Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

करोना : स्वलालधन्य जाहलो मी

ग
गामा पैलवान
गुरुवार, 05/05/2022 - 16:52
🗣 238 प्रतिसाद

महत्वाची सूचना: धागा लेखकाच्या मताशी आणि इतर प्रतिसादांशी मिपा व्यवस्थापन सहमत असेलच असे नाही. कोविड किंवा अन्य लस न घेणे हे हानिकारक ठरू शकते. या बाबतीत आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने निर्णय घ्यावेत. - मिपा व्यवस्थापन

लोकहो, करोनाची लस घेण्यासाठी कोणावरही सक्ती करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हंटलं आहे. कुठेतरी देर आहे, पण अंधेर नाही. गेले दोन-अडीच वर्षं मी जे बोंबलंत होतो त्यातलं बरचसं महत्त्वाचं अखेरीस न्यायालयाने मान्य केलं तर. संबंधित बातमी : https://www.lokmat.com/national/corona-vaccination-supreme-court-says-no-individual-can-be-forced-to-get-vaccinated-a732/ सदर बातमीतील ठळक खंड येणेप्रमाणे : १.
रोग टाळण्यासाठी निर्बंध लादू शकतात, परंतु लसीकरण करण्यास आणि कोणत्याही प्रकारचे विशेष औषध घेण्यास भाग पाडू शकत नाही.
हेच तर अस्मादिक म्हणंत होते की लशीची सक्ती हा नागरी स्वातंत्र्याचा संकोच आहे ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1065888#comment-1065888 ). २.
आपल्या निर्णयात न्यायालयाने केंद्र सरकारला देशातील नागरिक आणि डॉक्टरांशी बोलल्यानंतर एक अहवाल प्रकाशित करण्यास सांगितले आहे, ज्यामध्ये लसीचे परिणाम आणि प्रतिकूल परिणामांचे संशोधन सर्वेक्षण असावे. :
ऐच्चाघोव, मग मी काय वेगळं बोंबलंत होतो ? आणि हे सांगायला सर्वोच्च न्यायालय कशाला पाहिजे ? इतकी साधी बाब सरकारला आपणहून समजायला हवी ना ? पण सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? ( संदर्भ : https://www.misalpav.com/node/48514 धागा उडाला आहे ). ३.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात राज्य सरकारांना लस धोरणाबाबत सूचना करताना म्हटले आहे की, लसीच्या आवश्यकतेमुळे व्यक्तींवर लादलेले निर्बंध प्रमाणबद्ध आणि योग्य आहेत असे म्हणता येणार नाही.
हेच मी यापूर्वी म्हंटलं होतं की सरकारने संचारबंदी व टाळेबंदी घातल्या आहेत त्या नक्की कोणत्या तरतुदीखाली आहेत? यांना काही घटनात्मक आधार आहे का? ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066276#comment-1066276 ) असो. तर या यशाबद्दल मीच माझी पाठ थोपटून घेत आहे. कारण की शाबासकी द्यायला दुसरं कोणी येणार नाहीये. म्हणून मीच माझी लाल करून घेतो. अशा रीतीने मी स्वलालधन्य जाहलो आहे. आता एकेकाची एकेक भाष्ये पाहूया. १.
करोनाचे थोतांड प्रमाणाबाहेर फुगवल्याने जगभरातल्या आरोग्यसेवांवर अपरिमित ताण आला आहे. : https://www.misalpav.com/comment/1070817#comment-1070817
नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी करोनाच्या बळींची संख्या फुगवून सांगणे अयोग्य असल्याचे विधान केले आहे. दुवा : https://tittlepress.com/covid19/1719836/ श्री. पॉल यांनी याबाबतीत लान्सेट या नामवंत प्रकाशनास दोष दिला आहे. च्यायला, हेच तर मी पण बोंबलतोय. मुडद्यावर करोनाचा छाप मारायला काय अक्कल लागते? शेवटी कोणीतरी ऐकलं तर. २.
टाळेबंदी हा उपाय नाही. विशेषत: धडधाकट माणसांना घरात डांबल्याने कसलाही फायदा नाही. : https://www.misalpav.com/comment/1065945#comment-1065945
हेच तर न्यायालयाने सांगितलं आहे. मी जे दोन वर्षांपूर्वी घसा फोडून ओरडाआरडा करीत होतो, तो आता न्यायालयाने ऐकला. यावरनं मी द्रष्टा महापुरुष आहे हे सिद्ध होतं. ३.
करोना हा रोगप्रवण लोकांसाठी घातक आहे. म्हणून रुग्णालयातल्या खाटा रोगप्रवण लोकांसाठी मोकळ्या हव्यात. मात्र परिस्थिती नेमकी उलट होती. रुग्णालयांत खोट्या रुग्णांची सरसकट खोगीरभरती होत होती. तिचे दुष्परिणाम इथे आहेत : https://www.misalpav.com/comment/1074745#comment-1074745
रुग्णालयांचा अनुचित वापर टाळण्यासाठी शासनाने एक समिती गठित करावी असा सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वर उद्धृत केलेलाच आहे. असंख्य निरर्थक बळी घेतल्यावर कुणालातरी ही अक्कल सुचली आहे. त्याबद्दल कुणाचंतरी अभिनंदन. ४.
माझ्यासारख्या बुद्धीभेदी लोकांमुळे करोनाच्या थोतांडास वाचा फुटली. : https://www.misalpav.com/comment/1098413#comment-1098413
आता पुढील लक्ष्य करोनाच्या लशीचं थोतांड उघड करण्याचं आहे. असो. हा एका अर्थी सर्वसामान्य जनतेचा विजय आहे. अर्थात, त्यामुळे हुरळून न जाता आपण ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करूया. जितके आपण ईश्वराच्या जवळ असू तितकं आपलं संरक्षण सुकर होणार आहे. म्हणूनंच आपण अधिक जोमाने नामजप करूया. धन्यवाद ! आपला नम्र, -गामा पैलवान

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 78128 views

🗣 चर्चा (238)
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/05/2022 - 16:56 नवीन
च्यायला, शीर्षकात स्वलालधान्य झालंय. ते स्वलालधन्य हवं होतं. संपादक महाशय, कृपया हा बदल करणार का? धन्यवाद! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 05/08/2022 - 11:55 नवीन
नमस्कार संपादक महाशय. शीर्षक दुरुस्त केल्याबद्दल धन्यवाद. धान्यवाद नाही बरंका ! ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 05/05/2022 - 17:27 नवीन
आता पुढे काय? कुठे विसा वगैरे हवा असल्यास लशीची सक्ती होती. ज्यांना जायचं होतं त्यांनी घेयली.
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 05/05/2022 - 18:19 नवीन
लस घेण्यासाठी सक्ती केली होती हे मी कुठे वाचले नाही. लस घेणे सगळे ऐच्छीक होते. पण लस न घेतल्यांमुळे जर कुठे अडथळा येत असेल (पक्षी परदेश भ्रमण, कार्यालय, उपहार ग्रुह ई.) तर ते सर्वस्वी आपली जबाब्दारी होती. लोकडाउन नंतर जेव्हा आमच्या गावात उपहार ग्रुह पुन्हा सुरु झाले तेव्हा तिथे फक्त लसवंतांना प्रवेश होता. त्यावर काही व्यक्ती स्वातंत्र्याचा गळा घोटला वगेरे वगेरे बोलत होते. तेव्हा जर लस न घेणे हे जर एखाद्याचा व्यक्तीगत निर्णय असेल तर त्याला प्रवेश द्यायचा की नाही हा पण त्या आस्थापणेचा निर्णय आहे. त्यात सक्ती करता येत नाही असा निर्णय झाला होता. असो. या विषयावर खुप चर्वण झाले आहे .. तेव्हा इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure गुरुवार, 05/05/2022 - 18:42 नवीन
लस घेण्याची सक्ती केलीच होती.फक्त सरळ सक्ती न करता वाकड्या मार्गाने केली होती. इतके निर्बंध टाकले होते की माणसाला लस घेतली नसेल तसे बाहेर पडणे,प्रवास करणे,नोकरी करणे,शॉपिंग करणे,कठीण झाले होते.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य गुरुवार, 05/05/2022 - 19:36 नवीन
जर संचारबंदी किंवा लॉकडाऊन, टाळेबंदी, लसीकरण, मुखाच्छादन (मास्क), स्वच्छता वगैरे ह्यामुळे कोरोना आटोक्यात आला नाही तर मग तो कशामुळे आटोक्यात आला ? काही वर्षांपूर्वी क्षय झालेल्या व्यक्तींना आयसोलेटेड जागेत किंवा हॉस्पटिलच्या वॉर्डमध्ये ठेवीत ज्यामुळे क्षय बरा होत होता की नाही ते माहीत नाही पण त्यामुळे रोग जास्त पसरू शकला नाही हे सत्य आहे. जोपर्यंत कोरोना नक्की कशामुळे होतो व त्यावर रामबाण उपाय काय हे माहीत नसेल तर जे काही माहीत असलेले प्रतिबंधात्मक इलाज करणे, उपचार पाळणे हे गरजेचं आहे असं माझं मत आहे. कोरोना काळात जर माझ्या बाजूला येऊन एखादी व्यक्ती खोकू लागली व तिने मास्क घातला नसेल तर एकतर तिनेच स्व:ताहून दूर जावे किंवा मी तरी दूर व्हावे असं मला वाटतं. ज्यावेळी रोगावर उपाय माहीत नसेल तर जे काही उपलब्ध ज्ञान आहे त्या जोरावर उपचार करणे गरजेचे आहे. "गो कोरोना, गो" म्हणणे, थाळ्या वाजवणे, घंटा नाद करणे वगैरे फक्त मनाला उभारी देण्याचे काम करू शकतात पण रोग दूर नाही करू शकत ही वस्तुस्थिती आहे. कोरोना काळात सरकारनी जी काही पावले उचलली ती योग्य होती ह्या मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान गुरुवार, 05/05/2022 - 21:59 नवीन
सौंदर्य, १.
जर संचारबंदी किंवा लॉकडाऊन, टाळेबंदी, लसीकरण, मुखाच्छादन (मास्क), स्वच्छता वगैरे ह्यामुळे कोरोना आटोक्यात आला नाही तर मग तो कशामुळे आटोक्यात आला ?
करोना हा रोग वा जे काही आहे ते सर्दीपडसे किंवा फ्ल्यू सारखा आजार आहे. त्याची साथ दरवर्षी नेमेची येतेच. आणि तशीच जातेही. २.
जोपर्यंत कोरोना नक्की कशामुळे होतो व ....
करोना होणे म्हणजे नेमके काय? ८०% लोकांना लक्षणं दिसंतही नाहीत. मग रोग कसला झाला ? करोना खरंच इतका घातक आहे की वारंवार चाचणी करून लोकांना पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय ते .... ? ३.
कोरोना काळात जर माझ्या बाजूला येऊन एखादी व्यक्ती खोकू लागली व तिने मास्क घातला नसेल तर एकतर तिनेच स्व:ताहून दूर जावे किंवा मी तरी दूर व्हावे असं मला वाटतं.
याला सामाजिक स्वच्छता म्हणतात. करोना असो वा नसो ती पाळावी असा दंडक आहे. ४.
"गो कोरोना, गो" म्हणणे, थाळ्या वाजवणे, घंटा नाद करणे वगैरे फक्त मनाला उभारी देण्याचे काम करू शकतात पण रोग दूर नाही करू शकत ही वस्तुस्थिती आहे.
करोनाच्या विषाणूचा अस्सल नमुना आजूनही विलग केलेला नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. थाळ्या बडवून रोग बरा होत नाही, अगदी त्याप्रमाणेच नुसती बोंबाबोंब केल्यानेही रोग होत नसतो. ५.
कोरोना काळात सरकारनी जी काही पावले उचलली ती योग्य होती ह्या मताचा मी आहे.
तुमच्या मताचा आदर आहे. मात्र माझं मत तुमच्या विरुद्ध आहे. करोनाच्या काळात सरकार मेकॉलेछाप पद्धतीने वागलं. जरा म्हणून स्वत:ची अक्कल वापरायची नाही असा चंग बांधला होता. त्यामुळे हकनाक बळी गेले. सर्वोच्च न्यायालयाचं मत माझ्याशी मिळतंजुळतं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Fri, 05/06/2022 - 00:15 नवीन
करोनाच्या काळात सरकार मेकॉलेछाप पद्धतीने वागलं. जरा म्हणून स्वत:ची अक्कल वापरायची नाही असा चंग बांधला होता. त्यामुळे हकनाक बळी गेले.
नक्की कुठले सरकार? फक्त भारताचे की यच्च्यावत जगातले सरकार. यात अमेरिका, कॅनडा, युरोप मधले सगळे देश, मध्यपुर्व , चीन, जपान , सौदी अरेबिया , न्युझीलंड , ऑस्ट्रेलिया वगेरे वगेरे आले. नाही म्हणजे सार्‍या जगात लॉकडाउन लावुन जनतेची गोची करणे हे सगळ्या देशांनी एकाच वेळेस केले. हा एक जागतीक कट तर नव्हता ना?
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Fri, 05/06/2022 - 20:01 नवीन
"करोना हा रोग वा जे काही आहे ते सर्दीपडसे किंवा फ्ल्यू सारखा आजार आहे. त्याची साथ दरवर्षी नेमेची येतेच. आणि तशीच जातेही." हा जर साध्या सर्दीपडश्यासारखा आजार होता तर जगभरातील जी माणसे अचानक मेली ती नेमक्या कशामुळे मेली ? जर त्याचे नक्की कारण आपल्याला ठाऊक नसेल तर जे काही उपाय सुचवले गेले ते करून पाहायला हरकत काय होती ? ह्या 'साध्या सर्दीपडश्यासारख्या' रोगावर ज्या काही लसींची निर्मिती झाली ती नक्कीच चांगल्या प्रयोगशाळेत झाली असणार, त्यातून फायदा जरी नाही झाला तर नुकसानही झाले नाही. ज्यावेळी आपले सर्व उपाय थकतात त्यावेळी जीव वाचविण्यासाठी आपण अंगारे-धुपारे, देवाला साकडे वगैरे घालतोच ना ? त्याच प्रमाणे हे सर्व उपचार समजायचे. देवी, पोलियोची लस घेणे बंधनकारक आहे की नाही ते मला ठाऊक नाही पण आमच्या लहानपणी दार उन्हाळ्याच्या सुट्टीत सरकारी इस्पितळातून डॉक्टर्स प्रत्येक सोसायटीत, शाळेत लस टोचवायला जायचे. त्याला आडकाठी केल्याचे आठवत नाही. सध्या पोलियो फक्त अफगाणिस्तान व एका आफ्रिकन देशात आहे. अफगाणिस्तानात ह्या लसी टोचायला तालिबानने बंदी केली परिणाम स्वरूप आजही पोलियोचे जगातून निर्मूलन झाले नाही. अमेरिकेत पाय ठेवण्यापूर्वी काही लसी घेणं बंधनकारक होतं त्यामुळे त्या का कू न करता घेतल्या त्याचा काही दुष्परिणाम झाल्याचे जाणवले नाही. आणि तसे पाहू जाता साध्या सर्दी पडश्यावरील औषधांचे दुष्परिणाम वाचेलत तर 'भीक नको पण कुत्रा आवर' म्हणण्याची पाळी येईल. शेवटी ज्या त्या क्षणी जे काही महत्त्वाचे वाटेल ते ते करावे ह्या मताचा मी आहे. एका वेगळ्या पोस्टमध्ये 'भागो'नी म्हंटल्याप्रमाणे 'वादे वादे जायते तत्वबोध:' हे खरे आहे. पैलवान साहेब तुमच्या ह्या एका पोस्टमुळे खूप माहिती मिळाली. मिसळपावचे हे एका प्रकारे यशच म्हंटले पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 05/09/2022 - 03:56 नवीन
नक्की कुठले सरकार? फक्त भारताचे की यच्च्यावत जगातले सरकार. माझा हि हाच प्रश्न आहे पैलवानांना .. निदान गेला बाजार इंग्लंडात जिथे ते राहतात तिथे करोना ने मेलेल्या व्यक्ती चाय नातेवाईकास भेटून हा "करोना थोतांड " पाजण्याची हिंमत ते दाखवतील तर पैलवानांना डम आहे असे आपण म्हणू! फारच मोठ्या गफल्याचा शोध लावल्या बद्दल नोबेल पुरस्कार द्यावा म्हणतो आपला सरकारी गुलाम ....
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 05/09/2022 - 03:50 नवीन
जोपर्यंत कोरोना नक्की कशामुळे होतो व त्यावर रामबाण उपाय काय हे माहीत नसेल तर जे काही माहीत असलेले प्रतिबंधात्मक इलाज करणे, उपचार पाळणे हे गरजेचं आहे असं माझं मत आहे. सहमत पन कोन्स्पिरेसि थेओरि वले अनि "व्यक्ति स्वन्त्रय ," वले असेच गळे काधनार ! स्वतः मरणार आणि दुसर्यालाही मारणार सार्वजनिक आरोग्य हि बाब यांच्या खिचगणतीत हि नसते जणू आणि गंमत म्हणजे यात २ टोकाची विचार सरणी ची लोक सहमत असतात ( स्ट्रेंज बेडफेल्लोव ) एका तर भरकटलेले डा अनाकरिस्ट किंवा "गॉड आणि गन " वाले अति टोकाचे उजवे !
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Mon, 05/09/2022 - 06:10 नवीन
आणि गंमत म्हणजे यात २ टोकाची विचार सरणी ची लोक सहमत असतात ( स्ट्रेंज बेडफेल्लोव ) एका तर भरकटलेले डा अनाकरिस्ट किंवा "गॉड आणि गन " वाले अति टोकाचे उजवे !
&#128077 &#128077 &#128077
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/06/2022 - 03:18 नवीन
करोना हा रोग वा जे काही आहे ते सर्दीपडसे किंवा फ्ल्यू सारखा आजार आहे. त्याची साथ दरवर्षी नेमेची येतेच. आणि तशीच जातेही.
अमेरिकन आकडे दरवर्षी फ्ल्यू मध्ये मरणारे लोक- २०,०००-६०,००० दोन वर्षात अमेरिकेत झालेले कोव्हिड मृत्यू- १०,२३,०००
करोना होणे म्हणजे नेमके काय? ८०% लोकांना लक्षणं दिसंतही नाहीत. मग रोग कसला झाला ? करोना खरंच इतका घातक आहे की वारंवार चाचणी करून लोकांना पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय ते .... ?
हो. लक्षणं दिसत नसतानाही विषाणूंचाणप्रसार होऊ शकतो म्हणून हे गरजेचे आहे.
करोनाच्या विषाणूचा अस्सल नमुना आजूनही विलग केलेला नाहीये. ही वस्तुस्थिती आहे. थाळ्या बडवून रोग बरा होत नाही, अगदी त्याप्रमाणेच नुसती बोंबाबोंब केल्यानेही रोग होत नसतो.
SARS-CoV-2 has been isolated and its complete genome has been sequenced
काळात सरकार मेकॉलेछाप पद्धतीने वागलं. जरा म्हणून स्वत:ची अक्कल वापरायची नाही असा चंग बांधला होता. त्यामुळे हकनाक बळी गेले.
बळी गेले ? ते कसे ? कोव्हिड प्रसार जास्त झाला असता तर आणखी बळी गेले असते हे स्पष्ट नाही काय ? उलटपक्षी कोव्हिड काळात जी थेट मदत गोरगरिबांना करण्यात आली आहे त्याने absolute powerty जगभरात तात्पुरती कमी झाल्याचे दिसत आहे.
  • Log in or register to post comments
न
नगरी Fri, 05/06/2022 - 04:00 नवीन
मी तरी तुमच्या विचारांशी पूर्ण सहमत. खरेतर करोना मुळे किती मेले आणि अँटीबायोटिकसच्या बेसुमार अतिरेकी माऱ्याने किती मेले हे तो देवच जाणे.मी स्वतः लस घेणे खूप टाळले,पण शेवटी नाईलाजाने घ्यावी लागली,लसीचा एकतरी डोस असल्याशिवाय विमानप्रवासास बंदी होती.सुप्रीम कोर्ट काही का म्हणे,ह्यांना जे करायचे ते ह्यांनी केले.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 05/06/2022 - 05:17 नवीन
1)काहीच लक्षण नसलेल्या व्यक्ती ल पण सरकारी विलागिकरण आणि उपचार केंद्रात भरती केले गेले आणि काहीच त्रास नसताना पण खूप दिवस तिथे ठेवले गेले.अशी उदाहरण मी काही बघितली आहेत. त्या मुळे जे गंभीर त्रासाने ग्रस्त होते त्यांना प्रवेश मिळाला नाही. २) कोरोना वर उपचार म्हणून ज्या औषध चा प्रचार,प्रसार आणि त्याच औषधांनी उपचार केले गेले. काही दिवसानंतर जी औषध जालीम म्हणून प्रसिद्ध केली होती ती किती हानिकारक ठरली ह्याच्या बातम्या येवू लागल्या. ३), ब्लॅक फंगस ची निर्मिती उपचार मधील काही तरी चुकी मुळेच झाली.पण ते कधीच स्पष्ट केले नाही.आज पण भारतात ब्लॅक फंगस चे रुग्ण अचानक covid काळातच का वाढले ह्या वर कोणी बोलत नाही.अगदी who पण बोलत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 05/06/2022 - 05:47 नवीन
लशीची सक्ती नसावी हे शंभर टक्के योग्य. आणि सर्वच औषधे / उपचार यांबाबत सदैव लागू असणे योग्य. पण रोग आणि लस हे दोन्ही थोतांड, हा रोग मुळात गंभीर नाहीच आणि लस निरुपयोगी आहे हेही अति टोकाचं वाटतं. धडधाकट वगैरे अशा सरसकट व्याख्या करणे अवघड आहे. ऐंशी नव्वदचे वृद्ध यातून सहज बाहेर पडताना दिसले आणि डोळ्याला दिसताना रिझनेबली धडधाकट वाटणारे तरुण, व्यायामपटू, मजबूत लोक अनपेक्षितपणे मृत्यू पावताना दिसले. तेव्हा हा आजार अनप्रेडिक्टेबल आहे यात शंका नसावी. बाकी सक्ती नसण्याबाबत विवेचन योग्यच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/06/2022 - 07:01 नवीन
अमेरिकन टर्म्स मध्ये : लस , मास्क आणि लॉकडाऊन ची सक्ती करणारे = डेमोक्रॅटिक लस , मास्क , लॉकडाऊन ऐच्छिक असावे असे म्हणणारे = रिपब्लिकन आता भारतातील ह्याचे समान अर्थी शब्द शोधणे काही जास्त अवघड नाही . कारण लोकांना त्यांचे निर्णय घ्यायचे स्वातंत्र्य असावे असे म्हणाणारा एक ग्रुप होता अन लोकांवर प्र्तयेकवेळी सक्ती करणारा एक ग्रुप होता इथेही !! अवांतर : ह्या संदर्भाने सी.बी.सी अर्थात कॅनडा ब्रॉडकास्तिंग कॉर्पोरेशनने एक मजेशीर विधान येथे आठवते -

The word freedom has become common among far-right groups, experts say.

=))))
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/06/2022 - 07:16 नवीन
पण, लसी बद्दल, मास्किंग खोटी नाटी माहिती पसरवणारे, लस घेण्यापासून बऱ्याच लोकांना परावृत्त करणारे- रिपब्लिकन्स. हे फक्त कोव्हिड लसीबाबत नाही. एकूणच लसीकरण नको म्हणतात हे. बऱ्याच लसी यापूर्वीही अमेरिकेत बंधनकारच होत्या.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/06/2022 - 07:29 नवीन
लसी बद्दल, मास्किंग खोटी नाटी माहिती
तुम्हाला कसे ठाऊक की ती माहीती खोटी आहे ? लसी केवळ एक वर्षात विकसीत करण्यात आलेली आहे , त्याचे लाँगटर्म स्टडी उपलब्ध्द आहेत का ? तुम्ही लसींच्या परिणामकते वरच्या डबल ब्लाईंडेड वगैरे स्टॅस्टिस्टिकल टेस्ट्स पाहिल्या आहेत का ? फार्मासुटीकल कंपन्यांनी ह्या प्रकारात किती पैसे कमावले ह्यावर तुमच्याकडे काही डेटा आहे का ? आणि मास्क मॅण्डेट्स हे कोव्हिडचा प्रचार थांबवण्यात अक्षरशः निरुपयोगी होते असे रीसर्च यायला लागले आहेत आता. आपण सर्च करुन पहा - mask mandates were useless. मला बाकीच्या लसींच्या बाबतीत अमेरिकन लोकांचा मुर्खपणा ठाऊक आहे . पोलिओ , देवी वगैरे रोगांवरच्या लसी उपयुक्त आहेत हे पुराव्याने शाबित करता येते , अनेक दशकांचा डेटा सपोर्ट ला आहे . पण कोव्हिडच्या बाबतीत केवळ भारतच नव्हे तर जगभर जे जे झालं ते सर्व लेफिस्ट विचारसरणीच्या सरकार ने केलेला आतातायीपणा होता हे माझेही ठाम मत आहे ! अवांतर वैयक्तिक : गावी असताना एकदा मंडई घेऊन येत असताना "विनाकारण फिरणे" हे कारण सांगुन एका पोलिसाने माझ्याकडुन ५०० रुपायची पावती फाडली अन त्याचे टारगेट पुर्ण करायचा प्रयत्न केला हे मी कधीही विसरणार नाही .
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 05/06/2022 - 07:54 नवीन
बाकी कशाविषयी काही म्हणणे नाही पण..
mask mandates were useless.
.. सर्च करुन पहा... याबद्दल मात्र असे म्हणेन की गूगलचा मोठा प्रॉब्लेम असा आहे की विशफुल सर्च टर्म्सना तो नेहमीच पावतो. त्यातून benefits of smoking , global warming is a myth, covid virus useful अशा कोणत्याही सर्चने कुठलेतरी पबमेडमधले किंवा तत्सम संशोधन बाहेर टाकले जातेच. गूगल अत्यंत उपयोगी असलं तरी हा भाग त्यातला मोठा वीकनेस. गूगल मस्ट वर्क ऑन इट नेक्ष्ट. तेही एक दिवस होईल. वेटेज, जनरल consensus या बाजूने किती आहे असा काहीतरी tag आला पाहिजे. ते वेटेज वाढले/ घटले पाहिजे. याविषयी सुन्दरशी एकदा चर्चा करायची आहे. ;-)
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/06/2022 - 08:37 नवीन
विशफुल सर्च टर्म्स
तुम्ही विशफुल सर्च टर्म्स म्हणत आहात , ठीक आहे . आपण अजुन रीसर्च येण्याची वाट पाहु. माझ्या माहीती नुसार तरी अजुन पर्यंत कोणताच सबस्टॅन्शियल इव्हिडन्स नाहीये की मास्क मुळे कोव्हिड प्रसार थांबवण्यास मदत झाली. अजुन रिलायेबल रीसर्च आले की मी लिन्क्स टाकेन. बाकी तुम्ही सुचवलेले तीन्ही विशफुल सर्च मी करुन पाहिले , मला तरी काही एक सपोर्टिंह सापडले नाही त्यावर ! त्यातल्या त्यात global warming is a myth असे सर्च केल्यावर ज्या लिन्क्स सापडल्या त्या बहुतांश प्रश्णार्थक आणि हे मतखंडन करणार्‍याच होत्या. असो. बाकी तुम्ही सुंदर सरांशी चर्चा जरुर करा , पण त्यातुन काही साधेल असे वाटत नाही. ट्विटर ने हेच करायचा प्रयत्न केला , विरोधी मत दिसले की दाब , ऊडव ट्वीट , कर अकाऊंट ब्लॉक ! शेवटी ट्विटरचे काय झाले आपण पाहिलेच ! विरोधी/ आपल्याला न पटणार्‍या मतांचा आवाज दपडुन सत्य लपुन रहात नाही ! कोंबडा झाकला म्हणुन सुर्य उगवायचे रहात नाही की कोंबडी अंडे द्यायचे रहात नाही !! =))))
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 05/06/2022 - 09:21 नवीन
नाही नाही. न पटणारा आवाज दाबणे किंवा पटणारा आवाज लाऊडस्पीकरवर लावणे असा उद्देश नाहीच. विशफुल हा शब्दही कामकाजातून वगळूया तूर्त. तो तांत्रिक भाग होता. कोणताही कीवर्ड टाकला की सर्व प्रकारचे रिझल्ट येतात. "मास्कची परिणामकारकता" आणि "मास्क उपयुक्त असल्याचे सिद्ध" "मास्क कुचकामी ठरला" यातील काहीही टाकलं तरी त्याच्याशी संलग्न काही रिसर्च येतोच. कोणतेही शारिरीक लक्षण सर्च करा. मग तेच लक्षण + cancer असं सर्च करा. अगदी चक्कर, खोकला, निद्रानाश, बद्धकोष्ठ, नखावर डाग, पुरळ यातले काहीही लक्षण कर्करोगाशी नेऊन जुळवणारे निकाल मिळतीलच. त्यामुळे वेटेज ही कल्पना मांडली. काहीही उडवायचे / दाबून टाकायचे नाही. फक्त वेटेज द्यायचे. (त्यातही वेटेज वाढवणारी सिस्टीम उभी राहू शकते, value added service म्हणून वेटेज वाढवून मिळू शकते या शक्यता आल्याच) उदा. पृथ्वी चौकोनी आहे अशी मांडणी करणारे एक संशोधन आहे. आगोदर त्याचे वेटेज शून्यवत असेल. हळुहळू अधिक अभ्यास/ पेपर्स याला पाठबळ देतील तसे तसे वेटेज वाढत जाईल. "पृथ्वी गोल" याचे सध्याचे 100% वेटेज तेव्हा कमी होत जाईल. इत्यादि.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/06/2022 - 09:23 नवीन
ओह. ओके. आत्त कळले तुम्हाला काय म्हणायचे होते ते !
  • Log in or register to post comments
क
कॉमी Fri, 05/06/2022 - 08:26 नवीन
लस शक्य तितक्या लवकर देणे हे उद्दिष्ट चुकीचे आहे काय ? तुम्ही म्हणताय तो अभ्यास व्हावाच कि, पण उपलब्ध माहितीनुसार तरी लसी फायदेशीर आहेतच ना ? हॉस्पिटलायझेशन, गंभीर आजार आणि मृत्यू- तिन्हीपासून लसीने संरक्षण दिलेच कि. मृत्युदर लसीकरण न घेतलेल्या लोकांमध्ये जास्त आहे हे दिसून आले आहे. https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/vaccines/effectiveness/work.html इतके सोडा, ट्रम्पला मत देणाऱ्या भागांमध्ये मृत्युदर जास्त आहे हे सुद्धा दिसले आहे. https://www.npr.org/sections/health-shots/2021/12/05/1059828993/data-vaccine-misinformation-trump-counties-covid-death-rate मग लस घेणे धोकादायक आहे असे पुश करणारे रिपब्लिकन आणि फॉक्स न्यूज वैगेरे पिद्दे जबाबदार नाहीयेत का या गोष्टीसाठी ? लस घेण्याची जबरदस्ती होऊ नये हे फेअर होते, पण लस घेण्यापासून परावृत्त करणारे बोलणे अत्यंत बेजबाबदार पणाचे होते. फार्मासुटीकल कंपन्या पैसे कमावतात ह्याचा संबंध काय ते समजले नाही. लस जर तुम्हाला मरण्यापासून वाचवण्याची शक्यता वाढवत असेल तर फार्मा कंपन्या श्रीमंत होतात का नाही हे बघायचे काय ? बरं, फार्मा कंपन्यांवर नियंत्रण आणावे हे रिपब्लिकन्सना मान्य नाही. बाजूचा कॅनडा इन्शुलिन इतक्या स्वस्तात विकतो, आपल्या इथे प्राईस कॅप लावा म्हणून बरणी घसा कोकलून ओरडतो तेव्हा त्याला सोशालिस्ट कम्युनिस्ट म्हणतात. मग आज पांडेमिक आल्यावर लोकांच्या जीवाशी खेळताना फार्मा कंपन्यांची तुंबडी भरतीये हे कसे आठवते ? कोव्हिड हा नवीन रोग आहे.मेडिकल मत बदलणे हे समजण्यासारखे आहे. पण प्रत्येक बदलाचे GOP ने भांडवल केले आणि लोकांचा अविश्वास वाढवला हे खरे आहे. मास्क बद्दल सुद्धा. तेव्हाचे कन्सेन्शस होते ना मास्क काम करतो तर घाला ना! इतके रडण्याभेकण्यासारखे त्यात काहीही नव्हते.
पण कोव्हिडच्या बाबतीत केवळ भारतच नव्हे तर जगभर जे जे झालं ते सर्व लेफिस्ट विचारसरणीच्या सरकार ने केलेला आतातायीपणा होता हे माझेही ठाम मत आहे !
जे झालं म्हणजे काय झालं ?कशाबद्दल बोलत आहात ? गरीबातली गरीब लोक absolute poverty मधून बाहेर राहू शकली उलट कोव्हिडमध्ये.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Mon, 05/09/2022 - 04:09 नवीन
पण कोव्हिडच्या बाबतीत केवळ भारतच नव्हे तर जगभर जे जे झालं ते सर्व लेफिस्ट विचारसरणीच्या सरकार ने केलेला आतातायीपणा होता हे माझेही ठाम मत आहे ! १०० % तसे म्हणता येणार नाही ऑस्ट्रेल्या = उजवे सरकार , सुरवातीला कडक निर्बंध सिंगापुर = एकाच सरकार "परोपकारी उजवे" तरी निर्बंध
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 05/09/2022 - 09:39 नवीन
ऑस्ट्रेलिया , सिंगापुर मध्ये उजव्या विचारसरणीचे सरकार आहे ? हे मला माहीत नव्हते , तपासुन पहातो . बाकी तसे तर भारतातही उजव्या विचारसस्रणीचे सरकार आहे , त्यांनीही "मित्रों " म्हण्त आतातायी लॉकडाऊन लावला होताच पण नंतर देशाच्या ईकॉनॉमीला घोडा लागतोय ही अक्कल आल्यावर निर्बंध बिर्बंध राज्यसरकारांवर जबाबदारी झटकुन रिकामे झाले . =))))
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/10/2022 - 04:35 नवीन
ऑस्ट्रेलिया ,मध्ये उजव्या विचारसरणीचे सरकार आहे ? नक्की तपासा तिथे डावे = लेबर ( मजूर ) आणि हिरवे ( ग्रीन = पर्यवर्णवादी पण तशी कमी ) उजवे लिबरल + नॅशनल ( जास्त उजवे म्हणू हवे तर ) सिंगापुर बद्दल म्हणू मिश्रण उजवे असे म्हणले बर समजा दाव्याची हि फायदा तर खाजगी लस निर्मात्यांना आणि इतर उतपादने पुरवणाऱ्यांना ! मग असे कसे ?
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Fri, 05/06/2022 - 09:21 नवीन
अधिकृत संस्थे चे निष्कर्ष मान्य करावेत!!!!! बाह्य दबाव प्रचंड असतो अशा संस्थेवर ह्या सत्याकडे डोळे झक करून पण. कारण शेवटी तेच अधिकृत सत्य असते. का विचार करू नये असे पॉइंट. १)जगात मानवाच्या उत्पत्ती पासून आज पर्यंत अनेक साथीचे आजार येवून गेले असणार. अर्थात च सर्व आपल्याला माहीत नाहीत. पण साधीचे आजार समुद्राच्या लहरी सारखे असतात. भरती म्हणजे पीक पॉइंट वर आणि त्या नंतर ओहोटी म्हणजे विषाणू,जिवाणू कमजोर होवून साथ निघून जाते. आणि हे नैसर्गिक रीत्या घडते. Covid बाबत पण तेच घडले असेल.लसी नी फक्त वेळ कमी केली असेल. २) रोगविषयी डेटा माझ्या मते दोन प्रकार चा असावा. एक संशोधन करणाऱ्या संस्था नियंत्रित वातावरणात ठराविक लोकांचा अभ्यास करून मिळालेला डेटा. हा खूप कमी लोकांचा अभ्यास करून आणि नियंत्रित वातावरणात डेटा मिळवून त्या वर निष्कर्ष काढले जातात. हे सर्व जगाला ,विविध स्थिती मध्य राहणारी लोक,विविध जीवन शैली असणारी लोक,विविध आहार. घेणारी लोक .विविध वंशाची लोक ह्यांना लगुच होईल असे काही नाहीं. लस अशाच डेटा वर बनवली आहे आणि ती किती परिमाण कारक आहे ह्याचा निष्कर्ष पण ह्याच प्रकार च्या डेटा वर आधारित आहे. दुसरा डेटा हा विस्तृत असतो. जगभरातील रोग ग्रस्त लोकांची स्थानिक संस्था नी जमा केलेली माहिती वर आधारित असतो. आणि हाच डेटा सत्य सांगू शकतो पण असा डेटा जमा करण्याचे guiide लाईन सरकार ठरवतात. त्या मुळे चाकोरी बद्ध च माहिती गोळा होते.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 05/06/2022 - 19:37 नवीन
कॉमी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
हो. लक्षणं दिसत नसतानाही विषाणूंचाणप्रसार होऊ शकतो म्हणून हे गरजेचे आहे.
अशा असंख्य बिनलक्षणी विषाणूंचा सतत 'प्रसार' होत असतो. प्रत्येकासाठी निर्बंध घालंत बसलं तर जगणं अशक्य होऊन बसेल. २.
SARS-CoV-2 has been isolated and its complete genome has been sequenced
या लेखात क्लिनिकल इन्फेक्शन ही बाब पूर्णपणे दुर्लक्षित केली आहे. ज्याला लागण झालेलीच नाही अशा माणसाच्या नमुन्यात काहीबाही विषाणू सापडला तर त्या माणसाला बाधित म्हणून घोषित करायचा ....? हे कसलं वैद्यक ? लागण ( = क्लिनिकल इन्फेक्शन ) आधी होत असते आणि बाधाकारक जीवाणू/विषाणू नंतर शोधला जातो. करोनाच्या बाबतीत प्रवास बरोब्बर उलटा आहे. म्हणून मी करोनास थोतांड म्हणतो. ३.
बळी गेले ? ते कसे ? कोव्हिड प्रसार जास्त झाला असता तर आणखी बळी गेले असते हे स्पष्ट नाही काय ?
माझ्यासारख्या हृदयविकारी लोकांना करोनापासून खरंच भीती आहे. मला जर काही झालं तर माझ्यासाठी रुग्णालयात खाट मोकळी हवी. त्याऐवजी जर इतर धडधाकट लोकं खोगीरभरती झालेले असतील तर माझी काय हालत होईल? माझ्यासारख्या अनेक केसेस आहेत. करोनाचं निरर्थक अवडंबर आणि करोनाच्या नावाखाली विपरीत उपचार यांमुळेच बळी गेले आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/07/2022 - 04:32 नवीन
असंख्य बिनलक्षणी विषाणूंचा सतत 'प्रसार' होत असतो. प्रत्येकासाठी निर्बंध घालंत बसलं तर जगणं अशक्य होऊन बसेल.
क्लिअरली कोव्हिड इतक्या झपाट्याने आणि कोव्हिड इतक्या डिस्त्रक्टीव्ह रोगाचा होत नाही. तुम्ही आता जे म्हणता ते प्रत्येग रोगाच्या वेळेस म्हणायचे काय, प्लेग आणि कॉलरा एकेकाळी जितके संहारक होते तश्या रोगांना सुद्धा ? मग कुठेतरी लाईन आखली जातेच ना- हि स्वीकारार्ह रिस्क आहे आणि हि अस्वीकारार्ह रिस्क आहे.
लेखात क्लिनिकल इन्फेक्शन ही बाब पूर्णपणे दुर्लक्षित केली आहे. ज्याला लागण झालेलीच नाही अशा माणसाच्या नमुन्यात काहीबाही विषाणू सापडला तर त्या माणसाला बाधित म्हणून घोषित करायचा ....? हे कसलं वैद्यक ? लागण ( = क्लिनिकल इन्फेक्शन ) आधी होत असते आणि बाधाकारक जीवाणू/विषाणू नंतर शोधला जातो. करोनाच्या बाबतीत प्रवास बरोब्बर उलटा आहे.
गामा, तुम्ही आधी म्हणत होता की कोव्हिडचा विषाणू विलग केलेला नाहीये. त्यासाठी तो दुवा होता. विलग केला आहे. मी काही डॉक्टर नाही. पण इतके तर समजते कि नमुन्यात विषाणू सापडला तर त्याला बाधित म्हणायचे कारण तो व्यक्ती पुढे विषाणू पसरवू शकतो. तो बाधित आहे म्हणजे आजारी पडेल असे नाही. पण इतरांना विषाणूंची बाधा त्याच्या संपर्कात राहून होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तक्रार नक्की कशाबद्दल करत आहात कल्पना नाही.
माझ्यासारख्या हृदयविकारी लोकांना करोनापासून खरंच भीती आहे. मला जर काही झालं तर माझ्यासाठी रुग्णालयात खाट मोकळी हवी.
सध्या तरी तशी कसलीही भीती नाही.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sat, 05/07/2022 - 19:59 नवीन
कॉमी, १.
क्लिअरली कोव्हिड इतक्या झपाट्याने आणि कोव्हिड इतक्या डिस्त्रक्टीव्ह रोगाचा होत नाही.
करोना खरंच इतका घातक आहे का? लोकांना तर वारंवार चाचणी करून पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय म्हणून. २.
तुम्ही आता जे म्हणता ते प्रत्येग रोगाच्या वेळेस म्हणायचे काय, प्लेग आणि कॉलरा एकेकाळी जितके संहारक होते तश्या रोगांना सुद्धा ?
प्लेग, कॉलरा वगैरे साथी स्वच्छतेमुळे आटोक्यात आल्या. लशीकरणाच्या बऱ्याच आधीपासून साथी मंदावल्या होत्या. ३.
.... नमुन्यात विषाणू सापडला तर त्याला बाधित म्हणायचे कारण तो व्यक्ती पुढे विषाणू पसरवू शकतो.
हे एकांगी मूल्यमापन नव्हे काय? मला म्हणायचंय की जर एखाद्या निरोगी माणसाच्या अंगात करोना आढळला तर त्यास बाधित म्हणू नये. करण की त्याची प्रतिकारशक्ती विकसित झाल्याने तो करोनास दाद देत नाहीये. मग असा माणूस प्रतिकारशक्तीचाही वाहक आहे ना? त्याला केवळ रोगवाहक या वर्गात का म्हणून ढकलायचं? अशा प्रकारच्या पसरणाऱ्या प्रतिकारशक्तीस परिचयकाठीण्य म्हणजे herd immunity म्हणतात. करोना अंगात सापडणे अतिशय किरकोळ बाब आहे. तर मग करोनाचा रुग्ण म्हणजे नेमकं काय? करोना अंगात असणे, त्यामुळे बाधित असणे, त्याची सौम्य लक्षणं दिसणे, ती लक्षणं तीव्र बनणे आणि त्यांच्यापायी मृत्यू होणे हे पाच स्वतंत्र वर्ग आहेत ( संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1066627#comment-1066627 ). आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/07/2022 - 20:47 नवीन
करोना खरंच इतका घातक आहे का? लोकांना तर वारंवार चाचणी करून पटवून द्यावं लागतं की तुम्हांस रोग झालाय म्हणून.
गामा, दोन वर्षांमध्ये कोव्हिडचे ६० लाख बळी गेलेत. WHO चे म्हणणे मानले तर १.५ करोड बळी गेलेत. कॅन्सर दरवर्षी १० लाखाच्या आसपास बळी घेते. यू मेक द कॉल. मी म्हणेन कोव्हिड घातक आहे.
प्लेग, कॉलरा वगैरे साथी स्वच्छतेमुळे आटोक्यात आल्या. लशीकरणाच्या बऱ्याच आधीपासून साथी मंदावल्या होत्या.
देवी घ्या. माझा मुद्दा आहे की लक्षावधी लोकांना मारणारा संसर्गजन्य रोग- Novel Corona Virus- जास्त विनाशकारी आहे ना ? प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी निर्बंध घालायचे का- हा प्रश्न कोव्हिडच्या परिणामांना फार कमी लेखतोय असे मला वाटते. कोव्हिड माझ्या आयुष्यातील तरी सर्वात भयानक रोग आहे.
हे एकांगी मूल्यमापन नव्हे काय? मला म्हणायचंय की जर एखाद्या निरोगी माणसाच्या अंगात करोना आढळला तर त्यास बाधित म्हणू नये. करण की त्याची प्रतिकारशक्ती विकसित झाल्याने तो करोनास दाद देत नाहीये. मग असा माणूस प्रतिकारशक्तीचाही वाहक आहे ना? त्याला केवळ रोगवाहक या वर्गात का म्हणून ढकलायचं? अशा प्रकारच्या पसरणाऱ्या प्रतिकारशक्तीस परिचयकाठीण्य म्हणजे herd immunity म्हणतात.
काय म्हणायचे - बाधित म्हणायचे का आणि काय- मला इतके ह्त्वाचे वाटत नाही. टेस्ट करण्यामागचा हेतू काय- तर माणूस आजारी नसला तरी तो वाहक असेल तर ओळखणे आणि त्याला लोकांच्यात काही दिवस मिसळू नकोस इतके सांगणे. मग नावे काहीही दिली तरी चालतील. प्रतिकारशक्ती वाहक हा प्रकार काय ? व्यक्ती अ ची प्रतिकारशक्ती चांगली आहे आणि ब ची वाईट. अ कडून ब ला प्रसाद मिळाल्यावर प्रतिकारशक्ती नाही, फक्त कोव्हिड मिळणार. हर्ड इम्युनिटी म्हणजे जास्तीत जास्त लोकांना तो रोगलागण किंवा लसीकरण झाले असल्यास येणारी प्रतिकारक्षमता. हर्ड इम्युनिटी नावाप्रमाणे हर्डला- समाजाला येते. एकेका व्यक्तीला नाही. लागण जास्त लोकांना झाल्यावर आधी जास्त लोकं मरून मग उरलेल्ल्यांना हर्ड इम्युनिटी मिळते. ती रोगातून मिळणेपेक्षा लसीतून मिळणे प्रत्येक व्यक्तीसाठी चांगलेच असते. त्यामुळे 'पसरणारी प्रतिकारशक्ती' हे धडधडीत चुकीचे आकलन आहे असे मला माझ्या अल्प समजातून वाटते. डॉ. खरे किंवा कुमार सरांनी शंका निरसन केल्यास आभारी राहीन.
करोना अंगात सापडणे अतिशय किरकोळ बाब आहे. तर मग करोनाचा रुग्ण म्हणजे नेमकं काय? करोना अंगात असणे, त्यामुळे बाधित असणे, त्याची सौम्य लक्षणं दिसणे, ती लक्षणं तीव्र बनणे आणि त्यांच्यापायी मृत्यू होणे हे पाच स्वतंत्र वर्ग आहेत ( संदर्भ :
वाहक, रुग्ण आणि गंभीर रुग्ण असे विभाग होऊ शकतात.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 05/08/2022 - 22:47 नवीन
१.
दोन वर्षांमध्ये कोव्हिडचे ६० लाख बळी गेलेत. WHO चे म्हणणे मानले तर १.५ करोड बळी गेलेत.
हा आकडा फसवा आहे. हे करोना अंगात असतांना झालेले मृत्यू आहेत. करोनामुळे झालेले नाहीत. २.
माझा मुद्दा आहे की लक्षावधी लोकांना मारणारा संसर्गजन्य रोग- Novel Corona Virus- जास्त विनाशकारी आहे ना ?
आजीबात नाही. करोना सर्दीपडशासारखा आजार आहे. फारतर फ्ल्यूसारखा म्हणता येईल. तो धड्द्त माणसासाठी जीवघेणा असूच शकंत नाही. ३.
टेस्ट करण्यामागचा हेतू काय- तर माणूस आजारी नसला तरी तो वाहक असेल तर ओळखणे
या 'वाहक' थियरीवर माझा आक्षेप आहे. रोगाचा वाहक असू शकतो, नाही असं नाही. पण करोना हा सर्वत्र आढळणारा विषाणू आहे. अगदी नळाच्या पाण्यावरही पीसीआर चाचणी केली तरी तिथेही आढळून येतो. अशा वेळेस कुण्या एका माणसाला वाहक बनवण्यात काय अर्थ ? ४.
.... हर्ड इम्युनिटी मिळते. ती रोगातून मिळणेपेक्षा लसीतून मिळणे प्रत्येक व्यक्तीसाठी चांगलेच असते.
लशीतनं कुठल्याही प्रकारची इम्युनिटी मिळायची कसलीही खात्री नाही. विशेषत: नवी लस प्रस्थापित व्हायचा कालखंड १० वर्षेही असू शकतो. लशीमुळे रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एक उदाहरण सांगतो. गोवराच्या दूषित लशीमुळे लहान मुलांना होणारा गोवर मोठ्या माणसांनाही होऊ लागला आहे. ५.
'पसरणारी प्रतिकारशक्ती' हे धडधडीत चुकीचे आकलन आहे असे मला माझ्या अल्प समजातून वाटते.
'पसरणारी प्रतिकारशक्ती' हिची पुढील आवृत्ती म्हणजे स्वप्रसारित लस. कृपया हा लेख पाहणे ( इंग्रजी दुवा ) : https://www.nationalgeographic.com/science/article/the-controversial-quest-to-make-a-contagious-vaccine जर जंतूंचा प्रसार होतो, लशीचा प्रसार होतो, तर प्रतिकारशक्तीचाची प्रसार व्हायला हरकत नसावी. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/09/2022 - 04:20 नवीन
हा आकडा फसवा आहे. हे करोना अंगात असतांना झालेले मृत्यू आहेत. करोनामुळे झालेले नाहीत.
चूक. मृत्यूच्या एकापेक्षा जास्त कारणांपैकी एक कोव्हिड आहे असे डॉकटर सर्टिफाय करत असतील तरच कोव्हिड मृत्यू म्हणून गणला जातो. तुम्ही कोव्हिड पॉझिटिव्ह असताना गाडीचा अपघात होऊन मेला तर त्यास कोव्हिड मृत्यू म्हणत नाहीत. तर्कसुसंगतच आहे. आपल्या वर लक्ष देणाऱ्या फिजिशियननेच लिहायचे असते मृत्यूचे कारण. इथे कोव्हिड मृत्यू नोंदण्याची सविस्तर प्रोसिजर दिली आहे. बर, आणि जगात इतकी जास्त लोकं मेली, कोव्हिड पांडेमिकच्या पीक महिन्यांमध्येच मेली. तरी तुम्ही कसे म्हणू शकत कि ६० लाख सुद्धा मेले नाहीत ? Excess mortality नुसार जगभरात १.५ करोड लोक मेले आहेत असे WHO म्हणतेय.
नळाच्या पाण्यावरही पीसीआर चाचणी केली तरी तिथेही आढळून येतो. अशा वेळेस कुण्या एका माणसाला वाहक बनवण्यात काय अर्थ ?
अर्थ कसा नाही ? वाहक बनवण्याचा प्रश्न नाही, तुम्ही वाहक व्याख्येनुसार आहातच ना ? नळाच्या पाण्याला सुद्धा जमत असेल तर आयसोलेट करा!
लशीतनं कुठल्याही प्रकारची इम्युनिटी मिळायची कसलीही खात्री नाही. विशेषत: नवी लस प्रस्थापित व्हायचा कालखंड १० वर्षेही असू शकतो. लशीमुळे रोग आटोक्यात येण्याऐवजी वाढल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एक उदाहरण सांगतो. गोवराच्या दूषित लशीमुळे लहान मुलांना होणारा गोवर मोठ्या माणसांनाही होऊ लागला आहे.
कोव्हिड ची लस काम करते. मृत्यू, गंभीर आजार आणि हॉस्पिटलायझेशन तिन्ही गोष्टींपासून संरक्षण मिळते.
'पसरणारी प्रतिकारशक्ती' हिची पुढील आवृत्ती म्हणजे स्वप्रसारित लस. कृपया हा लेख पाहणे ( इंग्रजी दुवा ) : https://www.nationalgeographic.com/science/article/the-controversial-que... जर जंतूंचा प्रसार होतो, लशीचा प्रसार होतो, तर प्रतिकारशक्तीचाची प्रसार व्हायला हरकत नसावी.
लेख वाचला. तो एक्सपिरिमेन्टल लसींबद्दल आहे. त्यात लिहिले आहे-
'“We can't even get people to take a vaccine in a global pandemic. The idea that you would be able to surreptitiously vaccinate the population with a virus without causing riots is just, you know, it's stuff of fantasy. It will never be used in humans,”.
बरं, आणि अशी पसरणारी लस नैसर्गिक रित्या नाही होत, प्रयोगशाळेत बनवावी लागते. कोव्हिडबाबत याचा संबंध येतच नाही- अशी ल्स बनवलीच नाहीये.
जर जंतूंचा प्रसार होतो, लशीचा प्रसार होतो, तर प्रतिकारशक्तीचाची प्रसार व्हायला हरकत नसावी
हरकत काहीच नाही, पण तसे होताना दिसत नाही. लसीचा प्रसार हि फक्त फॅन्टसी आहे, सध्या चर्चेत स्थान असायचे काही कारण नाही. मुद्दा काय- हर्ड इम्युनिटी म्हणजे पसरणारी प्रतिकारशक्ती होत नाही, रोगासोबत प्रतिकारशक्ती पसरते असा कोणताही पुरावा दिसत नाही, तसे असते तर इतकी लोकं मेली नसती, पसरणारी लस कोरोनासाठी तरी अस्तित्वात नाही.
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 05/09/2022 - 09:36 नवीन
पाश्चिमात्य देश,अमेरिका,ह्या देशांना च corona नी सर्वात जास्त फटका दिला. इटली,ब्रिटन,अमेरिका.आणि बाकी देश. आरोग्य सेवा उत्तम,स्वच्छता तरी हेच देश सर्वात जास्त बाधित. स्वच्छता आणि covid प्रसार ह्याचा संबंध कसा लावणार. Omicron. जो नंतर आला.पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिका . त्यांच्या आकड्या वर मी लक्ष ठेवायचो. खुप कमी लसीकरण झालेला देश आहे दक्षिण आफ्रिका.गरीब तर आहेच,आरोग्य सुविधा पण जास्त नाहीत. काहीच दिवसात amiycron नी दक्षिण आफ्रिकेतून काढता पाय घेतला. आणि सर्वात जास्त लसीकरण झालेले देश,सर्वात उत्तम आरोग्य सुविधा असलेले देश,स्वच्छता मध्ये पुढे असणारे देश. ह्यांना 440 volt च झटका omiycron नी दिला. लसीकरण काही कामाला आले नाही. बिल गेट्स,आणि असे दिग्गज लसी उद्योगात आहेत. हा पॉइंट हल्ल्यात घेऊ नयेत
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 05/09/2022 - 09:36 नवीन
पाश्चिमात्य देश,अमेरिका,ह्या देशांना च corona नी सर्वात जास्त फटका दिला. इटली,ब्रिटन,अमेरिका.आणि बाकी देश. आरोग्य सेवा उत्तम,स्वच्छता तरी हेच देश सर्वात जास्त बाधित. स्वच्छता आणि covid प्रसार ह्याचा संबंध कसा लावणार. Omicron. जो नंतर आला.पहिला रुग्ण दक्षिण आफ्रिका . त्यांच्या आकड्या वर मी लक्ष ठेवायचो. खुप कमी लसीकरण झालेला देश आहे दक्षिण आफ्रिका.गरीब तर आहेच,आरोग्य सुविधा पण जास्त नाहीत. काहीच दिवसात amiycron नी दक्षिण आफ्रिकेतून काढता पाय घेतला. आणि सर्वात जास्त लसीकरण झालेले देश,सर्वात उत्तम आरोग्य सुविधा असलेले देश,स्वच्छता मध्ये पुढे असणारे देश. ह्यांना 440 volt च झटका omiycron नी दिला. लसीकरण काही कामाला आले नाही. बिल गेट्स,आणि असे दिग्गज लसी उद्योगात आहेत. हा पॉइंट हल्ल्यात घेऊ नये
  • Log in or register to post comments
S
sunil kachure Mon, 05/09/2022 - 09:52 नवीन
https://www.google.co.in/url?sa=t&source=web&rct=j&url=https://www.statista.com/statistics/1104709/coronavirus-deaths-worldwide-per-million-inhabitants/&ved=2ahUKEwjW4sur9dH3AhUTMKYKHXNjB-QQFnoECAkQAQ&usg=AOvVaw0zHO6KrQyQ2BL_64yuf6ok Covid मुळे झालेल्या मृत्यू ची टक्केवारी बघा . गरीब मागास देशात कमी आहे.श्रीमंत देशात जास्त आहे. लस विकत घेण्याची ज्या देशाची जास्त ताकत होती त्याचा देशात covid ची भीती मीडिया मार्फत पसरवली चीन मध्ये उगम.जिथे उगम त्या लॅब चे भागीदार जगातील श्रीमंत देश आणि लोक. लस निर्माण करणारे तेच,who त्यांचीच, उपचार काय करा हे सांगणारे तेच. आणि सर्वात जास्त बाधित पण त्याच देशात. काय योगायोग आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Mon, 05/09/2022 - 22:49 नवीन
चौकस२१२, १.
नक्की कुठले सरकार? फक्त भारताचे की यच्च्यावत जगातले सरकार.
भारत सरकार. २.
निदान गेला बाजार इंग्लंडात जिथे ते राहतात तिथे करोना ने मेलेल्या व्यक्ती चाय नातेवाईकास भेटून हा "करोना थोतांड " पाजण्याची हिंमत ते दाखवतील तर पैलवानांना डम आहे असे आपण म्हणू!
माझ्यात दम नाही. अर्थात, या चर्चेत दमाचा संबंधही येत नाही. ३.
फारच मोठ्या गफल्याचा शोध लावल्या बद्दल नोबेल पुरस्कार द्यावा म्हणतो
नोबेल पुरस्कार घेऊन मी काय करू? तो फारंच बोअरिंग आहे. त्यापेक्षा आपण समर्पक प्रश्न विचारायचा सराव करूया. ४.
जोपर्यंत कोरोना नक्की कशामुळे होतो व त्यावर रामबाण उपाय काय हे माहीत नसेल तर जे काही माहीत असलेले प्रतिबंधात्मक इलाज करणे, उपचार पाळणे हे गरजेचं आहे असं माझं मत आहे.
हे उपचार कोणी ठरवले? आणि लस कोणी विकसित केली? ही लस निर्माण करतांना पूर्वीच्या चुका परत तर केलेल्या नाहीत ना? हे कोणी तपासून पहायचं? उपायाचं म्हणाल तर आयव्हरमेक्टिन हा रामबाण उपाय आहे. पण निरर्थक व घातक लशी पुढे रेटण्यासाठी तो दडवून ठेवला आहे. ५.
स्वतः मरणार आणि दुसर्यालाही मारणार
दुसऱ्याला मारणार ते कसं? लस घेतलेले फुटबॉलपटू मैदानावर तडफडून मेले ते मी ( किंवा माझ्यासारख्या पर्यायी दृष्टीकोनवाल्यांनी ) मारलेत असं तुमचं म्हणणं आहे का? ६.
सार्वजनिक आरोग्य हि बाब यांच्या खिचगणतीत हि नसते जणू
कारण की ती जबाबदारी आरोग्य खात्याच्या खिजगणतीत आहे. तिला मी माझ्या खिजगणतीत ठेवल्याने असा काय थोर उजेड पडणारे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 05/10/2022 - 04:43 नवीन
माझ्यात दम नाही. अर्थात, या चर्चेत दमाचा संबंधही येत नाही. जगातील सरकार आणि वैदयकिया लोकांना " करोना हे थोतांड आहे " सांगण्याचा दम असतेल्याना उघडपणे हे आव्हान खरे तर स्वीकारता आले पाहिजे ! मग केतेल तुम्हाला किती गंभीर बातुम्ही बी बाबत आपण कॉन्स्पिरसी थेअरी दामटवताय ते !
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Tue, 05/10/2022 - 15:38 नवीन
कॉमी, तुमचा इथला प्रतिसाद वाचला. माझी मतं सांगतो. १.
मृत्यूच्या एकापेक्षा जास्त कारणांपैकी एक कोव्हिड आहे असे डॉकटर सर्टिफाय करत असतील तरच कोव्हिड मृत्यू म्हणून गणला जातो.
मृत्यूची कारणं साधारणत: एकापेक्षा जास्तच असतात. फक्त करोनामुळे कोणी मृत्यू पावंत नसतो. आणि मग करोनासोबत इतर विषाणू सापडले अंगात तर ते ही मृत्यूचे कारण म्हणून धरणार का? २.
तुम्ही कोव्हिड पॉझिटिव्ह असताना गाडीचा अपघात होऊन मेला तर त्यास कोव्हिड मृत्यू म्हणत नाहीत. तर्कसुसंगतच आहे.
प्रत्यक्षांत परिस्थिती नेमकी उलट आहे. कायझाद कापडिया हृदयविकारी झटक्याने वारला. तरी त्याची नोंद करोनामृत्यू अशी झाली होती. संदर्भ ( इंग्रजी दुवा ): https://henryclubs.com/kaizad-kapadia-fitness-expert-and-founder-of-k11-school-is-49-died-of-covid-in/ असे अनेक मृत्यू करोनाच्या नावाखाली खपवण्यात आले आहेत. असल्या विदाची विश्वासार्हता शून्य आहे. ३.
नळाच्या पाण्याला सुद्धा जमत असेल तर आयसोलेट करा!
यापेक्षा करोना हे थोतांड आहे हे समजायला सरळ व सोपं आहे. ४.
कोव्हिड ची लस काम करते. मृत्यू, गंभीर आजार आणि हॉस्पिटलायझेशन तिन्ही गोष्टींपासून संरक्षण मिळते.
हा केवळ बिनबुडाचा दावा आहे. यांस कुठलाही आधार नाही. अनेक ठिकाणी लस घेतलेले लोकंच रुग्णालयात परतून दाखल होताहेत. दर वेळेस विषाणूत जरा काही बदल घडला की नवी लस घ्यावी लागते. याचाच अर्थ असा की जुनी लस टाकाऊ ठरली आहे. ५.
लेख वाचला. तो एक्सपिरिमेन्टल लसींबद्दल आहे.
आज घडीच्या ( दिनांक १० मे २०२२ ) करोनाच्या सर्व लशीही प्रायोगिकच आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 05/10/2022 - 16:33 नवीन
फक्त करोनामुळे कोणी मृत्यू पावंत नसतो. आणि मग करोनासोबत इतर विषाणू सापडले अंगात तर ते ही मृत्यूचे कारण म्हणून धरणार का?
मी वर दिल्याप्रमाणे- फक्त कोव्हिड पॉझिटिव्ह असणे हा निकष नसतो. कोव्हिडचे मृत्यूत योगदान असेल तरच कोव्हिड मृत्यूचे कारण म्हणून गणले जाते.
प्रत्यक्षांत परिस्थिती नेमकी उलट आहे. कायझाद कापडिया हृदयविकारी झटक्याने वारला. तरी त्याची नोंद करोनामृत्यू अशी झाली होती. संदर्भ ( इंग्रजी दुवा ): https://henryclubs.com/kaizad-kapadia-fitness-expert-and-founder-of-k11-... असे अनेक मृत्यू करोनाच्या नावाखाली खपवण्यात आले आहेत. असल्या विदाची विश्वासार्हता शून्य आहे.
श्वास घेण्यास त्रास होऊन अत्यंत कमी वेळात अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. माझ्या व्यक्तिगत ओळखीच्या २-३ व्यक्तींचा सुद्धा असाच मृत्यू झाला आहे. त्यांना ह्रदयविकार नव्हता, टेस्ट पॉझिटिव्ह होती आणि अचानक श्वास घेण्यात त्रास होऊन काही करायच्या आत मृत्यू झाला. ICMR च्या गाईडलाईन्स वर इतक्या वरवरच्या बातमीने टिप्पणी करणे मला तरी भयंकर धाडसाचे काम वाटते बुवा. आणि गेल्या वर्षीच्या ट्रेंड प्रमाणे जितके मृत्यू अपेक्षित होते त्यापेक्षा इतके जास्त मृत्यू कसे झाले ? आणि कोव्हिडच्या पीक महिन्यांमध्येच कसे झाले- ह्याचे तुमच्यापाशी काय एक्सप्लेनेशन आहे काय ?
हा केवळ बिनबुडाचा दावा आहे. यांस कुठलाही आधार नाही.
अर्थातच आहे ! हॉस्पिटलायझेशन-लस घेतलेलं वि. न घेतलेले During October–November, unvaccinated persons had 13.9 and 53.2 times the risks for infection and COVID-19–associated death, respectively, compared with fully vaccinated persons who received booster doses, and 4.0 and 12.7 times the risks compared with fully vaccinated persons without booster doses. मी मार्कस ह्यांना दिलेल्या प्रतिसादात एक दुवा आहे- त्यात सरळ सरळ रिपब्लिकन मत देणारे लोक- लसी घेत नव्हते- त्यामुळे जास्त मेले असा दावा आहे. तुम्ही त्यात अमेरिकेच्या एकन एक कौंटीची माहिती काढून बघू शकता. तिथे सरळ ट्रेंड दिसतोय कि ट्रम्प ला मत देणारे- लसी घेत नव्हते- जास्त मेले (वयाची अडजस्टमेंट करूनसुद्धा)
अनेक ठिकाणी लस घेतलेले लोकंच रुग्णालयात परतून दाखल होताहेत.
विदा पाहता तुमचे विधान चूक आहे. लस न घेतलेले जास्त हॉस्पिटलायझेशन करावे लागत आहेत. त्यांचा धोका कित्येक पट जास्त आहे.
दर वेळेस विषाणूत जरा काही बदल घडला की नवी लस घ्यावी लागते. याचाच अर्थ असा की जुनी लस टाकाऊ ठरली आहे.
टाकाऊ नाही. नव्या व्हरायन्ट्स समीर लस कमी प्रभावी असली तरी, वर लिहिल्याप्रमाणे- हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यू पासून संरक्षण देते.
आज घडीच्या ( दिनांक १० मे २०२२ ) करोनाच्या सर्व लशीही प्रायोगिकच आहेत.
गामा, माझा मुद्दा होता की पसरणारी लस हि सध्या फक्त आणि फक्त संकल्पना आहे. एक्सपिरिमेन्टल शब्द चुकलाच म्हणायचा, पसरणारी लस हि चालू घडीला शुद्ध फॅन्टसी आहे आणि चर्चेत तिचा उल्लेख निरुपयोगी आहे. पसरणारी प्रतिकारशक्ती, प्रतिकारशक्ती पसर्वणारी लस ह्या दोन्ही गोष्टी केवळ फॅन्टसी आहेत. ~आ. न., कॉमी.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/11/2022 - 00:02 नवीन
कॉमी, १.
हॉस्पिटलायझेशन-लस घेतलेलं वि. न घेतलेले
During October–November, unvaccinated persons had 13.9 and 53.2 times the risks for infection and COVID-19–associated death, respectively, compared with fully vaccinated persons who received booster doses, and 4.0 and 12.7 times the risks compared with fully vaccinated persons without booster doses. उपरोक्त लेखात खाली एक विधान सापडलं : .... the influence of the Omicron variant on COVID-19–associated deaths by vaccination status in December could not be evaluated. Substantial case rate increases were recorded among unvaccinated and vaccinated persons when Omicron became the predominant variant in December .... याचा अर्थ करोनाच्या ओमायक्रॉन आवृत्तीसमोर आधीची लस कुचकामी ठरते आहे. मग डेल्टा आवृत्तीची आकडेवारी कालबाह्य आहे. लस जर टिकणार नसेल तर तिचा उपयोग काय? शिवाय ही आकडेवारी अमेरिकेतली आहे. भारताशी हिचा काय संबंध? २.
.... रिपब्लिकन मत देणारे लोक- लसी घेत नव्हते- त्यामुळे जास्त मेले असा दावा आहे. तुम्ही त्यात अमेरिकेच्या एकन एक कौंटीची माहिती काढून बघू शकता.
तूर्तास मला भारतातल्या परिस्थितीत अधिक रस आहे. पण वेळ मिळाल्यास नंतर हि आकडेवारी पाहीन. अर्थात, रोग्यांचा डेम/रिप आदि कृत्रिम वर्गीकरणावर माझा विश्वास नाही. ३.
लस न घेतलेले जास्त हॉस्पिटलायझेशन करावे लागत आहेत.
इथे जवळंच उत्तर आयर्लंडात उलट परिस्थिती आहे. लस घेतल्याने काही फरक पडत नाही. असं निदर्शनास आलं आहे. कृपया पान क्रमांक ९ वरील आलेख पाहणे : https://www.health-ni.gov.uk/sites/default/files/publications/health/doh-vaccination-status-weeks-03-06.pdf Image removed. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा एक अहवाल प्रकाशित झालाय. त्यानुसार लस घेतलेले अधिक प्रमाणावर रुग्णालयात भरती होताहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.ox.ac.uk/news/2021-09-20-vaccinated-groups-highest-risk-covid-19-hospitalisation-and-death-identified-using ४.
.... पसरणारी लस हि चालू घडीला शुद्ध फॅन्टसी आहे ....
करोनाचा विषाणू विलग झालेला नसतांना विकसित केलेली कुठलीही लस ही देखील एक फ्यांटसीच आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/11/2022 - 05:33 नवीन
पहिला मुद्दा- चुकीचे वाचन.
ऑक्सफर्ड विद्यापीठाचा एक अहवाल प्रकाशित झालाय. त्यानुसार लस घेतलेले अधिक प्रमाणावर रुग्णालयात भरती होताहेत ( इंग्रजी दुवा ) : https://www.ox.ac.uk/news/2021-09-20-vaccinated-groups-highest-risk-covi...
सदर दुवा वाचला असता तुम्ही धडधडीतपणे चुकीचा आणि लेखात कुठेही न दिलेला निष्कर्ष काढला आहे. ऑक्सफर्डने जे टूल तयार केले आहे, ते लस घेतलेल्याच लोकांमध्ये कोणते विशिष्ठ गट हॉस्पिटलाइझ होण्याची शक्यता आहे- इतकेच वर्तवणारे आहे. त्यातून लस घेतलेले लोक न लस घेतलेल्यांपेक्षा अधिक रुग्ण म्हणून भरती होतायत असा आजिबात अर्थ निघत नाही! सदर लेखात दिलेल्या टूल चा उद्देश आहे- लसीचे दोन डोस घेऊनही मृत्यूचा धोका संभावणारे गट शोधणे- आणि ते टूल प्रमाणे खालील आहेत-
  • Those who are immunosuppressed as a result of chemotherapy, a recent bone marrow or solid organ transplant, or HIV/AIDS
  • People with neurological disorders, including dementia and Parkinson’s
  • Care home residents, and those with chronic disorders including Down’s Syndrome
तर ह्या लोकांना लस घेऊनसुद्धा मृत्यूचा धोका इतर लस घेतलेल्याच लोकांपेक्षा अधिक संभवतो. लेखात आणखी एक गोष्ट दिली आहे- The researchers report that there were relatively few COVID-19 related hospitalisations or deaths in the group who had received the second dose of any vaccine, meaning that the study lacked the statistical power to determine if the groups listed above are more, or less, at risk following a second vaccine dose compared with following the first dose. आणि वरील जे गट आहेत- ते वेगळे करणे का गरजेचे आहे- तर त्यांना बूस्टर वैगेरे गोष्टी प्रायोरिटी ने मिळाव्यात. सदर लेखात लस न घेतलेल्या लोकांचा दुरान्वये संबंध येत नाही. त्यामुळे लस न घेतलेल्यांपेक्षा लस घेतलेल्यांना जास्त धोका आहे असा निष्कर्ष तुम्ही दिलेल्या लेखातून आजिबात निघत नाही. ती माहिती तुमचे इथे पाहू शकता- Monthly age-standardised mortality rates (ASMRs) for deaths involving coronavirus (COVID-19) have been consistently lower for all months since booster introduction in September 2021 for people who had received a third dose or booster at least 21 days ago, compared with unvaccinated people and those with a first or second dose. हि अतिशय बेसिक लोच्या टाईप गोष्ट असल्याने देतोय. उरलेल्यावर सावकाश प्रतिसाद देईन.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 05/11/2022 - 20:17 नवीन
कॉमी,
त्यामुळे लस न घेतलेल्यांपेक्षा लस घेतलेल्यांना जास्त धोका आहे असा निष्कर्ष तुम्ही दिलेल्या लेखातून आजिबात निघत नाही.
तुमचं बरोबर आहे. पण मी असा निष्कर्ष का काढला ते सांगतो. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा दुवा आता चालंत नाही. तो जनतेस बंद केला आहे. मात्र त्यातील संशोधन इतरत्र उपलब्ध आहे. त्यानुसार मूळ लेख British Medical Journal मध्ये प्रकाशित झाला होता. त्या मूळ लेखाचा दुवा असा आहे : https://www.bmj.com/content/374/bmj.n2244 या मूळ दुव्यात लशीकृत माणसांच्या रुग्णालयात दाखल होण्याविषयी अंदाज व्यक्त केले आहेत. तसंच हे अंदाज व्यक्त करायची गरज का पडते हे ही सांगितलं आहे. हे विश्लेषण जाम गोलमटोल भाषेत आहे. त्यानुसार लस टोचल्यावर काही जणांना गंभीर प्रतिक्रिया उमटू शकते. पण अशांच्या चाचण्या केलेल्या नसल्याने गंभीर प्रतिक्रियांसंबंधी नक्की धोके कोणते ते आजूनही माहित नाही. मग लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा कशाच्या हवाल्याने दिला जातोय? उत्तर : कसल्याही नाही. हा निर्वाळा हवेतला इमला आहे. आता तुम्ही दिलेला दुवा पाहूया : https://www.ons.gov.uk/peoplepopulationandcommunity/birthsdeathsandmarriages/deaths/bulletins/deathsinvolvingcovid19byvaccinationstatusengland/deathsoccurringbetween1january2021and31january2022#deaths-by-vaccination-status-england-data या दुव्यावर गेलं की Deaths by vaccination status, England नामे दुवा दिसतो : https://www.ons.gov.uk/peoplepopulationandcommunity/birthsdeathsandmarriages/deaths/datasets/deathsbyvaccinationstatusengland या दुव्यावर एक *.xlsx धारिका आहे : https://www.ons.gov.uk/file?uri=%2fpeoplepopulationandcommunity%2fbirthsdeathsandmarriages%2fdeaths%2fdatasets%2fdeathsbyvaccinationstatusengland%2fdeathsoccurringbetween1january2021and31january2022/referencetable20220316accessible.xlsx ही धारिका मी गूगल ड्राईव्ह वर चढवली : https://docs.google.com/spreadsheets/d/1EO9dTmqiQpkA5Xo5-K4QIm0AFH91zNRx/edit?usp=sharing&ouid=100551450179791984794&rtpof=true&sd=true Table3 मध्ये लशीकृत व लसविहीन मृत्यूंची नोंद आहे. दोन्हींत फारसा फरक नाही. मग लस घ्यायचीच कशाला? असाच काहीसा कल बाकी तालिकांत आढळून येतो. एक्सेल चाळणी ( data fileters ) लावून विदा तपासून पाहता येईल. इंग्लंड मध्ये ८० % ते ९० % लोकांचं लशीकरण झालेलं आहे ( संदर्भ : https://www.bbc.co.uk/news/health-55274833 ). तरीही रुग्णालयात दाखल व मृत्यूंमध्ये लसीकृत व लसविहीन सारख्याच प्रमाणात म्हणजे ५० % आहेत. म्हणजेच लशी एका प्रकारे निरर्थक आहेत. असो. माझ्या मते काय घडलं ते सांगतो. लस हेच मृत्यूस कारण आहे. कारण की ते प्रतिकारयंत्रणेत मोडतोड घडवून आणतं. म्हणून लसीकृत लोकं परत परत रुग्णालयात दाखल होतात. नुकताच फेब्रुवारीत अमेरिकेतला एक ७ वर्षांचा मुलगा फायझरची लस घेतल्यावर हृत्शूलाने ( = हार्ट अॅटॅक ने ) मृत्युमुखी पडला. लस सोडल्यास दुसरं काय कारण आहे? बातमी : https://expose-news.com/2022/05/10/7-year-old-boy-dies-from-pfizer-injection/ हे घ्या इंग्लंडमधील बाळहत्येचे आवाहन : https://i.imgur.com/KWzgONK.jpeg Image removed. प्रतिकारयंत्रणेची मोडतोड लपवण्यासाठी विषाणूत उत्परिवर्तन झाल्याची खोटी किंवा खरी हाकाटी पिटली जाते. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/12/2022 - 09:57 नवीन
https://www.bmj.com/content/374/bmj.n2244 या मूळ दुव्यात लशीकृत माणसांच्या रुग्णालयात दाखल होण्याविषयी अंदाज व्यक्त केले आहेत. तसंच हे अंदाज व्यक्त करायची गरज का पडते हे ही सांगितलं आहे. हे विश्लेषण जाम गोलमटोल भाषेत आहे. त्यानुसार लस टोचल्यावर काही जणांना गंभीर प्रतिक्रिया उमटू शकते. पण अशांच्या चाचण्या केलेल्या नसल्याने गंभीर प्रतिक्रियांसंबंधी नक्की धोके कोणते ते आजूनही माहित नाही.
सदर लेख वरवर वाचला असता, त्यात वरिल लेखाचेच आणखी शास्त्रिय भाषेतले रुप आढळले. त्यात लसी नंतर उमटणार्या प्रतिक्रियेबद्द्ल वरकरणीतरी काही उल्लेख दिसला नाही. त्यातल्या स्पेसिफिक भागात असल्यास उपकृत करावे. लस घेतल्यावर सुद्धा कोणते गट धोक्यात असू शक्तात हे शोधणे महत्वाचे आहेच. तेच या दोन्ही लेखांमध्ये दिसले.
Table3 मध्ये लशीकृत व लसविहीन मृत्यूंची नोंद आहे. दोन्हींत फारसा फरक नाही. मग लस घ्यायचीच कशाला? असाच काहीसा कल बाकी तालिकांत आढळून येतो. एक्सेल चाळणी ( data fileters ) लावून विदा तपासून पाहता येईल.
विदा पाहिला. लस घेतलेल्या लोकांचा (किमान एक डोस) कोव्हिद मृत्युंमधला वाटा- ४१.६७% लस न घेतलेल्या लोकांचा वाटा- ५८.३३% किमान १ डोस घेतलेले युके मध्ये ९२% लोक आहेत. ८% लोकसंख्या पूलमधून ५८% मृत्यु होतायत हा आकडा बरेच काही बोलून जातो. जेव्हा १००% लसीकरण होइल तेव्हा १००% मृत्यु लसिकरण झालेल्या गटातूनच असणार आहेत. म्हणजे सगळ्यांचे लसीकरण झाल्यावर एक माणूस मेला तर १००% मृत्यु लसीकरण झालेल्यांचेच आहेत म्हणत तुम्ही "लस घेउन आम्हाला काय फायदा झाला ?" असा तर्कदुष्ट सवाल करणार. जसे जसे दुसरा डोस, तिसरा/चौथा डोस- पुढे पुढे जाता तसे एकूण मृत्युमधला वाटा कमी होत जातो आणि मृत्युदर देखील कमी होतो. आणि ज्या डेटावरुन टिप्पणी होत आहे त्याच डेटावरुन त्याच संस्थेने लसीकरण झालेल्या गटांमध्ये मृत्युदर कमी आहे असे सांगितले आहे. लसीकरण वाढल्याने एकूण मृत्यु सुद्धा घटले आहेत.
लस हेच मृत्यूस कारण आहे. कारण की ते प्रतिकारयंत्रणेत मोडतोड घडवून आणतं. म्हणून लसीकृत लोकं परत परत रुग्णालयात दाखल होतात. नुकताच फेब्रुवारीत अमेरिकेतला एक ७ वर्षांचा मुलगा फायझरची लस घेतल्यावर हृत्शूलाने ( = हार्ट अॅटॅक ने ) मृत्युमुखी पडला. लस सोडल्यास दुसरं काय कारण आहे? बातमी : https://expose-news.com/2022/05/10/7-year-old-boy-dies-from-pfizer-injec...
तुमचे मत निराधार आहे. इतकेच नव्हे ते तर्कदूष्ट सुद्धा आहे. लस घेण्याअधी इतके लोक मेले आहेत. लस घेणार्यातले १% सोडा, ०.०००००१% सुद्धा लसीमुळे रिअ‍ॅक्शन येऊन मेले नाहियेत. कोण कुठला हा एक्ष्पोसे पेपर- काय ती शेंडा व बुडखा नसलेली बातमी. मुलाचे नाव नाही, वैद्यकिय तज्ञांचे मत नाही, लस आणि मृत्यु मध्ये संबंध काय तर १३ दिवसांचे अंतर इतकेच. VAERS हा आजिबात विश्वसनीय स्त्रोत नाहिये. त्यात कोणीही काहिहि लिहू शकतं. बर, तुम्हाला भारतातली परिस्थीती हवी होता ना- ही बघा. Unvaccinated account for 92% Covid deaths in 2022: ICMR
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 06/18/2022 - 06:23 नवीन
Unvaccinated account for 92% Covid deaths in 2022: ICMR भारतात लसीकरण 2021 मध्ये सुरू झाले जोर एप्रिल मई मध्ये पकडला. त्या आधीचे सर्वच बिना लस घेतलेले होते. अर्थात भ्रमित करणारा दावा. माझ्या घरी सर्वांना लस घेतल्या नंतर करोंना झाला. अधिकान्श लोक चुकीच्या औषधी घेतल्याने मेले करोंनाने नाही. आता पुन्हा करोंना लाट येत आहे. पूर्वी सारखी घातक नसेल तरीही यावेळी स्वस्त आयुर्वेदिक औषधी घेणे अधिक उपयुक्त. (गिलोय तुळशी काढा घेतली तरी चालेल). पतंजलि शिक्षण संस्थान करोंना काळात एक ही दिवस बंद झाले नाही त्यांनी विद्यार्थ्यांना फक्त हाच काढा दिला होता आणि रोज एक तास योग आणि व्यायाम.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 06/18/2022 - 12:23 नवीन
भारतात लसीकरण 2021 मध्ये सुरू झाले जोर एप्रिल मई मध्ये पकडला. त्या आधीचे सर्वच बिना लस घेतलेले होते. अर्थात भ्रमित करणारा दावा.
पटाईटजी तुमचे ते योगा बिगा, आयुर्वेद बियुर्वेद काय आळवायचे ते आळवा. पण उगाच मुद्दामून चुकीचे वाचन करू नका. नीट वाचा.
भारतात लसीकरण 2021 मध्ये सुरू झाले जोर एप्रिल मई मध्ये पकडला. त्या आधीचे सर्वच बिना लस घेतलेले होते. अर्थात भ्रमित करणारा दावा. माझ्या घरी सर्वांना लस घेतल्या नंतर करोंना झाला. अधिकान्श लोक चुकीच्या औषधी घेतल्याने मेले करोंनाने नाही.
ICMR ने केलेला दावा- "2022 मध्ये मृत्यू झालेल्यांपैकी 94% लस न घेतलेले होते." डिसेंम्बर 2021ला लसीकरण टक्का होता 89 %. उगाच फेकफेकी करून दिशाभूल करू नका.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 07/27/2022 - 18:31 नवीन
पटाईटजी तुमचे ते योगा बिगा, आयुर्वेद बियुर्वेद काय आळवायचे ते आळवा. पण उगाच मुद्दामून चुकीचे वाचन करू नका. नीट वाचा. ज्यांनी सोबत आयुर्वेदिक औषधी घेतली ते जिवंत राहिले विज्ञाननिष्ठ औषध फक्त आयुर्वेद जवळ होते. योग आणि आयुर्वेदाने आपल्या देशात कोट्यावधी लोकांचे रक्षण केले हेच सत्य आहे. तथाकथित मॉडर्न ???जवळ औषधे नव्हतेच. नुकताच एका औषधाचा 1000 कोटींचा घोटाळा उघड झाला आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 07/27/2022 - 18:52 नवीन
भारतात लसीकरण 2021 मध्ये सुरू झाले जोर एप्रिल मई मध्ये पकडला. त्या आधीचे सर्वच बिना लस घेतलेले होते. अर्थात भ्रमित करणारा दावा.
हि थाप मारली तुम्ही, त्याकडे आता लक्ष आजिबात दिले नाही. असो.
ज्यांनी सोबत आयुर्वेदिक औषधी घेतली ते जिवंत राहिले विज्ञाननिष्ठ औषध फक्त आयुर्वेद जवळ होते. योग आणि आयुर्वेदाने आपल्या देशात कोट्यावधी लोकांचे रक्षण केले हेच सत्य आहे. तथाकथित मॉडर्न ???जवळ औषधे नव्हतेच.

via GIPHY

इतके तथ्यहीन आणि भंपक विधान आहे की मी काही न लिहिता सुद्धा सगळ्यांना फोलपणा समजेल.
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 07/27/2022 - 19:32 नवीन
हैद्राबाद मधे आमचे एक जुने ओळखिचे आहेत. ते कुंडली बघुन भविष्य, घर बघुन वास्तु, हात बघुन अवलक्षण, आपलं ते भविष्य वगेरे वगेरे करतात. त्यांनी म्हणे (म्हणे च बरंका) कित्येकांची कुंडली बघुन त्याला कोरोना होइल की नाही हे सांगीतले होते. वर कोरोनाचे निदान पण केले होते. आहात कुठे? त्यांनी म्हणे (पुन्हा म्हणे च बरंका) एक ईलेक्ट्रोनिक डीवाईस शोधले आहे जे वैदीक प्रींसिपल नुसार घरात पॉसिटीव एनर्जी रेडीएट करते. (हायला मराठीत कसे लिवायचे हे सारे). किंमत फकस्त २०० डॉलरा. दोन घेतले तर ३०० डॉलरा . . जितके जास्त घ्याल तितके जास्त डॉलरा सुट . . एजन्सी घावी म्हणतो. . .
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा