Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

करोनाचा बागुलबुवा

आ
आशु जोग
Mon, 05/16/2022 - 12:47
🗣 147 प्रतिसाद
सुरुवातीला नरेंद्र मोदी दूरदर्शनवरून करोनाबाबत बोलले. टाळ्या वाजवून आणि दिवे लावून त्यांनी करोनासाठी काम करणाऱ्यांचे अभिनंदन करावयास सांगितले. प्रत्येक ठिकाणी मास्क घातलेली त्यांची छबी झळकायला लागली. अगदी मन की बात मधे माईक समोर सुद्धा ते तोंडावर मास्क घालू लागले. स्वतः पंतप्रधानच सांगत असल्यामुळे जनतेनेही करोनाचा धसका घेतला आणि करोनाचा बागुलबुवा उभा राहिला. करोनाच्या उपचारासाठी हॉस्पिटलात दाखल झालेल्यांच्या बातम्या माध्यमांमधे झळकू लागल्या. त्यांचा दिनक्रमही दाखवला जाऊ लागला. हॉस्पिटलमधून बाहेर आल्यावर हे लोक स्वतःला करोना-योद्धे म्हणवत करोना डायरीज लिहू लागले. करोनापासून वाचण्यासाठी लस कंपल्सरी झाली. सरकार कितीही नाही म्हटले तरी लस नसेल तर अनेक ठिकाणी अडवणूक व्हायला लागली. त्यामुळे मनात नसताना अनेकांना लस घ्यावी लागली. मूळात रोग खरा आहे का याचा पत्ता नाही आणि इथे उपचारांची सक्ती सुरू झाली होती. पण यामधे अनेक लोकांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता आणि उभ्या केलेल्या करोनाच्या बागुलबुवाला न जुमानता करोनाची लस अजिबात घेतली नाही. बातमी पहा आणि आता स्वतः केंद्र सरकार न्यायालयामधे सांगते की लस सक्तीची नाही आणि लसवाल्या कंपन्यांना न्यायालय सांगते की आधी तुमच्या लसीचे कुणाकुणावर दुष्परिणाम झालेले आहेत त्याची आकडेवारी आणून द्या आणि लस निर्मात्या कंपन्या म्हणतात आम्ही अशी आकडेवारी देणार नाही अशी आकडेवारी दिली तर आमच्या लशीच्या खपावर परिणाम होईल. आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीमधे एक डॉक्टर प्रामाणिकपणाने सांगतात, हा रोग काय आहे ते आम्हाला समजलेले नाही. जगभरात सगळीकडे चाचपडतच उपचार सुरू आहेत. असे असताना उच्चशिक्षित डॉक्टर्स मात्र करोनाबाबत छातीठोकपणे बोलताना आणि करोनाची भीती आणखीन वाढवताना दिसतात. प्रश्न पडतो हे डॉक्टर्स या गोष्टी मुद्दामून करीत असतात की सामान्य माणसांप्रमाणेच तेही अनभिज्ञ असतात ?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 32981 views

🗣 चर्चा (147)
स
सुबोध खरे Mon, 05/30/2022 - 16:35 नवीन
कचरे बुवा औषध आणि सौंदर्य प्रसाधने यांच्या बद्दल माहिती देण्यासाठी असणारे कायदे, त्यांच्या घटकांच्या शरीरावर होणाऱ्या परिणामाच्या चाचण्या कशा करायच्या आणि त्या उत्पादन विपणन या वर कोणती नियंत्रणे असावीत याबद्दल चे कायदे आणि त्यावर लावला जाणारा कर ( ५% आणि २८ % वसेक /GST) हे वेगळे आहेत. एकदा हि माहिती करून घातली असती तर फायझरची लस आणि फेअर अँड लव्हली सारखे गोरे करणारे सौंदर्य प्रसाधन याची तुलना केली नसतीत
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/31/2022 - 09:31 नवीन
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://api.nationalgeographic.com/distribution/public/amp/science/article/a-rare-black-fungus-is-infecting-many-of-indias-covid-19-patientswhy&ved=2ahUKEwiM4euhmon4AhXk7TgGHYbiBLMQFnoECAsQAQ&usg=AOvVaw3W4N0TBtCuhxcU_Ggc6y5k काळी बुरशी निर्माण होणें हा अत्यंत दुर्मिळ आजार covid काळात मोठ्या प्रमाणात वाढला. अनेक लोकांना डोळे गमवावे लागले,जबड्यात दोष निर्माण झाला .आणि मृत्यू पण झाले. पण हा अतिशय दुर्मिळ आजार covid काळात भारतात का वाढला ह्या वर कोणीच चर्चा करणार नाही. डॉक्टर,संशोधक,सरकारी अधिकारी चुकून पण एक शब्द पण बोलणार नाहीत. मीडिया तर काळी बुरशी मधील( का ) हा शब्द पण वापरायला कच घाईल. Covid वर उपचार करताना स्टरोईड चा अतिरिक्त वापर ह्या मुळे हा काळी बुरशी हा दुर्मिळ आजार भारतात वाढला असे निष्कर्ष आहेत. बाकी कारणे पण आहेत च. पण कोणी चुकून पण काही बोलणार नाही ह्या विषयात. वर लिंक दिली आहे. वाचण्याची तसदी घ्यावी.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/31/2022 - 09:42 नवीन
ब्लॅक फंगस भारतात त्याच वेळी कसा आला. हे तुमचे अगोदरचे वाक्य काहीही माहिती न घेता टंकलेलं त्यावर मी प्रतिसाद दिला होता ब्लॅक फंगस अनादी काला पासून भारतात आहे सर्वत्र पसरलेली आहे. तुमच्या पावावर किंवा मुरंब्यावर येणारी बुरशी आहे ती. आणि आता पण हा अतिशय दुर्मिळ आजार covid काळात भारतात का वाढला ह्या वर कोणीच चर्चा करणार नाही. डॉक्टर,संशोधक,सरकारी अधिकारी चुकून पण एक शब्द पण बोलणार नाहीत. हे भंपक वाक्य टंकलंय
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/31/2022 - 09:59 नवीन
ब्लॅक fungus चे इन्फेक्शन माणसात होणे ही दुर्मिळ घटना covid काळात भारतात का घडली ... ह्याची कारणे काय Steroid च प्रमाण बाहेर covid उपचार साठी वापर हे एक कारण आहेच.(वर नॅशनल geography ची लिंक दिली आहे) दूषित ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलिंडर हे दुसरे कारण आहे अजून काय कारणे आहेत... आणि ह्याची जबाबदारी कोण घेणार
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/31/2022 - 09:59 नवीन
ब्लॅक fungus चे इन्फेक्शन माणसात होणे ही दुर्मिळ घटना covid काळात भारतात का घडली ... ह्याची कारणे काय Steroid च प्रमाण बाहेर covid उपचार साठी वापर हे एक कारण आहेच.(वर नॅशनल geography ची लिंक दिली आहे) दूषित ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलिंडर हे दुसरे कारण आहे अजून काय कारणे आहेत... आणि ह्याची जबाबदारी कोण घेणार
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/31/2022 - 10:34 नवीन
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.washingtonpost.com/world/2021/05/11/india-covid-black-fungus/&ved=2ahUKEwjSvemJqIn4AhXa7DgGHY3EBYgQFnoECAsQAQ&usg=AOvVaw3kxXTw9Ee0Fcz-XQK_OoFM पूर्ण जग covid काळात ब्लॅक fungus ह्या बुरशीचे माणसाला का इन्फेक्शन झाले ह्याची कारणे समजून घेत आहेत.चुका मान्य करत आहेत. पण भारतीय फक्त अहंकार प्रचंड असल्या मुळे ह्या विषयावर शब्द पण बोलत नाहीत. अजब देशाची गजब कहाणी.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 05/31/2022 - 13:22 नवीन
sunil kachure, विपरीत उपचार केल्याने मृतांची संख्या वाढली याच्याशी सहमत आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/31/2022 - 15:18 नवीन
पण भारतीय फक्त अहंकार प्रचंड असल्या मुळे ह्या विषयावर शब्द पण बोलत नाहीत. आपण कुठेही काहीही न वाचता केवल टंकन करताय म्हणून भारतीय डॉक्टर कुठे आणि किती याबद्दल चर्चा करतात याबद्दल आपल्याला काहीही माहिती नाही. म्हणून हे भंपक वाक्य टंकलंय. उचलला हात आणि बडवला कळफलक
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 05/31/2022 - 13:27 नवीन
लोकहो, स्पेनमध्ये लशीकरणाची खोटी प्रमाणपत्रे देणारे घपलाजाळे पकडले. उच्चभ्रू लोकांना खरी लस टोचून घायची नाहीच्चे मुळी. का ते मी सांगायला हवंच का? संबंधित बातमी ( इंग्रजी दुवे ) : १. https://libertyrising.substack.com/p/over-2000-high-profile-spanish-paid २. https://www.euronews.com/2022/01/25/spain-arrests-seven-suspects-for-selling-fake-covid-certificates-in-eu हज्जारो युरो खर्च करून खोटी प्रमाणपत्रे मिळवायला पैसेवाले मूर्ख आहेत का ? गूगळण्यासाठी : https://www.google.co.uk/search?q=%22operation+jenner%22+spain आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Tue, 05/31/2022 - 23:11 नवीन
हज्जारो युरो खर्च करून खोटी प्रमाणपत्रे मिळवायला पैसेवाले मूर्ख आहेत का ?
पैसेवाले ( उदा. टॉम क्रूज ) अत्यंत निर्बुद्ध गोष्टींच्या (उदा. चर्च ऑफ सायंटॉलॉजी ) मागे लागतात हा काय शहाणपणा असतो का? लशीने जीवनमरणाची सीमा कशी अधोरेखित होते हे मी माझ्या काकांच्या कोविड निधनाने आणि काकूंच्या वाचण्याने फार जवळून पाहिले आहे. कितीही तर्क लढवले तरी, अगदी लस हा प्लासिबो उपचार असून प्लासिबो म्हणूनच जीवनदायिनी आहे असे जरी १०० टक्के सिद्ध झाले तरी मी तिचे महत्त्व अजिबात अमान्य करणार नाही. सर सलामत तो लशी पचास म्हणून लशीही पचवू. आपला विनीत, हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 06/11/2022 - 10:42 नवीन
हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर, तुम्ही म्हणता तसं त्यांना आपण महामूर्ख समजून चालू. त्या यादीत फार्मा-मार या स्पेनमधल्या औषध आस्थापनाचा अध्यक्ष ( फार्मा कंपनीचा प्रेसिडेंट ) आहे. त्याचं नाव जोस मरिया फर्नांदेझ सूसा-फारो. औषध आस्थापनाच्या अध्यक्षाचा औषधावर विश्वास नाही आणि लोकांना टोचायला निघालेत. जोस मरिया फर्नांदेझ सूसा-फारो किती नावाजलेला आहे ते इथे वाचायला मिळेल ( इंग्रजी लेख ) : https://247newsaroundtheworld.com/trending/was-dr-sousa-faro-arrested-for-fake-vaccination-charges/ आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 05/31/2022 - 13:49 नवीन
https://www.sciencealert.com/hypothetical-question-reveals-most-doctors-would-still-give-unnecessary-antibiotics काय अपेक्षा ठेवणार
  • Log in or register to post comments
आ
आशु जोग गुरुवार, 06/02/2022 - 21:25 नवीन
गामा पैलवान आणि दिलीप बिरुटे यांचे प्रतिसाद आवडले. बाकी थोतांड असलेल्या रोगाची अंधश्रद्धा जपण्याचा सध्याचे डॉक्टर लोक किती प्रयत्न करीत असतात ते आता दिसते आहे. डॉक्टरां इतके रोगावर कुणाचे प्रेम असणार ?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 06/03/2022 - 06:06 नवीन
थोतांडाच्या केसेस मुंबईमध्ये वाढत आहेत. बहुतेक रात्री कुलूप फोडून डॉक्टर आत घुसत असणार आणि रात्रीतून लोकांवर औषधांचा भडिमार करत असणार, म्हणजे दुसऱ्या दिवशी पॉझिटिव्ह येणार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 06/03/2022 - 15:33 नवीन
कुठे लोकांशी वितंडवाद घालत बसताय? People will always believe what they want to believe. This is due to the fact that people wish to create their own truths; anything but the truth that's real. My creed is simple: Let them! Their beliefs don't alter your truth. Moreover, your attempt at altering them won't do any good for you.”
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 06/04/2022 - 08:17 नवीन
कॉमी, अंगात करोना सापडलेले लोकं करोनाचे रुग्ण खरोखरीच आहेत का? क्लिनिकल इन्फेक्शन म्हणजे काय? आणि ते पी.सी.आर तंत्राच्या सहाय्याने कसं निश्चित करता येतं? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sun, 06/05/2022 - 09:05 नवीन
परत मास्क लावा म्हणताय मामु. काय समजेना .. कंपाउंडर चे ऐकावे का मामु चे?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Sun, 06/05/2022 - 09:33 नवीन
मुख्यमंत्री साहेबांची सूचना पाळणे हे तुमचे कर्तव्य च आहेत.संजय साहेब राज्य सरकार चे निर्णय सांगत अस्तात त्यांचे पण ऐकावे लागेल. महाराष्ट्र मध्ये आता वास्तव्य करत नसाल तर इतक्या विषयात लक्ष देवू नये .
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sun, 06/05/2022 - 11:03 नवीन
साहेब, मी महाराष्ट्रात राहतो की नाही हा मुद्दा गैरलागु आहे. मामु म्हणतात मास्क लावा .. तुम्ही म्हणतात मामु जे बोलतात ते करा. आता हा तुमचा प्रतीसाद बघा .. यात तुम्ही म्हणता आहात की कितीही काळजी घ्या हा रोग होणार. तसेच निष्काळजी लोकांपेक्षा जास्त काळजी घेणारे च जास्त covid चे बळी ठरले आहेत. मग मी काळजी घेउन का आजारी पडु? (http://misalpav.com/comment/1141360#comment-1141360) आता मामु म्हणतात काळजी घ्या .. तुम्ही म्हणता काळजी घेउ नका .. मग कोण खरे बॉ? एकतर मामु खोटे बोलत आहेत किंवा तुम्ही .. काय करावे ब्र? आडाण्याला मार्गदर्शन करावे .. उपकार होतील.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 06/05/2022 - 10:38 नवीन
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 06/05/2022 - 10:38 नवीन
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 06/05/2022 - 10:39 नवीन
हाहाहा, तोंडास डायपर लावून आत्तापर्यंत कोणता रोग बरा झाला आहे? की कुठली साथ आटोक्यात आलीये? &‌#129318;&‌#8205;&‌#9794; -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Sun, 06/05/2022 - 11:05 नवीन
गा मा .. डायपर ?? जरा अती होतय. (तुमच्याशी प्रतीवाद करुन फायदा नाही .. भले भले थकले. तेव्हा माझा पास)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 06/05/2022 - 15:20 नवीन
सुक्या, मी नाही हो, लोकंच असं म्हणताहेत : https://www.google.co.uk/search?q=%22face+diapers%22 बाळाला कसा डायपर घालतात, तसा सरकारला जनतामुखास लंगोट नेसवायचाय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 06/05/2022 - 16:30 नवीन
हे अमेरिकन पण काय काय धंदे शोढून काढतील... हा टीशर्ट २३ डॉलरात विकला जातो आहे (म्हणे) खखोदेजा. Image removed. आणि खानावळीवर बोर्ड लावले जात आहेत (म्हणे) Image removed.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Mon, 06/13/2022 - 15:14 नवीन
>> तुमच्याशी प्रतीवाद करुन फायदा नाही .. भले भले थकले. तेव्हा माझा पास थकले नाही हो, कॉमन सेन्स नसणार्यांशी कोण प्रतीवाद करत बसणार ? बाकी गामा आणि त्यांच्या प्रश्नांवरुन मला जुदाई मधला परेश रावल आठवला!
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 06/14/2022 - 00:54 नवीन
गामा ज्याचा आधार देउन "फेस डायपर" वगेरे बोलत आहेत ... ते फ्लोरिडा मधले एक हॉटेल आहे. तेव्ह्डे एकच. जौ दे. आपण का भुगा करायचा डोक्याचा!! बाकी परेश रावल - चे प्रश्न म्हणजे खरच नमुने होते . . . ... :-)
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 06/15/2022 - 13:40 नवीन
सुक्या, इथे उत्तर आयर्लंडाविषयी ब्रिटीश सरकारने एक अहवाल प्रकाशित केला आहे ( इंग्रजी दुवा ) : https://www.gov.uk/government/publications/education-recovery-in-early-years-providers-spring-2022/education-recovery-in-early-years-providers-spring-2022 वरील पानावर जाऊन कृपया Impact on children यावर सर्च मारणे. त्या परिच्छेदात करोना निर्बंधांचे ( टाळेबंदी, मुखलंगोट, इत्यादि) अर्भक व लहान मुलांवरील दुष्परिणाम नोंदवलेले आहेत. करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. लस हे भीक नको पण कुत्रं आवर असा थोतांडोपचार आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 06/15/2022 - 18:36 नवीन
करोना हे थोतांड आहे. टाळेबंदी हे महाथोतांड आहे. लस हे भीक नको पण कुत्रं आवर असा थोतांडोपचार आहे.
लगे रहो गापैभाई. असे एकदम वरीजनल - हटके - टोकाचे विचार करणारे, अभ्यास करणारे आणि त्यानुसार मते मांडणारे लोक समाजात असणे अत्यंत गरजेचे आणि समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आणि उपयोगी असते हे मानवी इतिहासात वारंवार दिसून आलेले आहे. मानवी संस्कृतीचा गाडा पुढे पुढे ओढून नेण्यात अशा व्यक्तींचाही मोलाचा वाटा असतो. तस्मात लगे रहो आणि आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेचा अविष्कार करत नवनवे विचार मांडते रहो. 'थोतांडोपचार' हा शब्द प्रचंड आवडल्या गेला आहे.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 06/15/2022 - 18:59 नवीन
आता तुम्ही गोल पोस्ट बदलताय !! आधी मास्क मुळे कुठलाही साथ रोग बरा झाला नाही .. सबब मुखपट्टी ची गरज नाही हा तुमचा मुद्दा होता. आता तुम्ही मुखपट्टी/टाळेबंदी मुळे लहान मुलांवर काय परीणाम झाला यावर आला आहात. नेहेमीचेच आहे ते, नवीन काही नाही. असो. मुद्याकडे येउ या. या कोरोना च्या साथीमुळे जगात अगदी सगळीकडे सोशल / ईमोशनल / शैक्षणीक बाबतीत प्रभाव पडला आहे हे खरे आहे. ह्युमन इंटर्‍याक्षन मुलांच्या बाबतीत अगदी गरजेचे आहे हे नक्की. पण शैक्षणीक नुकसान जरा जास्त झाले आहे. तरी बर्‍याच ठीकानी (यात भारत ही आला) ऑनलाईन क्लास घेतले गेले. यात शिक्षकांबरोबर पालकांचीही जबाब्दारी तितकीच होती. आपला पाल्य काय शिकतो आहे. त्याला समजते आहे की नाही हे पाहण्याची जबाब्दारी त्यांची पण होती. जगात लागलेल्या टाळेबंदी मुळे मुलांचे शैक्षणीक नुकसान झाले हे मात्र खरे आहे. दुसरा मुद्दा मुखपट्टी मुळे २ वर्षे वयाच्या मुलांवर झालेला परीणाम. खरे तर लोक मुखपट्टी बाहेर वापरत होते. घरात नाही. त्यामुळे मुले बोलताना त्यांना ओठांची हालचाल बघताच आली नाही हा मुद्दा गैर्लागु आहे. तो डे-केयर मधे जाणार्‍या मुलांच्या बाबतीत खरा जरी असला तरी मुले घरी आई - बापाला पाहुन / त्यांच्या शी बोलुन भाषा शिकतात हे ही तितकेच खरे आहे. बाकी लस / थोतांड यावर आपला पास.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Mon, 06/13/2022 - 13:38 नवीन
सुबोध खरे यांच्या प्रतिसाद करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे सत्य ही काही वर्षांत कबूल केले जाईल इतका धडधडीत असत्य मी गेल्या अनेक दिवसात मिपावर पाहिलेलं नाही यात सत्यापेक्षा पूर्वग्रह आणि एकांगी विचार कितीतरी जास्त आहे. साहेब तुम्ही गूगल सर्च करा किंवा त्या औषधींच्या साईट वर ही तपासू शकता. प्रोटोकॉल मधील औषधींचे वाईट परिणाम 1. शुगर वाढणे, 2. लीवर आणि किडनी वर वाईट परिणाम 4. हृदय गती आंनियंत्रित होणे. इत्यादि. त्यातले एक ही औषध करोंना विषाणू वर प्रभावी नव्हते हे विशेष. बाकी काही औषधे प्रोटोकॉल मधून बाहेर ही झाली. पण त्यांनी किती हजार कोटींचा धंधा केला हे ही माहिती असेल. मला खोटे म्हंटले तरी काही फरक पडत नाही. करोंना सोबत चुकीची औषधी दिली नसती तर मरण्याचे प्रमाण कमी झाले असते. जी औषधी डॉक्टरांना वाचवू शकत नव्हती ती रुग्णांना वाचवेल यावर विचार .... आपले आणि रुग्णांचे प्राण वाचविण्यासाहती अधिकान्श डॉक्टर या काळात काढा इत्यादि आयुर्वेदिक औषधी घेत होते आणि रुग्णांना ही देणे सुरू केले होते (प्रोटोकॉल मध्ये नसतानाही) यात दिल्लीतले अधिकान्श मोठी हॉस्पिटल्स होती. बाकी औषधी ही फक्त औषधी असतात. पैथी या आधारावर भेदभाव करणे मूर्खता असते. त्यामुळे आयएमए ह्या संस्थेवर ही प्रश्न चिन्ह आहेत.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 06/13/2022 - 15:06 नवीन
1. शुगर वाढणे, 2. लीवर आणि किडनी वर वाईट परिणाम 4. हृदय गती आंनियंत्रित होणे. इत्यादि. या सर्व गोष्टी करोनाच्या विषाणू चा थेट प्रभावामुळे होत असत हे हि डॉक्टरांना माहिती आहे. या शिवाय डेक्सामेथासोन या औषधामुळे सुद्धा रक्तातील साखर वाढते हे डॉक्टरांना माहिती आहेच परंतु डेक्सामेथासोन या औषधामुळे ३३% अधिक लोकांचे जीव वाचलेले आहेत हे अनेक चाचण्यांमध्ये सिद्ध झालेले आहे. बाकी रेम्डेसीव्हीर किंवा टॉसिलीझूमॅब हि औषधे बहुतांशी निरुपयोगीच ठरली यातही संशय नाही त्यात औषधी कंपन्यांनी भरपूर पैसा केला हेही सत्य आहे परंतु

करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य

आहे यात मुळी सुद्धा शंका नाही
  • Log in or register to post comments
स
सुक्या Tue, 06/14/2022 - 01:04 नवीन
ह्या सगळ्या बाबतीत आपली हर्ड मेंटॅलिटी कारणीभुत आहे. रेम्डेसीव्हीर किंवा टॉसिलीझूमॅब ही औषधे मला वाटते फक्त भारतात दिली जात होती. ईतर ठिकाणाची मला कल्पना नाही. किंवा त्या कंटेंट ची ईतर औषधे असावीत. पण भारतात अगदी आफाट प्रमाणात स्टेरॉईड्स वापरली गेली त्याचा खुप वाईट परिणाम झाला. तीच बाब व्हॅकसीन ची. सुरुवातीला कुणीच व्हॅकसीन घ्यायला तयार नव्हते. मग अचानक सगळे केंद्रावर गर्दी करु लागले .. मग आमदार / खासदार यांच्या चिठ्या घेउन लोग व्हॅकसीन शोधत बसले. काळ्या बाजारातुन व्हॅकसीन विकत घ्यायला लागले ... जशी लाट ओसरली तशी ही केंद्रे परत रिकामी झाली. आता पुन्हा केसेस वाढत आहेत .. काही दिवसांनी परत लोक बुस्टर घ्यायला विना मास्क गर्दी करतील .. मग परत सरकार च्या नावाने शिमगा .. की सरकार काहीच करत नाही ते ..
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/14/2022 - 08:45 नवीन
भारतात अगदी आफाट प्रमाणात स्टेरॉईड्स वापरली गेली त्याचा खुप वाईट परिणाम झाला. साथ ज्यावेळेस आपल्या शिखरावर होती त्यावेळेस एक टोकाचा उपाय म्हणून सर्व रुग्णांवर स्टिरॉइडचा वापर झाला हि वस्तुस्थिती. कारण डेक्सामेथासोन हे एकच औषध कोव्हीड मध्ये गुणकारी आहे हे सिद्ध झाले आहे. अनेक वेळेस रेमडेसीव्हिर देऊन फायदा होत नाही हे डॉक्टरांना माहिती होते तरी रुग्णांच्या दबावाखाली ते दिले गेले. तसेच एक शेवटचा उपाय म्हणून डेक्सामेथासोन हेही दिले गेले आणि त्यामुळे निदान ३० % रुग्णा चे प्राण वाचले हि वस्तुस्थिती.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 06/15/2022 - 08:53 नवीन
सुबोध खरे डॉक्टर, या ३० % प्रमाणाचा काही स्रोत आहे का? बाकी, करोनावर उपचार म्हणून आयव्हरमेक्टिन या औषधाची चर्चा का होत नाही? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/15/2022 - 15:03 नवीन
जालावर भरपूर स्रोत आहेत
  • Log in or register to post comments
अ
असंका Tue, 06/14/2022 - 06:14 नवीन
डॉ. साहेब आपल्या चिकाटीला एक सलाम केल्याशिवाय आता रहावत नाही. "सलाम आपल्या चिकाटीला _/\_ "
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 06/14/2022 - 09:31 नवीन
कारोना व्हायरस नवीन आहे .त्या बाबत काही माहीत नाही. जणू पृथ्वी ची निर्मिती झाल्या नंतर करोडो वर्षांनी 2020 मध्येच जा व्हायरस पृथ्वी वर अस्तित्वात आला. Corona virus नवीन आहे ,ओळखीचा नाही असे छाती बडवून जग भरात सर्व डॉक्टर आणि संशोधक सांगत होते. Dr हा घटक आरोग्य विभागात सर्वात घालचा घटक आहे हे माझे मत परत इथे व्यक्त करतो. पण संशोधक पण नवीन आहे नवीन आहे हेच सांगत होते. आणि dr खरे दावा करत आहेत. Covid मुळे. किडनी ,लिव्हर, वर परिणाम होतो हे dr ना माहीत होते. Good जोक. व्हायरस नवीन आहे ह्या दव्यानंतर फक्त प्रयोग केले गेले आणि उपचार मुळेच लोक मेली. व्हायरस नी मेली नाहीत. ज्यांनी उपचार घेतले नाहीत ते वाचले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 06/14/2022 - 16:02 नवीन
कचरे बुवा आपला पगार किती? आपण बोलता किती? सार्स (SARS) किंवा मर्स(MERS) हे पण कोव्हीड सारखेच करोना जातीचेच विषाणू आहेत आणि त्यामुळे पण माणसांना रोग होऊन सार्स मुळे ७५० च्या वर माणसे मेलेली आहेत. https://en.wikipedia.org/wiki/Coronavirus https://en.wikipedia.org/wiki/2002%E2%80%932004_SARS_outbreak मर्स(MERS) हा उंटांना होणार रोग माणसात पसरला आणि मध्यपूर्वेत त्याची साथ आली होती https://www.who.int/health-topics/middle-east-respiratory-syndrome-coronavirus-mers#tab=tab_1 त्यामुळे करोना विषाणू शरीरावर कुठे परिणाम करतात याची थोडी फार माहिती डॉक्टरना होतीच. फक्त कॉव्हिडची साथ एखाद्या वावटळीसारखी आली त्यामुळे जगभरची आरोग्यव्यवस्था कोलमडली. बाकी तुम्हाला काही सांगणे हे पालथ्या घड्यावर नव्हे तर फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. कुठूनही टाका ते बाहेरच जाणार
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 06/14/2022 - 17:29 नवीन
हे पालथ्या घड्यावर नव्हे तर फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे. लॉल !
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 06/14/2022 - 17:56 नवीन
१)प्रतिसाद पहिला. किडनी,लिव्हर वर corona विषाणू परिणाम करतो हे dr ना माहीत होते. २)मी प्रतिवाद केल्यानंतर . प्रतिसाद २) मार्स ,sars मुळे dr ना covid मुळे किडनी आणि लिव्हर वर परिणाम होतो हे थोडेफार माहीत होते..इथे थोडेफार हा शब्द महत्वाचा आहे. आजुन कोणी प्रतिवाद केला तर dr ना covid मुळे किडनी आणि लिव्हर वर परिणाम होत असावा असा संशय होता. अशी पलटी खरे साहेब मारतील.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/15/2022 - 06:06 नवीन
हे पालथ्या घड्यावर नव्हे तर फुटबॉल वर पाणी टाकण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 06/16/2022 - 06:11 नवीन
करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य खरे साहेब करोंना वर उगाच दोष देण्यात अर्थ नाही. ही लिंक बघून खात्री करा Common Side Effects Anemia (low number of red blood cells) Fever Kidney damage Hypotension (low blood pressure) Nausea Vomiting Increased liver enzymes https://www.bing.com/search?q=side+effects+of+remdesivir&filters=dtbk:%22MCFkcl92MV9zaWRlX2VmZmVjdHMhZHJfdjFfc2lkZV9lZmZlY3RzIWJiZTQyNmFlLWIxYjMtN2MzMi1mZjE0LWRiNjRjZWE3Y2E1Mw%3d%3d%22&FORM=DEPNAV बाकी तुम्ही औषधांच्या साईट वर जाऊन खात्री करू शकतात. तुम्ही १०० असत्य म्हंटले तरी सत्य बदलणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 06/16/2022 - 06:41 नवीन
you get a skin rash that may include itchy, red, swollen, blistered or peeling skin you're wheezing you get tightness in the chest or throat you have trouble breathing or talking your mouth, face, lips, tongue or throat start swelling You could be having a serious allergic reaction and may need immediate treatment in hospital. https://www.nhs.uk/medicines/paracetamol-for-adults/ Paracetamol overdose is one of the leading causes of acute liver failure. https://britishlivertrust.org.uk/researchers-shed-new-light-paracetamol-causes-liver-damage/#:~:text=Paracetamol%20overdose%20is%20one%20of%20the%20leading%20causes%20of%20acute%20liver%20failure,-Posted%20on%3A%201st&text=Paracetamol%20overdose%20is%20one%20of%20the%20leading%20causes%20of%20liver,of%20poisoning%20has%20eluded%20them. आपण रोज घेत असलेल्या क्रोसीन किंवा पॅरासिटामॉल या औषधाचे आहेत जे औषध गरोदर पणात सुद्धा सुरक्षित समजले जाते म्हणून क्रोसीन मुळे रोगापेक्षा जास्त त्रास होतो म्हटल्यासारखे आहे. रेम डेसी व्हिरला साईड इफेक्टस आहेत म्हणून त्याने कोव्हीड रोगापेक्षा जास्त लोक मेले असे म्हणणे केवळ हास्यास्पद आहे.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Tue, 06/14/2022 - 09:45 नवीन
दलाल. मीडिया आणि बाकी बरेच. ह्यांनी बोंब नाही मारली तर 4th कथित corona लाट आली कधी आणि गेली कधी हे पण माहीत पडणार नाही. पण दलाल बेंबी च्या देटपासून बोंब ठोकणार . दलाली मिळाली पाहिजे ना.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 06/15/2022 - 08:56 नवीन
सुबोध खरे डॉक्टर,
करोंनापेक्षा औषधांनी बळी जास्त घेतले हे धडधडीत असत्य
त्याचं काय आहे की मृताच्या अंगात करोना सापडला तर तो ३० दिवसांनीही करोनाचा मृत्यू म्हणूनच धरायचा. भले क्लिनिकल इन्फेक्शन नसलं तरीही. मात्र करोनाची लस टोचून घेतल्यावर आठवड्यात मृत्यू झाला तरीही तो लशीमुळे झालेला मृत्यू धरायचा नाही. या दुटप्पी निकषांमुळे लसमृत्यू दडपले गेले आहेत आणि करोनामृत्यू फुगवले गेले आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 06/15/2022 - 15:06 नवीन
मी फक्त औषधांमुळे झालेले मृत्यू बद्दल लिहिलेलं आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा