक परिणाम काही अंशी पाहू शकतात पण दुय्यम स्तरावरचे परिणाम है त्यांच्या शक्तीच्या पलीकडले असतात. विनाकारण सौर, पवन ऊर्जेच्या मागे धावणे, जबरदस्तीने तेल वापर कमी करणे, नको तिथे टॅक्स वाढवणे, ESG हे प्रकार जे ह्या बागुलबुव्याने निर्माण झाले आहेत त्यामुळे असंख्य लोक आत्ताच काही वर्षांत मरणार आहेत. ओझोन लेयर चा बागुलबुवा खोटा होता. आम्ही बागुलबुवा निर्माण केला म्हणून संकट आले नाही असे हि मंडळी म्हणतील पण प्रत्यक्षांत संकट नव्हतेच, आणि ह्यांची भाकिते ऐकली असती तर ती एकदम पराकोटीची होती. ती अंशतः सुद्धा खरी ठरली नाहीत. मॉन्ट्रिअल मध्ये करार झाला तेंव्हाच ओझोन अचानक वाढू लागला, CFC च्या वापरत मोठे बदल येण्याच्या आधीच अचानक ओझोन वाढू लागला. त्याशिवाय ओझोन च्या कमतरतेमुळे पृथीववर जास्त UVB येतील हे सुद्धा भाकीत खोटे ठरले. पर्यावरण महत्वाचे आहे आणि त्यामुळे आम्ही त्याच्या रक्षणासाठी प्रयत्न केले पाहिजेत ह्या मुद्द्यावर आम्हा दोघींचे एकमत होईल. फक्त इतके मला म्हणायचे आहे कि हे तथाकथित तञ् जी भाकिते करत आहेत आणि जे तोडगे सुचवत आहेत ते बरोबर आहेत असे आपण गृहीत धरू शकत नाही. भारतांत असंख्य महिला लाकूड किंवा शेणी जाळून अन्न बनवायच्या. ह्यांना LNG (नैसर्गिक वायू) दिल्यास त्यांचे आरोग्य सुधारेल. त्याशिवाय हवामानातील एकूण CO२ कमी होईल. पण बहुतेक पर्यावरण वादी LNG किंवा केरोसीन वर जास्त कर किंवा एकदम बंदीची मागणी करत आहेत. कारण ह्या लोंकाना फक्त आपले प्राथमिक परिणाम दिसतात, मानवी समाज किती क्लिष्ट आहे आणि कुठल्या निर्णयाचे काय परिणाम होतील हे जाणून घेण्याची त्यांची (किंवा इतर कुणाची) कुवत नाही. अमेरिकेने एकीं २२% CO२ उत्सर्जन कमी केले. हे LNG मुळे साध्य झाले, सौर किंवा nuclear मुळे नाही. बहुतेक पर्यावरण वाद्यांना ह्याची अजिबात अपेक्षा नव्हती आणि ह्या मंडळींनी आधीपासून शेल गॅस, फ्रॅकिंग ह्याला कडाडून विरोध केला आहे. > हे माहित नव्हते, याबद्दल अधिक माहिती घेतो. पण हा फुटण्याची शक्यता किती आहे ? > तो लवकर फुटू नये किंवा फुटण्याची शक्यता कमीत कमी व्हावी म्हणून काही उपाययोजना शक्य आहेत काय ? काहीही करणे शक्य नाही. हा कधीही फुटू शकतो.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 06/17/2022 - 13:01 नवीन
पर्यावरण बदलाच्या बाबतीत माझे वैयक्तिक मत असेच असल्याने वरील प्रतिसादाशी सहमत. पृथ्वीच्या शेकडो कोटी वर्षांच्या वयात जे वातावरण आणि पर्यावरणात बदल झालेत, त्यात तीनशे वर्षांच्या मानवी हस्तक्षेपाने होणाऱ्या बदलांचा हिस्सा कणभरही नसेल. नदीचे प्रवाह बदलल्याने सिंधू संस्कृती विलुप्त झाली. (किंवा जे काही झालं असेल ते) त्यामुळे काही लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले. कदाचित ते नष्ट सुद्धा झाले असतील. त्यात तर काहीच मानवी हस्तक्षेप नव्हता. थोडक्यात मानवी हस्तक्षेपाशिवाय सुद्धा वातावरणीय आणि पर्यावरणीय बदल होत असतात. आपण निसर्गाचं फार काही वाटोळं करतोय अशातला भाग नाही. याचं अजून एक उदाहरण : गणपती मूर्ती. आकडे अंदाजे आहेत, पण लॉजिक (पन इंटेंडेड) समजण्यासाठी पुरेसे आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मिळून लोकसंख्या चाळीस लाखाच्या आसपास. कुटुंबे आठ लाख. मराठी हिंदू पाच लाख. तीन लाख घरात गणपती मूर्ती आणतात असं गृहीत धरू. एका मूर्तीचं सरासरी वजन तीन किलो. एकूण मूर्ती वजन नऊ लाख किलो. पूर्णांक दहा लाख किलो. एक हजार टन. पन्नास ट्रक भरून माती. याच्या कित्येक पट माती आणि गाळ मुळा मुठा , पवना आणि इंद्रायणी नद्या जुलै ऑगस्ट मध्ये रोज वाहून नेतात. दुसरी एक गोष्ट. माणूस आणि निसर्ग असं नेहमी द्वैत केलं जातं. माणूस हा निसर्गाचाच भाग आहे, हे विसरतात लोक. समजा एखाद्या माकडाच्या, वाघाच्या, कोंबडीच्या, गोगलगायीच्या चुकीने अमेझॉन जंगल जळून नष्ट झाले आणि त्यामुळे पृथ्वीच्या पर्यावरणावर (मानवासाठी) प्रतिकूल परिणाम झाला, तर ....? किंवा या सगळ्या प्राण्यांच्या वागण्यामुळे निसर्गावर जो (मानवासाठी प्रतिकूल) परिणाम होतो त्याचा विचार कोणत्या पर्यावरणीय अभ्यासात केला जातो? कार्बन उत्सर्जनामुळे (कदाचित) तापमान वाढून समुद्र पातळी वाढल्याने अनेक लोकांना कदाचित विस्थापित व्हावे लागेल. पण उत्सर्जन कमी करताना भारतातील इंधन वापरावर बंधने आल्याने कोट्यवधी लोकांच्या जीवनमानावर प्रतिकूल परिणाम होईल त्याचं काय?
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Fri, 06/17/2022 - 14:35 नवीन
मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणात फार मोठे बदल घडून येवू शकत नाही असे वाटत असल्यास अरल समुद्राचे उदाहरण बघा. १९६० च्या दशकामध्ये सोव्हिएत संघाने अरल समुद्राला मिळणाऱ्या अनेक नद्या सिंचनासाठी इतरत्र वळवल्या. ह्या कारणास्तव एकेकाळी जगातील सर्वात मोठ्या सरोवरांपैकी एक असणारा अरल समुद्र घटत चालला आहे. २००७ सालाअखेरीस ह्या सरोवराच्या मूळ आकाराच्या केवळ १० टक्केच पाणी अस्तित्वात आहे. ह्यामुळे येथील मच्छीमारी व्यवसाय पूर्णपणे उध्वस्त झाला आहे याचे परिणामः या समुद्राच्या आसपासचे वातावरण बदलले,. उन्हाळा कडक आणि हिवाळा अतिथंड बनला.. समुद्राची जमीन जी आता कोरडी आहे, ती खारट बनली आहे. वारे वाहताना आपल्याबरोबर येथील मीठयुक्त रेती घेऊन जातात. ही रेती शेजारील मोठ्या जमिनींवर पसरत जाऊन जमिनी क्षारयुक्त बनल्या आहेत. त्यामुळे शेतीचे उत्पन्‍न घटत आहे व त्याचा दर्जा घसरत आहे. शेतकरी (अज्ञानापोटी आणि दीर्घदृष्टीने विचार न करता) क्षाराचा परिणाम कमी करण्यासाठी शेताला जास्त पाणी देताहेत. त्यामुळे शेते अजूनच खारट बनत आहेत. श्वासावाटे क्षार शरीरात गेल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (संदर्भ)
  • Log in or register to post comments
आ
आग्या१९९० Fri, 06/17/2022 - 15:04 नवीन
नदीजोड प्रकल्प हे पण हवामान बदलाला कारणीभूत आहेत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sat, 06/18/2022 - 16:02 नवीन
सिंधू संस्कृतीचे उदाहरण पाहा. सिंधू संस्कृती विलुप्त झाली ती नदीचा प्रवाह बदलल्याने. तिथे कोणताही मानवी हस्तक्षेप नव्हता. (किंवा नसावा. Conspiracy theory वाल्यांकडे त्याचीही एखादी गोष्ट असेल). सहारा वाळवंटाचे उदाहरण पाहा. आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट काही हजार वर्षांपूर्वीपर्यंत आताच्या तुलनेत जास्त ओलावा असलेले क्षेत्र होते. सहारा वाळवंटाच्या उत्तरेस असलेल्या अल्जीरिया देशाच्या दक्षिणेतील प्रदेशात, जो सहाराच्या अंतर्गत भागात येतो, तिथे काही भित्तीचित्रांत मगरी आहेत. त्याशिवाय काही dinosaurs चे जीवाश्म वाळवंटात सापडले आहेत. म्हणजे कोट्यवधी वर्षांपासून ते काही हजार वर्षांपूर्वीपर्यंत त्या प्रदेशात पुरेसा पाऊस व्हायचा. जमिनीवर वनस्पती होत्या. मानवी हस्तक्षेपाशिवाय आज तिथे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. पृथ्वीवर सुरुवातीला वातावरणात ऑक्सिजन नव्हता म्हणे. तेव्हा जे काही जीव होते ते मिथेन, नायट्रोजन वापरून जगायचे. मग कोठून तरी काही जीव आले, जे दणादण ऑक्सिजन निर्माण करू लागले. त्यांनी इतका ऑक्सिजन निर्माण केला की तोपर्यंत अस्तित्वात असलेले जीव तितका ऑक्सिजन सहन करू शकले नाहीत. त्यांच्याकरता तो विषारी वायू होता. पण त्यातूनच पुढे उत्क्रांती मार्गे आपण आता आहोत तिथे पोहचलो आहोत. अजून एक वाचलं आहे. आता संदर्भ उपलब्ध नाही, पण स्रोत विश्वसनीय होता. एखाद्या शहराच्या मध्यभागी हवेत जितका ऑक्सिजन असतो आणि अमेझॉनच्या जंगलात मध्यभागी दिवसा जितका ऑक्सिजन असतो, त्यात काही ppm (दहा लाख भागात काही कण) इतका फरक असतो. पृथ्वीवर मागील ४२० कोटी वर्षात आलेली सर्वात मोठी संकटे मानवी हस्तक्षेपाशिवाय आली आहेत. तरी पृथ्वी तिथेच आहे, वातावरण तिथेच आहे, पर्यावरण तिथेच आहे आणि जीवसृष्टी तिथेच आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Sat, 06/18/2022 - 19:49 नवीन
पृथ्वीवर मागील ४२० कोटी वर्षात आलेली सर्वात मोठी संकटे मानवी हस्तक्षेपाशिवाय आली आहेत
मानवी हस्तक्षेपामुळे नवीन संकटे येण्याचा वेग वाढतो आहे. आणि ही संकटे सहन करणे मानवालाच कठीण जाईल हे पण महत्वाचे
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 06/16/2022 - 01:40 नवीन
ह्यांची बहुतेक भाकिते पूर्णपणे तोंडघशी पडली आहेत. ह्या आधी लोकसंख्या विस्फोट, ओझोन लेयर गायब होणे इत्यादी बागुलबुवे येऊन गेले. आता "तापमान वाढ" हा बागुलबुवा निर्माण झाला आहे आणि त्याच्या असून आधुनिक वसाहतवाद पसरवला जात आहे.
अतिशय टोकाची माहिती पसरवत असेल तर त्याच्याकडे संशयास्पद नजरेने पाहणे आवश्यक आहे. हेच सत्य दाखवले की समर्थक लोक अचानक आंधळेच होऊन जातात असा अनुभव आहे. :) मग हे लोक अनेकदा अंगावर पण धावून येतात. किंवा हे फोल आहे मिथ्या आहे. पर्यावरणवादी संघटनांना हाताशी धरून वेगळाच अजेंडा पुढे रेटला जातो हे दाखवून देणाराच 'डिस्क्रेडिट' करण्याचे प्रयत्न होतात. त्यांच्यावर वैयक्तिक हल्ले सुरू केले जातात. वर प्रतिसादात हे सहजतेने दिसून येते आहे.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा